Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिपा दुसऱ्या क्रमांकावरून प्रथम वर आणायचे कि नाही ?

ए
एकुलता एक डॉन
Tue, 09/06/2016 - 14:47
🗣 113 प्रतिसाद
नमस्कार बऱ्याच दिवसापासून धागा टाकायचा विचार होता पण प्रतिसाद मिळतील कि नाही शंका होती ,निदान आज मिपा च्या वर्धापन दिनाला तरी किती लोक" हिट" चिंतक आहेत ते बघू 23/05/2016 रोजी मी मिपा मराठीतील प्रथम क्रमांकाचे संकेत स्थळ http://www.misalpav.com/node/36133 म्हणून धागा टाकला होता 5000 वर वाचणे पण शेवटी कपिलमुनी http://www.misalpav.com/comment/reply/36133/861663 ह्यांनी सांगितले कि क्रमांक खाली गेला एकाने पण हळहळ किंवा प्रतिक्रिया दिली नाही निदान आजतरी एक होऊ या मिपा प्रथम क्रमांक वर आणायचे तर 1) दररोज निदान 2 वेळा तरी मिपा ला भेट द्या 2) browser ओपन ठेवा मिपा close नका करू 3) आपल्या मित्र मंडळीला मिपा चा दुवा द्या 4)दररोज लेख नाही तर प्रतिसाद तरी नोंदवा ,वाचणे आणि प्रतिसाद संख्या मध्ये खूप फरक दिसतोय आणि सर्वात मुख्य 5) जरा भांडणे कमी करू या

प्रतिक्रिया द्या
58223 वाचन

💬 प्रतिसाद (113)
स
संदीप डांगे Tue, 09/06/2016 - 18:00 नवीन
+१००००००००००. बास! ह्याच्या पुढे काय नाय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
अ
अभिजीत अवलिया Tue, 09/06/2016 - 18:07 नवीन
ओढून-ताणून उगाचच एखाद्याला मोठे करायचा प्रयत्न केला की, त्याचा राजीव कपूर किंवा कुमार गौरव होतो. --- आई ग. असला हसतोय ह्या डायलॉग वर. एक नम्बर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
र
रेवती Tue, 09/06/2016 - 19:03 नवीन
हा हा हा..........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
व
वाल्मिक Tue, 09/06/2016 - 20:03 नवीन
सलमान खान पण होऊ शकतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
ग
गॅरी ट्रुमन Tue, 09/06/2016 - 18:06 नवीन
4)दररोज लेख नाही तर प्रतिसाद तरी नोंदवा ,वाचणे आणि प्रतिसाद संख्या मध्ये खूप फरक दिसतोय
Mipakar या फेसबुक पेजवर मी १९ जुलै रोजी पुढील लिहिले होते: पुढील इमेजमध्ये कोणत्या तारखेला मिपावरील महत्वाचे माईलस्टोन (उदा. १०००, २००० इत्यादी लेख) पार केले गेले हे पाहता येईल. ६००० ते ७००० हा लेखांचा टप्पा अवघ्या ४९ दिवसांत (१० फेब्रुवारी २००९ ते ३१ मार्च २००९) पार केला गेला होता.आजच्या घडीला मिपावरील लेखांची संख्या ३६,६९८ आहे. तरीही एक हजार लेख ४९ दिवसात पूर्ण झाले हा विक्रम गेली ७ वर्षे अबाधित आहे. मिपावरील लेखांचा ओघ आटला आहे का हा एक लेखाचा विषय होऊ शकेल का? :) Image removed. <पुणेकर मोड ऑन> खरोखरच पूर्वीचे मिपा आता राहिले नाही :( :( <पुणेकर मोड ऑफ>
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Tue, 09/06/2016 - 18:49 नवीन
मिपावरील लेखांचा ओघ आटला आहे का हा एक लेखाचा विषय होऊ शकेल का? :)
मीही काही काळ ही आकडेवारी तपासून पाहात असे. त्यात २००९ - २०१० हा काळ प्रसिद्ध होणाऱ्या धाग्यांच्या संख्येच्या दृष्टीने सुवर्णयुगाचा होता. दिवसाला १५ ते २० धागे सहज येत. धाग्यांची संख्या मला वाटतं आता दिवसाला १०-१२ च्या आसपास स्थिरावलेली आहे. मात्र प्रतिसादांची आणि धाग्यांच्या वाचनाची आकडेवारी पाहिली तर चित्र अधिक चांगलं आहे असं दिसेल. त्याकाळी ५० प्रतिसाद आणि १००० वाचनं हा माइलस्टोन असायचा. मोजक्या लेखनासाठीच ते मिळायचं. याची दोन मुख्य कारणं मला दिसतात. यांची ठाम आकडेवारी माझ्याकडे नाही. माझा केवळ अंदाज आहे. १. फेसबुक आणि व्हॉट्सअॅपने मराठी संस्थळांचा एक मोठा घास घेतला. त्याचा सगळ्याच संस्थळांवर परिणाम झाला. तो परिणाम ११-१२-१३ साली मोठ्या प्रमाणावर दिसला. त्या काळात मिपावरचं लेखन दिवसाला ६-७ लेख इतकं खाली आलेलं होतं. ते एका अर्थाने बरंच असं मला वाटतं कारण चारोळी फेसबुक पोस्टींपलिकडचं लिखाण संस्थळांवर राहायला लागलं. २. दुसरं कारण थोडंसं अनेक लहानलहान गोष्टींनी बनलेलं आहे. काही संकलित धागे आल्यामुळे अनेक लहानलहान धागे येण्याऐवजी एकच मोठा धागा चालू राहिला. मिपाव्यवस्थापनाने चालू केलेल्या गणेशलेखमाला, दिवाळी अंक, विज्ञानविशेषांक, प्रवासविशेषांक अशा उपक्रमांमुळे जास्त मोठ्या आकाराचे सकस धागेही यायला लागले. त्यांनी अनेक लहान धाग्यांची जागा घेतली. गॅरी ट्रुमन यांना विनंती करतो की दर दिवसाला येणाऱ्या धाग्यांचा दर काढून त्याचा आलेख मांडावा. गेल्या दोनतीन वर्षांत हा दर वाढत असलेला दिसेल असं वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Tue, 09/06/2016 - 18:08 नवीन
मिपा दुसऱ्या क्रमांकावरून प्रथम वर आणायचे कि नाही ?
माझ्यासारख्यांना तरी हा प्रश्नच पडत नाही. कारण माझ्यासाठी मिपा आणि केवळ मिपाच कायमच पहिल्या क्रमांकावर आहे आणि असेल :) (इतर सर्व मराठी संकेतस्थळांवरून निवृत्ती घेतलेला आणि मिपा सोडून अन्यत्र कुठेही लिहायची अजिबात इच्छा नसलेला) ट्रुमन
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Tue, 09/06/2016 - 18:15 नवीन
सेम पिण्च!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
त
तुषार काळभोर Tue, 09/06/2016 - 18:26 नवीन
सेम^२ पिंच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
न
नाखु Wed, 09/07/2016 - 05:22 नवीन
अती तीव्र अती तीव्र सहमती. मिपाविण कुठे (ना) धावे अता मन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 09/06/2016 - 18:29 नवीन
>>>>>माझ्यासारख्यांना तरी हा प्रश्नच पडत नाही. कारण माझ्यासाठी मिपा आणि केवळ मिपाच कायमच पहिल्या क्रमांकावर आहे आणि असेल :) सहमत. अधिक बोलण्यासारखं काही नाही. आमचं मिपा जसं आहे, तसं उत्तम आहे. -दिलीप बिरुटे (वेडा मिपाकर)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
स
सुचिकांत Tue, 09/06/2016 - 18:24 नवीन
मी अनेकांना मिपाच्या वापराकरता प्रेरित करत असतो. सर्वांचे मत असते मिपा सारखे दुसरे संकेतस्थळ नाही. पण नवीन लेखकांच्या लेखांच्या खूपच चिंध्या केल्या जातात. त्यावर काही करता आले तर विचार करावा. आपल्याला नुसते वाचक नकोत, लेखक पण निर्माण करायचे असतील तर प्रोत्साहनपर काही करता आलं तर विचार करावा.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Tue, 09/06/2016 - 18:50 नवीन
सर्वात महत्त्वाचे, नव्या लेखकांच्या चिंध्या होतात हे अर्धसत्य आहे. नकारात्मक घटना जास्त पसरतात तसेच हे. माझ्या दोन वर्षाच्या मिपाप्रवासात अनेक नवलेखकांच्या पहिल्यावहिल्या लिखाणाला, कधीतरीच लिहिणार्‍या दुर्मिळांना खूप चांगले प्रतिसाद मिळाल्याची उदाहरणे खूप पाहिली आहेत. नविन लेखकांसाठी एक सांगणं आहे. आयडी घेतल्याच्या दुसर्‍या दिवसापासून धाड धाड लेख टाकू नका. आधी इथली वाचक मंडळी काय वाचतात, कसे प्रतिसाद देतात, कशावर देतात हे बघा. म्हणजे थोडक्यात प्रेक्षकांत बसून नाटक बघा. प्रेक्षकांच्या भूमिकेतून लिखाणाकडे बघा. काही आवडले तर बाजुच्या मनभरून दाद देणार्‍याला टाळी द्या. नाही आवडले तर स्पष्ट मत द्या. इथल्या वावराची सवय करा. लिहिणे तुमच्याच हातात आहे. आधी लिहून जिमेलमधे सेव्ह करुन ठेवा. प्रकाशित करण्याची घाई करु नका. तुम्ही घाई का करता? कारण तुम्हाला प्रतिक्रियांची घाई झालेली असते, मग प्रतिक्रिया आल्या की मनासारख्या म्हणजे कौतुकच करणार्‍या आल्या नाही की वाईट वाटतं. प्रत्येकाला आपल्या कलाकृतीचे कौतुक झालेले पाहिजे असते. पण कोणत्या कलाकृतीचे कौतुक होते ते बघून कौतुकाची थाप मिळायला आपली कलाकृती तितकी चांगली आहे काय हे ताडून बघता येतं. किंवा द्या बेधडक टाकून. मन घट्ट करा. काय लिहावे ह्याचं स्वातंत्र्य हवं असेल तर काय प्रतिक्रिया याव्यात ह्याचं स्वातंत्रय मिळू शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुचिकांत
म
मुक्त विहारि Tue, 09/06/2016 - 21:13 नवीन
+ १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
अ
अनन्त अवधुत Tue, 09/06/2016 - 21:17 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
अ
अलका सुहास जोशी Wed, 09/07/2016 - 12:10 नवीन
मी नवीन मेंबर आहे मिपा वर. त्याआधी सहा महिने मिपा वाचत होते. संदिप डांगे यांच्याशी पूर्ण सहमत. अनुमोदक म्हणा ना.......कारण दिवस बाप्पाचेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 09/08/2016 - 07:39 नवीन
पण माझा अनुभव थोडा वेगळा आहे. मी आयडी घेतल्याच्या दुस-या नाही, तर त्याच दिवशी लेख टाकला होता. मला प्रतिसाद येईल अशीही अपेक्षा नव्हती. In fact, मिपा हा काय प्रकार आहे हेदेखील माहित नव्हतं. आपण लिहिलेलं लोक वाचणार एवढं समजलं होतं. इथले खास वाक्प्रचार - चान चान, मोठे व्हा, ह्यापी बड्डे, अभ्यास वाढवा आणि सर्वात भारी म्हणजे बसवला टेंपोत - हे नंतर कळले. मला तेव्हा मिळालेले पहिले सगळे प्रतिसाद हे आधी माझ्या आयडीवरुन आणि मग लेखनावरुन मिळाले होते. मिपाकर स्वॅप्स (आता एस) यांनी एका प्रतिसादात लिहिलं होतं की लोक प्रतिक्रिया देतीलच असं नाही. किती जणांनी वाचलंय ते महत्वाचं. द्याव्याशा वाटल्या प्रतिक्रिया तर देतील. इथल्या प्रतिक्रिया आणि प्रेयसी यांच्यात एक साम्य आहे - यां चिंतयामि सततं मयि सा विरक्ता!(चूभूद्याघ्या).जेवढा जास्त विचार कराल तेवढी समोरची पार्टी विरक्त होत जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
र
रुपी Tue, 09/06/2016 - 21:25 नवीन
सध्या तरी माझ्याकडे मिपा ११ आणि मायबोली १३ क्रमांकाला दिसत आहेत.
  • Log in or register to post comments
ए
एकुलता एक डॉन Wed, 09/07/2016 - 08:21 नवीन
कृपया जुना धागा बघावा ,बाकीचे वर्तमान पत्रे आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी
च
चित्रगुप्त Tue, 09/06/2016 - 23:14 नवीन
मुळात पहिला क्रमांक कश्यासाठी हवा ? हे समजले नाही. उत्तमोत्तम लेख आणि चपखल प्रतिसाद येत रहावेत, हे महत्वाचे. नंबर कोणताही असो.
  • Log in or register to post comments
र
रघुनाथ.केरकर Wed, 09/07/2016 - 12:28 नवीन
गेली ५ वर्षे मी मिपा वर आहे, जेवढा वेळ मी ऑन्लाइन असतो तेवढावेळ मिपा ओपन असत. माझ्या मते मिपा च एक नंबर आहे. डांगे साहेबांशी १०० % सहमत.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Wed, 09/07/2016 - 13:10 नवीन
संपादकांनी संकुचित वृत्ती सोडून द्यावी. कक्षा रुंदावाव्यात. उगाचच्या उगाच धागे उखडू नये. हा धागा मायबोलीवर राहू शकतो तर मिपावर का उखडला जावा. मागासलेपणा सोडा...
  • Log in or register to post comments
द
देशपांडे विनायक Wed, 09/07/2016 - 15:13 नवीन
असा प्रयोग करून बघावा लेखकाचे नाव न देता लेख छापावा . चार पाच दिवसानंतर नाव जाहीर करावे लेख आणि लेखकाला मिळणारे प्रतिसाद कसे असतील ते कळेल
  • Log in or register to post comments
ए
एकुलता एक डॉन Wed, 09/07/2016 - 16:07 नवीन
अहो निदान लेखकाची परवानगी घेऊन लेख छापा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देशपांडे विनायक
अ
अकिलिज Wed, 09/07/2016 - 15:53 नवीन
हे आसं नंबरामागं लागला तर मिपाचं संध्यानंद होईल. आणि गर्दी करून करायचंय काय ? ऑनलाईन पेपरांच्या कमेंटा वाचा म्हणजे लोकांची बुद्धी कुठे राहीली ते कळेल. उगाच दंगा वाढला म्हणजे अभ्यासू लोकं लांब व्हायला लागतील. आपलं गरीबाचं मत.....
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 09/07/2016 - 16:24 नवीन
आता जरा सिरियस विचार. डॉनराव, संस्थळाचा एक आणि दोन नंबर काढायला ही काय स्प्रिंट रेस नाय. मायबोलीशी मिपाची स्पर्धा असं तुम्हाला वाटलं तरी मायबोली मराठी आंतरजालावर पायोनियर आहे. मायबोली कमर्शियल तत्त्वावर चालते तर मिपा हौशी लोकांच्या बळावर. तेव्हा दोन्हीची तुलना तशी करता येणार नाही. मायबोली या वर्षी २० वर्षे पूर्ण करत आहे. तर मिपाला ९ वर्षे झाली. एकूण मराठी बोलणार्‍या आणि वाचू शकणार्‍या लोकांचा विचार करायचा तर मराठी आंतरजालाला अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. अजून कितीही संस्थ़ळे आली तरी प्रत्येक संस्थळाला इथे आपली जागा तयार करता येईल आणि सगळ्यानाच वाढायला भरपूर स्कोप आहे. वाचकाला जिथे जे वाचण्यालायक वाटेल, कम्फर्टेबल वाटेल तिथे तो रमतो. अशात मधेच एका संस्थळाच्या हिट्स जास्त असतात तर कधी दुसर्‍याच्या. पण म्हणून ते कायमस्वरूपी कधी होणार नाही. तुम्हाला वाटते तशी कट थ्रोट काँपिटिशनही मराठी आंतरजालावर असू नये असं मला वाटतं. एकमेकांशी सहकार्य करून अजून बरंच काही साध्य करता येईल. मिपा मालकांनी अन्य काही मराठी संस्थळांना तांत्रिक व अन्य मदतीचा हात देऊ केला/दिला होता. हे असे चालत आले आहे आणि पुढेही चालेल. कारण एकही मराठी संस्थळ बंद पडले तर शेवट तोटा मराठी आंतरजालाचाच होणार. तेव्हा स्पर्धा असेल तर ती निकोप असावी. जास्तीत जास्त नवे लोक आंतरजालावर कसे येतील याची असावी. मग तुमचा मिपावर लोभ असेल तर मिपावर जास्तीत जास्त उत्तम लिखाण कसे येईल याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. मिपावरील लिखाण कसे वाढवायचे याचा उपाय हवा असेल तर तुमच्या मित्रांपैकी कोण चांगले लिहू शकतात त्यांना मिपावर यायचे आणि लिहायचे निमंत्रण द्या. मात्र ते काहीतरी चांगले वाचनीय लिखाण असावे. एकोळी, दोनोळी, मदत पाहिजे छाप १०० धाग्यांपेक्षा आतिवास, जयंत कुलकर्णीं सारख्यांचा एक धागा मला वाचक म्हणून लाखमोलाचा आहे. चांगल्या लिखाणाला प्रतिसाद द्या हे तर तुम्हीच म्हणालात. चांगले लिखाण मिपावर येत राहिले तर मिपा नंबर एक का दोन हे मला महत्त्वाचे वाटत नाही. बादवे, मगाशी अलेक्सा रँकिंग पाहिली. मिपा पुन्हा एक नंबरावर दिसते आहे. :)
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 09/07/2016 - 16:39 नवीन
खत्रा...अग्दी सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
अ
अजया गुरुवार, 09/08/2016 - 07:56 नवीन
मिपावरील लिखाण कसे वाढवायचे याचा उपाय हवा असेल तर तुमच्या मित्रांपैकी कोण चांगले लिहू शकतात त्यांना मिपावर यायचे आणि लिहायचे निमंत्रण द्या. मात्र ते काहीतरी चांगले वाचनीय लिखाण असावे.
अगदी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
श
शलभ Wed, 09/07/2016 - 17:02 नवीन
+११११... सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
अ
अभिजीत अवलिया Wed, 09/07/2016 - 17:05 नवीन
सहमत. माझे तर असे मत आहे की काही एकोळी, दोनोळी, मदत पाहिजे छाप धागे उडवून टाकावेत येत्या काही दिवसात. स्वच्छ मिपा अभियान ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ज
जेपी Wed, 09/07/2016 - 17:23 नवीन
आणी इनडायरेक्ट मार्केटिंग करणारे "परिक्षणासाठी मदत हवी" छाप धागे पण उडवले पायजेत . काय मसाला नसतो त्यात..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
स
संदीप डांगे Wed, 09/07/2016 - 17:35 नवीन
हजार टक्के सहमत! त्या धाग्यात "धोरणात बसत नसेल तर उडवा" असे स्पष्ट लिहिलेले काही लोक वाचतच नाहीत तेव्हा असे धागे पहिले उडवावे! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ज
जेपी Wed, 09/07/2016 - 17:56 नवीन
ज्जे बात.! अजुन एका गोष्टीला सहमत व्हा.मिपाची धोरण लवचीक आहेत.सहानुभुती ठेवतात. . एखादा मिपाकरांची तुलना कु* शी करुन रामराम ठोकतो आणी पुन्हा येऊ शकतो.यातच मिपाच्या लवचीक धोरणाचा प्रत्यय येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Wed, 09/07/2016 - 18:10 नवीन
परत एकदा सहमत नक्कीच, काही मिपाकरांचे धोरण व्यक्ती पाहून लवचिक किंवा कडक होते, हे सदस्यांना राजरोस कोल्हे, मतिमंद, इत्यादी काहीही म्हटल्यावर काही बोलले जात नाही हे बघितलं तेव्हा लाख टक्के पटलं! आजचा सुविचार: चार दोन कुजलेल्या शेंगदाण्यांसाठी किलोभर उत्तम दाणे कचऱ्यात टाकावे असा मूर्खपणा करु नये!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
स
संदीप डांगे Wed, 09/07/2016 - 17:16 नवीन
यात अधिक काय जोडावे? अर्थात बैलाचा डोळा प्रतिसाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 09/08/2016 - 07:50 नवीन
+१००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ए
एकुलता एक डॉन Wed, 09/07/2016 - 16:34 नवीन
तिथे मायबोली प्रथम क्रमांकावर नसून एक ब्लॉग (9) आहे ,आणि मिपा 2 (11)वर आहे कृपया मिपा एक क्रमांक दिसल्याचा स्क्रीनशॉट द्यावा
  • Log in or register to post comments
र
रुपी Wed, 09/07/2016 - 22:11 नवीन
मी वरच्या माझ्या प्रतिसादात हेच सांगायचा प्रयत्न केला आहे. तुम्ही लेखात दिलेला प्रतिसादाचा दुवा २५ जुलैचा आहे - जेव्हा मायबोली मिपाच्या पुढे होते. मधल्या काळात मिपा आहे तिथेच आहे (११) आणि मायबोली १० वरुन १३ वर गेले आहे. शिवाय, मला वाटते ती तुलना त्यांनी मराठी लेखनातल्या संकेतस्थळांची केली आहे. मराठी दैनिकांचे हिट्स फारच जास्त आहेत. बाकी फक्त हिट्स वाढवायचे असतील तर ते फार सोपे काम आहे. दोन ओळींची एक स्क्रीप्ट फावल्या वेळात चालवली तरी खूप हिट्स वाढतात. तसे करायचे असेल तर येथे स्क्रीप्ट लिहून मिळेल ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकुलता एक डॉन
प
पैसा गुरुवार, 09/08/2016 - 08:13 नवीन
हाहा! त्या लिस्टात सगळीच मराठी भाषिक संस्थळे आहेत. सर्कारी संस्थळ, पेपर्सची सगळीच सरमिसळ आहे. मराठीमाती हे मिपा किंवा मायबोलीसारखे इंटरॅक्टिव्ह संस्थळ आहे का? बघून तसे वाटले नाही. नुसता ब्लॉग असेल तर तो त्या कॅटेगरीत टाकता येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी
ए
एकुलता एक डॉन Mon, 09/19/2016 - 21:02 नवीन
नुसता ब्लॉग पण पुढे जातो राव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
य
यशोधरा Wed, 09/07/2016 - 16:39 नवीन
पण इतके का नंबराच्या मागे लागलेत हे नवे डॉन साहेब? जुने डॉनसाहेब वायले.
  • Log in or register to post comments
स
साहना Mon, 09/19/2016 - 21:49 नवीन
नंबर वाढवणे हेच पाहिजीए असेल तर Alexa टूलबार इन्स्टॉल करा नंबर आपोआप वर जाईल. हे ट्रॅफिक प्रकरण सॅम्पलिंग द्वारे मोजले जाते आणि त्यासाठी अलेक्सा टूलबार हे एक इनपुट आहे. १० मिपा करणी जरी टूलबार टाकला तरी ट्राफिक १००% सुद्धा वर जाऊ शकते.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Tue, 09/20/2016 - 03:21 नवीन
.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Tue, 09/20/2016 - 05:07 नवीन
पुढेमागे मिपा या रँकिंगमध्ये खाली गेलेच तर मिपावरचा ट्रोल्स व रिवर्स ट्रोल्सचा गोंधळ कमी होईल अशी शक्यता वाटते.
  • Log in or register to post comments
र
रुपी Tue, 09/20/2016 - 19:11 नवीन
हे समजले नाही. रँकिंग खाली गेले तर ट्रोल्स कमी होतील की उलटे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्रीरंग_जोशी Tue, 09/20/2016 - 19:59 नवीन
तसे झाल्यास ट्रोल्स अन रिवर्स ट्रोल्स मिपाऐवजी अधिक रँक असणार्‍या संस्थळाकडे वळतील असा आडाखा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी
र
रुपी Wed, 09/21/2016 - 18:15 नवीन
म्हणजे ते अलेक्सावरचं रँकिंग बघून मिपावर येतात असे गृहीत धरण्यासारखे आहे ;) बाकी सध्याच्या रणधुमाळीतही मिपाचा नंबर ११ वरुन १२ वर घसरला. अलेक्साच्या अल्गोरिदममध्ये ट्रोल्स किती हेही धरत असतील काय? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्रीरंग_जोशी Wed, 09/21/2016 - 18:44 नवीन
सदर रँकिंग मध्ये खाली जाणे म्हणजे मिपावरची ट्रफिक कमी होऊन ती इतरत्र वळणे अध्याहृत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 09/21/2016 - 19:30 नवीन
असं होणार आहे.. तर ते सगळं!
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Wed, 09/21/2016 - 20:01 नवीन
मिपाचं माहिती नाही पण या धाग्यावरची प्रतिसादसंख्या ९९ वरून १०० आणलीच पाहिजे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा