Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

२०१७ नंतरच्या आर्थीक जडणघडणीसाठी आपण तयार आहात/आहोत ?

म
माहितगार
Sun, 11/20/2016 - 05:56
🗣 118 प्रतिसाद
२०१६ चे उर्वरीत नव्हेंबर डिसेंबर दोन महिने ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा जाऊन साजरे झाले. डिमॉनीटायझेशनचा अनुभव सुखद की दुख्खःद या बद्दल येता काळ बरेच चर्वित-चर्वण होत राहील. डिमॉनीटायझेशननी काळ्या पैशाचे सगळे मार्ग भले बंद होणार नसतील भारतीय बँकांकडची डिपॉझीटस अनेक लाख कोटींनी वाढत असल्याच्या बातम्या आहेत, पूर्ण आकडेवारी ३१ डिसेंबर नंतर कळेलच, पण वाढत्या डिपॉझीट्सच्या परिणामी बचतींवरील व्याजदर बँकांकडून लगोलग कमी केले जात असल्याच्याही बातम्या वाचनात आल्या आहेत हे बँकांसाठी अर्थशास्त्रीय दृष्ट्या ठिक. पण बँकांकडे आलेला पैसा वस्तु व शेतकी उत्पादनात कमी व्याजदराने उपलब्ध करून देणे आणि वस्तु आणि शेतकी उत्पादन वाढवणे याचे अर्थशास्त्रीय महत्व लक्षात घेणे आणि वस्तु आणि शेतकी उत्पादन वाढवीण्याच्या कृतीत सक्रीय सहभाग नोंदवणे यासाठी भारतीय समाज व्यवस्था म्हणजे तुम्ही आणि आम्ही म्हणजेच आपण तयार आहात/आहोत का ?

प्रतिक्रिया द्या
16677 वाचन

💬 प्रतिसाद (118)
स
संदीप डांगे गुरुवार, 11/24/2016 - 05:38 नवीन
बँकेचा वापर लोक मुख्यतः रोख भरणे व रोख काढणे यासाठीच करतात, जे आहे ते आहे. चेक पेमेंटवर भरोसा नाही कारण बाऊन्स ची भीती. बाकी अनेक छोट्यामोठ्या गोष्टी आहेत, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे टाईप. इकडे शेतकरी मिनिमम वीसपंचवीस हजार रुपये कॅश सहज सोबत बाळगतात, (सरसकट नाही, काही गरीबही आहेत). व्यवहारांची एक संस्कृती रुजलेली असते, अचानक आजपासून सगळ्यांनी सूटबूट घालूनच फिरायचं असा आदेश काढल्यावर धोतर-चप्पल वापरणारे गडबडणारच... तडकफडक निर्णय तुम्ही घ्यायचा आणि गडबडली जनता तर तीलाच हसायचं? बँकिंग न करणे गुन्हा नाही हे सांगितल्याबद्दल धन्यवाद!.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव गुरुवार, 11/24/2016 - 06:25 नवीन
ते तर आहेच. पण गोपाळराव आणि तुमचे प्रतिसाद बघता मला टोटल लागत नाहि. एक गाव जिथे करोडोंचा व्यवहार होतो, जिथे बँकांचे जाळे आहे, पण बँकींग व्यवहारात लोकं हतबल होताहेत. चेक पेमेण्टवर भरोसा नाहि, अगदी १००% फसगत होते असं गृहीत धरलं तरी इतके मोठे व्यवहार करणारे लोकं डिमांड ड्राफ्ट वगैरेबद्दल ऐकुन नसतील हे पटत नाहि. ज्या मॅग्निटुडची हतबलता इथे वर्णन केली आहे त्यामागचं लॉजीक उमगत नाहि. ( वायनरी बिझसेन नाहि, पण होलसेल ते रिटेल कपडा मार्केट मी फार जवळुन बघितला आहे. फॉर इयर्स टुगेदर. चेक बाउन्स होण्याची भानगड नेहेमी असते कारण व्यापार्‍यांना हरघडी पैसा फिरवत रहावा लागतो. प्रचंड कॅश व्यवहार चालतात तिथे. सध्याच्या प्रसंगात काहि अडचणींना नक्कीच तोंड द्यावं लागतय, पण हतबलता नावालाही नाहि.) सुलभता म्हणुन कॅश फिरवणे आणि बँकींग व्यवहार टाळणे वेगळं. बँकींग व्यवहार टाळावेच लागुन कॅशनेच व्यवहार करण्याची अपरिहार्यता असणारे धंदे मी बघितले आहेत. तुम्हालाहि ते नक्की माहित असावेत. सदर गावाचे व्यवहार या दुसर्‍या प्रकारात मोडत नसतील अशी आशा करतो.
तडकफडक निर्णय तुम्ही घ्यायचा आणि गडबडली जनता तर तीलाच हसायचं?
नक्कीच नाहि. पण त्याच लोकांसाठी कटु पण अत्यावष्यक निर्णय घेतले तर आपल्या चश्म्याला चिकटुन फुकटचे अपशकुन करायचे? ( हे तुमच्याकरता नाहि )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 11/24/2016 - 06:31 नवीन
संकटं आली तरी लोक मार्ग काढतातच! अगदी अतिरेक्यांनाही नवीन नोटा मिळतात. सगळंच आलबेल आहे असं समजणे हाही चष्मीश असण्याचा प्रकार आहे, नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
म
मोदक गुरुवार, 11/24/2016 - 06:36 नवीन
सगळंच आलबेल आहे असे कोणी म्हटले आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 11/24/2016 - 06:43 नवीन
सगळंच वैट्ट झालं असंही कोणी म्हटलं आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
अ
अर्धवटराव गुरुवार, 11/24/2016 - 06:48 नवीन
अगदी जगबुडी आलि, ति ही कोत्या मनाच्या निर्बुद्ध सरकारच्या जाणुनबुजुन घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे... असा स्वर जाणवला बर्‍याचदा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 11/24/2016 - 06:54 नवीन
जगबुडी आली की नाही हे कुणाच्या सांगण्यावरून ठरणार नाही, आली तरी किंवा नाही तरी, दोन्हीकडच्या पाहुण्यांना दिसेलच, त्यामुळे तुका म्हणे उगे राहावे जे जे होईल ते ते पाहावे,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव गुरुवार, 11/24/2016 - 06:45 नवीन
मी तरी सगळं अगदी आलबेल असल्याचं कुणी म्हटलेलं ऐकलं नाहि. भक्त आणि अभक्तांना चर्चेत कोणि विचारत नाहि. इंटलेक्चुअल कावीळ मात्र डोक्यात जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 11/24/2016 - 06:51 नवीन
जशी तुम्ही मला उद्देशून शेवटची विधाने केली नव्हती तशीच मी तुम्हाला उद्देशून म्हटलं नव्हतं,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
प
पैसा Mon, 11/28/2016 - 15:05 नवीन
मला आठवतं त्याप्रमाणे झिरो बॅलन्स-नो फ्रिल्स वाल्या खात्यांनासुद्धा आम्ही खाते सुरू करताना एटीएम डेबिट कार्ड गळ्यात घालत होतो. त्याला चार्जेस काही नसतात. सगळ्या खात्याना डेबिट कार्ड्स दिलीच पाहिजेत असा शाखांना आदेश असतो. मग या लोकांकडे कार्ड्स कशी नाहीत? बँकेत सेव्हिंग खाते असेल तर डेबिट कार्ड असतेच. सुरक्षा योजनेचे २००० रुपये सरकारी पेन्शन घेणारी अल्पशिक्षित म्हातारी नातवाच्या मदतीने एटीएममधून पैसे काढू शकते, तर हे कोणालाही सहज शक्य आहे. हा, बँकेत खात्याला पैसे नसतील आणि घरात पोत्यात भरून ठेवले असतील तर मात्र पंचाईत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Mon, 11/28/2016 - 16:01 नवीन
पैतै, शेतकर्‍यांचे कार्ड्स आहेत पण रोजचे व्यवहार कार्डने होत नाहीत असे म्हटले आहे. ते कार्ड वापरतील, बॅन्केत जातील पण फक्त रोख काढायला, रोख भरायला. बाजारात माल विकला की रोख मिळते दोन लाख ते वीस लाख-चाळीस लाख, कितिही ते मालावर अवलंबून. चेक पेमेंट करणारे व्यापारी असतात. पण फार कमी व्यवहार होतात असे. थेट खात्यावर येणारे पैसेही असतात. पण रोखीचा बोलबाला जास्त. त्यामुळे बाकीचे लाड नाहीत असे म्हंटलो.. डाळींब-द्राक्ष शेतीवाल्यांचे खूप किस्से आहेत. पंचवीस लाख कॅश घेऊन थेट फॉर्चुनर घ्यायला टोयोटा शोरुमला, चॉकलेटसारखी आत्ताच्या आत्ता दे म्हणून. =)) शेतकर्‍यांचे रोखीचे व्यवहार बंद झाले तर जे काही थोड्या प्रमाणात व्यसन वा शौक म्हणून पैसे उधळणे होते, ते होणार नाही असे वाटते. नारायणगावात भारतातले सर्वात मोठे टोमॅटो मार्केट आहे. पैसा हातात आला की काही शेतकरी तिथेच काही पैसे (विविध ठिकाणी) खर्च करुन बसतात. घरी जाऊन सांगतात अमूकच भाव मिळाला. घरच्या लोकांना जरी बाजारभाव माहित असेल तरी ५-१० टक्क्यांचाही झोल करुन खोटे बोलु शकतात. सर्व बॅन्केमार्फत झाले तर घरच्या लक्ष्मीलाही कळेल किती पैसा आला, कुठे गेला बॅन्क स्टेटमेंट बघून...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Tue, 11/29/2016 - 09:54 नवीन
पंचवीस लाख कॅश घेऊन थेट फॉर्चुनर घ्यायला टोयोटा शोरुमला, चॉकलेटसारखी आत्ताच्या आत्ता दे म्हणून. =))
कहर आहे! खरंच यांच्या बायकाना कळले पाहिजे नेमके किती पैसे येतात आणि जातात, तर उधळण्याला जरा लगाम बसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
अ
अस्वस्थामा Tue, 11/29/2016 - 14:34 नवीन
खरंच यांच्या बायकाना कळले पाहिजे नेमके किती पैसे येतात आणि जातात, तर उधळण्याला जरा लगाम बसेल
हाहाहा.. असं तुम्हाला वाटतंय. त्या बायका तेच पंचवीस लाख घेऊन सराफाच्या दुकानात जातील की मग 'आत्ताच्या आत्ता तसला हिरा/दागिना पायजे' म्हणून. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
J
jp_pankaj Wed, 11/23/2016 - 20:23 नवीन
लॉजीक गंडलय तुमच..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
आ
आनंदी गोपाळ Wed, 11/23/2016 - 18:49 नवीन
अ‍ॅम गेटिंग बिटर. सध्या निवृत्ती!
  • Log in or register to post comments
म
मोदक Wed, 11/23/2016 - 19:01 नवीन
थांबा हो.. इतके कशाला पेटताय. तुमची गैरसोय होत आहे ते लक्षात आले. "तुम्ही ५० लाख रूपये बँकेत भरले तर तुमचे नांव स्क्रुटिनी मध्ये निघणार आणि लोकल लेव्हलचे इन्कमटॅक्स अधिकारी त्या स्कृटिनीचा पैसे खायचे साधन असा उपयोग करणार" असे काही आहे का..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
आ
आनंदी गोपाळ Wed, 11/23/2016 - 19:06 नवीन
तुमच्या संतुलित पणावर कधी काळी विश्वास होता. आज नाही. बाऽय ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Wed, 11/23/2016 - 19:09 नवीन
ब्वॉर्र.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
स
संदीप डांगे Wed, 11/23/2016 - 19:07 नवीन
ऐसाभी है मोदकभाऊ! आयटीवाले तोडपाणी करतच नाहीत हा कोणाला भ्रम असेल तर असो बापडा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
आ
आनंदी गोपाळ Wed, 11/23/2016 - 19:10 नवीन
मोदक तुम्हाला व्यनि करून शांत व्हायला लावतात. अन असले मेसेज पब्लिक मधे पोस्ट करतात. त्यांची यत्ता भारी आहे. आवरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Wed, 11/23/2016 - 19:13 नवीन
ओ आय सी...! ऐसाभी होता है?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
म
मोदक Wed, 11/23/2016 - 19:19 नवीन
आयटीवाले तोडपाणी करतच नाहीत हा कोणाला भ्रम असेल तर असो बापडा... याला काही रेफरन्स / असंबद्ध पुरावे वगैरे आहे की वीस लाखाच्या ट्रक प्रमाणे हवेतल्या गोळ्या..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Wed, 11/23/2016 - 19:34 नवीन
आयटीवाले तोडपाणी करतात हे कुठं म्हटलंय? पण एखाद्याला भ्रम असू शकतो ना कि करत'च' नाही म्हणून... बाकी सर्व सरकारी खात्यांमध्ये केवळ आयटीत सर्वच्या सर्व हरिषचन्द्री अवतार असतात ह्याबद्दल मला कोणतीच शंका नाही! किंवा काय माहित सर्वच सरकारी खात्यांना मे 2014 पासून हरिश्चंद्री गुटी दिली गेली असावी.. आपल्याला काय माहित, आपल्याला काय बी नाही माहित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Wed, 11/23/2016 - 19:42 नवीन
आयटीवाले तोडपाणी करतच नाहीत हा कोणाला भ्रम असेल तर असो बापडा... म्हणजे आयटीवाले पण तोडपाणी करतात. हाच अर्थ आहे ना तुमच्या विधानाचा..? आपल्याला काय माहित, आपल्याला काय बी नाही माहित. मग अभ्यास वाढवा. इथे अनेकांनी बघितले आहे, अभ्यास कमी पडला की उगाच कोणीपण सोम्यागोम्या मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ करतो किंवा इतर आयडींवर फुकाचे आरोप करून नंतर घुमजाव करावे लागते तसेच चुकीच्या लिंका देवून पब्लीककडून धुलाई करून घ्यावी लागते. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Wed, 11/23/2016 - 19:52 नवीन
इथले चार आयडी म्हणजे पब्लिक का? ओ आय सी... केव्हापासून ठरलं म्हणताय हे? हे पब्लिक बऱ्याच ठिकाणी कानफटात पडेल म्हणून सोयीस्कर मौन धरून असते, उंदीर जाण्याऐवढी जागा दिसली की सोयीस्कर मिळून येऊन अंबुश करते, हे पब्लिक 'पब्लिक' च्या नावावर बरंच काही खपवते... बरं झालं तुम्ही सांगितलं... दुर्दैव आहे आता पब्लिकचं! ;) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Wed, 11/23/2016 - 20:01 नवीन
इथले चार आयडी म्हणजे पब्लिक का? ओ आय सी... केव्हापासून ठरलं म्हणताय हे? हे पब्लिक बऱ्याच ठिकाणी कानफटात पडेल म्हणून सोयीस्कर मौन धरून असते, उंदीर जाण्याऐवढी जागा दिसली की सोयीस्कर मिळून येऊन अंबुश करते बर्र.. हे नक्की तुमचेच मत आहे का..? हे पब्लिक 'पब्लिक' च्या नावावर बरंच काही खपवते... बरंच काही खपवले असते तर बाकी पब्लीकने योग्य वेळी कानपिचक्या दिल्या असत्या आणि माझ्या बाबतीत तसे झाले तर आनंदाने मान्य करून नवीन गोष्टी शिकायचा प्रयत्न करेन. उगाच खोट्या लिंका देवून सारवासारव करणार नाही. बरं झालं तुम्ही सांगितलं... दुर्दैव आहे आता पब्लिकचं! ;) =)) जशी तुमची इच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Wed, 11/23/2016 - 20:06 नवीन
ओ येस, कोण कोणाला कधी कानपिचक्या देतं हे चार आयडी असलेलं पब्लिक ठरवतं...! मला का कोण जाणे गंगाधर मुंटेंची फार आठवण यायला लागलीये... पत्ता शोधायला हवा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
स
संदीप डांगे Wed, 11/23/2016 - 19:45 नवीन
ओहो, सी, व्हॉट आय फाऊंड ऑन इंटरनेट...!! The CBI has registered a corruption case against nine officers of the income tax department and three others. The officers include a principal IT commissioner, two IT commissioners, five officers in the rank of joint commissioners and a deputy commissioner. लिंक देत नै कारण अनेक ठिकाणी आलेली बातमी आहे. बातमी 2016 चीच,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Wed, 11/23/2016 - 19:54 नवीन
थांबा थांबा.. माझी वाचण्यात चुक झाली. मला आयटी म्हणजे आमच्या प्रोफेशन बद्दल वाटले आणि तुम्ही इन्कम टॅक्स बद्दल बोलत आहात. इन्कम टॅक्स डिपारमेंट बद्दल असेल तर मला पण लै फर्स्ट हँड अनुभव आहेत - तुमच्याशी सहमत आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Wed, 11/23/2016 - 20:02 नवीन
ना भाई ना, हि कोलांटी नाही चालायची आता... जिथे मी आयटीवाले म्हटले त्या तुमच्याच प्रतिसादात इन्कमटॅक्स वाले अधिकारी असा स्पष्ट उल्लेख केलाय तुम्ही, त्यावरच मी आयटीवाले प्रतिसाद दिलता... तो कोणत्याही प्रकारे मा. तं. वाल्याशी रिलेटेड आहे असा दूरदूर पर्यंत कोण्या बावळट प्राण्याला संशय येणार नाही... तसेच या धाग्यावर प्रस्तुत गोपाळ, मोदक, डांगे यांच्या ट्रेलमध्येही कोणी मा.तं. बद्दल अवाक्षर काढलेले नाही... माझ्या प्रत्येक प्रतिसादकडे पूर्वग्रहदूषित नजरेने बघायची, सरसकट करण्याची सवय तर नाही ना लागली?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Wed, 11/23/2016 - 20:11 नवीन
तसेच या धाग्यावर प्रस्तुत गोपाळ, मोदक, डांगे यांच्या ट्रेलमध्येही कोणी मा.तं. बद्दल अवाक्षर काढलेले नाही... गोपाळरावांनी दिलेला प्रतिसाद आहे. "मुंबई पुण्यातच जग नाही. सगळ्यांनाच आयटीत पगार नाहीत." या रेफरन्सने मी वाचत होतो. गैरसमज लक्षात आल्या आल्या प्रतिसाद दिलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Wed, 11/23/2016 - 20:18 नवीन
ओके, ठीक आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Wed, 11/23/2016 - 19:17 नवीन
ओ कक्काजान.. तो रेफरन्स वायला हा वायला. प्रत्येक रूग्णाला डायरेक्ट ऑपरेशनचा सल्ला देता का त्या त्या परिस्थितीप्रमाणे औषध,विश्रांती वगैरे पण सुचवता..? तुम्हाला शेवटची खरड केली होती जुन महिन्यात... व्यनीचे आठवत नाही. उगाच आरोप करू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
आ
आनंदी गोपाळ Wed, 11/23/2016 - 19:22 नवीन
प्रत्येक रूग्णाला डायरेक्ट ऑपरेशनचा सल्ला देता का त्या त्या परिस्थितीप्रमाणे औषध,विश्रांती वगैरे पण सुचवता..?
माझ्याबद्दल शष्प माहिती नसताना इन्सिन्युएशन. असोच. पण मी मघाशीच बाऽय म्हटलेलं ना! चुकलंच माझं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Wed, 11/23/2016 - 19:29 नवीन
माझ्याबद्दल शष्प माहिती नसताना इन्सिन्युएशन. तुम्हाला कधी व्यनी केला आहे ते सांगा आणि त्याचा माझ्यावर केलेल्या आरोपाशी संबंध आहे का ते सिद्ध करा. स्वत: केलेले इन्सिन्युएशन दुसर्‍याने चालवून घ्यावे आणि दुसर्‍याने केलेले चालत नाही असे काही आहे का..? (इथे खोट्या लिंका देणार्‍यांप्रमाणे..) चुकलंच माझं! सीए ला विचारा. असल्या चुका झाल्या तरीपण धंदा बंद ठेवायचा का ते..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
आ
आनंदी गोपाळ Wed, 11/23/2016 - 19:40 नवीन
Image removed. इथल्या व्यनि/खरड इ. मधे गोंधळ होतो माझा. इतका मिपा सराइत नाही. याचा संदर्भ आपणांस ठाऊक आहेच. मी वेगळा सांगावा असे नाही. आपण संतुलितपणाने मला शांतवलेत असे समजत होतो. आता तुमच्याबद्द्ल खात्री पटली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Wed, 11/23/2016 - 19:51 नवीन
तुमचा नेमका मुद्दा काय आहे..? तुम्ही मागच्या वर्षी मे महिन्यात आक्रस्ताळेपणे प्रतिसाद देवून कोणत्या तरी धाग्यामध्ये तुमच्याच मुद्द्यातील हवा काढत होतात असे माझे मत होते म्हणून पहिली खरड टाकली. त्यावर तुम्ही व्हय जी. म्हणूनच लिहिणे बंद केले. धन्यवाद! असा खरडीमध्येच प्रतिसाद दिलात. त्यावर मी लिखाण थांबवण्यापेक्षा दुर्लक्ष करा असे सुचवले होते.
खरड ही सार्वजनिक असते. तुम्ही केलेल्या आरोपानुसार "मी व्यनीतून खाजगीत एक गोष्ट सांगतो आणि सार्वजनिकरीत्या दुसरी गोष्ट सांगतो असे ध्वनीत होत आहे"
आत्ताही तुम्हाला दिलेल्या पहिल्या प्रतिसादामध्ये एक जेन्युईन प्रश्न आहे. त्याला उत्तर द्यायचे सोडून तुम्ही विषय भरकटवत बेसलेस आरोप करत आहात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
आ
आनंदी गोपाळ Wed, 11/23/2016 - 20:00 नवीन
माफ करा. नजरचुकीने, वा बुद्दीदोषाने लक्षात आला नाही. कोणता प्रश्न? उतर द्यायचा यत्न करतो, पुनः प्रश्न विचारायचे कष्ट घेणार का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Wed, 11/23/2016 - 20:19 नवीन
प्रश्न असा आहे की.. सरकारी नियमामुळे यावेळी तुम्हाला जास्त कॅश बँकेत भरावी लागणार आणि त्यामुळे तुम्हाला इन्कम टॅक्सचा त्रास होणार आहे. असे तुमचे मत आहे. जर तुमची सगळी बुक्स क्लीअर असतील तर; नक्की काय त्रास होणार आहे..? एक शक्यता मला वाटली ती ही आहे की, "तुम्ही ५० लाख रूपये बँकेत भरले तर तुमचे नांव स्क्रुटिनी मध्ये निघणार आणि लोकल लेव्हलचे इन्कमटॅक्स अधिकारी त्या स्क्रुटिनीचा पैसे खायचे साधन असा उपयोग करणार" असे काही आहे का..?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
आ
आनंदी गोपाळ Wed, 11/23/2016 - 20:25 नवीन
ते लोक त्रास देतील तेव्हा माझे वाढलेले ब्लड प्रेशर, (वाल्या कोळ्याने बायकापोरांना माझी पापं डोक्यावर घेता का असं विचारलं, तसे,) तुम्ही घेणार का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Wed, 11/23/2016 - 20:36 नवीन
ह्म्म... हीच शंका होती. त्रास झाला तर सरकारी पोर्टलचा वगैरे उपयोग करून बघा इतकेच सुचवू शकतो. :( आता आमच्या भूमीकेवर शांतपणे विचार करा, मुद्दा असा असतो डॉक, आम्ही नोकरदार माणसे असल्याने या खाचाखोचा माहिती नसतात आणि व्यावसायिकांना नक्की काय त्रास होतो किंवा काय त्रास होवू शकतो तेही फारसे माहिती नसते त्यामुळे असे (तुम्हाला बाळबोध वाटणारे) प्रश्न विचारले जातात. त्यामुळे अशा बेसीक प्रश्नांना प्लीज थोड्या संयमाने उत्तरे द्या. वरती लिहिल्या प्रमाणे इन्कम टॅक्स वाल्यांशी समोरासमोर बोलणे होतही नाही. आमचे पगार टॅक्स कापून येतात आणि खोटी बिले जोडणार्‍यांना अनेक कंपन्या घरी पाठवतात, असे असल्याने खोटेपणा करण्याचा मार्ग बहुतांश जण स्वीकारत नाहीत. तुमची गैरसोय होत आहे ते लक्षात आले होते पण नक्की काय होत आहे ते कळाले नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
ब
बोका-ए-आझम Wed, 11/23/2016 - 19:13 नवीन
गोपाळराव, I am sorry. मी माफी मागितलेली आहे. Ok?
  • Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ Wed, 11/23/2016 - 19:15 नवीन
नो माय डियर, ही माझी मिसळपाव प्रशासनाशी बोलणी आहेत. फुकटात माफी?? मला नकोच. तुम्ही महान आहात, तसेच रहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Wed, 11/23/2016 - 19:23 नवीन
आता यापुढे जबाबदारी तुमची. मी माफी मागितलेली आहे. आता मी जे काही बोलेन त्याचीसुद्धा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
आ
आनंदी गोपाळ Wed, 11/23/2016 - 19:28 नवीन
कुणी दरवडेखोर माझ्यावर बंदूक रोखून मला सांगतो, की "आय अ‍ॅम सॉरी, तुझी माफी मागतो, पण तुझ्या तिजोरीच्या चाव्या दे, अन सोबत तुझ्या घरातली बायकापोरेही. न दिलीस तर पुढे जे होईल त्याची जबाबदारी तुझी." असं झालं तर जबाबदारी माझीच असते नै?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Wed, 11/23/2016 - 19:33 नवीन
तुमच्या बुद्धिमत्तेबद्दल आदर आहेच. पण तुमचा नकारात्मक फटकळपणा डोक्यात जातो. स्पष्टपणे सांगतोय. जर व्यवस्थित चर्चा करायची असेल तर स्वागत आहे. इतर धाग्यांवर तशी झालेली पण आहे. पण फटकळपणा कराल तर आम्ही नडतोच. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
आ
आनंदी गोपाळ Wed, 11/23/2016 - 19:51 नवीन
Let's call it quits गोपाळराव! बोका-ए-आझम - Thu, 24/11/2016 - 00:03 तुमच्या बुद्धिमत्तेबद्दल आदर आहेच. पण तुमचा नकारात्मक फटकळपणा डोक्यात जातो. स्पष्टपणे सांगतोय. जर व्यवस्थित चर्चा करायची असेल तर स्वागत आहे. इतर धाग्यांवर तशी झालेली पण आहे. पण फटकळपणा कराल तर आम्ही नडतोच. असो. प्रतिसाद द्या << बोकोबा, "आम्ही नडतोच" ते ठीकाय. नडला त्याला फोडला, अशीही म्हण आहे की नै? चैला, आम्ही आम्हाला बसलेल्या चिमट्यांबद्दल किरकिरतोय, अन तुम्ही मोदीभजन करायलेत, कसं चालावं? दोस्तीत र्‍हा भौ. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
आ
आनंदी गोपाळ Wed, 11/23/2016 - 19:52 नवीन
बो घेऊन टाका ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
ब
बोका-ए-आझम Wed, 11/23/2016 - 19:56 नवीन
Slate clear.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
आ
आनंदी गोपाळ Wed, 11/23/2016 - 20:01 नवीन
वोक्के.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा