Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

इसिसमध्ये सामील होणारे युवक/युवती

श
श्रीगुरुजी
Wed, 08/03/2016 - 11:07
🗣 134 प्रतिसाद
सिरिया व इराक मध्ये इसिसचा उदय झाल्यापासून विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक देशातील मुस्लिम तरूण, तरूणी इसिसमध्ये सामील होऊन इस्लामसाठी लढून हुतात्मा होण्यासाठी सिरीयामध्ये जात आहेत अशा बातम्या येत आहेत. भारतातील केरळमधील व महाराष्ट्रातील काही मुस्लिम युवक, युवती आधीच इसिसमध्ये भरती झाल्याच्या बातम्या झळकल्या आहेत. गर्भवती मुस्लिम तरूणींनी सिरिया/इराकमधील इसिसच्या अधिपत्याखालील इस्लामच्या पवित्र प्रदेशात येऊन मुलांना जन्म द्यावा असे इसिसने आवाहन केल्याचे २-३ दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झाले होते. इसिसमध्ये भरती होण्यासाठी निघालेल्या काही मुस्लिम युवकांना संशयावरून विमानतळावरच अडवून परत घरी पाठविण्यात आल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झालेल्या आहेत. इसिस आपल्या प्रचारासाठी आंतरजालाचा प्रभावी वापर करते असे दिसते. आंतरजालाच्या माध्यमातून मुस्लिम युवक/युवतींवर प्रभाव टाकून त्यांना आपल्या जाळ्यात ओढायचे प्रयत्न सुरू असतात असे माध्यमे सांगतात. जे युवक/युवती इसिसच्या तत्वज्ञानाने भारून इराक/सिरियाला निघाले आहेत त्यांना बळजबरीने अडवून परत घरी पाठविणे चुकीचे आहे असे आमचे मत आहे. त्यांना इसिसमध्ये सामील होऊन न देता बळजबरीने भारतात डांबून ठेवले तरी ते आंतरजालाच्या माध्यमातून इसिसच्या संपर्कात राहतीलच आणि इसिसमध्ये सामील होता न येता इथेच रहावे लागल्याच्या रागातून इथेच दहशतवादी कारवायात सामील होऊन जास्त उपद्रव देतील अशी शक्यता वाटते. त्यांना इसिसमध्ये जाऊन न देता अडविणे म्हणजे रोगापेक्षा उपाय भयंकर अशी परिस्थिती येऊ शकते. त्यामुळे इसिसमध्ये सामील व्हायला निघालेल्यांना बळजबरीने न अडविता त्यांना जाऊन द्यावे. त्यांना इसिसमध्ये सामील होऊन द्यावे. त्यांना धर्माकरिता युद्ध वगैरे करायचे असेल तर ते त्यांना इराक/सिरियाच्या भूमीवर करता येईल. भारताला त्याचा त्रास नाही. त्यातले बहुतेकजण तिथे युद्धात मारले जातीलच व मृत्युनंतर त्यांना स्वर्गात प्रवेश मिळून त्यांना ७२ कुमारी अप्सरांचा लाभ होईल. चुकूनमाकून त्यातले कोणी परत आलेच तर त्यांना आयुष्यभर तुरूंगात ठेवावे. एकंदरीत आपला उपद्रव कमी करण्यासाठी त्यांना न अडविता इसिसमध्ये जाऊन द्यावे.
वर्गीकरण
राजकारण
सिरिया
इसिस
इराक

प्रतिक्रिया द्या
26644 वाचन

💬 प्रतिसाद (134)
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 08/13/2016 - 12:55 नवीन
+1000
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
श
श्रीगुरुजी Sat, 08/13/2016 - 14:38 नवीन
ड्रेस कोड, चालिरीती, सणवार साजरा करण्याच्या पद्धतीत अध्यात्म शोधतो म्हटलं तर मग कठीण आहे गुर्जी. असु द्या. जानवं, शेंडी, धोतर, पुरणपोळीचा नैवेद्य या सगळ्यांचा ज्ञानदेव सांगितलेल्या सच्चिदानंद चिद्विलासाशी संबंध लावणं म्हणजे... असो.
मुस्लिम अध्यात्म कसं गोड आणि श्रीमंत आहे हे सांगण्याऐवजी तुम्ही थेट हिंदू धर्मावरच घसरलात. मुस्लिम अध्यात्माच्या गोडव्याची व श्रीमंतीची काही उदाहरणं द्याल असं वाटलं होतं. आता जानवं, शेंडी, धोतर, पुरणपोळीचा नैवेद्य इ. चा हिंदू धर्माच्या अध्यात्माशी संबंध आहे असं तुम्हाला म्हणायचं असावं. मुळात जानवं, शेंडी इ. बाह्य अवडंबरं हिंदूंमधील एका अत्यंत अल्पसंख्या असलेल्या जातीशी संबंधित होती. ही बाह्य चिन्हे बहुसंख्य हिंदू वापरत नव्हते. जे वापरत होते त्यातील अनेकांनी या बाह्य चिन्हांचा त्याग केला आहे. हिंदू अध्यात्म हे या बाह्य चिन्हांवर कधीच अवलंबून नसते. एका विशिष्ट दिशेला तोंड करून, विशिष्ट वेष परीधान करून, विशिष्ट प्रकारे उपासना केली तरच ते अध्यात्म आणि तसं नसेल तर ते अध्यात्म नाही असं बंधन हिंदूंवर कधीच नव्हतं. हिंदू धर्मात परमेश्वरप्राप्तीचे असंख्य मार्ग सांगितले आहेत. कोणताही मार्ग अवलंबताना बाह्य अवडंबर असलेच पाहि़जे असे बंधन नाही. अगदी शूचिर्भूत असावे हे सुद्धा बंधन नाही. आता हीच तुलना मुस्लिम पद्धतीशी करा आणि फरक बघा. त्यात काही गोड आणि श्रीमंत असेल तर सांगा.
अगदी सुरुवात करायची म्हटलं तर जयंतरावांची इब्न बतूत सिरीज चाळण्याचा सल्ला देतो. ते ही असो.
सिरीजची लिंक असेल तर द्या. नक्की वाचेन.
आपल्यासारख्या अनेक महाभागांशी संवाद साधायचं भाग्य लाभलय मला. त्यामुळे आपल्या विचारांचं आश्चर्य नाहि वाटलं, खेद जरुर वाटतो.
चालायचंच. काही जणांचे जे गैरसमज आहेत त्याबद्दल मला सुद्धा खेद वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
च
चंपाबाई Sat, 08/13/2016 - 13:08 नवीन
हो का ? सनातनची पुस्तके वाचा. तिथेही हे मिळेल. आर्यानीही द्रविडांच्या मुंड्या मुरगाळूनच आपले बस्तान बसवले. मार ही त्राटिका .... आठवते का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
अ
अर्धवटराव Sat, 08/13/2016 - 21:54 नवीन
या. स्वागत आहे. सध्या एरंडेल तेलाचा भाव काय आहे हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
ग
गामा पैलवान Sat, 08/13/2016 - 23:12 नवीन
काहीही हं चंपाबाई! म्हणे आर्यांनी द्रविडांच्या मुंड्या मुरगळल्या!! एकतरी युद्ध दाखवा ज्यात एक आर्य आणि एक द्रविड अशा दोन पार्ट्या एकमेकांशी लढताहेत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
म
मोदक Fri, 08/12/2016 - 11:15 नवीन
मान्य केले तर मग कितीही बाटवाबाटवी झाली, कत्तली झाल्या तरी आपण बांग्लादेशी, पाकिस्तानी हिंदूंबद्दल शष्प संवेदना ठेवायचे काम नाही, हे पोटकलम सुद्धा मान्य व्हावे म्हणे मी , कारण जसे ह्या आयसिसेच्छूक लोकांना भारताशी काही घेणे देणे नाही तसेच त्या हिंदूंनाही कधीच नव्हते! जेव्हा मौका होता तेव्हा आले नाहीत मग आता आपण कश्याला रडावे! बापूसाब.. याच न्यायाने तुम्ही अप्रत्यक्षपणे "एक धर्म एक राष्ट्र" या थिअरीला किंवा "हिंदूराष्ट्र" या संकल्पनेला पाठिंबा देत आहात असे वाटत आहे. तरीपण मेन मुद्दा मिस झाला असेल तर तो काय ते प्लीज सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 08/12/2016 - 14:39 नवीन
मेन मुद्दा क्र.१
जसे आयसीसेतच्छूक भारतीय मुसलमानांस देशाशी घेणे देणे नाही, तसेच पाकिस्तानात राहिलेल्या हिंदूंना सुद्धा नाही, का नाही? तर साक्षात फाळणीच्यावेळीही हिंदूंचे शिरकाण पाहून देखील ज्यांना धर्म, नवा हक्काचा लोकशाही देश ह्यांच्याप्रती ममत्व न राहता जन्मस्थानाशी (भौगोलिक) घट्ट इमानदार राहायची इच्छा होती, त्यांच्यावर आज भरोसा ठेवायचे कारण नाही असे वाटते, आज पाकिस्तान मध्ये हिंदू कापत आहेत म्हणून ही माणसे गळा काढणार, मग आपल्याकडली काही धर्मप्रेमी गाढवे त्यांची उष्टी खरकटी काढायची बात करणार, हे झाले, ते सगळे भारतात आले, अन उद्या जर पाकिस्तान ने त्यांना इन्सेंटिव्ह किंवा किमान सुरक्षा देऊन परत बोलावले तर ?? ती किती मोठी रिस्क असेल हे आपण इमॅजिन करू शकता का? बरं ते ही जाऊ द्या, इस्लामचं तत्व हे "दार उल हरब" ला "दार उल इस्लाम" मध्ये कन्व्हर्ट करणे आहे, हे तरी आपण मानाल न? इतके असूनही, पाक बघा, भारतात मुसलमान असुरक्षित आहेत हे कोकलतो कायम पण भागलपुर ते 2002 गुजरात किती भारतीय मुसलमानांस त्यांनी सन्मानाने बोलवून नागरिकत्व दिले आहे?? असल्यास मला जरूर सांगाल, मूहाजीर संकल्पनेबद्दल मी तुम्हाला सांगु नये!
बापूसाब.. याच न्यायाने तुम्ही अप्रत्यक्षपणे "एक धर्म एक राष्ट्र" या थिअरीला किंवा "हिंदूराष्ट्र" या संकल्पनेला पाठिंबा देत आहात असे वाटत आहे. अजिबात नाही, मी अतिशय अग्रेसीव अश्या "भारतीयत्व" आधारित देशाची भलामण करतोय, जो भारतीय तो आमचा, जो भारतात राहून भारताला सुरुंग लावायच्या गप्पा करतोय तो "आमचा" गुन्हेगार, त्याला त्याच्या सीरियन मित्रांकडे जाण्यापासून रोखुन तसेच जायची इच्छा असलेल्या त्याच्या मित्रांसमोर त्याचे एक "उदाहरण" बनवणे हे ही "आमचेच कार्य" त्यांना outsource करायचे काम नाही, अमेरिका इस्राएल बघा, त्यांच्या माणसाने बाहेर जाऊन 1000 खून केले तरी आटापिटा करून त्याला परत मायदेशात आणतील मग वाटल्यास फासावरही देतील, पण जे आहे ते घरात, असे बाहेर जाऊ द्या रोकु नका करून नाही. रच्याकने, आता हिंदुत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व वगैरे म्हणू नका, कारण हिंदुत्ववादी गाढवे तीच आहेत ज्यांनी दलितांना मारू नका मला गोळ्या घाला म्हणणाऱ्या मोदींचा निषेध केला कोर्टात जायची भाषा केली अन मोदीसारख्या एका सच्च्या भारतीयाला घरचा आहेर देऊन मान खाली घालायला लावली आहे. Hope I am clear.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Fri, 08/12/2016 - 15:44 नवीन
जो भारतीय तो आमचा, जो भारतात राहून भारताला सुरुंग लावायच्या गप्पा करतोय तो "आमचा" गुन्हेगार इथेच मुद्दा क्लीयर झाला आणि आपण एकाच पानावर आहोत ते कळाले. तरीपण आणखी शंका असल्यास सवडीने प्रतिसादेन. लोभ आहेच.. तो वाढवत ठेवावा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
आ
आनन्दिता Wed, 08/24/2016 - 05:02 नवीन
प्रतिसाद प्रचंड आवडला !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
प
प्रसाद_१९८२ Fri, 08/12/2016 - 11:05 नवीन
सहमत! उगाच कुठल्याही गोष्टीचे समर्थन करत बसतात आजकालचे विचारवंत(?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
S
sagarpdy Fri, 08/12/2016 - 13:29 नवीन
कुठले उमाळे ?! हे वाचा : http://indianexpress.com/article/india/india-news-india/perception-about-pakistan-has-left-us-jobless-we-are-not-terrorists-pune-muslims-2969155/ अगदी हिंन्दू येतात त्यांना सुद्धा "पाकिस्तानी" म्हणून नोकऱ्या मिळत नाहीत. हिंदूंची तेव्हाची आणि आत्ताची टक्केवारी हि फक्त "इथे आम्ही तुम्हाला छळत नाही, तिकडल्या लोकांसारखे नाही आम्ही" हे दाखवण्याचा दाखला आहे. तिकडली टक्केवारी राहावी / वाढावी तसेच त्यांना त्रास होऊ नये हा उद्देश फार छोटा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 08/12/2016 - 13:39 नवीन
इथे आम्ही तुम्हाला छळत नाही, तिकडल्या लोकांसारखे नाही आम्ही" हे दाखवण्याचा दाखला आहे <<< खरेतर ती एक गर्भित धमकी आहे असं म्हणू शकतो,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy
श
श्रीगुरुजी Fri, 08/12/2016 - 11:35 नवीन
जर का गुर्जी म्हणतात तसे मान्य केले तर मग कितीही बाटवाबाटवी झाली, कत्तली झाल्या तरी आपण बांग्लादेशी, पाकिस्तानी हिंदूंबद्दल शष्प संवेदना ठेवायचे काम नाही, हे पोटकलम सुद्धा मान्य व्हावे म्हणे मी , कारण जसे ह्या आयसिसेच्छूक लोकांना भारताशी काही घेणे देणे नाही तसेच त्या हिंदूंनाही कधीच नव्हते! जेव्हा मौका होता तेव्हा आले नाहीत मग आता आपण कश्याला रडावे!
स्वातंत्र्यानंतर जवळपास ६९ वर्षे उलटली. गेल्या ६९ वर्षात पाकिस्तानचा हिंदूद्वेषी, रक्तपिपासू व क्रूर चेहरा अनेक वेळा दिसूनसुद्धा इथल्या निर्धमांधांना पाकिस्तान हा लाडाने थोडासा बिघडलेला धाकटा खोडकर भाऊ वाटतो. भारत-पाकिस्तान मधील जनतेमध्ये वैर नसून त्यांच्यात अत्यंत प्रेमळ भाव आहेत व काश्मिर, दहशतवाद इ. प्रश्न हे दोन्ही देशातील राजकारण्यांनी निर्माण केले असून सामान्य जनतेचा त्याला पाठिंबा नाही असे उच्चरवाने सांगून स्वतःची व सर्वांचीच फसवणूक करण्यात हे निधर्मांध आघाडीवर आहेत. आपण चुकून पाकिस्तानी जनतेबद्दल वाईट बोललो तर आपली धर्मनिरपेक्षतेची, उदारमतवादीपणाची, मानवतावादाची पदवी रद्द होऊन आपल्याला जातीयवादी, बुरसटलेल्या, फॅसिस्ट विचारांचे समजले जाईल अशी भीति त्यांना वाटत असते. जर ६९ वर्षानंतर सुद्धा इथल्या काही जणांचे डोळे उघडले नसतील तर १९४७ मध्ये फाळणी झाल्यानंतरसुद्धा आपण पाकिस्तानी भागात सुखाने राहू, देश सोडून भारतात जायची गरज नाही, स्थानिक मुस्लिम आपले शेजारी आहेत व आपली काळजी घेतील या भ्रमात तत्कालीन बांगलादेशातील व पाकिस्तानमधील हिंदू राहिले असतील यात नवल वाटायचे कारण नाही. भारतात न येता तिथले काही हिंदू पाकिस्तानमध्येच राहिले याला कारण त्यांना भारताशी काही घेणेदेणे नव्हते हे कारण नसून जरी पाकिस्तान निर्माण झाला तरी आपल्याला त्रास होणार नाही या गैरसमजूतीतून ते तिथे राहिले असावेत. गेल्या ६९ वर्षात तिथल्या स्थानिक मुस्लिमांचा क्रूर चेहरा अनेकदा पूर्ण उघड झाला आहे. १९४७ मध्ये पाकिस्तानमध्ये २४% हिंदू होते. २०१६ मध्ये त्यांची संख्या २% पेक्षाही कमी आहे. बांगलादेशाची थोडीफार अशीच परिस्थिती आहे. स्थानिक मुस्लिमांच्या भरवशावर राहून तेथील हिंदूंचा पूर्ण भ्रमनिरास झाला आहे. स अशा परिस्थितीत भारत हे त्यांचे एकमेव आशास्थान आहे. त्यामुळे तिथल्या हिंदूंबद्दल सहानुभूती असायलाच हवी. त्यांना भारतात स्थलांतर करून नागरिकत्व हवे असल्यास ते लगेच देण्यात यावे. इस्राईल मध्ये जगातील कोणत्याही देशातील कोणत्याही वर्णाच्या ज्यू जनतेला नागरिकत्व मिळते कारण इस्राईल ही ज्यूंची एकमेव भूमी आहे. तसेच भारत ही जगभरातील हिंदूंसाठी एकमेव आशास्थान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 08/12/2016 - 14:58 नवीन
भारतात न येता तिथले काही हिंदू पाकिस्तानमध्येच राहिले याला कारण त्यांना भारताशी काही घेणेदेणे नव्हते हे कारण नसून जरी पाकिस्तान निर्माण झाला तरी आपल्याला त्रास होणार नाही या गैरसमजूतीतून ते तिथे राहिले असावेत. अहो, फाळणी पासून कैक कोस दूर असलेल्या तुमच्या आमच्यासारख्या मराठी जनतेला जर आज इतक्या वर्षानंतरही जेव्हा फाळणीचा भेसूर चेहरा दिसतो, जाणवतो, तो त्याकाळी स्वतःच्या घराच्या मागल्या बोळात साक्षात घडताना पाहूनही लोकांना "गोड गैरसमज" झाला असेल, हे आपण कसे म्हणु शकता?? इतके पाहूनही तिथेच राहिलेत देवा ते, माझ्यालेखी त्यांचा धर्म कुठलाही असो, ते भरवश्याचे नाहीत, तुम्ही वरतीच भारतात असलेल्या निधर्मांध लोकांबद्दल माहिती दिली आहेत, आधीच दुथडीभरून वाहत असलेल्या गाढव गोठ्यात दूरदृष्टी नसलेली अन ते सिद्ध केलेली अजून गाढवे आणून बांधणे तुम्हाला रुचत असेल, आम्हाला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
अ
अमितदादा Fri, 08/12/2016 - 11:43 नवीन
मोदी म्हणतात त्याप्रमाणे संविधन ला भारताचं धर्मग्रंथ मानलं तर बाहेरील हिंदू ना भारतात प्रवेश देता नाही येणार, पण ही झाली थियरी। आता आपण प्रॅक्टिकल जगात येवूया, जगात कोणत्याही धर्मातील लोकांवर अन्याय होत असेल तर अश्या लोकांना स्वीकारायला अनेक देश तयार असतात, मुस्लिम निर्वासितांना मुस्लिम देश आश्रय देतात, ख्रिश्चन लोकांना युरोप मध्ये आश्रय मिळतो, ज्यू लोकांना इस्राईल मध्ये आश्रय मिळतो, मग अन्याय ग्रस्त हिंदू , शीख, बुद्ध, मुस्लिम अहमादी लोकांनी जायचं कूट? बरं त्यांच्या पूर्वजांनी भारतात न येण्याचा निर्णय घेतला त्यांना थोडाच माहित होत कि आजचा पाकिस्तान उद्या नापाक होईल। म्हणजे हे आस म्हणण्यासारखं झालं की मुलीने प्रेमविवाह करून सासरी गेल्यानंतर, सासरी छल झाला तर तिच्या बापानं आस म्हनाय हवं कि त्यावेळी तू निर्णय घेतला आता भोग माज्या घरी येऊ नको। भारत हा पूर्वीपासून हिंदू आणि बुद्ध धर्मियांना आश्रय देतो आहे। नाहीतर बांगलादेश च्या सीमेवर कुंपण आणि लेसर भिंती बांधणारा भारताने हिंदू नेपाळ शी मोकळ्या सीमा ठेवल्या नसत्या। तिबेट मधील बुद्ध धर्मियांना आश्रय दिला नसता। थोडक्यात काय भारताने अन्याय ग्रस्त हिंदू, बुद्ध, शीख, मुस्लिम अहमादी,मुस्लिम दाऊद बोहरा यासारख्य लोकाना आश्रय देण्यासाठी योग्य पोलिसी बनावाय हवी।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
स
संदीप डांगे Fri, 08/12/2016 - 11:47 नवीन
निर्वासितांचे धर्म बघून आश्रय दिला जात नाही, आंतराष्ट्रीय संकेतानुसार, तसेच भारत काही अधिकृतपणे हिंदू देश नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
श
श्रीगुरुजी Fri, 08/12/2016 - 11:54 नवीन
निर्वासितांना आश्रय देणे बंधनकारक नाही. २-३ वर्षांपूर्वी सिरिया व इराकमधील बरेचसे नागरिक युरोपमध्ये कायदेशीर्/बेकायदेशीर आश्रय घेण्याच्या प्रयत्नात होते. जर्मनी, फ्रान्स इ. देशांनी त्यांना अधिकृत आश्रय दिला परंतु आम्ही एकही निर्वासित घेणार नाही असे सांगून हंगेरीने आपल्या सीमेवर कडेकोट बंदोबस्त ठेवून एकाही निर्वासिताला देशात घुसून दिले नव्हते. इस्राईल धर्म बघूनच आश्रय देतो. भारत अधिकृतरित्या हिंदू असो वा नसो, जगात भारत हा हिंदूंचाच देश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे भारताने पाकिस्तान/बांगलातील फक्त हिंदूंनाच आश्रय देण्याचे ठरविले तर कोणीही आरडाओरडा करू शकणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ग
गणामास्तर Fri, 08/12/2016 - 11:59 नवीन
कशाला द्यायचा पण मी म्हणतो भारताने पाकिस्तान/बांगलातील हिंदूंना आश्रय? सोन्याबापू म्हणतात त्याप्रमाणे जेव्हा संधी होती तेव्हा आले नाहीत मग आता आपण कश्याला नसत्या उचापत्या वाढवत बसाव्या. इथं घरचं झालं थोडं अन व्याह्यानं धाडलं घोडं अशी गत व्हायची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 08/12/2016 - 12:04 नवीन
आपली इथे वाट लागेल हे दुर्दैवाने त्यांच्या त्यावेळी लक्षात आले नव्हते. स्थानिक मुस्लिमांवर भोळसटासारखा त्यांनी विश्वास ठेवला आणि त्यांचा विश्वासघात झाला. इथल्या निर्धमांधांचे २०१६ मध्ये सुद्धा डोळे उघडलेले नाहीत. मग ६९ वर्षांपूर्वी सर्वसामान्यांना तिथे राहण्यात असलेले धोके लक्षात आले नसावेत यात आश्चर्य ते काय? त्यांच्यावर तिथे ते हिंदू असल्याने अन्याय होत आहे. म्हणजे धर्म मुस्लिम नसल्यानेच त्यांना अन्यायाला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत भारताने त्यांच्या पाठीशी उभे रहायलाचा पाहिजे. १९४७ मध्ये फाळणी होताना लोकसंख्येची संपूर्ण अदलाबदल केली असती तर हे प्रश्न निर्माण झाले नसते. त्यावेळी केलेल्या चुकांची भरपाई भारताने करायलाच हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 08/12/2016 - 16:01 नवीन
बरं, भरपाई एकट्या भारतानेच करावी काय? मुस्लिम तेतुका मेळवावा वर पाकिस्तान स्थापन झालाय न? द्या मग एक ऑफर पाकला, तुमच्याकडले सगळे हिंदु द्या अन आमच्याकडली सगळी मुसलमानं घ्या, जमतंय का बघा प्रकरण जमतंय का! जमले तर आमच्याइतके आनंदी कोणी नसेल! भेंडी नोकरी धरली सीमसुरक्षेकरता अन दंगली झाल्या का आवरत फिरायला लागतंय तिच्यायला घरातल्याच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
अ
अमितदादा Fri, 08/12/2016 - 12:11 नवीन
तुम्ही फक्त हिंदू म्हणू नका म्हणजे गैरसमज दूर होतील। अन्यायग्रस्त हिंदू, शीख, बुद्ध, मुस्लिम धर्मतील लहान सेक्टर याना प्रवेश। जगातील सर्वच देश हे मानवतेच्या दृष्टिकोनातून दारवरशी लाख निर्वासित घेतात। बरं हिंदू लोकांना नको मग तिबेटी बुद्ध, श्रीलंकन तामिळ, नेपाळी हिंदू याना आतापर्यंत का आश्रय दिला? भारताची हि पोलिसी जुनीच आहे ती फक्त पाकिस्थान आणि या बांगलादेश ह्यांना apply नव्हती।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 08/12/2016 - 16:03 नवीन
तिबेटी लोकांना आश्रय देणे ही उघड दृष्ट्या एक घोडचूक होती, अन गुप्तचर विभागाकरता ब्लेसिंग इन दिसगाईस, पाकिस्तानी हिंदू काय ऑफर करत आहेत ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
अ
अमितदादा Fri, 08/12/2016 - 17:24 नवीन
बापू तुमचे मत समजत आहे, परंतु भारत बाहेरच जग हे भारताला जगातील हिंदू शीख लोकांचा रक्षणकर्ता म्हणून बगतो। हिंदू शीख बुद्ध धर्मीय वर होणाऱ्या अत्याचारांना भारताने रेस्पॉंड नाही केलं तर त्यांचं नाश झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणूनच माझं मत आहे की सगळ्यांना सरसकट घेऊ नका एक चांगली policy बनवा। भारत सरकार ला सुद्ध बहुदा हेच वाटतंय http://www.dawn.com/news/1252665 बाकी प्रश्न फक्त तिबेटी बौद्ध चा नाही, नेपाळी हिंदू आणि श्रीलंकन तामिळ याना सुद्धा भारताने आश्रय दिला आहे त्याच काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
अ
अमितदादा Fri, 08/12/2016 - 11:57 नवीन
याची मला पूर्ण कल्पना आहे, म्हणूनच पोलिसी मध्ये सगळं धर्म समाविष्ट करा, मात्र मुस्लिम सुन्नी ना आश्रम नको कारण त्यांच्यावर धार्मिक अन्याय होणार नाही। मुस्लिम शिया हि एकवेळ चालतील। बाकी ह्या जगात कोणताही देश साळसूद नाही, भविष्य आणि स्वार्थ बगूनच पोलिसी बनवाव्या लागतील। जर्मनी मध्ये सीरिया तुन येणारे निर्वासित ख्रिश्चन धर्म स्विकारातयात कारण निर्वासित व्हिसा मिळण्याची श्यक्यता वाढतेय, ईशान्य भारतातील ज्यू इसराईल मध्ये निघून गेले। दोनी घटना आत्ताच्या आहेत। भारताने योग्य पोलिसी बनवायला हवीच, भारत हा पुस्तकी secular आणि प्रॅक्टिकाली हिंदू dominated राष्ट्र आहे हे वास्तव आहे।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 08/12/2016 - 15:52 नवीन
मुस्लिम निर्वासितांना मुस्लिम देश आश्रय देतात, उदाहरण देता येईल का?? सीरिया मध्ये यळकोट झाला तेव्हा सौदी ने निर्वासित आत घेतले का इराण नं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
अ
अमितदादा Fri, 08/12/2016 - 17:02 नवीन
उदाहरण लिबिया येथील पाळून जाणारे निर्वासितांना इजिप्त आणि tunisia आश्रय देत आहे (आकडा 2 तो 4 लाख)। सीरिया मधून पाळू आलेल्या लोकांना तुर्कस्तान आश्रय देत आहे (आकडा 2.7 मिलियन). म्यानमार मधून पाळणाऱ्या rohingya मुस्लिम ना मलेशिया आणि इंडोनेशिया आश्रय देत आहेत।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
अ
अनुप ढेरे Fri, 08/12/2016 - 12:17 नवीन
जेव्हा मौका होता तेव्हा आले नाहीत मग आता आपण कश्याला रडावे!
नाही पटलं. जेव्हा मौका होता, १९४७ साली तेव्हा आत्ता ४०-५०-६० वर्षाचे लोक किती वयाचे असतील. जन्मले देखील नसतील हे लोक तेव्हा. त्यांच्या बापजाद्यांनी घेतलेल्या निर्णयाची शिक्षा त्यांना का द्यायची? आणि दुसरा मुद्दा. पाकिस्तानचं पद्धतशीरपणे रिग्रेशन घडवून आणलेलं आहे. तिथल्या हुकूमशहांनी असो वा धर्मगुरुंनी. १९४७ चा पाकिस्तान आत्ताच्या पाकिस्तान इतका वाईट नसेलही. सो चूक आता लक्षात आली किंवा आता परिस्थिती बदलली तरी ती दुरुस्तं करू द्यायची नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 08/12/2016 - 16:04 नवीन
हे सगळे वन वे होईल का? ह्यावरही विचार करा साहेब :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
अ
अनुप ढेरे Sat, 08/13/2016 - 05:37 नवीन
होऊ दे की टू वे. जो न्याय तिथल्या हिंदूंना लागू तोच इथल्या मुस्लिमांना लागू आहे की. पण मला वाटत नाही की कोणी मुस्लीम तिकडे जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
S
sagarpdy Fri, 08/12/2016 - 13:23 नवीन
Image removed. हा फोटू पाहून रडला असाल तर त्याच कारणासाठी.
मौका होता तेव्हा आले नाहीत
विमान पडत असताना स्वतःच्या सामानाची पर्वा करतात लोक, घरदार सोडून निघणं सोपं आहे का?
जर का गुर्जी म्हणतात तसे मान्य केले तर
हे लॉजिक काय झेपलं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 08/12/2016 - 16:06 नवीन
विमान पडत असताना स्वतःच्या सामानाची पर्वा करतात लोक, घरदार सोडून निघणं सोपं आहे का? हे ही लॉजिक झेपले नाही! असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy
श
श्रीगुरुजी Fri, 08/12/2016 - 11:45 नवीन
+१
थोडक्यात काय भारताने अन्याय ग्रस्त हिंदू, बुद्ध, शीख, मुस्लिम अहमादी,मुस्लिम दाऊद बोहरा यासारख्य लोकाना आश्रय देण्यासाठी योग्य पोलिसी बनावाय हवी।
अहमदी व बोहरा अजिबात नको. तेही तितकेच कट्टर असतात. बोहरांमधील बालवयात केला जाणारा मुलींची सुंता हा क्रूर प्रकार माहित असेलच. बाकी सगळे चालतील.
  • Log in or register to post comments
म
मोदक Fri, 08/12/2016 - 11:48 नवीन
देशपातळीवर असे सिलेक्टीव्ह वागता येत नाही हो गुरूजी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 08/12/2016 - 11:59 नवीन
नक्कीच वागता येतं. इस्राईल फक्त ज्यूंनाच आत घेतात. अमेरिकेत नागरिकत्व मिळविण्यासाठी वेगवेगळ्या खंडांसाठी वेगवेगळे नियम आहेत. अरब देशांचे नागरिकत्वाचे स्वतःचे वेगळे नियम आहेत. नजीकच्या भविष्यकाळात विशेषतः युरोपिअन देश मुस्लिम नागरिकांना नागरिकत्व देण्याचे नियम अधिक कडक करतील अशी शक्यता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Fri, 08/12/2016 - 12:02 नवीन
हे बघा.. आता माझा अभ्यास नाही म्हणून खरोखरी विचारत आहे. एकाच धर्मातला एक पार्ट हवा आणि एक नको असे कसे चालेल..? का तुम्ही नोंदवलेली मंडळी मुस्लीम छत्रीखाली येत नाहीत..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 08/12/2016 - 12:06 नवीन
मी कोठे असं म्हटलंय? मी म्हणतोय की मुस्लिमांचा कोणताच उपपंथ नको. मग ते अहमदी असोत वा बोहरी वा शिया वा सुन्नी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Fri, 08/12/2016 - 12:10 नवीन
ओके.. आत्ता मुद्दा समजला. धन्यवाद..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
च
चंपाबाई Fri, 08/12/2016 - 12:15 नवीन
सावरकर तर बोलायचे , अखंड हिंदुस्तानचे सगळे हिंदु मुसलमान एकाच हिंदुत्वाचे प्रवाह. कारण पितृभू एकच. .. मग पाकिस्तानी मुसल्मानाना त्यांची पितृभू नाकारणे , हा सावरकरांचा अपमान नव्हे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
अ
अमितदादा Fri, 08/12/2016 - 12:19 नवीन
भारतीय मुस्लिम अजून भारतीय संस्कृती मानणारे आहेत, पाकिस्तान चे मुस्लिम आत अरबस्तान चे जाले आहेत। भारत बद्दल त्यांना एव्हडा द्वेष कि ते भारतीय आणि आपण हे एकाच बापाचे पोट्टे आहोत हे विसारलेत। त्याऐवजी त्यांनी अरबी बाप लाऊन किंवा मानुन घेतलाय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
स
सुबोध खरे Fri, 08/12/2016 - 15:31 नवीन
मग पाकिस्तानी मुसल्मानाना त्यांची पितृभू नाकारणे चंपाबाई त्यांना मुळात "मातृभूमी किंवा पितृभूमी " हा विचारच अमान्य आहे. जे काही आहे ते सर्व "अल्लाच्या मर्जी" बद्दल आहे आपण जन्मतः डॉक्टर नव्हता. "प्रशिक्षणाने" झाला आहात. सत्तर वर्षे "भारत तेथील मुसलमानांवर अन्याय करीत आले आहेत" असेच प्रशिक्षण पाकिस्तानच्या मुलांना शाळांत इतिहासात शिकवले गेल्याने ते भारत द्वेष्टे झालेले आहेत. त्यातून त्या राष्ट्राची निर्मिती धर्माधारित आहे. आपला धर्म( सुन्नी मुसलमान) सोडला तर दुसरे सर्व लोक "जगण्याच्या लायकीचेच" नाहीत हे बाळकडू मदरश्यामध्ये बालकांना दिले गेल्यामुळे तेथील इतर मुसलमानांचे शिरकाण करणे हि अल्लाची सेवा आहे हे समजणाऱ्या लोकांना इथे कशासाठी आश्रय द्यायचा? पाकिस्तानच्या चारही प्रांतांमध्ये केवळ धर्म सोडला तर एकात्मता अजिबात नाही. त्यांच्यात एकच समान धागा आहे तो म्हणजे भारत द्वेष. तेंव्हा तेथील पूर्वग्रहदूषित मुसलमानांना आपण आपल्याकडे "सामावून" घेण्याचा प्रश्नच नाही. बाकी आपल्याला "सावरकरांचे विचार" आठवल्याचे( चुकीच्या कारणासाठी का असेना) पाहून डोळे पाणावले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
स
सुबोध खरे Fri, 08/12/2016 - 15:47 नवीन
http://www.satp.org/satporgtp/countries/pakistan/database/sect-attack.htm
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
न
नगरीनिरंजन Sat, 08/13/2016 - 05:18 नवीन
मुसलमानांना काय मान्य-अमान्य असेल ते असेल; सावरकरभक्तांना सावरकरांचे विचार मान्य आहेत की नाही? अखंड भारतवर्षाचं स्वप्न काय त्या त्या प्रदेशातले लोक "साफ" करुन साध्य करणार काय? सावरकर महान होते; पण सावरकरभक्त हा एक महाविनोदी प्रकार आहे आजच्या काळातला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 08/13/2016 - 05:35 नवीन
१००००% सहमती नागरीनिरंजन भाऊ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
ग
गामा पैलवान Sat, 08/13/2016 - 12:10 नवीन
नगरीनिरंजन, वडाची साल पिंपळाला लावताय? पाकिस्तानातल्या जनतेने पाकिस्तान कधीच मागितला नव्हता. त्यामुळे तिथली साफसफाई करायचा प्रश्नंच उद्भवत नाही. कोणाची साफसफाई करायला हवीये ते सावरकरभक्तांना चांगलं ठाऊक आहे. त्यामुळे चिंता नसावी. :-) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 08/12/2016 - 16:13 नवीन
5 बाय 5 च्या लॉनला पाणी घालणे अन 5000 किमी बाय 5000 किमी अंतराच्या लॉनला पाणी घालणे ह्यातले अंतर तुम्हाला झेपत नाही हे स्पष्ट झाले गुर्जी, कारण तुम्ही फक्त लॉनची हिरवाई किंवा झूळवाहतं पाणी बघताय, कुठला कोण तो इस्राएल, अमेरिकेच्या जोरावर अन फक्त तेटरपणा करताच बातम्यात असलेल्या कोकणच्याही पावशेर असलेल्या देशाच्या पॉलिसी अन खंडप्राय प्रिय भारताच्या पॉलिसी ह्यात अंतर समजावे म्हणून आपणाला शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
प
प्रदीप Fri, 08/12/2016 - 16:52 नवीन
"कुठला कोण तो इस्राएल, अमेरिकेच्या जोरावर अन फक्त तेटरपणा करताच बातम्यात असलेल्या कोकणच्याही पावशेर असलेल्या देशाच्या पॉलिसी..." इतक्या पटकन तुम्ही इस्राएलला झटकून टाकलंत. १९९९ साली 'ई. तिमोर' ह्या अगदी चतकोर प्रांताला इंडोनेशियापासून 'मुक्त' करून त्याचे बस्तान बसवण्याचा प्रयत्न करण्याचे महत्कार्य पश्चिमी राष्ट्रांनी उत्साहाने केले. ह्यात ख्रिश्चन धर्माच्या आस्थापनाचाही हात होता. अगदी सर्व प्रकारे (फायनॅन्शियल, अ‍ॅडमिन, इत्यादी) मदत मिळूनही नंतर त्या 'देशा'चे काय झाले? आपापसातील मारामार्‍या, राष्ट्रप्रमुखाच्या खुनाचा प्रयत्न, लाथाळ्या वगैरे सगळे तिथे सुरू झाले आहे. दोनेक वर्षांपूर्वी सुदानमधून फुटून निघालेल्या द. सुदानची काय परिस्थिती आहे? तेव्हा, नुसता एक प्रदेश टीचभर आहे, आणि त्याला महासत्तेचा पाठिंबा आहे, ह्याव्यतिरीक्तही त्या देशांतील जनतेची प्रगति करण्याची मानसिकता असणे जरूरी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
भ
भंकस बाबा Sun, 08/14/2016 - 19:24 नवीन
धन्य जाहलो तुमचे विचार वाचून, कोण कुठला इस्राईल, हा तोच इस्राईल आहे ज्याने अमेरिकन बैंकिंग व्यवस्था पोखरून ठेवली आहे, शत्रुशी लढण्याचे बळ मनगटात नाही तर मनात असावे लागते, इस्राइलने काय गांधी तत्वज्ञान वापरून आपली मान अरबांच्या हातात द्यावी काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
स
संदीप डांगे Fri, 08/12/2016 - 11:48 नवीन
गौरक्षक च्या नावाखाली मनुष्यभक्षक चालतील?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
मोदक Fri, 08/12/2016 - 11:51 नवीन
तुम्हाला "गुजरात २००२" म्हटल्यावर दंगल आठवते की साबरमती एक्सप्रेस..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 08/12/2016 - 15:42 नवीन
काय संबंध?? गोरक्षक मुद्दा मांडलाय त्यांनी अन तो समसामयिक मुद्दा (करंट अफेयर) आहे भाऊ, तुम्ही डांगेंचे सरसकटीकरण करताय का? का मुद्दाम तिसरेच वळण देताय ?? डांगेबुआ किंवा आम्ही, आमचे लफडे एकच आहे, आम्हाला बाबू बजरंगी सुद्धा राष्ट्रद्रोही वाटतो अन तिस्ता सेटलवाड सुद्धा, आम्ही माया कोडणानीला सुद्धा शिव्या घालतो अन कविता कृष्णनला सुद्धा, फक्त बदल्यात आम्हालाही शिव्याच मिळतात (अर्थात आम्ही तो डबल बोनस समजतो, विकटीम नाही समजत स्वतःला), आपलं आयुष्याचं तत्व आहे "भारत....भारत अन फक्त भारतच" जो माणुस जी बाजु माजणार त्यांना मी शिव्याच घालणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा