Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मला बाबा व्हायचं नाही!

त
तर्राट जोकर
Sat, 08/20/2016 - 16:38
🗣 142 प्रतिसाद
मुलाचे वडील तो दहावीत असतांना एका अपघातात गेलेले. आई मुंबईत सरकारी खात्यात नोकरीला. एकटीने वाढवले, मुलाला इंजिनीअर केले. एकुलता एक मुलगा प्रेमविवाहासाठी हट्ट धरुन बसला ते आढेवेढे घेत करुन दिले. मुलगी त्याच्याच वर्गातली समवयस्क. दोघांच्याही वयाच्या २४ व्या वर्षी हे लग्न झाले. लग्नाला आठ वर्ष होऊन गेलीत. अजून गुड न्यूज नाही. मध्यंतरी मुलीला गर्भाशयाचा आजार असल्याचे ऐकिवात आले. हे कुटूंब म्हणजे खरं तर मुलाची आई आपल्या गोष्टी बाहेर येऊ देत नाही, गुप्तता राखते. (त्याचवेळी इतरांच्या फाटक्यात पाय घालायला चवीचवीने पुढाकार घेते) त्यामुळे खरे काय ते काही कळत नव्हते. तसे आमच्या सर्व नातेवाईकांत बर्‍यापैकी मोकळेपणा, समजूतदारपणा असल्याने "बाप्रे, अजून पाळणा हलला नाही?" वाले कुत्सित टोमणे असे काही नाही. सर्व लोक नैसर्गिक उत्सुक असतात तेवढेच. सुरुवातीला वय कमी असल्याने असेल प्लानिंग म्हणून कोणी लक्ष दिले नाही. नंतर मुलाचे वय कमी असले तरी मुलीचे वय वाढत आहे ह्याने चिंता वाटायला लागली. पाच सहा वर्षे झाल्यानंतर मात्र कुतूहल वाढायला लागले. त्यात आम्हा लोकांत इतर सर्व बाबींबद्दल नियमित मोकळ्या चर्चा होतांना नेमकं ह्या जोडप्याच्या मूल प्रकरणाबद्दल काही विचारावे अशी परिस्थिती नव्हती. काही मदत (वैद्यकिय, सल्लामसलत, निव्वळ मनमोकळं करण्यासाठीही) लागल्यास करावी असे वाटूनही उपयोग नव्हता. कारण ह्याबाबतीत आपण काही विचारले तर त्यांच्या मनाला त्रास होईल म्हणून कोणीही हा विषय त्यांच्याकडे काढत नव्हते. अचानक आता एवढ्यात कळले की मुलाला 'वडील व्हायची इच्छाच नाही' म्हणून. ह्याबद्दल तो साय्कॅट्रीस्टकडे जातो आहे. आम्हा सर्वांना चांगलाच धक्का बसला. एखाद्याला वडील व्हायची का इच्छा नसावी हे काही कोणास झेपले नाही. त्याला लहान मुले सांभाळणे, ती अवतीभवती असणे, त्यांची जबाबदारी घेणे हे महाभयंकर दबावाचे वाटत आहे. हे काहीतरी अनाकलनीय आहे असे वाटले. थोडं आणखी विचार करता लक्षात आले की ह्याचे मूळ त्याच्या आईच्या वागण्यात आहे का असा प्रश्न आला. स्वतःचा मोठेपणा सिद्ध करण्याच्या नादात, मिरवण्याच्या नादात "मी एकटीने किती खस्ता खावू मुलाला मोठे केले" हे ती सतत प्रसारित करत होती. त्याचा मुलाच्या मनावर भयंकर परिणाम झाला असे वाटते. जेणेकरुन 'मुले वाढवणे' म्हणजे फार कठिण, दुष्कर गोष्ट आहे असे त्याच्या सुप्त मनाने धरुन ठेवले असावे. दुसरी गोष्ट अशी की आईच्या अतिलाडाने, अतिलक्ष देण्याने, आयुष्य परिटघडीचे ठेवल्याने मुलाला आखीवरेखीव आयुष्याची सवय लागली आहे. त्यात त्याला मुलांमुळे येणारा अव्यवस्थितपणा, घडी बिघडण्याची भीती, आपल्या इच्छांना मुरड घालून मुलांची उस्तरवार करायला लागण्याने स्वातंत्र्यावर येणारे बंधन ह्या सगळ्याचा त्याला धसका बसला असावा असे वाटते. ह्या सर्वात अतिशय केविलवाणी स्थिती झाली आहे ती मुलीची. तिला लहान मुलांची प्रचंड आवड आहे, मातृत्वासाठी ती आसुसलेली आहे. तिच्या आर्थोडॉक्स माहेराकडून काय ऐकून घेत असेल ते तिचे तिलाच माहिती. तिच्याबद्दल प्रचंड वाईट वाटत आहे. दोघांचेही एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे. पण आयुष्य असा प्रश्न घेऊन उभं राहिल असे कुणालाही स्वप्नात वाटले नसेल. मिपाकरांसमोर ही घटना मांडायचे कारण की असं काही तुमच्या बघण्यात आले आहे काय, ह्यावर काही उपाय आहेत का, किंवा एकंदर आपलं बहुमोल मत काय आहे? एखाद्याच्या व्यक्तिगत आयुष्यावर मिटक्या मारत ताशेरे ओढणे, उपदेश करणे, हा या धाग्याचा उद्देश नाही. एक महत्त्वाची केसस्टडी म्हणून ह्यावर गंभीर चर्चा घडावी ही इच्छा आहे. धन्यवाद.

प्रतिक्रिया द्या
34911 वाचन

💬 प्रतिसाद (142)
ग
गामा पैलवान Wed, 08/24/2016 - 15:13 नवीन
‌
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
च
चंपाबाई Wed, 08/24/2016 - 15:30 नवीन
दधिचीऋषी , सावरकरमुनी , सानेगुरुजी सगळे पापी का ? नव्या कायद्यानुसार आत्महत्या गुन्हा नव्हे म्हणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Wed, 08/24/2016 - 15:56 नवीन
चंपाबाई, प्रायोपवेशनामार्गे देहत्याग म्हणजे आत्महत्या नव्हे. तुमचं विधान सुधारा. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
च
चंपाबाई Wed, 08/24/2016 - 16:19 नवीन
लोकसंख्येच्या विस्फोटाचे कारण सांगून ज्याला मानवजातीवर उपकार करायचे आहेत , त्यानी प्रायोप्वेशन , दधिची ध्यान वगैरे लावून स्वतः नष्ट व्हावे. अगदी सामान्य माणसाप्रमाणे गळफास लावला तरी चालेल. पण , पुढची जन्माला न घालण्याचे जस्टिफिकेशन देउ नये...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
आ
आजानुकर्ण Wed, 08/24/2016 - 16:33 नवीन
चंपाबाई, कदाचित चंपाबाईंसारखं अपत्य असण्यापेक्षा नसलेलं बरं असं कुणाला वाटू शकतं की! त्याचा निसर्ग, लोकसंख्या वगैरेशी काही संबंध नाही. निव्वळ नॉशिया आल्यामुळेही होऊ शकतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
म
मराठी कथालेखक Wed, 08/24/2016 - 17:19 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
च
चंपाबाई Wed, 08/24/2016 - 19:27 नवीन
अपत्य चंपाबाई होइइल की शोभा डे हे आधीच कसे समजेल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
आ
आजानुकर्ण Wed, 08/24/2016 - 21:27 नवीन
चंपाबाई की शोभा डे म्हणजे इकडे आड आणि तिकडे विहीर. दोन्ही पर्याय तितकेच धोकादायक आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
म
मृत्युन्जय गुरुवार, 08/25/2016 - 08:35 नवीन
खिक्क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
न
नाखु गुरुवार, 08/25/2016 - 12:46 नवीन
का समानार्थी शब्द आहेत याचीच चौकशी करण्याचा प्रस्ताव ठेवतो.. सूचक नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
ग
गामा पैलवान गुरुवार, 08/25/2016 - 09:13 नवीन
चंपाबाई, आता हिशोब मांडाच म्हणतो मी. जर एकाने देहत्याग केला तर एकंच जीव कमी होईल. याउलट त्याने जिवंत राहून प्रबोधन केलं तर गेलाबाजार शंभरदीडशे जिवांची तरी बचत होईलंच ना? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
च
चंपाबाई गुरुवार, 08/25/2016 - 09:27 नवीन
अगदी बरोबर. आणि हा प्रबोधनकार कधी ना कधी स्वर्गवासी होणारच. जो नवा जीव येईल तो त्याचे कार्य पुढे नेईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
च
चंपाबाई Mon, 08/22/2016 - 06:49 नवीन
मूल न होण्याचा जोडप्याने निर्णय घेणे व फक्त नवर्‍याने निर्णय घेऊन बायकोवर त्या निर्णयाची जबरदस्ती करणे या भिन्न सिचुएशन्स आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
स
सुबोध खरे Mon, 08/22/2016 - 06:53 नवीन
जर नवरा बायको दोघांनी संमतीने असा निर्णय घेतला असेल तर त्यात वावगे काहीच नाही. पण एका बाजूने हा निर्णय दुसऱ्या बाजूवर लादला गेला तर आयुष्य फार क्लेशदायक असते. हे वाचलं नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
च
चंपाबाई Mon, 08/22/2016 - 10:17 नवीन
माझा तो प्रतिसाद नगरीनिरंजन यांच्या प्रतिसादासाठी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
न
नगरीनिरंजन Wed, 08/24/2016 - 15:03 नवीन
त्या स्त्रीला पर्याय उपलब्ध आहेत हे वाचलं नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
प
पक चिक पक राजा बाबू Sun, 08/21/2016 - 19:02 नवीन
अश्या प्रकारच्या व्यक्तिसाठी psychologist ची अतिशय चांगली मदत होऊ शकते. Behavioural science मधे अतिशय चांगले उपचार उपलब्ध zalele आहेत, बोधात्मक वर्तनात्मक उपचार पद्धत यासाठी उपयुक्त ठरू शकते, psychologist हे वर्तन उपचार आणि psychotherapy वापरून मानसिक समस्या दूर करतात
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Sun, 08/21/2016 - 19:49 नवीन
ते सगळे सोडा मालक, आम्ही तुमच्या आयडीचेच तुफान पंखे झालेलो आहोत!! "पक चिक पक राजबाबू कर गया कोई जादू न राहा दिल पे काबू क्या कर गयी हसीना" अहाहा खल्लास गाणे!! राजा बाबू नंतरच आमच्या लाडक्या गोंद्याने नंबर वन धमाका सुरु केलता त्याचा !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक चिक पक राजा बाबू
ब
बोका-ए-आझम Sun, 08/21/2016 - 21:32 नवीन
उसीसे तो गोविंदा और डेव्हिड धवन चालू हो गये!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Mon, 08/22/2016 - 04:10 नवीन
अहो हिरो नंबर वन दूल्हेराजा वगैरे नंतर आले होते ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
त
तुषार काळभोर Mon, 08/22/2016 - 08:42 नवीन
अगेन्स्ट द पॉप्युलर बिलीफ, दुल्हेराजा डेव्हिड धवनद्वारे दिग्दर्शित नव्हता. (पिच्चर भारी होता, यात शंका नाही.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
च
चिनार Mon, 08/22/2016 - 09:25 नवीन
दुल्हेराजा एक नंबर सिनेमा आहे..कधीही पहा कुठूनही पहा... सैफ अली खानला जर हम तुम सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळू शकतो तर गोंविदाला दुल्हेराजासाठी मिळायलाच हवा असे आमचे वैयक्तिक मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
अ
अभ्या.. Mon, 08/22/2016 - 08:46 नवीन
गाणे भारी होते, गोंद्या तुफान नाचलेला पण क्रेडीट गोज टू रहमान अँड प्रभुदेवा, विष्णूदेवा. हे पाहा वरिजिनल चिक पुक चिक रैले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
न
नगरीनिरंजन Mon, 08/22/2016 - 03:19 नवीन
उपचार? _/\_.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक चिक पक राजा बाबू
म
मराठी कथालेखक Sun, 08/21/2016 - 19:32 नवीन
हा विषय माझ्याकरिता अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. मी स्वतःही याच विचारांचा ('स्वेच्छेने विनापत्य' किंवा childfree राहणे ) आहे आणि 'childfree' जीवनशैली जगत आहे. ह्या लेखावरील प्रतिसाद दोन प्रकारचे होवू शकतील १) फक्त या केसपुरता प्रतिसाद २) एकूणातच 'स्वेच्छेने विनापत्य' या संकल्पनेबद्दल /या जीवनशैली बद्दलचा उहापोह करणारा प्रतिसाद पैकी दूसर्‍या प्रकारचा प्रतिसाद इथे न देता लवकरच या विषयावर स्वतंत्र धागा काढण्याचा विचार करतो आहे. आता या विशिष्ट केसपुरतं आधी मुलाची मानसिकता समजून घेण्याचा प्रयत्न करुयात. निर्णय की फोबिया ? -'मूल नको' हा त्याचा विचारांती घेतलेला निर्णय आहे की फोबिया हे कसे ठरवणार ? निर्णय तसे तर प्रत्येक व्यक्तीला कसली न कसली भिती वाटते आणि त्यामुळे तो काही गोष्टी करायच्या टाळतो. त्याला फोबिया कसं म्हणता येईल ? उदा: एखादा व्यवसाय करुन जे भरपूर वैभव प्राप्त होवू शकते त्याचे मला आकर्षण आहे, पदरी पदव्या आहेत, बँकेत चांगल्यापैकी शिल्लक आहे तरी व्यवसायातील अर्थिक चढउतार, अनिश्चितता यांच्याशी सामना करण्याचे धाडस नसल्याने मी नोकरीला रामराम ठोकत नाहीये , हा निर्णय म्हणावा की फोबिया ? आयुष्यातील कोणत्याही महत्वाच्या बदलाचे जे परिणाम असतात ते एखाद्या पॅकेजप्रमाणे असतात, त्यात काही चांगल्या तर काही वाईट (म्हणजे त्रासदायक गोष्टी ) असतात. त्यातील त्रासदायक गोष्टींचा विचार करुन एखाद्याला वाटत असेल की 'माझी काही या त्रासाला सामोरे जाण्याची तयारी नाही' आणि त्याकरिता तो ते पुर्ण पॅकेजच नाकारत असेल तर त्याला फोबिया नाही म्हणता येणार. या केसमध्ये सदर मुलगा 'मूल होईल..त्याच्या बाळलीलांनी घरात आनंद येईल..त्याच्या बोबड्या बोलांनी कान सुखावतील वगैरे' रम्य चित्रांत न रमता त्यातील जबाबदार्‍यांचा , होवू शकणार्‍या त्रासाचा विचार करतो आहे, त्यांस स्वतःच्या कुवतीशी ताडत आहे, त्यातून त्याला या त्रासांना सामोरे जाण्याचे मानसिक बळ आपल्याकडे आहे असे वाटत नाही म्हणून तो मूल नाकारतो आहे असे असू शकेल. मूल जन्माला घालणे ही फक्त एक छोटीशी क्रिया नाहीये , पालकत्व हे पंचवीस-तीस वर्ष किंवा अगदी अजन्म आहे आणि त्यातून मागे फिरणे अशक्य आहे (किंवा शक्य असले तरी अयोग्य निश्चितच आहे). [आता त्या मुलाची आईच बघा.. मुलगा बत्तीस वर्षाचा झाला तरी ती मुलाची चिंता वहातच आहे] हा मुलगा निश्चितच बेजबाबदार किंवा पळपूटा नाहीये. जे पुरुष (काही प्रमाणात स्त्रियाही असतील अशा) मूल जन्माला घालतात पण पुढिल संगोपनाच्या जबाबदारीतून अंग काढतात, दुर्लक्ष करतात ते बेजबाबदार ...असो. जर अशा प्रकारे हा निर्णय त्याने विचारांती घेतला असेल आणि आता फक्त बायको वा आईच्या आग्रहाने तो मानसोपचारतज्ञाकडे जात असेल तर मला नाही वाटत की मानसोपचारतज्ञ फार काही करु शकतील. झालेच तर त्याला मुलांचि आवड नसेल आणि अशी आवड नसणे हा मानसिक विकार समजण्याचे कारण नाही असे मला वाटते. वर एका प्रतिसादात म्हंटलय की
पुरुषाला एखाद्या गोष्टीसाठी राजी करण्याचे अनंत मार्ग स्त्रियांकडे असतात
पण साम दाम दंड वगैरे वापरुन फक्त तात्पुरतं राजी करणं आणि मन बदलणं यात फरक आहे. अशा प्रकारे दबाव आणून तो राजी झाला तरी बाळाच्या जन्माच्या वेळी पतीच्या चेहर्‍यावरून आनंद ओसंडून वहाणार नसेल तर ते त्या संसाराकरिता हितकारक असेल ? बाळाकरिता हितकारक असेल ? फोबिया
त्याला लहान मुले सांभाळणे, ती अवतीभवती असणे, त्यांची जबाबदारी घेणे हे महाभयंकर दबावाचे वाटत आहे.
या वाक्यावरुन फोबिया असण्याची काहीशी शक्यता वाटते. लहान मुल थोडा वेळही आसपास असल्यास तो अस्वस्थ होतो का ?लहान मुलाला अगदी थोडा वेळ पण साभाळू शक्त नाही का ? तसे असल्यास फोबिया आहे असे म्हणता येईल आणि मानसोपचाराने फरक पडू शकेल. पण तरीही पुढे जावून असा फोबिया असल्यानेच त्याला मुल नको आहे की असा फोबिया असणे आणि 'मुल नको' हा निर्णय या दोन्ही स्वतंत्र गोष्टी आहेत याचा कीस पाडावा लागेल. म्हणजे फोबिया दूर होवून तो तास-दोन तास मुलांसोबत मजेत घालवूही शकेल कदाचित पण त्यामूळे त्याचा (विचारांती घेतलेला) निर्णय बदलेलच असं नाही. Antinatalism हा एक अजून थोडा वेगळा विषय अलिकडेच वाचनात आला. ह्या पंथाच्या लोकांना एकूणातच मूल जन्माला घालणे , लोकसंख्या वाढवणे निरर्थक वाटते. पण या केसमध्ये तो मुलगा या पंथाचा असेल असं काही वाटत नाही. (आणि असल्यास त्यावर काही उपचार आहेत किंवा कसे याबद्दल काही वाचनात आले नाही). मुलीची मानसिकता मुलीला मूल हवे आहे...पण तिला स्वतःचे मूल असण्याची प्रचंड आसक्ती आहे की फक्त मुलांच्या सहवासाची आवड आहे की नातेवाईकांचा दबाव, नातेवाईकांत /समाजात वाट्याला येवू शकणारी कुचंबणा (आज येत नसेल तरि भविष्यात येवू शकेल अशी भीती) , तिला गर्भाशयाचा आजार असल्याची बातमी बाहेर फुटली असल्याने 'मी वांझ नाही,मूल जन्माला घालू शकते' हे सिद्द करण्याची जिद्द यापैकी नेमकं काय आहे हे समजणे कठीण आहे. तिची फसवणूक ? त्याने लग्नाआधि तिला याबाबत सांगितले नाहि म्हणुन त्याने चूक केली असे काहींना वाटत आहे. पण कदाचित त्यावेळी त्याच्याच मनात असा काही निर्णय पक्का झाला नसेल. लग्नाच्या वेळी दोघांचे वय २४ म्हणजे फार काही जास्त नव्हते. विचार पक्के झालेच असतील असे नाही. त्यामूळे त्याने खूप मोठी चूक केली असं वाटत नाही. घटस्फोट न होण्याचे कारण दोघांत खूप प्रेम आहे असे आपण लिहिले. म्हणजे एकतर त्या प्रेमापोटी ती त्याच्यापासून दूर होवू शकत नाही (म्हणजे त्याच्यापासुन दूर होण्याचे दु:ख ती स्वतः सहन करु शकत नाही ) किंवा 'घटस्फोटाने तो कोलमडेल' या भावनेने हळवी होवून ती घटस्फोट घेत नसेल किंवा घटस्फोटिता म्हणुन समाजात /कुटूंबात होणारी बदनामी तिला नको असेल आता काय करावे ? त्याने - तिचे जीवन दु:खी करण्याचा त्याला अधिकार नाहि म्हणून त्याने मोकळे पणाने तिच्यासमोर प्रस्ताव ठेवावा की "माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि मी तुला दीर्घकाळ दु:खी पाहू शकत नाही. पण तुझ्या आनंदाकरिता माझा निर्णय बदलणेही योग्य होणार नाही तेव्हा तुला या बंधनातून मोकळे व्हायचे असल्यास मी कोणतीही कटूता न ठेवता तुला मुक्त करेन, झालेच तर तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी मी जमेल ते प्रयत्न /मदत करेन." तिने - या प्रस्तावावर तिने शांतपणे विचार करावा. म्हणजे खरेतर दोन कठीण पर्यायात कमी त्रासदायक पर्याय निवडावा. 'मूल नसण्याचे दु:ख " मोठे की "प्रिय पतीला सोडण्याचे दु:ख" मोठे याकरिता मनाचा कौल घ्यावा. मला वाटते ती त्याला सोडणार नाही. यापुढील सहजीवन - जर तिने त्याच्याबरोबर संसार न मोडण्याचा निर्णय घेतला तर तिच्या आयुष्यातले 'मूल नसण्याचे दु:ख' दोघांनी मिळून थोडे हलके करावे - तिने नातेवाईक्/मित्र-मंडळी/शेजारी यांच्या मुलांसोबत जमेल तसा वेळ घालवावा त्यामुळे त्या पालकांनाही बालसंगोपनात तिची मदत होईलच. - त्यातीलच एखाद्या लाडक्या मुला/मुलीशी दीर्घकाळासाठी मावशी/मैत्रिण/मार्गदर्शक असे नाते जोडावे. एखाद्या अनाथ आश्रमात वा शाळेत जावून काही काम मिळू शकते का काही वेळ देता येतो का ते पहावे (अभियंता आहे असे आपण लिहिलेय, संगणक अभियंता असेल तर शाळेत संगणक शिकवणे वगैरे अर्धवेळ काम मिळू शकेल). - इतर छंद जोपासावेत - त्याने तिला भरपूर वेळ द्यावा..निदान त्याच्या सहवासाची उणीव तिला कधी भासू देवू नये. - नेहमी तिच्याशी प्रेमाने वागावे, तिने कधी चिडचिड केली तरी स्वतः शांत रहाण्याचा प्रयत्न करावा. - तिच्या इतर छंदांत रस घ्यावा, मदत करावी - भटकंती, खरेदी , गृहसजावट, मनोरंजन (नाटक , सिनेमा , पार्टी ई) यापैकी ज्याप्रकारची चैन तिला आवडेल त्यात सढळ हाताने खर्च करावा. अनेकदा भौतिक सुखांच्या नशेत बाकीची दु:खे हलकी होतात / विसरली जातात. - तिच्या वरील घरकामाचा भार कमी होवून तिला स्वतःची सौंदर्य /तारुण्य जोपासना करायला भरपूर वेळ मिळेल असे बघावे. त्याकरिता तिला नेहमी प्रोत्साहन द्यावे, तिच्या सौंदर्याची स्तुती करावी. तिच्या आहाराकडे स्वतः नीट लक्ष द्यावे. तरुण आणि सुंदर असल्याचे समाधान (काहिसा गर्व म्हणू हवंतर) स्त्रीची इतर दु:ख हलकी करते असे मला वाटते. - त्याने स्वत:ही तंदुरुस्त राहून प्रणयात रस घेत रहावा , त्यात नावीन्य /रंजकता आणण्याचाही प्रयत्न करावा. अखेरीस काय की आयुष्यात कोणता आनंद मिळेल्, कोंणता नाही याचा काही करार करुन माणूस जन्माला येत नाही, आयुष्य हे देखील एक पॅकेज आहे ज्यात चांगल्या वाईट गोष्टी, सुख दु:ख भरलेली आहेत. एखादे विशिष्ट सुख आयुष्यात नाही म्हणुन कुढण्यात अर्थ नाही, आयुष्यात प्रेम असणे महत्वाचे..
  • Log in or register to post comments
च
चंपाबाई Mon, 08/22/2016 - 17:30 नवीन
म्हणजे बोर्डाचा फॉर्म भरायचा. आणि नंतर बोंबलायचं की मी गणिताच्या पेप्राला बसणारच नाही. तरी माझा निकाल पासच आला पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
N
nanaba Wed, 08/24/2016 - 08:57 नवीन
are 2 worlds apart.. so I understand why someone may not want kids.. I too thought for some time that I do not want kids.. for around 7 yrs - post marriage.. and then even after my mind changed, I faced issues getting preggo for 2+ years.. but now that I have one.. I can not imagine life without her.. no bigger happiness, no bigger love. Suddenly, everything is not about you, but about them and you don't feel bad about it. It just comes naturally!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
प
पक चिक पक राजा बाबू Sun, 08/21/2016 - 19:58 नवीन
मैं खुद इ अपने णाम क़े प्रेम में पड़ा हूँ ,बापू, भोत म्हैनत करके खोजेला है यह णाम.
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Mon, 08/22/2016 - 04:20 नवीन
बहुमोल मत विचारले म्हणून सांगतो मात्र तत्पूर्वी
एक महत्त्वाची केसस्टडी म्हणून ह्यावर गंभीर चर्चा घडावी ही इच्छा आहे.
मात्र सदर महत्त्वाच्या केसस्टडीवरील गंभीर चर्चेचा इथे जो काही निष्कर्ष आणि उपाय निघतील त्याची अंमलबजावणी कशी करणार याबाबत काही मतप्रदर्शन केले तर बरे होईल! ('हिंदूंनी अनेक मुले जन्माला घालावी' असे फतवे आजकाल निघत आहेत त्याच्याशी ही चर्चा संबंधित आहे काय?) बाकी अनेक प्रतिसाद बेणारे बाईंच्या उलटतपासणीसारखे वाटले. समलैंगिक हे मनोरुग्ण आहेत असा एक गैरसमज आहे त्या स्वरुपाच्याच गैरसमजातून आलेले स्वेच्छेने निपुत्रिक राहणाऱ्यांनीही सायकियाट्रिस्ट नाही तर किमान सायकॉलॉजिस्टशी तरी चर्चा करावी ह्या स्वरुपाचे प्रतिसाद वाचून हहपुवा झाली. आता शेवटी बहुमोल मतः -नवरा आणि बायको जे काही आहे ते आपापसात बघून घेतील.
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Mon, 08/22/2016 - 18:11 नवीन
अजानुकर्णसाहेब, तुम्ही किती गांभिर्याने सदर धाग्याकडे बघत आहात हे आपल्या प्रतिसादावरुन कळतेच आहे. तरीही आपल्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. सदर घटना रेअर केस (निदान माझ्यासाठी व आमच्या गोतावळ्यासाठी तरी) आहे. ह्या गोतावळ्यात काही व्यक्ति हे एकतर कमी शिक्षित, प्रगल्भ विचार करु शकणारे नाहीत, काही वयस्कर असून परंपरा, रुढींचा पगडा असल्याने जरी 'खुलेपण अंगिकारणार्‍या' किंवा 'नाक न खुपसणार्‍या' असल्या तरी त्यांना एक प्रकारचा संभ्रम निर्माण झालेला आहे. काही समवयस्क सुशिक्षित समविचारी असल्या तरी साधारणपणे अशा घटना रोजच्या जीवनात आढळत नसल्याने काय भूमिका घ्यावी, कसा विचार करावा ह्याबद्दल गोंधळलेल्या आहेत. सदर गोतावळा एकमेकांना सुख्दु:खात सहभागी होत असल्याने चर्चा-विचारविनिमय नित्याचा असतो. या विशिष्ट प्रकरणात संबंधितांशी वागतांना नेमके कसे वागावे, काय बोलावे, मुळात स्वतः आपणच ह्या घटनेकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहावे ह्याबद्दल संभ्रम आहे. त्यांचे ते बघतील हे बोलायला सोपे असते पण प्रॅक्टिकली शक्य नसते जेव्हा संबंधित खूप जवळचे असतात. आमच्या गोतावळ्यातल्या कोणीही त्यास आजही मनोरुग्ण वा तत्सम समजत नाही. सदर व्यक्ति अतिशय संस्कारी, सुशील व सद्वर्तनी आहे. सगळ्यांचे त्याच्याशी चांगलेच संबंध आहेत, सर्वांना त्याच्यासोबत चांगलेच व्हावे अशी अपेक्षा आहे. बेणारेबाईंच्या उलटतपासणी प्रकरणासारखे इथे काहीच होत नाहीये. मिसळपाववर ही घटना मांडण्याचे कारण फार साधे आहे. इथे अनेक प्रकारची मंडळी आहेत, व्यावसायिक किंवा नोकरीनिमित्ताने अनेक अनुभव असलेली आहेत. काही उत्तम डॉक्टर्स, तर काही मानसशास्त्रात रुची ठेवणारे तसेच मनोविकारतज्ञही आहेत. अशांसमोर सदर घटना मांडल्यावर त्यांचे अनुभवसिद्ध दृष्टीकोन वाचायला मिळणे हे वर उल्लेखित गोतावळ्यास मार्गदर्शक ठरु शकते. ह्यात प्रत्यक्ष संबंधित व्यक्ति व त्याची पत्नीही असू शकतात (त्यांना हे माहिती नाही पण ते मिसळपावचे वाचक असण्याची किंवा नसण्याचीही शक्यता मी गॄहित धरली आहे) तसेच, अशीच काहीशी समस्या असलेल्या, माहिती असलेल्या इतर मंडळींना ज्यांना इथे लिहावे हे सुचले नाही, किंवा भविष्यात कधी अशी घटना बघतील तर त्यांनाही माहिती व्हावी हा देखील दृष्टीकोन आहे. आता तुमचे इथे व्यक्त केलेले मत बहुमोल आहे की नाही हे कळले असेलच. प्रतिसादासाठी धन्यवाद. धाग्याचे गांभिर्य ठेवण्याची सूचना आपण कदाचित वाचली नसेल असे गृहित धरतो अन्यथा आपल्यासारख्या संतुलित सदस्याकडून असा प्रतिसाद अपेक्षित नव्हता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण Mon, 08/22/2016 - 19:08 नवीन
मी पुरेशा गांभीर्याने प्रतिसाद दिला होता. सदर प्रश्न हा त्या दांपत्याचा हा पूर्णपणे वैयक्तिक मामला आहे हे मत तुम्हाला गंभीर का वाटले नाही हे कळले नाही. बेणारेबाईंची उलटतपासणी हा त्या गोतावळ्याशी संबंधित शेरा नसून या धाग्यावर आलेले मानसोपचारतज्ञाकडे जा, ज्योतिष कुंडलीत काय आहे, पळपुटेपणाचा गौरव होण्याची देशाची परंपरा, गोविंदा-राजाबाबू आणि डेविड धवन, पक चिक पक लै लै वगैरे प्रतिसादांवर दिलेला शेरा होता. अ‍ाता हे सर्व प्रतिसाद वगळता तुम्हाला माझ्या पुरेशा गंभीर प्रतिसादावर तो गंभीर नाही अशी टिप्पणी करावीशी वाटली हे रोचक आहे.
मत बहुमोल आहे की नाही हे कळले असेलच
हू केअर्स!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Mon, 08/22/2016 - 19:39 नवीन
महोदय, तुमचा प्रतिसाद महत्त्वाचा वाटला म्हणून उत्तर दिले. अन्यथा टाळले असतेच. उत्तर देण्याचे कारणही मी प्रतिसादात दिले होते त्यावर आपण विचार केलेला दिसला नाही. नवरा-बायकोची आपसातली गोष्ट म्हणून काही गोष्टी टाळता येत नाहीत. उद्या काहीही होऊ शकते, मुलीला डिप्रेशन येउन तिने आत्महत्या केली तर, मुलानेही कदाचित केली तर, दोघांनीही केली तर, बरीच लोकं इथे घटस्फोट घटस्फोट करत आहेत पण इतकं सोपं असत नाही ते. तसंच तुम्ही म्हणताय तसं त्यांच्यात आपसात ठरवतील ते, हे इतकं सोपं नाही. मध्यंतरी मुलीला गर्भाशयाची काहीतरी समस्या झालेली, आम्ही अगदी प्रचंड योगायोगाने एकाच क्लिनिकमधे एकमेकांना भेटलो. ती तिथे रिपोर्ट्स दाखवायला आलेली, डॉक्टरने तिला कॅन्सरच्या शक्यतेची चाचणी करायला सांगितलेली. ती एकटीच तिथे हबकून बसलेली, डोळ्यात पाणी आलेले, नुसतं कॅन्सरचं नाव ऐकून ती प्रचंड घाबरलेली होती. आम्ही तिची विचारपूस केली, रिपोर्ट्स बघितले, मला ह्या विशिष्ट चाचणीबद्दल थोडी माहिती 'आधीच' असल्याने मी तिला योग्य भाषेत समजावून सांगु शकलो की ही फक्त शक्यतेची चाचणी आहे, मलेरिया,डेन्गुसारखी व रुटीन चेकप आहे. याचा अर्थ तुला कॅन्सर झाला किंवा होईल असा होत नाही. अर्धापाऊन तास तिला नीट समजावल्यावर ती नॉर्मलला आली. आम्ही कर्मधर्मसंयोगाने तिथे भेटलो नसतो तर तिने हे कोणालाही सांगितले नसते हे मला पक्के ठावूक आहे. आतल्याआत कुढत राहिली असती व काहीबाही विचार करत बसली असती. आताही ही घटना मांडण्याचं कारण इतकंच होतं की काही विषय अपरिचित असतात, त्याबद्दल शास्त्रिय माहिती असली तर बरं असतं. कुनाच्या फाटक्यात पाय घालण्यासाठी हा उपद्व्याप मी निश्चितच करत नाही आहे. तसेच तुमच्या मताला बिनकामाचे म्हटलेले नाही हे लक्षात घ्यावे, फक्त त्याच्याकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन स्पष्ट केल्याने तुम्हाला त्याचे महत्त्व अजूनही पटतंय का एवढाच विचार करावा असे सूचित करायचे होते. बाकी इतर अवांतर, महत्त्वहिन प्रतिसादांबद्दल तर त्यासंबंधी संपादकांना विनंती करतोय की असंबंधित, गांभिर्यहिन प्रतिसाद इथून काढावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण Mon, 08/22/2016 - 21:31 नवीन
तुमच्या मताचा आदर आहे. पण तरीही हा प्रश्न त्या दोघांपुरताच आहे. मुलाला बाबा व्हायचं नाही, मुलीला आई व्हायचंय. ही खरी शृंगापत्ती आहे. :) या दोघांपैकी कुणीतरी पडतं घेऊन हा प्रश्न सोडवायचाय. जो काही निर्णय आहे त्याची जबाबदारी दोघांनाच उचलायची आहे. उद्या मूल झालं आणि मुलाची तेव्हाही मुलाला सांभाळायची इच्छा नसेल तर शंकाकुशंका काढणाऱ्या आणि चौकशा करणाऱ्या गोतावळ्याची कितपत मदत होऊ शकेल याबाबत साशंक आहे. तेव्हा बाकीचे काय म्हणतात याला काडीचे महत्त्व देऊ नये. मुलगा आणि मुलगी यात अमुकच बाजू बरोबर आहे असे मला वाटत नाही. समोरच्या व्यक्तीची इच्छा ही माझ्या इच्छेपेक्षा जास्त महत्त्वाची आहे असा विचार दोघांपैकी एकाने केला तर प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. यात फार तर मॅरिज कौन्सिलर वगैरे मदत करु शकतील. या प्रश्नावर सायकिअॅट्रिस्ट काही करु शकतील असे मला वाटत नाही! (सायकिअॅट्रीची क्लिनिकल ट्रीटमेंटवगैरे घेतली तर सेक्स लाईफमध्ये काही दिवस अडचणी येऊ शकतात की काय याचीही कल्पना डॉक्टरकडून घेऊन ठेवा.) बाकी आत्याबाईला मिश्या येऊ शकतात या धर्तीवर काहीही होऊ शकतं. मुलीला डिप्रेशन येऊ शकतं, मुलाला डिप्रेशन येऊ शकतं. दोघांनाही येऊ शकतं (या बाबतीत मात्र सायकिअॅट्रिस्ट नक्की मदत करु शकतो!) पुढं आत्महत्येचीही शक्यता तुम्ही वर्तवली आहे. (म्हणजे एक जीव जगात येऊ शकत नाही म्हणून दोन जीवांनी जग सोडायचं. आनंद आहे!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
प
पक चिक पक राजा बाबू Mon, 08/22/2016 - 07:33 नवीन
अहो आजानुकर्ण साहेब, पुनरुत्पादन आणि समाजमान्य लैंगिक संबंध हे भारतीय विवाह संस्थेचा पाया आहेत. हाच हट्ट त्या मुलीने धरला असता तर त्या मुलाची प्रतिक्रिया काय असली असती ?.असले महान विचार त्याने लग्ना अगोदरच मूली जवळ शेअर केले असते तर, ती याच्या बरोबर लग्नाला तयार zali असती का ? ही त्या मुलीची फसवणूक आहे , ही मानसिक समस्या आहे दूसरे काही नाही,he needs treatment. आणि मूल जन्माला घालावे की घालु नये हा निंर्णय घेण्याचा अधिकार त्याचा एकाट्याचा कसा काय? निंर्णय घेण्याचा तिलाही tevdhach हक्क आहे .
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Mon, 08/22/2016 - 08:09 नवीन
फसवणूक झाली तर घटस्फोटाचा अधिकार आहेच की. झालेच तर मुल जन्माला घालण्याचा निर्णयाचा अधिकार दोघांना आहे हे मान्य पण त्याचे असे आहे की 1 x 1 = 1 1 x 0 = 0 0 x 1 = 0 0 x 0 = 0 थोडक्यात नकाराधिकार महत्वाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक चिक पक राजा बाबू
म
मराठी कथालेखक Mon, 08/22/2016 - 08:10 नवीन
फसवणूक झाली तर पर्याय आहेच की. असे वाचावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
प
पक चिक पक राजा बाबू Mon, 08/22/2016 - 08:42 नवीन
लग्न व्यवस्थेमधे समाज मान्य लैंगिक संबंध आणि अपत्य प्राप्ति या दोन्ही गोष्टिची अपेक्षा असणे यामधे काहीही अवाजवी आणि गैर नाही उलट या गोष्टि ना नकार देणे हे दुसऱ्या पार्टनर वर अन्याय आहे,त्यामुळे होकारधिकार महत्वाचा असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Mon, 08/22/2016 - 08:58 नवीन
मला एक मुलगी फार आवडते. मी तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला , पण तिला माझ्याशी लग्न करायचे नाही..सांगा होईल लग्न ? पुढे जावून मी माझ्या घरच्यांची, तिच्या घरच्यांची संमती मिळवली पण तरी ती नकारावर ठाम राहिली तर मी तिला काय म्हणणार "तू एकटीच हा निर्णय कशी घेवू शकतेस ? सगळ्यांचा होकार असताना तुझ्या नकाराला काही किंमत नाही"...चालेल ? लॉजिकलि विचार करा साहेब
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक चिक पक राजा बाबू
उ
उडन खटोला Mon, 08/22/2016 - 09:06 नवीन
आपण म्हणताय ते लॉजिक लॉजिकल वाटत नाहीये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
स
सामान्य वाचक Mon, 08/22/2016 - 09:55 नवीन
तुमच्या उदाहरण मध्ये इंटरस्तेड पार्टी 1 च आहे , दुसरी नाही पण जेंव्हा दोघे लग्न करतात म्हणजे दोघांमध्ये कॉन्ट्रॅक्ट होते कि नाही तेंव्हा ते दोघेही इंटेरेस्टेड party होतात त्यामुळे लग्न आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या जबाबदाऱ्या, फायदे, तोटे, बरे, वाईट इ इ यामध्ये दोघांची जबाबदारी असते आणि दोघां च्या हि मताला वजन असते त्याच वेळी एखाद्या निर्णयाने किती नुकसान होणार आहे त्यावर त्या निर्णयाचा बरे वाईट पणा ठरतो मला वाटते , कशामुळे का असेना, पण भारतीय बायकांमध्ये मातृत्वाला खूप महत्व असते, त्याशिवाय त्यांना खूप leftout, रिकामे, अधुरे वाटते . हे चूक का बरोबर हा विषय सोडून द्या पण त्या मुलाच्या भीतीमुळे त्या मुलीचे खूप जास्त emotional नुकसान नाही का होत आहे? त्यामुळे इथे होकाराधिकार जास्त महत्वाचा ठरतो उद्या समजा त्या मुलीने काही समाजापोटी नवर्याला सांगितलं कि तुझ्या आई ने आपल्या बरोबर राहायचे नाही , तू तिची जबाबदारी घ्यायची नाही कारण मला नको वाटते तर तिथे हि नकाराधिकार महत्वाचा का? मूळ प्रश्ना मध्ये मुलाने मानसोपचार घ्यावेत हे बरोबर आहे कारण त्याने कुठल्यातरी भीती पोटी, समजापोटी हा निर्णय घेतला आहे त्याचे स्वतःचे मुळ किंवा आदिम मत वेगळे असू शकते समजा , 15 वर्ष नंतर त्याची हि भीती आपोआप कमी झाली आणि त्याला मूल हवे वाटले, तर ते शक्य आहे का त्या मुलीचे नवऱ्या वर प्रेम आहे पण काही वर्षांनी she might hold this against him.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
प
पक चिक पक राजा बाबू Mon, 08/22/2016 - 09:09 नवीन
Mazyakde समुपदेशनासाठी एक केस आलि होती. 15 वर्षाच्या सुखी संसारानंतर ,2 मुले zalyanantar नवरोबा 2014 साली सहज एका क्ष ठिकाणी निशुल्क मेडिटेशन शिबिरासाठी jaoon आले,तिथे zalelya आध्यात्मिक ब्रेन वाशिंग नंतर ते धर्मपत्नी ला बहिन म्हणू लागले.पत्नी हैरान zali ,तिने आणि सगळ्या नातेवाईकानी भरपूर samjawale पण गड़ी आपल्या मतावर ठाम.पुढे 8 महीने मानसशास्रीय समुपदेशन आणि कॉग्निटिव बीहेवियर थेरेपीचे बरेच सेशंस करुन सदर व्यक्तीचे मन वळविण्यात यश आले.
  • Log in or register to post comments
प
पक चिक पक राजा बाबू Mon, 08/22/2016 - 09:25 नवीन
मराठी कथा लेखक साहेब, लग्नाला होकार किंवा नकार देण्याचा हक्क दोघांनाही आहे.लग्नानंतर परिस्थिति वेगळी असते लग्न हा एक करार असतो.मुले जन्माला ghalnyasathi दोन व्यक्ति आवश्यक असतात.आणि लग्न भारतात ज्या गोष्टि साठी केले जाते त्याच गोष्टि ना एका पार्टनर चा नकार असेल तर kalyanch आहे.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Mon, 08/22/2016 - 10:01 नवीन
अहो पण मुलाने आता बाप व्हायलाचं हवं असं तरि कसं म्हणू शकतो ? असा दबाव आणून त्यला बाप बनवता येणार नाहीच... मुलीसाठी घटस्फोटाचा पर्याय आहेच ना... प्रॅक्टिकली विचार करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक चिक पक राजा बाबू
प
पक चिक पक राजा बाबू Mon, 08/22/2016 - 12:02 नवीन
सगळ्यात महत्वाचे म्हणजे तो मूल न होऊ देण्याचे जी कारणे सांगत आहे ती तार्किक दृष्ट्या योग्य आहेत की नाही. आजनु कर्ण साहेब, मुलांच्या jababdarya अश्या काहि फार मोठ्या असतात ashyatala काही भाग नाही. मुलाची जबाबदारी घेण्यास भयंकर दबाव vatne ,मुले अवतिभवती असताना अस्वस्थ vatne, या सर्व गोष्टि असामान्य आहेत,psychology मधे याला maladaptive thinking म्हणतात. त्याच्या विचारांमधे समस्या आहे, ते बदलवे लागेल त्यांच्यासाठी साइकोथेरेपीचेच उपचार लागतील,फोबिया मधे ,चिंता विकृति मधे परिस्थिति धोकादायक नसते,रुग्णाचे विचार विकृत zalele असतात,त्याना badlave लागतें,
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 08/22/2016 - 17:26 नवीन
"नवर्याबद्दल" वरच्या प्रतिसादात लिहिले आहे एकदा "नीट" वाचून घ्या प्रधानसेवक कोण? मराठीत असा शब्द वाचला नाही( माझी शब्द संपत्ती फार आहे असा माझा दावा नाही) समजावून सांगितले तर बरे होईल.
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Mon, 08/22/2016 - 17:41 नवीन
http://www.pudhari.com/news/desh/47962.html प्रधानसेवक हा शब्द आमचा नाही. ज्यांचा आहे त्यांच्याच शब्दांत.
मी प्रधान सेवक असून, लोकांची सेवा ही आमची जबाबदारी आहे. आता आम्ही आमच्या कामच हिशोब देण्यासाठी आलो आहोत. इति - मा. पंतप्रधान प्रधानसेवक श्री. मोदी
धन्यवाद. वरचा प्रतिसाद 'नीट' वाचतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Mon, 08/22/2016 - 19:44 नवीन
प्रधान सेवक हे ते स्वतः ला म्हणत आहैत.त्यांचे अधिकृत नाव नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण Tue, 08/23/2016 - 02:58 नवीन
प्रधान सेवक हे ते स्वतः ला म्हणत आहैत.त्यांचे अधिकृत नाव नाही.
हे मान्य. त्यांचे अधिकृत नाव नरेंद्र दामोदरदास मोदी असे आहे. मात्र ते स्वतःला लाडाने प्रधानसेवक म्हणतात. आम्हाला ते नाव आवडते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
त
तर्राट जोकर Mon, 08/22/2016 - 18:27 नवीन
काही प्रतिसादकर्त्यांचा काहीतरी गोंधळ झालेला दिसतोय. मुलाने 'वैचारिक बैठक' म्हणून हा 'घेतलेला निर्णय' नाही. ते कदाचित त्याला हळूहळू जाणवायला लागलं. त्यालाही आपलं काहीतरी चुकतंय असं वाटत असेल अन्यथा तो सायकॅट्रीस्टकडे जायला तयार झाला नसता. त्याच्यावर कोणीही दबाव आणत नाही आहे हे माहिती आहे. पूर्ण विचारांती निर्णय घेणे आणि एखादी जबाबदारी घ्यायला भीती वाटणे ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. @मराठी कथालेखक, कधी कधी आपण एखाद्या गोष्टीच्या छोट्याशाच अडचणीचा बाऊ करतो तसा काहीसा प्रकार असावा असे वाटतं. जसं बर्‍याचदा असं आढलंय की कार चालवायला शिकण्याअगोदर लोकांना क्लच, ब्रेक, गिअर, अ‍ॅक्सिलेटर असं सगळंच एकानंतर एक किंवा एकाचवेळी कसं वापरायचं ह्याबद्दल इमॅजिन करुन घाबरायला होतं, स्टीअरींग वर बसल्यावर घाम सुटतो. हळूहळू नीट शिकल्यावर मस्त मजेत गाडी चालवली जाते. पण शिकेपर्यंत तर भीती असतेच. ज्यांना ह्या भीतीला तोंड द्यायची हिंमत होत नाही ते गाडी चालवूच शकत नाही, पण काहीकाळाने त्यांना कळते की हे तितके काही कठिण नव्हते, आपण उगाच घाबरत होतो. नीट मार्गदर्शन, समुपदेशन झाले तर ही भीतीची स्टेज पार करता येते.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Mon, 08/22/2016 - 18:55 नवीन
या केसपुरतं तुम्ही म्हणताय तसं असेल बहूधा, तुम्ही या जोडप्याला जवळून ओळखता त्यामुळे तुम्हाला बरीच माहिती असेल. मी शक्यता सांगितली. बाकी गाडी चालवणं आपल्याला अनेकांना सरावाने सोपं वाटत आणि आपण आपल्या सुरुवातीला वाटणार्‍या भीतीवर मात केली हे खरेच आहे. (पण सुरुवातीलाहि खरंतर नुसती भिती नव्हतीच, त्या स्टिअरींग व गियरचं खूप आकर्षण , उत्सुकता असं सगळं होतंच ..खरंय ना ?). पण तरीही आजकालचं वाढतं ट्रॅफिक, होणारे अपघात ई ई चं दडपण घेवून कुणी ठरवत असेल की नको रे बाबा ते ड्रायविंग तर मी तो फोबिया मानणार नाही नक्कीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा