हिशेब
हिशेब
मागच्या रविवारी संध्याकाळी बायको बरोबर फिरायला गेलो होतो. (मुळात सगळ्या संध्याकाळी आमच्या दवाखान्यात जात असल्याने रविवारी संध्याकाळी आम्ही आवर्जून फिरायला जातो.) तेंव्हा आमची एक भाची रुचिरा तिथे फिरताना दिसली. नमस्कार चमत्कार झाल्यावर तिला विचारले एकटी इकडे कुठे फिरते आहेस. त्यावर ती म्हणाली आम्ही इथे जवळच नवीन घर घेतले आहे. आणि आग्रहाने ती आम्हाला तिच्या घरी घेऊन गेली.
सगळे घर दाखवले कुठे काय कसे घर सजवले आहे हे बोलणे चालू होते. ऋतुजा ( तिची मुलगी) आता ५ वर्षांची झाली. ती कुठल्या शाळेत जाते. रुचिराच्या घरी तीन बायका कामाला आहेत. एक दोन्ही वेळचा स्वयंपाक करते. एक झाडू मारणे लादी पुसणे, भांडी घासणे इ स्वच्छतेची कामे करते आणि तिसरी वरकामाला .
घरी चहापाणी अवांतर गप्पा चालू असताना चालू असताना मी तिला विचारले चिन्मय (तिचा नवरा) कुठे आहे? ती म्हणाली तो ऋतुजाला( तिच्या मुलीला) घेऊन फिरायला गेला आहे.
चिन्मय हा एका मुंबईतील मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत चांगल्या पगारावर आहे.
मी रुचिराला विचारले मग तुम्ही एकत्र का जात नाही? त्यावर ती म्हणाली कि पाच दिवस मी ऋतुजाला सांभाळते मग शनिवार रविवार चिन्मयने सांभाळायला नको का? ती त्याची ड्युटी आहे. मी विचारले म्हणजे तो काय काय करतो? ती म्हणाली त्या दोघांना सुटीचा असते. मग तो तिला उठवतो ब्रेकफास्ट करवतो अंघोळ घालतो जेवायलाही घालतो. दोन दिवस तिची पूर्ण काळजी त्यानेच घ्यायची.शनिवार रविवार मला पूर्ण फ्री
माझ्या तोंडावर आले होते कि मग शनिवार रविवार तू नोकरी करायला जातेस का? पण मी थांबलो.
बाहेर पडल्यावर बायको म्हणाली हि घरीच तर असते (गृहिणी) आहे. नवरा बिचारा सालस आहे पाच दिवस मानेवर खडा ठेवून काम करतो भरपूर पैसे मिळवतो. हि इथे राणीसारखी राहते. मग हा कसला हिशेब?
पाच दिवस मी सांभाळते तर दोन दिवस नवऱ्याने पूर्ण वेळ सांभाळायचे.
घरात कामाला तीन बायका आहेत.चांगले नउ हजार रुपये बायकांवर खर्च करते आहे.(चहा पाण्याच्या वेळेस स्वयंपाकघरात हि माहिती काढून झाली होती). मुलगी चार तास शाळेत जाते. सगळ्या कामाला बायका आहेत. पाच दिवस आरामच तर असतो. मग दोन दिवस मुलीला संपूर्ण नवर्याकडे द्यायचे हा कसला हिशेबीपणा.
मी अजून विचार करतो आहे. आपलीच भाची आहे ती बरोबर का बायको म्हणते ते बरोबर?
(सत्यकथा नावे बदलून)
💬 प्रतिसाद
(291)
स
संदीप डांगे
Fri, 09/02/2016 - 12:12
नवीन
बीड ते बार्शी च्या मधोमध आहे.
- Log in or register to post comments
म
मोदक
Fri, 09/02/2016 - 12:15
नवीन
..आणि ते बॉर्डरला वगैरे नाहीये.
मारवाजी.. तुम्हाला हिशेब चुक्याच. ;)
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Fri, 09/02/2016 - 14:27
नवीन
ते जैन् साधू कुंथुनाथामुळे कुंथलगिरी म्हणून प्रसिध्द आहे.
जवळच उजनी म्हणून एक गाव आहे तेथे सुंदर खवा अन बासुंदी मिळते. एरीयात खूप खवाभट्ट्या आहेत.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Fri, 09/02/2016 - 20:58
नवीन
हे आत्मूगुर्जींच्या कुठल्याशा लेखात/कवितेत वाचल्याचे आठवते.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Fri, 09/02/2016 - 21:00
नवीन
नको बोकेशा. इस्टॉप इथेच.
बुवांना माहीत नव्हते त्यावेळी.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Fri, 09/02/2016 - 11:53
नवीन
तात्पर्य : इथून पुढे कोणी काका मामानी माहिती विचारली की जपून द्या , शकयतो कमीच द्या
- Log in or register to post comments
म
मोदक
Fri, 09/02/2016 - 11:56
नवीन
ते ठाण्याचे एक मिपाकर साहेब तुमचे काका / मामा आहेत त्यांना उद्देशून आहे का हे..?
- Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा
Fri, 09/02/2016 - 12:03
नवीन
कस्लं काय घिऊन बस्लाय राव.....ह्ये आनिक कुटून कळलं तुमास्नी ?
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Fri, 09/02/2016 - 12:17
नवीन
माझा कोणी काका मामा नाही
- Log in or register to post comments
न
नाखु
Sat, 09/03/2016 - 05:37
नवीन
मी कुणाचा काका, मामा (झालेलो) नाही हे का लिहिले नाहीस हातासरशी...
सुचवणी काका नाखु
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Fri, 09/02/2016 - 11:57
नवीन
किंवा सरळ म्हणा, "तुम्हाला काय करायचा हो भोचकपणा?"
आम्ही तर असेच म्हणतो, म्हणून आमच्याकडे भोचकपणा करणारे येतंच नाहीत. तेवढाच 'आराम'!!
(तो अविनाश कुलकर्णींचा कावळे वाला धागा जस्ट आत्ता आठवला.. शप्पथ!)
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
Fri, 09/02/2016 - 12:00
नवीन
मुलाला सांभाळायची ड्युटी हा शब्द आजकाल सर्रास वापरला जातोय खासकरुन आयटीमध्ये.
त्यात काहीही हिशोबीपणा नाही, फक्त जार्गन आहे. मुलीला सांभाळणे फिरायला घेऊन जाणे आदी.
नवाआई, बाळाला सांभाळतेय म्हणुन कैक नवबाबा चहा नाष्टा करायला शिकलेत.
- Log in or register to post comments
च
चिनार
Fri, 09/02/2016 - 14:39
नवीन
बाकी पेढ्यांच म्हणाल तर आमच्या अकोल्याजवळ कापशी नावाचे एक खेडे आहे. तिथल्या पेढ्यासारखा पेढा आजवर खाल्ला नाही. अप्रतिम..
कारण माहिती नाही पण तो कंदी पेंढ्यांइतका फेमस नाहीये. शिवाय तो कापशीच्या बाहेर कुठेही मिळत नाही.
संदीप अन बोका भौ..तुम्ही खाल्ला असेल कदाचित
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Fri, 09/02/2016 - 14:49
नवीन
हाय की नाही.. मंग म्हंता मले बोलता म्हणुन...! अवं आमची शिक्रेटं फोड्याच्या कामावर लावलं हाय काय कोणं तुमाले शिक्रेट एजंट चिनारभौ?
कापशीचा पेढा आणि वाघोली (गांधीग्राम) ची चिक्की >> आमी गुळपट्टी म्हंतो त्याले >> लय फेमस आहे. पण फक्त आकोल्यातच. वाघोलीची गुळपट्टी लोणावळ्याले भारी पडते अर्ध्या राती. लोणावळ्याची लय फेमस म्हणून चिक्की खाल्ती पैल्यांडाव, तवा म्हणो अबे ह्याच्यापेक्षा खतरा तं माली माय बनोते, आमच्या इकडे घराघरात अशा गुळपट्ट्या हमेशाच बनोतात, त्याच काय खास व्हय काय म्हाईत. ह्या पुण्यामुंबईवाल्याईचं आपल्याले काय समजत नाही राजेहो.
कसं आहे, आम्ही आमचे सिक्रेट जपून ठीवतो, म्हणुन चव टिकून रायते, अन् तुम्ही फोडा. कुटी न्याच्या लाइकीचे नै चिनार भौ तुम्ही! आता अमरावती-आकोल्यात खादाडीची ठिकाणे असा धागा काढा तेच तुम्हाले शिक्षा.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Fri, 09/02/2016 - 21:00
नवीन
वा वा! आत्या बनवायची आम्ही भाचरं गेलो अकोल्याला की! कापशीचे पेढे खाल्ल्याचं आठवत नाही. तसंही गोड आणि माझा फार संबंध नाहीये.
- Log in or register to post comments
च
चिनार
Sat, 09/03/2016 - 06:33
नवीन
आवं कोन्या जमान्यात रायता तुम्ही संदीप भौ...तुमची शिक्रेट आता शिक्रेट नाही ऱ्हायले..इथं डाबकी रोडचं नाव BBC वर चमकू ऱ्हायलं त कापशीचे पेढे का म्हून मांग ऱ्हायतीन?..अन अकोल्याचे पोट्टेच त बोंबलते कापशीचे पेढे ,कापशीचे पेढे म्हून...
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Sat, 09/03/2016 - 06:41
नवीन
त्या बाकीच्या गंजाले आग लावा फनकटाच्या!!, डाबकी रोड काहाले बीबीसी वर आला थे सांगा
- Log in or register to post comments
च
चिनार
Sat, 09/03/2016 - 06:48
नवीन
अहो ते लय जुनी बात हाय बाप्पू...92-93 च्या दंगलीत अकोला पेटलं होतं..तेंव्हा BBC वर डबकी रोडवरचं फुटेज दाखवलं होतं असं ऐकून हाय..
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sat, 09/03/2016 - 07:45
नवीन
चला, पुण्यात आता कापशीचे पेढ्यांची आणि वाघोलीच्या गुळपट्टीचं दुकान टाकाले हरकत नाही. कोथरुड भागात पाऊन ठेवा एकांदा गाळा..
- Log in or register to post comments
च
चिनार
Sat, 09/03/2016 - 09:00
नवीन
हे पाहून घ्या आता..मंग म्हंता मले बोलता म्हून..
आमचावाला बिझीनेस प्ल्यान कायले साऱ्यासमोर मांडता..कॉम्पीटीशन येते ना राजेहो मंग..
तुम्हाले म्हून सांगतो..कापशीचे पेढे, गुळपट्टी,समोसे नं गिला वडा, सांबारवडी, भाकरी नं मिरच्याची भाजी असा फुलफ्लेज हॉटेल टाकायचा प्लॅन हाय..
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Sat, 09/03/2016 - 04:36
नवीन
कापशीचे पेढे!!!! गांधीग्राम वाघोली ची गुळपट्टी !!!!!!!
नका नका रे दुष्टांनो असले शब्द वापरू माझे कोमल हृदय भग्न होते आठवणीने, अहाहा!!! अकोटल जाताना पावभर गुळपट्टी घेणेग चोहोट्टा बाजारला खल्लास गरम भजे अन खुरासनी मिरच्या त्या खाल्ल्या का गाडीचा एसी 5 वर करून गुळपट्टी खात तोंड गार करणे! सगळीच मजा.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Sat, 09/03/2016 - 07:17
नवीन
जहाल असते काय एकदम? हा शब्द ऐकलेला नाही. खुरासन्यावी चटणी माहिती आहे.
- Log in or register to post comments
च
चिनार
Sat, 09/03/2016 - 07:28
नवीन
म्हणजे बहुतेक तेलात तळलेल्या आणि मीठ लावलेल्या जहाल मिर्च्या
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Sat, 09/03/2016 - 08:18
नवीन
लवंगी मिर्चीला खुरासनी म्हणतात वऱ्हाडीमध्ये, तुम्ही जी खुरासनीची चटणी म्हणता आहात त्या काळ्या तेलबिया असतात कारळ्याच्या त्यालाच नाशिक बागलाण खानदेशात खुरासनी म्हणतात, आपल्याकडे ही एक हिरवी मिर्ची असते, बोटाच्या दीड पेरा इतकी लंबी, भयानक म्हणजे भयानक जास्त तिखट, नागा चिली अन सिक्कीमीज दले खुरसानी मिर्ची नंतर भारतात तरी हिचाच नंबर लागत असावा, गुंटूर चिली मार्केट मध्ये प्रसिद्ध आहे ही मिर्ची. तिकडे ही मिर्ची इंडस्ट्रियल वापराकरता खरेदी विक्री होते (तेल, भुकटी स्वरूपात अर्क काढून चिप्स, पॅक नमकीन निर्मात्या कंपन्यात वापरायला) , ही मिर्ची कांडप मशीनमध्ये घालून पाहायचा प्रयोग करणारा माणूस दोन महिन्या करता टेम्पररी आंधळा झालेला मी स्वतः पाहिलाय, अश्या ह्या मिरच्या हिरव्या असताना मात्र अतिशय मस्त लागतात चवीला (अर्थातच जहाल तिखट) थोड्या मिरच्या बचकभर लसूण जिरं अन सांबार पाने वापरून तुफान ठेचा बनतो ह्या मिरच्यांचा :)
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Sat, 09/03/2016 - 19:59
नवीन
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Sat, 09/03/2016 - 19:59
नवीन
नंतर कराचीमधला मुक्काम फारच लांबला होता! ;)
- Log in or register to post comments
व
वामन देशमुख
Fri, 09/02/2016 - 16:38
नवीन
काय तरी चर्चा चाललीय बै!
पेढा म्हणजे आोठ तर मग लाडू म्हणजे काय?
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Fri, 09/02/2016 - 18:14
नवीन
बोट
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Fri, 09/02/2016 - 18:42
नवीन
आरा गप की मुडद्या
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Fri, 09/02/2016 - 18:42
नवीन
आरा गप की मुडद्या
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Fri, 09/02/2016 - 19:04
नवीन
गपलो.
.
.
पेढे दे की.
- Log in or register to post comments
म
मुक्त
Fri, 09/02/2016 - 18:21
नवीन
डॉ. तुमच्या भाचीने एवढ्या जवळ घर घेतले तरी तुम्हाला माहित नाही.
तुम्हाला घरभरणीला बोलावले नाही का.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 09/02/2016 - 18:28
नवीन
अहो सक्खी नाही म्हणून तर दुरूनच पाहतो आहे.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Fri, 09/02/2016 - 18:34
नवीन
तरीच.....
- Log in or register to post comments
स
स्रुजा
Fri, 09/02/2016 - 18:32
नवीन
लोल.. कुणाचं काय तर कुणाचं काय.
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Fri, 09/02/2016 - 18:38
नवीन
आता वाटायचे का पेढे?
कोण नक्की म्हणलं होतं म्हणे पेढे वाटेन म्हणुन?
- Log in or register to post comments
म
मोदक
Fri, 09/02/2016 - 18:42
नवीन
कोण का म्हणेना.. मी तुला पेढे देतो.
इकडे ये आणि घेवून परत जा.
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Fri, 09/02/2016 - 21:53
नवीन
तू? "पेढे" देणारेस?? आँ????!!!!
;)
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Fri, 09/02/2016 - 21:53
नवीन
तू? "पेढे" देणारेस?? आँ????!!!!
;)
- Log in or register to post comments
म
मुक्त
Fri, 09/02/2016 - 18:39
नवीन
चला पेढे येऊ द्या.
- Log in or register to post comments
स
सूड
Fri, 09/02/2016 - 18:40
नवीन
झाले एकदाचे २००, धागा फॉलो करतच आहात तुम्ही "पेढ्यांचं प्रॉमिस करणारे". काढा पेढे, गेला बाजार तुमच्या त्या गौरीशंकरच्या पेढ्यांचा फोटो टाका!!
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Fri, 09/02/2016 - 18:47
नवीन
अरे आता खरी ग्रीप पकडली धाग्याने, काल आम्ही फुंकून फुंकून छातीचे भाते मोडले, तेव्हा काय पेटला नाय, आताशा जरा धूर निघतोय,
- Log in or register to post comments
म
मोदक
Fri, 09/02/2016 - 18:49
नवीन
२०१४ ला अडवाणींनी हाच विचार केला असेल.. आम्ही इतक्या खस्ता खाल्ल्यानंतर आता कुठे पार्टीला अच्छे दिन आले.
:))
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Fri, 09/02/2016 - 19:01
नवीन
=)) लैच खंग्री कॉमेंट सुचली होती मोदक भाऊ पर बस आप हमारे अपने हो करके आवऱ्या ;)
- Log in or register to post comments
म
मोदक
Fri, 09/02/2016 - 19:17
नवीन
टाका की इथे बापू.. टाईमपासच सुरू आहे. :))
नैतर व्यनीत टाका मग...
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Fri, 09/02/2016 - 19:19
नवीन
नगं नंतर पहाय यिल
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Fri, 09/02/2016 - 19:05
नवीन
झालं का...!? तेवढंच राहिले होते... ;)
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Fri, 09/02/2016 - 19:08
नवीन
दोनहजारचौदामे हमने खाया खस्ता
तभी मिला तुमको पेढेपरका पिस्ता
.
कवि: पेढाबॉक्स पाठवले
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
Fri, 09/02/2016 - 18:47
नवीन
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Fri, 09/02/2016 - 18:47
नवीन
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- ›
- »