Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हिशेब

स
सुबोध खरे
गुरुवार, 09/01/2016 - 08:22
🗣 291 प्रतिसाद
हिशेब मागच्या रविवारी संध्याकाळी बायको बरोबर फिरायला गेलो होतो. (मुळात सगळ्या संध्याकाळी आमच्या दवाखान्यात जात असल्याने रविवारी संध्याकाळी आम्ही आवर्जून फिरायला जातो.) तेंव्हा आमची एक भाची रुचिरा तिथे फिरताना दिसली. नमस्कार चमत्कार झाल्यावर तिला विचारले एकटी इकडे कुठे फिरते आहेस. त्यावर ती म्हणाली आम्ही इथे जवळच नवीन घर घेतले आहे. आणि आग्रहाने ती आम्हाला तिच्या घरी घेऊन गेली. सगळे घर दाखवले कुठे काय कसे घर सजवले आहे हे बोलणे चालू होते. ऋतुजा ( तिची मुलगी) आता ५ वर्षांची झाली. ती कुठल्या शाळेत जाते. रुचिराच्या घरी तीन बायका कामाला आहेत. एक दोन्ही वेळचा स्वयंपाक करते. एक झाडू मारणे लादी पुसणे, भांडी घासणे इ स्वच्छतेची कामे करते आणि तिसरी वरकामाला . घरी चहापाणी अवांतर गप्पा चालू असताना चालू असताना मी तिला विचारले चिन्मय (तिचा नवरा) कुठे आहे? ती म्हणाली तो ऋतुजाला( तिच्या मुलीला) घेऊन फिरायला गेला आहे. चिन्मय हा एका मुंबईतील मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत चांगल्या पगारावर आहे. मी रुचिराला विचारले मग तुम्ही एकत्र का जात नाही? त्यावर ती म्हणाली कि पाच दिवस मी ऋतुजाला सांभाळते मग शनिवार रविवार चिन्मयने सांभाळायला नको का? ती त्याची ड्युटी आहे. मी विचारले म्हणजे तो काय काय करतो? ती म्हणाली त्या दोघांना सुटीचा असते. मग तो तिला उठवतो ब्रेकफास्ट करवतो अंघोळ घालतो जेवायलाही घालतो. दोन दिवस तिची पूर्ण काळजी त्यानेच घ्यायची.शनिवार रविवार मला पूर्ण फ्री माझ्या तोंडावर आले होते कि मग शनिवार रविवार तू नोकरी करायला जातेस का? पण मी थांबलो. बाहेर पडल्यावर बायको म्हणाली हि घरीच तर असते (गृहिणी) आहे. नवरा बिचारा सालस आहे पाच दिवस मानेवर खडा ठेवून काम करतो भरपूर पैसे मिळवतो. हि इथे राणीसारखी राहते. मग हा कसला हिशेब? पाच दिवस मी सांभाळते तर दोन दिवस नवऱ्याने पूर्ण वेळ सांभाळायचे. घरात कामाला तीन बायका आहेत.चांगले नउ हजार रुपये बायकांवर खर्च करते आहे.(चहा पाण्याच्या वेळेस स्वयंपाकघरात हि माहिती काढून झाली होती). मुलगी चार तास शाळेत जाते. सगळ्या कामाला बायका आहेत. पाच दिवस आरामच तर असतो. मग दोन दिवस मुलीला संपूर्ण नवर्याकडे द्यायचे हा कसला हिशेबीपणा. मी अजून विचार करतो आहे. आपलीच भाची आहे ती बरोबर का बायको म्हणते ते बरोबर? (सत्यकथा नावे बदलून)

प्रतिक्रिया द्या
61336 वाचन

💬 प्रतिसाद (291)
अ
अभ्या.. गुरुवार, 09/01/2016 - 08:27 नवीन
डॉक, फ्रँक्लि स्पीकींग. तुम्हाला यशस्वी जीवनाची आणि यशस्वी धाग्याची गुरुकिल्ली गावलीय.
  • Log in or register to post comments
ख
खेडूत गुरुवार, 09/01/2016 - 08:34 नवीन
:) अशेच म्हणतो. आन त्या दोन्हीही किल्ल्या एकाच की चेनला लावल्या आहेत! . . . बाकी भाच्या तेव्हढ्या स्टोर्‍या. हिशेब कुणी/ कसा लावावा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
N
nashik chivda गुरुवार, 09/01/2016 - 09:45 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
R
Rahul D गुरुवार, 09/01/2016 - 15:45 नवीन
अनुमोदन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
R
Rahul D गुरुवार, 09/01/2016 - 15:45 नवीन
अनुमोदन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ग
गणामास्तर गुरुवार, 09/01/2016 - 08:40 नवीन
कसल्या कसल्या बायका असतात राव.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 09/01/2016 - 08:44 नवीन
नाकात दोरी घालून घेण्याच्या अगोदर ( आज पोळा)लग्नाची गरज फक्त मलाच आहे हे कधीही जाणवून देऊ नका सर्व नवीन वळुंनो.
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर गुरुवार, 09/01/2016 - 09:13 नवीन
या वाक्यात थोडीशी सुधारणा इतकीच करेन की लग्नानंतरही लग्न टिकवून ठेवण्याची गरज फक्त मलाच आहे हे जाणवून देऊ नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
य
योगेश कोकरे गुरुवार, 09/01/2016 - 16:14 नवीन
अप्पा ,,,खूप अनुभव घेत्तलेला दिसतोय ,,,,,,,अवांतर : एक धागा काढा कि ,,,,"मीच का"?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
अ
अप्पा जोगळेकर Fri, 09/02/2016 - 07:29 नवीन
साहेब, माझ्या वैयक्तिक आयुष्यात नाक खुपसण्याचे कारण नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगेश कोकरे
ज
जव्हेरगंज गुरुवार, 09/01/2016 - 08:50 नवीन
च्यायला..
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख गुरुवार, 09/01/2016 - 08:57 नवीन
मग शनिवार रविवार तू नोकरी करायला जातेस का?
हे सर्वात महत्त्वाचे!
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 09/01/2016 - 09:10 नवीन
बघूया इथे बहिष्कार पडतो कि अणुयुध्ध होते =))
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 09/01/2016 - 10:52 नवीन
बहिष्कार पडणार ! युद्ध स्वतःच्या जमिनीवर करायचा नस्ता हे 'त्यांना' माहित आहे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
स
सामान्य वाचक गुरुवार, 09/01/2016 - 09:14 नवीन
रामतीर्थकर madam च्या cd द्या
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 09/01/2016 - 09:28 नवीन
आयोव..!! याडंच लागल...!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक
अ
अप्पा जोगळेकर गुरुवार, 09/01/2016 - 09:15 नवीन
मागे एकदा एका धाग्यावर 'शहरी स्त्रिया शेफारल्या आहेत तर खेड्यातील स्त्रिया अन्यायग्रस्त जीवन जगत आहेत' असा प्रतिसाद दिला होता त्याची आठ्वण झाली.
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा गुरुवार, 09/01/2016 - 09:17 नवीन
गणपतीआधीच ढोलताशे वाजणार आहेत इथे !
  • Log in or register to post comments
अ
अजया गुरुवार, 09/01/2016 - 09:19 नवीन
नवरा बिचारा सालस आहे
हाच काय तो जगप्रसिध्द सालस आय डी ;)
  • Log in or register to post comments
म
मोदक गुरुवार, 09/01/2016 - 09:23 नवीन
डॉक.. असे पब्लीकली सांगायचे नसते हो. बाकी फांदीवर जागा धरून आहे.
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 09/01/2016 - 09:25 नवीन
एक वेळ धुणी-भांडी परवडली पण लहान मुले सांभाळणे तसे खूप जिकिरीचे. मुलं सांभाळणे म्हणजे फक्त त्याला खाऊ पीयु घालणे, कपडे बदलणे, त्याच्याशी खेळणे एवढंच नसून सतत डोळ्यात तेल घालून त्याच्यावर लक्ष ठेवणे आलं. भाचे जावई नोकरी करतात म्हणजे खूप मोठे तीर मारत असतील असे मी मानत नाही. बाकी चालू द्यात...!!
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 09/01/2016 - 16:22 नवीन
एक वेळ धुणी-भांडी परवडली पण लहान मुले सांभाळणे तसे खूप जिकिरीचे. मुलं सांभाळणे म्हणजे फक्त त्याला खाऊ पीयु घालणे, कपडे बदलणे, त्याच्याशी खेळणे एवढंच नसून सतत डोळ्यात तेल घालून त्याच्यावर लक्ष ठेवणे आलं. उलट आहे. मी माझ्या मुलीचे बालपण खरंच एन्जॉय केलं. तिला जेवण भरवण्यापासून अंघोळ घालण्यापर्यंत सर्व काही मी आनंदाने केले. यात मला कुठेही ओझे किंवा काम वाटले नाही. ती चालायला लागल्यावर घरातील सामान चार फूट उंच ठेवायला लागले इ गोष्टी मी आनंदाने केल्या. काच सामान फुटण्यापेक्षा तिला लागेल या काळजीने. दुर्दैवाने मुलगा लहान असताना मी समुद्रात होतो. त्यामुळे त्याच्या बरोबर मला तितका वेळ देता आला नाही हि खंत आहे. ज्याला मुलांची आवड आहे त्याला हे ओझे आहे असे वाटणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
म
मुक्त विहारि गुरुवार, 09/01/2016 - 16:49 नवीन
+ १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
प
पक्षी Fri, 09/02/2016 - 09:20 नवीन
+१
Make it two
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
भ
भटक्य आणि उनाड Fri, 09/02/2016 - 19:30 नवीन
हे खर आहे.. त्याला तोड नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 09/01/2016 - 09:33 नवीन
प्रेम संपतं तिथे व्यवहार सुरु होतो. अपल्यात तशी परिस्थिती तर निर्माण झालेली नाही नं हे आधी दोघांनीही तपासून पाहावे. त्या आठवडाभर मुलीला सांभाळत असतील तर त्यांच्या नवर्‍याने बायकोच्या खुशीसाठी शनिवार-रविवार मुलीला सांभाळावे. पण त्यालाही, 'ड्यूटी' लावून का द्यावी लागावी? मुलीला सांभाळणे हे मनापासून आणि प्रेमाने न होता बायकोच्या खुशीसाठी का करावे लागावे? जाता जाता असेही सुचवावे वाटते की त्या दोघांनीही तीन पैकी दोन कामवाल्या कमी कराव्यात. हाताशी कांहीच काम नसले की डोके सैतानाचे घर होते. मुलांच्या वाढीत आई-वडील दोघांचाही सहभाग 'मनापासून' असावा, ड्यूटी म्हणून नाही. लहान मुले आजूबाजूच्या प्रत्येक बारीकसारिक गोष्टीची नोंद घेत असते. आपल्याला जाणवले नाही तरी तान्ह्या बाळाचेही आजूबाजूच्या वातावरणावर लक्ष असते आणि ते नोंद घेत असते. एरवी स्वतःच्याच आनंदात खेळत (दुपट्यावर पडल्यापडल्या 'सायकल' चालविणारा) माझा तान्हा मुलगा आम्हा दोघांत कांही कारणावरून चढ्या आवाजात वाद्विवाद झाला तर आमची नजर टाळून, आढ्याकडे दूर भयभित नजरेने पाहात राहायचा. हे मी अनुभवले आणि आम्ही वादविवाद कमी केले. शाळेच्या वयापासून तर मुलं त्यांच्या मित्रांचे आईवडील आणि स्वतःचे आईवडील ह्यांची मनातल्या मनात, नकळत, तुलना करीत असतात. बालपणापासून घरात सतत प्रेमाची उब जाणवली तर मुलेही प्रेमळ होतात आणि सतत व्यवहार अनुभवत आली तर त्यांचे स्वभावही रुक्ष आणि व्यवहारी बनतात. घरात सतत भांडणं चालली असतील तर मुलेही एकलकोंडी आणि आत्मकेंद्रीत बनतात. असो. सांगण्याचा उद्देश एव्हढाच की कोणीतरी (जमल्यास तुम्ही आणि/किंवा तुमच्या पत्नीने) भाची आणि जावईबापूंना ह्या गोष्टी वेळीच समजवून्/पटवून द्याव्यात. कामाची वाटणी एकमेकांवरील प्रेमातून व्हावी, एकमेकांबद्दलच्या आदरातून व्हावी, हा संसार आपला आहे ह्या भावनेतून व्हावी. कोणाची काय ड्यूटी आहे? मी तुमच्यासाठी काय करतो? मी तुझ्यासाठी काय करते? ह्या विचारांना थारा नसावा.
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 09/01/2016 - 09:43 नवीन
नवरा बायकोच्या प्रकरणामध्ये त्रयस्ताने पडू नये--- इति आमच्या आईसाहेब
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
स
सुबोध खरे गुरुवार, 09/01/2016 - 15:48 नवीन
नवरा बायकोच्या प्रकरणामध्ये त्रयस्ताने पडू नये--- इति आमच्या आईसाहेब विशुमित साहेब आमच्या ही आईसाहेब हेच म्हणतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
म
मुक्त विहारि गुरुवार, 09/01/2016 - 09:48 नवीन
एक नंबर प्रतिसाद...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
अ
अजया गुरुवार, 09/01/2016 - 10:02 नवीन
पेठकरकाकांचा प्रतिसाद आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
G
gogglya गुरुवार, 09/01/2016 - 10:17 नवीन
शतशः सहमत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
र
रघुनाथ.केरकर गुरुवार, 09/01/2016 - 10:24 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
स
सुबोध खरे गुरुवार, 09/01/2016 - 15:46 नवीन
पेठकर साहेब रुचिरा आणि चिन्मय मध्ये कोणतेही भांडण नाही. त्यांचा संसार गुण्यागोविंदाने चालू आहे. चिन्मयला ऋजुता ला सांभाळण्यास कोणताही त्रास नाही. बाप लेकीचे नाते फार सुंदर आहे.आणि मुलगी बापाबरोबर दोन दिवस मजेत सगळ्या गोष्टी करत असते. केवळ आमच्या भाचीच्या तोंडून हा "ड्युटी" शब्द आल्यामुळे आम्हाला आश्चर्य वाटले. उगाच त्यांच्या सुखी संसारात मी कशाला काडी घालू म्हणून मी "मग शनिवार रविवार तू नोकरी करायला जातेस का?" हे ओठापर्यंत आलेले शब्द मागे फिरवले. नवऱ्याला आपली ड्युटी काही जड आहे असे वाटत नाही आणि त्याची तशी तक्रारही नाही. "नवरा सालस आहे" असे बायको म्हणाली याचा हा अर्थ असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
पिलीयन रायडर गुरुवार, 09/01/2016 - 15:48 नवीन
तिने जोक मारला असेल तर??!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
संदीप डांगे गुरुवार, 09/01/2016 - 15:59 नवीन
नसेल तर..? आजकाल काहीही सांगता येत नाही ब्वॉ कोणाचे, वरवर सुजाण, सुसंस्कृत दिसणारी लोकं आतून कशी असतात ते देवाला तरी ठावूक असेल का नाही काय माहित! तुम्हाला म्हणून सांगतो पिरा, माझ्या बायकोच्या मामाच्या बायकोच्या बहिणीचा मेव्हणा अगदी बायकोचा बैल झालाय, काय जादू केली तिनं त्याच्यावर देवच जाणे, लग्न झाल्यावर मुलगे कसे बदलतात हो! आजची पिढी अशी बायकोभोवती नाचते, आमच्यावेळी असं नव्हतं... डोळे वटारले की बायका स्वयंपाकघरात पळून जायच्या. हल्लीच्या पिढीचं काय खरं नाय बघ...! (हुश्श!.... जमले का?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 09/01/2016 - 16:07 नवीन
डॉक्टरसाहेब, रुचिरा आणि चिन्मय मध्ये कोणतेही भांडण नाही. भांडण असेल तरच समुपदेशन करावे असे नाही. चुकीची विचारसरणी बदलण्यासाठीही करावे. पुढे त्यांच्या मुलांनाच त्याचा फायदा होईल. पूर्वी, माझा मुलगा ३-४ वर्षाचा, मला संताप अनावर व्हायचा. मुलाच्या चुकीसाठी त्याच्या पार्श्वभागी चटकन माझा हात उठायचा. पण माझ्या वडीलांच्य जेंव्हा हे लक्षात आले तेंव्हा त्यांनी मला सांगितले 'हात उचलू नकोस. नुसत्या नजरेने मुलाला कळलं पाहीजे एखादी गोष्ट तुला आवडलेली नाही किंवा त्याच्याकडून चुक झाली आहे.' हे माझे समुपदेशन त्यांनी केले. त्याचा मला आणि माझ्या मुलाला फायदाच झाला. असे समुपदेशन वेळीच केलेले चांगले असते. तसे त्यांनी केले नसते तर कळत्या वयात मुलाच्या मनांत माझ्याबद्दल अढी निर्माण झाली असती. तशी शक्यता असते. तो प्रसंग टाळला गेला हा केव्हढा मोठा फायदा झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
आ
आजानुकर्ण गुरुवार, 09/01/2016 - 16:22 नवीन
१. रुचिरा आणि चिन्मय मध्ये कोणतेही भांडण नाही. २. त्यांचा संसार गुण्यागोविंदाने चालू आहे. ३. चिन्मयला ऋजुता ला सांभाळण्यास कोणताही त्रास नाही. ४. बाप लेकीचे नाते फार सुंदर आहे.आणि मुलगी बापाबरोबर दोन दिवस मजेत सगळ्या गोष्टी करत असते. ५. नवऱ्याला आपली ड्युटी काही जड आहे असे वाटत नाही आणि त्याची तशी तक्रारही नाही. केवळ आमच्या भाचीच्या तोंडून हा "ड्युटी" शब्द आल्यामुळे आम्हाला आश्चर्य वाटले. ओके डॉक. गॉट इट. एका शब्दामुळे हा सगळा काथ्याकूट. ब्वॉर्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
र
रविकिरण फडके गुरुवार, 09/01/2016 - 09:43 नवीन
जगात दोन प्रकारची माणसे असतात; पिळवणूक करणारी आणि करून घेणारी. बहुसंख्य माणसे ह्याच दोन वर्गात मोडतात. तिसरा वर्ग पिळवणूक न करणारा आणि करवूनही न घेणारा. पण हा अगदीच अल्पसंख्य. आपण कोणत्या वर्गात मोडतो हे आपली गुणसूत्रे ठरवितात, त्यामुळे पुढील आयुष्यात त्यात फारसे बदल करता येत नाहीत. कुणीतरी (नाव आठवत नाही) म्हटलंय, बहुतेक सर्व नाती पिळवणुकीवरच आधारलेली असतात, ते खरंही असेल! असो.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 09/01/2016 - 09:50 नवीन
असे नसते हो.... कुटुंबातील सर्व घटक जर प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बांधलेली असतील तर असे होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रविकिरण फडके
म
मुक्त विहारि गुरुवार, 09/01/2016 - 09:55 नवीन
https://groups.google.com/forum/#!topic/aamhimarathi/vTfHmDh0V0Y
  • Log in or register to post comments
N
nanaba गुरुवार, 09/01/2016 - 09:57 नवीन
घरात कामाला तीन बायका आहेत.चांगले नउ हजार रुपये बायकांवर खर्च करते आहे.(चहा पाण्याच्या वेळेस स्वयंपाकघरात हि माहिती काढून झाली होती). मुलगी चार तास शाळेत जाते. सगळ्या कामाला बायका आहेत. पाच दिवस आरामच तर असतो. मग दोन दिवस मुलीला संपूर्ण नवर्याकडे द्यायचे हा कसला हिशेबीपणा. >> Okay, if girl goes out for four hours on weekend and is with hubby for remaining day, will you call he was at home only for 2 days the way you are saying about his wife? She is at home, has 3 maids to work on everything. He is also at home on weekend and has 3 maids at disposal for house work. How come he becomes "bicchaaraa" with the same aid and she becomes useless (rikamtekadi)? ~ By a working mom who utterly loves her daughter and is lucky enough to have a husband who loves the daughter to the same extent and doesn't consider spending time with the daughter as a "work", but thinks of it as fun activity - just like the mom do!
  • Log in or register to post comments
स
समी गुरुवार, 09/01/2016 - 10:29 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: nanaba
स
स्मिता. गुरुवार, 09/01/2016 - 12:07 नवीन
तुमचा हिशेब गंडलाय का? खरेकाकांनी जो प्रश्न न विचारताच गिळला तो विचारल्यावर खरा हिशेब कळला असता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: nanaba
म
मराठी कथालेखक गुरुवार, 09/01/2016 - 14:21 नवीन
मराठी संस्थळावर, मराठी धाग्यावर निष्कारण English मध्ये असलेल्या या प्रतिसादाचा निषेध नोंदवतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: nanaba
र
रघुनाथ.केरकर गुरुवार, 09/01/2016 - 10:25 नवीन
घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती इथे असावा प्रेम-जिव्हाळा नकोत नुसती नाती त्या शब्दांना अर्थ असावा नकोच नुसती वाणी सूर जुळावे परस्परांचे नकोत नुसती गाणी त्या अर्थाला अर्थ असावा नकोत नुसती नाणी अश्रूतुनही प्रीत झरावी नकोच नुसते पाणी या घरट्यातुन पिल्लू उडावे दिव्य घेऊनि शक्ती आकांक्षांचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती
  • Log in or register to post comments
ग
गंम्बा गुरुवार, 09/01/2016 - 10:27 नवीन
डॉक्टरांना शतकी प्रतिसादांचे धागे काढायची गुरुकिल्ली सापडली आहे.
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 09/01/2016 - 10:36 नवीन
आरी कुठे आहे ते पाहून ठेवणे आले. नेहमीचे यशस्वी कलाकार आलेकी धागा पतंग भरारी घ्यायला सुरुवात होईल.. मोदकाशेजारीच जागा पकडून बसलो आहे
  • Log in or register to post comments
म
मीरा वैद्य गुरुवार, 09/01/2016 - 10:49 नवीन
हिशेबच लावायचा तर सरळ गणीती हिशेब मांडुयातः १. मुलगी रोज ४ तास शाळेत जाते म्हणजे ५ दिवसांचे मिळुन २० तास बायकोला पुर्ण फ्री. जे हवे ते करावे. ९००० रुपये मोजुन ३ बायका कामाला आहेत म्हणजे त्यांच्याकडुन सगळी कामे करुन घेत असावेत. (अर्थात त्या बायकांकडुन काम करुन घावे लागते हे मुजोर आणी आळशी पुरुष जातीच्या लोकांना कधी कळणार नाही.) थोडक्यात २० तास पुर्ण मोकळा वेळ मिळतो असे दिसते. (गरीब बिचार्‍या भोळ्या भाबड्या सरळ साध्या बाईला इतकी मेहनत करुन एका आठवड्यात काय मिळते तर केवळ २० तास मोकळा वेळ आणि माजोरडे नवरे मात्र...... जाउदेत) २. माजोरडा, आलशी, ऐदी, ऐतखाउ नवरा रोज कामावर जातो. उच्चपदस्थ आहे म्हणजे किमान १० तास काम करत असावा. ८ तास झोपण्यात जातात आणी रोजी १ तास प्रवासात आणी १ तास आन्हिकांमध्ये जातो असे धरल्यास हा माणूस रोज ४ तास फ्री असतो आणी घरी असतो. म्हणजेच याला पण २० तास पुर्ण मोकळा वेळ मिळतो असे दिसते. अर्थात ५ दिवस तो मुलीची कुठलीही जबाबदारी घेत नाही, मुलगी त्याच्याकडे आल्यास हाडहाड करुन हाकलुन देतो असे मानुयात. थोडक्यात ५ दिवसात दोघांनीही २० तास मोकळा वेळ मिळतो मात्र विकांताला सगळे नवर्‍यानेच करायचे आणि बायको पाय पसरुन बसणार (बायका आहेतच). आता वाटेल हिशोबाचे पारडे बायकोच्या बाजुने झुकले. पण एह एवढे सरळ आहे का? बाईमाणसाची या सगळ्या प्रकारात किती कुचंबणा होते हे नवरे समजु शकतात का?: १. एकतर बिचारी नौकरी सोडुन घरी बसली आहे. ती सुद्धा शिकलेली असेल. तुलाही करीयर करायचे असेल. मात्र जणु मुलगी वाढवण्याची जबाबदारी तिचीच. माजोरडा, आळशी, ऐदी, ऐतखाउ नवरा काय तो फक्त करियर करणार काय? २. बायकांकडुन काम करुन घेणे किती अवघड असते हे माजोरड्या, आळशी, ऐदी, ऐतखाउ पुरुषांना माहिती तरी असते का? वरकामाची बाई फर्निचर पुसते तेव्हा तिच्या मागे लागुन पंखे पण पुसुन घ्यावे लागतात. तिला आठवणा करुन द्यावी लागते की बाई ग ड्रेसिंग टेबल वर पण एक फडके मार गं. स्वयंपाकाच्या बाईकडुन रोजच्या स्वयंपाकाव्यतिरिक्त एक दिवस चटणी कुटुन घेउन दाखवा. १० दिवस मागे लागल्यावर ती एकदा चटणी कुटेल. १० दिवस रोज सांगायला लागणे हे पण एक कामच आहे ना? शिवाय फरशी पुसणारी बाई सोफ्याखालुन फडके मारत नाही. आठवण ठेउन तिला सांगावे लागते की बाई मागच्या आठवड्यात फडके मारले होते तिथुन आता परत मार. पेरियोडिक फॉलो अप यु सी. शेड्युल मेंटेन करणे हे काही सोप्पे काम आहे का? भांडी घासणारी बाई मधुनच दमते मग स्वयंपाकाच्या बाईला सांगुन तिघींसाठी चहा करुन घ्यावा लागतो. Optimal utilization of available resources. You see. Resource management is such a task. त्यात परत या बाया अधुन मधुन दांड्या मारतात तेव्हा थोडीशी धूळ दिसली की तो माजोरडा, आळशी, ऐदी, ऐतखाउ नवरा कुरकुर करायला तयार आहेच. शिवाय या बायका रोज येत आहेत की नाही हे बघणॅ, नाही आल्या तर त्यांना फोन करणे. चुचकारुन त्यांच्याकडुन कामे करुन घेणे. एक न अनेक. किती कामे असतात. ३. ऐदी, आळीशी नवर्‍याला काय त्रास आहे? रोज हापिसात एसी मध्ये बसतो. सहकार्‍यांवार ऑर्डर सोडतो आणि कामे करुन घेतो. Its that simple. मध्येच त्याचा बास गुरकावला तर दुर्लक्ष तर करायचे असते. शिवाय डेडलाइन्स चे टेंशन नसतेच. ऑफिल पॉलिटिक्स वगैरे प्रकार नुसतीच गंमत आहे. पीसीकडे टक लावुन बघणे हे काही काम होउ शकत नाही (बाकी काम असतेच काय?) असो. तर बिचार्‍या बायकांना या सगळ्या त्रासातुन जावे लागत असताना डॉक्टरांना असले प्रश्न पडावेत हे बघुन वाईट वाटले , गृहिणी असणे म्हणजे विश्रांतीची गरज नसणे का ?
  • Log in or register to post comments
ग
गणामास्तर गुरुवार, 09/01/2016 - 10:57 नवीन
फक्त या लेखात उल्लेख आलेला नवरा आळशी,माजोरडा,ऐदी, ऐतखाउ आहे असे आपल्याला म्हणायचे आहे कि जगातल्या सर्व पुरुष जमातीबद्दल आपले हे मत आहे? बरं, फक्त या लेखातला पुरुष आळशी,माजोरडा,ऐदी, ऐतखाउ असल्याचा निष्कर्ष तुम्ही कसा काढलात हे जाणून घेण्यास उत्सुक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीरा वैद्य
ग
गंम्बा गुरुवार, 09/01/2016 - 11:21 नवीन
मीराताईंचा प्रतिसाद उपहासात्मक वाटला, खास करुन पॉईंट नंबर ३
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा