Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कुणी सांगेल का ?

स
स्पा
गुरुवार, 07/21/2016 - 08:17
🗣 91 प्रतिसाद
सध्या माझ्या आजूबाजूला काहीतरी विचित्रच घडायला लागलेय प्रसंग एक : संध्याकाळचे डोंबिवली स्टेशन , मी पार्किंग मधून बाईक काढतोय, अचानक समोरून गडबड गोंधळ , ३ (सुस्वरूप कॉलेजवयीन )मुली आणि १ मुलगा धावत माझ्या दिशेने.. मी आजूबाजूला घाबरून पाहिले काय झाल?? काही विशेष नव्हते , परत नजर समोर घोळका अजून जवळ आलेला, आता ते मला बोलवत पण होते , हे बाब्बासॉर, जल्दी ओ मी बाबाब्सोर नाही हो मी.. मी .. म्हणेपर्यंत सगळे बाईक वर कोसळलेच, काहीतरी हातात मोबाईल वर त्यांना मिळाले , मग अजून गोंधळ करत तो ग्रुप उडत दुसरीकडे गेला. माझी बाईक जवळपास आडवी झालेली होती. समोरचा पण टपरी वाला ह्या ह्या करत हसत होता. कशीबशी बाईक सरळ केली आणि मार्गाला लागलो प्रसंग दोन: घाटकोपर आणि विक्रोळीच्या मध्ये .. दोन तरुण, साला ये ट्रेन को आजी इतना फास्ट जानेका था? मेर्को रोज ये सर्कल मे रेअर पोकेमोन दिख्ते बट साला ये ट्रेन ( ऑ, आता लोक ट्रेन हळू जावी म्हणून प्रार्थना करायला लागले ? ये क्या हो राहा हे ? प्रसंग तीन : ऑफिस लंच टाईम : बॉस:ए प्रसु . कल्याण डोंबिवली म्हणजे जंगल ना फुल ? मी : आ ? का ? बॉस : नाही रे मी ऐकलय तिथे भारी पोकेमोन फाईंड होतात. यायचं आहे रे , साला इकडे तेच तेच परत दिसतात मी : ????? प्रसंग चार : ए तू ट्रेक ला जातोस तर जिथे ३ जी असेल तिथेच प्लान करत जा रे.गाव साइड फुल्ल कलेक्सन अस्ते. प्रसंग पाच : रात्री १० नंतर एरियात हातात मोबाईल आणि मुंडी खाली असा जमाव इकडे तिकडे पळताना दिसतो . बर्यापैकी भीतीदायक दृश्य असते नक्की आजूबाजूला सुरु काय आहे कोणी सांगेल काय ?

प्रतिक्रिया द्या
15547 वाचन

💬 प्रतिसाद (91)
प
प्रचेतस गुरुवार, 07/21/2016 - 08:21 नवीन
???
  • Log in or register to post comments
स
सामान्य वाचक गुरुवार, 07/21/2016 - 08:23 नवीन
जाऊ दे दुर्लक्ष्य करा नवीन फॅड दुसरेकाय
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 07/21/2016 - 08:27 नवीन
स्पॉकेमोन
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 07/21/2016 - 08:38 नवीन
एकदा तरी कट्ट्याला या. मग बोलूच. (अर्थात, हा विषय सोडून.)
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम गुरुवार, 07/21/2016 - 12:07 नवीन
नक्की आजूबाजूला सुरु काय आहे कोणी सांगेल काय ?
याला 'या टोपी खाली दडलंय काय " गाण्याची चाल फिट्ट बसेल नै
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
अ
अजया गुरुवार, 07/21/2016 - 08:38 नवीन
=)) कचरा वेचतात ना हातात छडी घेऊन तसे लोक पण दिसतील तुला स्पांडु.घाबरु नको.ते पोकेमाॅन वेचतात ;)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 07/21/2016 - 08:39 नवीन
ह्ही ह्ही ह्ही ह्ही! पांडूव्यथा .
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 07/21/2016 - 08:47 नवीन
आँ, अच्चं जालं तल
  • Log in or register to post comments
ल
लालगरूड गुरुवार, 07/21/2016 - 09:10 नवीन
pokémon go गेम आहे. असं मॅप मध्ये पोकेमाॅन शोधायच आणि पकडायचं... चु*गिरी.....
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 07/21/2016 - 09:25 नवीन
आम्ही अद्यापही घराबाहेर, नोकिया-१०१, वापरत असल्याने, उत्तमच आहे म्हणायचे. जुने ते सोने आणि नोकियाला पर्याय नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लालगरूड
स
सभ्य माणुस गुरुवार, 07/21/2016 - 09:19 नवीन
schoolbus चाललेली असते.अचानक 3-4 दांडगत तरुन बसला अडवे जातात. बस मधे घुसतात. कहीच सेकंदात बाहेत पडतात. "मिल गया पोकेमोन...!"
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 07/21/2016 - 09:26 नवीन
http://maharashtratimes.indiatimes.com/international/international-news/popular-game-pokemon-go-claims-its-first-victim/articleshow/53315717.cms
  • Log in or register to post comments
व
वरुण मोहिते गुरुवार, 07/21/2016 - 09:35 नवीन
अहो हे कैच नाई. सध्या मुंबईत आहे आमचे काई कॉर्पोरेट बार मित्र पिता पिता बाहेर जातात आणि पोकेमॉन वॉर करून येतात.. काय चालूये
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 07/21/2016 - 09:40 नवीन
आणि पोकेमॉन वॉर करून येतात....." उत्तम रंगलेली मैफिल, अशी अर्धवट सोडणार्‍यांना आम्ही परत बोलवत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/21/2016 - 09:59 नवीन
मी अत्ता पर्यंत झुबाट वीडली अब्रा रट्टाटा आणि पिड्गे पकडले आहेत ! बुल्बासॉर सगळ्यांनाच मिळतो सुरुवातीला ! बाकी एका पोकेस्टॅप ला विजिट देवुन आलोय ! साला लाईफ मध्ये पहिल्यांदा गेम खेळायसाठी डेटापक मारला पण डेटापॅक चे स्पीड कमी असल्याने बाकीचे पोकेमॉन पकडायला वेळ लागत आहे :)
  • Log in or register to post comments
V
viraj thale गुरुवार, 07/21/2016 - 10:38 नवीन
badges जिंकलेत की नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
म
माम्लेदारचा पन्खा गुरुवार, 07/21/2016 - 09:59 नवीन
तूर्तास इतकेच !
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे गुरुवार, 07/21/2016 - 10:01 नवीन
सध्या बरंच फॅड आहे या गेमचं. काल दुपारी जेवल्यानंतर खाली पार्कींग प्रिमायसेसमध्ये शतपावली सुरू होती. अचानक मोबाईल फोन हातात घेऊन चालणारी ग्रुपमधली एक पोरगी चालता चालता अचानक "हेहे बॉब्बासॉर..बॉब्बासॉर" करत उड्या मारायला लागली. म्हटलं अचानक काय झालंय बघायला गेलो तर ही थेरं.! =))
  • Log in or register to post comments
स
स्पा गुरुवार, 07/21/2016 - 10:06 नवीन
हा एक फिटनेस गेम आहे असे समजले =)) डॉक खरे अजून सांगितलच या बद्दल
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे गुरुवार, 07/21/2016 - 10:12 नवीन
या गेमविषयीची आजची ही ताजी बातमी !
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ गुरुवार, 07/21/2016 - 10:13 नवीन
हा खेळ पांचट असूदे, पण "ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी" ही लय भारी आयड्या आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/21/2016 - 11:25 नवीन
ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी
ही खरतनाकाच कन्सेप्ट आहे ! तरी अजुन पोकेमॉन मधील अवतार पाहिजे तितका परसनलाईझ करता येत नाही . जर तो तसा परसनालाईझ करता आला तर अ‍ॅक्च्युअल मध्ये "मॅट्रीक्स" बनवता येईल !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
म
मोहनराव गुरुवार, 07/21/2016 - 10:14 नवीन
मोबाईल झोंबी तयार करण्यासाठी नवीन गेमींग अ‍ॅप दिसतय... चालु द्या. अजुन काय काय बघणार भविष्यात काय माहीती? Image removed.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस गुरुवार, 07/21/2016 - 10:19 नवीन
ह्यांचेच अजुन एक प्रसिध्द वाक्य “Two things are infinite: the universe and human stupidity; and I'm not sure about the universe.”
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव
च
चिनार गुरुवार, 07/21/2016 - 10:20 नवीन
नक्की काय प्रकार आहे हा पोकेमॉन गेम ??
  • Log in or register to post comments
स
सस्नेह गुरुवार, 07/21/2016 - 10:34 नवीन
तरीच आमचे चिरंजीव हल्ली स्कूटर सोडून पायी फिरायला लागलेत !!!
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 07/21/2016 - 10:39 नवीन
पोकेमोनमधल्या कोणी कॅरिक्टरसारखा दिसतोस का?
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री कुलकर्णी गुरुवार, 07/21/2016 - 10:48 नवीन
मला पण हे शष्प कळले नाही. त्या स्थानावर गेल्यावर मोबाईल मध्ये ते येतात का. कितीही पोकेमान असतात का त्या जागी.माझे अद्यान दुर करा कुणीतरी.
  • Log in or register to post comments
ल
लालगरूड गुरुवार, 07/21/2016 - 10:56 नवीन
शष्प म्हणजे काय? नविन शब्द
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री कुलकर्णी
स
सूड गुरुवार, 07/21/2016 - 10:59 नवीन
गवत, तसूभर कळलं नाही अशा अर्थी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लालगरूड
स
सूड गुरुवार, 07/21/2016 - 10:58 नवीन
मन्याच्या मनीची व्यथा!!
  • Log in or register to post comments
श
शि बि आय गुरुवार, 07/21/2016 - 11:08 नवीन
हा हा हा... पुढच्या वेळेपासून तुम्ही हातात छडी घेऊनच बाहेर पडत जा... पूर्वी लोक गुरं हाकायचे तसं आता पॉकिमांच्या गुरांना हाकलायला उपयोगी पडेल. पोर रस्त्यात सुध्या 'बॉब्बासॉर.. बॉब्बासॉर मिल गया' करत ओरडत फिरताना पहिली आहेत... लोक बसून गेम खेळण्यावर ऑब्जेक्शन घेतात ना म्हणून आता व्यायाम आणि गेम असं कॉम्बिनेशन आलेलं आहे.
  • Log in or register to post comments
ब
बेकार तरुण गुरुवार, 07/21/2016 - 11:15 नवीन
हा खेळ उपलब्ध (लाँच) करुन दिल्यापासुन त्या कंपनीची मार्केट कॅप दुप्पट झाली !! http://www.business-standard.com/article/international/nintendo-s-market-cap-doubles-to-42-billion-since-pokemon-go-launch-116071900379_1.html
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 07/21/2016 - 11:15 नवीन
एक मोबाइल अॅप आहे अलार्मचे. यात वेळेचा गजर लावायचा नसून जिपिएस अलार्म आहे.अमुक एक अक्षांश रेखांश फिक्स करून गजर लावायचा आणि फोनातले जिपिएस चालू ठेवायचे.जेव्हा तुम्ही त्या जागेवर पोहोचता तेव्हा गजर वाजतो.तशा प्रकारचा गेम असावा.दिलेल्या ठिकाणी गेल्यावर चेकइन करून पॅाइंट्स मिळत असतील.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 07/21/2016 - 11:16 नवीन
एक मोबाइल अॅप आहे अलार्मचे. यात वेळेचा गजर लावायचा नसून जिपिएस अलार्म आहे.अमुक एक अक्षांश रेखांश फिक्स करून गजर लावायचा आणि फोनातले जिपिएस चालू ठेवायचे.जेव्हा तुम्ही त्या जागेवर पोहोचता तेव्हा गजर वाजतो.तशा प्रकारचा गेम असावा.दिलेल्या ठिकाणी गेल्यावर चेकइन करून पॅाइंट्स मिळत असतील.
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री कुलकर्णी गुरुवार, 07/21/2016 - 15:17 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
भ
भाग्यश्री कुलकर्णी गुरुवार, 07/21/2016 - 15:18 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
अ
अभ्या.. गुरुवार, 07/21/2016 - 11:19 नवीन
आपण मिपावर दुआयडी हुडकायचा गेम चालू करूयात काय?
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 07/21/2016 - 11:59 नवीन
करा, आयाम इन !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
र
रघुनाथ.केरकर गुरुवार, 07/21/2016 - 11:35 नवीन
हा गेम जर भारतात ओफ्फीशीयली लाँच झाला तर टेलीकॉम ऑपरेटर किमान १० ते २५ % जास्त पैसे कमावतील. खरोखरचाच पॉकेट माँन्स्टर होउन जाईल हा गेम.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 07/21/2016 - 12:31 नवीन
एक ओगस्टला ओफ लाइन येतोय असं हॅकर्सनी जाहिर केलंय.म्हणजे मोबाइलला दोन पावर ब्यान्क ला वूस ठेवायच्या.
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम गुरुवार, 07/21/2016 - 12:39 नवीन
याचे सर्व्हर परदेशात आहेत. आणि खेळण्यासाठी GPS आणि कॅमेरा सुरू हवा यामुळे संवेदनशील ठिकाणांची माहिती पोहचू शकते.
  • Log in or register to post comments
स
स्पा गुरुवार, 07/21/2016 - 12:43 नवीन
मज्जा मज्जा आहे सगळी
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 07/21/2016 - 14:37 नवीन
पांडू, तू पण एक घोस्टर गेम काढ ना असाच! भूतं पकडायचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
म
मुक्त विहारि गुरुवार, 07/21/2016 - 14:42 नवीन
"स्पा"चा धागा आणि गुरुजी का नाही? चला आता "स्पा"च्या धाग्याचे सार्थक झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
प
प्रचेतस गुरुवार, 07/21/2016 - 15:04 नवीन
पांडूमॉन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 07/22/2016 - 11:22 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
पैसा गुरुवार, 07/21/2016 - 14:29 नवीन
पहिला परिच्छेद वाचून वाटले स्पा चे 'ते' खरेच आले का काय!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 07/21/2016 - 14:36 नवीन
"हे" नाही परवडत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
च
चाणक्य Fri, 07/22/2016 - 18:43 नवीन
अगदी अगदी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा