२०१७ नंतरच्या आर्थीक जडणघडणीसाठी आपण तयार आहात/आहोत ?
२०१६ चे उर्वरीत नव्हेंबर डिसेंबर दोन महिने ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा जाऊन साजरे झाले. डिमॉनीटायझेशनचा अनुभव सुखद की दुख्खःद या बद्दल येता काळ बरेच चर्वित-चर्वण होत राहील. डिमॉनीटायझेशननी काळ्या पैशाचे सगळे मार्ग भले बंद होणार नसतील भारतीय बँकांकडची डिपॉझीटस अनेक लाख कोटींनी वाढत असल्याच्या बातम्या आहेत, पूर्ण आकडेवारी ३१ डिसेंबर नंतर कळेलच, पण वाढत्या डिपॉझीट्सच्या परिणामी बचतींवरील व्याजदर बँकांकडून लगोलग कमी केले जात असल्याच्याही बातम्या वाचनात आल्या आहेत हे बँकांसाठी अर्थशास्त्रीय दृष्ट्या ठिक. पण बँकांकडे आलेला पैसा वस्तु व शेतकी उत्पादनात कमी व्याजदराने उपलब्ध करून देणे आणि वस्तु आणि शेतकी उत्पादन वाढवणे याचे अर्थशास्त्रीय महत्व लक्षात घेणे आणि वस्तु आणि शेतकी उत्पादन वाढवीण्याच्या कृतीत सक्रीय सहभाग नोंदवणे यासाठी भारतीय समाज व्यवस्था म्हणजे तुम्ही आणि आम्ही म्हणजेच आपण तयार आहात/आहोत का ?
मी त्या नोटा बँकेत भरल्या तर माझ्यात इन्कम्टॅक्सचा बांबू. अन कल्हई.इतरवेळी तुम्ही काय करता..? नोटा बँकेत भरत नाही का..?तुम्ही लोक कधी कुणा इन्कम्टॅक्स ऑफिसरशी अॅक्रॉस टेबल बोलला तरी आहात का कधी?नाही बोललो, म्हणून प्रश्न विचारत आहोत. तेही सभ्य भाषेत. तुम्ही सांगा मग नक्की काय अडचण आहे ते.