लष्करी मुख्यालयावर अतिरेकी हल्ला, १७ जवान शहीद
ही बातमी.
जम्मू-काश्मीरमधील उरी येथील लष्कराच्या मुख्यालयावर पहाटे आत्मघाती दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारतीय लष्कराचे १७ जवान शहीद झाले आहेत. तर, लष्कराच्या प्रतिहल्ल्यात चार दहशतवादी मारले गेले आहेत.
चीड आणी हतबलता याशिवाय दुसरे काहिच सुचत नाहिये. पहिले पोलीस आणि आता लष्करी जवान. जे आपल्या रक्षणासाठी आहेत त्यांच्यावरच जीव गमवायची पाळी वारंवार येतेय. तरीही डोके शांत ठेऊनच विचार करायचा, भ्याड हल्ल्यांचा जास्तीत जास्त कडक निंदा करायची आणि मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली वाहायची याच्यापेक्षा जास्त ऑप्शन्स हाताशी नसणे यासारखे दुर्दैव दुसरे काय असू शकते ?
आजचा दिवसाची खराब सुरुवात. जास्त काही सुचत नाहिये त्यामुळे पुढे लिहित नाही.
---------------
श्रद्धांजली वाहण्यापुरता उरलेला एक सामान्य नागरिक
९८ साली आपण अणुबॉम्ब बनवला नसता तर ही वेळ आली नसती असे मला एक भारतीय नागरीक म्हणून प्रामाणिकपणे वाटते.दुर्दैवाने हा फार मोठा गैरसमज आहे. पाकिस्तानाने भारताने अणूस्फोट केला त्यानंतर लगेच दोन एक आठवड्यांत अणूस्फोट केले. अणुस्फोट घाईघाईत काही आठवड्यांत करता येईल असे नसते. त्यासाठी अनेक वर्षांची पूर्वतयारी लागते. म्हणजे पाकिस्तानने अणुस्फोट करण्याची तयारी केलेली होतीच. फक्त पाकिस्तानने त्याच्या नेहमीच्या धूर्त चालीने त्याच्या अणूस्फोटाचे खापर भारतावर फोडले. त्यातही सर्वात दु:खद गोष्ट अशी की पाकिस्तानच्या अश्या धूर्त खेळींना 'सिंप्लिस्टिक विचारसरणीचे" अनेक भारतीय कळत नकळत बळी पडतात, पडणे जास्त सोईचे समजतात. मुख्य म्हणजे पाकिस्तानच्या या कारवाया केवळ चीन नव्हे तर अमेरिका व युरोपिय देशांच्या उघड/गुप्त मदतीने व अनेक महत्वाचे आंतरराष्ट्रिय कायदे धुडकावून झालेल्या आहेत. पाकिस्तानने त्याला मिळालेले तंत्रज्ञान चोरीच्या मार्गाने उत्तर कोरिया, इराण आणि लिबियाला विकले हे पण गुपित नाही. मुख्य या सगळ्या गुन्हेगारी कारवायांसाठी पाकिस्तानला काही शिक्षा झालेली नाही. पाकिस्तानचा आणि विषेशतः त्याच्या सैन्य सत्ताधार्यांचा (केवळ ज्यांचेच म्हणणे महत्वाचे आहे, तेथिल मुलकी सरकार नेहमीच दिखाव्यासाठी मधून मधून पुढे केलेली कठपुतळी होऊन राहिलेले आहे) पूर्वेतहास पाहता, त्यांना भारताशी सलोख्याचे किंवा समानतेचे संबध नको आहेत तर त्यांचे एकमेव ध्येय भारताला कमकुवत करून आपल्या कह्यात ठेवायचे आहे. ते सरळ सरळ युद्धाने जमत नाही हे तश्या युद्धांत पराभव चाखून पाकिस्तान शिकला आहे. पण त्याचा मूळ उद्द्येश बदललेला नाही. फक्त तो उद्येश साधण्यासाठी (अ) अतिरेकी कारवाया करून "ब्लिडिंग बाय अ थाऊंजड कट्स" करणे; (आ) अणूयुद्धाच्या धमकीने ब्लॅकमेल करणे; (इ) शांततेच्या आणि मानवतेच्या नावाखाली अंतर्गत फूट पाडणारी व भारत "सॉफ्ट स्टेट" बनवण्यासाठी मानसिकता निर्माण करणारी "विचारवंत/डोव्हज" ची फळी निर्माण करणे, इत्यादी कमीतकमी खर्चात जास्तीतजास्त फायदा देणारे उपाय चालू आहेत. हे सर्व अजिबात गुपित नाही. अनेक पाकिस्तानी रिटायर्ड जनरल्स यांच्या लेखनात आणि मुलाखतींत हे अनेकदा व्यक्त झाले आहे. अनेक राजकिय विश्लेषकांनीही या अर्थाचे भाष्य केले आहे. त्यामुळे आपण अणूस्फोट केला नसता तर पाकिस्ताननेही केला नसता असा विचार करणे फार नाईव्ह होईल. किंबहुना पाकिस्तानने अगोदर स्फोट केला असता तर भारतावर स्फोट करू नये यासाठी प्रचंड दडपण आले असते आणि भारताची अजूनच पंचाईत झाली असती. भारत हा सामरिक दृष्ट्या सबळ पण राजकिय विचारशक्ती नसलेला देश आहे असा आजपर्यंतचा जागतिक समज आहे. पाकिस्तानबरोबर तीन युद्धे जिंकूनही पाकिस्तानला सतत वरचढ होऊ देण्याच्या सत्य वस्तूस्थितीवर हा समज आधारलेला आहे. आता त्यात बदल घडत आहे असे दिसते आहे... तो घडावा असे वाटते. शेवटी पाकिस्तान, "वाघ म्हटले तर खातो, वाघोबा म्हटले तरी खातो" या म्हणीचे उत्तम उदाहरण आहे. राहता राहिला अणूयुद्धाचा बागुलबुवा... तो बागुलबुवाच (ब्लफ) आहे असे तज्ञांचे म्हणणे आहे. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे, पाकिस्तानचे सर्व वरिष्ठ जनरल्स सैनिक कमी आणि बिझिनेसमन जास्त आहेत. पाकिस्तानी मिलिटरीच्या मालकीचे अनेक "नॉन-मिलिटरी" गोष्टी तयार करणारे कारखाने/व्यवसाय आहेत. तसेच डोंगराळ प्रदेशात चालणारे अंमली पदार्थांचे उत्पादन आणि त्याची भारत (पंजाबची आठवण करा) व पाश्च्यात्य देशांत विक्री हा सैन्यातल्या अधिकार्यांचा मोठा व्यवसाय आहे. माणूस एकदा व्यापारी होऊन सधन झाला की त्याची युद्ध करण्याची इच्छा (रिस्कटॉलरन्स) कमी होते आणि कपटाने दुसर्यांना झुंझवून आपण मलिदा खात राहणे हे जास्त सोईचे होते. हे पण फार मोठे गुपित नाही. बहुतेक सर्व पाकिस्तानी जनरल्सच्या अमेरिका व ब्रिटनमध्ये मोठमोठ्या गुंतवणूका आहेत, त्यांची मुलेबाळे तेथे स्थायिक झालेली आहेत. अश्या जनरल्सना अणूयुद्धाचाच नव्हे तर मोठ्या पारंपारिक (कन्व्हेनशनल) युद्धाचाही धोका नको असणारच. मात्र जोपर्यंत भारत आणि जग अणूयुद्धाच्या धमक्यांना घाबरून पाकिस्तानी जनरल्सना हवे तसे वागू देत आहे, तोपर्यंत त्या चालीची मजा लुटणे त्यांनी चालू ठेवावी, हे केवळ तार्कीक सत्य आहे ! मात्र, भारताने डोके गरम करून "काय होईल ते नंतर पाहून घेऊ" असे म्हणत आजच हल्ला करणे वेडेपणाचे होईल. त्याऐवजी, (अ) प्रथम जागतिक राजकिय स्तरावर पाकिस्तानला वेगळे पाडणे (ज्यामुळे चीनलाही त्याला पाठिंबा देणे कठीण व्हावे); (आ) त्याचबरोबर भारतीय डोव्हची अनेक दशके चाललेली दुकाने ताब्यात आणणे; (इ) आर्मी-नेव्ही-एअर फोर्स यांनी एकत्रितपणे कारवाईची योजना आखणे; आणि (ई) फार वेळ न घालवता पण योग्य संधी पाहून असा हल्ला करणे की रोग मुळापासून नष्ट व्हावा. कारण, सद्याचे जागतिक वारे पाहता, सद्या चालून आलेली संधी वारंवार येत नाही. केवळ येणारा काळच सत्यात असे काही उतरेल की नाही हे सांगू शकेल... पण सद्या वाहणारे वारे असे होईल असे संकेत देत आहेत.मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “If death strikes, before I prove my blood, I swear I'll kill death.” – Gorkha Capt. Manoj Kumar Pandey PVC 1/11 Riflesमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Two men from PoK working for JeM arrested in Uri: Army