Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

Sanglit kothe kay

V
Vidyadhar1974
Wed, 07/06/2016 - 18:21
💬 63
I have recently shifted to sangli. Can somebody late me know good eateries and places to visit at sangli?

प्रतिक्रिया द्या
18175 वाचन

💬 प्रतिसाद (63)
V
Vidyadhar1974 Fri, 07/08/2016 - 10:41 नवीन
साइप्रसादची थाळी उदरभरणासाठी पण भरले वान्गे व फ्लावरची भाजी यापैकी एक रोज.
  • Log in or register to post comments
श
शान्तिप्रिय Fri, 07/08/2016 - 10:48 नवीन
मिरज पंढरपूर रस्त्यावर मिरजेपासुन २२ २५ किमि अंतरावर दंडोबाचा छान डोंगर आहे. याच रस्त्यावर , अगदी लगेच मिरज कोलेज जवळ वहिनींचा वडा (बटाटे वडा) फार प्रसिध्ध आहे. मी मिरजेचाच!
  • Log in or register to post comments
च
चंपाबाई Fri, 07/08/2016 - 14:35 नवीन
मिरज मेडिकल क्वालेज ... बॉयज हॉस्टेल समोर ... बापुजी साळुंखे कॉलिजच्या ग्राउंडजवळ .... डॉ. चंपाबै मिरजकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शान्तिप्रिय
ध
धनंजय माने Fri, 07/08/2016 - 14:39 नवीन
तिथंच मेन्टल हॉस्पिटल सुद्धा आहे. लाभ घेतला असतात, बरं झालं असतं की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
च
चंपाबाई Sat, 07/09/2016 - 05:24 नवीन
धनंजय माने इथेच रहातात का? अय्या, तुमचा भाऊ डॉक्टर झाला ना? त्यानी एम डी केली का नाही? नीलाबाई काळभोर कशा आहेत ? मोतीबिंदूचे ऑप्रेशन झाले का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने
म
मोदक Fri, 07/08/2016 - 12:30 नवीन
चला.. मी कांही नेहमी करत असलेली खादाडी सांगतो. १) स्टॅंड समोर जेथून पुणे / कोल्हापूरच्या गाड्या बाहेर पडतात तेथे एक चहावाला आहे. अप्रतीम चहा..!!! २) कॉलेज कॉर्नर रोड किंवा स्टँडमागे "स्वामी समर्थ इडलीवडा" येथे इडली वडा मिळतो, गरमागरम इडलीवडा आणि मालकही वसवस न करता आगत्याने आग्रह वगैरे करतो. ३) जेवणाचे बरेचसे ऑप्शन्स आले आहेतच.. तरीही श्रावण डायनींग हॉल वरच्या लिस्ट मध्ये वाचले नाही. अँबेसेडर हॉटेल, विश्रामबाग येथे वर कोणीतरी उल्लेख केला आहे ती थाळी श्रावणचीच. बाकी सांगलीतल्या जेवणाबद्दल पास. पंजाबी जेवण वगैरे सांगलीत कोठेही चांगले मिळत असेल यावर विश्वास नाही* ४) कॉलेज कॉर्नर समोर एकच सँडवीचवाला आहे त्याच्याकडे कोणतेही सँडविच खा. भारीच असेल. ५) बापटबाल शाळेसमोर समोर एक मुलगा दाबेली आणि सँडवीचचा गाडा लावतो. (ओळखण्याच्या खूण = छोटा हत्ती / रिक्शा मध्ये हा स्टॉल असतो) ..आणखी एक झकास दाबेलीवाला म्हणजे टाटा पेट्रोल पंप विश्रामबाग येथे "सुनिल" चा गाडा. याच्या स्टॉलचे नांव माहिती नाही शोधाशोध करावी लागेल. ६) मथुबाई गरवारे समोर एक जादुगाराची पाटी असलेला रस्ता आहे. तरूण भारत - मथुबाई गरवारे अशा रस्त्याने आलात तर नो एंट्रीतून घुसावे लागेल. तेथे "स्टार टेक्सास" नामक गाडा आहे. त्याच्याकडे शेवपुरी, दहीपुरी आणि पाणीपुरी खा. ..त्याच्याकडे भेळही मिळते पण चांगली भेळ फक्त कोल्हापूरला राजाभाऊंकडे मिळते. ७) काळ्याखाणीकडून कॉलेज कॉर्नरला जात असताना उजवीकडे बघितले तर दूध कोल्ड्रींकचा एक स्टॉल दिसेल यांचे नांव बहुदा "लागू" असावे.. त्यांच्याकडे काहीही प्या. ८) गोटी सोडा कोर्टासमोरच्या चौकात मिळेल किंवा पोस्टाकडून महानगरपालिकेकडे जाताना डाव्या हाताला किल्ल्यासारखा बुरूजाचा दरवाजा दिसेल त्या रस्त्यावर मिळेल. ९) गांव भागात लागूंचे पेढे मिळण्याचे एक ठिकाण आहे. शोधाशोध करावे लागेल. प्रतापसिंह उद्यानासमोर भगवानलाल कंदी आहेतच. १०) माळी थिएटर समोर एका ठिकाणी मख्खन पान मिळते. संपूर्ण गोठवलेले आणि फार जाड नसलेले एकदम पातळ असे मसाला पान मिळते. ते गालात ठेवून द्या आणि निवांत भटका. हळूहळू पान नॉर्मलला येते आणि एक एक फ्लेवर सुटा होत जातो. लै भारी पान आहे ते. ११) मिलेनीयम होंडा शेजारी आणि जिल्हा परिषद समोर जो रस्ता मोडक हॉस्पीटलकडे जातो तेथे तळघरात ऊसाचा रस मिळतो. १२) कुल्फी आईसक्रीम खाण्याचा कधी प्रसंग आला नाही पण १० / १५ वर्षांपूर्वी एकदा हरभट रोडवर पाटील कोल्ड्रींक्समध्ये बरेच वेगवेगळे प्रकार ट्राय केले होते. ते दुकान अजून आहे का ते बघा.. १३) कुमठा फाट्याला नॉन व्हेज चांगले मिळते. *सांगलीमधले बहुतांश पंजाबी हॉटेलवाले सांगली व्हर्जनची पंजाबी भाजी देतात आणि "पुण्यासारखी भाजी द्यायची आहे पण सांगलीच्या दरात" असा त्यांचा कायम गोंधळ उडालेला असतो.
  • Log in or register to post comments
स
सामान्य वाचक Fri, 07/08/2016 - 12:52 नवीन
पुण्यासारखे किंवा पुण्या पेक्षा अंमळ जास्त स्वादिष्ट पंजाबी जेवण मिळते दार आता आठवत नाहीत पण पुण्यापेक्षा तर नक्कीच कमी आहेत शिवाय मिशन चौकाजवळ अन्नपूर्णा आहे तिथे इडली वडा चांगला मिळतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Fri, 07/08/2016 - 13:40 नवीन
मला फक्त सांगलीची माहिती आहे मिरज इल्ला. मिरजेला फक्त औषध घ्यायला जातात असा ठाम समज एके काळी होता. तसेच मिरजेला आवर्जुन काहीतरी खाण्यासाठी जाण्याचा प्रसंग आला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक
स
सुखी Fri, 07/08/2016 - 19:43 नवीन
Rahamattulla, Bhauji cha wada an bhaji, Akshay, balle balle paratha, purvichi priyadarshani pavbhaji, parasram an mahesh chi bhel, Gadgil bainchi bhel, shivappa, basappa, a1 bekary ajun list purna nai zali mirjechi
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
स
सामान्य वाचक Sat, 07/09/2016 - 03:51 नवीन
आता पूर्वी सारखे राहिले नाही त्यांनी स्थलांतर सुद्धा केले पहिल्यांदा घराच्या भागातच असल्याने भाभी पूर्ण वेळ असायच्या आत्ता माहित नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखी
अ
अभ्या.. Fri, 07/08/2016 - 20:14 नवीन
अक्षयची टेस्ट भारीच, व्हरायटी पण चांगली. सद्यस्थिती माहीत नाही. मिरजच्या बस डेपो कँटीन मधला चहा सुरेख असतो. शिवाप्पा ची गुलकंद लस्सी जबरदस्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक
क
कपिलमुनी Fri, 07/08/2016 - 20:05 नवीन
सांगलीत चांगली माणसे भेटतील ! इतर शहरात हे दुर्मिळ आहे
  • Log in or register to post comments
स
सामान्य वाचक Sat, 07/09/2016 - 03:53 नवीन
इथे बरेच जण सांगली मीरजे चे दिसत आहेत
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा