Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

फार्म हाऊस की नुसतीच हौस???????

म
मुक्त विहारि
Mon, 07/04/2016 - 17:10
🗣 135 प्रतिसाद
डिस्क्लेमर : खालील लेख हा संपूर्ण काल्पनिक आहे.केवळ माझा वेळ जात नाही म्हणून लिहिला आहे.तुमचा वेळ जर अमुल्य असेल तर, खालील लेख नाही वाचलात तर फार उत्तम. ============================================ शेती करण्यापुर्वी बर्‍याच जणांचा सल्ला घेतला.त्यापैकी ज्यांनी खूप विरोध व्यक्त केला, ते सगळेच शहरातील.त्यातही बर्‍याच जणांचे मत असे पडले की, शेतीत पैसे घालवण्यापेक्षा , एखादे टूमदार फार्म हाऊस विकत घेतलेले परवडते.पुढे मग "फार्म हाऊस." ह्या संकल्पनेतील धोका लक्षांत यायला लागला आणि मी फार्म-हाऊस ही माझी नुसतीच हौस ह्या सदरांत मोडेल म्हणून तो विचार बाजूला सारला. पण गेल्याच आठ्वड्यांत आमच्या एका हितचिंतकाने, हा विचार परत मला ऐकवला म्हणून हा धागा प्रपंच. आमचा थोडक्यात संवाद असा. तो : तुम्ही शेत विकत घेताय म्हणे? मी : हो. तो : काय भावात पडले? मी : साधारणे सर्व खर्च वजा जाता एकरी २,५०,०००/- ला पडेल. तो : अरे.मग शेत घेण्यापेक्षा फार्म हाऊस विकत घ्यायचे.मी मागच्याच वर्षी एक विकत घेतले. मी : कितीला? तो : साधारण पणे ३०,००,०००/- खर्च झाले.जवळपास अर्धा एकर जागा आहे.शिवाय त्यात आंबा,नारळ इत्यादी झाडे पण आहेत. मी : अरे व्वा!!! मस्तच. तो : आता ६-७ वर्षांनी आम्ही तिथेच रहायला जावू. मी : मस्त. तो : सध्या आम्ही तिथेच एक कुटुंब ठेवले आहे.ते सध्या देखभाल करत आहेतच. मी : छान. तो : आता अजिबात शक्यच नाही झाले तर, ज्याने विकले आहे तो परत विकत घ्यायला किंवा विकायला मदत पण करणार आहे. मी : ओके. हे तर फारच उत्तम. तो : तुमच्या शेती पेक्षा, आमचे फार्म हाऊस फायदेशीर ठरणार बघ. मी : असे झाले तर फार उत्तम. तो : तू पण फार्म-हाऊसच विकत घ्यायला हवे होतेस. मी : हो ना.पण काय आहे, माझी जागे बाबतची संकल्पना फार वेगळी आहे.मी सामान्य माणूस असल्याने, अन्न-वस्त्र-निवारा, अशीच माझी चढती भाजणी आहे.शेतात जर अन्नच पिकत नसेल तर शेताचा उपयोग काय? तो : अरे, तू एकदा माझे फार्म हाऊस बघायला हवेस. मी : अरे हो.नक्कीच येईन.पण हे आहे कुठेशी? तो : अरे ते ढिकणेवाडीला आहे.म्हणजे फलाणेवाडी पासून साधारण १०-१२ किमी अंतरावर. मी : अरे व्वा!!!! मग कधी जावू या. तो : आता इतक्यात तरी काही शक्य नाही.ह्या डिसेंबरला त्या टलाण्या हॉटेल स्कीम मध्ये पैसे गुंतवले आहेत ना.ते थोडे वसूल करायला गोव्याला जाणार आहे.त्यामुळे उन्हाळ्यात नक्की जावू. मी : उन्हाळ्यात मला जमेल असे वाटत नाही.कारण ह्या उन्हाळ्यात शेतात बरेच खड्डे खणायचे आहेत. तो : बघ. ही शेती म्हटली की असे अडकायला होते.म्हणूनच फार्म हाऊस घ्यायचे.आपण मनांत आले की, लगेच निघू शकतो. मी : हो ना.पण ते जावू दे.मग उन्हाळ्यात तू नक्की जाणार ना? कारण वहिनी म्हणत होत्या की, इथला उन्हळा त्यांना झेपत नसल्याने तुम्ही ह्यावर्षी युरोपला किंवा कूलु-मनालीला जाणर म्हणुन. तो : हं.ते पण आहेच म्हणा.सध्या उकाडा इतका वाढला आहे की, एक स्वयंपाकघर सोडले तर प्रत्येक खोलीत ए.सी. मी : (मनांत.आता बाथरूम आणि संडासात पण ए.सी. लावतो की काय? असेल ही.) आता आजकाल उन्हाळा जरा जास्त्च वाढला आहे. तो : अरे ह्यावर्षी आम्ही नेमके उन्हाळ्यातच फार्म-हाऊस वर गेलो होतो.आमच्या फार्म हाऊसच्या इथे रेंज मिळत नाही.खूप प्रयत्न केला पण त्या आमच्या घरगड्याशी काही संपर्क होइना.घरी पोहोचलो तर घरी कुणीच नाही.आणि शेजारचे सगळेच बंगले रिकामे.मग काय? परत फलाणेवाडीला आलो आणि तिथल्याच एका हॉटेलमध्ये जेवलो आणि तिथेच राहिलो. मी : गूड.हे मस्त.शहर जवळ असल्याचा हा एक फायदाच की. तो : हो ना.मग दुसर्‍या दिवशी आम्ही तिथे गेलो तर काय.घरात बरीच घाण.दारे आणि खिडक्या बंद असल्याने घरात कोंदट हवा.शिवाय सध्या तिथे आसपास कुणीच नसल्याने, मुख्य टाकीत पाणीच न्हवते.रखवालदार पण नेमका उशीरा आला.तेंव्हा समजले की पंप जळालेला आहे आणि सोसायटीला अद्याप सेक्रेटरी नसल्याने, तो पंप काही दुरुस्त झालेला नाही.मग त्याच्या मदतीने कसे तरी संध्याकाळी वायरमनला गाठले.वायरमन म्हणाला आधी मागच्या कामाचे पैसे द्या.मगच हात लावतो.मग काय? वायरमनला पटवून त्या दिवसापुरता पंप चालू करून घेतला.चांगले ५००/-रु दिले. अर्थात सुरुवातीला ह्या अडचणी येणारच. पाणी सुरु होता-होता रात्र उजाडली तेंव्हा समजले की, घरातील काही ट्युब लाईट चालत नाही आहेत.खरे तर मागच्या वेळीच त्या बदलल्या होत्या पण आता परत बिघडल्या.रखवालदार म्हणाला की, तिथे लाईटचे फ्लक्च्युएशन जास्त असल्याने सगळ्याच घरातील ट्यूब लाईट जातात. कसे-बसे जेवण घेतले आणि झोपायची तयारी केली...तर काय? सगळ्या चादरींना कुबट वास आणि उंदरांनी पाडलेली भोके. आता घरी झोपायचा नाद सोडला आणि परत मुक्काम पोस्ट फलाणेवाडी. आता तिसर्‍या दिवशी माझी परत एक चक्कर फार्म हाऊसवर करायचा विचार होता.पण तो दिवस समुद्र किनार्‍यासाठी राखीव असल्याने मग सरळ समूद्र किनार्‍यावर गेलो.मुले तिथेच जास्त रमल्याने मग तिथेच २ दिवस राहिलो आणि मग परत मुंबईला आलो. आता परत एकदा फार्महाऊसवर जावे म्हणतो. मी : का रे? तो : अरे मागच्या वेळी, तो पंप दुरुस्त करण्याच्या वेळी, तो रखवालदार बोलता बोलता म्हणाला की, इथल्या एका सभासदाला त्याचे फार्म हाऊस विकायचे आहे.साधारण २-३ वर्षांपुर्वी त्याने २५ लाखाला विकत घेतले पण सध्या त्याला फारच आर्थिक अडचण असल्याने, तो २२ लाखाला पण द्यायला तयार आहे.बघ तुझी इच्छा असेल तर, आपण लगेच बोलणी करू. मी : बरे मला एक सांग.हे जर ३०,००,०००/- तू बँकेत ठेवले असतेस तर तुला ह्या वर्षी किती मिळाले असते. तो : आता फिक्स मध्ये ठेवले असते तर ह्या वर्षी २,५०,०००/- नक्की.पण का रे? मी : काही नाही.इतक्या व्याजाच्या पैशांत माझी आणि माझ्या बायकोची, एक १५-२० दिवसांची कंबोडिया ट्रिप नक्कीच झाली असती. तो : अरे कंबोडिया काय बघतोस? त्यापेक्षा आमचे फार्म हाऊस बघ. आता पुढे मला काही बोलवेना.
वर्गीकरण
फार्म हाऊस की नुसतीच हौस???????

प्रतिक्रिया द्या
63178 वाचन

💬 प्रतिसाद (135)
म
मुक्त विहारि Sun, 12/12/2021 - 12:52 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी
क
कर्नलतपस्वी Fri, 03/19/2021 - 19:21 नवीन
कविवर्य बा भ बोरकर यांच्या कवीतेप्रमाणे. आता विसाव्याच्या क्षणी मस्त जगायचं कुणी कुणासाठी थाबंत नाही कुणी कुणाच्या आयुष्याला पुरत नाही आस म्हणाल तर काही अर्थच उरत नाही असेल तोवर मस्त रहायचं नंतर फक्त आठवणींत जगायचं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
म
मुक्त विहारि Sat, 03/20/2021 - 01:33 नवीन
आर्थिक, शारीरिक, मानसिक ताकद असेल आणि कौटुंबिक मान्यता असेल तर, सामाजिक कामे पण करू शकतो... सामाजिक कार्य करण्यासाठी, ह्या चारही गोष्टी हव्यातच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी
प
प्रकाश घाटपांडे Sat, 03/20/2021 - 14:32 नवीन
'यावज्जीवेत् सुखं जीवेत् ऋणं कृत्वा घृतं पिबेत्। भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः।।" असा अर्थ बोरकरांना अभिप्रेत आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी
R
Rajesh188 Sat, 03/06/2021 - 10:35 नवीन
रोजचा खर्च चालण्यासाठी तुमच्या कडे पेन्शन आहे,औषध किंवा बाकी extra खर्च निघाला तर रो हाऊसेस चे भाडे आहे . म्हणजे खर्च कसा चालणार,आजारी पडलो तर उपचार साठी पैसे कोठून येणारं ही समस्या तुम्हाला नाही. एक महत्वाची समस्या वर कायम स्वरुपी उपाय तुमच्या कडे. आता काही तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी पैसे कमवायचे नाहीत. तुम्हाला तुमचे छंद जपता आले पाहिजेत कोणत्यातरी कामात गुंतून राहिले तर विरंगुळा सुद्धा मिळतो आणि समाधान सुद्धा मिळते. शेती तुम्ही छंद म्हणून घ्या गुंतवणूक म्हणून नाही. पण कर्ज काढून नको आणि जास्त पण नको. तुमच्या राहण्याच्या ठिकाणापासून जवळ ,कोणतीच समस्या नसलेली आणि पाणी उपलब्ध असलेली १० गुंठे जमीन पण खूप झाली. त्या जमिनीत तुम्ही विविध प्रयोग करू शकता. कोणतेही रासायनिक खत न वापरता भाज्या,फळे पिकवू शकता आणि उत्तम दर्जा चे अन्न निर्माण करू शकता. झाडांच्या सानिध्यात दिवस कसा छान जातो. त्यांना वाढताना बघून खूप आनंद आणि समाधान मिळते. पण तुम्हाला त्या ची आवडा असेल तरच. आता फक्त आपले छंद जपायचे आणि त्या मधून पैसे मिळाले तर बोनस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
R
Rajesh188 Sat, 03/06/2021 - 10:35 नवीन
रोजचा खर्च चालण्यासाठी तुमच्या कडे पेन्शन आहे,औषध किंवा बाकी extra खर्च निघाला तर रो हाऊसेस चे भाडे आहे . म्हणजे खर्च कसा चालणार,आजारी पडलो तर उपचार साठी पैसे कोठून येणारं ही समस्या तुम्हाला नाही. एक महत्वाची समस्या वर कायम स्वरुपी उपाय तुमच्या कडे. आता काही तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी पैसे कमवायचे नाहीत. तुम्हाला तुमचे छंद जपता आले पाहिजेत कोणत्यातरी कामात गुंतून राहिले तर विरंगुळा सुद्धा मिळतो आणि समाधान सुद्धा मिळते. शेती तुम्ही छंद म्हणून घ्या गुंतवणूक म्हणून नाही. पण कर्ज काढून नको आणि जास्त पण नको. तुमच्या राहण्याच्या ठिकाणापासून जवळ ,कोणतीच समस्या नसलेली आणि पाणी उपलब्ध असलेली १० गुंठे जमीन पण खूप झाली. त्या जमिनीत तुम्ही विविध प्रयोग करू शकता. कोणतेही रासायनिक खत न वापरता भाज्या,फळे पिकवू शकता आणि उत्तम दर्जा चे अन्न निर्माण करू शकता. झाडांच्या सानिध्यात दिवस कसा छान जातो. त्यांना वाढताना बघून खूप आनंद आणि समाधान मिळते. पण तुम्हाला त्या ची आवडा असेल तरच. आता फक्त आपले छंद जपायचे आणि त्या मधून पैसे मिळाले तर बोनस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
ट
टर्मीनेटर Sat, 03/06/2021 - 10:54 नवीन
१००% सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
श
शाम भागवत Sat, 03/06/2021 - 11:03 नवीन
२० लाख ही काही छोटी रक्कम नाही.त्यात मातीशिवाय शेती करता येऊ शकेल काय? म्हणजे एखाद्याकडे रिकामा प्लॅट असेल तर त्यात अशी शेती २० लाखात करता येऊ शकेल काय? त्यात निरनिराळ्या प्रकारच्या भाज्या पिकवणे वगैरे उद्योग करता येऊ शकतील काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
प
प्रकाश घाटपांडे Sun, 03/07/2021 - 05:52 नवीन
या पर्यायाचाही विचार झाला आहे.तिला हवे ते करायचे स्वातंत्र्य आहेच. मी लिजवर शेती ची हौस भागवण्याचा पर्याय सुचवला तरी तसा तो मिळत नाही. व मिळाला तरी स्वत:चे अशी भावना तिथे राहत नाही. माझ्या तीन पिढ्या शेतात व गावी गेल्या. माझे शिक्शण लहानपण गावी व शेतीततच गेले. शहरात आल्यावर शेत्या झेपेना म्हणुन विकल्या.. मला त्याचे नावीन्य नाही. पण बायको पुण्यात आयुष्य गेलेली. तिचे आईवडिल प्राथमिक शिक्षक होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
म
मुक्त विहारि Sun, 03/07/2021 - 06:32 नवीन
लीज वर जमीन देणारा, योग्य तो माणूस शोधतो... नो प्राॅफीट, नो लाॅस, हे मिनिमम बघायला लागेल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रकाश घाटपांडे Mon, 03/08/2021 - 11:35 नवीन
फक्त शेतजमीन घेउन त्यावर हौसेपोटी फार्महाउस बांधणे एवढेच अपेक्षित. त्यापासून कुठलेही उत्पन्न अपेक्षित नाही. हौसेला मोल नसतेचा मुद्दा सध्या १) मी18 लाख गुंतवणुक करुन मी 2003 मधे कर्वेनगर मधे एक रो हाउस घेतले . त्याची आज 2021 मधे त्याची बाजारभावाने किंमत 1.5 कोटी आहे. त्याचेच भाड्याचे उत्पन्न 23 हजार मिळते. एरिया डेव्हलपिंग आहे. ज्या बिल्डर कडून घेतले त्याचेच समोर 14 मजली कॉम्प्लेक्स होतो आहे. राहत्या घरापासुन २ किमी वर स्वतंत्र रो हाउस असे लिगल स्टेटस असलेले रो हाउस आहे. एरिया डेव्हलपिंग स्टेजला आहे. सोसायटीमधे नसल्याने कमर्शियल वापरासाठी उपयुक्त व लिगल असे स्टेटस आहे.. सध्या मुलांचे डे केअर नर्सरी तिथे आहे. छोट्या कंपनीसाठी, आयुर्वेदिक पंचकर्म, खाली दुकान वरती राहणे अशी गरज असलेल्या दुकानदारांसाठी वगैरे अत्यंत उपयुक्त आहे. डीपी रोड अजून झालेला नाही. मी अल्पसंतुष्टी आहे.शिवाय आळशी आहे. रिस्क कमीत कमी घ्यावी असा कल. शारिरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असणे हे महत्वाच मानणारा. माझी मानसिकता खाली लिंकवर दिलेल्या मठ या लेखात आहे. शिवाय जुन्या मिपाकरांना माहित आहे. बायको मात्र धडपडी workholic, Multitasker, उत्साही व भरपुर क्षमता असलेली आहे. तिचा जनसंपर्कही मोठा आहे. एक मिनिट शांत बसणे तिच्या स्वभावात नाही. घरांची खरेदी विक्रि भाड्याने देणे हा व्यवसाय. विशेषत: एनाराय लोकांसाठी तिचे उपयुक्तता मूल्य फार मोठे असल्याने सतत बिझी असते. आमच्या घरात कुटुंबप्रमुख तीच आहे. http://www.misalpav.com/node/46420 २) रिअल इस्टेटच्या किमती भविष्यात किती वाढतील याचा अंदाज अनेकांचा चुकतो.अगदी बिल्डर लोकांचा देखील चुकतो. अन्यथा आमच्या गृहसंकुलात बिल्डरने स्वत:साठी अनेक फ्लॅट ठेवले असते. 2005 मधे बिल्डर कडे 25 लाखला 3 बीचके होते ते आज 2021 मधे 1.8 सीआर ला रिसेल मधे जातात. दुसरा चर्चेत मुद्दा आला तो चांगला फायनान्शियल प्लॅनरचा जो ठरवायला अवघड आहे. इथे प्रश्न विश्वासार्हतेचा येतो. माझा एक सीएफए मित्र आहे त्याच्या कडे गुंतवणूक करत होतो पण नंतर त्याच्या धनदा इन्हेस्टमेंट प्रा लि. ची दिवाळे वाजले. त्यात अडकलेले पैसे गेलेच. मिळण्याची शक्यता फारच कमी. वेळोवेळी त्याने चांगले रिटन्स दिले होते. आता सरासरीमधे शून्य किंवा ऋण म्ह्णावे लागतील. त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीकडेच कल आहे. एक फटका खाल्लाय आता नको. पुढच्या वीस पंचवीस वर्षांचे प्लॅनिंग हे देशाच्या आर्थिक धोरणावरच अवलंबून राहणार. माझा अर्थशास्त्राचा फार संबंध येत नाही. इन्कमटॅक्स पेयर असे लेबल लावून घ्यायची इच्छाही अपुरी राहीली. तिथपर्यंत पोचलोच नाही. बायको भरते टॅक्स. अल्पसंतुष्टत्वात मला आनंद व समाधान आहे. जो देगा उसका भला जो नही देगा उसकाभी भला! पेन्शन देतय मायबाप सरकार बिनचूक.तशी चिंता नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
प
प्रकाश घाटपांडे Mon, 03/08/2021 - 11:45 नवीन
https://goo.gl/maps/dKGHQorYA7CvRmvY7 म्हणजे डेव्हलपिंग स्टेजचा अंदाज येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
N
nanaba गुरुवार, 03/11/2021 - 12:08 नवीन
जर तुम्ही कधी वापरणारच नसाल, तर १.५ क्रोर चे रो हाऊस विकून बावधन वगैरे सारख्या एरिया मधे ३ बीएच के घ्या. ( उदा. https://www.magicbricks.com/propertyDetails/3-BHK-1255-Sq-ft-Multistorey-Apartment-FOR-Sale-Bavdhan-in-Pune&id=4d423533333437313033) त्याचे भाडे येत राहिल - सेम अमाऊंट जी तुम्हाला आता मिळतेय. वर जे पैसे येतील त्यातून काकुंच्या इच्छेनुसार फार्म हाऊस घ्या. ९० +२० = ११०. तरीही ४० लाख राहतील - ते डिविडंट येईल अशा एमेफ, डीबेंचर्स मधे टाकलेत तर महिना ३०-३५ हजार असेच मिळू शकतील. जर २ बेडरूम चे घर घेतलेत तरी २० एक हजार भाडे येऊन, अजून पैसे एमेफ, डीबेंचर्स मधून मिळवू शकाल. रहात्या घराकरता हा पर्याय नाही. पण पडून राहिलेल्या घराला १.५ कोटी ला २४ हजार रिटर्न्स हा घाट्याचा व्यवहार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
म
मुक्त विहारि गुरुवार, 03/11/2021 - 12:13 नवीन
पण, मुळात, शेती ही दोघांनी करायची गोष्ट आहे... https://misalpav.com/node/36564 ह्या लेखांत मी, 3 नंबरला, हेच सांगीतले आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: nanaba
स
सुबोध खरे गुरुवार, 03/11/2021 - 14:41 नवीन
पडून राहिलेल्या घराला १.५ कोटी ला २४ हजार रिटर्न्स हा घाट्याचा व्यवहार आहे. यात आपण फक्त व्याजाचा/ भाड्याचा हिशेब धरला आहे. जर हीच जागा ७ वर्षांनी ३ कोटी रुपयाची झाली तर तो भांडवली नफा सुद्धा व्यवहारात धरावा लागतो. केवळ एकच भाग गृहीत धरणे चूक ठरेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: nanaba
N
nanaba Fri, 03/12/2021 - 04:55 नवीन
त्यांची दुसरी " रियल ईस्टेट" प्रोपर्टी रहाणार आहे, जीच्यात समांतर वाढ होईल. + फार्म हाऊसही आहे. (+ रहाते घर) + जर डिविडंट नको असेल तर एमएफ अधिक परतावा देऊ शकतात. ते ५८ वर्षांचे आहेत. पेंशन आहे, जबाबदारी नाही.. १५ वर्षाने काय होईल ह्याची चिंता करण्यापेक्षा आहे तो दिवस त्यांना मनाप्रमाणे जगता येईल ह्या पद्धतीन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
श
शाम भागवत Sat, 03/06/2021 - 10:54 नवीन
उतार वयात हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नये. (मला तुमचे निश्चित वय माहीत नाही) तुमच्याकडे असलेले २० लाख गेल्यामुळे किंवा त्यावर मिळणार्‍या उत्पनावर पाणी सोडल्यामुळे तुमच्या राहणीमानात कोणतीही उलथापालथ होणार नसेल तर गुंतवणूक करायला हरकत नाही. निवृत्तीवेतनाशिवाय मिळणार्‍या उत्पनातून कर्जहप्ता सहज फेडता येईल इतकेच कर्ज घ्यावे. कारण आपण किती जगणार के आपल्यालाच माहित नसते. अन्यथा आपल्या पश्चात आपल्या जोडीदाराला त्रास होऊ शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रकाश घाटपांडे Sat, 03/06/2021 - 11:38 नवीन
मी आता निवृत्ती तथा ५८ वयाचा आहे. पण मी २००७ मधेच स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. मुख्य मुद्दा हा आहे की आता हे २० लाख सोने, एफडी , नातेवाईकांकडून घेउन अशा प्रकारे उभे करावेत का? मला यात शुन्य रस साहे. किंवा मग ज्या घरापासून भाड्याचे उत्पन्न मिळते ते घर विकणे हा पर्याय राहतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
म
मुक्त विहारि Sat, 03/06/2021 - 11:44 नवीन
काही गरज नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
ट
टर्मीनेटर Sat, 03/06/2021 - 11:56 नवीन
मुख्य मुद्दा हा आहे की आता हे २० लाख सोने, एफडी , नातेवाईकांकडून घेउन अशा प्रकारे उभे करावेत का?
असे अजीबात करू नका असे माझे वैयक्तीक मत! परंतु हाती उपलब्ध असलेल्या रकमेतुन वर राजेश भाऊंनी म्हंटल्याप्रमाणे १० कींवा ५ गुंठे जमीन घेता येणे शक्य असल्यास तसा विचार नक्की करा. स्थावर मालमत्ताही होईल आणी हौस (काकुंची) पण पुर्ण होईल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
म
मुक्त विहारि Sat, 03/06/2021 - 13:58 नवीन
जितक्या सहजतेने फ्लॅट विकल्या जातात, तितक्या सहजतेने, जागा विकली जात नाही... त्यापेक्षा, सोने, हिरे लगेच विकल्या जाते... जागेचे असे आहे ना... पहिली पिढी लागवड, दुसरी पिढी उपभोग आणि तिसरी पिढी विकून टाकते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर
प
प्रकाश घाटपांडे Sun, 03/07/2021 - 05:42 नवीन
बायको माझ्यासारखी अल्पसंतुष्टी नाही. ती रिअल इस्टेट ब्रोकर आहे व रिअल इस्टेट मधील वकील आहे.म्हणजे इनकम टॅक्स पेयर व्यावसायिक आहे. त्यामुळे अनेक संधी सतत खुणावत असतात. हौसे ला मोल नसले तरी कॉस्ट आहे व ती सोने मोडून, पीपीएफ काढून, एफडी मोडून, नातेवाईकांकडून उसने घेउन मोजावी का? हा कळीचा प्रश्न आहे. तू सूर्यास्तांपर्यंत जेवढे चालशील तेवढी तुझी जमीन ही बोध कथा आठवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर
क
कानडाऊ योगेशु Sun, 03/07/2021 - 10:32 नवीन
बायको माझ्यासारखी अल्पसंतुष्टी नाही. ती रिअल इस्टेट ब्रोकर आहे व रिअल इस्टेट मधील वकील आहे.
ह्याचा अर्थ जागा घेण्याचा हा जो काही निर्णय आहे तो घाटपांडे काकुंच्या अखत्यारीतला आहे. जर तुम्हाला काकुंच्या निर्णयक्षमतेवर विश्वास असेल तर त्यांना निर्णय घेऊ द्यावा असे म्हणेन. कदाचित काकुंचीही तिच अपेक्षा असेल. कॅलक्युलेटेड रिस्क घ्यावी लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रकाश घाटपांडे Sun, 03/07/2021 - 11:45 नवीन
आमची पीपीएफ,एफडी, कौटुंबिक सोने अशी सुरक्षित व आपत्कालीन गुंतवणूक मोडून उत्साहाच्या भरात शेतजमीन घेणे हे तारतम्य गमावण्याचे लक्षण आहे असे मला वाटते. कुठल्याही भावनातिरेक हा तारतम्य गमावण्यास कारणीभुत ठरतो. मनोविकारांचा मागोवा- ले. डॉ श्रीकांत जोशी हे पुस्तक जरुर वाचावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु
म
मुक्त विहारि Sun, 03/07/2021 - 12:44 नवीन
त्या मालिका बघतात का? सामान्यतः, टीव्ही वरील बातम्या आणि मालिका, बघणारी माणसे, आत्मकेन्द्रित, चिडखोर आणि भावनेच्या भरात निर्णय घेतात, हे माझे निरीक्षण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रकाश घाटपांडे Mon, 03/08/2021 - 10:59 नवीन
पण रिअल इस्टेट मधील वास्तव जग पहाते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
च
चौथा कोनाडा Mon, 03/08/2021 - 08:51 नवीन
बायको माझ्यासारखी अल्पसंतुष्टी नाही. ती रिअल इस्टेट ब्रोकर आहे व रिअल इस्टेट मधील वकील आहे.म्हणजे इनकम टॅक्स पेयर व्यावसायिक आहे.
कर्तुत्ववान महिला ! घाटपांडे काकुंना आंतरराष्ट्रिय महिलादिनाच्या विशेष हार्दिक शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
क
कानडाऊ योगेशु Sat, 03/06/2021 - 15:37 नवीन
घाटपांडे काका आता पर्यंत तुम्ही तुमचे आयुष्य कसे व्यतित केले आहे त्याच्याशी प्रामाणिक राहा! आयुष्याच्या उत्तरार्धात उगाच अमिताबच्चन बनण्याची गरज नाही असे वाटते. बाकी तुम्हला उदंड आयुष्य लाभो ही सदिच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रकाश घाटपांडे Sun, 03/07/2021 - 05:34 नवीन
माझ्या अल्पसंतुष्टत्व मुळे,कमीत कमी रिस्क घेण्याची प्रवृत्ती मुळेच कुटुंबात या समस्या निर्माण झाल्या आहेत. वर्कहोलिक, कर्तुत्ववान, धडाडीने काम करुन अजून काही कमवण्याची जिद्द असलेल्या लोकांना माझे जगण्याचे तत्वज्ञान हे डिप्रेसिव्ह वाटते. ये जीना भी कोई जीना है! इससे अच्छा मरना है टाईप. वर लिहिले आहेच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु
म
मराठी_माणूस Sun, 03/07/2021 - 05:40 नवीन
इतका प्रांजलपणा खुप कौतुकास्पद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
अ
अनिरुद्ध.वैद्य Wed, 03/10/2021 - 05:37 नवीन
रिस्क ला मॅनेज करता आले तर उत्तम ! किंबहुना रिस्क टाळणे हा ही रिस्क मॅनेजमेंटचा भाग आहेच. वर्कहोलिक, कर्तुत्ववान, धडाडीने काम करुन अजून काही कमवण्याची जिद्द >> ह्यातल्या रिस्क मॅनेज करुन जरुर करावे, पण टैम म्हत्वाचा! आपल्या वयात अश्या रिस्क टाळणेच उत्तम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
श
श्रीगुरुजी Wed, 03/10/2021 - 19:36 नवीन
मी सुद्धा अल्पसंतुष्ट, फारशी महत्त्वाकांक्षा नसलेला, फारशी जोखीम न घेणारा आहे. आयुष्यात जी काही थोडीफार जोखीम घेतली ती विचारपूर्वक (calculated risk) घेतलेली जोखीम होती. अत्यल्प परतावा असलेल्या गोष्टीसाठी भरमसाट किंमत मोजणे मला मान्य नाही. नाव मोठं लक्षण खोटं अशी कीर्ति असलेल्या वस्तू, उपहारगृहे इ. कितीही नामवंत असली तरी मी ती टाळतो कारण नावाच्या बडेजावापेक्षा त्याची उपयुक्तता मी जास्त महत्त्वाची मानतो. अर्थात काही अपवादात्मक गोष्टींसाठी कितीही खर्च करण्याची माझी तयारी आहे व करतो. मी भविष्यासाठी पुरेशी तरतूद करूनच खूप लवकर स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 03/11/2021 - 06:09 नवीन
श्रीगुरुजी माझ्यासारखेच तुम्ही दिसता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 03/10/2021 - 19:40 नवीन
मी सुद्धा अल्पसंतुष्ट, फारशी महत्त्वाकांक्षा नसलेला, फारशी जोखीम न घेणारा आहे. आयुष्यात जी काही थोडीफार जोखीम घेतली ती विचारपूर्वक (calculated risk) घेतलेली जोखीम होती. अत्यल्प परतावा असलेल्या गोष्टीसाठी भरमसाट किंमत मोजणे मला मान्य नाही. नाव मोठं लक्षण खोटं अशी कीर्ति असलेल्या वस्तू, उपहारगृहे इ. कितीही नामवंत असली तरी मी ती टाळतो कारण नावाच्या बडेजावापेक्षा त्याची उपयुक्तता मी जास्त महत्त्वाची मानतो. अर्थात काही अपवादात्मक गोष्टींसाठी कितीही खर्च करण्याची माझी तयारी आहे व करतो. मी भविष्यासाठी पुरेशी तरतूद करूनच खूप लवकर स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रकाश घाटपांडे Sun, 03/07/2021 - 08:07 नवीन
शाम भागवत, मला हा प्रश्न केवळ आर्थिक व्यवस्थापनाचा वाटत नसून तो मानसिक व्यवथापनाचा देखील आहे असे वाटते. किंबहूना तो त्याचा अधिक आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
श
शाम भागवत गुरुवार, 03/11/2021 - 12:54 नवीन
तुम्ही मानसिक व्यवस्थापनाबद्दल बोलताय म्हणून लिहितोय. "अमूक अमूक" अशी स्थिती असेल तरच मी सुखी, अन्यथा मी दु:खी अशी एक अट आपण स्वत:च स्वत:ला घालून घेतो. त्यातून मग हवे नको सुरू होते. मग मात्र आपले समाधान टिकणे न टिकणे हे परिस्थितीवर अवलंबून राहाते. शिवाय परिस्थिती सतत बदलत असते व तिच्यावर १००% टक्के नियंत्रण मिळवणे कोणालाच शक्य नसते. अगदी वेगळ्या पध्दतीने बोलायचे झाल्यास, "माझी बायको धडपड करते आहे. तिच्या पाठीमागे मी पूर्ण ताकदीनिशी उभा राहीन. त्यातूनच मला आनंद मिळेल." अशी एखाद्याने स्वत:ला अट घालून घेतली असेल तर तो कितीही कष्ट झाले तरी बायकोला पाठींबा देईल आणि सुखी व समाधानी राहील. 😀 मला वाटते आपले समाधान कोणत्याही परिस्थितीत टिकणे महत्वाचे. त्यासाठी कोणत्याही अटी नसल्या पाहिजेत. तो माणूस निर्भय असतो. सुखी व आनंदी असतो. असो. 🙏
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रकाश घाटपांडे Fri, 03/12/2021 - 05:05 नवीन
पहिला परिच्छेद व दुसरा यात मला विसंगती दिसते. इथे आनंदाच्या कल्पनेत व्यावहारिक गोष्ट आलेली आहे. जवळपास ९० टक्के गुंतवणूक ही रिअल इस्टेट मधे आत्ताच आहे. १० टक्के फक्त एफडी पीपीएफ सोने अशा स्वरुपात आहे. दुसरा मुद्दा येतो जगण्याचे तत्वज्ञान. आपापल्या जगण्याचे तत्वज्ञान अंगीकारायची मुभा असती तर गोष्ट वेगळी आहे. नाहीतरी तू अल्पसंतुष्टी आहेस तर तुला मिळणारे पेन्शन बास झाले बाकीच तुला काय करायचे आहे? असा मुद्दा उपस्थित होतो आहे तार्किक म्हणून तो योग्यही आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
R
Rajesh188 Sat, 03/06/2021 - 11:59 नवीन
राहण्याचे ठिकाण आणि शेत जामीन ह्या मध्ये जास्तीतजास्त २ km वर अंतर नसावे.शक्यतो घराच्या जितक्या जवळ तितके चांगले. लांब असलेल्या जमिनी वर लक्ष ठेवता येत नाही.आणि कोणी बघायला नाही असे लक्षात आले की चोरी किंवा बाकी नुकसान लोक करतात.. तिथे वेल्हे मध्ये तर तुम्ही जावून राहणार नाहीं ना. मग नकोच तो उपत्याप.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
R
Rajesh188 Sun, 03/07/2021 - 12:38 नवीन
तुमचे ते कमलिनी कुटीर हे खरीव गावात आहे. गावची लोकसंख्या फक्त २९२ आहे आणि फक्त ५८ कुटंब आहेत. बस स्टँड खासगी आणि सरकारी दहा किलो मीटर वर आहे. जवळ पास कोणतेच महत्वाचे पर्यटन स्थळ नाही. गाव बहुतेक डोंगरात असावे पुण्या पासून५३ km वर आहे. Zp ची शाळा सोडली तर गावात दुसरी कोणती च सुविधा नाही. जमिनीच्या सिंचनासाठी पाण्या ची व्यवस्था नाही. चांगली कनेक्टिव्हिटी नाह. सिंचन व्यवस्था आणि उत्तम कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे शेती करणे महा मुश्किल आहे. कमलीनी कुटीर सारखा उद्योग चालू करण्याचे स्वप्न असावे . बाकी मी आता माझे ठाम मत सांगतो पैसे पडलेले असतील तरी त्या गावात गुंतवणूक करू नये.. त्या पेक्षा सासवड किंवा पुण्या शेजारी अनेक उत्तम गाव आहेत तिथे शेती बघावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
स
सुबोध खरे Wed, 03/10/2021 - 05:29 नवीन
हौसेला मोल नसते याची आता मला भीती वाटू लागली आहे आपली भीती अतिशय रास्त आहे शेतजमीन भागीदारीने घेणे हि फार मोठी चूक ठरेल. कारण भागीदारीतील करार करणे त्यावर अंमल बजावणी करणे आणि उद्या आपली प्रकृती बिघड्ली तर त्याची उस्तवारी कोण करणार. त्यातून एखादा भागीदार डांबरट निघाला तर सुखाचा जीव दुःखात घालणे होईल. मुळात अशा जमिनीत असंख्य हिस्सेदार असतात आणि ते काही काळाने उगवतात आणि खटले भरतात. प्रलंबित खटल्यात सर्वात जास्त कज्जे हे जमिनी संदर्भात आहेत हे लक्षात घ्या. नातेवाइकांच्यात तर भागीदारी कधीच करू नये. कारण अवघड जागी दुखणं असतं. आपल्याला लोक/ बायको घाबरट पळपुटा म्हणाले तरी चालेल पण हे विकतचं दुखणं अजिबात घेऊ नका. आपल्या पत्नीला कोणीतरी शेंडी लावत आहे अशी शक्यता आहे, त्याचा शोध घ्या आणि मुळाशीच घाव घाला. बायकोला २० लाख रुप्याच्या व्याजात ( ६% दराने १० हजार रुपये महिना) दर महिन्याला एखाद्या रिसॉर्ट मध्ये घेऊन जाणे अगदी सहज परवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
अ
अनिरुद्ध.वैद्य Wed, 03/10/2021 - 05:38 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
प
प्रकाश घाटपांडे Wed, 02/05/2025 - 11:13 नवीन
या ४ वर्षात या प्रकरणामुळे आयुष्याचाच ट्रॅक बदलला गेला. बर्याच घटना घडल्या. या टप्प्यावर वैवाहिक आयुष्याचा समतोल बिघडून गेला. माझ्या प्रतिक्रियांमधे त्याची बीजे आहेतच. मानसिक आरोग्य,शारिरिक आरोग्य, व्यवहार, नातेसंबध यावर सखोल परिणाम झाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सौंदाळा गुरुवार, 02/25/2021 - 08:18 नवीन
मुविकाका आता ५ वर्षे झाली. एक धागा शेतीबद्दलच्या अनुभवांचा पण येऊ देत. आनंद्/कष्ट, नफा/नुकसान, खरेदी/विक्री वगैरे सगळेच
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 02/26/2021 - 07:43 नवीन
चांगले आणि वाईट, दोन्ही अनुभव आले आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
क
कंजूस गुरुवार, 02/25/2021 - 09:27 नवीन
विकणे सहकाराशिवाय अशक्य.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 02/26/2021 - 07:43 नवीन
आता सांघीक विक्री शिवाय पर्याय नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
अ
अमर विश्वास Fri, 02/26/2021 - 13:13 नवीन
वरती काही प्रतिक्रिया बघितल्या .... फार्म हाऊस पेक्षा पैसे FD त टाकावे वगैरे वगैरे ... स्वतःचे फार्म हाऊस असणे हा आनंदाचा भाग असतो .... मी तो मुक्तपणे अनुभवाला आहे ... मित्रांबरोबर FD certificate बघत बसायचे का ? ज्याला शक्य आहे त्याने जरूर फार्महाउस घ्यावे ... अर्थात त्यासाठी आर्थिक तसेच मानसिक ताकद लागते बाकी काय लिहू ... अंगी नाही बळ दारी नाही आड .... त्याने फुलझाडं लावू नये
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Fri, 02/26/2021 - 15:25 नवीन
वाचलेल्या पैशातुन मित्रांसोबत एखादी बँकॉक ट्रीप करता येईल कि? (ह.घ्या)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास
अ
अमर विश्वास Fri, 02/26/2021 - 18:03 नवीन
कमावलेल्या पैशातून नक्कीच करता येईल :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु
र
राजेंद्र मेहेंदळे Fri, 02/26/2021 - 15:37 नवीन
कृपया प्रतिसाद नीट वाचा. फार्म हाउस घेउ नये असे म्हटलेले नाही. तुम्ही उपभोग घेणार असाल तर जरुर विकत घ्या, नपेक्षा डेड इन्वेस्ट्मेंट होईल हा मुद्दा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा