Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माझ्या मनातला एक ना-पाक प्रश्न

ब
बोका-ए-आझम
Mon, 10/03/2016 - 17:40
🗣 116 प्रतिसाद
खरडफळ्यावर आदूदादूंनी पाकिस्तानी अभिनेत्यांनी काम केलेल्या हिंदी चित्रपटाविषयी एक प्रश्न विचारला आहे. त्यावरून हे विचार मनात आले. पाकिस्तानी अभिनेत्यांचे चित्रपट प्रदर्शित न होऊ देणं वगैरे ठीक आहे. पण १.जे आधीच प्रदर्शित झालेले चित्रपट आहेत त्यांच्या टीव्ही प्रसारणाचं काय? बंदी तर त्यावरही आणायला हवी. आतिफ अस्लमने गायलेली गाणी चालतात पण पाकिस्तानी अभिनेते चालत नाहीत, हा दुटप्पीपणा आहे. २.बंदीच घालायची तर सगळ्या पाकिस्तानी कलाकारांवर घालायला हवी. उदाहरणार्थ कुठल्याही music shop मध्ये गुलाम अली, मेहदी हसन, आबिदा परवीन, फरिदा खानम,राहत फतेह अली खान, नुसरत फतेह अली खान यांचे आल्बम ठेवता कामा नयेत. कुठल्याही संगीत स्पर्धेत ' हंगामा है क्यूं बरपा ' आणि ' रंजिशी सही ' गाणाऱ्या कलाकारांना कितीही चांगले गायले तरी स्पर्धेबाहेर फेकून द्यायला हवं. इथे मिपावर ' छाप तिलक सब छीनी रे ' वर आलेला लेख काढून टाकायला हवा. ३. जो न्याय पाकिस्तानी अभिनेत्यांना,तोच इतर कलाकारांनाही. सैयोनी ऐकणं हा देशद्रोह जाहीर करायला हवा. फवाद खान आणि अली फझल यांना एक न्याय आणि राहत फतेह अली खान आणि गुलाम अली यांना दुसरा - हे कितपत बरोबर आहे? Either everybody counts, or nobody counts!व ४. रच्याकने नदीम श्रवण जेव्हा जोरात होते तेव्हा ते सर्रास पाकिस्तानी संगीतरचना उचलायचे. त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांचं काय? जे जे पाकिस्तानी आहे, ते बॅन व्हायला हवं. पण पूर्वलक्ष्यी प्रभाव किंवा retrospective effect ने! तुम्हाला काय वाटतं?

प्रतिक्रिया द्या
27586 वाचन

💬 प्रतिसाद (116)
स
संदीप डांगे Tue, 10/04/2016 - 09:51 नवीन
त्रिशतक मारायचं का बोकाशेठ? ;) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Tue, 10/04/2016 - 09:59 नवीन
त्यामुळे जरा कठीण दिसतंय. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Tue, 10/04/2016 - 10:14 नवीन
अरे हम है ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
म
महासंग्राम Tue, 10/04/2016 - 11:34 नवीन
मग तर ५०० कुठेच नै गेले भौ (कृहघ्या)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
य
यशोधरा Tue, 10/04/2016 - 09:52 नवीन
ही कुस्कुटं नंतर काढू शकतोच हो, पण सद्ध्या जे सहज शक्य आहे ते तर आधी करा! इथे येऊन, इथल्या नाटक सिनेमांत काम करुन, पैसे कमवून, भरपूर लाड पदरात पाडून जर कोणी हिंदुस्थान के लोगोंके दिल छोटे हैं वगैरे बोलत असेल, तर पहिले त्याला बॅन करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 10/04/2016 - 11:42 नवीन
बोकाजी आज वेगळ्या मूडमध्ये दिसत आहेत. "घटं भिद्यात, इ इ." करून काही जणांनी अनेक शतकी प्रतिसाद मिळवलेले पाहून तेही खवळले आहेत, अशी कुणकुण ऐकली आहे =)) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Tue, 10/04/2016 - 11:43 नवीन
ते आलेच आहे लक्षात एक्काकाका. कधीतरी प्पणही हातभार लावावा म्हटले ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
न
नाखु Tue, 10/04/2016 - 12:11 नवीन
तुम्ही सुद्धा !! इतके म्हणून मी खाली बसतो. गपगार नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
ब
बोका-ए-आझम Tue, 10/04/2016 - 13:25 नवीन
बंदी आणा किंवा बॅन करा हे सोशल मिडियावर इतक्या सवंगपणे वापरलं जातंय (फेसबुक, whatsapp, इत्यादी) त्यावरून हा एक विचार मनात आला. म्हटलं जरा पाहू या लोकांची काय प्रतिक्रिया येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
अ
अनिरुद्ध.वैद्य Tue, 10/04/2016 - 10:08 नवीन
आम्हास * पाकिस्तानी * नकोयत. तिथलं नाव गाव मुळ असलेल चालेल की. त्यांना सहानुभुती असणारेही नकोत. कलेशी खेळाशी कायीयेक वावड नाहिये, त्या खेळाडुंशी, कलाकारांशी वावड आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
य
यशोधरा Tue, 10/04/2016 - 08:58 नवीन
कितीही उच्चं प्रतीची आभाळातून पडलेली कला घेऊन आलेला कलाकार असेल तरी त्यापेक्षा देश श्रेष्ठ आहे.
  • Log in or register to post comments
ग
गिरिजा देशपांडे Tue, 10/04/2016 - 09:36 नवीन
+11111
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
ब
बोका-ए-आझम Tue, 10/04/2016 - 09:55 नवीन
मग जे जे पाकिस्तानी आहे त्या सगळ्यावर बॅन टाकायला हवा, बरोबर? त्याशिवाय देश श्रेष्ठ आहे यावर शिक्कामोर्तब कसं होणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Tue, 10/04/2016 - 09:59 नवीन
नुसते बुद्धीभेद करणारे प्रश्न विचारण्यापे़क्षा सुरुवात करायची. मी माझ्याकडून होईल तितका प्रयत्न करते, खास करुन एखा/दी कलाकार त्याची 'कला' विसरुन स्वतःच्या देशाशी प्रामाणिक राहून माझ्या देशाबद्दल वाईट साईट बोलतो, तेव्हा माझ्यातल्या नागरिकाने त्याच्या कलेची पत्रास का करावी? तुम्ही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Tue, 10/04/2016 - 10:06 नवीन
आणि समोरचा त्याच्या देशाशी प्रामाणिक राहात असेल तर त्याचा निषेध करायचा? ठीक आहे. माझं सुरूवातीपासून एकच म्हणणं आहे - एकतर इस पार या फिर उस पार. हाकलायचं तर सगळ्या पाकिस्तानी कलाकारांना हाकला आणि त्यांच्या कलाकृतींचंही भारतात नामोनिशाण ठेवू नका. मग ज्यांनी तोंड उघडलेलं नाही तेही लोक सुटता कामा नयेत. किंवा मग कला ही देश, धर्म वगैरेच्या पलिकडे असते असं म्हणा आणि ते पाळा. आपल्याकडे काय होतंय की लोक फवाद खानला हाकलताहेत पण आतिफ, राहत, गुलाम अली यांना ठेवताहेत. त्यांची गाणी ऐकताहेत. त्यांनी गायलेली गाणी स्पर्धेत म्हणताहेत. हे चुकीचं आहे. तेही पाकिस्तानी आहेत. हाकलायचं तर सगळ्यांना. कुणाला एकाला हाकलायचं आणि बाकीच्यांसाठी पायघड्या पसरायच्या यात अर्थ नाही. हा माझ्या मते दांभिकपणा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
अ
अनिरुद्ध.वैद्य Tue, 10/04/2016 - 10:11 नवीन
आम्ही सर्वंकश बंदीच्या फेव्हर मध्ये आहोत. सीलेक्टीव्ह बंदी बिंदी नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
य
यशोधरा Tue, 10/04/2016 - 10:12 नवीन
आणि समोरचा त्याच्या देशाशी प्रामाणिक राहात असेल तर त्याचा निषेध करायचा?
च्च!च्च! ऐसन काहे करत हो? स्वतःच्या देशाशी प्रामाणिक रहायला दुसर्‍या देशाला, जिथे आपली रोजी रोटी सुद्धा मिळते, त्याला शिव्या घालायला लागतात? आणि त्याच्या देशाशी प्रामाणिक राहूदेत हो, अगदी छाताडावर गोळ्या (खर्‍या, फिल्मी नाही) खाऊदेत - गुड फॉर हिम, त्याबद्दल काहीच म्हणणं नाही. पण माझ्या देशाला शिव्या घालू नकोस. इतकं सोपं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Tue, 10/04/2016 - 10:21 नवीन
की ज्या पाकिस्तानी कलाकारांनी/लेखकांनी असं कोणतंही मत दिलेलं नाही, त्यांना का सोडायचं? लताऐवजी नूरजहानचं गाणं ऐकणं, जगजीतऐवजी गुलाम अली आणि मेहदी हसन ऐकणं हेही थांबवायला हवं. Ban everything that is associated with Pakistan - right from 14th August 1947.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Tue, 10/04/2016 - 10:43 नवीन
करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 10/04/2016 - 12:11 नवीन
थोडे दिवस थांबा, २०१७ चा स्वातंत्र्यदिवस साजरा करण्यासाठी पाकिस्तानच नसणार अशी व्यवस्था चालली आहे अशी खबर आहे. (कधी मधी अर्णव गोस्वामीचे कार्यक्रम पहात जा हो ! ;) :) ) पाकिस्तान नाही तर पाकिस्तानीही नसणारच. मग तर कोणाला बॅन करावे आणि कोणाला नाही हा प्रश्नच उरणार नाही =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
य
यशोधरा Tue, 10/04/2016 - 12:13 नवीन
अर्णव गोस्वामी
हाहाहा! हल्ली मज्जा येते त्याचे कारेक्रम बघायला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
म
मदनबाण Tue, 10/04/2016 - 12:17 नवीन
हो,हल्ली तो चक्क इतरांनाही थोड फार बोलु देतो. ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- जोपर्यंत चंदू परतणार नाही, तोपर्यंत आजीच्या अस्थी विसर्जन नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
व
विशुमित Tue, 10/04/2016 - 12:27 नवीन
कसला ओरडून ओरडून बोलत असतो...त्याच्या घरचे वैतागत असतील नाही त्याला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
अ
अनिरुद्ध.वैद्य Tue, 10/04/2016 - 09:27 नवीन
कस्काय येवढे प्रश्न पडतात तुम्हाला? ब्लँकेट बॅन करा न सरळ? पब्लिकनी बहिष्कार टाका! कोण कोण्ता बायकी राहत फ्तेह अन किंचाळणारा सय्योनीवाला. आमचे कान तेव्हाही किटायचे अन आताही किटतात. लोक्स तेव्हाही आम्हाला द्वेषमुर्ती म्हणायचे अन आताही म्हणतील अन नंतरही म्हणतील, पण आमच्यातर्फे पाकड्याचं गुणगान गाणारे, त्यांना सपोर्ट करणारे अन खेळ कला सीमाविरहीत असते म्हणणारे सगळ्या सगळ्यांवर स्वयंघोषीत बहिष्कार असतोच, गेली १५ वर्ष हैच, अन असणार आहेच.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Tue, 10/04/2016 - 09:42 नवीन
+100000
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
ब
बोका-ए-आझम Tue, 10/04/2016 - 09:50 नवीन
कस्काय येवढे प्रश्न पडतात तुम्हाला?
ते डोकं असल्याचं लक्षण आहे.
१५ वर्ष हैच, अन असणार आहेच.
१५ वर्षे? त्याआधी काय परिस्थिती होती हे जाणण्यासाठी उत्सुक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
अ
अनिरुद्ध.वैद्य Tue, 10/04/2016 - 10:02 नवीन
१५ वर्षे? त्याआधी काय परिस्थिती होती हे जाणण्यासाठी उत्सुक. >> त्याआदी आमी धावी बारावी करण्यात बिजि होतु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
L
lakhu risbud Tue, 10/04/2016 - 09:51 नवीन
पाकिस्तानी कलाकारांना प्रश्न सोपाच विचारला गेला होता,भारतात जे दहशवादी हल्ले होत आहेत त्यांचा तुंम्ही निषेध कराल का ? या फवाद खान आणि तत्सम मंडळींनी तोंड बंद ठेवले. जर पाकिस्तान चे सरकार आणि माध्यमे जगाला ओरडून सांगत आहेत कि आमचा दहशतवादाशी काहीच संबंध नाही उलट पाकिस्तानच दहशतवादाचा शिकार आहे . मग या कलाकारांना मग अशी कोणती सक्ती आहे कि त्यांनी तोंड बंद ठेवावे ? वस्तुस्थिती अशी आहे कि पाकिस्तानात तीन प्रकारच्या सर्वोच्च म्हणावे अशा ताकदी आहेत. १) सरकार २) पाकी लष्कर /ISI ३)LeT /JuD आणि अशा अनेक दहशतवादी संघटना. यातली पहिली ताकद हि फक्त चेहरा म्हणून काम करते (अमेरिका आणि इतर देशांकडून भीक मिळण्यात अडचण येऊ नये म्हणून ). वास्तवात सत्ते चे संचालन लष्कर आणि दहशतवादी संघटनाच करतात.जे खरे दुखणे आहे. आपण आपल्या देशात ज्या काही वाईट घटना घडतात जसे कि बलात्कार,दहशतवादी हल्ले. तेव्हा त्या बाबतीत आपण आपल्या कलाकारांकडून अपेक्षा करतोच ना ? की त्यांनी त्या घटनांवर मत प्रदर्शन करावे /टीका करावी. इथे तर दहशतवाद आहे ज्यात माणसे मारली जात आहेत,ते हि धर्माच्या नांवाने प्रशिक्षित दहशतवाद्यांकडून. मग अशा वेळी कलाकार म्हणून नाही तर एक माणूस म्हणून असल्या घटनेची निंदा/टीका न करण्याचे कारण समजत नाही.
  • Log in or register to post comments
ज
जाबाली Tue, 10/04/2016 - 09:58 नवीन
काही गोष्टींना देशांची आणि सीमेची बंधने नसतात !
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Tue, 10/04/2016 - 09:58 नवीन
वस्तुस्थिती अशी आहे कि पाकिस्तानात तीन प्रकारच्या सर्वोच्च म्हणावे अशा ताकदी आहेत. १) सरकार २) पाकी लष्कर /ISI ३)LeT /JuD आणि अशा अनेक दहशतवादी संघटना. यातली पहिली ताकद हि फक्त चेहरा म्हणून काम करते (अमेरिका आणि इतर देशांकडून भीक मिळण्यात अडचण येऊ नये म्हणून ). वास्तवात सत्ते चे संचालन लष्कर आणि दहशतवादी संघटनाच करतात.जे खरे दुखणे आहे.
कसं बोललात! म्हणजेच पाकिस्तानात जो यापैकी कोणत्याही ताकदीला आव्हान देईल तो संपवला जाईल. मग हे पाकिस्तानी कलाकार कशावरून त्याला भिऊन मत देत नाहीयेत? शेवटी जिवाची पर्वा असतेच ना प्रत्येकाला.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Tue, 10/04/2016 - 10:02 नवीन
असं असलं तर त्यांनी देश सोडायला हवा कि नाहि?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Tue, 10/04/2016 - 10:14 नवीन
त्यांचे विचार असे नाहीयेत असं म्हणायचंय का तुम्हाला? ते फक्त उघडपणे बोलत नाहीयेत. जे बोलताहेत ते निदान प्रामाणिक आहेत असं म्हणू या आपण. जे बोलत नाहीत त्यांचं काय? त्यांनाही हाकला. क्राॅसवर्डसारख्या दुकानांत जी पाकिस्तानी लेखकांची पुस्तकं असतात त्यांनाही काढून टाकायला हवं. क्राॅसवर्डवर मोर्चा आलेला पाहिलाय का तुम्ही? आमच्या इथे राज ठाक-यांच्या कृष्णकुंजपासून हाकेच्या अंतरावर क्राॅसवर्ड आहे आणि तिथे पाकिस्तानी लेखकांची पुस्तकं सुखेनैव विकायला ठेवलेली आहेत. का? त्यावर का नाही बंदी? जर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालायची तर लेखकांना का सोडायचं? तेही कलाकारच आहेत ना? Be fair to everyone, even while throwing them out!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
L
lakhu risbud Tue, 10/04/2016 - 10:56 नवीन
साब, जमीर नाम कि भी चीज होती है ! हे सगळे लोक आर्थिदृष्ट्या संपन्न अशा घरातून येतात. वडिलोपार्जित पैश्या च्या जीवावर त्यांना घर/देश सोडणे शक्य आहे.पण केले जात नाही. https://en.wikipedia.org/wiki/Fawad_Khan
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
प
प्रसाद_१९८२ Tue, 10/04/2016 - 10:15 नवीन

भारताला ऑल आऊट करा, सर्जिकल स्ट्राईकनंतर जावेद मियाँदाद बरळला

भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या तणावाचं वातावरण आहे. यातच जावेद मियांदादने हे संतापजनक विधान केलं आहे. पाकिस्तानने आता भारतावर हल्ला करावा, असं जावेदने म्हटलं आहे. http://abpmajha.abplive.in/world/pak-ex-cricketer-javed-miandad-calls-for-all-out-attack-on-india-following-surgical-strike-across-loc-294920
  • Log in or register to post comments
व
विशुमित Tue, 10/04/2016 - 11:02 नवीन
माफीवीर व्यंगचित्र वाल्यानी तर याला पायघड्या घातल्या होत्या. वरून सुंदर सुंदर फोटो ही काढले होते....!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
ट
टवाळ कार्टा Tue, 10/04/2016 - 10:58 नवीन
बोक्याशी सहमत...एखाद दुसर्या कलकाराला बॅन करणे हा दांभीकपणा झाला आत्ता मीच सय्योनी ऐकतोय :)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 10/04/2016 - 11:02 नवीन
तुम्हाला काय वाटतं? बरचं काही वाटतं ! पण नुसतं वाटुन काय उपयोग ? बाकी त्या पाकड्यांचे मरु दे.... पण आपल्याकडच्या माकडांचे काय करायचे ? याचा विचार आपल्या लोकांनी आधी करायला हवा नाही ? लेटेस्ट माकड :- राजकारणासाठी सर्जिकल स्ट्राईकची अफवा : संजय निरुपम मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- जोपर्यंत चंदू परतणार नाही, तोपर्यंत आजीच्या अस्थी विसर्जन नाही!
  • Log in or register to post comments
व
विशुमित Tue, 10/04/2016 - 11:14 नवीन
असू ही शकतं... या सरकारचा काही भरोसा नाही. पुणे-मुंबई मध्ये बसून थोडीच कळत नक्की काय परिस्थिती आहे तिथे. पिताडी, मूर्ख आणि वेडी माणसं बऱ्याच वेळा खरं बोलत असतात, फक्त लोक यांच्यावर विश्वास ठेवत नाहीत. पण या माकडांच्या हातात कोण बरं कोलीत देत असावं???
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 10/04/2016 - 11:28 नवीन
पिताडी, मूर्ख आणि वेडी माणसं बऱ्याच वेळा खरं बोलत असतात, फक्त लोक यांच्यावर विश्वास ठेवत नाहीत. आपले DGMO { Director General of Military Operations } Lt Gen रणबीर सिंह देशाला चुकीची माहिती देतील असे मला वाटतं नाही,मला माझ्या देशाच्या आर्म फोर्सेसवर आणि त्यांच्या पराक्रम गाजवण्याच्या क्षमतेवर संपूर्ण विश्वास आहे. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- जोपर्यंत चंदू परतणार नाही, तोपर्यंत आजीच्या अस्थी विसर्जन नाही!
  • Log in or register to post comments
व
विशुमित Tue, 10/04/2016 - 11:38 नवीन
मी ऊपरोधक प्रतिसाद दिला होता...!! माकडांनी कसा उच्छाद मांडला आहे ते सांगायला... DGMO आणि आर्मी वर 100% काय 1000% संपूर्ण विश्वास आहे. गैरसमज नसावा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
अ
अनुप ढेरे Tue, 10/04/2016 - 12:01 नवीन
चीनबद्दल काय मत आहे? त्यांच्या वस्तूंवरपण टाकायचा का बहिष्कार?
  • Log in or register to post comments
व
विशुमित Tue, 10/04/2016 - 12:14 नवीन
चिनी कलाकारांवर पहिल्यांदा बॅन आणला पाहिजे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
अ
अमर विश्वास Tue, 10/04/2016 - 12:31 नवीन
भारतात एक प्रथा आहे.. दसऱ्याला रावणदहन करतात ... वाईट प्रवृत्तींचे प्रतीक म्हणून... तसेच प्रत्येकाला आपली देशभक्ती दाखवायला अशी प्रतिके लागतात.. काही विधायक.. जसे झेंडावंदन.. किंवा मग असे.. पाक कलाकरांवर बंदी वगैरे... बंदीची मागणी करणारे कितीजण न चुकता 15 ऑगस्टला झेंडवंदन करतात हा वेगळा संशोधनाचा विषय आहे... दुसरा मुद्दा म्हणजे हे रेट्रोस्पेक्टिव (पूर्वलक्षी प्रभावाने) बंदी घालणे ... आता गुलाम आलीच्या सगळ्यअ सीडी फेकुन द्याल.. विकायला बंदी आणाल.. पण मग इतकी वर्षे हे गाणे ऐकले.. त्याचा आनंद घेतला.. त्याचे काय? कुठे फेडाल ही पापे ? अर्थात या पापक्षालनाचा एक उपाय आहे.. करून बघा.. उपयोग झला तर कळवा... उपाय असा : ओळीने नउ दिवस आपले संपूर्ण भारतीय असलेले श्री हिमेश रेशमीया यांचे "तेरा सरूर" हे गणे रोज एकाशेआठ वेळा ऐकावे.. त्यानंतर दहाव्या दिवशी (जर जगण्याची उभारी राहिली तर) भारतमाता की जय ओरडावे.. जरूर पापक्षालन होईल.. बघा प्रयातना करून.. ऑल ते बेस्ट..
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Tue, 10/04/2016 - 16:05 नवीन
दुसरा मुद्दा म्हणजे हे रेट्रोस्पेक्टिव (पूर्वलक्षी प्रभावाने) बंदी घालणे ... आता गुलाम आलीच्या सगळ्यअ सीडी फेकुन द्याल.. विकायला बंदी आणाल.. पण मग इतकी वर्षे हे गाणे ऐकले.. त्याचा आनंद घेतला.. त्याचे काय? कुठे फेडाल ही पापे ?
म्हणजे तुमच्या दृष्टीने गुलाम अलींचं गाणं ऐकणं हे पाप आहे? बाकी प्रयातना हा शब्द आवडला. ज्याने यातना होतात अशा गोष्टी स्वतःहून करणे म्हणजे प्रयातना ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास
व
वेल्लाभट Tue, 10/04/2016 - 12:38 नवीन
बोकोबांशी तात्विक दृष्ट्या पूर्ण सहमत आहे. ग़ुलाम अली, मेहदी हसन न ऐकणं तेवढं जरा कठीण वाटतंय. एकवेळ न ऐकणंही जमेल, पण न गुणगुणणं.... विचारही न करणं.... कठीण आहे. तरीही सहमत.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Tue, 10/04/2016 - 13:12 नवीन
<<<<<<ऐकणंही जमेल, पण न गुणगुणणं.... विचारही न करणं.... कठीण आहे.>>>>> म्हणजे सोशल मीडिया वरची सर्व फुकाची देशभक्ती म्हणायची. शेवटी सलमान खान निर्दोषच सुटणार....!! ओम पुरी झिंदाबाद म्हणायची च वेळ येणार...!! संजय निरुपम देशाचा संरक्षण मंत्री बनवा म्ह्णून सिद्धिविनायक आणि हाजी अली ला साकडे घालावे लागणार...!!
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Tue, 10/04/2016 - 13:44 नवीन
सगळं फुकाचंच असतं हो आयुष्यात... टेन्शन नका घेऊ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Tue, 10/04/2016 - 14:04 नवीन
टेन्शन कोणी घेतलंय ?? तसं त्या इक्बाल च पण गाणं आपण गुणगुणतच असतो की--- सारे जहाँ से अच्छा हिन्दोसिताँ हमारा हम बुलबुलें हैं इसकी यह गुलसिताँ हमारा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
व
वेल्लाभट Tue, 10/04/2016 - 14:07 नवीन
एक्झॅक्टली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Tue, 10/04/2016 - 13:58 नवीन
सुषमा स्वराज यांचं ममत्व :::: याबद्दल काय मत आहे मदन भाऊ?? http://www.esakal.com/Tiny.aspx?K=FBGGXA
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा