Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आपण एवढे उद्धट का?

र
रविकिरण फडके
Fri, 08/26/2016 - 18:56
🗣 121 प्रतिसाद
['या सार्वजनिक सणांचे करायचे तरी काय' ह्यावर एक प्रतिक्रिया दिल्यानंतर आणि इतरांच्या वाचल्यानंतर काही विचार मनात आले तेव्हा लक्षात आले की हा थोडा general विषय होतो आहे. म्हणून हे नवीन लिखाण.] माझ्या स्वतःच्या आणि इतर जवळचे मित्र व आप्तेष्ट ह्यांच्या परदेशातील विविध अनुभवावरून असे दिसते की आपण भारतीय लोक एकूणच सामाजिक व्यवहारात दुसऱ्यांशी उर्मटपणे किंवा उद्धटपणे वागतो, आपल्यात बऱ्याचदा किमान सौजन्याचासुद्धा अभाव असतो. हे असे का? असे काय झाले की ज्यामुळे आपण भारतीय असे 'वैशिष्ठ्यपूर्ण' बनलो? मी कुणी अभ्यासू, सामाजिक शास्त्रज्ञ, वगैरे नाही. मला पडलेल्या प्रश्नाचा मागोवा scientifically कसा घ्यावा मला माहीत नाही. म्हणून हे पोस्ट. माझ्या मते दोन कारणे संभवतात; एक, आपल्या समाजात समता हे तत्व कधीच नव्हते. त्यास जातीभेद हे बहुधा प्रमुख कारण असावे. जातीच्या उतरंडीत कुणीतरी माझ्या वर असतो, कुणीतरी खाली. बरोबर कुणी नाही. त्यामुळे मी लांगुलचालन करतो किंवा उर्मटपणाने वागतो. दुसरा माझ्यासमान आहे, त्याला माझ्याइतकेच हक्क आहेत, हे आमच्या रक्तातच शिरलेले नाही. ह्याची उदाहरणे द्यायची गरज नाही इतक्या संख्येने ती आपल्याला दिसतात. शिकली सवरलेली माणसे असंस्कृतपणे वागतात, आणि भारतात असेच वागायला हवे असे ते मानतात. दुकानात चार कस्टमर्स पुढे असतानाही मध्ये घुसून आपणास हव्या असलेल्या गोष्टींची मोठ्या आवाजात ऑर्डर देणे, रांगेत घुसणे, कुणी आपल्यापुढे (आपल्या दृष्टीने) जरा हळू गाडी चालवत असेल तर त्याला 'तुम्हारे बाप का रास्ता है क्या' विचारणे, आजूबाजूला कुणी आहे नाही हे न बघता थुंकणे, इ. गोष्टी सामान्य आहेत. एकदा You Tube वर कुणीतरी रफी साहेबांची त्याला आवडणारी गाणी टाकली आणि त्यांची थोडीशी माहिती दिली होती. त्यात रफीच्या जन्मतारखेत एक चूक झाली; 1924 चे 1942 झाले. तर एकाने comment काय टाकावी? 'अबे, तू क्या दो पेग पिया था क्या?' आपण इतके असहिष्णू व असभ्यपणे वागतो. आपण ईशान्य भारतातील लोकांना त्यांच्या दिसण्यावरून हिणवतो. कारण उच्च नीचता भाव आपल्यात भिनलेला आहे. शहरीकरण: लहान गावात ह्या उद्धटपणाला आपसूकच मर्यादा पडतात. सगळेजण एकमेकास ओळखतात. बँकेत काउंटरवरील माणूस मला संध्याकाळी बाजारात नाहीतर सिनेमागृहात भेटतो. आम्ही नावाने एकमेकाला ओळखतो. त्यामुळे उद्धटपणाला किंवा अरेरावीला एक स्वाभाविक मर्यादा पडते. शहरात तसे होत नाही. मी कुणावरही जोरजोरात ओरडू शकतो, भांडण करू शकतो. शहरी जीवनात ताणतणावही खूप अधिक असतात ज्यांचा परिणाम क्षुल्लक गोष्टींवरून वाद आणि भांडणात होतो. ज्यांनी मुंबईतील लोकल गाडीतून बऱ्यापैकी प्रवास केला आहे त्यांना हा मुद्दा लगेच पटेल. आणि हे शहरीकरण वाढतच जाणार आहे. आणि त्याबरोबर आपला उद्धटपणाही. कारण हे शहरीकरण कसे झाले पाहिजे, माणसे इतक्या दाटीवाटीने राहत असताना कोणते नियम पाळले गेले पाहिजेत, ती सर्व घडी कशी घालायला हवी, ह्याबद्दल कोणताही विचार कुठल्याही पातळीवर झाला असण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. आता तो होणेही दुरापास्त आहे. सिस्टीम जेवढी जास्त बिघडते तेवढी ती रुळावर आणणे कठीण होऊन बसते. मी माझ्या मुंबईतील, आणि काही प्रमाणात अन्य शहरातील, अनुभवावरून हे विधान करतोय. आणि शिवाय, सुधारणेची काही गरज आहे हे मान्य करणे ही पहिली पायरी असते. तीच जर कुणालाही चढायची नसेल तर पुढे बोलणे बंद. काही उदाहरणे: 1) रस्त्यावरील वाहतूक: ह्याची एवढी दुर्दशा झाली आहे की काही बोलणे व्यर्थ ठरावे. वाहतूक सुरळीत असण्यासाठी जे जे म्हणून घटक असतात त्यातील एकही धड नाही. वाहतुकीचे नियम, ड्रायव्हर्स चे प्रशिक्षण, सिग्नल सिस्टीम, रोड मार्किंग्स...कुठलाही एलिमेंट घ्या. आपली सरधोपट पद्धत म्हणजे 'प्रॉब्लेम आहे? मग अधिक पोलीस तैनात करा' ही आहे. एक साधा प्रश्न विचारा की कोणत्याही सिग्नलला चार पाच ट्रॅफिक पोलीस कशासाठी हवेत? तेच पोलीस अन्य जास्त महत्त्वाच्या कामाला लावता येणार नाहीत? (आज परिस्थिती अशी आहे की पोलीस नसतील तर कुणीही कुठलाही सिग्नल पाळणार नाही! पण ते कारण नव्हे, परिणाम आहे.) पण हा प्रश्न आपले ट्रॅफिक पोलीस कमिशनर विचारीत नाहीत. ते आपली तीन वर्ष ड्युटी करतात आणि बदली झाली की जातात दुसरीकडे. ह्यातून वाढीला काय लागते तर उद्धटपणा, अरेरावीची वृत्ती, नियम मोडण्याची प्रवृत्ती, प्रसंगी हिंसाचार. 2) जवळपास 1965-70 पर्यंत मुंबईत बस स्टॉपवर लोक रांग लावून बसमद्धे चढायचे. आता आम्ही बस आली की तिच्यावर हल्लाच करतो. हे थांबवणे सहज शक्य होते. बेस्टने फक्त एवढेच करायचे होते की एक जाहिरात द्यायची; रांग नसेल तेथे बस थांबणार नाही. आणि नाही थांबवायची बस जर स्टॉपवर रांग नाही दिसली तर. पण हे तेव्हा नाही केले आणि आता करणे अशक्य आहे. 3) पाश्चिमात्य देशांत, निदान मी हे इंग्लंड मध्ये तरी पहिले आहे, तेही आज नव्हे तर 30 वर्षांपूर्वी, अगदी पोस्ट ऑफिस सारख्या ठिकाणीसुद्धा common queue multiple service windows ही पद्धत असते. आपल्याकडे हे अजूनही अपवादानेच दिसते. का? आपल्याला करता येणार नाही? मुंबईतील रेल्वे स्थानकावर तिकिटाच्या रांगेत उभे असताना अचानक एक खिडकी बंद झाल्यानंतर (उदा, भोजनासाठी) लोक ज्या रीतीने दुसऱ्या खिडकीवर धावतात ते ज्यांनी अनुभवले आहे त्यांना त्यातला त्रास कळेल. पण रेल्वेला त्याचे काय होय? ही बेपर्वा वृत्ती - वि डोन्ट केअर - मग सर्व लोकांत उतरते. 4) सर्वात महत्त्वाचे, शहरात आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही अशा रीतीने वर्तणूक ठेवण्याबद्दलचे नियम घालून देणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे ह्याकडे संपूर्ण दुर्लक्ष झाले. परिणामी, शहरे म्हणजे फक्त अवाढव्य वाढलेली खेडी असेच त्याचे रूप झाले. राहणे शहरात, मानसिकता मात्र खेडूतांची ह्या विरोधाचा जो काही परिणाम झाला तो आपणा सर्वांना दिसतोच आहे. शहरे कशी असावीत ह्याच्या सुस्पष्ट कल्पना जर राज्यकर्त्यांना असत्या आणि त्या त्यांनी अंमलात आणल्या असत्या तर ह्या भारतीय मानसिकतेला, जी मुळात असमानतेवर आधारलेली आहे, बऱ्याच प्रमाणात मुरड पडली असती. त्यायोगे सर्व समाज हळूहळू सुधारला असता. ती संधी आपण गमावली. सत्तर वर्षांपूर्वीच्या तुलनेत आता एकूण लोकसंख्या आणि शहरी लोकसंख्येचे प्रमाण, ही दोन्ही प्रचंड वाढली आहेत. त्याच्या जोडीला आणखी एक गोष्ट वाढली आहे ती म्हणजे, राजकीय पक्षांचा / नेत्यांचा बेजबाबदारपणा. हे सर्व फार घातक रसायन (potent combination) आहे ज्याचा केव्हाही स्फोट होऊ शकतो. नव्हे, तसे ते होतातच आहेत, फक्त लहान प्रमाणात. उदा. भारतात दर वर्षी एक दीड लाख लोक रस्ते अपघातात मरतात. लोकसंख्येचा विचार केला तरी हे प्रमाण फार जास्त आहे. इतर देशात ह्याच्यावर अतिशय गंभीरपणे विचार झाला असता. आपल्याकडे '80% अपघात हे मानवी चुकांमुळे होतात' असे निष्कर्ष काढले की काम भागते. मुद्दा असा आहे की कमीतकमी संघर्षाशिवाय माणसे आपापले व्यवहार करतील अशा सिस्टिम्स आखून दिल्या नाहीत व त्यांची कठोरपणे अंमलबजावणी केली नाही तर हम करेसो कायदा ही वृत्ती, अरेरावी, उद्धटपणा, मग्रुरी, ह्या गोष्टी वाढतच जाणार. नाहीतर, आपली असमानतेवर आधारलेली भारतीय मनोवृत्ती आणि त्यात अस्ताव्यस्त शहरीकरणाची फोडणी, म्हणजे 'आधीच मर्कट तशातही मद्य प्याला' अशी गट व्हायची. नव्हे, झालीच आहे. कालचा दही हंडीचा शिमगा दुसरे काय दर्शवितो? असो. हे माझे विचार झाले. तुम्हाला काय वाटते हे जाणून घ्यायला आवडेल.

प्रतिक्रिया द्या
21382 वाचन

💬 प्रतिसाद (121)
म
मुक्त विहारि Fri, 08/26/2016 - 19:41 नवीन
एका वाक्यात सांगायचे तर..... आपल्याकडे, स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार. अशी भावना निर्माण झालेली आहे.असे माझे मत... आणि.....हे सत्य ओळखायची आणि पचवायची ताकद, बर्‍याच लोकांकडे नाही. गेल्या १०००-१२०० वर्षांची गुलामगिरी अद्यापही सुरुच आहे. पुर्वी सरंजामशाही होती आणि आता आमदारकी आणि खासदारकी. असो, तुम्ही व्यक्त केलेल्या मुद्यांशी मी १००% सहमत आहे.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Fri, 08/26/2016 - 19:50 नवीन
तुमचे मुद्दे एकदम बरोबर आहेत. आणी दिवसेंदिवस हा उन्माद/उर्मटपणा कमी होण्याऐवजी वाढत चाललेला आहे. पण ह्याला उपाय काहीच नाही. कारण दुसऱ्या कुणी लोकांना सुधारण्यापेक्षा लोक स्वतः स्वयंशिस्त झाले तरच हे शक्य आहे. आणी आपण चुकीचे वागत आहोत असे कुणालाच वाटत नाही.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 08/26/2016 - 19:55 नवीन
+ १ आणि असे सांगणार्‍या माणसाला त्रासच जास्त होतो. खरा तो एकच, "गाडगे बाबा", असे माझे मत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
व
विशुमित Sat, 08/27/2016 - 07:13 नवीन
माझ्या घरातील मुले (माझी आणि माझ्या भावाची) आमच्या बरोबर असतील तर आम्हा घरातील कोणालाच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून देत नाहीत, अगदी चॉकलेटचे व्यार्पर सुद्धा. सिग्नल तोडून देत नाहीत, फोनवर मोठ्याने बोलून देत नाहीत. देव दर्शनाला गेलो तर मध्ये रांगेत घुसून देत नाहीत. अगदी अधिकारवाणीने आणि निरागसतेने म्हणतात आमच्या टीचर ने सांगितलं आहे. कवतुकाने आम्ही सर्व जण त्यांचे आदेश ऐकतो. आपल्याला नाही सुधारता/ सुधरावता आलं तरी ह्या नव्या पिढी कडून नक्कीच अपेक्षा ठेवू शकतो. कारण त्यांना या गोष्टीचे मह्त्व खूप लहान वयातच समजलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
ट
ट्रेड मार्क Fri, 08/26/2016 - 19:57 नवीन
नुसते उद्धट नाही तर माजुरडे पण. प्रत्येकाने आपली मानसिकता बदलल्याशिवाय यात सुधारणा होणार नाही. आपल्याला सगळ्या चांगल्या गोष्टी इतरांनी केल्या पाहिजेत आणि वाईट गोष्टी इतरांनी करू नयेत असं वाटतं. परिसर स्वच्छ ठेवणे हे सरकारचे काम, वाहतुकीचे नियम दुसऱ्याने पाळावे, भ्रष्टाचार दुसऱ्याने करू नये, माझ्या बहिणीकडे, मैत्रिणीकडे दुसऱ्या कोणी बघू नये पण मी मात्र दुसऱ्या कुठल्याही मुलीची छेड पण काढू शकतो.... अजून बरीच मोठी यादी होऊ शकते. सद्यपरिस्थिती बघता एकूणच सुधारणा अवघड वाटतेय.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Fri, 08/26/2016 - 20:00 नवीन
आपण एवढे उद्धट का?
साक्षात मिपावर हे वाक्य वाचायला मिळेल असं कधी वाटलं नव्हतं. म्हणून मुद्दाम लॉग-इन होऊन प्रतिसाद दिला!! :) बाकी जाणकारांच्या विवेचनाच्या प्रतिक्षेत... (स्वगतः तेज्याअसला, आमचं पूर्वीचं मिपा र्‍हायलं नाही!!!)
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 08/26/2016 - 20:08 नवीन
+ १ मिपाच्या आरंभाच्या काळातील, पेजर जावून स्मार्ट फोन आले आणि पब्लिक पण जरा स्मार्ट झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
च
चंपाबाई Fri, 08/26/2016 - 20:14 नवीन
लोक खरेच फार लबाड झालेत... जातो जातो म्हणुन सेंड ऑफ करुन घेतात अन जातच नाहीत !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
अ
अभ्या.. Sat, 08/27/2016 - 04:17 नवीन
हेहेहे, चंबा लैच चान्स पे डयांस हाय. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
म
मुक्त विहारि Sat, 08/27/2016 - 05:25 नवीन
मनोरंजक प्रतिसाद....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
म
मैत्र Sat, 08/27/2016 - 09:04 नवीन
चार चार वेळा हाकललं तरी मागच्या दाराने घुसतात आणि त्या रांगेत असलेल्या कस्टमर्स वर जसा तो नंतर येऊन मोठ्या आवाजात ऑर्डर देणारा उलट शिरजोरी करतो तसे करतात.. लबाड झालेत लोक फार ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
र
राही Mon, 08/29/2016 - 03:01 नवीन
'तेजाअसला'.. क्षणभर 'तेजा हसला' वाचले आणि पिडा नामत तेजा हसताहेत या कल्पनेने खरोखर हसू आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
अ
अनिलअहिरे Fri, 08/26/2016 - 20:40 नवीन
प्रत्येकजण स्वतःचाच विचार करतो कुणाची पर्वा नाही लोकल बसेस तर उद्धतपणाचे अड्डे बनले आहेत हल्ली प्रवाशांच्या उतरण्याचीही वाट बघितली जात नाही गाडी स्टेशनात आल्या आल्या तुटून पडतात समोर स्त्री आहे कि लहान मुलं आहेत ,वृद्ध आहेत यांना देणंघेणं नसत खरच हर भयानक अनुभव असतो
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Fri, 08/26/2016 - 21:04 नवीन
एक अनुभव पुणे स्वारगेट बस स्थानका बाहेरचा जेधे चौक, जगातला एक फार मोठा भुलभुलैय्या. एकदा रात्री सिग्नल लाल आहे आणि पादचारी रस्ता ओलांडताय म्हणून थांबलो होतो. (इथला सिग्नल रात्री उशिरा पर्यंत चालू असतो). मागून लोकांनी हॉर्न मारून मारून दणाणून सोडले. एक पोलीस माझ्याजवळ आले आला. मी काच खाली केली. घ्या की साहेब गाडी पुढे. अहो सिग्नल लाल आहे, लोक रस्ता ओलांडतायत. लोकांची काळजी नाही करायची आपण. त्यांचे ते करतात रस्ता बरोबर क्रॉस. चला पुढे. आता सांगा ज्याने हॉर्न मारणाऱ्या लोकांना हॉर्न मारण्याबद्दल खडसावले पाहिजे त्याची ही मुक्ताफळे. कुणा कुणाला शिस्त लावायची? आणी कसा हा देश सुधारायचा ?
  • Log in or register to post comments
अ
अमितदादा Fri, 08/26/2016 - 21:31 नवीन
+१११, माझा एक अनुभव, मी परदेशात आल्यानंतर एका भारतीय मित्राने मला एक गोष्ट सांगितली, तो बोला कि जर येथील स्थानिक कंपनीपुढे एकाच क्षमतेचे किंवा पात्रतेचे भारतीय, चिनी आणि जापनीज उमेदवार असतील तर ते चिनी किंवा जापनीज उमेदवार घेतील कारण ते नम्र असतात तसेच त्यांचं बोलणं मृदू असत. अर्थात त्यावेळी मला त्याच मत पटलं नाही कारण त्याला कोणताही बेस न्हवता. परंतु 2.5 वर्षांनंतर जेंव्हा मी एका कंपनीची मुलाखत देऊन रुजू झालो तेंव्हा मला माझा स्थानिक मॅनेजर बोलला कि भारतीय लोक जेंव्हा काही मागतात तेंव्हा अस वाटत कि त्यांची भाषा विनंती ऐवजी आदेशाची असते. त्यावेळी मला परत माझ्या मित्राचं वाक्य आठवलं. आणि स्वतःच्या स्वभावाच्या केलेल्या परिक्षणातून सुद्धा हे नंतर जाणवलं, त्यामुळं स्वतःला बदलणे क्रमप्राप्त झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 08/27/2016 - 18:29 नवीन
भारतीय लोक तांत्रिक दृष्ट्या कमकुवत असतात का?माझ्यामते उत्तर नाही असावे, ती कंपनी हॉस्पिटॅलिटी बिझनेस मधली आहे का? नसल्यास त्या कंपनीवर रेसिजमचा आरोप केल्यास काय चूक असेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
अ
अमितदादा Sat, 08/27/2016 - 18:40 नवीन
नाही हो बापू, त्या मित्राचे ते वैयक्तिक मत होत जे मला त्यावेळी हि नव्हते पटले, ते त्याच interpretation होत. हे कोणत्याही कंपजीच ऑफिसल मत नव्हतं अन्यथा माझ्या सारख्या भारतीय लोकांना नोकरीच नसती मिळाली. माझ्या कंपनीच्या स्थानिक मॅनेजर ने informal बोलतांना त्याच मत व्यक्त केलं जे मला स्वतःचा स्वभाव परीक्षण करताना सत्य आहे असं वाटलं, तसेच त्यावेळी मित्राच्या मताची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 08/27/2016 - 19:00 नवीन
अच्छा अच्छा! सॉरी अमितदादा माझाच जरा बेंबट्या झाला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
अ
अमितदादा Sat, 08/27/2016 - 19:22 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
स
संदीप डांगे Sat, 08/27/2016 - 18:57 नवीन
बापू, अमित म्हणतात तसा आदेशात्मक भाषा मला मुंबईला आलो तेव्हा प्रकर्षाने जाणवली, आपल्याकडे सहसा अपरिचित व्यक्तीला आदेशात्मक भाषा आपण वापरत नाही, निदान अकोल्यात तरी, एक प्रकारचे सौम्यसे सौजन्य जाणवते, तुमचा काय अनुभव?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 08/27/2016 - 19:04 नवीन
असे खासकरून निरीक्षण केले नाही, अकोला पहिल्या श्वासापासून अंगळवणी पडले म्हणून, अन मुंबई मध्ये अकोल्याच्या शिकवणी मुळे! ती म्हणजे "जो माह्यासंग सरका मी त्याच्यासंग सरका, जो हेकोडा चालन त्याले आपुन बी हेकोडे" =)) डांगे बुआ तुम्ही मुंबईत जास्त राहले, तुम्हीच सांगा बापा चार दोन उदाहरणे, म्हणजे मले आठोता येइन जर का मी ते फेस केलं आसन तर!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
अ
अमितदादा Sat, 08/27/2016 - 19:09 नवीन
माझा अनुभव आणि मत. इथली स्थानिक संस्कृती अशी आहे की मुलगा सुद्धा आईला छोट्या छोट्या गोष्टींना थँक्स म्हणतो, तेंव्हा नम्रपणा आणि आभार मानण्याची सवय ह्यांना लहानपणापासून असते. याउलट माझ्यासारखे भारतीय ज्यांना प्रेम आणि मार thank u किंवा sorry ची अपेक्षा न करता भेटलं, जे हवं ते हक्काने मागायचं लाजयच नाय हि सवय लागली त्यात कुठतरी नम्रतेचा अभाव होता अस मला वाटलं. कोणतं चांगलं कोणतं वाईट हे नाही सांगत कारण हा दोन संस्कृती मधील फरक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
सपे-पुणे-३० Mon, 08/29/2016 - 09:24 नवीन
अमितदादा या बाबतीत माझं निरीक्षण सांगते. भारतात नोकरीसाठी मुलाखती घेताना जे निकष लावले जातात त्यांत आणि परदेशातील मुलाखतींच्या निकषांमध्ये थोडा फरक आहे. माझ्या व्यवसायाचा एक भाग म्हणून मी बऱ्याच वेगवेगळ्या डेसिग्नेशन्स साठी मुलाखती घेतल्या आहेत(व्ही.पी. सोडून). मला असं जाणवलं की आपल्या लोकांना आत्मविश्वास आणि आगाऊपणा (ओव्हर कॉन्फिडन्स) तसेच स्पष्टवक्तेपणा आणि उर्मट/उद्धटपणा यांत जी पुसट सीमारेषा आहे तीच लक्षात येत नाही. त्यामुळे समोरच्याचा सहज गैरसमज होतो. दुसरं म्हणजे आपण व्यावसायिक औपचारिकतेमध्ये बऱ्याच वेळा मार खातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
अ
अमितदादा Mon, 08/29/2016 - 09:26 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सपे-पुणे-३०
अ
अभिदेश Fri, 08/26/2016 - 21:09 नवीन
मिसळपाववर ही काही कमी उद्धट मंडळी नाहीत . वैयक्तिक टीका करणे , टीका करताना अत्यंत आक्षेपार्ह्य भाषा वापरणे , हे प्रकार इथेही सुरु आहेत.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Fri, 08/26/2016 - 23:46 नवीन
सहमत. आपण एखादा लेख लिहिला आणी त्याच्यावर नकारात्मक प्रतिक्रिया आल्या किंवा कुणी उलट प्रश्न केले की बऱ्याच सदस्यांचा पारा चढतो. विरोध असेल तर तो वैचारिक असावा, वैयक्तिक न्हवे. पण असे करायचे सोडून लोक स्कोर सेटलिंगच्या मागे लागतात. माझ्या लेखावर नकारात्मक प्रतिक्रिया देतोस काय, थांब मी पण तुझ्या लेखावर देतो ही वृत्ती. ह्यातून होते काय तर लेख पाहून प्रतिक्रिया देण्यापेक्षा लेखक पाहून प्रतिक्रिया दिल्या जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिदेश
अ
अभ्या.. Sat, 08/27/2016 - 04:19 नवीन
हो हो, अगदी सहमत. आपण नुसते माझे नावच घेतले नाहीत तर विचारही घेतलेत असे वाटत आहे. द्या रॉयल्टी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
न
नाखु Sat, 08/27/2016 - 05:01 नवीन
"अभि-अभि" आल्यासारखा प्रतिसाद आहे हा अगदी प्रतीध्वनी म्ह्टला तरी चालेल फक्त तीन मध्ये आलाय. हा उद्धटपणा आहे हे बालपणी न सांगीतल्याने, आणि लग्न झाल्यावर सुधरेल या पालकांच्या भाबड्या आशावादाने मुले-मुली दोन्हीही उद्धटपणालाच "बोल्ड्/डॅशींग्/डेरींग/ओपन मांईड" अश्या आवरणात मिरवत राहतात, आणि याचे त्यांनाच काय इतरांनाही वावगे वाटत नाही. वाहतूक नियम पाळल्याने नेभळट ठरलेला नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ज
जयन्त बा शिम्पि Fri, 08/26/2016 - 22:24 नवीन
लेखातील मतांशी १०० टक्के सहमत. आणि नुसते 'एव्हढे' उद्धट नाही तर, खुपच उद्धट व उर्मट देखील ! ! लेखात दिलेली उदाहरणे कमीच आहेत, पण , प्रत्यक्षात, भरपुर ठिकाणी आमचा उद्धट्पणा ठळकपणे दिसतोच. वाढती लोकसंख्या, अपुर्ण साधने, अश्वाश्वती, माझे जग फक्त मी व माझे कुटुंब याभोवतीच फिरणारे, त्यामुळे इतरांबद्द्ल बेपर्वाई, सामाजिक बांधिलकी नुसती तोंडाने म्हणायची, प्रत्यक्ष आपणास त्यातुन किती ओरबाडता येईल याचाच फक्त विचार. या सर्वांना शिस्त कोण आणि कशी लावणार ? मी अजुन तरी एकही मंडळ असे पाहिले नाही कि ज्यांच्याकडून असा एखादा तरी कार्यक्रम / उपक्रम राबवला गेला की ज्यातुन नागरीकांना शिस्तीचे महत्व कळेल. १९७४ - ७५ सारखा ' दंडुका ' सतत कामी येत नाही आणि लादलेली शिस्त व स्वयंशिस्त यात खुप फरक आहे.
  • Log in or register to post comments
स
सामान्य वाचक Sat, 08/27/2016 - 03:50 नवीन
संयमाचा अभाव हे पण एक कारण आहे दुसऱ्याच्या आदर , संयम इ इ फालतू गोष्टी मुला ना शिकवायच्या कटकटीत आपण पडत नाही
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 08/27/2016 - 04:06 नवीन
:-( :-(
  • Log in or register to post comments
R
Rahul D Sat, 08/27/2016 - 05:17 नवीन
"संयमाचा अभाव हे पण एक कारण आहे दुसऱ्याच्या आदर , संयम इ इ फालतू गोष्टी मुला ना शिकवायच्या कटकटीत आपण पडत नाही."
  • Log in or register to post comments
अ
अजया Sat, 08/27/2016 - 06:20 नवीन
१००% मान्य आहे. स्वतःला न सुधारता जग सुधरेल असे जोपर्यंत लोकांना वाटते हे असेच सुरु राहणार आहे.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Sun, 08/28/2016 - 13:52 नवीन
स्वतःला न सुधारता जग सुधरेल असे जोपर्यंत लोकांना वाटते हे असेच सुरु राहणार आहे.
1++ Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
अ
असंका Mon, 08/29/2016 - 06:18 नवीन
प्रतिसाद आवडला... सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
द
दिगोचि Sat, 08/27/2016 - 06:33 नवीन
मी लेखकाच्या विचारान्शी सहमत आहे. एक आश्चर्य नमूद करवएसे वाटते ते असे की इतक्या प्रतिसादामधे अजून एकानेहि इथे आवडत नसेल तर परदेशी रहायला जा असे लिहिलेले नाही. काही मिपा सदस्य बदललेले दिसतात. (यावर आता माझ्यावर स्तुतिसुमने उधळली जातील)
  • Log in or register to post comments
अ
अंतरा आनंद Sat, 08/27/2016 - 06:49 नवीन
१००% सहमत. पुढल्या पिढीवरही तसेच संस्कार होताना दिसतात. उद्दध्टपणा म्हणजेच स्मार्ट्नेस, अरेरावी म्हणजेच गट्स असणे; अशी चुकीची समीकरणे दृढ होताना दिसता आहेत. नियमाप्रमाणे वागणारा बावळट ठरतो.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Sat, 08/27/2016 - 07:24 नवीन
"""माझ्या स्वतःच्या आणि इतर जवळचे मित्र व आप्तेष्ट ह्यांच्या परदेशातील विविध अनुभवावरून असे दिसते की"""... समस्या अशी आहे की बहुतांशी भारतीय लोकांनी परदेश अनुभवला नाही त्यामुळे आपल्या परिघाबाहेर जग कसं आहे हेच माहित नाही. पण परिस्थिती नक्कीच हळूहळू बदलेल.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sat, 08/27/2016 - 07:28 नवीन
अदलाबदली करूयात काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Sat, 08/27/2016 - 10:22 नवीन
कशाची?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Sat, 08/27/2016 - 10:27 नवीन
संस्कारांची, भाषेची, इतिहासाची, विचारांची, लोकसंख्येची, संपत्तीची, देशाची, कशाची पण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Sat, 08/27/2016 - 11:38 नवीन
अभ्या भाऊ- तुमची हरकत नसेल तर अदला बदली करण्यापेक्षा वाटून खाऊ की..!! माझा जास्त फायदा होईल. बाकी मी आपल्या स्वदेशातच असल्यामुळे एकत्र राहून बाकी गोष्टींच्या वाटण्या होऊ शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
उ
उडन खटोला Sat, 08/27/2016 - 10:29 नवीन
>>>समस्या अशी आहे की बहुतांशी भारतीय लोकांनी परदेश अनुभवला नाही त्यामुळे आपल्या परिघाबाहेर जग कसं आहे हेच माहित नाही. पण परिस्थिती नक्कीच हळूहळू बदलेल. हे समस्ये वरचं उत्तर आहे??? माझ्या मते सामान्यत: शिस्त नसणे, कायद्याचा नि कायद्याच्या थेट रक्षकांचा वचक नसणे, आपल्याला शिक्षा होऊ शकेल अशी भीती नसणे आणि लाच देण्या घेण्यावर असलेला प्रचंड विश्वास ही कारणं दिसतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
अ
अभ्या.. Sat, 08/27/2016 - 10:36 नवीन
मुद्दा बहुतेक सेल्फ व्हॅल्युएशनचा आहे. आपली समाजाच्या(ह्यात घरापासून देशापर्यंत सगळे आले) दृष्टीने काय व्हॅल्यु आहे आणि त्यासंदर्भात काय कर्तव्ये आहेत ह्याचे अज्ञान हे मूळ कारण असावे. आय मिस यू डीअर संजयजी आणि विवेकजी ;) म्या पळालो बरका ह्या धाग्यावरुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उडन खटोला
उ
उडन खटोला Sat, 08/27/2016 - 10:39 नवीन
कर्तव्यं विसरतात बरोबर. हक्क मात्र ठोकुन आणि वाजवून घेतात लोक. चालायचं.(हे असं चालवून घेतल्यानं आणखी फावतं)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
व
विशुमित Sat, 08/27/2016 - 11:15 नवीन
जो पर्यंत आपण आपल्या परिघामध्ये असतो तो पर्यंत आपल्याला आपल्या आणि आजू बाजूच्या लोकांच्या कृती चालून जातात. पण आपण जेव्हा आपल्या परिघाबाहेरील जग अनुभवतो त्यावेळेस नक्कीच आपल्यात बदल होतो. आणि तोच बदल आपण आपल्या परिघामध्ये आल्यावर इतर लोकांना समजावताना दिसतो. पण सुरवातीला नेहमी प्रतिकार असतो आणि जेव्हा प्रतिकार करणाऱ्याला अनुभव येतो तो पण नक्कीच बदलतो. शहरात येई पर्यंत गावाकडे बहुतेक सगळेच लोक उघड्यावर शौचाला जायचे. त्यावेळेस त्याचे कधीच वावगे वाटत नव्हते. उघड्यावर शौचाला गेले नाही पाहिजे हे माहित असून देखील त्याचे महत्व माहित नव्हते. पण आता परस्थिती तशी नाही. गावाकडे शौचालय बांधून घेतले. माझी मुले शहरातच वाढत असल्यामुळे ते ही गावाकडे गेल्यावर उघड्यावर जात नाहीत. हा झाला माझ्यातील बदल. पण या उलट गावामध्ये अजूनही बहुतांशी लोक उघड्यावरच जातात. त्यांना त्याचे दुष्परिणाम समजवायला गेलो तर 4 ग्यान मलाच शिकवतात. त्याला मी उर्मटपणा नाही म्हणू शकत. त्यामुळे हळूहळू ही परिस्थितीही बदलेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उडन खटोला
उ
उडन खटोला Sat, 08/27/2016 - 16:02 नवीन
ह्यात आपण कुठंतरी कमी आणि इतर देश कुठेतरी जास्त चांगले हा दृष्टिकोन दिसतोय. स्वच्छते चे धडे शाळेत मिळतात ओ. जे माझं नाही ते माझं नाही, ते हिस्कावण्याची कृती मी करु नये हे साधं नैतिक कृत्य कुणीतरी समजावून सांगावं? खाल्लेल्या ताटात हागुन (मिपा नुकतंच प्रगल्भ झाल्यानं सगळ्या शब्दांना परवानगी आहे असं समजलंय) घाण करु नये हे अगदी मूलभूत ज्ञान जर आपल्याला नसेल तर आपण काय कुणाला सांगणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
झ
झेन Tue, 08/30/2016 - 16:40 नवीन
माफ करा असं जनरलाझेशन करणं शक्य नाही. याला गणिती पद्धतीने उत्तर मिळणार नाही. कधी कधी प्रदेशात वास्तव्य करणा-या तथाकथित सुशिक्षित भारतीय व्यक्ती इथे आल्यावर मोकळया श्वासाचे सुख घेतल्यासारखे सिव्हिक सेन्स ची पार काशी (जास्तच सभ्य शब्द) करतात. तर कधी सवईने नम्र शब्द फक्त फेकतात. उलट कधी कधी असेही अनुभव येतात की सुधारणा नक्की होईल अशी आशा वाटायला लागते. एकदा सकाळी सातच्या सुमाराला सायकल वरून जात असताना एका छोट्या चौकात कुठलाही सिग्नल नव्हता. एक BMW SUV येत होती म्हणून वाट देण्यासाठी मी वेग कमी केला ऑल्मोस्ट थांबलो पण ती कार फारच सुरक्षित अंतर ठेवून मी पास होण्यासाठी थांबली होती. मला बाउन्सर होता, असली स्वप्न पण कधी पडत नसल्यामुळे आधी त्याच्या हेतू बद्दल संशय आला. भानावर आल्यावर त्या माणसाला हातानेच धन्यवाद देवून पुढे निघून गेलो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
प
प्रभाकर पेठकर Tue, 08/30/2016 - 17:22 नवीन
आखाती प्रदेशात चारचाकी वाहनांनी असे थांबून पायी चालणार्‍या आणि दुचाकीस्वारांना मार्ग देण्याची पद्धत आहे. त्या BMW वाल्याचे बरेच वास्तव्य आखातात गेले असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झेन
प
पगला गजोधर Tue, 08/30/2016 - 17:46 नवीन
खर सान्गा, BMW कधी घेतली ? पेढे कुठाय ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा