Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माझ्या अतिशय भित्रट आणि अतिहळव्या स्वभावाचे काय करावे???

ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर
Tue, 11/29/2016 - 18:39
🗣 53 प्रतिसाद
माझं व्यवहार ज्ञान खूप कमी आहे ,आणि माझं डोकं चालत नाही या विषयी मी मागच्या लेखात लिहीले होते.माझ्या व्यक्तीमत्वातले दोष मी जेव्हा शोधतो तेव्हा मला माझा बिंडोकपणा जास्त खटकतो.त्यानंतर मला माझ्या व्यक्तीमत्वात जास्त खटकणारी गोष्ट आहे ती म्हणजे माझा अतिशय भित्रट स्वभाव व अतिशय हळवेपणा. झाडाचं पान अंगावर पडल्यावर ' आभाळ कोसळलं ' म्हणून जंगलभर सैरावैरा पळणारा गोष्टीतील ससाही माझ्यापेक्षा धीट असेल इतका मी भित्रट आहे.आधीचाच असलेला ठार बिंडोकपणा त्यात हा भित्रट स्वभाव माझ्या दैनंदीन व्यवहारातील अडचणीत भरच टाकत असतो.या भित्रट स्वभावामुळे मी एकदा अडचणीत सापडलो होतो.एका गुंड स्वभावाच्या व्यक्तीशी पार्कींगमध्ये थोडा मॅटर झाला होता .मी लागलीच माफी मागितली ,पण त्या गुंडाने मला डोक्यात जबर फाईट मारली,काही दिवस मला त्यामुळे जिभ जड झाल्याचा अनुभव आला होता .माझं बोलणं sluggish झालं होतं. तर असा हा भित्रा स्वभाव आहे,यातही भर म्हणून की काय ,मी अतिशय हळवा देखील आहे.कुणी जरा टोचून बोललं की माझ्या मनाला लागतं,बराच काळ मी त्या विचारात राहतो,रडायलाही येते.टिका सहन होत नाही. आजुबाजुला काही घडले ,वर्तमानपत्रातल्या खून ,बलात्काराच्या बातम्या वाचल्या,रस्त्यावरच्या बेवारस प्राण्यांचे हाल बघितले की मी फार व्यथीत होतो. तर माझे काही प्रश्न आहेत.आंतरजालावरच्या धुरीणांनी मार्गदर्शन करावे. १. अतिशय भित्र्या व भिडस्त स्वभावाचे काय करावे? २. अतिहळवेपणावर कशी मात करावी? ३. वैयक्तीक ,सामाजिक ,आर्थिक प्रगतीत अडसर ठरणार्या या अतिशय भित्रट आणि हळव्या स्वभावाचा मला कंटाळा आला आहे! कृपया मार्गदर्शन करावे.
वर्गीकरण
सामाजिक

प्रतिक्रिया द्या
11925 वाचन

💬 प्रतिसाद (53)
म
मोदक Tue, 11/29/2016 - 18:43 नवीन
राहुल गांधीला भाषणे तुम्हीच लिहून देता का..?
  • Log in or register to post comments
प
पाटीलभाऊ Wed, 11/30/2016 - 08:55 नवीन
राहुल गांधी टफिंच्या माध्यमातून आपली व्यथा मांडतायत असे वाटते :P उद्या-परवा रागा पंतप्रधान झाले तर त्यात मिपाकरांनी दिलेल्या सल्ल्यांचा खारीचा वाटा असणार :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
ज
ज्ञाना Tue, 11/29/2016 - 19:03 नवीन
तुम्ही स्वतःला समजता तितके भित्रे नाही आहात. अशा पद्धतीने सर्वांसमोर अंतरंग खुले करण्यासाठीसुद्धा खूप धैर्य लागतं.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 11/29/2016 - 19:03 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Tue, 11/29/2016 - 19:12 नवीन
अजुनही लोकांना इथे सिरीयसली चर्चा करायची आहे का? मागच्या धाग्यात अनेकांनी बेनिफिट ऑफ डाऊट देऊन ह्या महाशयांना अत्यंत चांगले प्रतिसाद दिले. त्या सगळ्यांना येड्यात काढणारा हा धागा घेऊन टफि हजर! अशाने जेन्युइन लोकांनाही उद्या कुणी उत्तरं देणार नाही.
  • Log in or register to post comments
प
पुंबा Tue, 11/29/2016 - 19:23 नवीन
++111 साफ फसलो आम्ही नवी माणसं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर Tue, 11/29/2016 - 19:45 नवीन
मान्य आहे मला माझे प्रश्न नीट आर्टिक्युलेट करुन लिहीता येत नाहीत,याचा अर्थ मी फक्त मिपाकरांचा वेळ घेतो व टाईमपास करतो असा नाही.मला कळत नाही की माझे प्रांजळ आत्मनिवेदनही लोकांना का खटकते. पिलियन रायडर,तुम्ही मला सल्ला देऊ शकत नसाल तर ठीक आहे पण इतरांना त्यापासून का परावृत्त करता आहात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Tue, 11/29/2016 - 20:56 नवीन
मी कशाला काही करायला पाहिजे? तुम्हीच पुरेसे आहात.. एका हळव्या, भित्र्या, ढ आणि आत्महत्याच करावी असा विचारापर्यंत आलेल्या माणसाने गेल्या ७ दिवसात ४ धागे काढलेत. डुआयडींबद्दल तर मी बोलतच नाही. ह्याला अजुनही प्रांजळ आत्मनिवेदन वगैरे म्हणायचे असेल तर चालु द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्बोचार्जड फिलॉसॉफर
न
निनाद Tue, 11/29/2016 - 21:58 नवीन
हे म्हणावेसे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
न
नावातकायआहे Wed, 11/30/2016 - 04:05 नवीन
जाऊं द्याना! बॉर म्हणा नी सोडुन द्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद
र
रेवती Wed, 11/30/2016 - 02:34 नवीन
हैला! असय काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
स
सचु कुळकर्णी Tue, 11/29/2016 - 19:21 नवीन
भित्रट आणि हळव्या स्वभावाचा मला कंटाळा आला आहे! कृपया मार्गदर्शन करावे.
कोंबडी नाहितर गेलाबाजार मासळी आपल्या हाताने चिरुन साफ करावे. @ गरीब चिमणा लवकरात लवकर मानसोपचार तज्ञांचा सल्ला व उपचार घ्या.
  • Log in or register to post comments
स
सचु कुळकर्णी Tue, 11/29/2016 - 19:29 नवीन
राहुल गांधीला भाषणे तुम्हीच लिहून देता का..? मोदका नाहि रे लिहुन देणार्याचा IQ रागा पेक्षा किंचित वर असावा एम्पॉवर असावा.
  • Log in or register to post comments
स
सचु कुळकर्णी Tue, 11/29/2016 - 19:40 नवीन
मला तर खुद्द रिंगमास्टर असले आयडि घेऊन निराकार पणे मिपाकरांची मजा घेताहेत असे वाटले.
  • Log in or register to post comments
म
मारवा Tue, 11/29/2016 - 19:49 नवीन
टफि जी कोणी आत्महत्या करतो म्हणायला लागल की माझा मेंदु काम करणे थांबुन जातो मित्रा..... अर्थात माझाच प्रॉब्लेम आहे. एकच विनम्र विनंती आहे जमल्यास बघा आत्महत्या विषयावर विनोद नका करु हो. त्याने जो कोणी खरच अडचणीत असेल त्याला अत्यावश्यक असलेला दिलासा जो त्या काळात थोडा जरी मिळाला तरी फार.... बघा आपण सुज्ञ आहातच.... असो.... तुमच्या भावी जीवनासाठी व वाटचालीसाठी मनापासुन शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
न
निनाद Tue, 11/29/2016 - 21:57 नवीन
लैच्च येड्यात काढू र्‍हायले राव पब्लिक्ला! चालू द्या!
  • Log in or register to post comments
क
कविता१९७८ Wed, 11/30/2016 - 03:13 नवीन
धागाकत्याने मायबोलीकर रुन्मेष चा आदर्श घेतलाय का?
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Wed, 11/30/2016 - 04:16 नवीन
तुम्हाल खरेच भितीपासून मुक्ती हवी असेल तर, ऐका!.. . . . . . . . . . . . .. . . . . . झालं. आता मुक्ती मिळालेली आहे. तेव्हा शांतपणे पुढचे १५ दिवस मिपापासून लांब रहा. म्हणजे आम्हाला पण तुमच्या धाग्यांच्या भीतीपासून थोडी मुक्ती मिळेल.
  • Log in or register to post comments
स
सामान्य वाचक Wed, 11/30/2016 - 05:28 नवीन
तुम्हाला एवडे प्रॉब्लेम आहेत बघून खरच खूप वाईट वाटले नियती कशी काय एव्हडी निष्ठुर होऊ शकते एखाद्याच्या बाबतीत? खरे तर तुम्ही एव्हडे घाबरत नाही आहात कित्ती हिमतीने तुम्ही धागे काढताय भल्याभाल्याना जमत नाही ते स्वगत (दांभिकपणा आणि खोटारडे पणा, या गोष्टीची पण चिंता केली पाहिजे माणसाने, त्यावर एक धागा काढावा का )
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Wed, 11/30/2016 - 06:05 नवीन
तुम्हाला एवडे प्रॉब्लेम आहेत बघून खरच खूप वाईट वाटले..
याला पूर्वी जयश्री गडकर होणे म्हणत. का? ते त्यांचे चित्रपट पाहिले तरच कळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक
स
सामान्य वाचक Wed, 11/30/2016 - 08:01 नवीन
पण धागा कर्ते, तुम्हाला खूप प्रॉब्लेम्स आहेत, ते 1 बाय 1 सोडवा सगळ्या प्रॉब्लेम ना एकदम सोडवायला घेऊ नका आधी पांढरे केस, सामान्यज्ञान, व्यवहारज्ञान हे प्रश्न सोडवा मग पुढचे घ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
स
सामान्य वाचक Wed, 11/30/2016 - 08:03 नवीन
पण धागा कर्ते, तुम्हाला खूप प्रॉब्लेम्स आहेत, ते 1 बाय 1 सोडवा सगळ्या प्रॉब्लेम ना एकदम सोडवायला घेऊ नका आधी पांढरे केस, सामान्यज्ञान, व्यवहारज्ञान हे प्रश्न सोडवा मग पुढचे घ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
स
सामान्य वाचक Wed, 11/30/2016 - 08:03 नवीन
पण धागा कर्ते, तुम्हाला खूप प्रॉब्लेम्स आहेत, ते 1 बाय 1 सोडवा सगळ्या प्रॉब्लेम ना एकदम सोडवायला घेऊ नका आधी पांढरे केस, सामान्यज्ञान, व्यवहारज्ञान हे प्रश्न सोडवा मग पुढचे घ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 12/01/2016 - 05:21 नवीन
अशी ती परंपरा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
प
पिशी अबोली Wed, 11/30/2016 - 05:43 नवीन
लोणचे छान होते. सणसणीत फोडणी द्या.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Wed, 11/30/2016 - 05:59 नवीन
हे घ्या No 1 solution Image removed.
  • Log in or register to post comments
भ
भाते Wed, 11/30/2016 - 06:42 नवीन
तुम्हाला काही कामधंदा नाही हे तुम्ही आधीच जगजाहिर केले आहे. जर खरंच तुम्हाला तुमच्या समस्येचे ऊत्तर हवे असेल तर एकच धागा दोन संस्थळावर कशाला काढता? तुमचा कोणावरही विश्वास नाही आहे का? मिपावर मिपाकर तुमच्या समस्येचे समाधान करू शकणार नाहीत याची खात्री असल्याने पुन्हा हाच धागा माबोवर काढला ना? मग तिकडे मिळवा ना तुमच्या प्रश्नांची ऊत्तरे. पुन्हा इकडे कशाला येताय? जरी आपल्याला मिपा फुकट असले तरी नीलकांत/ प्रशांत यांना बॅण्डविड्थचे पैसे भरायला लागत आहेत ना! मग हे असले फालतु धागे काढुन ऊगाच त्यांचे पैसे कशाला वाया घालवताय? एक काम करा. पुढले सहा महिने सगळया आयडीने मिपावर येणे बंद करा. किमान आम्हाला तरी रोज असले फालतू धागे वाचावे लागणार नाहीत. तुमच्या वाचलेल्या वेळात पदरचे चार पैसे खर्च करून नियमितपणे मानसोपचार तज्ञाकडे जाऊन ऊपचार घ्या. त्याने तुमचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Wed, 11/30/2016 - 07:57 नवीन
एक काम करा. पुढले सहा महिने सगळया आयडीने मिपावर येणे बंद करा. किमान आम्हाला तरी रोज असले फालतू धागे वाचावे लागणार नाहीत. तुमच्या वाचलेल्या वेळात पदरचे चार पैसे खर्च करून नियमितपणे मानसोपचार तज्ञाकडे जाऊन ऊपचार घ्या. त्याने तुमचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे. == सहमत !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते
प
पुंबा Wed, 11/30/2016 - 07:06 नवीन
बेवारस प्राण्यांचे हाल बघितले की मी फार व्यथीत होतो.
वा रे वा! बेवारस प्राण्याचे हाल बघून व्यथित होता तसे आमचे हाल बघूनदेखील व्यथित व्हा आणि आवरा..
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Wed, 11/30/2016 - 07:51 नवीन
या भित्रट स्वभावामुळे मी एकदा अडचणीत सापडलो होतो.एका गुंड स्वभावाच्या व्यक्तीशी पार्कींगमध्ये थोडा मॅटर झाला होता
भित्रट स्वभाव असेल मत मॅटर झालाच कसा? तुमचे मॅटर अगोदरच पातळ व्हायला हवे होते.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 11/30/2016 - 08:12 नवीन
टफि, .... याच्या बरोब्बर विरुद्ध दिशेने उपाय करा : http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/sex-change-surgery/articleshow/55693527.cms मात्र उपाय टोकाचा आहे ही धोक्याची सूचना ! आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
सामान्य वाचक Wed, 11/30/2016 - 08:16 नवीन
हम आपके है कोन , आठवतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर Wed, 11/30/2016 - 08:31 नवीन
धन्यवाद प्रतिसादकर्त्यांनो,पण माझ्या प्रश्नाचे उत्तर कुणीच नीटपणे दिलेले नाही.कृपया या धाग्यावर मला आपला अभिप्राय हवा आहे,टाईमपास करु नये.
  • Log in or register to post comments
क
कुंदन Wed, 11/30/2016 - 09:07 नवीन
१. अतिशय भित्र्या व भिडस्त स्वभावाचे काय करावे? - बेदरकारपणे वागावे २. अतिहळवेपणावर कशी मात करावी? - बेदरकारपणे वागावे ३. वैयक्तीक ,सामाजिक ,आर्थिक प्रगतीत अडसर ठरणार्या या अतिशय भित्रट आणि हळव्या स्वभावाचा मला कंटाळा आला आहे! - बेदरकारपणे वागावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्बोचार्जड फिलॉसॉफर
श
श्रीगुरुजी Wed, 11/30/2016 - 09:52 नवीन
नानासाहेब नेफळे, मिपाकरांना पुन्हा एकदा चु* बनविल्याबद्दल अभिनंदन! बिचार्‍या मिपाकरांना वाटतंय की तुम्हाला खरोखरच समस्या आहेत आणि ते भोळेपणाने मदत करायचा प्रयत्न करतात. आणि ते बघून 'यांना कसं येडं बनवलं' या विचाराने तुम्हाला मनातून आनंदाच्या उकळ्या फुटतात. असो. तुमचे पुढील धागे खालीलप्रमाणे असतील याची खात्री आहे. - मला मुलींवर छाप पाडता येत नाही आणि मला कोणतीच मुलगी पटत नाही. मी काय करू???????????? - माझ्या अतिशय बावळट आणि अतिकुजकट स्वभावाचे काय करावे??? - माझे सकाळी पोट साफ होत नाही, पण भूक मात्र कचकून लागते. मी काय करावे?????????? - माझा एक आयडी फार काळ टिकत नाही आणि मला सभ्य लिहिता येत नाही. मी काय करावे???????????? - माझा वेळ जाता जात नाही आणि मला कोणतेही काम न करता टीपी करायची सवय लागली आहे. मी काय करावे????????
  • Log in or register to post comments
व
वरुण मोहिते Wed, 11/30/2016 - 10:59 नवीन
मी शिकवतो दादागिरी कशी करायची . खूप केली आहे :) अवांतर - असल्या धाग्यांवर येत नाही कधी पण खरंच कोणी सल्ला मागणारा असेल त्यालाही प्रॉब्लेम होईल पुढे हे तरी लक्षात ठेवा .
  • Log in or register to post comments
इ
इनू Wed, 11/30/2016 - 12:19 नवीन
लोणचं
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Wed, 11/30/2016 - 14:33 नवीन
You all are still on this thread??? मिपाकरांच्या अश्या स्वभावाचे काय करावे?
  • Log in or register to post comments
D
Deserter Wed, 11/30/2016 - 14:42 नवीन
तुम्ही jaw muscle building करा कारण कमकुवत जबड्यातून असे विचार उद्भवतात ,थेट मेंदूशी सम्बंध :))
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Wed, 11/30/2016 - 15:36 नवीन
Image removed. टर्बोपंत, तुमच्या आधीच्या धाग्याविषयी संशय असूनसुद्धा अनेकांनी आपलेपणाने लिहीले, परंतु आता मात्र सर्वांनाच शंका आहे. आधीच्या धाग्यात सुचवलेले उपाय तुम्ही अमलात आणत आहात का, त्यात प्रतिसादकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही दिलीत का, हे आधी बघा, आणि एकेका धाग्यात एकेक समस्या मांडण्यापेक्षा एकाच धाग्यात तुमच्या एकूण एक ज्या काही समस्या/विचारणा आहेत त्या मांडा, म्हणजे तुमच्याविषयी समग्र आकलन होईल. अर्थात हे सर्व जर तुमच्या समस्या वगैरे खरोखरीच्या असतील, तरच. मिपाकरांची फिरकी घेण्यासाठी हे सर्व आहे असे लक्षात आले तर यापुढे कुणीही प्रतिसादही देणार नाही आणि धागा उघडूनही पाहणार नाही. तुम्ही जर खरोखर प्रांजळपणे सल्ला मागत असाल, तर तुमचे खरे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, तसेच तुम्ही ज्या मानसोपचार तज्ञाचे उपचार घेत आहात, त्यांचे नाव आणि संपर्क पाठवा. याप्रमाणे तुम्हाला जर करायचे नसेल तर तुमचा धागा यापुढे अनेक मिपाकर उघडूनही बघणार नाहीत, याची खात्री बाळगा. व्हा बरे लवकर.
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Wed, 11/30/2016 - 19:52 नवीन
मेलो! फुटलो! कामातून गेलो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
स
सुबोध खरे गुरुवार, 12/01/2016 - 07:20 नवीन
I used to have schizophrenia but now both of us are OK
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
प
पुंबा गुरुवार, 12/01/2016 - 17:46 नवीन
हाहाहा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सिरुसेरि Wed, 11/30/2016 - 15:57 नवीन
लांडगा आला रे आला या कथेची आठवण झाली .
  • Log in or register to post comments
अ
अजया Wed, 11/30/2016 - 16:59 नवीन
संपवा आता हा अवतार.नवे नाव काय घेतलेय? नाॅनचार्ज्ड ढिलासाॅफर?
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Wed, 11/30/2016 - 17:48 नवीन
तुमचे खरे नाव आणि पत्ता द्या. औषध पाठवते!
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 12/01/2016 - 01:00 नवीन
आता तुम्हीपण पत्ता मागता??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
अ
अनन्त अवधुत गुरुवार, 12/01/2016 - 02:22 नवीन
पर्याय अ) तुमच्या गावात प्राणिसंग्रहालय असेल तर सिंहाच्या जबड्यात हात घाला त्याने तुमचा भिडस्तपणा जाईल. सिंहाने हात खाल्ला तर डोळ्यातून पाणी काढायचे नाही, म्हणजे तुमचा हळवेपणा पण जाईल. आणि हे करताना सेल्फी काढून त्याचे फेसबुक आणि व्हाट्सअँप वर प्रोफाईल पिक्चर लावा. ते झाल्यावर उंच उडी मारून उंटांचा मुका घ्या. त्याच्या गालाचा घेतला तर उत्तम. आणि हे करताना सेल्फी काढून त्याचे ... पर्याय ब) तुमच्या गावात प्राणिसंग्रहालय नसेल तर लाल मुंग्यांच्या वारुळात हात घालून एक मुंगी बाहेर काढा. एकही मुंगी मरायला नको. आणि हे करताना सेल्फी काढून त्याचे .... गाढवाच्या मागे उभे राहून त्याला गुदगुल्या करा, गाढव हसले पाहिजे. ते सेल्फीचे विसरू नका. आणि हे करताना सेल्फी काढून त्याचे .... तुम्ही अ किंवा ब पैकी दोन गोष्टी जर तुम्ही करू शकलात तर तुम्हाला कसल्याही गोष्टीची काहीही भीती बाळगायचे कारण नाही. तुम्ही अ आणि ब करू शकलात तर तुमच्यासारखे तुम्हीच. काहीच नाही करू शकलात तर.. तरी पण तुमच्यासारखे तुम्हीच. हे सगळे वाचताना आणि करताना तुम्ही किती शूरवीर, दिलेर आणि जाँबाज आहेत याचा तुम्हालाच प्रत्यय येईल. [टीप]: स्वत:च्या जबाबदारीवर हे उपाय करावेत.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 12/01/2016 - 05:24 नवीन
इतके सगळे करण्यापेक्षा बायकोला "तुला जेवण आज्जीबात जमत नाही" असे सांगा...काठिण्य पातळी वाढवायची असेल तर त्यानंतर "आईच्या हाताच्या जेवणाची सर कश्शालाच नाही" हे सुद्धा म्हणा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त अवधुत
स
साहना गुरुवार, 12/01/2016 - 06:31 नवीन
Image removed. Image removed. https://www.youtube.com/watch?v=Wgs-UEgXqQM
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा