इसिसमध्ये सामील होणारे युवक/युवती
सिरिया व इराक मध्ये इसिसचा उदय झाल्यापासून विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक देशातील मुस्लिम तरूण, तरूणी इसिसमध्ये सामील होऊन इस्लामसाठी लढून हुतात्मा होण्यासाठी सिरीयामध्ये जात आहेत अशा बातम्या येत आहेत. भारतातील केरळमधील व महाराष्ट्रातील काही मुस्लिम युवक, युवती आधीच इसिसमध्ये भरती झाल्याच्या बातम्या झळकल्या आहेत. गर्भवती मुस्लिम तरूणींनी सिरिया/इराकमधील इसिसच्या अधिपत्याखालील इस्लामच्या पवित्र प्रदेशात येऊन मुलांना जन्म द्यावा असे इसिसने आवाहन केल्याचे २-३ दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झाले होते. इसिसमध्ये भरती होण्यासाठी निघालेल्या काही मुस्लिम युवकांना संशयावरून विमानतळावरच अडवून परत घरी पाठविण्यात आल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झालेल्या आहेत.
इसिस आपल्या प्रचारासाठी आंतरजालाचा प्रभावी वापर करते असे दिसते. आंतरजालाच्या माध्यमातून मुस्लिम युवक/युवतींवर प्रभाव टाकून त्यांना आपल्या जाळ्यात ओढायचे प्रयत्न सुरू असतात असे माध्यमे सांगतात.
जे युवक/युवती इसिसच्या तत्वज्ञानाने भारून इराक/सिरियाला निघाले आहेत त्यांना बळजबरीने अडवून परत घरी पाठविणे चुकीचे आहे असे आमचे मत आहे. त्यांना इसिसमध्ये सामील होऊन न देता बळजबरीने भारतात डांबून ठेवले तरी ते आंतरजालाच्या माध्यमातून इसिसच्या संपर्कात राहतीलच आणि इसिसमध्ये सामील होता न येता इथेच रहावे लागल्याच्या रागातून इथेच दहशतवादी कारवायात सामील होऊन जास्त उपद्रव देतील अशी शक्यता वाटते. त्यांना इसिसमध्ये जाऊन न देता अडविणे म्हणजे रोगापेक्षा उपाय भयंकर अशी परिस्थिती येऊ शकते.
त्यामुळे इसिसमध्ये सामील व्हायला निघालेल्यांना बळजबरीने न अडविता त्यांना जाऊन द्यावे. त्यांना इसिसमध्ये सामील होऊन द्यावे. त्यांना धर्माकरिता युद्ध वगैरे करायचे असेल तर ते त्यांना इराक/सिरियाच्या भूमीवर करता येईल. भारताला त्याचा त्रास नाही. त्यातले बहुतेकजण तिथे युद्धात मारले जातीलच व मृत्युनंतर त्यांना स्वर्गात प्रवेश मिळून त्यांना ७२ कुमारी अप्सरांचा लाभ होईल. चुकूनमाकून त्यातले कोणी परत आलेच तर त्यांना आयुष्यभर तुरूंगात ठेवावे. एकंदरीत आपला उपद्रव कमी करण्यासाठी त्यांना न अडविता इसिसमध्ये जाऊन द्यावे.
एकंदरीत आपला उपद्रव कमी करण्यासाठी त्यांना न अडविता इसिसमध्ये जाऊन द्यावे.बर्र.. हे पत्र कुणाकुणाला पाठवले आहे? तुम्ही पण गुरूजी.. कशाला असल्या धाग्यात वेळ वाया घालवत आहात...?इकडच्या मुस्लिमांना तिकडच्या बद्दल ममत्व चालत नाही पण इकडच्या हिंदूंनी तिकडच्या हिंदूंबद्दल उमाळे काढले तर ते चालतंडांगे साहेब.. तिकडचे किती हिंदू इकडे येवून २६/११, मुंबई स्फोट, कोईंबतूर किंवा संसदेवर हल्ला सारखे प्रकार प्रत्यक्ष / अप्रत्यक्षपणे करतात..? ..आणि असल्या प्रकारात इथल्यांचेच जनाजे उठत असतील तर इथल्यांनी तिकडच्यांबद्दल का ममत्व बाळगावे..? आता प्लीज दहशतवादाला धर्म नसतो असे शोभाडे, बरखा दत्त टाईप सोयीस्कर विचार सांगू नका.मोदकराव, पाकिस्तान चे हिंदू असो व किरस्ताव, का आदिवासी, मला कोनाविषयीही ममत्व नाही, ट्रोजन हॉर्स पासून सावध तितके बरे!बर्र..तिथल्या हिंदूंवर अत्याचार होतात म्हणून इथल्या मुस्लिमाबद्दल द्वेष तयार करण्यासाठी त्यांचा वापर काही लोक करतात,याला सपशेल असहमत. हिंदू मुस्लीम दंगलींचा खरा इतिहास, मदरशांमध्ये चालणारे ब्रेनवॉशिंग, दहशतवादी हल्ल्यात नेहमीच आढळणारी मुस्लिम नावे, अल्पसंख्यांक अल्पसंख्यांक असा कांगावा करत उपटलेले फायदे आणि सर्वसाधारणपणे राष्ट्रनिष्ठेपेक्षा धर्मनिष्ठा मोठी अशी अनेक कारणे असताना "तिकडच्या भाईजानवर अत्याचार होत असल्यामुळे हिंदूत्व खतरेंमें" अशा आरोळ्या देण्याची आवश्यकता भासेल असे वाटत नाही.तिथे राष्ट्रप्रेम विसरून मुस्लिमांसारखे आपणही फक्त धर्मप्रेमी आहोत हे सोयीस्कर विसरायचेकोणीही स्वधर्मप्रेमी असण्याला कोणाचाच आक्षेप नसावा. "तुमचा धर्म माझ्या धर्माप्रमाणे चालत नाही म्हणून तुम्ही काफिर" ही थिअरी कशी मान्य करणार..?