लष्करी मुख्यालयावर अतिरेकी हल्ला, १७ जवान शहीद
ही बातमी.
जम्मू-काश्मीरमधील उरी येथील लष्कराच्या मुख्यालयावर पहाटे आत्मघाती दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारतीय लष्कराचे १७ जवान शहीद झाले आहेत. तर, लष्कराच्या प्रतिहल्ल्यात चार दहशतवादी मारले गेले आहेत.
चीड आणी हतबलता याशिवाय दुसरे काहिच सुचत नाहिये. पहिले पोलीस आणि आता लष्करी जवान. जे आपल्या रक्षणासाठी आहेत त्यांच्यावरच जीव गमवायची पाळी वारंवार येतेय. तरीही डोके शांत ठेऊनच विचार करायचा, भ्याड हल्ल्यांचा जास्तीत जास्त कडक निंदा करायची आणि मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली वाहायची याच्यापेक्षा जास्त ऑप्शन्स हाताशी नसणे यासारखे दुर्दैव दुसरे काय असू शकते ?
आजचा दिवसाची खराब सुरुवात. जास्त काही सुचत नाहिये त्यामुळे पुढे लिहित नाही.
---------------
श्रद्धांजली वाहण्यापुरता उरलेला एक सामान्य नागरिक
💬 प्रतिसाद
(142)
ब
बोका-ए-आझम
Mon, 09/19/2016 - 11:58
नवीन
या सैनिकांच्या शहीद होण्याबद्दल दु:ख होणं स्वाभाविक आहे पण देश हतबल झालाय असं समजणं चुकीचं आहे असं मला वाटतं. अशा एका हल्ल्याने डगमगणारा देश अशी ओळख आपल्या देशाची नाहीये आणि होऊही नये. गुप्तचर यंत्रणा असे अनेक हल्ले परतवून लावत असतात,सैनिकही अशा अनेक हल्ल्यांना तोंड देत असतात. एक फिदायीन हल्ला यशस्वी होणं हे सिस्टिमचं अपयश मानणं मला पटत नाही. आपण त्या परिस्थितीला कधीही तोंड दिलेलं नसल्यामुळे कुणाचं चुकलं आणि काय हे आपण ठरवू शकत नाही कारण कशा परिस्थितीत लोक आपलं काम करत आहेत हे आपल्याला माहित नाही. शहीदांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी होणं ही एक गोष्ट झाली, पण त्यामुळे व्यथित होणं म्हणजे एकप्रकारे शत्रूचा हेतू साध्य व्हायला मदत करणंच आहे असं माझं प्रामाणिक मत आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 09/19/2016 - 11:10
नवीन
कोठेतरी, काहीतरी मोठ्या प्रमाणात चुकत आहे. हा हल्ला सरकारचं व सैन्याचं नक्कीच अपयश आहे. उरी सीमेपासून २० किमी आत आहे असं वाचनात येतंय. सीमेपासून इतक्या आत सशस्त्र हल्लेखोर निर्धास्त येऊ शकतात व फक्त ४ जण २० सैनिकांना मारू शकतात ही अत्यंत व्यथित करणारी गोष्ट आहे. सैन्य बेसावध होते, गुत्पचर यंत्रणा बेसावध होत्या व दिल्लीतील राज्यकर्तेसुद्धा बेसावध होते हे कटु सत्य मान्य करायला हवे.
पाकिस्तानच्या बाबतीत आजवर अवलंबलेली सर्व धोरणे संपूर्ण अपयशी ठरली आहेत. मैत्रीचा हात, शांततेची चर्चा, पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट, सीमेवरील मेणबत्त्या, पाकिस्तानी कलाकारांना देशात पायघड्या, पाकिस्तानला ट्रेन व बसने जोडणे, मोदींची सरप्राईझ व्हिसिट, वाजपेयींचा बसने प्रवास, कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर्स, २००२ व २००३ मध्ये भारताने पाकिस्तानवर घातलेले निर्बंध, एकमेकांना आंबे व साड्यांची भेट, पाकिस्तानच्या तथाकथित बुद्धिजिवी विचारवंताबरोबरचा तथाकथित भारतीय बुद्धिजिवी विचारवंतांचा संवाद, भारताचे तथाकथित कठोर इशारे . . . काहीही केले तरी पाकिस्तानचे हल्ले थांबत नाहीत व त्यामुळे होणारी मनुष्यहानी व वित्तहानी थांबत नाही.
पा़किस्तान हा भारताचा शत्रू असून भारत नष्ट करणे हेच या देशाचे ध्येय आहे हे अजूनही भारत मान्य करायला तयार नाही. भारताने झोपेचे सोंग घेतले आहे व ते अत्यंत घातक आहे.
ही सर्व परिस्थिती अत्यंत निराशाजनक व अत्यंत संतापजनक आहे.
कालच्या हल्ल्यानंतर लगेच, "भारताने घाईघाईत कारवाईचा निर्णय घेऊ नये, युद्ध झाले तर ते दोन्ही देशांना परवडणार नाही, पाकिस्तान अण्वस्त्रे वापरू शकतो, हल्ला झाला तरी शांतता चर्चा सुरू रहायलाच हवी" अशा प्रतिक्रिया यायला सुरूवात झालीच आहे. आजवर जे जे केले ते व्यर्थ ठरले आहे. त्यामुळे आता जुनेच मार्ग पुन्हा एकदा नव्याने चोखाळून काहीही साध्य होणार नाही.
सद्यपरिस्थितीत लष्करी कारवाई हा एकमेव उपाय शिल्लक आहे असं दिसतंय. हा उपाय कसा करायचा हे लष्करालाच ठरवावे लागेल. हा उपाय कितीही कटु व महागडा वाटत असला तरी हाच एकमेव उपाय शिल्लक आहे. हे हल्ले थांबविण्यासाठी दुसरा कोणताही उपाय शिल्लक नाही. भारत आजपर्यंत हा उपाय टाळत आलेला आहे. परंतु हा अंतिम उपाय वापरायचा नसेल तर जैसे थे परिस्थिती सुरू राहील. पाकिस्तानी दहशतवादी, हल्लेखोर हल्ले करतच राहतील, आपण निषेध करतच राहू, चर्चा वगैरे मार्गाने प्रश्न सुटतील या भ्रमातच राहू.
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Mon, 09/19/2016 - 11:48
नवीन
लोकसत्ता मधील २२ ऑगस्टला प्रसिद्ध झालेला हा लेख दखल घेण्याजोगा आहे
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Mon, 09/19/2016 - 12:37
नवीन
आता 18. एका जवानाचा उपचारांदम्यान मृत्यू... :(
- Log in or register to post comments
_
_मनश्री_
Mon, 09/19/2016 - 15:53
नवीन
उरि दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली !
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Mon, 09/19/2016 - 16:00
नवीन
आपल्या Deep Asset ची काही पंप्रच्या कारकिर्दीत (मोरारजी देसाई, विश्वनाथ प्रतापसिंग व गुजराल) पुरती वाट लावून टाकली होती. मला वाटते की त्या बाबत खूप काही प्रगती साधली गेली असावी व आता लवकरच त्याचा उपयोग सुरू होईल.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 09/19/2016 - 17:38
नवीन
पाकिस्तान भारताविरूद्ध एकूण ४ वेगवेगळ्या स्तरावर काम करीत आहे.
१) पाकिस्तानी लष्कर - सातत्याने सीमेवर गोळीबार, भारतीय हद्दीत घुसून भारतीय सैनिकांवर हल्ले, दहशतवादी संघटनांना व आत्मघातकी हल्लेखोरांना शस्त्रे, प्रशिक्षण व इतर सर्व प्रकारची मदत देणे इ. मार्गाने पाकिस्तानी लष्कर भारताविरूद्ध कारवाया सुरू ठेवते.
२) लष्करे तोयबा, जैशे महंमद सारख्या दहशतवादी संघटना - या संघटना धार्मिक ब्रेनवॉशिंग करून दहशतवादी तयार करतात, प्रशिक्षण देतात, आत्मघातकी हल्ल्याचे नियोजन करून प्रत्यक्ष हल्ले घडवून आणतात, भारतात दहशतवादी घुसवून बॉम्फस्फोट, गोळीबार इ. मार्गाने दहशत निर्माण करतात.
३) पाकिस्तानी राज्यकर्ते - भारताबरोबर चर्चेचे नाटक करताना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताविरूद्ध मोहीम चालविणे, आंतरराष्ट्रीय बाजारात शस्त्रे विकत घेऊन ती भारताविरूद्ध वापरणे, अण्वस्त्रे कार्यक्रम, सातत्याने काश्मिरींना भडकावणे, भारतविरोधी कारवाया करणार्या भारतीय व पाकिस्तानी दहशतवाद्यांना राजकीय, आर्थिक इ. सर्व प्रकारचा पाठिंबा देणे इ. मार्गाने पाकिस्तानी राज्यकर्ते भारतविरोधी मोहीम सुरू ठेवतात.
४) तथाकथित पाकिस्तानी बुद्धिवंत, कलाकार - यांचे काम म्हणजे भारतातील पाकिस्तानविरोधाची धार बोथट करणे. हे करण्यासाठी स्वतः वारंवार भारताला भेटी देऊन आम्ही ट्रॅक २ डिप्लोमसी करीत आहोत, शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत आहोत असा आव आणणे; भारत-पाकिस्तान प्रश्न हा राजकारण्यांनी निर्माण केला असून सामान्य जनतेला यात रस नाही, सामान्य जनतेला मैत्री हवी आहे असा भ्रम पसरविणे; पाकिस्तानप्रेमी तथाकथित भारतीय बुद्दिजिवींना पाकिस्तानात बोलावून त्यांचा पाहुणचार करणे जेणेकरून ते भारतात परत गेल्यावर पाकिस्तानविषयी चांगले बोलतील, पाकिस्तानी कलाकारांनी भारतीय चित्रपटात काम करणे व गाणी म्हणणे, गुलाम अली सारख्यांनी सातत्याने भारतात मैफिली आयोजित करून पाकिस्तान विरोधाची धार बोथट करणे इ. मार्गाने हे भारतात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असतात. दुर्दैवाने भारतीय जनता, भारतीय माध्यमे आणि तथाकथित भारतीय विचारवंत यांचा पवित्रा ओळखू शकलेले नाहीत. १८५७ चा उठाव, १८७१ मधील वासुदेत बळवंत फडके यांचा सशस्त्र लढा इ. हिंसक लढ्यामुळे पोळलेल्या ब्रिटिशांनी धूर्तपणे भारतीयांना हिंसक मार्गापासून दूर वळविण्यासाठी १८८५ मध्ये स्वतःहून काँग्रेसच्या स्थापनेत पुढाकार घेतला होता. हिंसक प्रतिकार करण्याऐवजी निषेधाचा ठराव, लोकशाही मार्गाने मागण्या करणे इ. भुरळ पाडणार्या गोष्टींची चटक त्यांनी भारतीयांना लावली. अगदी तसेच पाकिस्तान करीत आहे. जेव्हा जेव्हा पाकिस्तानविरूद्ध कारवाई करण्याचा विचार सुरू होते, भारतातील तथाकथित विचारवंत लष्करी कारवाईला विरोध करून चर्चेच्या माध्यमाने प्रश्न सोडवावा, युद्ध परवडणारे नाही, काश्मिरला स्वायत्तता द्यावी, दोन्ही देशातील जनतेचा संपर्क वाढल्यास प्रश्न सुटेल इ. मागण्या पुढे करून कारवाईच्या विरोधात वातावरण निर्माण करतात.
दुर्दैवाने भारत या सर्व स्तरांवर फसलेला आहे. भारत कधी पाकिस्तानी राज्यकर्त्यांशी चर्चा करू पाहतो, तर कधी पाकिस्तानवर निर्बंध घालू पाहतो, तर कधी दहशतवाद्यांविरूद्ध कडक पावले उचलू पाहतो. यातील कोणत्याही धोरणात सातत्य नाही. सद्यपरिस्थितीत युद्ध हा एकमेव पर्याय शिल्लक आहे.
सर्वसामान्य नागरिक पाकिस्तानविरूद्ध थोडेफार करू शकतो. पाकिस्तानी कलाकार काम करीत असलेल्या चित्रपटांवर बहिष्कार टाकणे, गुलाम अली व इतर पाकिस्तानी गायकांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणे, त्यांच्या गाण्यांच्या सीडीज, डीव्हिडीज विकत न घेणे, परदेशस्थ भारतीयांनी पाकिस्तानी दुकाने व पाकिस्तानी रेस्टॉरंट्समध्ये न जाणे इ. मार्गाने आपण निदान थोडेतरी पाकिस्तानविरूद्ध करू शकतो.
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Mon, 09/19/2016 - 17:55
नवीन
अगदी लोलियत प्रतिसाद.
:) #मिसिंगलोळणारीस्मायली
हहपोदु. गेलाबाजार पाकिस्तानचे सर्वात मोठे मदतगार जे की अमेरिका आणि चीन यांच्या विरोधात अमेरिकन रेष्टारंटे आणि चायनीज ठेल्यावर खाणेही बंद करण्याचा प्रस्ताव मी मांडतो.
(गंभीर विषयावरील वरचा हास्यास्पद प्रतिसाद वाचल्याने राहवले नाही याबद्दल क्षमस्व.)
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 09/19/2016 - 19:26
नवीन
मला मात्र हा प्रतिसाद वाचून प्रतिसादकर्त्याची कीव आली.
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Tue, 09/20/2016 - 06:36
नवीन
चायनीज खाण्यावर बंदी घातलीच पाहिजे!
(गुलाम अली फ्यान)
अनुप
- Log in or register to post comments
स
साहना
Wed, 09/21/2016 - 03:48
नवीन
चिनी गळ्याचा शर्ट/कोट घालणे मोदींनी आणि पर्रीकरांनी राष्ट्रहित लक्षांत घेऊन तात्काळ बंद करावे असाही कडक इशारा आम्ही मोदींना देत आहोत.
- Log in or register to post comments
स
साहना
Wed, 09/21/2016 - 03:50
नवीन
> ब्रिटिशांनी धूर्तपणे भारतीयांना हिंसक मार्गापासून दूर वळविण्यासाठी १८८५ मध्ये स्वतःहून काँग्रेसच्या स्थापनेत पुढाकार घेतला होता.
पण आज काल प्रयत्नांत संघाने काँग्रेसला चारी मुंड्या चिट केले आहे.
आमचे सजेशन :
वेदिक विद्यापीठ काढून आपली जुनी ब्रम्हास्त्र, पराजन्यस्त्र इत्यादी पुन्हा शोधून काढावीत.
- Log in or register to post comments
अ
अशोक पतिल
Wed, 09/21/2016 - 18:57
नवीन
अगदी संतुलित व समर्पक विश्लेषन !
तसेही भारत सरकारने घाइत काहीही कार्र्वाही न करने हेच ठिक होइल .
परंतु सर्व जन एक गोष्ट विसरतत कि , कावरलेल्या कुत्र्याचे काम हे चावणे आहे. परंतु सुरक्षित रहाणे ही आपली जबाबदारी आहे. तसेच पठानकोट व आता झालेला हल्ला ह आप्ल्या सेने चे अपयश होय . आणि याच मुद्द्यावर लक्ष केद्रिंत व्हायला हवे.
- Log in or register to post comments
अ
अशोक पतिल
Wed, 09/21/2016 - 18:58
नवीन
@ श्री गुरुजी
अगदी संतुलित व समर्पक विश्लेषन !
तसेही भारत सरकारने घाइत काहीही कार्र्वाही न करने हेच ठिक होइल .
परंतु सर्व जन एक गोष्ट विसरतत कि , कावरलेल्या कुत्र्याचे काम हे चावणे आहे. परंतु सुरक्षित रहाणे ही आपली जबाबदारी आहे. तसेच पठानकोट व आता झालेला हल्ला ह आप्ल्या सेने चे अपयश होय . आणि याच मुद्द्यावर लक्ष केद्रिंत व्हायला हवे.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Mon, 09/19/2016 - 20:28
नवीन
विशाल व्यास:
सैनिक म्हणजे नाटकातला
समरधुरंधर आम्हा दिसतो
लीलेने भवपाश तोडूनी
जो गनिमांच्या फळीत घुसतो
पीळ मिशीला भरून म्हणतो – या या सारे
माय कुणाची व्याली – वगैरे
उडवुनी चटणी शत शत्रूंची
( पिटाकडे पाहून जरासा
गाली हसतो )
आणि रेल्वेमध्ये जेधवा
विटकी खाकी पेहरणारे
तुटक्या द्रोणातील वड्यांचे दही पिणारे
दोहे अथवा अभंग ओवी गुणगुणणारे
असे शिपाई सहज भेटती
देत जांभया त्रस्त स्वराने
आम्हा म्हणती –
भली नोकरी कारकुनाची
पगार घ्यावा मेजावरती
दिवस रजेचे किती तयाला
नाही गणती
या फौजेचा कठीण पेशा
शिस्तीचे वरवंटे माथा सदैव फिरती
मुलामाणसांपासून लागे दूर जावया
आणिक हे म्हणताना डोळे
किंचित भिजती
वीररूप हे असले पाहून
पांढरपेशा श्रद्धा आमुच्या
( थिएटरातील बनावटीच्या )
विचलीत होती
व्यथित होऊनी परस्परांना आम्ही पुसतो
काय शिपाई असेच असती !
होय शिपाई असेच असती,
परंतू आम्हा उपजत नाही
ते हे -
नाटकातल्या त्या शूराला
नसते तेथे मरावयाचे
असते केवळ टाळीसाठी
विरात्वाने स्फुरावयाचे
पायदिवे विझल्यावर आणिक
घरी जाउनी दुलईमध्ये
शिरावयाचे !
रेलवेतला सैनिक पण हा –
करांत त्याच्या दहीवड्याचा द्रोण असु द्या
स्वरात त्याच्या तक्रारीचा भाव दिसु द्या
मुलेमाणसे म्हणता त्याचे नेत्र भिजुद्या
जेव्हा आपुली (टिनोपालची)
मुलकी दुनिया सोडूनी जातो
रणगाडे, तोफा, तंबुंच्या जगात अपुली
जागा घेतो
गळुनी पडती सर्व जांभया
तक्रारीचा स्वरही विरतो
दुरस्थातील आप्तजनाचा
आठव तेथे विद्ध न करतो
मळकट कवचे (रेलवेतली) फुटून पडती
आणि सनातन पुरुषार्थाचा
सोलीव गाभा युद्धतळावर उभा राहतो.
तोच रेलवेतला शिपाई
अग्नीचे घन लोळ भोवती बरसत असता
अविचल दृष्टी समोर बांधून
गोळे भरतो,
खंदकातल्या भाईसाठी
घास आपुला दूर सारतो,
शरीर पिंजून गेले तरीही
हात उभारून अशरण वरती
या भूमीवर कोसळणारे
गगनाचे छत
रोखुनी धरतो
- कुसुमाग्रज
- Log in or register to post comments
स
साहना
Mon, 09/19/2016 - 21:58
नवीन
"झाले बहू होतील बहू" हे वाचन पाकिस्तानी हल्ल्यानं लागू पडते तसेच आमच्या नाकर्त्या लोकप्रतिनिधींना सुद्धा लागू पडते.
- Log in or register to post comments
ए
एरन्दोल्कर
Mon, 09/19/2016 - 22:24
नवीन
पाकिस्तान हा अतीशय तुकार देश आहे.
ते आप्ले शेजरि आहेत हे आप्ले दुर्भाग्य आहे.
- Log in or register to post comments
च
च्यायला
Tue, 09/20/2016 - 00:00
नवीन
काय सन्गता?
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Tue, 09/20/2016 - 00:00
नवीन
शहीद जवानांना विनम्र श्रद्धांजली. इतर कोणि इतर आठवण करो वा न करो, जेंव्हा केंव्हा युद्धभूमीवर आपले सैन्य शत्रुशी भिडेल तेंव्हा प्रत्येक जवान अशाच वीरमरण पत्करलेल्या आपल्या बांधवांची आठवण काढुन चवताळुन हात चालवेल.
एरवी काडिची किंमत देण्याचा लायकीचा नसलेला आपला शेजारी देश अशा प्रसंगी भारताला आपल्या पातळीवर आणुन उभा करतो व त्याची दखल घ्यायला भाग पाडतो... इतकी कि आपले आपले सर्व व्यवहार, चिंता, प्रॉब्लेम्स बाजुला सरतात व या शेजार्याचा खात्मा करायचा एकमेव उद्देश भारतीयांच्या दिवास्वप्नात चमकुन जातो.
असो. सरकार व इतर संबंधीत यंत्रणा काय योग्य ते करेलच. असे जीव जाणं मानाला चटका लाऊन जातं मात्रं.
- Log in or register to post comments
आ
आनन्दिता
Tue, 09/20/2016 - 05:56
नवीन
प्रचंड दु:ख देणारी बातमी. जीव अगदी तळमळून गेला. अशा अजुन किती विरांना आपल्या अमुल्य प्राणांची आहुती द्यावी लागणार आहे काय माहीत! :'(
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Tue, 09/20/2016 - 12:23
नवीन
शहिदांना आदरांजली !
आपल्या देशाच्या आत येउन आपल्याच देशाच्या जवांना ठार मारण्याचे भ्याड कॄत्य पाकिस्तान त्याच्या प्रॉक्सीवॉरच्या माध्यमातुन करु शकला आहे ! या प्रॉक्सीवॉरला आपण अजुनही उत्तर देउ शकलो नाही ही दुर्भाग्यपुर्ण गोष्ट आहे !
डोंन्ट टॉक, जस्ट रिटालिएट...
या शिवाय Indus Waters Treaty (IWT)चा आपण भंग करुन टाकावा.
यावर अधिक इथे :-
Mending Pakistan’s behaviour
Securing the Indus treaty
रशियाकडुन शस्त्रे घ्या आणि ती बलुचिस्तान मध्ये पसरवा...हा उपाय पण चांगला आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- India sucessfully test fires long range surface-to-air missile from defence base off Odisha coast
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Tue, 09/20/2016 - 13:35
नवीन
I wish to ask the Prime Minister, are you not weak? If indeed you are a strong government, the country needs proof of that.
— Narendra Modi (@narendramodi) May 4, 2009
माननिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आपण मनपोहन सिंग व्हर्जन २ आहात काय ?
आता जर मोदींनी आक्रमक पवित्रा घेतला नाही तर भाजपाचे "बुरे दिन" मात्र नक्कीच सुरु होतील !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- India sucessfully test fires long range surface-to-air missile from defence base off Odisha coast
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 09/20/2016 - 20:37
नवीन
पूर्वीच्या असंख्य हल्ल्याप्रमाणेच हा एक नवीन हल्ला होता. पूर्वीच्या असंख्य हल्ल्याप्रमाणेच यावेळीही लष्कर काही प्रमाणात गाफील होते असं वाटतंय. पूर्वीच्या अनेक हल्ल्याप्रमाणेच या हल्ल्यात मारल्या गेलेल्या भारतीयांचं प्रमाण हल्लेखोरांच्या संख्येपेक्षा खूप जास्त होतं. आणि ज्याप्रमाणे पूर्वीच्या असंख्य हल्ल्यानंतर तत्कालीन सरकारला फारसं काहीच करता आलं नव्हतं, तसंच यावेळीही मोदी, पर्रीकर काहीही करू शकणार नाहीत हे नक्की (कडक इशारे, निषेध इ. नेहमीप्रमाणे होईलच).
जर नेहमी देण्यात येणारे कडक इशारे, निषेधाचे ठराव, पुतळे/झेंडे जाळणे, आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकटे पाडण्याच्या वल्गना इ. व्यतिरिक्त काही भरीव कृती झाली तरच मोदींचं वेगळेपण दिसून येईल आणि निदान याबाबतीत तरी असे होण्याची शक्यता जवळपास शून्य आहे.
- Log in or register to post comments
अ
अमितदादा
Tue, 09/20/2016 - 21:25
नवीन
पूर्ण सहमत. Indus Water Treaty हा भारताच्या हातात असणारे हुकमी पत्ता आहे पण राज्यकर्ते किती निर्भीड आहेत त्यावर अवलंबून आहे . आंतरराष्ट्रीय पातळीवरून येणारा दबाव हटविण्यासाठी हे गुपचूप व्हायला हवं .
- Log in or register to post comments
J
John McClain
Tue, 09/20/2016 - 20:10
नवीन
परिस्थिती भरपूर complex वाटतेय...
हा एक ब्लॉग वाचण्यात आला.
चांगलं वाटतंय(खरं खोट खात्री नाही... पण practical वाटतंय)
खालचे काही comments पण चांगले आहेत...
एकाच म्हणणं आहे कि चीन ने पैसे देऊन भीती पसरवणे चालू केले आहे ☺
http://kiranasis.blogspot.in/2016/09/if-india-has-to-hit-terror-factories-in.html?m=1
- Log in or register to post comments
प
पैसा
Wed, 09/21/2016 - 06:41
नवीन
अजून किती? का सगळे जग शांततामय धर्माच्या वाटेवर जाईपर्यंत हे चालूच रहाणार?
आता सकाळी परवेझ मुशर्रफची मुलाखत बघताना टीव्हीवर चप्पल फेकून मारावीशी वाटत होती.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Wed, 09/21/2016 - 08:10
नवीन
सगळे जग शांततेच्या धर्माच्या वाटेवर गेले तरीही हे प्रकार संपायचे नाहीत.कारण सतत इतर कोणाचा द्वेष करणारे लोक शत्रू संपले की आपापासतातच द्वेष करायला लागतात-- पाकड्यांनी बांगलादेशात जे केले तेच ते आज बलुचिस्तानात करत आहेत. तरीही शांतताप्रिय लोकांचा भळभळती हृदये असलेल्या सर्वांनाच कळवळा आहेच. तेव्हा कधीनाकधी हे होणारच आहे आणि त्या वाटेवर जगाला लवकरात लवकर घेऊन जाण्यात मदत करायला मानवतावादाचा कळवळा आलेले युरोपिअन्स बसले आहेतच. मेर्केलबाईंनी कोणाला घरात घेतले आणि त्याचे काय परिणाम होत आहेत हे समोर दिसतच आहे.आजही अती मानवतावादी ओबामा दुप्पट शरणार्थी घ्यायची भाषा करतच आहेत.
- Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश
Wed, 09/21/2016 - 08:21
नवीन
आता संयमाची हद्द झाली आहे.
स्वाती
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Wed, 09/21/2016 - 08:03
नवीन
एकंदरीत पाकड्यांबरोबर डिल करताना आपण विनाकारण सॉफ्ट कॉर्नर दाखवत आलो होतोच आणि काही प्रमाणात त्यांचे नशीबही चांगले होते.
१९७७ मध्ये झियांनी सत्ता काबीज केल्यानंतर झिया आणि पाकिस्तानही जगाच्या दृष्टीने pariah झाले होते.अशावेळी जनता सरकार झियांच्या प्रेमात पडल्याप्रमाणे वागू लागले. फेब्रुवारी १९७८ मध्ये परराष्ट्रमंत्री अटलबिहारी वाजपेयी पाकिस्तानला गेले होते आणि "यापुढे भारत पाकिस्तानला हरवेल केवळ हॉकीच्या मैदानात" असे काहीसे बोलले होते.पुढे भारत-पाकिस्तान हॉकीचे सामनेही झाले.महिन्याभरातच भारत सरकारच्या निमंत्रणावरून झियांचे मार्शल लॉ अॅडमिनिस्ट्रेटर आमीर मोहम्मद भारत दौर्यावर आले होते. झियांशी फोनवर बोलताना मोरारजी देसाईंनी भोळसटपणे रॉच्या पाकिस्तानातील कारवायांसंबंधी माहिती दिली होती आणि त्यानंतर झियांनी ताबडतोब त्यावर कारवाई केली असेही म्हटले जाते. म्हणजे जगाच्या दृष्टीने झिया pariah ठरलेले असताना आपण मात्र त्यांना एका अर्थी लेजिटिमसी देत होतो. पुढे १९७९ मध्ये रशिया अफगाणिस्तानात घुसल्यानंतर पाकिस्तान आणि झिया "दहशतवादविरोधी" लढाईत अगदीच महत्वाची प्यादी ठरली. झियांचा pariah पणा त्यांच्या नशिबाने आपोआप नाहिसा झाला.
१९९९ मध्ये मुशर्रफांनी सत्ता काबीज केल्यानंतरही मुशर्रफ आणि पाकिस्तान जगाच्या दृष्टीने pariah ठरले होते. २००० साली अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन पाकिस्तानला ४-५ तासांसाठी गेले होते.त्यावेळी मुशर्रफ यांच्याशी जाहिरपणे हस्तांदोलन करणेही बिल क्लिंटन यांनी टाळायचा प्रयत्न केला होता.अशावेळी आपणच पुढाकार घेऊन मुशर्रफना आग्रा परिषदेसाठी बोलावले.त्यापूर्वी मुशर्रफ पाकिस्तानात सत्ताधारी असले तरी त्यांचे पद "अध्यक्ष" असे नव्हते तर "चीफ एक्झेक्युटिव्ह" असे होते आणि नामधारी अध्यक्ष म्हणून रफिक महंमद तरार होते. अशावेळी प्रोटोकॉलचा प्रश्न येऊ नये म्हणून मुशर्रफनी तरारला हटवून स्वतः अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतली. एका अर्थी सगळे जग मुशर्रफला टाळत असताना मुशर्रफला लिजिटिमसी आपण मिळवून देण्यात वाटा उचलला. पुढे ९/११ झाले आणि परत एकदा पाकिस्तान आणि मुशर्रफ पाश्चिमात्य सरकारांच्या गळ्यातले ताईत बनले.
आताही जग पाकिस्तानला टाळत आहे अशा बातम्या येत आहेत.अशावेळी फालतूचे मानवतावादाचे भरते येऊन जी चूक जनता आणि वाजपेयी सरकारने केली होती ती परत मोदी सरकार करणार नाही ही अपेक्षा. आणि हो-- अफगाणिस्तानमध्ये रशिया घुसणे किंवा ९/११ सारखी आणखी एखादी घटना घडून परत पाकिस्तान फ्रंटलाईन स्टेट बनणार नाही अशीही इच्छा.
- Log in or register to post comments
प
पैसा
Wed, 09/21/2016 - 09:30
नवीन
मोस्ट फेवर्ड नेशनचा घोळ वाचून हाताची बोटे काय अख्खा हात तोंडात घातला आहे. पाकिस्तान जर बदल्यात काही सवलती देत नसेल तर पाकिस्तानातून माल आयात करणे आणि सवलती अशी दुहेरी मदत कशाला चालू आहे? त्या पैशांवर पोसलेले अतिरेकी आपल्याकडे येऊन वाट्टेल तो गोंधळ घालतात. म्हणजे हा दहशतवाद पोसायला अंतिमतः आपलाही हातभार लागतोच आहे. प्रत्यक्ष लढाई करण्याच्या गप्पा मारण्यापेक्षा त्यांची आर्थिक नाकेबंदी का करायचा प्रयत्न होत नाही?
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Wed, 09/21/2016 - 10:46
नवीन
हे आर्थिक नाकबंदीबद्दल मी मागेही बरेचदा बोललो आहे पण कुणी उत्तर दिलं नाही अजून पर्यन्त, काय मजबुरी आहे नक्की?
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Wed, 09/21/2016 - 10:52
नवीन
आयात करण्यात आयात करणार्यांचा फायदा असतो.
- Log in or register to post comments
प
पैसा
Wed, 09/21/2016 - 10:56
नवीन
त्यांची तेवढी निर्यात होते आणि त्याना पैसे मिळतात. ते एका फटक्यात बंद होईल ना. सडू दे त्यांचा माल तिकडे. ते नको असेल तर तिथल्या लोकानी त्यांच्या सरकारला शिव्या द्याव्यात.
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
गुरुवार, 09/22/2016 - 11:29
नवीन
पाकला त्रास द्यायला आपण का त्रास करून घ्यायचा?
हे वाचा.
http://www.livemint.com/Opinion/AJyJYJD4vnAvyCysxxphTN/Mending-Pakistans-behaviour.html
हा उपाय छान वाटतो आहे.
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Wed, 09/21/2016 - 20:11
नवीन
वर उल्लेखलेली दोन्ही सरकारं........
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Wed, 09/21/2016 - 09:41
नवीन
हा हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्यांनी लष्करी मुख्यालयाच्या संकुलाजवळ असणाऱ्या पर्वतरांगांमध्ये लपून संपूर्ण परिसराची नीट टेहळणी केली होती. एनआयएच्या सूत्रांनी दि इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यादरम्यान मुख्यालयातील स्वयंपाकघर आणि स्टोअर रूममध्ये लागलेल्या आगीमुळे सर्वाधिक जवानांचा मृत्यू झाला. मुख्यालयाच्या परिसरात दोन इमारती आहेत. हल्ल्याच्यावेळी आग लागल्यानंतर कोणालाही पळून जाता येऊ नये यासाठी दहशतवाद्यांनी बाहेर जाण्याचे सर्व मार्ग बंद करून टाकले होते. यावरून दहशतवाद्यांना याठिकाणची सखोल माहिती असल्याचे सिद्ध होत आहे.
थोडक्यात आपल्या तरुण कोवळ्या जवानांना या अतिरेक्यांनी जाळुन मारले ! :(
हे जवान कुठल्या लढाईत मारले गेले नाहीत किंवा गोळ्या झाडतानाही ते शहिद झाले नाहीत.दहशदवादी खानावळीत आत पर्यंत पोहचले होते ! यावरुन आपण काय बोध घेतला पाहिजे ?
संदर्भ :- Uri attack probe : दहशतवाद्यांनी भारतीय सैनिकांना स्वयंपाकघरात कोंडले
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Uri Lesson: Secure Security Higher Priority Than Jingoism
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Wed, 09/21/2016 - 10:59
नवीन
ह्याचाच तीव्र संताप आहे बाणराव, प्रतिकाराची संधी ना मिळता संपून जाणे कसे असते ते शब्दात नाही वर्णू शकत,
काही लोक युद्धच्या विरुद्ध आहेत पण यारो, मरणारे सैनिक आपल्याच रक्ताचे नातेवाईक आहेत. भावनेच्या भरात काही करू नये, गप्प बसावे हे चीड आणणारे आहे, ह्या तमाम जगात फक्त आपल्याच देशाला सारासार विचार करण्याची काय गरज पडते नेहमी नेहमी हेच माझ्या आकलनाच्या बाहेर आहे, प्रतिकार करायचा नसेल तर ती शस्त्रसज्ज सेना, आयुधे, यंत्रे का काचेच्या कपाटात सजवून ठेवायला आहे काय? असेच हकनाक मरत राहण्यापेक्षा त्यांनाहि घरी पाठवा, आपण सगळे आपल्या मुलंबाळं सोबत घेऊन मरून जाऊ, ते जे काही अणुबॉम्ब मिसाईल बनवले आहेत ते आपल्याच देशावर टाकून संपवून टाका हा शेळपट देश, काही गरज नाही अशा अवस्थेत जगायची,
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Wed, 09/21/2016 - 10:38
नवीन
या शिवाय Indus Waters Treaty (IWT)चा आपण भंग करुन टाकावा.
यावर अधिक इथे :-
Mending Pakistan’s behaviour
Securing the Indus treaty
काल या संबंधात टिपण्णी केली होती आणि ब्रह्मा चेलानी यांच्या लेखाचे दुवे दिले आहेत, याच आशया वरचा लेख आत्ताच दिसला तो खाली देत आहे.
‘उरी’नंतर उरलेली
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Uri Lesson: Secure Security Higher Priority Than Jingoism
- Log in or register to post comments
प
पैसा
Wed, 09/21/2016 - 10:57
नवीन
करून टाका त्यांचे पाणी बंद.
- Log in or register to post comments
ज
जेसीना
Wed, 09/21/2016 - 10:47
नवीन
सध्या तरी युद्धात उतरण्याची हि वेळ नाहीये असा मला वाटते, जरी दहशदवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय सैन्य POK मध्ये शिरण्याच्या विचार करत असेल तर ते आपल्या दृष्टीने खूप घातक असेल असा मला वाटते. कारण POK मध्ये चीन ने बऱ्याच प्रमाणात गुंतवणूक करून ठेवली आहे .... पाकिस्तान ची हि चाल आपल्याला खूपच घातक आहे. त्यातच चीन ने आपले खायचे दात दाखवायला सुरवात केली आहे , एका बाजूने त्यांनी ह्या घटनेची कडी निंदा केली आहे तर दुसऱ्या बाजूने सरळ शब्दात आपल्याला "वॉर्निंग" दिली आहे आहे कि POK मध्ये सैन्य घुसवायचा अगोदर सर्व बाजूने विचार करा. आपल्याला दिलेला हा सरळ सरळ इशाराच आहे.
तिथे रशिया, फ्रान्स, बांगलादेश आणि अफगाणिस्तान ने आपल्याला पाठिंबा देऊन , आपण जे पाऊल उचलू त्यात ते सहकार्य असल्याचा दर्शवलंय.
हळू हळू पुन्हा एकदा पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धासारखे दोन गट पडण्यास सुरवात झाली आहे.
भारताने अजून पर्यंत कधीच कोणत्याच देशात आपले सैन्य घुसवले नाही हा अजून पर्यंतचा इतिहास आहे, उरी ची घटना अशा वेळी घडली आहे कि पठाणकोट ची जखम ताजी असतानाच परत पाकिस्तान ने आपल्या पाठीत खंजीर खुपसला आहे. भारताला खूप विचार करून पुढची पावला उचलायची आहेत.
आपले एक चुकीचा पाऊल उचलायची पाकिस्तान खूप वर्षांपासून वाट बघतो आहे, एक चुकीचा पाऊल उचलण्याच्या लगेच दोन किंवा तीन देशांमध्ये सरळ सरळ युद्ध भडकू शकते. आणि हे युद्ध कदाचित सरळ सरळ अणुयुद्ध असू शकते. कदाचित तिसऱ्या महायुद्धाची नांदीच सुरु होऊ शकते.
खूप कठीण काळ चालू आहे, अमेरिका खूपच भयानक अशा आर्थिक स्थितीतून जात आहे, रशिया आणि चीन दोघांना पण सुपर पॉवर बनण्याची घाई झालेली आहे, आणि अशा परिस्थितीत भारत नक्की कोणता पाऊल उचलतोय तिथे मला वाटते सगळ्या जगाचे आणि आपल्या सगळ्या भारतीयांचे लक्ष लागलेले आहे.
मला वाटते हा प्रश्न फक्त आणि फक्त पाकिस्तानची आर्थिक कोंडी , आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची सर्व बाजूने कोंडी करून त्यांना एकाकी पडूनच सुटू शकतो असा वाटते.
कदाचित मोदी आणि त्यांचे सहकारी येणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या सभे पर्यंत वाट बघतील त्यात पाकिस्तान ची सर्व बाजूने कोंडी करता येईल असा प्रयत्न करतील आणि नंतरच योग्य तो निर्णय घेतील. म्हणून कदाचित अजून पर्यंत केंद्राकडून काहीच हालचाली होताना दिसत नाहीयेत (फक्त बैठकांशिवाय).
मी तरी सध्या फक्त काहीतरी चांगल्या निर्णयाची वाट बघते आहे, बस माझ्या भारत मातेला आणि तिच्या रक्षण कर्त्यांना अजून इजा पोहोचू नये ह्यासाठी प्रार्थना करतेय.
तरी सुद्धा खूप खूप दुःखद मानाने माझ्या शहीद झालेल्या भारत रत्नांना भावपूर्ण श्रद्धांजली.
भारत माता कि जय ....... जय हिंद
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 09/21/2016 - 11:31
नवीन
प्रत्येक वेळी असा हल्ला झाला की लगेच भारताने युद्ध सुरू करावे, सीमा ओलांडून दुश्मनांचा खात्मा करावा अशी भाषा सुरू होते. त्याबरोबर लगेच अशीही भाषा सुरू होते की युद्धाची तयारी करायला अजून काही महिने लागतील, आताच युद्ध सुरू केले तर ते आत्मघातकी ठरेल. त्यामुळे बराच काळ काहीच न करता निघून जातो. तोपर्यंत आधीच्या हल्ल्याच्या स्मृती क्षीण होतात आणि मग पुन्हा एक नवीन हल्ला होऊन पहिले पाढे पंचावन्न अशी स्थिती येते. अगदी अल्प सूचनेवरून युद्ध सुरू करता येईल अशी स्थिती भारताला आणता येईल का?
- Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत
गुरुवार, 09/22/2016 - 03:50
नवीन
मुख्य प्रसार माध्यमात अजून दिसली नाही पाक व्याप्त काश्मिरात हल्ला
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Wed, 09/21/2016 - 10:58
नवीन
सध्या तरी युद्धात उतरण्याची हि वेळ नाहीये असा मला वाटते, जरी दहशदवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय सैन्य POK मध्ये शिरण्याच्या विचार करत असेल तर ते आपल्या दृष्टीने खूप घातक असेल असा मला वाटते. कारण POK मध्ये चीन ने बऱ्याच प्रमाणात गुंतवणूक करून ठेवली आहे .... पाकिस्तान ची हि चाल आपल्याला खूपच घातक आहे. त्यातच चीन ने आपले खायचे दात दाखवायला सुरवात केली आहे , एका बाजूने त्यांनी ह्या घटनेची कडी निंदा केली आहे तर दुसऱ्या बाजूने सरळ शब्दात आपल्याला "वॉर्निंग" दिली आहे आहे कि POK मध्ये सैन्य घुसवायचा अगोदर सर्व बाजूने विचार करा. आपल्याला दिलेला हा सरळ सरळ इशाराच आहे.
पाकिस्तानने आपल्याला घाबरले पाहिजे कि आपण पाकिस्तानला ? लष्कराने पाकव्याप्त काश्मिर सरळ काबीज करावे कारण तो आपलाच भाग आहे, मग आपण कशाला मागे-पुढे पहायचे ? पाकिस्ताने कंबरडे चांगले मोडले की चीन सुद्धा १० वेळा विचार करेल ! घी जब सीधी उंगली से ना निकले, तो उंगली तेढी करनी पडती है |
पाकिस्तान अतिरेकी पाठवत राहणार आपल्या सैनिकांची मुंडकी छाटणार, त्यांना जाळुन मारणार तरी आपण गप्पच बसायचे ? का ?आत्ता पर्यंत फक्त रशिया आणि फ्रान्स आपल्या बाजुने बोलताना आणि प्रत्यक्ष कॄती करताना लगेच दिसले. चीन काय करेल किंवा दुसरा क्ष देश आपल्या मदत करेल असे विचार कशासाठी ? देश आपला आहे, काश्मिर आपले आहे, पाक व्याप्त काशिमर सुद्धा आपलेच आहे असं असताना सरळ सैन्याला मोकळीक ध्या.
युद्ध आपल्यावर लादले जात असेल तर त्याला आपण तोंड दिलेच पाहिजे, इतके मिसाइल्स आपण टेस्ट करतो त्या काय फक्त नावासाठीच आहेत काय ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Uri Lesson: Secure Security Higher Priority Than Jingoism
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Wed, 09/21/2016 - 20:09
नवीन
>>जरी दहशदवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय सैन्य POK मध्ये शिरण्याच्या विचार करत असेल तर ते आपल्या दृष्टीने खूप घातक असेल असा मला वाटते. कारण POK मध्ये चीन ने बऱ्याच प्रमाणात गुंतवणूक करून ठेवली आहे ....
ही गुंतवणूक मे २०१४ नंतर झाली आहे का?
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Wed, 09/21/2016 - 20:38
नवीन
तो धोंडा भारताच्या पायाला बांधुन भारताला जखडुन ठेवावं, शक्य असल्यास बुडवावं हे ड्रॅगनचं तत्व. अंकल सॅम भारत-चीन संबंधी हेच स्वप्न बघत असणार. भारताने आता पाकिस्तानवरुन लक्ष्य पूर्णपणे काढुन सगळा जोर ड्रॅगन विरुद्ध लावावा. आपली फायनल लढाई, बँकेत आणि झालच तर रणांगणावर, ड्रॅगनशीच होणार आहे. मालकाचा हात पिळला तर तो आपोआप आपलं कुत्रं आवरेल.
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
गुरुवार, 09/22/2016 - 04:14
नवीन
मला इथली चर्चा वाचुन अजुन वाईट वाटायला लागलंय. १८ जण तर गेलेच, पण अजुनही आपण इतके ढिम्म कसे??? ... युद्ध करा असेही म्हणवत नाही पण काही तरी कराच राव आता.. खुपच झालंय... :(
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
गुरुवार, 09/22/2016 - 04:26
नवीन
आजची बातमी वर्मानपत्रात अशी आहे की पर्रीकराना आपल्या सैन्यात काही गफलत झाली असावी अशी शंका आली आहे. आपण हुतात्मा मेणबत्ती यांच्या नादाला लागून वास्तवाचे भान ठेवत नाही. संतापापेक्षा शरमेची भावना अधिक आली पाहिजे. एक एक ने दस दस मारे हे काव्यात लिहिणे ठीक असते. पण तसे होते का ? गुप्तचर यंत्रणा काय करीत होत्या. मुठभर दहशतवादी एका सैन्याला भारी पडतात वर्षानुवर्षे हे कसे काय..... ? सैनिक हो तुमच्यासाठी .. ही भावना आपली आहेच पण
सामरिक हालचालीत आपण काही कमी पडत तर नाही ना याचा गंभीर विचार झाला पाहिजे.
कृपया - सैनिकांचे मनोधैर्य खचविण्याचा आमचा हा प्रयत्न आहे असे तारे कृपया कोणी तोडू नयेत ही नम्र विनंति.
- Log in or register to post comments
प
पाटीलभाऊ
गुरुवार, 09/22/2016 - 10:57
नवीन
हा एक लेख वाचनात आला होता.
अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
http://kiranasis.blogspot.co.za/2016/09/if-india-has-to-hit-terror-factories-in.html?m=1
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 09/22/2016 - 11:56
नवीन
येस्स...हाच लेख शोधत होतो...यात जे लिहिले आहे ते वाचून इथे कोणी म्हणणार नाही की चला युद्ध करायला...याच बरोबर हे पण बघा
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 09/22/2016 - 11:56
नवीन
http://timesofindia.indiatimes.com/world/china/Our-friendship-with-Pakistan-is-unbreakable-Chinese-Premier-Li-Keqiang/articleshow/54461177.cms
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- ›
- »