आरक्षणाशिवाय कसे जगावे?
मित्रहो, मराठा मोर्च्याच्या निमित्त एका धाग्यावर आपल्या दणदणीत चर्चा झाल्या. त्याचा पुढचा भाग काढावा लागणार आहेच कारण अनेक मुद्दे अजून आलेले नाहीत. तर ते एक असो. हा धागा वेगळ्या विचाराने काढलाय व सर्व मिपाकरांना आग्रहाची विनंती आहे की यात जमेल तसे, तितके योगदान आपल्या अनुभव, कौशल्य, ज्ञान याद्वारे द्यावे.
तर मंडळी, असे आहे की अनेक हुशार, कर्तबगार मुलांना, विद्यार्थ्यांना, होतकरु तरुणांना शिक्षण व रोजगार ह्या जीवनयापनासाठी अतिशय महत्त्वाच्या गोष्टींसाठी कसल्याही प्रकारचे आरक्षण नसल्याने झगडावे लागते आहे. अनेकांना आर्थिक परिस्थितीमुळे किंवा इतर अनेक परिहार्य कारणांमुळे संधींची उपलब्धता कमी झाल्याचे, नसल्याचे जाणवत आहे. अशा नागरिकांना, आपल्या भारतीय बांधवांना जातपातीची आडकाठी येणार नाही व आपल्या क्षमतेनुसार योग्य ते शिक्षण व रोजगाराची संधी मिळू शकेल असे मार्गदर्शन करता येईल काय हा विचार मनात आला, म्हटले आपल्या मिपाकरांनाच विचारल्यास एक चांगला मार्गदर्शक धागा तयार होईल.
काय अपेक्षित आहे? :
१. कोणत्याही प्रकारची जातीवाचक टिप्पणी, दोषदर्शन नसावे.
२. प्रतिसाद थेट मुद्द्याला धरुन असावे.
३. रोजगार वा शिक्षण संधींची माहिती देतांना हात आखडता घेऊ नये.
४. आपल्या माहितीतल्या कंपन्या, संस्था, शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था ह्यांच्या कामाची माहिती.
५. हा 'खर्या गरजूं'साठी मदतीचा धागा आहे हे कायम लक्षात असू द्या.
६. आपले बहूमूल्य मार्गदर्शन.
खूप खूप धन्यवाद!
💬 प्रतिसाद
(131)
स
सूड
Mon, 09/26/2016 - 13:12
नवीन
माहीती मिळवायला आवडेल.
सेम हियर, एखादी व्यक्ती आपल्यासाठी एखादी गोष्ट करतेय म्हणताना; ते ती व्यक्ती का करतेय हा प्रश्न आधी पडतो.
- Log in or register to post comments
न
निओ१
Mon, 09/26/2016 - 20:12
नवीन
don't waste you talent... go to real world.. and find good ppl who can really want to work with you or want to invest on your project.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Tue, 09/27/2016 - 13:54
नवीन
मुद्दा क्रमांक 9 साठी मी उत्सुक आहे.
मी एका खासगी कंपनी मध्ये काम करतो. काम फायनाशियल अन्यालीस्ट स्वरूपाचं आहे.
माझी स्वतःची काही एकर शेती आहे. नोकरी करताना जाणवलं आपल्या टीमच्या आर्थिक विश्लेषण वर विश्वास ठेवून कंपनी करोडो रुपयांचे निर्णय घेते, तेच विश्लेषण जर आपण आपल्या शेतीत वापरलं तर नक्कीच आपल्याला सुद्धा "Decision Making" मध्ये मदत होईल म्हणून-
1) मी 4-5 पिकांचे "डिमांड सप्लाय, सेल्लिंग प्राईस ट्रेंड अनालयसिस" केले आहे. (काकडी, टोमॅटो, वांगी, गवार आणि ढोबळी)
2) वेगवेगळे रेशोज काढले.
3) शेती विषयक बिसनेस केसेस तयार केली
4) कॉस्ट एफ्फेक्टिव्ह ऊस शेतीचा पण अभ्यास केला आहे.
मी हे करत असताना प्रकर्षाने जाणवलं की शेतकऱ्याचा सर्वात महत्वाचा प्रश्न त्याचे "वर्किंग कॅपिटल" हे होय. शेतकऱ्याला फंड मॅनॅजमेन्ट अजून सुद्दा नीट करता येत नाही म्हणून तो एका वर्षी तुपात असतो आणि पुढील 3-4 वर्षे जात्यात.
शेतकऱ्यांना फंड मॅनॅजमेन्ट चे सल्ले सोप्या पद्धतीने देण्याचा मानस आहे.
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
Tue, 09/27/2016 - 14:43
नवीन
हे असे डेली लागणार्या भाज्यांचे मॉडेल केले तर फायदा होऊ शकेल का? आजकाल मोठ्मोठ्या शहरांमध्ये चांगली भाजी मिळत नाही.
जर शेतकरी लोकांनी मोठा गट स्थापन करुन डायरेक्ट सोसायटींशी किंवा हॉटेल्सशी व्यावसायीक भागिदरीत काम केले तर रेग्युलर इन्कम सुरु होऊ शकते.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Wed, 09/28/2016 - 08:02
नवीन
<<<<जर शेतकरी लोकांनी मोठा गट स्थापन करुन डायरेक्ट सोसायटींशी किंवा हॉटेल्सशी व्यावसायीक भागिदरीत काम केले तर रेग्युलर इन्कम सुरु होऊ शकते.>>>>>
हा फॉर्मुला सहसा यशस्वी होताना नाही दिसत. कारण जे पुढाकार घेतात ते कालांतराने शेतकरी न राहता व्यापारी बनतात आणि आपली वेगळी चूल मांडतात.
मी जेवढा अनुभव शेतीमध्ये घेतला, माझ्या निदर्शनात आले की शेतकरी हा उत्पादकांचे काम व्यवस्थित करू शकतो पण विपणन म्हंटलं की नाक मुरडतो (त्याला कारणे ही तशी आहेत). शेतकऱ्याला 2-3 टन टोमॅटो ज्यादा काढायला सांगा तो काहीही खटपट करून काढू शकतो पण तोच माल विपणन करायचा म्हंटलं तर त्याच्या अंगावर काटा येतो.
- Log in or register to post comments
म
मारवा
Tue, 09/27/2016 - 16:35
नवीन
संदीपजी
आपण स्वतः प्रगल्भ आहातच हा सल्ला नसुन एक मित्राच्या नात्याने अगदी साधी सुचवणी आहे
पटल्यास घ्यावी वा टाकुन द्यावी.
आपण खरच एक एक फोकस करुन कार्य हाती घ्यावे.
काय आहे की अगदी १०० पैकी एकच एक जरी फोकस करुन आणि त्याच्या लॉजिकल डेस्टीनेशन पर्यंत पोहोचवले.
तर त्याचा अंतिम घटकालाही फायदा होतो व तुम्हालाही समाधान मिळते.
शिवाय त्यातुन नेमक्या कुठे चुका होत आहेत त्या सुधारता कशा येतील आपण जो विचार करत आहोत तो प्रत्यक्षात किती रुजतो आहे. म्हणजे आपल्या आयडीयाज कठोर वास्तवाच्या मार्यात किती तग धरताहेत याचा विचार आढावा म्हणा घेऊन परत परत प्रयत्न करणे म्हणजे फोकस आणि पर्सिसंटन्स ने आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणणे महत्वाचे आहे असे वाटते.
आपल्या मनातल्या ५० पैकी अगदी १ च आयडीया जरी सक्सेस झाली तरी त्यातुन मीळणारा आनंद मोठा आहे.
कृपया सल्ला समजु नये सहज बोललो तुमच्या विचारांच फार मनापासुन कौतुक वाटल म्हणुन बोललो.
कृपया आदरवाइज घेऊ नये. पण वरील जो प्रकल्प ज्यात ते तरुण सोडुन गेलेले आहेत तोच फोकस करावा व तसे का झाले असावे याचा अॅनालिसीस करण्यासच भर द्यावा. वन अॅट अ टाइम मगच पुढे सरकला तर बरे होइल असे मला आपले एक मनापासुन सांगावेसे वाटत होते कालपासुन
पण आता सांगुन मोकळा झालो.
लोभ असावा
मारवा
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Tue, 09/27/2016 - 17:25
नवीन
सर्व योजनांत खूप पोटेंशियल आहे यात वाद नाही. इतरांनी अगोदरच म्हटल्याप्रमाणे...
प्रत्येक योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी स्वतंत्र प्रकल्प व नियोजन जरूर आहे. पुरेसे आणि योग्य मनुष्यबळ असेल तेवढाच/तेवढेच एक किंवा जास्त प्रकल्प हातात घेऊन सुरुवात करणे योग्य ठरेल.
- Log in or register to post comments
ए
एस
Mon, 09/26/2016 - 06:37
नवीन
खुद को कर बुलंद इतना
कि हर तकदीर से पहले
खुदा बंदे से खुद पूछे
बता, तेरी रजा क्या है?
- आणि अजून एक -
ज्याची स्पर्धा स्वतःशीच आहे, त्याला हरवणारा कोण आहे?
- Log in or register to post comments
स
साहना
Mon, 09/26/2016 - 07:25
नवीन
शैक्षणिक क्षेत्रांत स्वातंत्र्याची लढाई करणे सर्वच दृष्टिकोनातून भारतीय समाजासाठी साठी आवश्यक आहे. सरकारी निर्बंधा खाली असलेल्या शिक्षणाला भविष्य नाही. ते गेल्यांत जमा आहे. किमान खाजगी क्षेत्राला वाट्टेल त्या प्रकारच्या शाळा (स्वखर्चाने) उघडून,वाट्टेल ती प्रवेश प्रक्रिया वापरून आणि वाट्टेल ती फी आकारून आपल्या शाळा कॉलेजे उघडण्यास परवानगी दिली पाहिजे. मुरली मनोहर जोशींनी ह्या क्षेत्रांत फार चांगली पाऊले उचलली होती. त्यांच्या मुले आज किमान अमिटी सारखी युनिव्हर्सिटी अस्तित्वांत आहे.
१००% शेक्षणिक स्वातंत्र्य, सरकारी गुलामगिरी शैक्षणिक क्षेत्रांतून हद्दपार.
आमचे नशीब बरे आहे म्हणून अजून पर्यंत खाजगी क्षेत्रांत आरक्षण नाही. काँग्रेस सरकार हे आणण्याच्या प्रयत्नांत होते. खाजगी क्षेत्र जास्त विकसित आणि मोठे व्हावं आणि सार्वजनिक/सरकारी क्षेत्र जास्तीत जास्त कमी व्हावे ह्यासाठी आम्ही प्रयत्न केले पाहिजेत.
- Log in or register to post comments
ह
हेमन्त वाघे
Mon, 09/26/2016 - 07:54
नवीन
सरकारी निर्बंधा खाली असलेल्या शिक्षणाला भविष्य नाही ??
हे कोठल्या आधारावर आपण विधान केलेत ?>
कोणत्या खाजगी संस्था IIT आणि IIM पेक्षा चांगल्या आहेत
ISB हि अजूनही IIM च्या खाली आहे - आणि अजूनही IIT ला खाजगी पर्याय आला नाही
मुंबईत सर्व उत्कृष्ट मेडिकल आनंदी दांत विद्यालये सरकारी आहेत
मुंबई महाविद्यालयाच्या खाली येणारी UDCT VJTI आणि SPCE हि कॉलेजेस आजही टॉप लाच आहेत.
तसेच अनेक सरकारी निर्मान्ध असूनही मुंबईतील जमनालाल बजाज आपला दर्जा राखून आहे .
पुण्यात COEP चा दर्जा घसरला का ?
सर्व NIT बरबाद झाल्या का?
तर यांचे भविष्य आपणाला कसे दिसले ??
आपण शिक्षणावर काहीबाही लिहीत असल्याने आपल्या या विषयात बरच कळत असावे असे वाटते .............
- Log in or register to post comments
स
साहना
Mon, 09/26/2016 - 23:16
नवीन
ठीक आहे. आपल्या मुलांना COEP मध्ये पाठवा.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 09/27/2016 - 20:22
नवीन
सीओईपीबद्दल आपल्याला नक्की कल्पना नसावीसे वाटते.
- Log in or register to post comments
ह
हेमन्त वाघे
Wed, 09/28/2016 - 11:14
नवीन
खरेच आपण काय शिकला आहेत हे मला जाणून घेण्यास आवडेल
आपणास भारतातील आणि खासकरून महाराष्ट्रातील इंजिनीरिंग शिक्षणाबद्दल काही माहिती नसावी असे वाटते
COEP ला मी ठरवून चालणार नाही , तर माझ्या मुलीने engineer व्हायचे ठरवावे लागेल ( मला काहीही इच्छा नाही ) आणि तिला बरेच मार्क मिळवावे लागतील
पुणे जी खाजगी इंजिनीरिंग कॉलेग ची पांढरी आहे तिथेसुद्धा सरकारचे COEP क्रमांक 1 चे कॉलेज आहे ( दर्जा खाली आला असेल तर कृपया तसे सांगावे)
असो आणि बाकीच्या प्रश्नाचे उत्तर कोठे आहे ?
IIT पेक्षा कोणती खाजगी इंजिनीरिंग कॉलेजेस चांगली आहेत ? ( आपणास IIT माहित आहे का ?)
IIM पेक्षा कोणती खाजगी व्यवस्थापन कॉलेजेस चांगली आहेत ? ( आपणास IIM माहित आहे का ?)
तसेच मुंबईत सर्वोत्कृष्ठ कला शाखेसाठी कॉलेजेस आहेत - सेंट झेविअर्स , रुईया , रुपारेल
वाणिज्य शाखेसाठी - पोतदार , नरसी मंजी आणि सिडनहॅम
हि विद्यालये सुद्धा संस्थेची असली तरी खाजगी नाहीत - ती सरकारचे सर्व नियम पळून सरकारी मदतीवर चालतात
कायद्यासाठी मुंबईत सर्वात उत्कृष्ट आहे GLC गव्हर्नमेंट LAW कॉलेज
वैयद्यकीय शाखेसाठी सर्वोत्कृष्ट 5 कॉलेज हि सरकारी आहेत .
कला शाखेसाठी आणि स्थापत्य ( आर्किटेक्टर ) - सर जे जे - सरकारी
तर साहना ताई मला मुंबईतील आणि काही बाबतीत भारतातील सर्वोत्कृठ खाजगी कॉलेज सांगाल का?
कि आपणास काहीही माहित नसून आपण हवेत तिर मारता ?
तसेच मुंबई हे भारतातील सर्वात विचित्र शहर असून बाकी सर्व भारतात खाजगी कॉलेज ने सरकारी कॉलेज ला तोडले का?
दिल्लीत सेंट स्टिफन्स , लेडी श्रीराम आणि JNU खाजगी आहेत का ?
हो आणि आज माझी मुलगी अभ्यासात हुशार निघाली असती तर मी वरीलपैकी कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळाली असती तर मी आनंदाने रडलो असतो - कारण माझ्या अतिशय कमी माहितीत तरी हि उत्कृष्ट कॉलेज आहेत . पण सध्या ती चॊथीत असून तिचा प्लॅन आर्टिस्ट , अॅनिमेटर आणि रॅप स्टार बनणे असा खतरनाक आहे . मला ती फॅशन किंवा डिझाईन मध्ये गेली तर आवडेल - आणि भारतात शिकायचे तर आजच्या परिस्थितीत सर्वात उत्कृष्ट कॉलेज आहेत -फॅशन साठी NIFT आणि डिझाईन साठी NID किंवा IDC -IIT - हि सुद्धा सरकारी आहेत !!!
आपल्या पूर्ण उत्तराच्या प्रतीक्षेत
- Log in or register to post comments
ह
हेमन्त वाघे
Fri, 09/30/2016 - 04:25
नवीन
साहना ताई गप्पा का ??
साहना ताई गप्पा का ??
दिल्लीत हि सर्व चांगली कॉलेज सरकारच दिसतायत
मग हि तुम्ही सांगता ती खाजगी कॉलेज कोणती ??
- Log in or register to post comments
S
sagarpdy
Wed, 09/28/2016 - 07:28
नवीन
तुमचा एखादी शाळा उघडायचा प्लॅन होता का ? (ह घ्या)
आरक्षण खाजगी शिक्षण संस्थांना लागू असते कि नाही ? असल्यास ते बंद व्हावे असे तुमचे म्हणणे आहे का ?
- Log in or register to post comments
ह
हेमन्त वाघे
Sat, 10/01/2016 - 10:25
नवीन
आपण रोज हजेरी तर लावत आहेत , मग या धाग्यावरच गप्प का?
आपल्याला भारतातील सर्व प्रकारच्या सरकारे कॉलेज पेक्षा उत्कृष्ट कॉलेज मिळाली का?
आपण तर शिक्षण तज्ज्ञ आहेत ना?
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Mon, 09/26/2016 - 16:43
नवीन
डांगेबुआ, विचार आवडले, पोचले म्हणत नाही सद्ध्या, आम्हाला इतके उत्तुंग विचार प्रोसेस करायला वेळ लागतो, बाकी आज इथे तुम्ही आमचे मित्र असल्याचा फार अभिमान वाटतो हे जाहीर करतो मी :).
बाकी आयडियाज वाचून मी पण अप्पा अन अभ्यासोबत सहमत आहे. :)
- Log in or register to post comments
अ
अजया
Mon, 09/26/2016 - 17:33
नवीन
डांगेभाऊ, इतके दिवस तुमचे प्रतिसाद वाचून माणूस एवढं लिहु कसा शकतो म्हणून थक्क होते! आज तुमचा वरचा प्रतिसाद वाचून लोक कसे आणि किती विचार करु शकतात बघून थक्क झाले आहे.
_/\_
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Mon, 09/26/2016 - 17:51
नवीन
+१
डांगेजी जैसे सुलझे हुए आदमी से "आत्महत्या करावी का?" इस धागे की अपेक्षा नही थी. :)
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 09/27/2016 - 20:26
नवीन
_/\_
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 09/26/2016 - 19:40
नवीन
>>>> आरक्षणाशिवाय कसे जगावे?
काही जातींचे नागरिक इतकी वर्षे कोणत्याही आरक्षणाशिवाय जगत आहेत. त्यांच्याकडून शिकता येईल.
- Log in or register to post comments
स
साहना
Tue, 09/27/2016 - 08:54
नवीन
जगत आहेत असे म्हणणे खरे तर अंडरएस्टिमेशन ठरेल. काही जातीच्या लोकांनी गरीब असून सुद्धा स्वबळावर प्रचंड प्रगती केलेली आहे.
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Tue, 09/27/2016 - 13:55
नवीन
आरक्षणाशिवाय कसे जगावे?
सबलांनी दुर्बलांचे किमान जगता येईल असे सक्षमीकरण करावे. त्यासाठी मानवतावादी सहृदय समाज निर्माण होणे गरजेचे आहे. समानता म्हणजे न्याय व असमानता म्हणजे अन्याय या भ्रमातून बाहेर पडणे गरजेचे आहे. अधिक भाष्य राजीव साने यांच्या मुलाखतीत आहे
- Log in or register to post comments
म
मारवा
Tue, 09/27/2016 - 15:17
नवीन
सर्वांनी आवर्जुन ऐकावी अशी आहे
सानेगुरुजी झिंदाबाद!
हे गुरुजी फार भारी आहेत फार च भारी सीरीयसली ही मुलाखत फारच सुपर्ब दोन भागात आहे.
आणि एक आठवल
आय पी एच ही ठाण्याची संस्था आपले आनंद नाडकर्णी यांची यांचा दरवर्षी एक करीयर गायडन्स चा फेस्टीवल असतो.
अत्यंत सुंदर मार्गदर्शन असते.
एकवेळ अवश्य माहीती घ्यावी अतिशय चांगला दर्जेदार उपक्रम आहे.
- Log in or register to post comments
म
मारवा
Tue, 09/27/2016 - 16:21
नवीन
http://www.healthymind.org/2015-vedh.html
This is a flagship event of IPH running successfully for more than two decades.
VEDH is a career perspective conference which IPH started organizing way back in 1991.
VEDH Thane will have its 23rd edition in December 2014. IPH with respective partners now organizes VEDH at Ahmednagar (8yrs.), Pune (3 yrs), Latur (3 yrs), Aurangabad (7yrs) and
Nashik (3 yrs), Nagpur (2 yrs).
This year the VEDH season will open with 50th Golden VEDH AT Pune on 19th and
20th September 2014.
Every year Thane VEDH that spans over 16 hours and an entire week end attracts over 3500 students, teachers and parents. VEDH is documented in crisp DVD format by the
AVAHAN team of IPH.
याचे २०१६-१७ चे कॅलेंडर हा कार्यक्रम कुठे कुठे आयोजित होणार आहे ते दिलेल आहे.
अत्यंत चांगला कार्यक्रम आहे. ओळखीतल्या ज्यांनी याचा फायदा घेतलेला आहे त्यावरुन हा एक चांगला अटेंड करण्यालायक कार्यक्रम नक्कीच आहे.
- Log in or register to post comments
न
नाखु
Wed, 09/28/2016 - 08:06
नवीन
का होऊन गेले ते कळविणे.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Tue, 09/27/2016 - 17:33
नवीन
धन्यवाद मित्रांनो,
वरच्या दहा संकल्पनांपैकी माझ्या स्वतःच्या ओरिजिनल कन्सेप्ट्स ह्या एक-दोनच (शैक्षणिक मार्गदर्शन व शेती कॉलसेन्टर) आहेत. त्यात कोअर कन्सेप्चुअलायजेशन, ए टू झेड प्लानिंग, कोअर टेक्नॉलॉजी ब्रेकथ्रू ह्या माझ्या स्वतःच्या आहेत. त्या अर्थातच मी स्वतः जमेल तशा व तितक्या लवकर लॉन्च करणार आहे. त्याबद्दल ग्राउंड प्लानिंग व कोअर टिममेंबर शोधणे सुरु आहे.
बाकी सर्व संकल्पना ह्या एकतर कोणीतरी आधीच करत असलेले व्यवसाय "लार्ज फॉरमॅट वर कसे दिसतील" ह्याचे विजुलायजेशन आहे किंवा सहज करता येतील अशा आहेत ज्यात फार काही 'अन्कन्वेन्शल, आउट ऑफ बॉक्स' नाही. वर नाखु यांनी म्हटल्याप्रमाणे 'सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करिल तयाचे' ह्याप्रमाणे ह्या संकल्पना आज उपलब्ध आहेतच फक्त त्या झटून, जीव ओतून देऊन करणार्यांची गरज आहे. इथे मांडण्याचे कारण ही बीजं आहेत, कुणीही ह्या बीयांना उचलून घेऊन जावे त्याचे वटवृक्ष करावे. त्याचा माझ्याच महाराष्ट्रातल्या अनेक मुलांना फायदा होईल. तो फायदा व्हावा हाच एकमेव उद्देश आहे माझा. दुर्दैवाने माझे शंभर क्लोन बनू शकत नसल्याने माझ्यासारख्या विचारांच्या लोकांनी ह्यात सहभागी व्हावे, सर्वोदय करावा हीच इच्छा आहे.
आज आपण बघितले तर ९० टक्के तरूणवर्ग झापडबंद अवस्थेत आहे. त्याला आपल्या आजूबाजूला उपलब्ध असलेल्या संधी दिसत नाहीत, किंवा एका अजब स्वप्नवादामुळे त्या करायची इच्छा नसते. तसेच कोणी असंच करुन यशस्वी झाला की त्याचे 'फक्त यश' बघून कॉपी मारायला जातात आणि अपयश येऊन अशा वेगळ्या वाटांची बदनामी होते.
मागे एकदा खरडफळ्यावर मी लिहिले होते, अनेक नवनविन कल्पनांचे व्यवसायात रुपांतर कसे करता येईल ह्यावर विचार करण्याचा मला छंद आहे. त्या व्यवसायांचे थेरॉटिकल स्वरुप, त्याला लागणारे भांडवल, मनुष्यबळ, सरकारी परवानग्या, मार्केट रिसर्च, ग्राहकवर्ग, स्पर्धा, भविष्यातली वाटचाल, स्वॉट अॅनालिसिस, तशीच मदत लागली तर भांडवल व मार्गदर्शन पुरवणार्या संस्था ह्यांच्यावर इत्थंभूत विचार व अभ्यास करुन त्याचा एक अहवाल बनवून ठेवणे ह्याचा किडा गेले अनेक वर्ष आहे. आतापर्यंत सुमारे चारशे व्यवसायांचे असे संकलन करुन ठेवले आहे. ह्याचसंबंधी काम करण्यासाठी एक बिजनेस कन्सल्टन्सी फर्मही स्थापन केली आहे, माझी इतरही व्यवधानं असल्याने त्याचे काम म्हणावे तसे सुरू झालेले नाही. अनेकांकडे पैसा असतो, काम करायची तयारी असते पण चांगली कल्पना किंवा अभ्यास नसतो किंवा नक्की काय करायचे ह्याची काहीच माहिती उपलब्ध नसते. अशावेळी मी मदत करु शकतो हे मला लक्षात आले. कारण मी प्रत्यक्ष काम करण्यापेक्षा बिजनेस प्लानिंग, स्ट्रॅटेजीकल थिंकिंग, इत्यादी बैठे डोके चालवण्याचे काम हे चांगलं करु शकतो हे मागच्या तीन-चार वर्षाच्या अनुभवातून शिकलो.
आपल्या सर्वांसाठी एक बोधकथा: (माहित असेलच)
वादळामुळे समुद्रातून हजारो स्टारफिश किनार्यावर पडलेले असतात, एक माणूस एक एक उचलून परत समुद्रात फेक्त असतो. त्याला दुसरा बोलतो तु एकटा एवढे सारे जीव वाचवू शकणार नाहीस. तू असा काय मोठा फरक पाडणार आहेस?, त्यावर तो एक स्टारफिश उचलून परत समुद्रात फेकतो आणि म्हणतो "माहित नाही पण ह्याच्या जीवनात मोठा फरक पडला आहे."
मला तुम्ही सगळे किमान एक स्टारफिशच्या आयुष्यात बदल घडवणारे व्हावे असे वाटते. तेवढ्यासाठी ह्या संस्थळावर टाकले आहे, अनेक प्रयत्नांमधला हाही एक प्रयत्न आहे. वाया जाईल की नाही ते आपल्या सर्वांवर आहे.
अनेक चांगले प्रतिसाद येत आहेत, प्रत्येकाला व्यक्तिशः धन्यवाद देता येणे शक्य नाही. पण खरंच आभार्स यारो!
धन्यवाद!
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Tue, 09/27/2016 - 21:23
नवीन
संदीप तुझी काहीतरी चांगले करुन दाखवायची कळकळ बघून खरेच समाधान वाटते.
ह्यातली एक आयडीया शेतीचे कॉलसेंटर(हेल्पलाईन) हे तुझे स्वतःचे स्वप्न आहे म्हणतोयस तर आपण ह्यावर इथे चर्चा करण्यास काही हरकत नसावी. ह्यामध्ये काही ट्रेड सिक्रेट नसल्याने आणि तू स्वत: ह्या कल्पनेवर काम केले अस्ल्याने माझ्या काही शंकांविषयी आपण बोलणे गैर नसावे.
हेल्पलाईन म्हणताच डोळ्यासमोर मोबाईल कंपन्यांची वगैरे कॉलसेंटर्स येतात. त्यांच्याकडे ग्राहकांना पुरवण्याची माहीती, फ्रिक्वेन्टली आस्कड क्वेश्चन्स अशांचा अभ्यास करुन घेतलेले मनुष्यबळ उपलब्ध असते. किंबहुना ती माहीती फारच थोडी असते. फक्त ती योग्य नंबरला/योग्य अडचणीचे/योग्य निवारण कसे होईल ह्याचे मार्गदर्शन अशा प्रकारे असते. तुला काय वाटते, महाराश्ट्रातील शेतीसाठी असा डाटाबेस तयार आहे? शेतकरी बांधवांचे प्रश्न सोडवण्यास समर्थ असे ज्ञान सांभाळणारी नॉलेज बँक आहे? त्यांची भाषा समजून घेणारे आणि त्वरीत त्याचे निराकरण करु शकणारे मनुष्यबळ होऊ शकेल उपलब्ध? निराकरण जरी झाले तरी आगामी मार्गदर्शनासाठी जी अनुभवी आणि द्र्ष्टी नजर असलेले अस्सल शेतीतले डोके लागते ते ह्या तंत्राला सरावेल? फक्त फोनवरुन संपर्क एवढ्याच भरोश्यावर कुठ्ल्या स्वरुपाची माहिती आपण प्रसारीत करु शकू? ह्या सर्वामध्ये आर्थिक बाजू काय असेल? ते बिझनेस मॉडेल यशस्वी झालेले आहे का? सरकारी/निमसरकारी/खाजगी अशा हेल्पलाईन्स उपलब्ध असताना त्यांना सद्यकालीन शेतकर्यांचा प्रतिसाद कसा आहे? सग्ळ्यात महत्त्वाचे म्हणजे अशा हेल्पलाईन्स चालवण्यात आपला रोल काय राहील? केवळ मॅनेजमेंट? की संपर्काचे तंत्रद्यान उपलब्ध करुन देणे? शेतकर्यांनी अर्थात एंड युझर्सनी विश्वास का ठेवायचा? त्यासाठी आपले क्वालिफिकेशन काय राहील?
इतके प्रश्न लगेच उभे राहिले कारण मी स्वत: एक जिवंत हेल्पलाईन पाहिलीय, त्याला भेटलोय. आपल्या दुर्दैवाने ते आज आपल्यात नाहीत. शेतिमित्र वि.ग. राउळ. आमच्या येथील वैरागचे ते. मूळ तुमच्या विदर्भ खानदेशातीलच पण नोकरीनिमित्त सोलापूर जिल्ह्यात आले आणो इथलेच होउन राहिले. चोवीस तास शेतीचा विचार करणारा माणूस. साध्या निरोपाने पदरमोड करुन बांधावर येणारा माणूस. कुठलाही स्वार्थ न पाहता केवळ शेती आणि निसर्ग ह्यातच रमणारा माणूस. शरद पवारासारखा नेता त्यांची भेट घेतल्याशिवाय कधी गेला नाही असा माणूस. माती परिक्षण असो की कीड नियंत्रण, चर आखणी असो की शेततळ्यातली मत्स्यशेती प्रत्येक गोष्ट ह्या माणसाने केली. नुसती केली नाही तर प्रयोग आणि टिपणासहित केली. सारे ज्ञान भांडार अगदी मोफत शेतकर्यांना खुले करुन दिले. अॅग्रोवन सारखे नियतकालिक तर सोडाच (त्यात त्यांचे कमीतकमी ३०० लेख असतील) लोकल पेपरमध्ये सातत्याने लेख लिहिले. तेल्यासारख्या संकटात प्रचंड प्रयोग केले, नवीन वाटा चोखाळण्याचा उत्साह शेतकर्यांना दिला. मोबाईल सर्वत्र झाल्यावर त्यांचा नंबर हीच हेल्पलाईन होती. असे अभ्यासाचे, नैतिकतेचे आणि प्रामाणिकपणचे अधिश्टान अस्ल्यावर शेतकरी हक्कने येतात, विचारतात. हि खरी हेल्पलाईन. आपण अशा प्रकारचे जरी नाही तरी अशा स्वरुपाचे मनुष्यबळ उभे करु शकू का?
आपण हेल्प कधी करु शकतो तर त्या परिस्थितीचे आपणास संपूर्ण आकलन हवे, निराकरण करण्यास आवश्यक असे तंत्रज्ञान हवे नसता ज्या मार्गाचे मार्गदर्शन करु त्याचे पूर्ण रेफरन्सेस व आपली तेथे वट हवी.
नसता नाशिकला कांद्याचा भाव काय चाललाय हो? दोन दिवसात पाउस उघडेल का हो? जिब्रालिकचा पर्णाम होईना आता काय घेऊ अशा प्रश्नांना उत्तरे देणारे पोपट हे स्वरुप हेल्पलाईनचे होऊ नये हि इच्छा.
अजून बरेच प्रश्न आणि शंका माझ्या डोसक्यात असतात पण काय करणार? माझी घरची शेती पाहणारे लोक आता मला तिकडे फिरकू देत नाहीत. मी आधी करुनही पाहिले. वो मेरे बसकी बात नही म्हणून थांबलो, बस्स.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Wed, 09/28/2016 - 07:04
नवीन
अभ्या.. प्रश्नांसाठी धन्यवाद मित्रा!
तुझे प्रश्न अचूक आणि टू द पॉइन्ट आहेत. पण हेल्पलाईनची कल्पना वेगळी आहे. तू जसं समजत आहेस तसं ते नाही. म्हटलं तर 'ट्रेडसिक्रेट'ही आहे, पण सर्वांसाठीची विन विन सिचुएशनही आहे. त्यामुळे आत्ता जास्त सांगता करता येणार नाही. काही बाबतीत नुसत्या अचाट कल्पना मिळाल्या तरी कोणाला काही करता येत नसतं, कारण मूळ गाभा काय हे प्रत्येकाला लक्षात येईल हे शक्य नसतं.
राऊळांसारखे विद्वान एका रात्रीत जन्माला येत नाहीत, आले तरी आपल्या लोकांना त्यांची 'फुकट' असल्याने किंमत नसते, शेतीवर बोलण्यासारखे, करण्यासारखे बरेच आहे. फोनवर चर्चा करु..
- Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क
Tue, 09/27/2016 - 21:23
नवीन
आमचा __/\__ स्वीकार करावा. खरंच छान कल्पना आहेत.
याला १००% सहमत.
- Log in or register to post comments
र
रुपी
Wed, 09/28/2016 - 02:46
नवीन
चांगला धागा. डांगेसाहेब यांचे प्रतिसाद आवडले. मारवा यांचा प्रतिसादही खूप छान आहे.
शाळेत परीक्षा देताना असो की कुठलेही काम करताना असो, माझ्या आईचे एक वाक्य ठरलेले असायचे "कठोर परिश्रमास पर्याय नाही". अभ्यास असो, स्वच्छता करणे असो की कपड्यांना इस्त्री करणे असो, ते असे करावे की त्यात आपल्या प्रयत्नांत काही कमी राहू नये.
आरक्षण नसलेले एक कुटुंब पाहण्यात आहे. कष्ट आणि प्रयत्न करुन दिवस कसे पालटता येतात हे त्यांनी सर्वांनीच दाखवून दिले आहे. यांची दोन्ही मुले (एक मुलगा, एक मुलगी) साधारण माझ्याच वयाची. घरची आर्थिक स्थिती फार चांगली नसताना आई आणि आजीने घरगुती खानावळ चालवून हातभार लावला. शाळकरी वयापासून उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलगा हॉटेल्ससाठी टीश्युपेपरच्या घड्या घालणे, प्रिंटींग प्रेसवाल्यांना मिठाईचे बॉक्स बनवून देणे अशी कामे करायला लागला. पुढे जाऊन लहान-मोठे व्यवसाय करत आता स्वतःचे दुकान सुरु केले आहे.
मुलगी लहानपणीपासून बोलायला चुणचुणीत! दहावीच्या सुट्टीत टेली-मार्केटींग केल्यानंतर, शिक्षण सांभाळत कॉल-सेंटर असा प्रवास करत करत आता सेल्स स्पेशॅलिस्ट होऊन भारतभर आणि भाताबाहेर कामासाठी जात असते.
दोघांनीही तसे पाहिले तर शिक्षण/ डिग्री फार काही घेतले नाहीत. पण स्वतःचा कल, आवड ओळखून, मेहनत करुन फार पुढे गेले आहेत.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3