Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिपा दुसऱ्या क्रमांकावरून प्रथम वर आणायचे कि नाही ?

ए
एकुलता एक डॉन
Tue, 09/06/2016 - 14:47
🗣 113 प्रतिसाद
नमस्कार बऱ्याच दिवसापासून धागा टाकायचा विचार होता पण प्रतिसाद मिळतील कि नाही शंका होती ,निदान आज मिपा च्या वर्धापन दिनाला तरी किती लोक" हिट" चिंतक आहेत ते बघू 23/05/2016 रोजी मी मिपा मराठीतील प्रथम क्रमांकाचे संकेत स्थळ http://www.misalpav.com/node/36133 म्हणून धागा टाकला होता 5000 वर वाचणे पण शेवटी कपिलमुनी http://www.misalpav.com/comment/reply/36133/861663 ह्यांनी सांगितले कि क्रमांक खाली गेला एकाने पण हळहळ किंवा प्रतिक्रिया दिली नाही निदान आजतरी एक होऊ या मिपा प्रथम क्रमांक वर आणायचे तर 1) दररोज निदान 2 वेळा तरी मिपा ला भेट द्या 2) browser ओपन ठेवा मिपा close नका करू 3) आपल्या मित्र मंडळीला मिपा चा दुवा द्या 4)दररोज लेख नाही तर प्रतिसाद तरी नोंदवा ,वाचणे आणि प्रतिसाद संख्या मध्ये खूप फरक दिसतोय आणि सर्वात मुख्य 5) जरा भांडणे कमी करू या

प्रतिक्रिया द्या
58223 वाचन

💬 प्रतिसाद (113)
स
संजय पाटिल Tue, 09/06/2016 - 14:49 नवीन
ओक्के.. नोटेड.
  • Log in or register to post comments
ए
एकुलता एक डॉन Tue, 09/06/2016 - 14:54 नवीन
धन्यवाद पाटील साहेब
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 09/06/2016 - 14:57 नवीन
तुमची कळकळ पोचते आहे. पहिला दुसरा नंबर सतत तसाच राहील असं नसतं ना. जरा मागेपुढे होणारच. चांगले लिखाण सतत मिपावर समोर रहावे यासाठी आपण सगळ्यानीच प्रयत्न केले पाहिजेत. नंबर आपोआप येईल. पहिला नंबर हा अवांतर फायदा आहे. चांगले लिखाण मिपावर येणे हे मुख्य ध्येय असले पाहिजे. कोणी मुद्दाम कचरा आणून टाकत असेल तर त्यावर प्रतिक्रिया न देता तो मागे ढकलून दिला पाहिजे. बरोबर ना?
मिपा वर्धापन दिनाच्या सर्व मिपाकर सदस्य, वाचक आणि त्यांच्या परिवारांना हार्दिक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 09/06/2016 - 16:21 नवीन
कोणी मुद्दाम कचरा आणून टाकत असेल तर त्यावर प्रतिक्रिया न देता तो मागे ढकलून दिला पाहिजे. बरोबर ना?
कचरा आहे हे माहित असेल, दिसत असेल आणि हातात झाडूही असेल तर कचरा साफ करायच्याऐवजी मागे ढकलणे हा कामचुकारपणा आहे...असा माझा अंदाज
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
फ
फेदरवेट साहेब Tue, 09/06/2016 - 16:33 नवीन
भू भू भू भू भू (माणसाच्या भाषेत हॅ हॅ हॅ हॅ हॅ ), कचरा साफ करायचा म्हणले तर पहिला " मुली शोधताना" घालवावा का हो? ;) त्या शिवाय जे "दुत्त दुत्त" "लुऊऊऊऊऊ" वैग्रे कॉमेंट असतात बघा त्या अन त्या देणाऱ्या आयडी समूहाचे काय? राखणदारीला फाटकावर बसतो मिपाच्या, तरी आत काय चाललंय ह्यावर बारीक लक्ष असतं हो आमचं (मिसळपावला इमानदार) ढेल्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Tue, 09/06/2016 - 17:30 नवीन
यझ आयडी + प्रतिसाद खरोखर उडणार असतील (म्हणजे उडवायची धमक + इच्छा असेल) तर माझा एकच नाही तर इतरही असेच टाईमपास म्हणून काढलेले धागे उडवले तरी हरकत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब
स
संदीप डांगे Tue, 09/06/2016 - 17:35 नवीन
+१०००००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
फ
फेदरवेट साहेब Tue, 09/06/2016 - 18:27 नवीन
यझ आयडी + प्रतिसाद खरोखर उडणार असतील (म्हणजे उडवायची धमक + इच्छा असेल) तर माझा एकच नाही तर इतरही असेच टाईमपास म्हणून काढलेले धागे उडवले तरी हरकत नाही भ्वाआआआ (माणसे म्हणतात तसे ब्वार्र) "यझ आयडी " +" प्रतिसाद" ह्यातच समदे आले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
व
वाल्मिक Tue, 09/06/2016 - 20:04 नवीन
टवाळ आवाडे विनोद धागा करते ह्यांनी दुर्लक्ष करावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब
क
कैलासवासी सोन्याबापु Wed, 09/07/2016 - 08:37 नवीन
टका भाऊ, नको लक्ष देऊ, सुखी राहशील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Wed, 09/07/2016 - 10:03 नवीन
खिक्क...ते तर आहेच...मिपा सोडूनपण बरेच कामधंदे आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
प
पैसा Wed, 09/07/2016 - 05:28 नवीन
ज्यांच्या हातात झाडू आहे ते बघतील तो कधी, कसा आणि कुठे वापरायचा ते. आपल्या हातात झाडू नाही ना, मग जे आपण करू शकतो ते करावे. महात्मा गांधीजी म्हणाले “Be the change that you wish to see in the world.” गौतम बुद्ध म्हणाला "अप्प दीपो भव" अर्थात काही बदल व्हायला हवा असेल तर स्वतः हातपाय हलवावे लागतात, तेही योग्य दिशेने. तर माणूस पुढे सरकतो. त्यापेक्षा दुसर्‍याकडे बोट दाखवणे कधीही सोपे असते. The Choice Is Yours.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Wed, 09/07/2016 - 06:24 नवीन
असे असेल तर अशी फ्रेम करून लावायची वाक्ये टंकण्यापेक्षा एकदा झाडू द्याच हातात, दाखवतो फरक पाडून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ग
गॅरी ट्रुमन Wed, 09/07/2016 - 06:45 नवीन
असे असेल तर अशी फ्रेम करून लावायची वाक्ये टंकण्यापेक्षा एकदा झाडू द्याच हातात, दाखवतो फरक पाडून
टका तू झाडू हातात घेतलास तर तुझी खैर नाही.तुला इतके म्हणजे इतके झोडपून काढीन की कुठून एकदा झाडू हातात घेतला असे वाटायला लागेल तुला!! ह.घ्या.हे.वे.सां.न.ला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Wed, 09/07/2016 - 07:12 नवीन
ख्याक, कारुदेत की, मी वैयक्तिकरित्या अंगाला चिटकवून घेत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
प
पैसा Wed, 09/07/2016 - 06:53 नवीन
पुन्हा तू दुसर्‍यांकडे बोट दाखवतो आहेस. बादवे, तुला द्यायला झाडू माझ्याकडे नाही. तो वापरणारे आणि देणारे दुसरेच आहेत. मी मला काय जमते तेवढेच करते. नुसते एका जागी "हे द्या ते द्या" करत बसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Wed, 09/07/2016 - 07:10 नवीन
मी कोणाकडेही बोट दाखवले नाहीये, कोणाला स्वतः:च बोटासमोर येऊन उभे राहायचे असेल तर त्याला मी काहीच करू शकत नाही आणि झेपेल तितके करण्यापेक्षा थोडे जास्त प्रयत्न मलातरी करता येतात आणि खेड्या ते द्या असे मी मागत नाहीये, ते उत्तर होते वरच्या प्रतिसादाला, टोलवा टोलावी मात्र करता येत नाही मला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Wed, 09/07/2016 - 07:15 नवीन
आपण काय लिहिले आहे, दुसरे काय लिहीत आहेत ते नाट वाचा, विचार करा, समजून घ्या आणि मग बोला. बर्‍याच हार्दिक शुभेच्छा! आज बरीच करमणूक आतापर्यंत झाली. आता मला दुसरीही बरीच कामे आहेत. माझ्या घरची आणि मिपाचीही. तेव्हा बायबाय! गणपतीबाप्पा तुम्हाला उदंड सद्बुद्धी देवो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Wed, 09/07/2016 - 07:16 नवीन
अपेक्षित प्रतिसाद, बर्याच मिपाकरांसाठी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
क
कपिलमुनी Wed, 09/07/2016 - 10:03 नवीन
"कोणाला स्वतः:च बोटासमोर येऊन उभे राहायचे असेल" यासाठी माझ्याकडून एक कोरोना विथ लेमन !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Wed, 09/07/2016 - 07:14 नवीन
अपेक्षा नाहीये, ते उत्तर होते मी काय करू शकेन असे विचारल्यावर, बाकी ते आरत्यावगैरेमध्ये आपल्याला इंट्रेस्ट नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
स
स्वलिखित Tue, 09/06/2016 - 17:39 नवीन
-तर मंडळी मला प्रचंड मताने विजयी करा.. -गपे, ते रस्त्याचे काम बघ पहिले , परगती कर, तालुक्यातली पडीक पोरंसोरं चांगल्या कामाला लावअन मग म्हण मला आमदार करा ते पन परचंड मतानी. -निवडुन दिल्यावर करतो की -अहं आता जनता पन खुळी बावळी राहिली नाय.आता पोत काय केल. आधी काम करुन दावा मग बोला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
व
वेल्लाभट Tue, 09/06/2016 - 15:02 नवीन
1) दररोज निदान 2 वेळा तरी मिपा ला भेट द्या
ओढून ताणून कशाला? आपसूक वाटलं पाहिजे भेट द्यावी असं. आणि ते प्रत्येक सदस्याच्या हातात आहे. उत्तम लेखकांसोबतच उत्तम वाचक व प्रतिसादक यांच्या हातात आहे.
2) browser ओपन ठेवा मिपा close नका करू
पुन्हा; असल्या काहीतरी उपायांची गरजच का लागावी?
3) आपल्या मित्र मंडळीला मिपा चा दुवा द्या
हे ठीक. स्वागत.
4)दररोज लेख नाही तर प्रतिसाद तरी नोंदवा ,वाचणे आणि प्रतिसाद संख्या मध्ये खूप फरक दिसतोय
याही गोष्टी उसनं अवसान आणून व्हायला नकोत. लेख असे हवेत की प्रतिसाद द्यावासा वाटेल. व प्रतिसाद असे हवेत की लिखाण करावंसं वाटेल.
5) जरा भांडणे कमी करू या
योग्य. याशिवाय दुर्लक्ष करण्यासारख्या गोष्टी, धागे, सदस्य, प्रतिसाद यांकडे दुर्लक्ष होणं हेही गरजेचं आहे. मिपा क्रमांक एक वर येईलच. पण क्रमांक एक वर यावं म्हणून मिपा उघडा, प्रतिसाद लिहा वगैरे मताचा मी नाही.
  • Log in or register to post comments
ए
एकुलता एक डॉन Tue, 09/06/2016 - 15:05 नवीन
1) दररोज निदान 2 वेळा तरी मिपा ला भेट द्या मिपा वर आणायसाठी का नको? 2) पुन्हा; असल्या काहीतरी उपायांची गरजच का लागावी? seo,bounce rate 4) लेख असे हवेत की प्रतिसाद द्यावासा वाटेल. व प्रतिसाद असे हवेत की लिखाण करावंसं वाटेल. मान्य ,पण प्रतिसाद कौतुक नाही तर काही चुका किंवा improvement साठी पण देऊ शकता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
ज
जेपी Tue, 09/06/2016 - 15:01 नवीन
माझ्याकडे यासाठी ब्लुप्रिंट तयार आहे. फक्त एकहाती .....द्या. - जय मिपा.
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 09/06/2016 - 15:03 नवीन
जेपीसह मिपा.... झालाच पायजे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
न
नूतन सावंत Tue, 09/06/2016 - 18:00 नवीन
Zalach payje
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
न
नाखु Wed, 09/07/2016 - 05:14 नवीन
जेपी झालाच पाहिजे. अ
खिल मिपा* (नवमिपासाक्षर ,नवमिपावाचक,नवमिपावाचक-वचक्,नवलेखक्,नवप्रतिसादक्,नवटीकाकार्,नवरंगकर्मी) संघातर्फे मिपा हितार्थ जारी
अखिल मिपा* हे कंसातील सगळ्यांसाठी विशेष्ण आहे म्हणून कंसाबाहेर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नूतन सावंत
ए
एकुलता एक डॉन Tue, 09/06/2016 - 15:02 नवीन
लोक गुगल वॉर शोधतात तेव्हा 80% फक्त पहिलीच साईट ओपन करतात पैसे ताई मिपा जास्त लोकानापर्यंत पोचण्यासाठी प्रथम क्रमांक गरजेचं आहे पाहिजे तेवढा कचरा ढकला,हा पण धागा उडवा पण प्रत्ययकाने मिपा वर आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचं आहे
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Tue, 09/06/2016 - 15:08 नवीन
लोक गुगल वॉर शोधतात तेव्हा 80% फक्त पहिलीच साईट ओपन करतात >> गुगलवर काय शोधतात लोक?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकुलता एक डॉन
ए
एकुलता एक डॉन Tue, 09/06/2016 - 15:10 नवीन
समजा गुगळे वर " मराठी कविता" असा search तुम्ही केला तर त्यातल्या किती संकेतस्थळांना भेट देता ? पहिल्याच ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ए
एकुलता एक डॉन Tue, 09/06/2016 - 15:11 नवीन
माफ करा गूगल जागी गुगळे type झाले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकुलता एक डॉन
स
संदीप डांगे Tue, 09/06/2016 - 15:38 नवीन
मी मराठी कवितांसाठी असा सर्च करत नाही. मी नेमक्या कोणत्या कविता हव्यात त्यासाठी सर्च करतो. जसे की "ग्रेस, ती गेली तेव्हा रिमझिम.." तर जो रिझल्ट येईल त्यातल्या पहिल्या-दुसर्‍या लिन्कवर चेक करतो. मला वेबसाईट कोणती आहे त्याने फरक पडत नाही. नुसतं मराठी कविता किंवा असंच रॅन्डम सर्च मारुन कोणी बघतं का? गुगल ट्रेन्ड्स, अ‍ॅडवर्ड चेक करा. मिपा किंवा इतर कोणत्याही संस्थळावर एखादी चांगली कविता आली असेल आणि मला मिपा किंवा ते संस्थळ माहितच नसेल तर माझ्यापर्यंत ती आपोआप कशी पोचेल ह्यावर विचार करा. मिसळपाव काही विकत नाही, त्यामुळे इथे लोकांनी यावं अशी काही मालकांची गरज नाही. असे रॅन्किंग मधे नंबर घेऊन मिसळपावसारख्या कट्टाटाइप संस्थळासाठी काही साध्य होत नसतं. मिसळपाव ना विकिपिडिया आहे ना सॉन्ग्सडॉट्पिके. त्यामुळे नेमकी रॅन्किंगची गरज काय हा प्रश्न महत्त्वाचा. उत्कृष्ठ साहित्य, दर्जेदार चर्चा, जबरदस्त कन्टेन्ट असणं ही मिसळपावची स्वतःची अशी गरज आहे. ह्यात वाढ होण्यात रॅन्किंगची काही मदत होईल काय? मिसळपाव अधिकाधिक प्रसिद्ध होण्यासाठी सदस्यांनी आपल्याला इथलं काय आवडलं त्याची लिन्क चेपु किंवा ट्विटरवर शेअर केली तरी मोठे काम होईल. अनेक अनभिज्ञ वाचकांना नवा खजिना हाती लागेल. माझी नीलकांत्/प्रशांतला विनंती आहे की प्रत्येक धाग्यावर "शेअर टू सोशल मिडिया" असे काही विजेट देता आले तर बघावे. बाकी, मिसळपाव कोणत्या स्पर्धेत आहे काय? गणपतीच्या सजावटीच्या स्पर्धा असतात तशा काही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकुलता एक डॉन
ए
एकुलता एक डॉन Tue, 09/06/2016 - 15:47 नवीन
जर गूगल किंवा अलेक्सा वॉर प्रथम क्रमांकावर आले तरच जास्त लोक येतील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Tue, 09/06/2016 - 16:05 नवीन
जरा सविस्तर सांगाल काय? म्हणजे गुगलवर पहिले येतं म्हणून जास्त लोक येतात की जास्त लोक आले की गुगलवर पहिले येतं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकुलता एक डॉन
ए
एकुलता एक डॉन Tue, 09/06/2016 - 16:27 नवीन
गुगलवर पहिले येतं म्हणून जास्त लोक येतात पण गुगल पण जास्त लोक येणाऱ्या ना प्रथम स्थान देते एकदा जास्त लोक आले कि क्रमांक वाढतच जाईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Tue, 09/06/2016 - 16:43 नवीन
कृपया गैरसमज करुन घेउ नका. तुम्ही नेमका काय विचार करत आहात हे मला समजून घ्यायचे आहे. तीन मूलभूत प्रश्नांची व्यवस्थित विचार करुन उत्तर द्या. १. गुगल रॅन्किन्ग मधे मिसळपाव का दिसायला हवं? २. रॅन्किंग ने लोक येतात की लोकांमुळे रॅन्किंग येतं? ३. गुगल सर्चमधे मिसळपाव किंवा कोणतीही मिसळपाव टैप मराठी संस्थळं दिसतील असे शोधासाठीचे कळीचे शब्द (सर्च किवर्ड्स) कोणते? ह्या प्रश्नांची योग्य उत्तरं मिळाली तर पुढे काही योजना आखता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकुलता एक डॉन
व
वाल्मिक Tue, 09/06/2016 - 20:01 नवीन
1) जास्त लोकांनी भेट द्यावी म्ह्णून 2) vice versa 3) त्याने काही जास्त फरक नाही पडत ,तसेच हे काम वेबमास्तर चे आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Tue, 09/06/2016 - 20:18 नवीन
माझा तिसरा प्रश्न चुकला. रिवर्स-प्रोसेस ने विचारलं आहे. वेबमास्टरकडून नाही, युजरकडून विचारत आहे. मिसळपाव एखाद्या सर्चरिजल्टमधे दिसेल ह्यासाठी युजरने गुगलमधे जाऊन असा कोणता सर्च मारलेला असेल? उदा> १. ओला, उबेर हे पहिल्या स्थानावर येतात > युजरने "टॅक्सी हवी"चा सर्च मारलेला असतो २. मेकमायट्रीप, ट्रीपअ‍ॅडवायजर पहिल्या स्थानावर येतात > युजर ने हॉलिडे पॅकेजेस असा सर्च मारलेला असतो. ३. कारवाले, कारदेखो पैल्या स्थानावर येतात> युजरने कार्स इन इन्डिया, किंवा कोणत्याही कारचे नाव टाकून सर्च मारलेला अस्तो. ४. ओएलक्स, क्विकर पहिल्या स्थानावर येता> युजरने सेकंड हॅन्ड वस्तूचा सर्च मारलेला असतो ५. नायन्टीनाईनएकर्स, मॅजिकब्रिक्स पहिल्या स्थनावर येतात > युजरने "घर मिळेल का हो घर" असा सर्च मारलेला असतो तसाच. ६. मिसळपाव पहिल्या स्थानावर येते >> युजरने "********" हा सर्च मारलेला असतो. इथे "*********" काय असणार आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक
त
तुषार काळभोर Wed, 09/07/2016 - 13:53 नवीन
Top Keywords from Search Engines Which search keywords send traffic to this site? Keyword Percent of Search Traffic 1. misal pav 73.09% 2. कथा 5.51% 3. rinku patil 5.43% 4. नवरा बायको शरीरसंबंध 2.43% 5. charoli 1.90% ७३% लोक मिसळ पाव असे इंग्रजीमध्ये टाईप करून मिसळपाववर पोहचतात. चाळीसमधील एक व्यक्ती "नवरा बायको शरीरसंबंध" असे सर्च करून मिसळपाव येतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Wed, 09/07/2016 - 17:14 नवीन
धन्यवाद पैलवान साहेब, हेच हवे होते!! केव्हाचं डॉन रावांना विचारतोय, आता मी काय म्हणतोय ते लक्षात येईल, मिपा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायला गुगल सर्च हा मार्ग पुरेसा नाही, फक्त साडेसात टक्के चान्स आहे,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
प
पैसा Tue, 09/06/2016 - 15:11 नवीन
लोक गुगल वॉर शोधतात तेव्हा 80% फक्त पहिलीच साईट ओपन करतात पैसे ताई
मान्य. पण मला असं वाटतं की सतत काहीतरी चांगलं लोकांच्या नजरेसमोर आलं पाहिजे. वाचक आपोआप येतात. नंबरचा वगैरे विचार केला तर आपण सतत दुसर्‍या कोणाशी तुलना करत राहू. आणि मग त्यानी काय केलं याचा विचार करत बसू. ते व्हायला नको. आपली स्पर्धा स्वतःशी असली पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकुलता एक डॉन
ए
एकुलता एक डॉन Tue, 09/06/2016 - 15:13 नवीन
लेखन वाढायला पाहिजे असा पण टाकणार होतो पण लोक कसे लेखन वाढवतील ह्यावर उत्तर नाहीये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ज
जेपी Tue, 09/06/2016 - 15:09 नवीन
धागाकर्ते- इथे रात्रंदिवस पडीक असणारे कित्येक सदस्य आहेत.त्यांच्या मोबल्या ब्राऊझर मध्ये फक्त मिपा चालु असत. टेंशन नका घेऊ. पहिला काय अन दुसरा काय? its just a number.!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 09/06/2016 - 15:31 नवीन
मी तर म्हणते, ऑफिसमध्ये मिळतील तेवढ्या सगळ्या पीसीवरुन मिपा उघडून ठेवायचं का सगळ्यांनी? मिपाकर, अमिपाकर वगैरे वगैरे, चळवळच उभारु! काय म्हंता? सेलवरुन पण तसंच करुया. जातोय कुठे पयला नंबर! हाकानाका! आहे सामर्थ्य चळवळीचे.. वगैरे.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Tue, 09/06/2016 - 16:40 नवीन
पण कशाला हवाय पहिला नंबर ? आपली स्पर्धा हे दर्जेदार साहित्य मिपावर असावे ह्यासाठी असली पाहिजे. Quality महत्वाची
  • Log in or register to post comments
ए
एकुलता एक डॉन Wed, 09/07/2016 - 08:37 नवीन
ती असून पण पहिला क्रमांक नाहीये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
र
राजेश घासकडवी Tue, 09/06/2016 - 17:02 नवीन
5) जरा भांडणे कमी करू या
बाकी सगळं ठीक आहे, पण भांडणं कमी झाली तर टीआरपी कमी होईल अशी भीती वाटते. जिथे घमासान चर्चा चालू असतात तिथे लोक पुन्हापुन्हा तो धागा उघडून वाचतात. त्यापेक्षा 'जास्त भरभरून चर्चा करा, फक्त व्यक्तिगत होऊ नये याची काळजी घ्या' असं म्हणायला हवं.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Tue, 09/06/2016 - 17:49 नवीन
नुसते मिपा उघडे ठेउन फायदा नाही. कारण आपण मिपा एकदा उघडले की ते ऑटो रीफ्रेश होत नाही. थोडक्यात जेव्हा आपण मिपा उघडतो तेव्हा एक हीट जाते. मग तेच पेज तुम्ही दीवसभर उघडून ठेवलेत तरी एकच हीट असणार जो पर्यंत तुम्ही ती रीफ्रेश करत नाही. आंतरजालावर एखाद्या वेबपेजला जेवढ्या हीट जास्त तेवढे ते पेज प्रसीध्द. जर नुसत्या हीट्स ने वेबसाइट प्रसीध्द करायची असेल तर सारखे रीफ्रेश करत रहावे लागणार. :) मीपावर जास्त हीट्स येण्याची कारणे - कोणी प्रतीसाद दीलाय का? माझ्या प्रतीसादाला कोणी उत्तर दीलेय का? माझ्या लेखावर कीती प्रतीसाद आलेत? वगैरे...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 09/06/2016 - 17:55 नवीन
कुठल्याही संकेतस्थळाचा क्रमांक पहिला राहणारच... ओढून-ताणून उगाचच एखाद्याला मोठे करायचा प्रयत्न केला की, त्याचा राजीव कपूर किंवा कुमार गौरव होतो.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा