प्रतिजैविके समज आणि गैरसमज.
प्रतिजैविके
समज आणि गैरसमज.
सर्वप्रथम सूक्ष्म जीव म्हणजे काय?
सर्वात सूक्ष्म म्हणजे विषाणू किंवा व्हायरस. हा सजीव आणि निर्जीव यांच्या सीमेवर असलेला, जीव आणि रसायन यामधील अवस्था. याचे स्फटिकिकरण करता येते आणि हे स्फटिक युगानू युगे तसेच राहू शकतात. हा फक्त दुसऱ्या पेशींच्या अंतर्भागात सक्रिय होऊ शकतो अन्यथा एखाद्या रसायनासारखा मृतप्राय असतो. उदा पोलियो एड्स कांजिण्या इ
यानंतरचे काही जीव रिकेटसिया आणि क्लॅमिडिया हे जिवाणू आणि विषाणू यांच्या मध्ये आहेत.
यानंतर येतात ते जिवाणू (म्हणजे बॅक्टेरीया) हे एक पेशीय जीव असून यात चयापचय क्रिया (metabolism) चालू असते. उदा स्टॅफिलोकॉकस, टायफॉईड याचे जंतू.
या बरोबरच एकपेशीय बुरशीची निर्मिती झाली. उदा यीस्ट/ किणव
जगाची सुरुवात झाली तेंव्हा सर्व प्रथम एक पेशीय वनस्पती आणि प्राणी तयार झाले. आणि त्यांच्यात स्पर्धा सुरू झाली.
यात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांनी वेगवेगळे उपाय शोधण्यास सुरुवात केली. जिवाणू आणि बुरशी (fungus) यांनी त्याच अन्नासाठी स्पर्धा सुरू केली यावेळेस बुरशीच्या पेशींनी जिवाणूची वाढ होऊ नये म्हणून काही गुंतागुंतीची रसायने निर्मिती सुरू केली.आणि ही रसायने त्या आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचे पाझरून तेथे असणाऱ्या जिवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करीत हीच रसायने म्हणजे अँटीबायोटिक्स किंवा प्रतिजैविके.
यातील पाहिले प्रतिजैविक म्हणजे पेनिसिलीन. याचा शोध डॉ अलेक्झांडर फ्लेमिंग यांना योगायोगानेच लागला.
जिवाणू जगत असताना त्याच्या पेशीभिंतीची(cell wall) ची झीज चालू असते. ही झीज तो जिवाणू दुरुस्त करीत असतो. पेनिसिलीन ही झीज दुरुस्त करण्याच्या कामात लागणाऱ्या रसायनांच्या कामात अडथळा आणते. यामुळे जिवाणूच्या भिंती सच्छिद्र बनतात त्यामुळे त्याची पेशी बाहेरील अतिरिक्त पाणी शोषून फुगून येते आणि जिवाणूंचा मृत्यू होतो. प्राण्यांच्या शरीरात पेशींना असलेली भिंत नसतेच तर फक्त एक पटल (membrane) असते त्यामुळे पेनिसिलिनचा प्राण्यांच्या( मानवाच्या) शरीरावर अजिबात परिणाम होत नाही. यामुळे पेनिसिलीन आणि त्याच्या गटातील किंवा तशाच तर्हेचे असलेलं केफ्लॉस्पोरीन गटातील प्रतिजैविकांचा मानवी शरीरावर परिणाम अत्यंत नगण्य होतो.
१) विषाणू हे दुसऱ्या पेशींच्या अंतर्भागातच सक्रिय असल्यामुळे त्यांच्यावर प्रतिजैविकांचा मुळीच परिणाम होत नाहीत. यामुळेच प्रतिजैविके ही फक्त जिवाणूजन्य रोगात वापरली जातात विषाणूजन्य रोगात नाही.
२) आपल्याला झालेला रोग हा जिवाणूजन्य आहे की विषाणूमुळे आहे की बुरशीमुळे झालेला आहे हे समजून येण्यासाठी साडेपाच वर्षांचा एम बी बी एस हा कोर्स केलेले आणि त्यावर अनेक वर्षे अनुभव घेतलेले डॉक्टर असतात.
दुर्दैवाने केवळ लक्षणे पाहून लोक स्वतः औषधे घेतात, कारण मागच्या वेळेस शेजारच्या गण्याला किंवा आपल्या बंडूला अशाच लक्षणांसाठी आपल्या डॉक्टरने हीच औषधे दिलेली असतात.
काही लोक मागच्या वेळेस हगवण लागली असताना डॉक्टरांनी एंटेरो क्विनॉल किंवा तत्सम औषध दिले होते म्हणून दुसर्या वेळेसही "स्वतःच" ते औषध घेतात.
दुर्दैवाने त्याच्या मागील कार्यकारण भाव माहीत नसल्याने ते काही वेळेस होमियोपथिक डोस घेतात जो झुरळाला किंवा डासाला पुरेल इतका असतो
नाहीतर व्हेटरनरी डोस घेतात. ६० किलोच्या माणसाला लागणारा डोस ऐवजी ४०० किलोच्या रेड्याला लागणारा डोस घेतात.
३) किंवा जवळच्या केमिस्टकडे जाऊन त्याच्या कडून घसा फार दुखतो किंवा हगवण लागली आहे या लक्षणांसाठी अशी औषधे मागून घेतात. केमिस्ट सुद्धा आपलं धंदा चालवण्यासाठी किंवा स्वस्तात लोकप्रियता मिळवण्याच्या मागे असल्याने सर्रास अशी औषधे देतात. १००% डॉक्टर असे केमिस्टकडे अर्धवट औषधे घेऊन आलेले रुग्ण रोज पाहत असतात आणि जवळ जवळ १००% केमिस्ट अशी औषधे देतात. अर्ध्य हळकुंडाने पिवळे होण्याचे यापेक्षा दुसरे उदाहरण नाही. १० नंतर २ वर्षे डिप्लोमा केलेले (डी. फ़ार्म) केमिस्टच्या दुकानात बसून डॉक्टरकी करत असतात. ना त्यांना त्यातील रसायन शास्त्राचा गंध असतो ना त्यामागील जीवशास्त्रीय प्रक्रियेचा.
४) लोक सुद्धा अशी औषधे का घेतात. -सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे डॉक्टरच्या फी चे पैसे वाचवणे. यानंतरची कारणे -- तेथे लागणारा वेळ वाचवणे आणि कधी कधी डॉक्टर बाहेरचे अरबट चरबट खाल्ले, दारू पिऊन नको त्या गोष्टी केल्या म्हणून आपली हजेरी घेतील या भीती मुळे.
५) मुद्दामहून पसरविले गैरसमज - बहुसंख्य होमियोपॅथ (८०% च्या वर आपल्या पाथीचा प्रचार करण्यासाठी सर्रास असे सांगताना आढळतात की ऍलोपॅथीचे डॉक्टर अँटीबायोटिक्स देऊन रोग "तिथल्या तिथे दाबून टाकतात". होमियोपॅथी मध्ये आम्ही रोगाचा मुळापासून नायनाट करतो म्हणून आमची औषधे स्लो असली तरी परिणामकारक असतात. आपली रेषा मोठी करण्यासाठी दुसऱ्याची रेषा लहान करण्याची ही हीन प्रवृत्ती आहे. याबद्दल मला अजून काही म्हणायचे नाही.
६) अँटीबायोटिक्स "उष्ण" पडतात. आयुर्वेदाच्या वैद्यांनी हा एक जाणून बुजून पसरविलेला गैरसमज आहे. ऍमॉक्सीसिलीन सारखेच प्रतिजैविक साधारण २५० ते ५०० मिग्रॅ (कॅप्सूल) दिवसात तीन वेळेस दिले जाते. परंतु गनोरिया सारख्या गुप्तरोगावर जेंव्हा रुग्ण परत येण्याची शक्यता कमी असे तेंव्हा आम्ही एक वेळेस ३.५ "ग्राम" म्हणजे २०५ मि ग्रॅम च्या १४ कॅप्सूलच्या समकक्ष औषध रुग्णास द्रवस्वरूपात देत असू शिवाय ते औषध (शरीरात जास्त काळ राहावे) मूत्रपिंडातून बाहेर पडू नये म्हणून २ ग्रॅम प्रोबेनेसीड हे दुसरे औषद्ध देत असू. शेकडो रुग्णांना असा एकच डोस देऊन त्यांचे गुप्त रोग बरे झालेले मी स्वतः पाहिलेले आहेत. सांगण्याचे तात्पर्य हे की औषध "उष्ण" पडते हा मुद्दाम पसरवलेला गैरसमज आहे.
७) आम्हाला अतिशय अशक्तपणा, चक्कर येणे, घाम येणे उलटीची संवेदना होणे किंवा तोंडाला चव नसणे अशी लक्षणे औषध घेतल्यावरच का होतात? आम्ही काय खोटं बोलतो का असे रुग्ण विचारतात. याचे साधे उत्तर असे आहे की आपल्या शरीरात जंतूंनी प्रवेश केलेला असतो तुमची प्रतिकार शक्ती जेंव्हा जंतूंचा नाश करण्यास कमी पडते तेंव्हाच तुम्हाला रोग होतो आणि हे शरीरात शिरलेले जंतू दर २४ तासात दुप्पट या वेगाने प्रजनन करीत असतात. तुमच्या शरीरातील खर्वनिखर्व जंतू जेंव्हा प्रतिजैविके दिल्यावर मृत्यू पावतात तेंव्हा त्यांच्या पेशीतील विषे तुमच्या शरीरात पसरतात. आणि यामुळे तुम्हाला अतिशय आजारी असल्याची ही सर्व लक्षणे दिसू लागतात. देवनारच्या कचरा मुंबई भर पसरलं तर मुंबईची काय परिस्थिती होईल तशीच ही परिस्थिती आहे. जोवर या सर्व कचर्याचा निचरा होत नाही तोवर आपल्याला आजारी असल्याची संवेदना असते. दुर्दैवाने बहुसंख्य आधुनिक डॉक्टरना या गोष्टी समजावून सांगायला
(आणि रुग्णांना समजावून घ्यायला) वेळच नसतो. यामुळे काय होते रुग्ण दोनच दिवस औषध घेऊन बंद करतात आणि रोगाचे जंतू पूर्ण नष्ट व्हायच्या अगोदरच
प्रतिजैविक बंद केल्याने शरीराच्या प्रतिकारशक्तीवर जंतुनाशाच्या अतिरिक्त कामाचा ताण पडतो आणि रुग्णाला अजूनच अशक्तपणा जाणवतो. या आगीत तेल ओतायला आणि आपली पोळी भाजून घ्यायला होमियोपाथ किंवा आयुर्वेदिक तज्ज्ञ तयारच असतात.
८) प्रतिजैविके ही शेवटी रसायनेच असतात त्यांचा आपला जसा परिणाम असतो तसे काही दुष्परिणाम असतोच. पण हे साईड इफेक्ट्चे तुणतुणे इतर पॅथीचे लोक इतके वाजवतात की लोकांना तेच जास्त खरे वाटू लागते.
काही प्रतीजैविके यकृत (लिव्हर) मूत्रपिंड (किडनी) वर परिणाम करतात. त्यामुळे कोणत्या रोगात कोणते औषध घ्यायचे हे सुशिक्षित डॉक्टर ला नक्की माहिती असते. अर्ध शिक्षित किंवा अशिक्षित केमिस्ट कडून किंवा सर्वज्ञ रुग्णाने स्वतः अशी प्रतिजैविके घेतल्यास त्याला जबाबदार कोण?
"अँटी बायोटिक च्या सेवनाने कीडनि निकामी होऊ शकते".हे अत्यंत अपुऱ्या माहितीवर केलेले अज्ञान मुलक विधान आहे. हे जर खरे मानले तर मूत्रपिंडाच्या संसर्गाला(urinary tract infection-- UTI ) कोणते औषध देणार? हा रोग ३३% स्त्रियांना केंव्हाना केंव्हा तरी होतोच.
९) औषध कंपन्या , केमिस्ट आणि डॉक्टर यांचे हितसंबंध गुंतलेले असतात. ही गोष्ट "नवीन" नाही. पण यात "अँटीबायोटिकच जास्त" घेतले जाते असे नसून बऱ्याच वेळेस झिंक सेलेनियम सारखी सूक्ष्म द्रव्ये किंवा जीवनसत्त्वे आणि खनिजे जिनसेंग, स्पायरुलीना सारखी सुपर फूड याचा मोठा वाटा आहे.शिवाय ही औषधे जीवनावश्यक वर्गात मोडत नसल्याने त्याच्या किमतीवर नियंत्रण नाही. याविरुद्ध बरीच प्रतिजैविके हिची जीवनावश्यक श्रेणीत असल्याने त्यांच्या किमतीवर निर्बंध आहेत. अशा टॉनिक सारख्या औषधांचा डोस कितीही दिवस देता/ घेता येतो. अँटीबायोटिक तुम्ही फार तर पाच दिवस घ्याल.
