कुणी सांगेल का ?
सध्या माझ्या आजूबाजूला काहीतरी विचित्रच घडायला लागलेय
प्रसंग एक : संध्याकाळचे डोंबिवली स्टेशन , मी पार्किंग मधून बाईक काढतोय, अचानक समोरून गडबड गोंधळ , ३ (सुस्वरूप कॉलेजवयीन )मुली आणि १ मुलगा धावत माझ्या दिशेने.. मी आजूबाजूला घाबरून पाहिले काय झाल?? काही विशेष नव्हते , परत नजर समोर घोळका अजून जवळ आलेला, आता ते मला बोलवत पण होते , हे बाब्बासॉर, जल्दी
ओ मी बाबाब्सोर नाही हो मी.. मी .. म्हणेपर्यंत सगळे बाईक वर कोसळलेच, काहीतरी हातात मोबाईल वर त्यांना मिळाले , मग अजून गोंधळ करत तो ग्रुप उडत दुसरीकडे गेला.
माझी बाईक जवळपास आडवी झालेली होती. समोरचा पण टपरी वाला ह्या ह्या करत हसत होता. कशीबशी बाईक सरळ केली आणि मार्गाला लागलो
प्रसंग दोन: घाटकोपर आणि विक्रोळीच्या मध्ये .. दोन तरुण, साला ये ट्रेन को आजी इतना फास्ट जानेका था?
मेर्को रोज ये सर्कल मे रेअर पोकेमोन दिख्ते बट साला ये ट्रेन ( ऑ, आता लोक ट्रेन हळू जावी म्हणून प्रार्थना करायला लागले ? ये क्या हो राहा हे ?
प्रसंग तीन : ऑफिस लंच टाईम : बॉस:ए प्रसु . कल्याण डोंबिवली म्हणजे जंगल ना फुल ?
मी : आ ? का ?
बॉस : नाही रे मी ऐकलय तिथे भारी पोकेमोन फाईंड होतात. यायचं आहे रे , साला इकडे तेच तेच परत दिसतात
मी : ?????
प्रसंग चार : ए तू ट्रेक ला जातोस तर जिथे ३ जी असेल तिथेच प्लान करत जा रे.गाव साइड फुल्ल कलेक्सन अस्ते.
प्रसंग पाच : रात्री १० नंतर एरियात हातात मोबाईल आणि मुंडी खाली असा जमाव इकडे तिकडे पळताना दिसतो . बर्यापैकी भीतीदायक दृश्य असते
नक्की आजूबाजूला सुरु काय आहे कोणी सांगेल काय ?
💬 प्रतिसाद
(91)
य
यशोधरा
गुरुवार, 07/21/2016 - 14:39
नवीन
कोण असं पोकेमॉन शोधतं? मला नाही कोणी दिसलं कधी..? स्पावड्या, थापा मारतोयस ना?
- Log in or register to post comments
स
स्पा
गुरुवार, 07/21/2016 - 14:48
नवीन
दिसतील दिसतील,
मुंबईत फॅड आलय, आता पुण्यात यायला वेळ नाही लागणार
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 07/21/2016 - 14:53
नवीन
कालचा प्रसंगः काल वहुमन मधून निघालो. आणि आमची वर्गमैत्रिण एक डबक्यापाशी रेंगाळली. म्हणलं बयो (हो आम्ही मैत्रीणींना बयो वैगरे म्हणतो.) काय चाललंय. तर म्हणे डबक्यापाशी एक वॉटरपोकेमॉन आहे. एका कारपाशी पण तिला काहीतरी सापडलं. आमच्या वेळी असं नव्हतं हे वाक्य मनातल्या मनात म्हणून परतलो.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 07/21/2016 - 14:56
नवीन
=))
- Log in or register to post comments
स
स्पा
गुरुवार, 07/21/2016 - 14:59
नवीन
लोल
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
गुरुवार, 07/21/2016 - 15:32
नवीन
लहानपणी काडेपेट्यांचे छाप जमवायचो त्याची आठवण झाली!
- Log in or register to post comments
ख
खालीमुंडी पाताळधुंडी
गुरुवार, 07/21/2016 - 14:54
नवीन
महासत्ता होण्याकडे वाटचाल.
- Log in or register to post comments
र
रघुनाथ.केरकर
गुरुवार, 07/21/2016 - 15:03
नवीन
आत्ताच एक चार्मेंडर मारला, आजुबाजुला काही दीसत नाही. ऑफिस च्या वाय-फाय क्षेत्रात सगळं फिरुन झालं पन एक बी पोकेमोन नाही सापडला, बदलापुर ला बघतो सापडतात का?
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 07/21/2016 - 15:29
नवीन
बदलापूरात कुठे म्हणे तुम्ही?
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 07/21/2016 - 15:29
नवीन
बदलापूरात कुठे म्हणे तुम्ही?
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 07/21/2016 - 15:29
नवीन
बदलापूरात कुठे म्हणे तुम्ही?
- Log in or register to post comments
र
रघुनाथ.केरकर
गुरुवार, 07/21/2016 - 15:38
नवीन
Manhohar vikas residency
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 07/21/2016 - 16:11
नवीन
ओके!!
- Log in or register to post comments
र
रघुनाथ.केरकर
Fri, 07/22/2016 - 11:57
नवीन
आपण सुद्धा श्रीक्षेत्र बदलापुरचेच का?
- Log in or register to post comments
स
सूड
Fri, 07/22/2016 - 12:31
नवीन
नाय नुसतं बदलापूर, आम्ही पुण्यनगरीत निघून आल्याने आता ते श्रीक्षेत्र राहीलं नाही.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Fri, 07/22/2016 - 14:37
नवीन
हाण्ण्ण तिज्यायला.
माउली स्पेअर पादुका हैत का? खडावा, खडावा.
- Log in or register to post comments
स
सूड
Fri, 07/22/2016 - 19:24
नवीन
एक साधा जोड आहे, दुसरा तुमच्याकडून डिझाईन करुन घ्यायचाय. म्हणजे सणावाराला वापरायला बरा!! ;) =))
- Log in or register to post comments
र
रघुनाथ.केरकर
Sat, 07/23/2016 - 08:24
नवीन
Bhagya punya nagariche
- Log in or register to post comments
म
मोहनराव
गुरुवार, 07/21/2016 - 15:15
नवीन
सिरियात खुप पोकेमॉन सापडत असतील.. तिकडे जा म्हणाव!!
- Log in or register to post comments
ब
बहुगुणी
गुरुवार, 07/21/2016 - 16:02
नवीन
इन्ग्रेस
हा खेळ खरोखरीच जगभर पसरलेला आहे, भारत धरून, आणि serious गेमर्स यासाठी तासंतास घालवायचे. त्याच कंपनीने (Niantic) आता पोकेमॉन गो आणला आहे.
- Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज
गुरुवार, 07/21/2016 - 16:45
नवीन
खतरनाक!
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
गुरुवार, 07/21/2016 - 17:27
नवीन
एक दोघे गाडीखाली आले की फॅड कमी होइल...
- Log in or register to post comments
आ
आनन्दिता
गुरुवार, 07/21/2016 - 18:07
नवीन
ऑ!! अच्चं झालं तर !
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
गुरुवार, 07/21/2016 - 19:01
नवीन
मी खेळंत नाहीये तर मला पकडतील का हे लोकं? बहुतेक नाही. बरोबर?
-गा.पै.
- Log in or register to post comments
म
मराठमोळा
Fri, 07/22/2016 - 00:17
नवीन
हे सर्व काय चाललंय हे समजत नसेल आणी समजल्यानंतर न आवडल्यास आपलं वय बरंच वाढलंय आणि अजूनही केला नसल्यास गृहस्थाश्रमात प्रवेश करण्याची वेळ आली आहे हे समजून घ्यावे.
- Log in or register to post comments
स
स्पा
Fri, 07/22/2016 - 04:00
नवीन
विमे ची आठोण आली ;)
- Log in or register to post comments
र
रघुनाथ.केरकर
गुरुवार, 07/28/2016 - 10:25
नवीन
मिपा वरचा हा धागा पाहीला, अन लग्गेच पोकेमोन इंस्टाल केला, २ - ३ दीवस खेळुन पाहीला, पण ज्याप्रकारे नेट , टीव्हीवर पोकेमॉन ची चर्चा आहे तेवढा काही खास वाटला नाही, कात्रप, शीरगाव, हेन्द्रे पाडा , वाणीवली, एरंजाड, शिवाजी चौक अगदी बदलापुर गाव देखी पालथं घातलं पण मोजुन ४ ते ५ पोकेमॉन गावले. उगाच डिजेल, नेट आनी वेळ वाया गेला. काहिच थ्रिल वाटलं नाही.
- Log in or register to post comments
ज
जगप्रवासी
Fri, 07/22/2016 - 14:18
नवीन
काल एका ठिकाणी जायचं होत, एका मित्राला म्हटलं मला सोडशील का तिथे तर नेहमी नखरे करणारा मित्र लगेच तयार झाला. त्याच्या बाईक वरून जाताना त्याने भर रस्त्यात अचानक ब्रेक मारून गाडी थांबवली. मागून बेस्ट बस वाला हॉर्न मारतोय, मी त्याला शिव्यांची लाखोली वाहायला चालू केली तर हे महाशय पॉकेमॉन पकडत होते. जर बसच्या ड्रॉयव्हरने वेळेत ब्रेक मारला नसता तर आम्ही दोघे पण फोटोत जाऊन बसलो असतो. शुद्ध वेडेपणा आहे हा खेळ म्हणजे.
- Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा
Fri, 07/22/2016 - 14:26
नवीन
काळजी घ्यावी मालक !
सध्या नोकिया वापरणारे आता देवदूत म्हणून ओळखण्यात येत आहेत....
- Log in or register to post comments
क
कंजूस
Fri, 07/22/2016 - 18:20
नवीन
आजच संध्याकाळी cnbc awaaz tv18 चानेलवर दोन एपिसोड दाखवले पोकेमनवर छान होते.१) टेकगुरू -गेमिंग स्पेशल ,२)pokemania नेटवर चसेल तर पाहा.
एक जाहिरातही दाखवली परदेशी त्यात हेल्मेट घालून पोकेमोन खेळा असा संदेश दिलाय.
- Log in or register to post comments
च
चतुरंग
Sat, 07/23/2016 - 10:08
नवीन
आचरटपणा आहे!
http://www.cartelpress.com/pokemon-go-major-highway-accident-man-stops-middle-highway-catch-pikachu/
हायवेवरती मधेच पोकेमॉन पकडायला गाडी थांबवणारे महाशय!
ही फक्त सुरुवात आहे....
- Log in or register to post comments
स
स्पा
Sat, 07/23/2016 - 10:32
नवीन
डेंजर हाय
- Log in or register to post comments
आ
आंबट चिंच
गुरुवार, 07/28/2016 - 10:09
नवीन
ऑ!!आँच्च जाँल्ल झालं तर !
साभार परत स्पांडुजी
- Log in or register to post comments
स
स्पा
गुरुवार, 07/28/2016 - 10:14
नवीन
ओके आंची
वेळ मिळेल तसे माझ्या इतर लेखांवर पण टाका न प्लीज एक एक कमेंट
- Log in or register to post comments
उ
उडन खटोला
गुरुवार, 07/28/2016 - 10:15
नवीन
खि खि खि. तु पोकेमोन पकडत असणार ;)
- Log in or register to post comments
ग
गवि
गुरुवार, 07/28/2016 - 10:39
नवीन
रोचक खेळ आहे. ऑगमेंटेड रियालिटी पुढे आणणारा.
पण भारतात गेम रिलीज झालेला नसेल तर भारतातल्या भौगोलिक अक्षांशरेखांशांवर पोकेमॉन तरी कसे दिसतात?
(मूळ कंपनीने फक्त जिथे गेम रिलीज करायचा तिथल्या प्रदेशातल्याच ठराविक जागीच आभासी पोकेमॉन सर्वर प्रोग्राममधे पेरले असणार असं गृहीत धरुन)
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
गुरुवार, 07/28/2016 - 11:12
नवीन
मी माझी ट्रु जी.पी.एस लोकेशन हाईड करुन फेक जी.पी.एस लोकेशन क्रियेट केली की जेणे करुन मला एका जागी बसुन वेगवेगळ्या ठिकाणांचे पोकेमॉन पकडता येतील किंव्वा पोकेस्टॉप विजिट करुन पोकेबॉल मिळवता येतील , बट इट डिडन्ट वर्क. पोकेमॉन गेम फेक जी.पी.एस लोकेशन डिटेक्ट करतंय :( Perhaps I was being to naive to assume that they would make such a simple mistake :P
असे फेक जीप.पी.एस लोकेशन सिम्युलेट करता आले असते तर आपण मॅट्रिक्स चित्रपटासारखे संपुर्ण सिम्युलेटेड रियालिटी कन्सेप्टला फार जवळ आलो असतो .
असो . थोडक्यात काय तर , स्वतःचे बुड हलवल्या शिवाय पोकेमॉन पकडता येणार नाहीत . उठा आणी चालायला लागा . त्या निमित्ताने व्यायाम :))))
अवांतर : अॅन्ड्रोईड गेम्स चे कोड स्वतःपुरते मॉडीफाय करता येतात का ? आणि तसे करणे लीगल असते का ?
- Log in or register to post comments
त
तेजस आठवले
Wed, 08/10/2016 - 16:31
नवीन
हा गेम राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असू शकतो. तसेच अपघातांची संख्या वाढत जाणार हे पण नक्की.
- Log in or register to post comments
स
स्वामी संकेतानंद
Wed, 08/10/2016 - 17:08
नवीन
महामूर्खपणा आहे हा. लोकांच्या आणि देशाच्याही सुरक्षेला धोका!
- Log in or register to post comments
ह
हेमन्त वाघे
Wed, 08/10/2016 - 18:28
नवीन
देशाच्याही सुरक्षेला धोका कसा ते जरा सांगाल का?
- Log in or register to post comments
ल
लालगरूड
Wed, 08/10/2016 - 19:01
नवीन
कॅमेरा चालू असतो डाटा अपलोड होतो यामुळे गुगल मॅप्समधून जेवढी माहिती मिळणार नाही तेवढी कळेल.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2