Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माझ्या अतिशय भित्रट आणि अतिहळव्या स्वभावाचे काय करावे???

ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर
Tue, 11/29/2016 - 18:39
🗣 53 प्रतिसाद
माझं व्यवहार ज्ञान खूप कमी आहे ,आणि माझं डोकं चालत नाही या विषयी मी मागच्या लेखात लिहीले होते.माझ्या व्यक्तीमत्वातले दोष मी जेव्हा शोधतो तेव्हा मला माझा बिंडोकपणा जास्त खटकतो.त्यानंतर मला माझ्या व्यक्तीमत्वात जास्त खटकणारी गोष्ट आहे ती म्हणजे माझा अतिशय भित्रट स्वभाव व अतिशय हळवेपणा. झाडाचं पान अंगावर पडल्यावर ' आभाळ कोसळलं ' म्हणून जंगलभर सैरावैरा पळणारा गोष्टीतील ससाही माझ्यापेक्षा धीट असेल इतका मी भित्रट आहे.आधीचाच असलेला ठार बिंडोकपणा त्यात हा भित्रट स्वभाव माझ्या दैनंदीन व्यवहारातील अडचणीत भरच टाकत असतो.या भित्रट स्वभावामुळे मी एकदा अडचणीत सापडलो होतो.एका गुंड स्वभावाच्या व्यक्तीशी पार्कींगमध्ये थोडा मॅटर झाला होता .मी लागलीच माफी मागितली ,पण त्या गुंडाने मला डोक्यात जबर फाईट मारली,काही दिवस मला त्यामुळे जिभ जड झाल्याचा अनुभव आला होता .माझं बोलणं sluggish झालं होतं. तर असा हा भित्रा स्वभाव आहे,यातही भर म्हणून की काय ,मी अतिशय हळवा देखील आहे.कुणी जरा टोचून बोललं की माझ्या मनाला लागतं,बराच काळ मी त्या विचारात राहतो,रडायलाही येते.टिका सहन होत नाही. आजुबाजुला काही घडले ,वर्तमानपत्रातल्या खून ,बलात्काराच्या बातम्या वाचल्या,रस्त्यावरच्या बेवारस प्राण्यांचे हाल बघितले की मी फार व्यथीत होतो. तर माझे काही प्रश्न आहेत.आंतरजालावरच्या धुरीणांनी मार्गदर्शन करावे. १. अतिशय भित्र्या व भिडस्त स्वभावाचे काय करावे? २. अतिहळवेपणावर कशी मात करावी? ३. वैयक्तीक ,सामाजिक ,आर्थिक प्रगतीत अडसर ठरणार्या या अतिशय भित्रट आणि हळव्या स्वभावाचा मला कंटाळा आला आहे! कृपया मार्गदर्शन करावे.
वर्गीकरण
सामाजिक

प्रतिक्रिया द्या
11925 वाचन

💬 प्रतिसाद (53)
द
दीपक११७७ गुरुवार, 12/01/2016 - 10:40 नवीन
१. तुम्ही जुन्या पध्दीने दिलाजाणारा एनिमा भर चोकात घ्यावा. किंवा २. शक्य असल्यास डुकरची विष्ठा वाळवुन, छोटे केक बनवुन सकाळी आणि संध्याकाळी गोमुत्रा सोबत खावी
  • Log in or register to post comments
र
रुस्तम गुरुवार, 12/01/2016 - 13:46 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दीपक११७७
द
दीपक११७७ Fri, 12/02/2016 - 07:25 नवीन
माझी वरिल प्रतिक्रिया ही एक गमंत समजवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दीपक११७७
  • «
  • ‹
  • 1
  • 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा