भारतीय सैन्य आणि प्रांतिक सीमेचे शिक्के ...
आज टीव्हीवर १६ मराठा बटालियनच्या जवानांचे मनोगत ऐकत होतो तेव्हा एक गोष्ट जाणवली की भारतीय सैन्य हे मराठा गोरखा जाट अशा अनेक रेजिमेंटमध्ये विभागलेलं आहे...आपल्या लढाईत सगळे एकत्र येतात पण मग असे वर्गीकरण का ?देशाच्या सैनिकाला प्रांतिक सीमावादाच्या पलीकडे असायला हवं....अशा रेजिमेंटमुळे नक्की काय साध्य होतं ?
मुळात जर सैन्य भरतीसाठी हे वर्गीकरण असेल तर सैन्यात आल्यावर ते तसे असता कामा नये...कारण प्रांतिक सीमा मागे टाकून तो सैनिक भारतीय म्हणून आलेला असतो....
ब्रिटिशांनी जर हे रेजिमेंट बनवले असतील तर ते अजूनही हद्दपार का करण्यात आलेले नाहीत?
जाणकारांच्या उत्तराच्या प्रतिक्षेत !
💬 प्रतिसाद
(169)
स
संदीप डांगे
Sun, 08/21/2016 - 09:12
नवीन
बापू उत्तर देतीलच
- Log in or register to post comments
च
चंपाबाई
Sun, 08/21/2016 - 10:06
नवीन
ते पूर्वीच्या काळी ब्र्टिशानी निर्माण केले.
अगदी पूर्वी त्या त्या जातीच्या गटात तेच लोक असत.
आजकाल असे बंधन नाही.
पण ती नावे परंपरेने असल्याने व त्या त्या जातीला अभिमानास्पद वाटत असल्याने ती तशीच आहेत. त्यात काही गैरही नाही.
आता काही जातीच्या लोकाना उदा. समजा ब्राह्मण .. हे चुकीचे वाटते. तर त्यानीही सरकारला विनंती करुन ब्राह्मण बटालियन काढावी व सुरुवातीला काही वर्षे आपल्या जातीचेच लोक त्यात भरुन शौर्य गाजवावे.
मग कालांतराने नाव तसेच ठेवून सर्व जातीधर्माचे लोक त्यात भरावेत.
....
प्रत्येक गावात ब्राह्मणपुरी असते... पूर्वी त्यात फक्त ब्राह्मणच रहायचे ... आजकाल ब्राह्मण परगावी परदेशी उडाल्याने व त्या जागा बाकीच्यानीही विकत घेतल्याने सर्वच लोक त्यात रहातात.
पण गल्लीचे नाव मात्र ... आजही ब्राह्मणपुरीच असते.
...
तसेच हेही.
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Sun, 08/21/2016 - 11:02
नवीन
https://en.m.wikipedia.org/wiki/1st_Brahmans
- Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ
Sun, 08/21/2016 - 18:21
नवीन
The 1st Brahmans was an infantry regiment of the British Indian Army. It was raised at Oudh by Captain T Naylor in 1776 for service in the army of Nawab Wazir of Oudh, and was known as the Nawab Wazir's Regiment. It was transferred to the East India Company in 1777. In 1922, it was designated as the 4th Battalion 1st Punjab Regiment. It was disbanded in 1931.
<<
जौद्या ना?
- Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ
Sun, 08/21/2016 - 18:31
नवीन
म्हंजे, ही जी काय फर्स्ट ब्राह्मण इन्फंट्री रेजिमेंट आहे, तिला अॅक्चुअली अवधच्या नबाब वजीराची रेजिमेंट म्हणत असत. मग हिचं नांव फर्स्ट ब्राह्म्ण कुठून आलं वगैरे काही विकी संदर्भ?
एकंदरात,
हे त्याच विकीत लिहिलेलेल आहे. ही अशी नांवे का बदलतात याबद्दल कुणी सांगेल काय? १९०१ ते डिसबँड होईस्तोवर १९३१.
बाकी स्वतंत्र भारताच्या सेनेत ही रेजिमेंट नाही. मला रेजिमेंट्स थोड्या स्कूल हाऊसेस सारख्या वाटतात. एकेमेकांवर जीव अवलंबून असणार्या सैनिकांत अस्मिता चेतविण्यासाठी दिलेली प्रतिके. आय मीन बापू सारख्या ऑथेंटिक सैनिकाने इथे त्यांच्या रेजिमेंटातील इतर भारतीय जाती/प्रांतातील लोकांबद्दल लिहिले आहेच की.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Sun, 08/21/2016 - 18:53
नवीन
हे त्याच विकीत लिहिलेलेल आहे. ही अशी नांवे का बदलतात याबद्दल कुणी सांगेल काय?
ह्याचा संबंध सरळ तत्कालीन इतिहासाशी आहे, प्रत्येक नावाखाली मला जे सर्वात probable अन plausible ऐतिहासिक कारण वाटते ते लिहितो मी
1776 Nawab Wazir's Regiment
(तैनाती सेना पर्व, ब्रिटिश/पाश्चात्य तालमीत तयार झालेल्या रँक अँड फाइल पद्धतीच्या पलटणी एतद्देशीय संस्थानिकांच्या तैनातीत सालीना तनख्यावर नियुक्त होऊ लागल्यामुळे, अन ह्या पलटणी त्या त्या राजवाड्याच्या खाशा अंगरक्षकांत असल्यामुळे, ती ओळख पटावी असे नाव)
1777 30th Battalion of Bengal Sepoys
(कंपनी बहाद्दूर ने पहिले पाय रोवले ते मद्रास अन कलकत्त्यातच (फोर्ट सेंट जॉर्ज अन फोर्ट विल्यम) तिथे त्यांची अजून जमीन बळकवायची करामत सुरु झाली, साहजिक आर्मीची गरज वाढू लागली अन लोकल लोक भरती केले गेले, नेटिव्ह लोकांची (बंगाल्यांची) तिसावी बटालियन म्हणून हे नाव आले असावे
1781 23rd Regiment of Bengal Sepoys
1784 29th Regiment of Bengal Sepoys
1786 29th Bengal Sepoy Battalion
हे आकडे बदलायचे कारण म्हणजे दरवेळी बटालियन/रेजिमेंटला अमुकच लोक असावेत असा नियम नसे, तर शत्रू किती मातब्बर आहे ह्यावर एखाद्या बटालियनची नफरी ठरत असे, असे जर दोन किंवा जास्त रेजिमेंट/बटालियन सम्मिलित झाल्या तर वरील प्रमाणे आकडे अन नावे रिवाईज होत असावेत
1796 2nd Battalion 9th Regiment of Bengal Native Infantry
1824 21st Regiment of Bengal Native Infantry
1861 1st Regiment of Bengal Native Infantry
1885 1st Regiment of Bengal Infantry
आर्टिलरी अन इनफंट्री मध्ये फरक करता यावा अन त्या रेजिमेंट अन बटालियन मध्ये भरती कुठले लोक झाले असावेत ते सांगणाऱ्या नावांची ही जंत्री वाटते
1901 1st Brahman Infantry
1903 1st Brahmans
त्या काळची एकंदरीत जातीव्यवस्था पाहता (उत्तर भारत अन बंगालकडली तर कायस्थ हे मुलकी सेवांत बरेच घुसलेले होते अन ब्राह्मण-भूमिहार हे फौजी सेवेत, म्हणून कदाचित ही नावे पडली असावी)
- Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ
Sun, 08/21/2016 - 18:33
नवीन
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Sun, 08/21/2016 - 11:02
नवीन
मा. प. सर,
मला खरंतर ह्या विषयावर एक लेखच लिहायचा होता, पण वेळ साधेना, तरीही आता आपण विषय काढलाच आहेत तर एकाच मेगाबायटी प्रतिसादात जितके सांगता येईल तितके सांगतो.
प्रथमतः रेजिमेंट्सची नावे कशी पडली किंवा त्याला जाती कश्या संलग्न झाल्या? तर इथे हे लक्षात घ्यायला हवे की ईस्ट इंडिया कंपनीचं शासन होतं तेव्हा रेजिमेंट्सची नावे अशी जात आधारित नव्हती, तर प्रांतिक होती, उदाहरणार्थ बंगाल नेटिव्ह इनफंट्री, बॉम्बे नेटिव्ह इनफंट्री "काली पांचवी" (काळ्या/एतद्देशीय सैनिकांची पाचवी बटालियन) जाती आधारित रेजिमेंट्स आल्या 1871 नंतर त्याकाळी अपराधी , लढाऊ, वगैरे विभागात भारतीय जाती वाटल्या गेल्या होत्या, त्याकाळी अपराधी जमाती म्हणून नोंदवल्या गेलेल्या पारधी वगैरे जाती आजची तो शिक्का डोक्यावर घेऊन जगतात, तो भाग वेगळा, तर अश्या लिस्टस मध्ये एक भारतातल्या लढाऊ जमातींची लिस्ट सुद्धा तयार झाली होती, त्यात जाट, मराठा, शीख, राजपूत इत्यादी जमातींचा समावेश होता,पुढे त्या रेजिमेंट्स ची नावे जी पडली ती तशीच राहिली कारण भारतीय सेना आपल्या ट्रेडिशन खूप प्रेमाने जतन करते, गम्मत म्हणजे नव्या परंपरा आत्मसात सुद्धा करते, आज आपल्या वापरात असलेल्या दहीने मूड, पीछे मूड वगैरे कमांड पैकी बहुतेक सगळ्या इंडियन नॅशनल आर्मी ने डिझाईन केलेल्या कमांड मधून प्रेरित आहेत.
हा झाला थोडा इतिहास,
आता थोडे सध्याच्या स्थिती बद्दल,
सध्या रेजिमेंट्सची नावे जरी तीच असली तरी त्यांचे composition प्रांतिक नसते, मुळात जीसी (जेन्टलमन कॅडेट्स) जेव्हा आयएमए मधून पास होत असतात तेव्हा त्यांना चॉईस विचारतात पण पेरेंटल क्लेम नसेल तर सहसा रेजिमेंट अलोकेशन हे रँडोम असते, म्हणजे जसवंतसिंह ओबेरॉय नामक शीख अधिकारी मराठा लाईट इनफंट्रीला येतो तर विशाल हनुमंतराव देशमुख नामे पोरगा ग्रेनेडीयर्सला येतो, हे झाले अधिकाऱ्यांचे , रिक्रुट जवानांचे बोलायचे झाले तर नाव मराठा लाईट इनफंट्री आहे म्हणून फक्त मराठी जवान असतील असे नसते , गंमत म्हणजे ह्या "मराठा लाईट इनफंट्री" चे मुख्यालय विवावस्पद अश्या बेळगावी मध्ये आहे. मराठा लाईट इनफंट्रीची भरती जाहिरात निघते तेव्हा त्यात वेगवेगळ्या गावी भरती कॅम्प/मेळावे भरवले जातात, ते फक्त महाराष्ट्रात नसते तर जाहिरात नीट वाचल्यास ती भरती महाराष्ट्र, कर्नाटक, अन केरळचा काही भाग इतक्या ठिकाणच्या वेगवेगळ्या गावात होते, त्याचे कारण म्हणजे प्रत्येक ठिकाणच्या लोकांची फिजिकल बिल्डप वेगळी असते, तुम्ही गोरख्यांना लावत असलेले नियम पंजाबी लोकांस लावू शकत नाही, माझा एक जवळचा मित्र अधिकारी आहे आर्मी मध्ये पंजाब रेजिमेंटला टिपिकल सावळा असा पवित्रन नायर, केरळी, पण तो जितका अस्खलित पंजाबी बोलतो तितकी कोणी इतर बोलताना आजवर पाहिलेले नाही,
शेवटी कसंय हो की रेजिमेंट्सच्या नावात प्रांतिकवाद आपण सामान्य लोक पाहतो, आर्मी मध्ये त्याला cultural exchange चे एक माध्यम म्हणून ट्रीट केले जाते, अन मुळात इंडॉक्टरीनेशन असले कडक असते की तुम्ही कोणीही असा एकदा रेजिमेंट धरली की त्या रेजिमेंटची आन बान शान हे तुमचे सर्वस्व असते, ह्या निष्ठा इतक्या पक्क्या असतात की 'मेजर. परमानंद सदाशिव कुलकर्णी' हा इसम आपली 85 सेमी छाती 90 सेमी पर्यंत फुगवून म्हणतो की "मी एक प्राऊडेस्ट महार आहे, माझ्या रेजिमेंट सारखी रेजिमेंट नाही अन सिक्कीम बॉर्डरची रखवाली फक्त आम्ही काटक महारच करू शकतो" , "वैभव सुखीप्रसाद तिवारी" नामक एखादा कॅप्टन आपल्या सातारी जवानाला पोरगे झाल्याचे ऐकून अस्सल सातारी टोन मध्ये "रम पाज समद्यास्नी अन घरला बी ने थोडी भाड्या" असे सांगतो , तिथे फक्त अन फक्त रेजिमेंटच असते, बुंदेलखंडी मुसलमान ग्रेनेडियर्स मध्ये भरपूर असतात पण अतिशय मानाने ते ग्रेनेडियर्सचा युद्धघोष म्हणजेच "राजा रामचंद्र की जय" करतात,
तेव्हा, रेजिमेंटच्या नावात प्रांत वगैरे आपण लोक शोधतो ते लोक फक्त ते नाव प्रचंड मोठे करायला सतत धडपडत असतात, त्यात मद्रासी, मराठी, भैय्या, पंजाबी असे नसते, हेच भारतीय थलसेनेचे सर्वोत्तम सौंदर्य आहे असे मला वाटते.
काही राहिले असल्यास किंवा चुकले असल्यास कर्नल चितळे सर ते नीट दुरुस्त करतील तर इट वूड बी एन ऑनर
- Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा
Sun, 08/21/2016 - 11:08
नवीन
आणि मी कोणी सर वगैरे नाही हो....उगाच लाजवू नका !
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Sun, 08/21/2016 - 11:37
नवीन
बेस्टच सांगितलस समजावून बापू.
परफेक्ट.
आर्मीवाल्यांच्या काही सिस्टीम्स असतात, शिस्तीने आणि त्यांच्या काही आडाख्याने परफेक्शन आणलेले असते. त्याबाबतीत माहीती जरुर विचारावी पण असेच का तसेच का असे सिव्लीयन्स च्या परस्पेक्टीव्हने शंका विचारणे मला तरी गैर वाटते.
एनीवे सहज कालचाच किस्सा..
काल ऑफीसला जाताना मराठा लाईटची एस्कॉर्ट जिप्सी गावातून पास होत होती. मागे ट्रुप असणार पण नवीन झालेले बायपास, गावातील अडचणीचे रस्ते टाळून, सगळे ट्राफिकचे नियम पाळून, इतक्या सफाईने अन वेगाने ती ड्रायव्हरने गावाबाहेर काढली की गावातल्या ड्रायव्हरला पण तशी जमणार नाही. एसटीचे ड्रायव्हर सुध्दा गंडतात. जवळपास ७ किमी मी बरोबर होतो. तो ड्रायव्हर तर कधीतरीच हा रोड वापरत असणार पण कुठल्यातरी परफेक्ट सिस्टीमने ते जात असणार. त्याशिवाय इतकी सफाई नाहीच पॉसिबल. माझ्यासारख्या गंडक्या मॅपिंगवाल्याला हा चमत्कारच वाटतो.
- Log in or register to post comments
प
पद्मावति
Sun, 08/21/2016 - 11:37
नवीन
सुंदर प्रतिसाद सोन्याबापू. वरील धाग्यातला प्रश्न मलाही पडला होता. त्यामुळे तुमच्या उत्तराची अपेक्षा आणि उत्सुकता होतीच. अतिशय मुद्देसुद माहिती. धन्यवाद.
आता मी पण जरा वाहत्या गंगामाईमधे हात धुवून घेऊ का? :)
मलाही एक प्रश्न पडतो. मी असे ऐकलंय की सेना अधिकारांच्या जॉब इंटरव्यू मधे उत्तम इंग्रजी येणं आवश्यक असतं. हे खरं आहे का? असेल तर असे का? म्हणजे अधिकारी लोक जेव्हा हाताखालच्या जवानांशी संवाद साधतात तेव्हा हिंदी भाषे मधेच बोलत असतील नं मग इंग्रजीचा आग्रह कशासाठी?
डिफेन्स बॅकग्राउंड च्या लोकांशी कधी माझा थेट संबंध कधी आला नाही त्यामुळे माहिती सगळी ऐकीव पण खूप कुतूहल आहे.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Sun, 08/21/2016 - 17:17
नवीन
सेनेत भरती होताना इंग्रजी उत्तम लागतेच किंबहुना सर्विस सेलेकशन बोर्डचा एक महत्वाचा भाग इंग्लिश भाषेतच असतो, आता ह्याची कारणे काय?
१. अधिकारी हा फक्त आपल्या कनिष्ठ सैनिकांशीच बोलत नसतो, तर त्याला इतरही ठिकाणी "लायझनिंग" करावे लागते, ह्या लायझनिंग मध्ये लोकल ऑटोमोबाईल डीलरशिप सोबत चर्चा करून त्यांना कॅन्टीन योजनेत सामील करवून बेस वरील लोकांना स्वस्त वाहने, किराणा इत्यादी उपलब्ध करवून देणे ते मिलिटरी ऍटेशे म्हणून भारताच्या एखाद्या तिसऱ्या देशातील वकीलातीत पोस्टिंग झाल्यास त्या देशाच्या मिलिटरी प्रशासनासोबत संबंध वृद्धिंगत करणे इत्यादी कामे सुद्धा करावी लागतात, ह्या कामात सफाईदार फर्डी इंग्लिश अतिशय जास्त कामी येते, त्याशिवाय मागच्या एक दोन दशकांपासून एक नवे ट्रेंड सुरु आहे ते म्हणजे "जॉईंट मिलिटरी एक्सरसायझेस" ह्या कवायतींमध्ये मध्यलेव्हलचे अधिकारी (मेजर, लेफ्टनंट कर्नल) हे अतिशय महत्वाचे असतात, त्यांचे काम इंग्लिश बोलणारी परदेशी सेना अन आपले हिंदी/पंजाबी/मराठी बोलणारे जवान ह्यांच्यात समन्वय साधणे सुद्धा होय, अश्या प्रसंगी इंग्रजी भाषेची उत्तम जाण असणे खूप गरजेचे आहे.कल्पना करा अलास्का मध्ये एक ऑपेशन युद्धाभ्यास होते आहे भारतातून गोरखा रेजिमेंट गेली आहे, अमेरिकन डेल्टा फोर्स सोबत अभ्यास सुरु आहे, दिवासभरातली कामे क्लास झाल्यावर स्ट्रॅटेजी डिस्कशन सुरु आहे अश्यावेळी उत्तम इंग्रजी येत असणारच अधिकारी उत्तम दुभाष्याचे काम करून अमेरिकन टीम चा अनुभव अन त्यांच्या टिप्स आपल्या जवानांपर्यंत पोचवू शकतो.
- Log in or register to post comments
ह
हुप्प्या
Mon, 08/22/2016 - 17:43
नवीन
कधीतरी अमेरिकन लोकांशी संबंध येईल म्हणून फर्डे इंग्लिश यावे हे पटत नाही. दुभाषे अशाकरताच असतात ना? चिनी सैनिक अधिकारी असा विचार करतील का? नाही. ते उत्तम दुभाषा बरोबर घेऊन अमेरिकन लोकांशी संवाद साधतील.
पण आपण इंग्रजीबद्दल आपल्याला इंग्रजांच्या कृपेने एक अहंगंड आहे. इंग्रजी सफाईदार बोलेल तो उच्चभ्रू, सुसंस्कृत वगैरे. सैन्यदल तर ब्रिटिश रितीरिवाज, परंपरा यांचा प्रचंड अभिमान बाळगून आहे हे वेळोवेळी दिसतेच. त्यामुळे त्यांनी इंग्रजीला डोक्यावर चढवली तर आश्चर्य वाटायला नको.
उद्या जर चीनशी संबंध सुधारले आणि त्यांच्याशी जॉइंट एक्सरसाईज करायची वेळ आली तर सैन्य चीनी भाषा अभ्यासू लागेल का? आजिबात नाही. तिथे दुभाषाच वापरणार. रशियन सैन्याशी असे सहकार्य करायचे झाले तर काय? अरबी सैन्य? इराणी सैन्य? सगळे काही इंग्रजीला शिरसावंंद्य मानत नाहीत.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Mon, 08/22/2016 - 18:04
नवीन
उत्तर ते ही तार्किक उपलब्ध आहे, पण नकोच, तुम्ही एकंदरीत आर्मी, त्यांच्या परंपरा, त्यांची भाषा वगैरे बद्दल टोकाची मते बनवून घेतली आहेत, अन कदाचित तीच बरोबर आहेत असे स्वतःला समजावून सुद्धा टाकले आहेत (स्वतःच!) त्यामुळे तुम्हाला मी दिलेले उत्तर पटणे किंवा त्यातून तिसरेच फाटे न फुटणे हे अशक्य दिसते, तस्मात आमचा पास :)
बाकी एकंदरीत शैली अन शब्दरचना विलक्षण ओळखीची वाटली एकदमच! असो!
- Log in or register to post comments
आ
आदिजोशी
Tue, 08/23/2016 - 09:21
नवीन
कधीतरी अमेरिकन लोकांशी संबंध येईल म्हणून फर्डे इंग्लिश यावे हे पटत नाही. दुभाषे अशाकरताच असतात ना?
कधी तरी युद्ध होईल म्हणून कायम युद्धसज्ज रहावे हे पटत नाही. हव्या तेव्हा बाजारातून बंदूका घेता येतील की विकत.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 08/23/2016 - 09:53
नवीन
या प्रश्नाच्या दोन बाजू आहेत
एक म्हणजे आपले सर्व कायदे, पत्रव्यवहार, कार्यालयीन कामकाज हे इंग्रजीत चालते. सर्व राज्यांना मान्य होईल अशी दुसरी भाषा अधिकृतपणे जरी हिंदी असली तरीही ती बऱ्याच दक्षिणेकडील राज्यांना( राजकारणासाठी) मान्य नाही.
शिवाय शस्त्रास्त्रे किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणे इ बाहेरून येणाऱ्या युद्ध साहित्याची तांत्रिक माहिती हि पण इंग्रजीतच असते. यामुळे इंग्रजीला पर्याय नाही हि वस्तुस्थिती आहे.
सैन्यातील अधिकाऱ्याला जर एखादी विदेशी भाषा येत असेल तर तो एक फार महत्त्वाचा गुण समजला जातो आणि त्यासाठी त्याला ए सी आर मध्ये जास्त गुण दिले जातात. याचे कारण तुम्ही जेंव्हा एखादा हेर शत्रूचा सैनिक पकडता तेंव्हां त्याच्याशी संभाषण करणे आणि माहिती काढून घेणे. किंवा त्यांच्यातील संभाषण ऐकणे या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी दुभाषांमार्फत करणे कठीण असते.
काश्मीर मध्ये अफगाण अतिरेकी ( तालिबानचे) पकडले तेंव्हा त्यांना पुशतो सोडून दुसरी भाषा येत नव्हती. अशा वेळेस पुश्तो येणार लष्करी अधिकारी अतिशय कामाचा असतो. हि उणीव अमेरिका जेंव्हा अफगाणिस्तानात शिरली तेंव्हा त्यांना फार मोठ्या प्रमाणावर जाणवली. अरबी भाषा बोलणारे लष्करी अधिकारी हे मध्यपूर्वेत UAE, इराक, इराण सारख्या देशात फार कामास येतात.
हीच गोष्ट मँडरिन भाषे बद्दल आहे. चिनी सैनिक काय बिनतारीयंत्रावर काय बोलतात हे अशी भाषा येणाऱ्या अधिकाऱ्याला सहज समजू शकते.चीन बरोबर ध्वज बैठक होते अशावेळेस आपले मँडरिन येणारे अधिकारी तेथे आवर्जून उपस्थित असतात पण आपल्याला मँडरिन येते हे न दाखवता.
राहिली गोष्ट इंग्रजी संस्कृतीची. त्यात नंतरच्या काळात बरेच बदल झाले असून बरेच अर्ध आंग्ल अधिकारी जाऊन तेथे स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेले अधिकारी उच्च पदावर आल्यावर हा बदल झाला आहे. उदा. आता आर्मीच्या सगळ्या पार्टीत लाउंज सूट आवश्यक नाही.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Tue, 08/23/2016 - 10:38
नवीन
खरे पाहता, कुठल्याही जॉईंट exercise मध्ये संभाषण हे इंग्लिश मधेच होते, अमेरिकन आर्मी फक्त उदाहरण म्हणून घेतली होती. असो, काही अजून मुद्दे डॉक्टरांनी अन जोशी साहेबांनी मांडले आहेतच म्हणा
- Log in or register to post comments
ह
हुप्प्या
Wed, 08/24/2016 - 10:11
नवीन
सैनिकांनी युद्धसज्ज असणे अपेक्षित आहे की फर्डी इंग्रजी बोलणे? शस्त्रसज्ज आणि भाषेवरील प्रभुत्त्वात फरक कळत नसेल तर आपली कीव करावी तितकी कमीच!
भारतीय सैन्याचा अनेक वर्षे रशियन सरकारशी आणि सैन्याशी घनिष्ठ सहकार्य होते. त्याकरता तमाम सैनिक फर्डे रशियन बोलत होते का? आजिबात नाही. त्याकरता दुभाषे नेमले जात होते.
शस्त्रांची माहिती येण्याइतके इंग्रजी येणे आणि इंग्रजांच्या तोडीचे इंग्रजी येणे ह्यात फरक आहे. बँकेच्या अधिकार्याला, प्राध्यापकालाही इंग्रजी यावेच लागते. पण त्याचा सैनिकी अधिकार्यांच्या इंग्रजी प्रभुत्त्वाइतका गवगवा केला जात नाही. अशा नागरी सेवेतल्या लोकांना इंग्रजाला लाजवेल अशा प्रकारे इंग्रजी संस्कृतीने थबथबलेले कपडे, जेवण, शिष्टाचार लागत नाहीत. सैनिकांना तसे का करावे लागते? सांस्कृतिक गुलामगिरी ह्याखेरीज अन्य उत्तर मलातरी सापडत नाही.
रशियन, चिनी, इराणी, कोरियन सैनिक इतके इंग्रजी संस्कृतीत मुरावेत असे त्यांचे देश प्रयत्न करतात का? आणि ते केले नाहीत म्हणून त्यांचे सैनिकी बळ कमी समजले जाते का?
- Log in or register to post comments
फ
फेरफटका
Tue, 08/23/2016 - 17:22
नवीन
भारताच्या घटनेप्रमाणे भारताच्या राज्यकारभारासाठी दोन अधिकृत भाषा आहेत - हिंदी आणी ईंग्रजी. बाकी १४ प्रादेषिक भाषांना अधिकृत राज्यभाषा म्हणून मान्यता आहे. त्यामुळे ईंग्रजीचा तिरस्कार करण्यात काहीच अर्थ नाहीये. मुळात कुठल्याच भाषेचा तिरस्कार करण्यात काही अर्थ नाहीये. उगाच ईंग्रजी ला प्रतिवाद म्हणून मँडरीन वगैरे फाटे फोडणं गैरलागू वाटतं.
- Log in or register to post comments
ह
हुप्प्या
Wed, 08/24/2016 - 10:14
नवीन
इंग्रजी भाषा येणे हे आवश्यक असते. केवळ सैनिकांनाच नव्हे तर वकील, बँकर्स, आर्थिक उलाढाल करणारे, शास्त्रज्ञ, वैज्ञानिक, पायलट, बोटीवर काम करणारे सगळ्यांनाच ती यावी लागते. पण कपडे, खाणेपिणे, शिष्टाचार हेही अस्सल इंग्रजी सरंजामशाही काळातले असावेत असे या इतर वर्गातील लोकांना वाटत नाही. ते फक्त सैन्यात. माझा आक्षेप ह्या सांस्कृतिक गुलामगिरीला आहे. भाषेला आजिबात नाही.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 08/26/2016 - 17:50
नवीन
हुप्प्या - साहेब
<
strong>माझा आक्षेप ह्या सांस्कृतिक गुलामगिरीला आहे. भाषेला आजिबात नाही.हे मान्य
पण लष्करात कोणत्याच गोष्टीचा असा "आग्रह" होत नाही. आपण भाषण हिंदीत केले तरीही चालते. मी दारू पिट नाही आणि माझ्या घरात मी कोणालाही दारू पाजली नाही. यामुळे माझ्या कोणत्याही सामाजिक परिस्थितीत फरकी पडला नाही. कित्येक अधिकारी तर सामिषही अजिबात खात नाहीत आणि अशा सर्व अधिकाऱ्यांचे कुठेही अडत नाही.
दुर्दैवाने बहुसंख्य लोकच "मानसिक" गुलामगिरीतून बाहेर आलेले नाहीत त्यामुळे इंग्रजी फाडफाड बोलता आलं आणि हात दारूचा ग्लास धरता आला म्हणजे आपण मॉडर्न झालो हि व्याख्या जशी बाकी नागरी समाजात आहे त्याचेच प्रतिबिंब लष्करात पाहायला मिळते.
- Log in or register to post comments
य
योगेश कोकरे
Wed, 08/24/2016 - 18:39
नवीन
हुप्या आपलं मत पटलं . मध्यन्तरी एका महत्वाच्या यांत्रिकी प्रकल्पामध्ये चिनी आणि जपानी अभियंत्यांशी संबंध आला होता . ते लोक तांत्रिक दृष्ट्या इतके हुशार होते पण एक बोंब होती .त्यातल्या खूप कमी लोकांना इंग्लिश येत होते. बाकीच्यांचे इंग्लिश इतके टुकार होते के विचारू नका . परंतु त्या जपानी कंपनी ने प्रत्येक अभियंत्याला एक दुभाषा दिला होता. परंतु डायरेक्ट संभाषण हे ते लोक तोडक्या इंग्लिश भाषेत करायचे. आणि वर हुप्या ने म्हटल्या प्रमाणे त्यांना इंग्लिश येत नाही याच काही वाटत नव्हता . किंबहुना अभियांत्रिकीचे शिक्षण हे मातृभाषेतून झाल्यामुळे त्यांचे तंत्रज्ञान हे खूप अस्सल दर्जाचे झाले होते. या उलट आपले इंजिनिर्स हे तांत्रिकदृष्ट्या इतके चांगले नाहीत. हल्ली तर आबा , काका , दादा , राव यांची अभियांत्रिकी महाविद्यालये इतकी झालेत ना कि त्यातून कोणत्या दर्जाचे शिक्षण शिकवतात यांच्याबाबतीत शंका आहे . त्यातून बाहेर पडणारे अभियंते हे अभियंता म्हणण्याइतपत शंका येते . बाकी सैन्य मध्ये इंग्लिश वापरणे या बाबतीत मत वेगळे आहे .जर तो त्यांच्या स्टॅंडर्ड procedure चा भाग असेल तर त्याला विरोध नाही. पण फक्त इंग्लिश चा बाऊ करणे पटत नाही . माझं मत तर असा आहे कि अभियंत्या लोकांनी जापानी चिनी भाषा पण शिकावी . पण सध्या जगात तंत्रज्ञानात ते लोकांचा दबदबा आहे. आपल्या इथे खूप क्लिष्ट तंत्रज्ञान वापरायचे असल्यास जापानी किंवा चिनी यांनाच बोलावतात .
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
Fri, 08/26/2016 - 11:42
नवीन
.
- Log in or register to post comments
म
मोदक
Fri, 08/26/2016 - 11:44
नवीन
अभियांत्रिकीचे शिक्षण हे मातृभाषेतून झाल्यामुळे त्यांचे तंत्रज्ञान हे खूप अस्सल दर्जाचे झाले होते.
- Log in or register to post comments
य
योगेश कोकरे
Fri, 08/26/2016 - 12:39
नवीन
चिनी किंवा जपानी अभियंत्याबरोबर काम केले असल्यास लक्षात येईल.
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
Fri, 08/26/2016 - 17:29
नवीन
जर्मन, अमेरिकन अन ब्रिटीश लोकांसोबतच काम केलंय. येवढा फरक नाही वाटला.
तंत्रज्ञान अन मातृभाषा ह्याचा अर्थाअर्थी संबंध वाटत नाही. खाली अमितदादांनी म्हण्टल्याप्रमाणे तंत्रज्ञानाची भाषा किंवा ते बनवण्याचा संबंध गणीत व विज्ञानाशी.
कल्पना सुचुन त्यांना सही सही कार्यान्वत करणे ह्यासाठी जे वातावरण लागते ते महत्वाचे.
- Log in or register to post comments
अ
अमितदादा
Fri, 08/26/2016 - 19:29
नवीन
अगदीच सहमत. ह्यांना काही चिनी/जपानी अभियंते भेटले ज्यांचा दर्जा उच्च होता, ह्यांना वाटलं हि भाषेची कमाल आहे. खरे उत्तर यांनी यांच्या प्रतिसादात लिहले आहे.
त्यांना तुम्ही विचारायला हवं होतं की तुमच्या देशात अशी महाविद्यालये आहेत का हो, जेंव्हा त्यांनी नाही ब्वा असे उत्तर दिले असते तेंव्हा याना समजलं असत कि मातृभाषा विज्ञान समजण्यासाठी काही प्रमाणात मदत जरी करत असली तरी उच्च तंत्रज्ञान निर्मिती साठी इतर अनेक घटक कारणीभूत असतात.
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
Fri, 08/26/2016 - 20:52
नवीन
अभियंते लोक्स रोज्गारक्षम देशात (हा नॅस्कॉमचा आकडा, म्हणजे सॉफ्टवेअर धरले तरी चालेल) असतांना तंत्रज्ञान निर्मीतीची भाषा करणच चुकीच आहे!
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Fri, 08/26/2016 - 21:00
नवीन
कारण बाकीचे 75% पब्लिक इच्छा, कुवत, aptitude नसताना प्रवेश घेतं... मेंढरामधून वाघाची अपेक्षा चुकीची तसेच इंजीनीरिंग शिकण्याचा उद्देश नोकरी मिळवणे आहे, आवड नाही
- Log in or register to post comments
च
चंपाबाई
Sat, 08/27/2016 - 00:17
नवीन
कुवत असणारे लोकही पैशासाठीच डिग्री घेतात ना ?
- Log in or register to post comments
अ
अमितदादा
Fri, 08/26/2016 - 12:06
नवीन
हे काय जास्त पटत नाही, मुळात उच्च विज्ञान आणि क्लिष्ट तंत्रज्ञान यांची भाषच गणित आहे. सगळा खेळ आकड्यांचा, theoram, principle यांचा आहे. हे समजून घ्यायला मातृभाषा हवी अस काही नाही. मातृभाषेचा नक्कीच फायदा होत असेल पण एका ठराविक लेवल नंतर नाही.
मुळात जर्मन, जापनीज, चिनी लोक तंत्रन्यांनात अग्रेसर आहेत याची खूप करणे आहेत. उत्तम शैक्षणिक सोयी, शासन धोरण, उद्योगांचा पाठिंबा, सामाजिक जाणिवा आणि प्रेफेरेन्सस यांचा सुद्धा वाटा आहे.
- Log in or register to post comments
य
योगेश कोकरे
Fri, 08/26/2016 - 12:37
नवीन
ज्यास्त नाही ,,, थोडा पटलं ना ..बस्स
- Log in or register to post comments
फ
फेरफटका
Fri, 08/26/2016 - 16:30
नवीन
योगेश कोकरे, आपल्या प्रतिसादात थोडा विरोधाभास जाणवला, तेव्ह्ढा मांडतोयः
"किंबहुना अभियांत्रिकीचे शिक्षण हे मातृभाषेतून झाल्यामुळे त्यांचे तंत्रज्ञान हे खूप अस्सल दर्जाचे झाले होते."
पण फक्त इंग्लिश चा बाऊ करणे पटत नाही . माझं मत तर असा आहे कि अभियंत्या लोकांनी जापानी चिनी भाषा पण शिकावी . पण सध्या जगात तंत्रज्ञानात ते लोकांचा दबदबा आहे.
ईंग्रजी चा बाऊ नको, पण मँडरीन / जॅपनीझ भाषा शिकावी. (चीनी आणी जपानी अशा भाषा नाहीयेत. मँडरीन आणी जॅपनीझ आहेत).
- Log in or register to post comments
य
योगेश कोकरे
Fri, 08/26/2016 - 17:29
नवीन
माहितीबद्दल आभारी आहे . भारतात सध्या मोठे अभियांत्रिकी प्रकल्प ते लोक करत असल्यामुळे ती भाषा येत असेल तर चांगले आहेच कि . आपण इंग्लिश भाषेच्या बाबतीत खूप बाऊ करतोय म्हणून पटत नाही म्हटलंय .
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 08/26/2016 - 17:44
नवीन
हे सर्व मान्य केले तरी भारतीय भाषेत आजतरी तांत्रिक ज्ञान उपलब्ध नाही हि वस्तुस्थिती आहे आणि आपण मँडरिन किंवा जपानी भाषा शिकून त्यात तंत्रज्ञान शिकावे अशी भारतात तरी स्थिती नाही. तेंव्हा सद्य स्थितीत इंग्रजी शिवाय पर्याय नाही.
इंग्रज शिष्टाचाराचा दुराग्रह नसावा हे मान्य पण इंग्रजी भाषेचा द्वेष नको.
- Log in or register to post comments
फ
फेरफटका
Tue, 08/23/2016 - 17:15
नवीन
धन्यवाद बापू. हाच आणी असाच प्रतिसाद अपेक्षित होता तुमच्याकडून. एक नंबर!
- Log in or register to post comments
प
पद्मावति
Sun, 08/21/2016 - 17:31
नवीन
सैन्यातील इंग्रजी सक्तीच्या मागे असलेला हा इतका तर्कशुद्ध आणि सखोल विचार तुमच्यामुळे मला प्रथमच समजतोय.
सुंदर आणि मुद्देसुद उत्तराबदद्ल धन्यवाद बापु.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Sun, 08/21/2016 - 17:50
नवीन
@सोन्याबापू :
तुमच्या चपखल व मुद्देसूद प्रतिसादांमुळे भारतिय सैन्यासंबंधीचे सर्वसामान्यांच्या मनातले बरेच गैरसमज दूर होतील.
"काहीवेळेस धाग्यापेक्षा प्रतिसाद उजवे असतात" हे तत्व या ठिकाणी परत एकदा अधोरेखित झाले आहे ! :)
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Sun, 08/21/2016 - 17:53
नवीन
आभार डॉक्टर सर,
जेव्हा अकादमी लिहीले तेव्हाच मनात "नो युअर फोर्सस" नामक एक लेखमाला लिहायचे मनात होते, आजवर मुहूर्त लागलाच नाही, बघू चान्स मिळेल तसे सुलभ भाषेत युनिफॉर्म सर्विसेसची ओळख करून देणारे काही लिहिता आले तर बघू
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Sun, 08/21/2016 - 18:13
नवीन
जरूर लिहा.
भारतात पारंपारिकरित्या सशत्र सेना मुलकी जनतेपासून जराश्या वेगळ्याच राहतात. एखाद दुसरे पब्लिक रिलेशन फंक्शन होत असले तरी ते बहुतेक शस्त्र-अस्त्रांची तोंडओलख याच प्रकाराचेच असते. भारतात काही काळाचे सक्तीचे (किंवा ऐच्छिक) सैनिक शिक्षण नसल्याने सर्वसामान्य नागरिकाची सैन्याबद्दलची माहिती नगण्य असते.
सैनिक व त्यांच्या कामाबद्दल बद्दल (युद्ध असले की लढतात आणि इतर वेळी बॅरॅक्समध्ये राहतात यापलिकडे) फारशी माहिती नसल्याने सर्वसामान्य लोकांच्या मनांत बरेच गैरसमज असतात. मग त्यांच्या भावना एकतर "सीमेवर लढणारे आपले संरक्षक" इतका सोपा अर्थ किंवा "शांततेच्या काळात उगाच केला जाणारा खर्च" असा अवास्तव विचार; अशी वैचारिक टोके असतात. या टोकांमध्ये असणारी अनेक तथ्ये सतत अंधारातच राहतात.
त्यामुळे, सशस्त्र सेनांबद्दल माहिती काही/शक्य प्रमाणात तरी मुलकी नागरिकांत प्रसारीत करणे हे दोन्ही बाजूंच्या फायद्याचे आणि दोघांतील सौदार्ह्य वाढवायला मदतीचे होईल असे वाटते.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sun, 08/21/2016 - 18:16
नवीन
+ १
बापू आणि चलत मुसाफिर, ह्यांचे प्रतिसाद एकदम मस्त...
(स्वगत : आता अल्सेशियनचा पण धागा काढायला पाहिजे.)
- Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा
Mon, 08/22/2016 - 07:22
नवीन
प्रतिसाद नेहमी उजवेच असणार कारण ते अधिकारी व्यक्तीनी दिलेले आहेत....माझा आपला एक अडाणी प्रश्न होता....!
- Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर
Sun, 08/21/2016 - 18:01
नवीन
श्री सोन्याबापू यांच्या प्रतिसादात काही दुरुस्ती सुचवू इच्छितो.
भूदल सैन्यातील राजपत्रित अधिकारी हे अखिल भारतीय स्तरावर स्पर्धा परीक्षांमधून गुणवत्ता तत्त्वावर निवडले जातात. त्यांचे प्रशिक्षणही एकत्र होते. त्यानंतर त्यांना सैन्याच्या विविध विभागांत, जाति-धर्म-प्रांत-भाषा हे विचारात न घेता नियुक्त केले जाते. अर्थात सोन्याबापू यांनी म्हटल्याप्रमाणे मुलगा हा वडिलांची पलटण हक्काने मागून घेऊ शकतो.
जवांनांची भरती हा संपूर्ण वेगळा प्रकार आहे आणि माझ्यामते पंखासाहेबांचा लेख त्या संदर्भातला आहे.
इंग्रजांनी भारतीय (यात पाकिस्तानीही आले) समाजाचे लढाऊ आणि गैरलढाऊ जाती असे अधिकृत वर्गीकरण केले होते. त्यानुसार जाट, शीख, मराठा, राजपूत, डोगरा, बलोच, मुस्लिम, महार, गोरखा वगैरे "लढाऊ" जातींच्या नावावर रेजिमेंट निर्माण केल्या. याला तत्कालीन व्यापक राजकीय संदर्भही आहेत पण माझे ज्ञान तोकडे पडत असल्यामुळे लिहू शकत नाही.
सगळी इंग्रजी सेना अशीच उभी राहिली असे काही नाही. काही रेजिमेंट या खालसा केलेल्या राज्यांचे सैनिक इंग्रजी सेनेला जोडून बनवल्या गेल्या. (मला वाटतं, पंजाब रेजिमेंट, शिंदे Horse, इत्यादि. चू.भू.द्या.घ्या). 1857 मध्ये बंडखोर शिपायांनी वेढलेली दिल्ली पुन्हा काबीज करून घेण्यासाठी 'Hodson's Horse' ही रेजिमेंट अंबाल्याला उभी करून दिल्लीवर उत्तरेकडून हल्ला चढवला गेला. William Hodson याने पंजाबमधील शीख तरुणांची भरती करून ही रेजिमेंट उभी केली. ही रेजिमेंट अजून भारतीय सैन्यात आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात जातिनिहाय भरतीची ही पद्धत तशीच ठेवली गेली. (योग्य कीअयोग्य हा वेगळा मुद्दा). पण सैन्याला प्रातिनिधीक स्वरूप यावे यासाठी काही बदल करण्यात आले. ग्रेनेडिअर, गार्डस, महार अशा काही रेजिमेंट अखिल भारतीय करण्यात आल्या. राजपुताना रायफल्ससारख्या काही रेजिमेंटसाठी जाति-गुणोत्तर ठरवून दिले गेले. जम्मू-काश्मीर रायफल्स, नागा, बिहार अशा नव्या रेजिमेंटचीही निर्मिती केली गेली. सर्वात मोठा बदल म्हणजे सैन्यभरतीच्या जागांचे वाटप हे आता जनगणनेच्या आधारे करण्यात येते. जनगणनेदरम्यान संकलित केलेल्या माहितीमधून R.M.P. म्हणजे Recruitable Male Population असा एक घटक अगदी जिल्हानिहाय मोजला जाऊन त्यानुसार रंगरूट भरतीच्या जागा वाटल्या जातात.
भारतात झपाट्याने झालेल्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक बदलांचा प्रभावही या प्रक्रियेवर पडला आहे. मराठा रेजिमेंटच्या जागा महाराष्ट्रातून पूर्णपणे भरल्या जात नसल्यामुळे त्यांना आपल्या जाती-भाषेच्या अटी शिथिल करणे भाग पडले. आता या रेजिमेंटमध्ये दक्षिणेतील जवानही दिसून येतात. दिल्ली व आसपासच्या भागात जमिनींचे भाव गेल्या दोन दशकांत गगनाला भिडल्यामुळे येथील जाट-राजपूत समाजातील युवकांचा सैन्याकडे ओढा कमी झाला. परिणामी, त्या रेजिमेंट आता पार बिहार ते उत्तराखंडपर्यंत सर्व भागातील जवान स्वीकारतात.
सुवर्ण मंदिरावरील लष्करी कारवाईनंतर काही शीख जवानांनी सशस्त्र उठाव केला होता. त्यानंतर एखाद्या रेजिमेंटमध्ये त्याच समाजाचे किती अधिकारी असावेत यावर अतिशय सक्त नियंत्रण ठेवले जाते.
मुलायम सिंह यादव हे संरक्षण मंत्री असताना त्यांनी, यादव रेजिमेंट बनवा असा हट्ट धरला होता. तत्कालीन सेनापतींनी तो हाणून पाडला.
वरील सर्व मुद्दे हे पायदळ सेनेबद्दल होते. त्यापलिकडे सैन्यात अनेक विभाग आहेत. तोफखाना, रणगाडा, यंत्रयुक्त पायदळ, अभियांत्रिकी या "लढाऊ" विभागांत काही रेजिमेंट जातिनिहाय तर काही अखिल भारतीय आहेत.
दळणवळण, रसदपुरवठा, विद्युत अभियांत्रिकी, कारकून, खानसामे वगैरे तांत्रिक विभागातील भरती मात्र पूर्णपणे अखिल भारतीय असते.
हवाईदल व नौदल यांची संपूर्ण भरती ही अखिल भारतीय असते.
वर दिले आहे त्याशिवाय इतर कोणत्याही राखीव जागा, माझ्या माहितीनुसार सैन्यात नसतात.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Sun, 08/21/2016 - 18:09
नवीन
अतिशय सुंदर!! उत्तम सांगितलेत, माझ्या जुजबी प्रतिसदापेक्षा हाच प्रतिसाद रेफर करावा अशी सगळ्यांना विनंती.
- Log in or register to post comments
अ
अमितदादा
Sun, 08/21/2016 - 18:17
नवीन
+१
- Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा
Sun, 08/21/2016 - 18:28
नवीन
मला अपेक्षित उत्तर मिळालं....पुनश्च आभार....!
- Log in or register to post comments
उ
उडन खटोला
Sun, 08/21/2016 - 18:34
नवीन
बेष्ट धागा, सुपरबेष्ट प्रतिसाद. वाचतोय.
बाप्पुअण्णासाब, know your forces बद्दल नक्की च लिहा
- Log in or register to post comments
ध
धनावडे
Sun, 08/21/2016 - 18:58
नवीन
सोन्याबापू जमलच तर गोरखा बटालियन बद्दल लिहा
- Log in or register to post comments
भ
भटक्य आणि उनाड
Sun, 08/21/2016 - 20:06
नवीन
बापू आणि चलत मुसाफिर, ह्यांचे प्रतिसाद एकदम मस्त..
अतिशय मुद्देसुद माहिती. धन्यवाद...
- Log in or register to post comments
म
मोदक
Sun, 08/21/2016 - 20:54
नवीन
+११११
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- 4
- ›
- »