यानंतर एक फार महत्त्वाचा विषय मी मांडू इच्छितो-- "अँटी बायोटिकला प्रतिकार करणाऱ्या जिवाणूंची वाढ"
मुळात तुम्ही जेंव्हा दोन दिवस प्रतिजैविक घेता तेंव्हा सुरुवातीला त्याला सर्वात जास्त संवेदनशील(SENSITIVE) असणारे जिवाणू मरतात आणि जे जिवाणू त्या प्रतिजैविकाला कमी संवेदनशील(resistant) असतात ते जिवंत राहतात. यानंतर आपण जर प्रतिजैविक बंद केले तर हे कमी संवेदनशील(resistant)जिवाणू शरीरात जिवंत राहतात आणि त्यांची पुढची पिढी मुळात त्या प्रतिजैविकास कमी प्रतिसाद देणारी (resistant)जन्मास येते. ही प्रक्रिया वारंवार घडल्याने प्रतिजैविकास अजिबात दाद ना देणारे जिवाणू शिल्लक राहतात आणि जे संवेदनशील असतात ते जिवाणू नष्ट होतात. असे करत करत अनेक प्रतिजैविकाना दाद न देणारे(multi drug resistant) जिवाणू नैसर्गिक निवड तत्वाने(natural selection) जिवंत राहतात. अशा जिवाणूंचा फार वेगाने प्रसार होतो. अशाच जिवाणूची एक जात म्हणजे NDM १
पहा https://en.wikipedia.org/wiki/New_Delhi_metallo-beta-lactamase_1
१०) एकंदरीतच अँटी बायोटिक चे अनेक वाईट दूरगामी परिणाम असतात हा परत बऱ्याच इत्तर पॅथीच्या व्यावसायिकांनी जाणून बुजून पसरविलेला अत्यंत दुर्दैवी गैरसमज आहे. १९४२ मध्ये पेनिसिलिनचा वापर सुरू होण्याच्या अगोदर लोक शेकड्यानीच नव्हे तर हजारांनी प्लेग, कॉलरा, हगवण किंवा विषमज्वर या रोगांनी मरत होते. या काळात आयुर्वेद किंवा होमियोपॅथी सारख्या इतर पद्धती होत्याच परंतु त्यांना या कोणत्याही रोगाचा प्रसार थांबवता आला नाही ही वस्तुस्थिती आहे. कित्येक अकाली मृत्यू त्यांना थांबवता आले नाहीत ही वस्तुस्थिती नाकारून ते एकंदरीतच अँटी बायोटिकला शिव्या देताना आढळतात यापेक्षा दैवदुर्विलास दुसरा नसेल.
बालविधवांच्या पिढ्याच्या पिढ्या अशा रोगांमुळे दुःखात खितपत पडलेल्या अशा कथा त्या कालच्या साहित्यात सहज वाचायला मिळतात.प्रत्येक एकत्र कुटुंबात अशी एखादी बालविधवा सर्रास असे.
प्रतिजैविकांचा अतिरिक्त वापर करणार्यात केवळ इतर पॅथीचे व्यावसायिक केमिस्ट आणि स्वतः औषधे घेणारे रुग्णच नव्हे तर आधुनिक डॉक्टरही दिसतात याची काही कारणे
१) रुग्णाला आजच्या झटपट काळात एक दिवसात बरे व्हायचे असते त्यामुळे तो डॉक्टरवर दबाव टाकताना दिसतो. :"डॉक्टर परवा माझे प्रेझेन्टेशन आहे तेंव्हा परवापर्यंत काहीही करून मला बरे करा. नवीन व्यवसाय सुरू केलेल्या डॉक्टरला याला नकार देणे शक्य नसते. आणि जुन्या डॉक्टरला नेहमी येणार माणूस असेल तर त्याला नकार देणे वैयक्तिक संबंधामुळे शक्य नसते
२) जेंव्हा रोग निदान नक्की नसते की हा विषाणूमुळे रोग झाला आहे का जिवाणूमुळे अशा वेळेस डॉक्टर स्वतःच्या सुरक्षिततेचा उपाय( to be on safer side) अँटीबायोटिकचा एक कोर्स लिहून देतात.रुग्ण दोन दिवसात बरा झाला तर अर्ध्या वेळेस स्वतः हून औषध थांबवतो.
३) मोठ्या शल्यक्रियेनंतर सर्जन परत उगाच धोका( why take chances) नको म्हणून एकदम उच्च दर्जाचे प्रतिजैविक देतात. antibiotic resistanceची चिंता मी कशाला करू हा विचार त्यामागे असतो.
४) दीड शहाणे किंवा सर्वज्ञ रुग्ण डॉक्टरवर दबाव टाकतात आणि सांगतात की मला चांगले अँटी बायोटिक द्या. अशा वेळेस डॉक्टर "माझ्या बापाचे काय जाते" म्हणून लिहून देतात.
हा विषय कित्येक पी एच डी करता येईल इतका खोल आणि विस्तृत आहे. त्यात खोलवर जाण्याची माझी लायकी नाही यास्तव इथेच थांबतो.
💬 प्रतिसाद
(349)
प
प्रसाद भागवत
गुरुवार, 07/07/2016 - 05:11
नवीन
.व्वा डॉक्टर साहेब.. अत्यंत आवश्यक अशा विषयावर तितकेच माहितीपुर्ण विवेचन केल्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद..आपणासारखे अभ्यासु डॉ. प्रत्येक कुटुंबास, प्रत्येक रुग्णास मिळो.
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
गुरुवार, 07/07/2016 - 07:21
नवीन
बाकी माहिती छान आहे डॉक्टर, पण तुम्ही होमिओपॅथीवाल्यांचा जबर राग करता हे कळतं यातून.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 07/07/2016 - 07:55
नवीन
पूर्वी करत नसे
परंतु जशी वर्षे जाताहेत तसे अनेक रोग जे बरे होऊ शकले असते ते होमियोपॅथी च्या लोकांनी बरेच महिने "चोळल्या"मुळे हाताबाहेर गेलेले दिसून येत आहेत. केस वाढवण्याची खात्री देणाऱ्या मुकेश बात्रामुळे बीजांडकोषाचा कर्करोग( ovarian cancer) असलेल्या( मीच निदान केलेल्या) ४५ आनि ४७ वयाच्या दोन स्त्रिया डोळ्यासमोर मरताना पाहिल्या आहेत. "कॉन्स्टीट्युशनल डिसऑर्डर" म्हणून फेरम फॉस आणि फॉसम फेर देऊन सहा महिने चोळून झाले. या कालावधीत कर्करोग शरीरभर पसरला आणि पोटात पाणी झाल्यावर ते रुग्ण परत आले तोवर रोग हाताबाहेर गेला होता.
साधारण महिना किंवा दोन महिन्यात एक या दराने मूत्रपिंडातील खडे काढून देतो सांगून चोळ्त बसल्याने मूत्रपिंड खराब झालेले रुग्ण मी पाहतो आहे.
मुतखडा किंवा पित्ताशयातील खडा याचे काहीही फायदा न झालेले रुग्ण माझ्या रोजच्या पाहण्यात गेली २५ वर्षे आहेत.
पुण्यातील प्रथितयश डॉक्टर हबू आणि इतरही प्रतिष्ठित डॉक्टर यांचे मुतखडा किंवा पित्ताशयातील खडा याचे लष्करातील ६० रुग्ण( ज्यांना शल्यक्रिया करायची नव्हती) मी ३ वर्षे पर्यंत सोनोग्राफी करून पाहिले आहेत एकही रुग्णाचा एकही खडा गेलेला मी पाहिला नाही. पण आम्ही हे रोग बरे करून देतो हे छाती ठीकपणे सांगतात आणि ते सुद्धा "साईड इफेक्ट् शिवाय" या मूलमंत्रासकट.
बीजांडकोशातील साधी सिस्ट (follicular cyst) ला कर्करोग म्हणून रुग्णाला सांगायचे ( ही सिस्ट ३-४ महिन्यात स्वतःहून बरी होते) आणि सहा महिन्यात कर्करोग बरा केला म्हणून शेंडी लावायची. हे पण कित्येक दिवस पाहत आलो आहे.
स्वमग्नता एकलकोंडेकर यांच्या धाग्यावर एक होमियोपाथचा अनुभव मी मांडला आहे. आमच्या वर राहत असलेल्या आता अमेरिकेत असलेल्या मुलाची मुलगी ऑटिझम या रोगाची शिकार आहे. त्याच्या औषधाचे ५०००/- रुपये सांगितले जेंव्हा बाप "एन आर आय" आहे हे समजले तेंव्हा फी ५००० डॉलर्स झाली. या बापाने संतापाने सांगितले मी ५००० रुपये देईन औषध द्यायचे तर द्या. डॉलर्स मिळवण्यासाठी आम्ही किती कष्ट करतो तुम्हाला माहीत नाही. गपचूप औषध दिले. दुर्दैवाने फायदा काही झाला नाहीच.
छदम शास्त्र असूनही एथिक्स आणि प्रामाणिकपणाचा आव आणण्याचा हा प्रयत्न पचत नाही.
पूर्वी मी गप्प राहत असे परंतु आता स्पष्टपणे बोलल्यामुळे काही रुग्णांचा फायदा झालेला पाहिला आहे म्हणून हे बोलतो.
- Log in or register to post comments
ध
धनंजय माने
गुरुवार, 07/07/2016 - 08:07
नवीन
वाईचे डॉ. शन्तनु अभ्यंकर आधी BHMS करुन त्यात तथ्य न आढळल्याने पुन्हा MBBS करुन (नंतर पीजी पण केलं बहुतेक)आता हॉस्पिटल चालवतात.
(त्यांचे वडील सुद्धा डॉक्टर)
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
गुरुवार, 07/07/2016 - 09:13
नवीन
तुमची कळकळ कळते. परंतु विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, इतर औषधोपचार थकल्यावर होमिओपॅथी घेऊन पूर्ण बरे झालेली ही प्रच्चंड उदाहरणं आहेत. मी वादात पडत नाही, पण तुम्ही म्हणता त्यानुसार होमिओपॅथी थोतांड मुळीच नाही. गैरसमज 'त्या' बाजूने पसरले असतीलही, पण तुम्ही उलट पसरवू नका इतकी विनंती करेन. ज्याला जे लागू पडतं ते औषध त्याने घ्यावं. आणि तुम्ही नमूद केल्याप्रमाणे भोंदू (हाच शब्द वापरतो) डॉक्टर जे मशरूम सारखे उगवत असतात त्यांच्यापासून लांब रहावं असं सर्वांना सुचवेन.
माझा एक मित्र आहे, तो आज हा ब्रँड ट्राय करू.... अशा प्रकारे डॉक्टर बदलत असतो. दोन डोसात बरं नाही वाटलं की त्याला ** ठरवून दुसर्याकडे जातो. असा अॅप्रोच ठेवू नये असं मनापासून सांगावंसं वाटतं; सगळ्यांनाच. बाकी डोक्टरांच्या म्हणण्याला चॅलेंज न करता सांगतो, आजवर होमिओपॅथीच घेत आलोय; रादर, फ्यामिली डॉक जे देतात ते घेत आलोय आणि त्यांच्या औषधाने म्हणा किंवा हातगुणाने म्हणा; बरा होत आलोय.
होमिओपॅथीवर माझा तरी विश्वास आहे आणि अनुभव चांगला आहे. माझं शरीर त्याला उत्तम प्रतिसाद देतं.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 07/07/2016 - 09:32
नवीन
गैरसमज 'त्या' बाजूने पसरले असतीलही,
मुकेश बात्रा यांचा एक तरी लेख "साईड इफेक्ट् शिवाय" हे शब्द नसलेला दाखवून द्या. प्रत्येक होमियोपॅथ हेच रडगाणे गात असतो.
तुम्ही तुमचे धुणे धुवा की आधुनिक वैद्यकशास्त्राला शिव्या दिल्याशिवाय यांना जेवण घशाखाली उतरत नाही. आपली रेषा मोठी करण्यासाठी दुसऱ्याची रेषा लहान करण्याची ही प्रवृत्ती शिसारी आणणारी आहे. अगोदर आम्ही सर्व रोग बरे करून देतो असा दावा करायचा. स्वतःला क्षयरोग झाला की मात्र आधुनिक औषधे घ्यायची. हे करणारे दोन होमियोपॅथ माझ्या आसपास व्यवसाय करीत आहेत. त्यांची परिस्थिती पाहून त्याना "साबुदाण्याच्या गोळ्या" घ्या असे सांगायचं मोह मी आवरला.
बाकी ज्याचा अंगारे धुपारे यावर विश्वास आहे त्याने ते पण करावे. ज्याला जे पटेल त्याने ते करावे. सांगणारा मी कोण?
अब्जावधी लोक प्लेग कॉलरा विषमज्वर यांना बळी पडले किंवा देवी रोगाचे बळी जात होते तेंव्हा होमियोपॅथी होतीच की पण प्रतिजैविके/ देवीची लस आल्यावर लोकांचे प्राण वाचले ही वस्तुस्थिती कशी नाकारणार? आजही हेच होमियोपॅथ "लस टोचून घेऊ नका" हे सांगताना पाहतो तेंव्हा मात्र संताप आणि हतबल झाल्याची मिश्र भावना येते.
- Log in or register to post comments
म
मन१
गुरुवार, 07/07/2016 - 11:26
नवीन
असं सांगणं हा फौजदारी की काय गुन्हा आहे ना म्हणे ?
( आणि नसेल तर असं म्हण्णार्याचं डाक्टरकीचं लायसन रद्द करता येत असेल ना )
.
बाकी मूळ धागा/लेख माहितीपर आहे, उपयुक्त आहेच. त्याबद्दल मनःपूर्वक आभार .
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 07/07/2016 - 16:43
नवीन
मी वैद्यकीय डॉक्टर नाही. पण विज्ञान आणि वैज्ञानिक पद्धती मला समजल्या आहेत, असं मला वाटतं. म्हणून डॉ. खरे आणि इतर डॉक्टरांच्या क्षेत्रात थोडी घुसखोरी.
इतर औषधोपचार घेऊन थकल्यावर असं तुम्ही म्हणता. वर कुठेतरी डॉ. खऱ्यांनीही लिहिलेलं आहे की औषध घ्यायला लागल्यावरही एक-दोन जुलाब होणं, एखादा ताप चढणं अशा गोष्टी होऊ शकतात. थोडक्यात औषध घेतलं आणि दुसऱ्या क्षणाला फायदा झाला असं ताप, पोट बिघडणं ह्या तुलनेत कमी गुंतागुंतीच्या आजारांमध्येही होतं. जे आजार, विकार बरेच अधिक गुंतागुंतीचे असतात आणि शरीरावर मोठा परिणाम करणारे असतात, ते बरे व्हायला बराच जास्त वेळ जाऊ शकतो.
इतर औषधोपचार प्रभावी आहेत हे दिसण्यासाठी जो अधिकचा वेळ लागतो, त्याच काळात बरोब्बर होमेपदी सुरू केली आणि रुग्ण खडखडीत बरे झाले, अशीही एक शक्यता असते. ह्याचा पूर्ण अभ्यास झाल्याखेरीज रोग नक्की कशामुळे बरा झाला हे सांगता येत नाही. 'मी बरेच रुग्ण होमेपदीने बरे झालेले बघितलेले आहेत', ह्याला विज्ञानात काहीही अर्थ नाही. ह्याला सांगोवांगीच्या गोष्टी (anecdotes) म्हणतात.
लेखाबद्दल आभार.
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
गुरुवार, 07/07/2016 - 17:18
नवीन
असं की काय?
तर मग
यालाही विज्ञानात काहीही अर्थ नाही. तेंव्हा राहू द्या तुमचं तुमच्याकडे.
- Log in or register to post comments
ध
धनंजय माने
गुरुवार, 07/07/2016 - 17:30
नवीन
हा प्रतिसाद फाऊल मानण्यात यावा.
(ना कोई लिंक, ना और कुछ, ऐसी भी कभी अक्षरे होती है यार? ;) )
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 07/07/2016 - 07:41
नवीन
सोप्या भाषेत समजावून सांगणारा असा लेख मी पहिल्यांदा वाचला.
मार्कस ऑरेलियस यांचे प्रश्नही तितकेच महत्वाचे. आयुर्वेद व होमिओपॅथी बद्दल काही लोकांच्या मते ते जर उपयुक्त नसते तर कालाच्या ओघात ते नामशेष झाले असते असा युक्तिवाद केला जातो. जो ज्योतिषाबाबतही असतो.
- Log in or register to post comments
स
स्पा
गुरुवार, 07/07/2016 - 07:46
नवीन
उत्तम माहितीपुर्ण लेख
डाॅक साहेब्स.
प्रि आणि प्रो बायोटीक हा काय प्रकार असतो?
याने पचन संस्था सुधारते असे बरेच सायटीवर वाचण्यात आले
- Log in or register to post comments
स
स्पा
गुरुवार, 07/07/2016 - 09:34
नवीन
!!!
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 07/07/2016 - 16:46
नवीन
प्रोबायोटिक अन्न म्हणजे पोटातल्या, पचनात मदत करणाऱ्या जीवाणूंना पोषक किंवा असे जीवाणू असणारं अन्न. उदाहरणार्थ दही, ताक. वेगवेगळ्या संस्कृतींमधले पारंपरिक आणि आंबवलेले अन्नपदार्थ ह्या प्रकारात मोडतात. कोंबुचा, किमची असे पदार्थ अमेरिकन फार्मर्स मार्केटात हातोहात आणि प्रचंड किमतीला विकले जातात.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 07/14/2016 - 08:48
नवीन
prebiotic प्रीबायोटिक हे एक तर्हेचे कार्बोहायड्रेट पदार्थ असतात जे आपल्या शरीरात पचन होत नाही(nondigestible fiber) की शोषून घेतले जात नाहीत परंतु आतड्यात पुढे गेल्यावर त्याचा उपयुक्त जिवाणू अन्न म्हणून वापर करतात आणि या जिवाणूंच्या संख्येत वाढ होते. यामुळे आपोआप अपायकारक जंतूंची वाढ थांबते आणि आपली पचनसंस्था सुधारते. यात कांदा,कांद्याची पात, लसूण, गव्हाचा कोंडा, कच्चं केळं, गव्हाचं पीठ इ. पदार्थ येतात.
प्राथमिक संशोधनात याचे बऱ्याच रोगांमध्ये फायदे दिसून आले असले तरी थेट कार्यकारण भाव अजून दाखवता आलेला नाही. त्यावर अजून संशोधन चालू आहे.
probiotic प्रोबायोटिक हे एक तर्हेचे जिवाणू आहेत ज्यांचे सेवन केले असता आतड्यात त्यांची वसाहत तयार होते. हे सर्वसाधारणपणे मानव शरीराला अपायकारक नसून या वसाहतीमुळे इतर अपायकारक जिवाणू आतड्यात वसाहत करू शकत नाहीत. या मध्ये आईच्या दुधातून बाळाला येणारे bifidobacteria आणि दुधाचे दही बनवण्यासाठी जबादार असलेले दुग्धजन्य जिवाणू lactobacillus हे येतात.
पोट बिघडले असेल किंवा बराच काळ प्रतिजैविक घेतल्यामुळे पचनशक्तीत बदल होऊन वारं वर शौचास होत असेल( antibiotic induced diarrhoea) यासाठी हे उपयुक्त आहेत. रक्तदाब कोलेस्टिरॉल वाढणे ऍलर्जी एक्झिमा आणि इत्तर प्रतिकारशक्तीचे आजार यात थोडा फार फायदा दिसून आला आहे. परंतु याबद्दल अजूनही खात्रीलायक किंवा निर्णायक पुरावा सापडलेला नाही.
तसा पुरावा सापडेपर्यंत अनुभवातून आलेले शहाणपण म्हणून पोट बिघडलेल्या किंवा पचनशक्ती कमी असणाऱ्या माणसांनी ताक भात किंवा दही भात घेण्याने फायदा होईल.
शिवाय पहिले सहा महिने मुलाची प्रतिकार शक्ती विकसित होईपर्यंत मुलाला फक्त "आईचे दूध" पाजणे श्रेयस्कर ठरेल.
इतर खडाजंगी मध्ये आपला प्रश्न पाहायचा राहून गेला याबद्दल क्षमस्व.
- Log in or register to post comments
स
स्पा
गुरुवार, 07/14/2016 - 09:40
नवीन
धन्यवाद डॉक, मला वाटलेच :D
- Log in or register to post comments
स
सस्नेह
गुरुवार, 07/07/2016 - 07:54
नवीन
सोप्या भाषेतील अत्यंत उपयुक्त माहितीसाठी धन्यवाद डॉक.
काही मुद्द्यांबाबत लेखात नमूद केल्यापेक्षा विपरीत अनुभव आहे.
१. पेशंट किंवा त्यांचे नातेवाईक डॉक्टरांकडे अँटि-बायोटिक्स देण्याचा आग्रह धरतात.
सर्वसामान्यत: पेशंट किंवा नातेवाईकांना अँटि-बायोटिक्स या उपचारपद्धतीची फारशी माहिती नसते. डॉक्टर देतील ते औषध प्रामाणिकपणे घेण्याची प्रवृत्ती असते. त्यामुळे असा काही आग्रह डॉक्टरांना पेशंट किंवा नातेवाईकांकडून होत असेल हे खरे वाटत नाही. आणि झाला तरी त्यांना समजावून/ दटावून योग्य ते औषध डॉक्टरांनी दिले पाहिजे.
२. आतापर्यंत जेव्हा जेव्हा अँटि-बायोटिक्स घेण्याची वेळ आली तेव्हा सर्व डॉक्टरांनी सोबत न चुकता अँटासिड घेण्यास बजावले होते. एकदा घेतले नाही तेव्हा जबरदस्त रिअॅक्शन आली. जनरली कोणतेही औषध न घेता नुसत्या आहाराने मला आजवर कधीच अॅसिडिटि झालेली नाही. पण अँटि-बायोटिक्स घेतल्यावर हमखास होते, असा अनुभव आहे.
३. खरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पेशंटसाठी योग्य असा अँटि-बायोटिक्स डोस किती हा विचार करून डोस लिहून देणारे डॉक्टर आढळात नाहीत. चाइल्ड डोस आणि अॅडल्ट डोस असे सरसकट वर्गीकरण करूनच देतात.
पर्टिक्युलरली माझी ड्रग-सेन्सिटिव्हिटी जास्त असल्यामुळे एक्सेस अँटि-बायोटिक्स डोसचा अनेकदा जबरी धक्का खाल्ला आहे.
- Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ
गुरुवार, 07/07/2016 - 19:00
नवीन
त्यांनी, पेशंट लग्गेच, आत्ताच, तात्काळ "बरे" होण्याचा आग्रह धरतो, व हे होण्याची शक्यता, जहाल प्रतिजैविकांच्या मार्याने कमी होते, हीच फॅक्ट फक्त नोंदविलेलि आहे. नातेवाईक अॅंटीबायोटिक्स मागत नाही, इन्स्टन्ट रिझल्ट मागतो.
माझ्या खुर्चीत बसून समजावू/दटावून योग्य ते औषध देण्याचे काम आपण सालग १ महिना करावे, ही नम्र विनंती करतो. ;) नंतर होणारे नुकसान (शारिरीक व आर्थिक, मी भरून देईन)
अॅसिडिटी हा अॅंटीबायोटिकचा सामान्य साईड इफेक्ट नसून, बहुदा त्यासोबत दिलेल्या पेन किलर/ सूजनाशक/ तापाच्या औषधाचा असतो.
असे मूर्ख नक्कीच आधुनिक वैद्यकाचे पदविधर नव्हेत. तुमचे वय, वजन, लिंग, पूर्वेतिहास, सोबत लिहिलेल्या औषधांशी संभाव्य क्रॉस रिअॅक्शन याचा विचार न करता पेन कधीच चालत नाही. तसा तो चालत असेल, तर त्या सद्गृहस्थांनी डिग्री सरळ नेऊन चोरबाजारात विकावी, व तुमच्यासारख्या पेशंटांनी त्यांच्याकडे जाणे थांबवावे, हा सल्ला.
माफ करा, हा तुम्हाला वैयक्तिक प्रतिसाद नसून, तुमच्या समजूतींना आहे.
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Fri, 07/08/2016 - 08:33
नवीन
????
सदर प्रतिसाद हे माझे 'ज्ञान' अगर समजूत नसून अनुभव आहे, आनंदी गोपाळसाहेब.
एखादा पेशंट, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे, 'लवकर बरे करा' असे डॉक्टरांना निश्चितच म्हणेल पण 'मला अँटिबायोटिक्सच द्या' असे म्हणेल, हे अतिज्ञानी पेशंटच्या बाबतीत खरे असेल कदाचित, पण सर्वसामान्य पेशंटबद्दल मी लिहिले आहे, त्या वर्गातले नक्कीच म्हणणार नाहीत.
डॉक्टर लोकांवरील प्रामाणिक टिप्पणीबद्दल धन्यवाद !!
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
गुरुवार, 07/07/2016 - 08:04
नवीन
अत्यंत उपयुक्त लेख.
प्रतिजैविके विषाणू मारताना त्याबरोबर शरीरातील प्रथिनेही मारतात आणि त्यामुळे अशक्तपणा येतो हे खरे आहे का ?
प्रथिन हे रसायन असते किंवा असावे. मग प्रथिने मरतात म्हणजे काय ?
बाकी, ताप अंगावर काढणे चांगलेच असे वाटू लागले आहे.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 07/08/2016 - 09:32
नवीन
अप्पासाहेब
ताप आल्यामुळे शरीरातील रासायनिक क्रिया जलद होऊ लागतात( जितके तापमान वाढते तितक्या जास्त) हा रसायनशास्त्राचा मूळ सिद्धांत आहे. याप्रमाणे आपली प्रतिकारशक्ती सुद्धा जास्त सक्रिय होते परंतु एक विशिष्ट पातळीपेक्षा जास्त तापमान वाढल्यामुळे उपयोगापेक्षा नुकसानच जास्त होते. ( आपली प्रतिकारशक्ती एक विशिष्ट पातळीपेक्षा जास्त सक्रिय होऊ शकत नाही).
एकदा फ्लू झाला असताना मी हा प्रयोग स्वतःवर करून पहिला. ताप बराच वाढला तरीही औषध घेतले नाही. चार दिवसांनी ताप स्वतःहून बरा झाला. पण न भूतो न भविष्यति असा अशक्तपणा आला. तेंव्हा पासून ताप जास्त झाला तर जास्त शहाणपणा न करता मी औषध घेतो.
लहान बाळाबाबत ( ५ वर्षा खालील) असा प्रयोग कोणीही चुकूनही करू नये याचे कारण लहान बाळाचा मेंदू पूर्ण विकसित झालेला नसतो आणि ताप जास्त वाढला तर मेंदूत जाऊन बाळाला फिट्स येऊ शकतात.
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
Fri, 07/08/2016 - 11:11
नवीन
धन्यवाद
- Log in or register to post comments
र
राजाभाउ
गुरुवार, 07/07/2016 - 08:23
नवीन
अत्यंत महत्वपुर्ण विषयावरील खुप सोप्या भाषेत नेहमी प्रमाणे समजाउन सांगणारा लेख. प्रतिजैविके बद्दलचे खुप गैरसमज यामुळे दुर होण्यास मदत होइल. मुळ धाग्यात आणि प्रतीसादां मघुन इतकी उत्तम माहीती दिल्या बद्दल मनापासुन धन्यवाद.
एक शंका
बर्याच वेळेला डॉ. कल्चर चाचणी करायला सांगतात. साधारण पणे जिवाणुं जिवाणुं मध्ये असणारे सुक्ष्म फरक समजाउन घेउन उपाययोजना करणे असा या चाचणीचा उपयोग असतो असा माझा समज आहे. तर कल्चर चाचणी या बद्दल थोड सांगु शकाल का डॉ. साहेब ?
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 07/14/2016 - 08:09
नवीन
राजाभाऊ
कल्चर चाचणी--
यात आपल्याला ज्या भागाला जंतू संसर्ग झाला आहे तेथे कोणत्या विशिष्ट जिवाणू मुळे हा संसर्ग झालेला आहे हे समजणे भाग आहे.
उदा एखाद्या मधुमेहाच्या रुग्ण असलेल्या स्त्रीला वारंवार मूत्र मार्गाचा दाह आणि जळजळ( जंतू संसर्ग) होत असेल तर डॉक्टर आपल्याला मुत्रचाचणी आणि लघवीचे कल्चर करायला सांगतात. यात प्रयोगशाळेत आपली लघवी जिवाणू वाढतील अशा काचेच्या डबीत ठेवून उबवली(incubate) जाते. २४ ते ४८ तासांनी त्यात तयार होणारे जंतू सूक्ष्म दर्शकाखाली पाहून कोणत्या तर्हेचे जिवाणू आहेत हे पाहिले जाते. शिवाय हे जन्तु कोणत्या प्रतिजैविकाला दाद देणार नाहीत आणि कोणते प्रतिजैविक त्याविरुद्ध सर्वात प्रभावी ठरेल हीही तपासणी केली जाते (antibiotic sensitivity test). समजा आपल्या लघवीत इ कोलाय हे जंतू सापडले आणि ते जर सिप्रोफ्लोक्ससीन या प्रतिजैविकाला रेझीस्टंट असतील तर हे प्रतिजैविक कितीही दिवस दिले तरीही रुग्णाला त्याचा काहीच फायदा होणार नाही. अशा वेळेस या चाचणीत समजा ते जिवाणू अँपिसिलिनला सर्वात जास्त संवेदनशील( sensitive) असतील तर सिप्रोफ्लोक्ससीन बंद करून अँपिसिलिन हे प्रतिजैविक चालू केलं असता त्यांचा रोग पटकन आटोक्यात येईल.
या गदारोळात आपल्या प्रश्नाकडे लक्ष गेले नाही याबद्दल क्षमस्व.
- Log in or register to post comments
व
वडाप
गुरुवार, 07/07/2016 - 08:51
नवीन
यातलं कायबी कलत नाय.डाक्तरला आमीच सांगतू सुई लावा.
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
गुरुवार, 07/07/2016 - 09:12
नवीन
...
- Log in or register to post comments
अ
अद्द्या
गुरुवार, 07/07/2016 - 09:14
नवीन
उत्तम माहिती डॉक्टर,
वर विचारल्या प्रमाणे . अति औषधे घेतल्याने प्रतिकार शक्ती कमी होते हे बघितलंय . खरं की खोटं तुम्हीच जाणे .
शाळेतला वर्गमित्र. आई वडील दोघेही डॉक्टर . घरातलेच डॉक्टर असल्यामुळे वेळच्यावेळी सगळी औषधे असत. पण अति काळजीवाहू पालक होते .
याचा परिणाम असा की आम्ही बाहेर गेलो कुठे फिरायला / खेळण्यासाठी कुठल्या दुसऱ्या शहरात गेलं . की लगेच हा आजारी पडायचा. फक्त घरचंच "प्युरिफाइड " पाणी प्यायचा. त्याची कुठलीही जखम मी आपल्या आपण भरून निघताना पाहिलेली नाही . जरा कुठे कापलं खरचटलं तरी लगेच ड्रेसिंग करायचे..
- Log in or register to post comments
श
शि बि आय
गुरुवार, 07/07/2016 - 09:16
नवीन
अत्यंत उपयुक्त लेख. सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत तो सादर केल्याबद्दल डॉक्टरांचे आभार..
मार्कस ऑरेलियस हयांना दिलेला प्रतिसाद वाचला आणि आपले शरीर निमूटपणे किती काय काय करत असतं ह्याची जाणीव झाली.
- Log in or register to post comments
व
वेदांत
गुरुवार, 07/07/2016 - 09:20
नवीन
ऊत्तम लेख ...
- Log in or register to post comments
श
शान्तिप्रिय
गुरुवार, 07/07/2016 - 09:36
नवीन
डॉ खरे आणि डॉ अजया
यांचे याविषयी अतिशय उपयुकत अशी माहिति आपणा सर्वांना उपलब्ध करुन दिल्याबद्दल
मनापासून आभार!
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 07/07/2016 - 09:43
नवीन
ज्या तळमळिने ही माहिती साध्या सोप्या शब्दात दिलेली आहे.. त्या तळमळिला आधी एक नमस्कार, आणी दुसरा माहिती देण्याला. __/\__
- Log in or register to post comments
श
शलभ
गुरुवार, 07/07/2016 - 10:26
नवीन
+१०००००००००००
- Log in or register to post comments
र
राघवेंद्र
गुरुवार, 07/07/2016 - 18:00
नवीन
+१००००००००००००००
- Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर
गुरुवार, 07/07/2016 - 09:53
नवीन
सर्व प्रथम तुमच्या धाडसाचे कौतुक आहे डॉ. साहेब. बाकी लेख आणि प्रतिसादही नेहमीप्रमाणेच मस्त. सोप्या भाषेतला माहितीपुर्ण.
- Log in or register to post comments
अ
अभिरुप
गुरुवार, 07/07/2016 - 09:53
नवीन
डॉक साहेब,
इतक्या सोप्या भाषेत इतका किचकट विषय मांडल्याबद्दल आभार.....
खूप सार्या प्रश्नांना उत्तर मिळाले.
- Log in or register to post comments
स
स्वीट टॉकर
गुरुवार, 07/07/2016 - 09:55
नवीन
नेहमीप्रमाणेच सोप्या भाषेत अवघड विषय तुम्ही सहज समजावून सांगता.
असं म्हणतात की प्रत्येक कुटुंबात एक डॉक्टर आणि एक वकील असावा. आम्हा मिपाकरांच्या नशीबानी आमच्या या कुटुंबात तुमच्यासारखे चांगले चांगले डॉक्टर आहेत ! वकीलही असतीलच पण अजून ओळख झालेली नाही.
धनंजय मानेंनी आम्हाला तुमचे आणखी पैलू दाखवले ! धनंजय +१००
- Log in or register to post comments
म
मोहनराव
गुरुवार, 07/07/2016 - 10:19
नवीन
उपयुक्त माहिती. धन्यवाद.
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
गुरुवार, 07/07/2016 - 10:26
नवीन
मी स्वतः मुळात फार कमी औषधे घेतलेला मनुष्य आहे. अर्थात मला बी पी व डायबेटीस दोन्ही असल्याने त्याची औषधे घ्यावीच लागतात.अलिकडे किडनी रक्षणासाठी एक ए सी इन्हिबिटर पण चालू झाले आहे. मला १९७९ पासून आजतागायत ९८ चे वर ताप आलेला नाही. त्याचे कारण मी उठ्सूट डॉ कडे जात नाही. मग प्रतिजौविक द्या असा आग्रह करण्याचा प्रश्नच नाही. खरे तर परिपूर्ण निष्कर्ष येण्यासाठी एलीमिशन मेथड वापरून विविध पॅथीचे मुल्पमापन करता येते पण हरेक माणसाचे शरीर वेगळे आहे ते दुनियेत कोणत्याही शाखेतील डॉ ला वा लॅबला पुरते कळलेले नाही. त्यामुळे सर्व बाबतीत कितीही अभ्यास केला तरी शेवटी व्यक्ती तितक्या प्रकृति हे सत्य उरतेच. त्यामुळे क्लिनिकली डेथ कॅन्डीडेट असणारे सुद्धा पुन्हा संजिवनीकडे वळलेले दिसतात. मग विल पावर वगैरे प्रवाद अपरिहार्यपणे प्रस्थापित होतात. डॉ डॉयर यानी आपल्या पुस्तकात माईन्ड द अनेक्प्लोअरड अलाय असे एक प्रकरणच यावर लिहिलेय. त्या पुस्तकाची अर्पण पत्रिकाच अशी आहे
त्याने ईश्वराला विचारले ... देवा मी उत्तम आरोग्य युक्त आयुष्य मिळविण्यासाठी काय करावे...... " आपले आईवडील काळजीपूर्वक पणे निवड " ईश्वराने उत्तर दिले. मला मिळालेली बर्यापैकी प्रतिकारशक्ती ही माझ्या आईकडून मिळाली असावी
असा माझा कयास आहे.
ता.क. पुण्यातले एक डॉ ह्याना धनवन्तरी पारितोषिक मिळाले त्यावेळी सत्कार प्रसंगी त्यानी एक वाक्य सांगितल्याचे आठवते
ते असे " उठसूट डॉ कडे न जाणे हे रोग्याचे पहिले कर्तव्य आहे..... !"
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
गुरुवार, 07/07/2016 - 17:07
नवीन
+ १
त्याच बरोबर,
चौरस आहार, आहार आणि विहारात नियमितपणा, ह्या पण गोष्टी तितक्याच महत्वाच्या असतात.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 07/07/2016 - 17:14
नवीन
+ १००
चौरस आहार, आहार आणि विहारात नियमितपणा, ह्या पण गोष्टी तितक्याच महत्वाच्या असतात.
मी यात थोडी सुधारणा करून एवढेच म्हणेन चौरस आहार, आहार आणि विहारात नियमितपणा, ह्या गोष्टीच "जास्त" महत्वाच्या असतात.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 07/07/2016 - 17:17
नवीन
आणि यायाम
- Log in or register to post comments
च
चतुरंग
गुरुवार, 07/07/2016 - 17:11
नवीन
शरीराला बरं होण्यासाठी वेळ द्या.. विश्रांती आणि योग्य खाणे याने रोग आपापताच चटकन बरे होतात...
- Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ
गुरुवार, 07/07/2016 - 19:07
नवीन
तुमच्या चरणकमलांईचा फोटू पेस्ट करा हो! प्रिंटॉट काढून ल्यांमिनेट करून ओपीडीतल्या देवार्यात ठिवतो आन तीर्थ पेशंटांना वाटतो बगा!
काब्रं इच्चारताय?
हेच्च बोल्डवलेले तुम्हाला कळले, त्यासाठी इतका खटाटोप हो!
दुसरं कैनै.
हरेक माणूस टीवीएस सुझ्कीच्या गाडीला १२ नंबरचा पाना अमुक स्क्रूला लागतो तसंच हे सगळे बिन्डोक डाक्टर समजतात, ह्ये तुमचं संशोदन नोबेल प्राईजला रेकम्येंड करायला हवं!!
- Log in or register to post comments
ध
धनंजय माने
गुरुवार, 07/07/2016 - 19:19
नवीन
आशे क्रू न्ये, प्रेमाणे सांगावे.
- Log in or register to post comments
स
स्पा
गुरुवार, 07/07/2016 - 19:20
नवीन
डाॅ.खरे आणि तुमच्यातला फरक दरवेळी जाणवून जातो :)
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
गुरुवार, 07/07/2016 - 19:21
नवीन
आपल्या व्यवसायासंबंधी धागा आला आहे हे तुम्हाला कसं कळतं हो?
- Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे
गुरुवार, 07/07/2016 - 10:29
नवीन
अप्रतिम माहितीपूर्ण लेख..
होमिओ/ आयुर्वेद यांवरील मते देखिल मार्मिक..
जालावर अनेक चर्चांमधे त्यातल्या विवादास्पद मुद्द्यांवर (विरलीकरण /पदार्थांची उष्ण, थंड प्रकृती / इ ) प्रामाणिकपणे शास्त्रीय माहिती मिळवण्याचा प्रयत्न सर्व चर्चा 'आलेले अनुभव' यावर घसरल्याने वृथा ठरल्याचेच पाहिलेत..
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 07/07/2016 - 13:11
नवीन
जबरदस्त लेख...
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 07/07/2016 - 13:14
नवीन
वाखुसाआ
- Log in or register to post comments
च
चतुरंग
गुरुवार, 07/07/2016 - 16:37
नवीन
सविस्तर माहितीपूर्ण लेखाबद्दल आणि तळमळीने जनांचे भले चिंतण्याच्या भावनेबद्दल शतशः धन्यवाद डॉक! __/\__
-रंगा
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- ›
- »