Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

इसिसमध्ये सामील होणारे युवक/युवती

श
श्रीगुरुजी
Wed, 08/03/2016 - 11:07
🗣 134 प्रतिसाद
सिरिया व इराक मध्ये इसिसचा उदय झाल्यापासून विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक देशातील मुस्लिम तरूण, तरूणी इसिसमध्ये सामील होऊन इस्लामसाठी लढून हुतात्मा होण्यासाठी सिरीयामध्ये जात आहेत अशा बातम्या येत आहेत. भारतातील केरळमधील व महाराष्ट्रातील काही मुस्लिम युवक, युवती आधीच इसिसमध्ये भरती झाल्याच्या बातम्या झळकल्या आहेत. गर्भवती मुस्लिम तरूणींनी सिरिया/इराकमधील इसिसच्या अधिपत्याखालील इस्लामच्या पवित्र प्रदेशात येऊन मुलांना जन्म द्यावा असे इसिसने आवाहन केल्याचे २-३ दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झाले होते. इसिसमध्ये भरती होण्यासाठी निघालेल्या काही मुस्लिम युवकांना संशयावरून विमानतळावरच अडवून परत घरी पाठविण्यात आल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झालेल्या आहेत. इसिस आपल्या प्रचारासाठी आंतरजालाचा प्रभावी वापर करते असे दिसते. आंतरजालाच्या माध्यमातून मुस्लिम युवक/युवतींवर प्रभाव टाकून त्यांना आपल्या जाळ्यात ओढायचे प्रयत्न सुरू असतात असे माध्यमे सांगतात. जे युवक/युवती इसिसच्या तत्वज्ञानाने भारून इराक/सिरियाला निघाले आहेत त्यांना बळजबरीने अडवून परत घरी पाठविणे चुकीचे आहे असे आमचे मत आहे. त्यांना इसिसमध्ये सामील होऊन न देता बळजबरीने भारतात डांबून ठेवले तरी ते आंतरजालाच्या माध्यमातून इसिसच्या संपर्कात राहतीलच आणि इसिसमध्ये सामील होता न येता इथेच रहावे लागल्याच्या रागातून इथेच दहशतवादी कारवायात सामील होऊन जास्त उपद्रव देतील अशी शक्यता वाटते. त्यांना इसिसमध्ये जाऊन न देता अडविणे म्हणजे रोगापेक्षा उपाय भयंकर अशी परिस्थिती येऊ शकते. त्यामुळे इसिसमध्ये सामील व्हायला निघालेल्यांना बळजबरीने न अडविता त्यांना जाऊन द्यावे. त्यांना इसिसमध्ये सामील होऊन द्यावे. त्यांना धर्माकरिता युद्ध वगैरे करायचे असेल तर ते त्यांना इराक/सिरियाच्या भूमीवर करता येईल. भारताला त्याचा त्रास नाही. त्यातले बहुतेकजण तिथे युद्धात मारले जातीलच व मृत्युनंतर त्यांना स्वर्गात प्रवेश मिळून त्यांना ७२ कुमारी अप्सरांचा लाभ होईल. चुकूनमाकून त्यातले कोणी परत आलेच तर त्यांना आयुष्यभर तुरूंगात ठेवावे. एकंदरीत आपला उपद्रव कमी करण्यासाठी त्यांना न अडविता इसिसमध्ये जाऊन द्यावे.
वर्गीकरण
राजकारण
सिरिया
इसिस
इराक

प्रतिक्रिया द्या
26644 वाचन

💬 प्रतिसाद (134)
म
मोदक Wed, 08/03/2016 - 11:13 नवीन
एकंदरीत आपला उपद्रव कमी करण्यासाठी त्यांना न अडविता इसिसमध्ये जाऊन द्यावे. बर्र.. हे पत्र कुणाकुणाला पाठवले आहे? तुम्ही पण गुरूजी.. कशाला असल्या धाग्यात वेळ वाया घालवत आहात...?
  • Log in or register to post comments
प
पेशवा भट Wed, 08/03/2016 - 11:15 नवीन
त्यांना स्फोटक धागे काढल्याशिवाय स्वस्थ बसवत नाही मोदक साहेब. धुरळा स्वतःच उडवायचा आणि म्हणायचं डोळ्यात माती गेली.
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Wed, 08/03/2016 - 11:56 नवीन
हा हा हा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पेशवा भट
व
विनायक प्रभू Wed, 08/03/2016 - 11:27 नवीन
श्री गुरुजी अमर धागा कर्ते चे रेकॉर्ड करणार बहुतेक
  • Log in or register to post comments
स
संजय पाटिल Wed, 08/03/2016 - 11:55 नवीन
चुकूनमाकून त्यातले कोणी परत आलेच तर त्यांना आयुष्यभर तुरूंगात ठेवावे.
त्यापेक्षा परत पाठवावे..
  • Log in or register to post comments
प
पी. के. Wed, 08/03/2016 - 12:07 नवीन
"मृत्युनंतर त्यांना स्वर्गात प्रवेश मिळून त्यांना ७२ कुमारी अप्सरांचा लाभ होईल.". 1)वरील वाक्याचे संदर्भा सहित स्पष्टीकरण द्या? 2) ७२ च का?
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Wed, 08/03/2016 - 12:42 नवीन
सैनिकाना ताबडतोब स्वर्गप्राप्ति होते, व् त्यांच्या सेवेला 72 हूर(पऱ्या) मिळतात हेच सांगून तरुणाना घातपाती कार्यासाठी उकसले जाते, त्यासाठी कुराणाचा संदर्भ देखिल दिला जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पी. के.
च
चंपाबाई Wed, 08/03/2016 - 19:09 नवीन
हतो वा प्राप्यसि स्वर्गम .... ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
ब
बॅटमॅन Tue, 08/23/2016 - 22:55 नवीन
गीता वाचून आजमितीस दहशतवाद करणारे कुणी असतील तर ठीके, नायतर हा फक्त चाटिझम आहे. कशाचा चाटिझम ते स्पष्ट दिसतंच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
ग
गणामास्तर Wed, 08/24/2016 - 06:09 नवीन
चाटिझम =)) =)) शब्द लै आवाल्डा आणि उचललेला आहे रे बॅट्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
च
चंपाबाई Wed, 08/24/2016 - 11:47 नवीन
पुस्तकात लिहिलेले आहे. आता ते वाचून कुणी फॉलो नसतील करत तर तो एक वेगळा मुद्दा आहे. आवडतं पुस्तक फॉलो करायलाही गट्स लागतात. फाटिझम होउन शेपूट घालणार्‍यांचे ते काम नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
सुबोध खरे Wed, 08/24/2016 - 12:16 नवीन
ब्वॉर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
ग
गामा पैलवान Wed, 08/24/2016 - 15:10 नवीन
चंपाबाई, अगदी समर्पक बोललात. तुम्ही शरिया का अनुसरत नाही ते कळलं. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
V
Vishvnath Shelar Wed, 08/03/2016 - 12:30 नवीन
Ho barobar jyanna jychey tyanna jaaudya ki
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Wed, 08/03/2016 - 12:37 नवीन
प्रतिसाद वाचून गंमत वाटली. कदाचित् यांच्या बुडाखाली फटाके फुटले नाहीत अद्याप! हा विषय विनोदाचा खचित नाही, जी मुले सामिल होण्यासाठी जात आहेत त्यांचे ब्रेनवॉश झालेले आहे. त्याना आता त्यांचा जीव प्यारा नाही,त्यामुळे ही एक ज्वालाग्रही वस्तु बनली आहेत. जर ह्यांची ऊर्जा दाबायचा प्रयत्न केल्यास ते इथेच घातपात करून दाखवतील. त्यांना रोखण्यात काय हशील आहे? उलट त्यांच्यावर नजर ठेवण्यास आपल्या गुप्तचर खात्याची दमछाकच् होईल.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 08/03/2016 - 17:56 नवीन
Tel- waat ghala.dhaga petavA
  • Log in or register to post comments
ख
खालीमुंडी पाताळधुंडी Wed, 08/03/2016 - 18:57 नवीन
जितकी वाटते तितकी मोठी समस्या नाहीये ही, इसिसची ताकद नगण्य आहे पण त्याचे ओवरप्रेझेंटेशन मिडीयावाले करतात. बादवे, यावर मागे तुडतुडींना धागा काढला होता, तुम्ही आता स्वयंघोषित गोरक्षकांवर धागा काढा. आणि गाय का मारू नये? मग शेळी मारली तर का शिक्षा नाही? मग प्राण्यांमध्ये सुद्धा भेदभाव का? मग पूर्वी आर्य गोमांस खात होते का? ऋग्देवात तसे उल्लेख आहेत का? याची डिट्टेल चर्चा करा.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 08/03/2016 - 19:00 नवीन
जितकी वाटते तितकी मोठी समस्या नाहीये ही, इसिसची ताकद नगण्य आहे पण त्याचे ओवरप्रेझेंटेशन मिडीयावाले करतात.
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खालीमुंडी पाताळधुंडी
ख
खालीमुंडी पाताळधुंडी Wed, 08/03/2016 - 19:04 नवीन
माझं मत पटलं कि उपाहासाने हसताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
च
चंपाबाई Wed, 08/03/2016 - 19:07 नवीन
संघवाले वर्षानुवर्षे नुसत्या हवेत काठ्याच फिरवत बसलेत.... शिका काहीतरी
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 08/03/2016 - 20:30 नवीन
खालीमुंडी पाताळधुंडी,
>> जितकी वाटते तितकी मोठी समस्या नाहीये ही,
जगातले मोठे प्रश्न सोडवायची सर्वोत्तम वेळ म्हणजे ते छोटे असतांनाची. आयसिसची समस्या मोठी होण्यापूर्वीच सोडवलेली बरी, नाहीका? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Wed, 08/03/2016 - 21:48 नवीन
त्यामुळे इसिसमध्ये सामील व्हायला निघालेल्यांना बळजबरीने न अडविता त्यांना जाऊन द्यावे. त्यांना इसिसमध्ये सामील होऊन द्यावे. त्यांना धर्माकरिता युद्ध वगैरे करायचे असेल तर ते त्यांना इराक/सिरियाच्या भूमीवर करता येईल. भारताला त्याचा त्रास नाही.
हे उपरोधीक असेल तर ठीक, अन्यथा माझ्या देशातल्या कुठल्याही व्यक्तीचं असं वाकडं पाऊल पडत असेल तर त्याला वेळीच थांबवणे माझ्यासाठी गरजेचे आहे. प्रतिबंध कसे लावायचे हा स्वतंत्र मुद्दा आहे, पण "मरु देत त्यांना, मला काय त्याचे" असं म्हणुन मला जबाबदारी झटकता येणार नाहि.
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण गुरुवार, 08/04/2016 - 15:24 नवीन
ज्यांना मरायचं त्यांना मरुद्या पण जाणाऱ्यांना थांबवणं आवश्यक वाटतंय कारण ते तिथं जाऊन इथले आणखी लोकं रिक्रुट करतील त्याचं काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
श
श्रीगुरुजी गुरुवार, 08/04/2016 - 16:53 नवीन
तथाकथित हौतात्म्याच्या आत्मघाती विचारांनी प्रेरीत झालेल्यांना बळजबरीने इथे थांबून ठेवले तर ते रागारागाने इथेच दहशतवादी कृत्ये करण्याची शक्यता आहे. त्यापेक्षा त्यांना जाऊन द्यावे. इथे राहिले तरीही ते आणखी माणसे रिक्रूट करण्याचा प्रयत्न करणारच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
स
सतोश ताइतवाले Sun, 08/07/2016 - 13:05 नवीन
खूप मोठी समस्या आहे पण हे लोक का जातात इसिस माडे करणे शोधून काडली पाहिजे जास्त करून बेरोजगार गरीब घरातले युवक युवती तेथे जात आहेत आणि इसिस चे आंतर्जालावरच्या सर्व माहिती विभाग ,जाहिराती पूर्ण पाने नाश्ता केल्या पहीजेत आणि मुस्लिम विचारवंतांनी सुद्धा यात लक्ष घालून गरजवंताची मदत केली पाहिजे तसं इसिस चे जास्त लक्ष यूरोप कडेच आहे
  • Log in or register to post comments
ई
ईन्टरफेल Fri, 08/12/2016 - 17:16 नवीन
>> बेरोजगार गरीब घरातले युवक युवती तेथे जात आहेत<<< च्यायला यांना नेट चा बैलन्स मारायला पैसे कुठुन मिळतात ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतोश ताइतवाले
ई
ईन्टरफेल Fri, 08/12/2016 - 17:19 नवीन
>> बेरोजगार गरीब घरातले युवक युवती तेथे जात आहेत<<< च्यायला यांना नेट चा बैलन्स मारायला पैसे कुठुन मिळतात ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतोश ताइतवाले
ई
ईन्टरफेल Fri, 08/12/2016 - 17:20 नवीन
>> बेरोजगार गरीब घरातले युवक युवती तेथे जात आहेत<<< च्यायला यांना नेट चा बैलन्स मारायला पैसे कुठुन मिळतात ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतोश ताइतवाले
ब
बाबा योगिराज Mon, 08/08/2016 - 17:00 नवीन
नै मला एक शंका आहे. जर बाबा युद्धात मेला तर त्याला 72 हूर मिळणार, अन बाई युद्धात मेली तर तिला पण 72 हुरच मिळणार का? मग ती बाई त्या 72 हूर घेऊन करणार काय? (अवांतर:-श्रीगुरूजी हघ्या.) कानाचे फ्यूज उडालेला बाबा योगीराज.
  • Log in or register to post comments
अ
अमितदादा Mon, 08/08/2016 - 18:20 नवीन
+11 बाई ला कुठलं एवढ भाग्य, ती मेली कि त्या 72 मध्ये सामील होणार. तिथं भी शोषणच. ( हलके घ्यावे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा योगिराज
आ
आनंदी गोपाळ Mon, 08/08/2016 - 17:49 नवीन
भारतात नव्याने पेरण्यात आलेल्या मुस्लिमद्वेषाच्या चष्म्यापलिकडे, मध्यपूर्व व युरोप यांत जिहाद अन क्रुसेड्स हे ख्रिश्चन वि. मुस्लिम असे प्रकरण फार पूर्वीपासून सुरू आहे हे आपण विसरतो. आपल्याकडे बेसिकली भारत-पाकिस्तान भांडण आहे, अन भारत वपाकिस्तानातल्या बहुतेक मुसलमानांना 'खरे' मुसलमान अर्धे काफीरच समजतात. सूफी वगैरे तर टोटल कचराच जणू. जागतिक, व मुख्यत्वे इसिसला क्रूसेड/जिहाद पार्श्वभूमी आहेच, प्लस, मधेच उपटलेली व जगाला शहाणपण शिकवायला जाणारी अमेरिका, हे ↓ करीतच असते. Image removed. अफगाणीस्तान, इराक, इतिहास आठवा. कशाला बोटं घालतात कुणास ठाऊक :-s अधिकाधिक युवक इसिसमधे सामिल होण्याचे हे एक मोठे कारण आहे, असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 08/09/2016 - 23:07 नवीन
आगो, >> भारतात नव्याने पेरण्यात आलेल्या मुस्लिमद्वेषाच्या चष्म्यापलिकडे, ... मुस्लिमद्वेष हा काय प्रकार आहे? भारतात कोण करतो मुस्लिमांचा द्वेष? नव्याने पेरणी म्हणजे काय? जरा इस्कटून सांगा बरं. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
आ
आनंदी गोपाळ गुरुवार, 08/11/2016 - 10:23 नवीन
आन्गापै, कित्ती तो निरागसपणा! ब्रायटनात असलं काय नस्तं ना? मग खुष र्‍हावा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान गुरुवार, 08/11/2016 - 16:45 नवीन
आगो, आहेच मी निरागस. त्याबद्दल प्रश्नंच नाही. आता तुम्हाला 'मुस्लिमद्वेषाची नव्याने पेरणी' म्हणजे काय हे सांगता येत नसेल तर नका सांगू. काय सांगू, अहो, माझीही थोडीफार अशीच अवस्था आहे. स्वत:ला मुस्लिम म्हणवणारे आपापसांत इतका पराकोटीचा द्वेष बाळगून आहेत की भारतात मुस्लिमद्ववेषाचा जास्तीचा रतीब घालायची आजिबात गरज पडू नये. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
अ
अनुप ढेरे गुरुवार, 08/11/2016 - 07:27 नवीन
अन भारत वपाकिस्तानातल्या बहुतेक मुसलमानांना 'खरे' मुसलमान अर्धे काफीरच समजतात.
भारतातल्या रिक्रूट्सना स्वच्छतेच्या कामगिरीवर (बोले तो लट्रीन डुटीवर) लावतात आयसीसवाले असं वाचलं होतं कुठेशी. किंवा म क्यानन फॉडर म्हणून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
ग
गामा पैलवान Tue, 08/09/2016 - 23:15 नवीन
लोकहो, आयसिस आपल्या दाराशी येऊन ठेपली आहे. परभणीत मुस्लीम दहशतवाद्याने आयसिसच्या संपर्कात येऊन चक्क बॉम्ब तयार केला आहे. आधी माहिती : http://www.esakal.com/Tiny.aspx?K=MA5ZFE ज्यांना ही आजूनही छोटी समस्या वाटते त्यांनी आपल्या मताचा कृपया नव्याने विचार करावा. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 08/11/2016 - 19:54 नवीन
आयसिसच्या जन्माच्या आधीपासून भारतातील इस्लामी अतिरेकी भारतात बॉम्ब तयार करून वापरत होतेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 08/11/2016 - 19:19 नवीन
मान्य केले तर मग कितीही बाटवाबाटवी झाली, कत्तली झाल्या तरी आपण बांग्लादेशी, पाकिस्तानी हिंदूंबद्दल शष्प संवेदना ठेवायचे काम नाही, हे पोटकलम सुद्धा मान्य व्हावे म्हणे मी , कारण जसे ह्या आयसिसेच्छूक लोकांना भारताशी काही घेणे देणे नाही तसेच त्या हिंदूंनाही कधीच नव्हते! जेव्हा मौका होता तेव्हा आले नाहीत मग आता आपण कश्याला रडावे!
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Fri, 08/12/2016 - 05:57 नवीन
इकडच्या मुस्लिमांना तिकडच्या बद्दल ममत्व चालत नाही पण इकडच्या हिंदूंनी तिकडच्या हिंदूंबद्दल उमाळे काढले तर ते चालतं, तिथे राष्ट्रप्रेम विसरून मुस्लिमांसारखे आपणही फक्त धर्मप्रेमी आहोत हे सोयीस्कर विसरायचे, असो, ह्या धाग्यावर पहिला नि शेवटचा प्रतिसाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
म
मोदक Fri, 08/12/2016 - 10:31 नवीन
इकडच्या मुस्लिमांना तिकडच्या बद्दल ममत्व चालत नाही पण इकडच्या हिंदूंनी तिकडच्या हिंदूंबद्दल उमाळे काढले तर ते चालतं डांगे साहेब.. तिकडचे किती हिंदू इकडे येवून २६/११, मुंबई स्फोट, कोईंबतूर किंवा संसदेवर हल्ला सारखे प्रकार प्रत्यक्ष / अप्रत्यक्षपणे करतात..? ..आणि असल्या प्रकारात इथल्यांचेच जनाजे उठत असतील तर इथल्यांनी तिकडच्यांबद्दल का ममत्व बाळगावे..? आता प्लीज दहशतवादाला धर्म नसतो असे शोभाडे, बरखा दत्त टाईप सोयीस्कर विचार सांगू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ब
बोलबोलेरो Fri, 08/12/2016 - 10:46 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 08/12/2016 - 10:55 नवीन
तुम्ही मुख्य मुद्दाच मिस केलात, असो!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
स
संदीप डांगे Fri, 08/12/2016 - 11:08 नवीन
हेच म्हंतू! मोदकराव, पाकिस्तान चे हिंदू असो व किरस्ताव, का आदिवासी, मला कोनाविषयीही ममत्व नाही, ट्रोजन हॉर्स पासून सावध तितके बरे! तिथल्या हिंदूंवर अत्याचार होतात म्हणून इथल्या मुस्लिमाबद्दल द्वेष तयार करण्यासाठी त्यांचा वापर काही लोक करतात, बाकी दांभिक भूमिका मला पटत नाहीत ते वेगळं! असो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
म
मोदक Fri, 08/12/2016 - 11:24 नवीन
मोदकराव, पाकिस्तान चे हिंदू असो व किरस्ताव, का आदिवासी, मला कोनाविषयीही ममत्व नाही, ट्रोजन हॉर्स पासून सावध तितके बरे! बर्र.. तिथल्या हिंदूंवर अत्याचार होतात म्हणून इथल्या मुस्लिमाबद्दल द्वेष तयार करण्यासाठी त्यांचा वापर काही लोक करतात, याला सपशेल असहमत. हिंदू मुस्लीम दंगलींचा खरा इतिहास, मदरशांमध्ये चालणारे ब्रेनवॉशिंग, दहशतवादी हल्ल्यात नेहमीच आढळणारी मुस्लिम नावे, अल्पसंख्यांक अल्पसंख्यांक असा कांगावा करत उपटलेले फायदे आणि सर्वसाधारणपणे राष्ट्रनिष्ठेपेक्षा धर्मनिष्ठा मोठी अशी अनेक कारणे असताना "तिकडच्या भाईजानवर अत्याचार होत असल्यामुळे हिंदूत्व खतरेंमें" अशा आरोळ्या देण्याची आवश्यकता भासेल असे वाटत नाही. तिथे राष्ट्रप्रेम विसरून मुस्लिमांसारखे आपणही फक्त धर्मप्रेमी आहोत हे सोयीस्कर विसरायचे कोणीही स्वधर्मप्रेमी असण्याला कोणाचाच आक्षेप नसावा. "तुमचा धर्म माझ्या धर्माप्रमाणे चालत नाही म्हणून तुम्ही काफिर" ही थिअरी कशी मान्य करणार..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 08/12/2016 - 15:47 नवीन
अल्पसंख्यांक अल्पसंख्यांक असा कांगावा करत उपटलेले फायदे आणि सर्वसाधारणपणे राष्ट्रनिष्ठेपेक्षा धर्मनिष्ठा मोठी म्हणजे नेमके काय काय फायदे लुटले आहेत??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
श
श्रीगुरुजी Fri, 08/12/2016 - 11:38 नवीन
पाकिस्तान चे हिंदू असो व किरस्ताव, का आदिवासी, मला कोनाविषयीही ममत्व नाही, ट्रोजन हॉर्स पासून सावध तितके बरे!
पाकिस्तानातील सर्व मुस्लिमेतरांविषयी मला सहानुभूती वाटते.
तिथल्या हिंदूंवर अत्याचार होतात म्हणून इथल्या मुस्लिमाबद्दल द्वेष तयार करण्यासाठी त्यांचा वापर काही लोक करतात,
भारताप्रमाने जगभर सर्वत्र मुस्लिमांचा द्वेष केला जातो. त्याची कारणे अगदी उघड आहेत. तिथल्या हिंदूंवर अत्याचार होतात या एकाच कारणासाठी भारतात मुस्लिमांचा द्वेष होत नसून त्यासाठी इतर असंख्य कारणे आहेत. मुस्लिमांचा द्वेष करण्यासाठी काहीच प्रयत्न करण्याची गरज नाही. त्यांचे वर्तन त्यासाठी पुरेसे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
प्रसाद_१९८२ Fri, 08/12/2016 - 11:40 नवीन
त्यांचे वर्तन त्यासाठी पुरेसे आहे. << सहमत !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
अ
अर्धवटराव Fri, 08/12/2016 - 19:43 नवीन
अ‍ॅज अ ब्लॅकेट स्टेटमेण्ट या वाक्याशी तीव्र असहमत. ढोबळ मानाने मुस्लीम शब्दाचे आध्यात्मीक, सांस्कृतीक आणि राजकारणी असे तीन पदर आहेत. त्यातले आध्यात्म आणि संस्कृती अत्यंत गोड आणि श्रीमंत आहे. मुस्लीम राजकारणात काहि कालबाह्य तत्वे रुजल्यामुळे हा एक पदर इतर पदरांना खायला उठलाय. पण म्हणुन असा सरसकट मुस्लीम द्वेष तर अधीक घातक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 08/13/2016 - 11:00 नवीन
त्यातले आध्यात्म आणि संस्कृती अत्यंत गोड आणि श्रीमंत आहे.
मुस्लीम अध्यात्म जे दिसते ते म्हणजे पूर्णपणे बाह्य अवडंबर आहे. पुरूषांनी दाढी ठेवायची, आखूड पायजमा वापरायचा, महिलांनी बुरखा वापरायचा, निष्पाप प्राण्यांना एका विशिष्ट पद्धतीने कापायचे, वेगळ्या पद्धतीने कापले तर ते हराम, . . . यात काय गोड व श्रीमंत आहे ते समजले नाही. मुस्लिम संस्कृती म्हणजे नक्की कोणती संस्कृती? सौदी अरेबियातील संस्कृती का अफगाणिस्तानातील संस्कृती का पाकिस्तानातील संस्कृती का भारतातील संस्कृती का सुदानमधील संस्कृती का मलेशिया/इंडोनेशियातील संस्कृती का अजून कोणत्या तरी प्रदेशातील संस्कृती? मुस्लिमांमध्ये सर्वत्र पुरूषप्रधान संस्कृती आहे. मुख्य म्हणजे इतर धर्मियांच्या संस्कृतीबद्दल अजिबात आदर न ठेवता जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे इतरधर्मियांची संस्कृती उद्ध्वस्त करणे हेच आजतगायत दिसून आले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव Sat, 08/13/2016 - 12:13 नवीन
मुस्लीम अध्यात्म जे दिसते ते म्हणजे पूर्णपणे बाह्य अवडंबर आहे. पुरूषांनी दाढी ठेवायची, आखूड पायजमा वापरायचा, महिलांनी बुरखा वापरायचा, निष्पाप प्राण्यांना एका विशिष्ट पद्धतीने कापायचे, वेगळ्या पद्धतीने कापले तर ते हराम, . . . यात काय गोड व श्रीमंत आहे ते समजले नाही.
ड्रेस कोड, चालिरीती, सणवार साजरा करण्याच्या पद्धतीत अध्यात्म शोधतो म्हटलं तर मग कठीण आहे गुर्जी. असु द्या. जानवं, शेंडी, धोतर, पुरणपोळीचा नैवेद्य या सगळ्यांचा ज्ञानदेव सांगितलेल्या सच्चिदानंद चिद्विलासाशी संबंध लावणं म्हणजे... असो.
मुस्लिम संस्कृती म्हणजे नक्की कोणती संस्कृती?
अगदी सुरुवात करायची म्हटलं तर जयंतरावांची इब्न बतूत सिरीज चाळण्याचा सल्ला देतो. ते ही असो. आपल्यासारख्या अनेक महाभागांशी संवाद साधायचं भाग्य लाभलय मला. त्यामुळे आपल्या विचारांचं आश्चर्य नाहि वाटलं, खेद जरुर वाटतो. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा