अरेंज्ड मॅरेज! हे स्त्रीचे वस्तुकरण नाही काय!!!!
अरेंज मॅरेज हा आपल्याकडील एक व्यवस्थीत स्थापीत झालेला प्रकार आहे.इतका की लग्नाचा जोडीदार शोधायचा हाच सर्वोत्तम प्रकार आहे हे आपल्या मानसिकतेत घट्ट रुजले आहे.मी नुकताच जेव्हा वयात येत होतो तेव्हा मला हे अरेंज मॅरेज प्रकरण फार रोमॅण्टीक वाटायचे.मुलगा मुलगी एकमेकांना बघतात,एकमेकांशी बोलतात ,एकमेकांना समजुन घेतात हे भारी वाटायचे .
पण हा भ्रमाचा भोपळा फुटला ,जेव्हा मी माझ्या मावसभावाच्यावेळी " बैठकीला " गेलो होतो.बैठक होती संगमेश्वरला.आम्ही मुलीच्या घरी गेलो होतो.इकडतिकडच्या गप्पाटप्पा झाल्यावर उपवर मुलगी पोहे आणि चहा घेऊन आली.ती आल्यावर् आमच्या बाजूचे सगळे बायाबाप्ये तिच्याकडे बघायला लागले.तिचे नजर खाली झुकली.मावसभावाचे वडील तिला बस म्हणाले,तेही तिला ऐकायला गेले नाही इतकी ती कावरीबावरी झाली होती.आमच्या बरोबर जे पुरुष मंडळी होती ते तिला अगदी नखशिकांत स्कॅन केल्यासारखी बघत होती.मावसभाऊ तर हे ' मटेरीयल' आपल्याला सुट होईल का या नजरेतून बघत होता.तिने नंतर चेहरा वर करुन नुसतेच हसल्यासारखे केले.काय न्हवतं तिच्या नजरेत? आपण बाजारात ठेवलेली वस्तु आहोत इथपासुन ते आपले झालेले / होत असलेले "वस्तुकरण या सर्व भावना तिच्या डोळ्यात दिसत होत्या.मलाच ते बघुन कसे तरी वाटायला लागले.काहीतरी निमित्त करुन मी बाहेर गेलो.
पण विचारात पडलो . ही कसली पद्धत लग्न ठरवायची? अरेंज मॅरेज या प्रकारात लगेच लग्न ठरत नाही.असे अनेक " दाखवायचे "कार्यक्रम उपवर मुलिंना पार पाडायला लागतात.काय वाटत असेल त्यांच्या मनाला? कुणीतरी तरी अनोळखी लोक बघायला येणार आहेत,त्यांच्यासाठि नैसर्गीक लाज,विनय,स्वत्व बाजुला ठेऊन त्यांच्यासमोर परफेक्ट वाईफ मटेरीयल आहोत हे दाखवण्यासाठी आटापीटा करायचा.की स्त्री जन्मा तुझी ही कहाणी ' म्हणत गप्प वडीलधार्यांच्या ईशार्यावर स्वतःचे वस्तुकरण करुन घ्यायचे?
हे कुठे तरी थांबायला पाहीजे असे वाटते.यात प्रमुख अडसर जातीव्यवस्थेचा आहे हे मान्य.तरुण तरुणींनी ही असली रानटी पद्धत फाट्यावर मारुन सर्रास लव मॅरेज करावे.ज्यांच्यात गट्स नाहीत व जातीतच लग्न करायचे आहे अश्यांनी फक्त एक्सक्लुजीव तरुण तरुणीचे मेळावे भरवावेत ,तिथे कटाक्षाने म्हातारी खोंड असु नयेत.अश्या मेळाव्यांद्वारे मैत्री व्हावी ,पुढे आपआपल्या पसंतीच्या मुला मुलीशी आपणच जमवावे व मग लग्न करावे.हे मला जास्त संयुक्तीक वाटते.
आपल्याला काय वाटते??
💬 प्रतिसाद
(58)
ग
गॅरी ट्रुमन
Fri, 12/09/2016 - 13:04
नवीन
तुमची आज्ञा शिरसावंद्य मानून मी नेमके हेच केले होते :)
- Log in or register to post comments
इ
इरसाल कार्टं
Sat, 12/10/2016 - 11:16
नवीन
मी हि त्याच माळेचा मणी.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Mon, 12/12/2016 - 13:44
नवीन
;)
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Fri, 12/09/2016 - 13:33
नवीन
हा हा हा
टर्बोचार्ज्ड फिलॉसॉफर राव , तुम्ही काय नायट्रो बुस्टर लाऊन घेतला की काय ? काय एक से एक अफलातुन धागे येत आहेत ! एकच नंबर =))))
बाकी आम्हाला तर वाटते की लग्नसंस्था ही मुळातच अत्यंत रीडंडंट संस्था आहे , लग्न ही भानगडच नको ! लग्नविधीची मुळ संहिता काढुन पाहिलीत तर त्यातील क्लॉजेस किती भयानक रित्या बायंडिंग आहेत हे लक्षात येते.
(अन वाईट म्हणजे इथे स्टॅट्युटरी वॉर्निंगही नसते अशी Mutual Fund investments are subject to market risk. Please read the offer document carefully before investing'. )
प्रजोत्पादन व्यक्तीगत कन्सेंटने व्हावे प्रॉपर लीगल & कॉन्ट्रॅक्चुअल. मुलांची जबाबदारी ही म्युचुअल कन्सेंट्नेच ठरावी आणि वारसा हक्क ही वैयक्तिक इच्छेने ठरावा .
राजसत्तेने आणि धर्मसत्तेनेही लोकांच्या व्यक्तिगत आयुष्यात ढवळाढवळ करु नये !
आमच्या ओशो सरांचा मॅरेज & चिल्ड्रेन हा व्हिडीयो नक्की पहा , त्यांच्या मताला आमचे १००% अणुमोदन आहे !
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Fri, 12/09/2016 - 14:26
नवीन
अर्र... कल्ल्ला धागा!
आपल्यालापण हे दाखवण्याचे आयटम पहिल्यापासून पटत नाहीत. स्त्रियांचे वस्तुकरण अगदी योग्य शब्द आहे ह्याला. पुरुषांचेही 'काहीतरीकरण' (गिर्हायकीकरण?) होतेच. फालतूपणा दोघांनाही झेलावा लागतो आहेच.
धागा वधुवरांच्या अपेक्षा ह्या धाग्याच्या वळणावर जाउ देऊ नका मंडळी...
- Log in or register to post comments
इ
इरसाल कार्टं
Sat, 12/10/2016 - 11:18
नवीन
बरोबर.
- Log in or register to post comments
व
विवेकपटाईत
Fri, 12/09/2016 - 14:50
नवीन
म्हणून मी मुलगी पहिली नाही, आईने ठरवलेल्या मुलीशी लग्न केले. ३० वर्ष झाले संसार सुखाचा आहे. बाकी आमच्या घरात अर्थात नवीन अर्थात पुढच्या मुलांनी स्वत: वर/वधु निवडले. हिमाचल ते गुजरात, जैन ते गुजर, सुनार सर्वांशी नाते जुळले. खर्या अर्थाने भारतीय परिवार झाला. अर्थात हिंदी हि भाषा आपसूक घरातली भाषा झाली.
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Fri, 12/09/2016 - 15:06
नवीन
यू आर मिसिंग द पॉईंट, काका. तुम्ही नाही तरी तुमच्या आईने मुलगी 'बघितली'च ना? किंबहुना त्रयस्थाने मुलगी बघण्यामध्ये वस्तुकरण जास्तच होईल.
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
Fri, 12/09/2016 - 20:02
नवीन
आता मुलगी कुण्णी कुण्णी अज्जिबात बघायचीच नाही, तर मग 'लव मैरिज' तरी कसे होणार ????
पण आहे, यावरही तोडगा आहे, आपल्या महान पूर्वजांनी हा देखील प्रश्न अत्यंत कल्पकतेने आणि यशस्वीपणे सोडवलेला आहे. जन्मांध धृतराष्ट्राला मुलगी 'बघणे' शक्यच नव्हते. त्याच्यासाठी भीष्माने गांधार देशी जाऊन, शुल्क देऊन गांधारीला आणले. तिने सुद्धा हा न बघण्याचा फंडा पाळता यावा, म्हणून आजन्म डोळ्यांस पट्टी बांधून घेतली. विवाहाचा मुख्य हेतु जो संतानोत्पत्ती, त्यात तर त्यांनी विश्वविक्रम स्थापित केला... धन्य ती आर्य संस्कृती, आणि तिचे पाईक.

- Log in or register to post comments
व
वरुण मोहिते
Fri, 12/09/2016 - 15:38
नवीन
डोळ्यात अंजन टाकणारे लेख लिहिणारे टफी ह्यांचं जाहीर कौतुक .:)))
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Fri, 12/09/2016 - 16:45
नवीन
टफि,
मुलगी बघणे या प्रकारचा रचितविवाहाशी (अॅरेंज्ड मॅरेज) सुतराम संबंध नाही. दोन्ही एकत्र घडंत असल्या तरी दोहोंचा एकमेकींशी काहीही संबंध नाही. बायको करायला सोबत दुनियेस निमंत्रण कशास हवं?
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Fri, 12/09/2016 - 17:10
नवीन
दादा, तो काळ गेला. बाजू पलटली आहे आता =))
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Fri, 12/09/2016 - 19:36
नवीन
मुलाच्या घरी सगळ्या ताया, काकवा, मावश्या जमल्या आहेत आणि त्यांच्यासमोर मुलगा चहा आणि पोहे घेउन येतोय. असे चित्र डोळ्यासमोर तरळून गेले. :)
खरं तर असा कार्यक्रम करायला हरकत नसावी.
रच्याकने - आजकाल हे सर्व दाखवादाखवी चे कार्यक्रम औपचारीक असतात. चेपू आणि व्हॉट्सअॅपच्या जमान्यात व्हर्च्यूअल बघाबघी आधीच होत असते. कीत्येकदा बाहेर एकमेकांना भेटूनसुध्दा होते.
- Log in or register to post comments
स
सूड
Tue, 12/13/2016 - 10:20
नवीन
तुम्ही देखील भावं विश्वं सुरु करायच्या विचारात आहात का काय?
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Tue, 12/13/2016 - 12:21
नवीन
=))
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Fri, 12/09/2016 - 17:14
नवीन
"आयडीचे अतीड्युआयडिकरण" आणि "धाग्यांचे अतीप्रसवीकरण" हे पण निषेधार्ह आहे !
आधिच एकामागोमाग इतके धागे काढले आहेत तर या विषयांवरही धागे काढा. मिपा आहे घर्च, होऊ द्या खर्च ! ;)
- Log in or register to post comments
स
साहना
Sat, 12/10/2016 - 00:23
नवीन
अरेंज मॅरेज हे स्त्रीचे वस्तूकरण आहे ह्यांत शंका नाही पण त्यात गैर काय आहे मला समजत नाही. तुम्हाला त्यांत नैतिक दृष्ट्या काही वाईट वाटत असेल तर तुम्हाला (कुठल्याही वधू पित्याला) तुमच्या मुलीचे लग्न करायला कुणीही जबरदस्ती केलेली नाही. तुम्ही स्वतःहून तुमच्या आणि तुमच्या मुलीच्या स्वार्थासाठी तिचे वस्तूकरण करून लग्न लावून देत आहात.
तुम्हाला दाखवायचा वगैरे प्रोग्रॅम नको असेल तर आपल्या मुलीपेक्षा ५०% कमी कमावणाऱ्या, शिक्षण कमी असणाऱ्या पण निर्व्यसनी अश्या गरीब मुलाला मुलीचे स्थळ न्या. दाखवायचा वगैरे प्रोग्रॅम होणार नाही असे ठणकावून सांगा. तुम्हाला तुमची मुलगी पसंद करणारा एक तरी गरीब मुलगा १००% मिळेल. पण बहुतेक वाढू पिता आणि त्यांच्या मुली स्वार्थी असतात. त्यांना गब्बर पैसे कमावलेले मोठ्या घरांतील मुलगे हवे असतात. म्हणून मुलीचे वस्तूकरण करण्याची त्यांची हौस असते.
वधुपिते आपण जणू काही अलोक नाथ आहोत असा आव आणतात पण प्रत्यक्षांत ह्यांना गरीब, प्रामाणिक मुलां पेक्षा भरपूर पैसा असणाऱ्या मुलांसाठी स्पर्धा करायची असते त्यामुळे ह्या स्पर्धेत हे वस्तूकरण साहजिकच आले.
*** वस्तूकरणांत वाईट काय आहे ? ****
हे मला अजून समजत नाही. IT आउटसोर्सिंग मध्ये असलेल्या लोकांना "रिसोर्स" म्हणून संबोधले जाते. हे वस्तूकरण नाही का ? आपल्याला रिसोर्स संबोधिले म्हणून कुणी कधी नोकरी सोडून गेलीय का?
गर्भ लिंग निदानावर बंदी घातलीय. कारण काय तर म्हणे लिंग-प्रमाण कमी होते. इथे सर्व स्त्री जातीला फक्त एका आकड्यातील "numerator" म्हणून संबोधित करणे अतिशय खालच्या पातळीचे वस्तूकरण नाही का ?
सरकारी आणि इतर सामाजिक जाहिरातीत ढासळत्या लिंग-प्रमाणाचे धोके सांगितले जातात:
धोका क्रमांक एक : "हे असच चालू राहिलं तर लग्नाला स्त्रिया मिळणार नाहीत"
धोका क्रमांक २: "स्त्रिया नाहीश्या झाल्या तर पुरुषांना जन्म कोण देणार ? "
थोडक्यांत संपूर्ण स्त्री जातीचे "लग्नाला वधू" आणि "मुले (ती सुद्धा पुरुष) जन्माला घालण्याचे मशीन" असे समाजमान्य पद्धतीने वस्तूकरण करताना सरकारी लोकांचा आणि इतर स्त्रीमुक्तीवादी लोकांचा धर्म कुठे चरायला जातो ? चुकूनच एखादी जाहिरात अशी येते कि लहान मुलीला नर्स, डॉक्टर, शास्त्रद्न्य वगैरे व्हायचे आहे तिची स्वप्ने पूर्ण करण्याची तिला संधी देणे हि समाजाची जबाबदारी आहे म्हणून कदाचित भ्रूण हत्या चुकीची आहे (गर्भ पुरुष असला तरी सुद्धा हि हत्या तितकीच चुकीची आहे).
बहुतेक सर्व महिला आपला फायदा होतो तेंव्हा वस्तूकरण स्वखुशीने करून घेतात. पण आपले नुकसान होताना मात्र समाजाला पुरुषप्रधान म्हणून नाव ठेवून ठेवून मोकळी होतात.
भरूपर बोल्ड सिन आणि अंगप्रदर्शन करून रग्गड पैसा आणि प्रसिद्धी कमावलेल्या तारका आणि मॉडेल्स वृद्धापकाळी मात्र "स्त्री-हक्क", "वस्तूकरण" असल्या गोष्टीविषयी बोलायला लागतात.
प्रसिद्धी आणि लोकप्रियतेच्या शुक्रवार असताना पामेला अँडरसन (प्रसिद्धीच्या शिखरावर असताना ती काय करत होती हे इथे लिहीत नाही)
पॉर्न उद्योगविरोधांत बोलणारी पामेला
"वस्तू-करण" हा शब्द स्त्री हक्का साठी लढणार्या लोकांनी आणलेला नाही तर त्या उलट स्त्री सुधारणांचा आव आणणाऱ्या डाव्या सोशलाईट लोकांनी आणलेला आहे. आपल्या सारख्या सामान्य लोकांनी असल्या प्रोपोगांडा कडे दुर्लक्ष केलेलेच बरे.
स्त्री ला जे काही वाईट सहन करावे लागते त्या सर्वांत पुरुषांचाच दोष आहे किंवा पुरुषप्रधान संस्कृती जबाबदार आहे किंवा इतर लोकांचा दोष आहे असे सर्रास काही स्त्री हक्क वादी दाखवतात. "वस्तूकरण" हा अश्याच लोकांचा एक बागुलबुवा आहे. आणि हे वस्तूकरण जणू काही फक्त स्त्रियांनाच लागू होते पुरुषांना लागू होत नाही.
हि आहे रोज मेकगावं हि अचानक स्त्री-मुक्ती साठी स्त्री-वास्तुकरणाच्या विरोधांत काम करतेय
कारण ? साधय ती अशी दिसतेय
कॉस्मोपॉलिटन मॅगझीन
हिच्या दृष्टीने मरणारे तरुण कोवळ्या पुरुषांची काहीही किंमत नाही. स्वतः च्या फायद्या साठी काहीही

- Log in or register to post comments
स
सामान्य वाचक
Sat, 12/10/2016 - 03:08
नवीन
हा प्रतिसाद वाचनीय आहे
100 टक्के सहमत
- Log in or register to post comments
स
सामान्य वाचक
Sat, 12/10/2016 - 03:13
नवीन
,,
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
Sat, 12/10/2016 - 05:18
नवीन
थोडासा बोल्ड पण खूप छान प्रतिसाद! खरंच फायद्यासाठी सरसकट सगळीकडे "पुरुषी मानसिकता" यावर बोट ठेवणाऱ्यांची कीव येते.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sat, 12/10/2016 - 05:47
नवीन
साहना ताई
हा असा प्रतिसाद देणं म्हणजे बुर्ज्वा, प्रतिगामी, स्त्रीस्वातंत्र्य विरोधी म्हणून स्वतःवर शिक्का मारण्यासारखे आहे.
- Log in or register to post comments
भ
भक्त प्रल्हाद
Sat, 12/10/2016 - 06:07
नवीन
साहना ताई
बढिया हय!
एक नंबर प्रतीसाद!
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sat, 12/10/2016 - 10:03
नवीन
ह्या साठी एक कडकडीत सॅल्यूट!
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
Sat, 12/10/2016 - 00:45
नवीन
@साहना: एकदम खणखणीत रोखठोख प्रतिसाद.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sat, 12/10/2016 - 03:23
नवीन
कचकून समर्थन....
- Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया
Sat, 12/10/2016 - 07:40
नवीन
मस्त प्रतिसाद साहनाजी
पूर्णपणे सहमत
- Log in or register to post comments
स
सिरुसेरि
Sat, 12/10/2016 - 08:24
नवीन
अरेंज्ड मॅरेज मध्ये डस्टबीन ची अट मांडता येते हा एक फायदा आहे .
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sat, 12/10/2016 - 08:40
नवीन
साहना,
प्रतिसाद दणकून आहे. :-)
बहुतेक तुम्हाला सोशलाईटच्या जागी सोशालिस्ट म्हणायचं होतं. अशांना फेमिनाझी म्हणतात.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
M
mayu4u
Sat, 12/10/2016 - 14:25
नवीन
आता १०० नक्की!
- Log in or register to post comments
स
साहना
Mon, 12/12/2016 - 10:27
नवीन
नाही हो. मला `सोशलाईट` च म्हणायचे होते. आपला तर्क अगदीच चुकीचा नाही सोशालिस्ट लोक सुद्धा अनेकदा फेमिनाझी वर्गांत मोडतात.
so·cial·ite > a person who is well known in fashionable society and is fond of social activities and entertainment.
म्हणजे थोडक्यांत शोभा डे सारखी लोक.
- Log in or register to post comments
ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर
Sat, 12/10/2016 - 08:48
नवीन
साहना,प्रतिसाद छान आहे .नंतर विस्ताराने लिहीतो.
- Log in or register to post comments
स
सामान्य वाचक
Sat, 12/10/2016 - 13:27
नवीन
,
- Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 12/13/2016 - 10:27
नवीन
=)) =))
- Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके
Sat, 12/10/2016 - 14:47
नवीन
जी काही वस्तू घ्यायची ती नीट पारखुन घ्यावी म्हणजे झालं.
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Sun, 12/11/2016 - 06:59
नवीन
हम्हेच, हेच ते...
- Log in or register to post comments
अ
अफगाण जलेबी
Sun, 12/11/2016 - 10:03
नवीन
त्यामुळे वस्तूकरण हे होतंच. पण ते arranged marriage मध्येच होतं आणि Love Marriage मध्ये सगळं काही उदात्त असतं हा गैरसमज आहे. Arranged marriage मध्ये मुलगा/मुलगी आणि त्याच्या/तिच्या घरचे सगळे बघतात. Love Marriage मध्ये फक्त मुलगा/मुलगी बघतात एवढाच काय तो फरक आहे. आणि वस्तूकरण होतं म्हणजे नक्की काय? समोरच्या व्यक्तीचा एक माणूस म्हणून विचार केला जात नाही, एवढंच ना? लग्न करुन घरात जाणारी मुलगी सुद्धा ' इथे माझा फायदा झाला पाहिजे ' असाच विचार करत असते. जेव्हा सगळेच जण market मध्ये आल्यासारखा विचार असतील तर कुणा एकाचा विचार चुकीचा आहे असं कसं म्हणता येईल?
- Log in or register to post comments
क
कायरा
Sun, 12/11/2016 - 10:28
नवीन
सगळ्याच मुली मनाजोगा वर निवडून त्याला पटवण्याइतक्या हुशार नसतात. काहींना हवा असणारा मुलगा मिळतसुध्दा नाही.त्यांचे प्रयत्न चालू असतात पण त्यात त्या यशस्वी ठरत नाहीत. कुठेतरी वडीलांना असणारा कमी पगार, स्लम वस्तीत असलेले घर, कमी उत्पन्नामुळे चेहर्यावर आलेला फिकटपणा, चांगले ड़्रेस अप नसल्यामुळे आलेला गबाळेपणा या गोष्टींचासुध्दा लग्न करताना विचार होतोच. अस जरी असले तरी त्या मुलीलाही लग्न करायचे असते. मग अशांनी जायचे कुठे? त्यामुळे मुलींनाही आपल्यासाठी कुणी एखादे चांगले स्थळ आणावे असे वाटणे स्वाभाविक आहे. इथेच अरेंज मॅरेजची सुरवात होते. कुणाला लग्न करायचे आहे, कुणाला नाही हे रस्त्यावर उभे राहून कसे काय कळणार? मग त्यासाठी घरी एकत्र येऊन बघून जाणे यात गैर काय आहे? सगळ्यांसाठी कांदेपोहे केले आणि एवढे करूनही लग्न नाही जमले म्हणून त्यात वाईट वाटण्यासारखे काय आहे? पुन्हा दुसर्या मुलाला पाहण्यासाठी कांदेपोहे करायचे. कांदेपोहे हे नेहमीच स्वस्त पडणार पण निर्णय चुकला तर तो खूप महाग पडणार म्हणून जोपर्यंत मनाजोगा मुलगा मिळत नाही तोपर्यंत बघण्याचा कार्यक्रम करणे हे जरी अप्रिय असले तरी अटळ आहे.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sun, 12/11/2016 - 10:52
नवीन
वधुवर मेळावे भरतात आजकाल, तिथे फक्त मुलगा व मुलगी यांनाच प्रवेश असावा, भेटू देत एकमेकांना तिथेच. पटलं तर घरी गोष्ट न्यायची,
घरी दाखवण्याचे कार्यक्रम बंद व्हायला हवेत
- Log in or register to post comments
अ
अफगाण जलेबी
Sun, 12/11/2016 - 11:17
नवीन
अापला प्रामाणिकपणा वेगळा सिद्ध करावा लागत नाही. मुलगी/मुलगा स्वतःच्या घरी जास्त comfortable असतात. विचार करा - एक क्ष मुलगी मेळाव्यात एका य मुलाशी बोलते आहे आणि दुस-या क या मुलाने ते पाहिलं. नंतर क्ष आणि य यांचं काही कारणाने जमलं नाही अाणि क आणि क्ष भेटले. क अाणि क्ष यांनी एकमेकांना नाकारण्याची शक्यता जास्त. घरी येणारे पर्याय हे बाहेर एखाद्या मेळाव्यात भेटणाऱ्या पर्यायांपेक्षा कमी असतात आणि तिथे निवड करुन बोलणी पुढे जाण्याची शक्यताही जास्त असते. जेव्हा जास्त पर्याय उपलब्ध असतात तेव्हा गोंधळ उडून कुठलाही निर्णय न घेतला जाण्याची शक्यता जास्त असते.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sun, 12/11/2016 - 12:53
नवीन
आपण आपलाच प्रतिसाद परत एकदा शांतपणे वाचावा, अन्यथा मी उत्तर देतोच! :)
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
Tue, 12/13/2016 - 11:10
नवीन
वधुवर मेळावे भरतात आजकाल, तिथे फक्त मुलगा व मुलगी यांनाच प्रवेश असावा, भेटू देत एकमेकांना तिथेच. पटलं तर घरी गोष्ट न्यायची,
छे. तेदेखील वस्तूकरणच आहे. शॉपिंग मॉल मधे जाऊन शर्ट घेण्यासारखेच.
लौ मेरेज पण बर्यापैकी वस्तूकरणातच मोडते.
त्यापेक्षा काही आदिवासी जमातींमधील 'एकत्र राहून पाहा' आणि 'पसंत करा' हा दॄष्टीकोन जास्त प्रागतिक आहे.
निदान या बाबतीत, खर तर त्यांना आदिवासी न म्हणता रुढ नागर समाजालाच आदिवासी म्हणायला पाहिजे.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Tue, 12/13/2016 - 11:16
नवीन
आपल्याला तर ते आदिवासी पद्धतच पटते पण जौदे, नै झेपत आधुनिक नागर समाजाला.
बाकी लौ मेरेज वस्तुकरणात कसे मोडतं ते कै कल्लं नै? (काडी रहेगा तो रेन्दो)
- Log in or register to post comments
अ
अफगाण जलेबी
Sun, 12/11/2016 - 11:25
नवीन
सगळे प्रेमविवाह हे चांगले आणि arranged marriages हे सगळे रानटी आणि वाईट हे दाखवण्याचा जो चंग बांधलेला आहे त्यालाच विरोध आहे. सर्व प्रेमविवाह उदात्त नसतात आणि सर्व रचितविवाह राक्षसी नसतात. स्वतःला आलेल्या एका अनुभवावरून ' हे असंच होत असणार सगळीकडे ' म्हणून आरडाओरडा करणारे पुरूष आणि साहनाताईंनी भंडाफोड केलेल्या फेमिनाझी स्त्रिया यांच्यात गुणात्मक फरक काहीही नाही. आततायी extrapolation हा दोघांमधला सामायिक मुद्दा आहे.
- Log in or register to post comments
व
वरुण मोहिते
Sun, 12/11/2016 - 12:20
नवीन
अश्या समतोल प्रतिसादांसाठी.
बाकी वधू वर मेळ्यांमध्ये लोकांच्या नजरा अत्यंत चांगल्या असतात का??
जाता जाता बुद्धिमान लेखकांचे आभार .
चर्चा होत आहे हे हि नसे थोडके .
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sun, 12/11/2016 - 12:51
नवीन
वधू वर मेळाव्यांचा कै अनुभव नै,
वाईट नजर असणे जागेवर अवलंबून नसते भौतेक! ;) :)
बाकी, आजच्या पुढारलेल्या काळात जे लोक स्वतःचा जीवनसाथी स्वतः शोधू शकत नाहीत त्यांच्याबद्दल फार वाईट वाटतं. 'अनेक (ठिसूळ) कारणं देऊन तसं होण्याला समर्थन मिळू नये' असंच वातावरण कायम राहावं अशा विचारात मंडळी दिसतात.
परदेशात हे दाखवण्याचे कार्यक्रम होतात काय?
- Log in or register to post comments
र
रेवती
Mon, 12/12/2016 - 03:54
नवीन
अगदी होतात. आपल्याकडे असते तसे सगळेजण मुलीकडे, मुलाकडे पहातही असतील पण असे वाटत नाही की पापणीही लवत नसतील. आईवडीलांनी, काकाकाकूंनी किंवा कोणीही ओळख करून देणे व यातून भविष्यात काही होऊ शकेल का हे त्या मुलगा व मुलीला ठरवू देणे असे स्वरुप मी तरी ऐकून आहे. आर्थिक उलाढाल फारशी नसावी म्हणून लोकांचे इंटरेस्ट मर्यादित रहात असावेत.
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
Tue, 12/13/2016 - 11:04
नवीन
बाकी वधू वर मेळ्यांमध्ये लोकांच्या नजरा अत्यंत चांगल्या असतात का??
चांगल्या नजरेने मुलगी किंवा मुलगा पसंत कसा करणार ?
मुळात चांगली नजर म्हणजे काय ?
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Tue, 12/13/2016 - 11:09
नवीन
चांगला प्रश्न आहे.
- Log in or register to post comments
व
वरुण मोहिते
Sun, 12/11/2016 - 13:01
नवीन
चर्च च्या माध्यमातून .. जेवढ्या जाती तेवढ्या प्रथा . असो मला पण वधू वर मेळाव्याचा अनुभव नाही:)))आम्ही लव्ह मॅरेज करणारे:)
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sun, 12/11/2016 - 13:26
नवीन
:)) मिलाव हाथ!
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »