नमस्कार,
मी सध्या उर्दू शिकत असून मला मराठी-उर्दू शब्दकोश हवा आहे. तरी कोणता शब्दकोश विकत घेऊ ज्यात विपुल शब्दसंपदा असेल? जाणकारांकडून मार्गदर्शन हवे आहे.
गालिब खुसरो आणि पवित्र पुस्तक एवढे तीनच उर्दू पुस्तके मला ऐकून माहीती आहेत.
बादवे तुम्ही उर्दू कशासाठी शिकताहात? कुछ खास वजह?
(आपली सहज क्युरिऑशिटी म्हणून इचारले हं. राग मानू नका)
उर्दु मराठी, वा मराठी उर्दू असे चांगले शब्दकोष मला आढळले नाहीत. उर्दु इंग्रजी वा इंग्रजी उर्दु असे शब्दकोष जास्त चांगले आहेत. ऑक्सफर्डने तसे शब्दकोष छापलेले आहेत. (आपण उर्दू लिपी जाणत असाल असे गृहित धरतो आहे. नाहीतर शब्द शोधणे, वाचणे हे अवघड आहे).
गुगल ट्रान्सलेटमधे उर्दू भाषेतील शब्दांचा दर्जा फार चांगला वाटत नाही. अनेकदा एकच प्रतिशब्द सुचवतात. वास्तविक त्या भाषेत त्या अर्थाचे अनेक पर्यायी शब्द असताना केवळ एकच दाखवतात. कित्येकदा इंग्रजी शब्दच उर्दूत लिहून अनुवाद म्हणून सादर करतात!
उर्दू लिपी नाही, लिपी "नस्तलिक" आहे, भाषा उर्दू आहे, नस्तलिक वापरून लिहिल्या जाणाऱ्या इतर भाषा म्हणजे फारसी, अरेबिक ह्या आहेत, हे बरेचसे देवनागरी लिपी सारखे आहे, हिंदी भागातला माणूस देवनागरीत लिहिलेली मराठी वाचू शकतो पण त्याला उच्चार अन शब्दार्थ ओ का ठो कळत नाहीत , बरेचसे तसेच आहे हे. लिपी एक आहे त्यामुळे फारसी जाणकार उर्दू वाचून घेईल पण त्याला मतितार्थ न कळण्याची शक्यता अधिक असते?
बरोबर आहे. उर्दू ही लिपी नाही पण बहुतांश ती नस्तलिक वळणाने लिहिली जाते. त्यामुळे उर्दू लिपी म्हणजे नस्तलिक असे म्हणायचे होते. अर्थात हे असे म्हणणे पुरेसे काटेकोर नाही हे मान्य. जसे हिंदी व मराठी देवनागरीत लिहिल्या जातात. इंग्रजी रोमन लिपीत इ.
मला वाटते बीबीसी उर्दू वगैरे नक्श वळणाची असते.
अरबी भाषेत काही ध्वनी नाहीत जे उर्दूत आहेत. जसे प, च, ग. फारसी भाषिकांनाही ती उणीव जाणवली म्हणून त्यांनी नवी अक्षरे ह्या लिपीत जन्माला घातली घातली. आणि उर्दूने ती घेतली. कारण अशा ध्वनींशिवाय ह्या बोलीभाषा लिहिताच येणार नाहीत.
फारसी आणि उर्दू ह्यात उदंड शब्द एकसारखे आहेत. त्यामुळे थोडा प्रयत्न केला तर काहीतरी कळेलच.
उर्दू आणि अरबी ह्या भाषेत प्रचंड फरक आहे. अनेक शब्द सारखे असले तरी त्यांचे अर्थ थोडे वेगळेच आहेत. उदा. अजनबी: उर्दूत अनोळखी तर अरबीत परदेशी. हिंदी आणि मराठीतला फरक त्यामानाने खूपच कमी आहे. उर्दू आणि फारसीतला फरक ह्या दोन टोकांच्या मधे कुठेतरी आहे.
हिंदी आणि मराठीत फार तर एक ळ हे अक्षर असे आहे जे हिंदी भाषिकाला कळणार नाही. पण अरबी माणसाने उर्दू वाचायला घेतले तर तीन चार अक्षरे अनाकलनीय वाटतील. अरबी भाषेतली अक्षरे अरबी पद्धतीने एक तर फारसी वा उर्दूत वेगळीच उच्चारली जातात. फारसीत कर्तव्य ह्या अर्थी फर्झ हा शब्द आहे (उर्दूतही) तो अरबीत फर्द असा उच्चारतात. रमझान (उ/फा) आणि रमादान (अ). माझी म्हणजे भूतकाळ (उ/फा) तर अरबीत मादी.
नस्तलिक म्हणजे???
नस्तलिक म्हणजे एक अर्थ सभ्य ,सुसंस्कृत, शिष्ट या अर्थाने होतो
व दुसरा अर्थ म्हणजे उर्दु लिहीण्याची एक विशिष्ट लिपी या अर्थाने होतो.
श्रीपाद जोशींच्या नितिन प्रकाशन च्या कोषात हा अर्थ दिलेला आहे.
बाय द वे नर्गिस शब्दाच्या वापराची मजा वाटते
ये नर्गिसी आखे ही उपमा काय कळत नाही. म्हणजे डोळे हे जुल्मी गडे (की जुलुमी लिहावे ) तला "जुलुम" मुळ उर्दु असला तरी मराठीत छान वाटतो. मृगनयनी ने डोळे हरणासारखे सुंदर हे ही कळते. किंवा ग्रेसचे गाईचे डोळे व्याकुळ पटकन व्याकुळता नजरेसमोर उभी राहते.
पण नर्गीसी ऑखे म्हटल तर हे फुल डॅफोडील च नार्सिसस फ्लॉवर असा अर्थ आढळतो. यातला नार्सिसस व नर्गिस शब्दातल साम्य भारी आहे. फुला कडे बघुन तरी कळत नाही की ये तेरी नर्गिसी ऑखे असे का म्हणतात ते असो कवितेची फार चिरफाड करु नये इतक मात्र खर.
मी सुद्धा उर्दू लिपी वाचण्यास शिकलो आहे. " हिंदी-उर्दू टिचर " नावाचे पुस्तक धुळ्याच्या बस-स्थानकावरुन अवघ्या अडीच रुपयास विकत घेतले होते,( १९७१ साली.).आजही ते पुस्तक बाजारात उपलब्ध आहे( किं. २० रुपये ).हिंदी सिनेमातील बहुतेक सुन्दर गाणी ( ५० व ६० च्या दशकातील ) म्हणजे प्रसिद्ध शायर लोकांनी रचलेल्या गजल आहेत असे समजल्यावरुन
उत्तम गजला, मुळातुन वाचण्यासाठी,उर्दू लिपी शिकावयास हवी असा ठाम निश्चय केला आणि स्वयं-अध्ययन करून उर्दू लिपी आत्मसात केली.
दुसरे महत्वाचे कारण : - पुण्याहून ग.वा.बेहरे यांचे सोबत नांवाचे साप्ताहिक वाचावयास मिळत असे. त्यात ' मुसलमान जगात फेरफटका ' अगर तत्सम नावाचे एक सदर येत असे.त्यातील उर्दूव्रुत्तपत्रातील अनुवादित व संक्षिप्त माहिती वाचून,त्या घडामोडी मुळातुन वाचता यायला हव्यात असे फार वाटत असे. कारण मराठी अगर हिंदी पेपर " ते " आरामात वाचू शकतात, पण आमच्यासाठी ' उर्दू ' व्रुत्तपत्र किंवा पुस्तके म्हणजे " काला अक्षर ,भैंस बराबर " ! एक अक्षर कळणार नाही.म्हणून उर्दू लिपी शिकायचीच्, हे मनाने पक्के केले. उर्दू लिपीतील अक्षर-ओळख झाल्यावर , मोठ्या टाईपातील अक्षरे, हळु हळु वाचता येऊ लागली. धुळे येथे एकदा मुसलमान बाहुल्य असलेल्या वस्तीत फिरत असतांना , एका चौकात ,एका फळ्यावर उर्दू मजकुर लिहिला होता. मला त्यावेळी फक्त शीर्षकच वाचता आले, ते असे होते " कौम को धोखा " .त्यावेळी मनात आले " हे " भारतात सर्व सोयी, सवलती घेवून रहातात आणि यांना कसला आला आहे 'धोखा " ? बारिक अक्षरातील मजकूर वाचता आला नाही याची खंत मनात होतीच. म्हणुन सुद्धा उर्दू लिपी शिकलीच पाहिजे असे ठरविले. आज मला उर्दू लिपीतील व्रुत्तपत्र वा पुस्तक ९०% वाचता येतात. एखाद दुसरा शब्द अदला तर एखाद्या जाणकारास विचारुन घेतो,अन्यथा संदर्भाने अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो.गजल वाचण्याचा आनंद मिळतो तो वेगळाच. प्रत्येकाने एकतरी परकीय भाषा शिकायलाच हवी. वरील कारणासाठी मी उर्दू ची निवड केली इतकेच.
उर्दू साहित्यात, फारसी भाषेतील अक्षरे सुद्धा मिसळलेली असल्याने, उर्दू बरोबर फारसी भाषा पण यायला हवी.
उर्दू लिपी शिकण्यासाठी पीडीएफ मध्ये इंटरनेट्वर भरपुर पुस्तके उपलब्ध आहेत. शब्द-कोश जरी असला तरी लिपी शिकता शिकता , बर्याच शब्दांशी परिचय होतोच.
आपका जज्बा तो वाकई काबिले तारीफ है! एक दुरूस्ती फक्त - उर्दू ही परकीय भाषा मुळीच नाही. फारसी आणि हिंदी यांच्या मिश्रणातून तयार झालेली आणि शंभर टक्के भारतीय भाषा आहे उर्दू. फाळणीपूर्वी उत्तर भारतात शिक्षणाचं माध्यम उर्दूच होतं. आजही उत्तर भारतातल्या रेल्वे स्टेशन्सची नावं उर्दूत लिहिलेली दिसतात. अनेक नेत्यांना देवनागरी हिंदी वाचता येत नसे. माझ्याकडे पुरावा नाही पण पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंनाही उर्दूच वाचता यायची, देवनागरी नाही. ते त्यांचं हिंदीत करायचं भाषण (महत्वाचे मुद्दे) उर्दूत (लिपीत) लिहायचे - असं वाचलेलं आहे.
ती परकीय भाषा असल्याचा गैरसमज पसरण्याचं कारण पाकिस्तानने उर्दू आपली अधिकृत भाषा असल्याचं घोषित केलं हे असावं. या न्यायाने उद्या बंगाली हीसुद्धा परकीय भाषा म्हणायला हवी. अजून एक गैरसमज (जो तुमच्या प्रतिसादात नाहीये) म्हणजे उर्दू ही मुस्लिमांची भाषा आहे. हेही साफ चूक आहे. एक तर भाषेवर कुठल्याही धर्माची मालकी असू शकत नाही. दुसरं म्हणजे अनेक हिंदू साहित्यिकांनी उर्दूत लिहिलंय आणि अप्रतिम लिहिलंय. मुन्शी प्रेमचंद आणि आजच्या काळात डाॅ.गोपीचंद नारंग ही उदाहरणं आहेत.
सहमत १०१% - उर्दू भारतीय भाषा आहे!
मलाही उर्दू लिपी (नस्तलिक?) शिकायची इच्छा आहे, कधी जमतेय काय माहित!
गुलजा़रलाही (संपुर्णसिंग कालरा) ह्या उर्दू साहित्यिकांत सामिल करून घ्या!
नितीन प्रकाशन चा श्रीपाद जोशी यांचा शब्दकोश उर्दु मराठी हिन्दी शब्दकोश अतिशय सुंदर आहे मी वापरलेला आहे.
शिवाय डॉ. विनय वाईकर व डॉ. जरीना सानी यांचा आइना ए गजल पण सुंदर आहे. यात शब्दाच्या अर्थाबरोबर शेरही दिलेले आहेत. हा फार च सुंदर आहे.
आणि एक भव्य प्रोजेक्ट होता अनेको वर्षांच्या परीश्रमातुन उभा राहीलेला महाराष्ट्र राज्य संस्कृती महामंडळाचा बहुधा त्याविषयी नुसतच वाचलेल आहे. तो बहुधा उर्दु मराठीच शब्दकोश होता मात्र त्याला अनेको वर्ष प्रकाशनाचे भाग्य लाभले नाही.
वरील दोन्ही बिगीनर्स साठी उत्कृष्ठ आहेत. एक एक नविन शब्द शोधण्यातली गंमतही असते. गालिबच्या साठी जर वाचायच असेल तर एक जळगावच्या सौ. देशमुख म्हणुन आहेत त्यांचा एक गालिब समझने की एक और कोशीश त्यात गालिब च्या दिवान मधील प्रत्येक शेर गझल चे डिटेल मराठी अनुवाद आहेत त्यानेही अनेक नविन शब्दाचे अर्थ कळतात.
म्हणजे तो डायरेक्ट शब्दकोश नाही पण मराठी अनुवाद व दर्जेदार असल्याने आपली मजा वाढते इतकेच.
नुकताच एक नविन शब्द कळला तो सांगावासा वाटतो उदा.
ताज आता इथे त्याचा एक वेगळा अर्थही आहे. म्हणजे बघा ताजबाज यावरुन याचा अर्थ "लौंडेबाजी" करणारा पुरुष,
होमोसेक्शुअल या अर्थाने. ताज. म्हणजे असा कोवळा मुलगा ज्याच्याबरोबर हे कृत्य होते असा "लौंडा" ताजबाजी म्हणजे
अशी सवय असणारा.
हे वसंत पोतदारांचं पुस्तकही गालिबची छान माहिती देतं. पोतदार स्वतःही गालिबप्रमाणेच अजब आणि आझाद होते त्यामुळे त्यांनी गालिबचं व्यक्तिमत्व छान पकडलेलं आहे.
यह लाश-ए-बेकफन असद-ए-खस्ता जॉ की है
हक मगफिरत करे, अजब आजाद मर्द था
इन आबलो से पॉवो के घबरा गया था मै
जी खुश हुआ है राह को पुरखारं देखकर.
काय सुंदर झोत टाकलाय पोतदारांनी गालिबवर टेरीफीक पुस्तक आहे राव.
याच पुस्तकानंतर गालिब च्या फारसीतल्या कवितांच महत्व कळलं होत. त्या कवितांविषयी गालिबला वाटणारा अभिमान.
माझ खर काव्य वाचायच तर माझ्या उर्दु नाही फारसी कविता वाचाव्यात अशा अर्थाचा त्याचा एक शेर. पोतदारांनी त्या पुस्तकात दाखवलेली छोटीशीच त्याच्या पर्शियन पोएट्रीची झलक. तेव्हापासुन आतापर्यंत गालिब च्या पर्शीयन कवितासंग्रह वाचण्याची फार तहान लागलेली आहे बोकोबा. पण आपल्याला चमचाने भरवाणारा अनुवाद हवा. समजावुन सांगितलेला अर्थासहीत.
आपले जयंत कुलकर्णी सर मनात आणल तर करु शकता पण ते घेतील तर
त्यांची एक स्वाक्षरी होती पुर्वी जुनी
किताब का पहला और आखरी अक्षर गायब अशी
शोधु शोधु आपण गालिब ची पर्शियन पोएट्री शोधुन काढु एक दिवस
मेरी तामीर मे मुज्मत है नीयत मेरे खराबी की
हयूला बर्के खर्मन का, है खून-ए-गर्म देहकां का!
आणि
जी ढूंढता है फिर वही फुरसत के रात दिन
बैठे रहे तसव्वुर-ए-जानां किए हुए
हे वाचल्यावर उर्दू शिकायची प्रचंड इच्छा झाली. सुरूवात पण केली - पोतदारांकडेच पण त्यांचे व्याप हजार. माझे अगदी त्यांच्याएवढे नसले तरी शे-दीडशे. नाही जमलं. आता पोतदारही नाहीत. :(
परकीय भाषा याचा अर्थ जी आपली मात्रुभाषा नाही ती एव्हढ्याच मर्यादेपावेतो. उर्दू लिपीचा वापर,उर्दू शाळातुन होतो, पण त्या शाळेत एकही मराठी मात्रुभाषा असणारा विद्यार्थी प्रवेश घेत नाही. अन्य माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
मी अस करतो.
काही उर्दु चॅनेल्स आहेत ते पहावेत. बहुतांश ते अत्यंत पुअर क्वालिटी व रीलीजन सेंट्रीक असतात. म्हणजे धार्मिकच कार्यक्रम त्यात फार असतात. मात्र तरीही त्यातले जे चर्चेचे न्युज चे कार्यक्रम आहेत ते येता जाता पाहत राहावेत. त्याने काय होत उच्चारांची मजा कळते. शब्दाचा वाक्यात प्रत्यक्षात कसा उपयोग केलाय ते कळत.
अजुन एक खरोखर चांगला उपाय म्हणजे मुशायरे अटेंड करावेत. अन्यथा यु ट्युब वर देखील अनेक चांगले मुशायरे आहेत.
यात डॉ. बशीर बद्र, मिराज फैजाबादी, अली सरदार जाफरी, इ. अनेक दिग्गजांचे काव्य वाचन असते. ते फार सुंदर व दर्जेदार व अप्रतिम शैलीत असते. त्यात त्यांचा बोलण्याची उच्चारांची शैली फारच सुरेख असते. त्यातही मात्र "उकिरडा उपसारे रत्नांसाठी " हा प्रकार असतोच. कारण मध्येच नॉस्टॅल्जीक झालेले " हम भी कभी शाह थे इस मुल्क के " टाइप बकवास असते, दंभ /कचरा असतो अनेकोनेक सुमार ही असतात. पण सुरुवातीला तुम्हाला बेसीक शब्दसंग्रह वाढवण्यास हे चालु शकते. नंतर जसजसे तुम्ही क्रिटीकली सिलेक्शन करत जाल तुम्हाला योग्य शायर योग्य मुशायरा निवडता येइल. एक एक शायराचा परीचय होइल. ऐसी अक्षरे संस्थळावर एक मिलींद म्हणुन आयडी आहेत त्यांचे लेख प्रतिसाद वाचत चला. ते एक असामान्य दिग्गज आहेत या भाषेचे.
कोलंबिया युनिव्हर्सीटीच्या संस्थळावर इंग्रजी अनुवाद आहेत काहीं मोठ्या शायरांचे. अर्थात तुम्हाला उर्दु शायरीच्या प्रेमावरुन शिकावीशी वाटतेय असा गोड गैरसमज करुन लिहीतोय.
बघा त्याहुन सुंदर मार्ग म्हणजे जमल्यास मैत्री करा एखाद्या जाणकार मुलीशी. मग एकदम वेग वाढेल भाषा शिकण्याचा.
पुण्याला, बीजे मेडिकल कॉलेजच्या होस्टेलजवळ शासकीय फोटोझिंको प्रेस आहे. तिथे उर्दू-मराठी शब्दकोश १४ रुपयांना विकत घेतला होता. त्याला खूप वर्षे झालीत, पण तिथे चौकशी करून पहायला हरकत नाही.
तुम्हां सर्वांच्या प्रतिसादाबदृल धन्यवाद.
मी राहायला नाशिकला असून सारडा सर्कल (नाशिक) येथे उर्दू शाळेमध्ये १ वर्षाचा सरकारमान्य उर्दू डिप्लोमाचा कोर्स मी करत आहे. कोर्स पूर्ण झाल्यानंतर मला सर्टिफिकेट मिळेल. डॉ. यु.म.पठाणांचा शब्दकोश आहे मराठी-उर्दूचा असे मी ऐकून आहे.
महाविद्यालयात एफ.वाय.बी.कॉमला असतांना एका मराठीच्या प्राध्यापकांनी भाषणादरम्यान विचारले होते, "जगातील गोड भाषा कोणती"? अर्थातच कोणी मराठीचा गजर करतोय, कोण हिंदीच्या नावे आरोळ्या ठोकतोय तर कोणी काही युरोपीय भाषासमूहांची नांवे घेतली. नंतर प्राध्यापकांनी सांगितले की उर्दू भाषेमध्ये जी गोडी आहे ती जगातील इतर कोणत्याही भाषेत नाही. तेव्हा मी उर्दू भाषा शिकण्याचा निर्णय घेतला.
सलिके से हवाओं में वो खुशबू घोल सकते है,
अभी कुछ लोग बाकी है जो उर्दू बोल सकते है|
पण शब्दांवर केले जाणारे आघात किंवा accents उर्दूला एक वेगळाच भारदस्तपणा देतात.मजा म्हणजे उर्दूचा महाकवी मिर्झा गालिब उर्दूपेक्षा फारसी भाषेला जास्त पसंती देत असे. आपला मित्र आणि शिष्य मुन्शी हरगोपाल ' तफ्ता ' याला पाठवलेल्या एका पत्रात गालिब म्हणतो की मी उर्दूत माझं म्हणणं मांडू शकत नाही कारण त्यात फारसीची इबारत आराई (व्यक्त होण्याची क्षमता) नाहीये.
प्रत्यक्षात त्याने उर्दू भाषेत जबरदस्त काव्यरचना केली. एवढंच नाही तर उर्दू नस्र (गद्य) याचाही तो बादशहा मानला जातो. आणि त्याने गद्य काय लिहिलं तर फक्त मित्रांना पत्रं.
rekhta.org हि एक खूप चांगली आणि उपयुक्त website आहे उर्दू शिकण्यासाठी. त्यात कुठल्याही शब्दावर क्लिक केलं कि त्याचा अनुवादित अर्थ मिळतो. ऑडिओ, व्हिडिओ पण आहेत. मस्त site आहे.
नस्तलिक म्हणजे???नस्तलिक म्हणजे एक अर्थ सभ्य ,सुसंस्कृत, शिष्ट या अर्थाने होतो व दुसरा अर्थ म्हणजे उर्दु लिहीण्याची एक विशिष्ट लिपी या अर्थाने होतो. श्रीपाद जोशींच्या नितिन प्रकाशन च्या कोषात हा अर्थ दिलेला आहे. बाय द वे नर्गिस शब्दाच्या वापराची मजा वाटते ये नर्गिसी आखे ही उपमा काय कळत नाही. म्हणजे डोळे हे जुल्मी गडे (की जुलुमी लिहावे ) तला "जुलुम" मुळ उर्दु असला तरी मराठीत छान वाटतो. मृगनयनी ने डोळे हरणासारखे सुंदर हे ही कळते. किंवा ग्रेसचे गाईचे डोळे व्याकुळ पटकन व्याकुळता नजरेसमोर उभी राहते. पण नर्गीसी ऑखे म्हटल तर हे फुल डॅफोडील च नार्सिसस फ्लॉवर असा अर्थ आढळतो. यातला नार्सिसस व नर्गिस शब्दातल साम्य भारी आहे. फुला कडे बघुन तरी कळत नाही की ये तेरी नर्गिसी ऑखे असे का म्हणतात ते असो कवितेची फार चिरफाड करु नये इतक मात्र खर.