Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माझ्या मनातला एक ना-पाक प्रश्न

ब
बोका-ए-आझम
Mon, 10/03/2016 - 17:40
🗣 116 प्रतिसाद
खरडफळ्यावर आदूदादूंनी पाकिस्तानी अभिनेत्यांनी काम केलेल्या हिंदी चित्रपटाविषयी एक प्रश्न विचारला आहे. त्यावरून हे विचार मनात आले. पाकिस्तानी अभिनेत्यांचे चित्रपट प्रदर्शित न होऊ देणं वगैरे ठीक आहे. पण १.जे आधीच प्रदर्शित झालेले चित्रपट आहेत त्यांच्या टीव्ही प्रसारणाचं काय? बंदी तर त्यावरही आणायला हवी. आतिफ अस्लमने गायलेली गाणी चालतात पण पाकिस्तानी अभिनेते चालत नाहीत, हा दुटप्पीपणा आहे. २.बंदीच घालायची तर सगळ्या पाकिस्तानी कलाकारांवर घालायला हवी. उदाहरणार्थ कुठल्याही music shop मध्ये गुलाम अली, मेहदी हसन, आबिदा परवीन, फरिदा खानम,राहत फतेह अली खान, नुसरत फतेह अली खान यांचे आल्बम ठेवता कामा नयेत. कुठल्याही संगीत स्पर्धेत ' हंगामा है क्यूं बरपा ' आणि ' रंजिशी सही ' गाणाऱ्या कलाकारांना कितीही चांगले गायले तरी स्पर्धेबाहेर फेकून द्यायला हवं. इथे मिपावर ' छाप तिलक सब छीनी रे ' वर आलेला लेख काढून टाकायला हवा. ३. जो न्याय पाकिस्तानी अभिनेत्यांना,तोच इतर कलाकारांनाही. सैयोनी ऐकणं हा देशद्रोह जाहीर करायला हवा. फवाद खान आणि अली फझल यांना एक न्याय आणि राहत फतेह अली खान आणि गुलाम अली यांना दुसरा - हे कितपत बरोबर आहे? Either everybody counts, or nobody counts!व ४. रच्याकने नदीम श्रवण जेव्हा जोरात होते तेव्हा ते सर्रास पाकिस्तानी संगीतरचना उचलायचे. त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांचं काय? जे जे पाकिस्तानी आहे, ते बॅन व्हायला हवं. पण पूर्वलक्ष्यी प्रभाव किंवा retrospective effect ने! तुम्हाला काय वाटतं?

प्रतिक्रिया द्या
27586 वाचन

💬 प्रतिसाद (116)
म
मदनबाण Tue, 10/04/2016 - 16:58 नवीन
हँहँहँ... नवाज शरिफ यांच्या मातोश्रींची आणि सुषमा स्वराज यांची मागच्या वर्षी डिसेंबर {बहुधा} मध्ये भेट घेतली होती. त्यांचे शब्द होते, तू तो मेरे वतन से आयी हो इं इं इं... मग पाकिस्तानी लोकांचे काय मत असेल यावर ? ते समजले की मी वरच्या प्रश्नाचे उत्तर देइन ! ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- जोपर्यंत चंदू परतणार नाही, तोपर्यंत आजीच्या अस्थी विसर्जन नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
स
संदीप डांगे Tue, 10/04/2016 - 16:02 नवीन
अरे काय, आजच्या दिवसात शंभर पण झाले नाही? :(
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Tue, 10/04/2016 - 16:08 नवीन
देशभक्ती म्हणून काही राहिलेलीच नाही लोकांमध्ये!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
य
यशोधरा Tue, 10/04/2016 - 16:21 नवीन
तुमच्याइतकी, हा शब्द अ‍ॅड करा की ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Tue, 10/04/2016 - 16:25 नवीन
स्वतःची स्तुती करायची सवय नसली की हे असं होतं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Tue, 10/04/2016 - 16:27 नवीन
बरोबर आहे म्हणा, स्तुती करायसारखं फारसं काही नसलं की सवय कशी असणार? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Tue, 10/04/2016 - 16:38 नवीन
रच्याकने तुम्हाला उपरोध कळत नसावा असं मला वाटलं नव्हतं. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Tue, 10/04/2016 - 16:43 नवीन
कळतो की दादा, आणि तुम्ही निखळ गंमत तशी घेऊ शकता असं मला वाटलं होतं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
क
कैलासवासी सोन्याबापु Tue, 10/04/2016 - 17:36 नवीन
असो(च)!
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Tue, 10/04/2016 - 17:49 नवीन
मी माझ्यापासून सुरवात करतोय. आजपासून आलेपाक खायचे सोडून दीले....
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास Tue, 10/04/2016 - 19:00 नवीन
गुलाबजाम सुद्धा साखरेचे खणार.. "पाक"तील नको
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 10/04/2016 - 19:22 नवीन
बोका-ए-आझम,
मग जे जे पाकिस्तानी आहे त्या सगळ्यावर बॅन टाकायला हवा, बरोबर? त्याशिवाय देश श्रेष्ठ आहे यावर शिक्कामोर्तब कसं होणार?
नाक दाबलं की तोंड उघडतं. सरसकटपणे सगळे अवयव पिरगळंत बसायची गरज नाही. घोट्या (पायाच्या बरंका) पिरगळल्या की डोळे उघडतात. फावड्याखानास हाकलून दिला कारण त्याने कमावलेला पैसा पाकिस्तानात परत जाऊ शकला असता. त्यातून दहशतवादास प्रोत्साहन मिळाल्यासारखं झालं असतं. दांभिकपणाचं म्हणाल तर शिवसेनेचे मुंबईतले पहिले महापौर सुधीर जोशींना निवडून आणतेवेळी बाळासाहेबांनी चक्क मुस्लिम लीगची मदत घेतली होती. पुरंदरच्या तहानंतर शिवाजीमहाराजांना आदिलशाहीविरुद्ध मोगलांचे अंकित बनून (दिलेरखानाच्या(?) हाताखाली) लढाई लढावी लागली. तिच्यात त्यांचा सपशेल पराभवही झाला होता. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Tue, 10/04/2016 - 20:13 नवीन
दांभिकपणाचं म्हणाल तर शिवसेनेचे मुंबईतले पहिले महापौर सुधीर जोशींना निवडून आणतेवेळी बाळासाहेबांनी चक्क मुस्लिम लीगची मदत घेतली होती.
हो, पण तेव्हा पाकिस्तानने हल्ला केलेला नव्हता आणि मुस्लीम लीग हा भारतात नोंदणी केलेला अधिकृत पक्ष आहे. बाकी शिवाजीमहाराजांनी जे केलं, तो त्यांच्या मुत्सद्दीपणाचा एक भाग होता. या दोन्हीही ठिकाणी दांभिकपणाचा संबंध कसा येतो हे सांगितलं तर बरं होईल.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 10/04/2016 - 21:48 नवीन
बोका-ए-आझम, अहो, दांभिकपणाचा संबंध येतंच नाही मुळी. तेच तर सांगायचं होतं. दांभिक हा शब्द तुम्ही तीन ठिकाणी वापरला आहे.
काही जणांना ती लागू आणि काही जणांना नाही हे जाॅर्ज आॅरवेलच्या All people are equal but some are more equal या वाक्याप्रमाणे होईल आणि तो दांभिकपणा असेल.
नाहीतर मग आपण selective ban करणार हे मान्य करुन आपला दांभिकपणा चालू ठेवावा.
कुणाला एकाला हाकलायचं आणि बाकीच्यांसाठी पायघड्या पसरायच्या यात अर्थ नाही. हा माझ्या मते दांभिकपणा आहे.
हे तिन्ही राजकारणात मोडतात. राजकारण म्हंटलं की दांभिक काय अन अदांभिक काय सगळं सारखंच नाही का? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Tue, 10/04/2016 - 22:10 नवीन
हा लेख वाचून मी बायकोला म्हणालो, आजपासून मी गुलाबजाम, रसगुल्ला वगैरे 'पाक' असलेले पदार्थ खाणार नाही... बायको म्हणाली, छान... आजपासून मीसुद्धा स्वयं'पाक' करणार नाही. वाचा आणखी मिसळपाव.
  • Log in or register to post comments
व
विकास Tue, 10/04/2016 - 22:55 नवीन
माझ्या मर्यादीत वाचनाप्रमाणे IMMPA या मला वाटते बिगर सरकारी असलेल्या चित्रपट दिग्दर्शक-निर्मात्यांच्या संघटनेच्या नावाने बातमी आलेली आहे. त्यांचा अधिकृत ठराव खाली चिकटवेला आहे. ज्यांना माझ्याप्रमाणे अधिकृत प्रस्ताव (सही शिक्क्यानुसार) बघून खात्री करून घेण्याची हौस आहे त्यांनी येथे बघावा. यात म्हणल्याप्रमाणे त्यांनी, "...appeal to all IMPPA members" अर्थात त्यांच्या सभासद कंपान्यांना वगैरे जाहीर आवाहन केले आहे. आवाहन करणे म्हणजे बॅन करणे असते का? त्यात काही "आज्ञा" असते का? आणि असली तरी ती एका संघटनेच्या सदस्यांना दिलेली आज्ञा फारतर असू शकेल... सरकार काही मधे पडले आहे का? बरं कोणी कुणाला घ्यावे आणि का घेऊ नये आणि घेतले तरी नंतर फायर करावे हे आवडो अथवा न आवडोत, पण ते त्या पैसे देणार्‍याचे हक्क असतात, हे खाजगी कंपन्यांमधे नोकरदार असतात त्यांना तरी किमान कळायला हवे. IMPPA takes significant decisions in its Extraordinary General Body Meeting and Annual General Meeting IMPPA in its Seventy Seventh Annual General Meeting began the meeting with obituary and condolence for the brave martyrs of the Indian Armed Forces in the cowardly terrorist attack at Pathankot and Uri. All members present were highly concerned and aggrieved at the total silence of the Pakistani artistes and technicians towards the shameful attack on India and after discussions and deliberations the members in the meeting unanimously decided that this silence of Pakistani artistes was an insult and humiliation of our armed forces and the country at large. The members unanimously felt that this is the right time to react and stand by the emotions and dignity of our Country and passed the following resolution. It is unanimously resolved to appeal to all IMPPA members to henceforth in future not to work with any artistes, singers or technicians from Pakistan until the situation of hostilities between Pakistan and India subsides and the Government of India declares that all is well with Pakistan and India. माझ्या दृष्टीने हा ठराव म्हणजे शुद्ध चावटपणा पक्षी धूळफेक आहे... मराठीत "हात रे" म्हणणे अथवा इंग्रजी, "slap on the wrist" वाक्प्रचारासारखा प्रकार आहे... त्यातून ऐन पंजाब-युपि निवडणुकांच्या वेळेस नवीन कावकाव करण्याची तयारी झालेली आहे इतकेच.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा