Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नास्तिक विचार मंच!!!!

ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर
Tue, 01/03/2017 - 16:47
🗣 79 प्रतिसाद
मराठी संकेतस्थळांवर अनेक आस्तिकतेशी संबंध असणारे धागे आहे.कुठला तरी बापू,महाराज ,योगी,कुणी ब्रह्मचैतन्य कुणी काय अन काय.या सगळ्या आस्तिकीकरणात नास्तिकांचा आवाज कुठेच ऐकायला येत नाही,त्यासाठी हा प्रपंच. मी ही आस्तिक होतो,वयाच्या सोळाव्या सतर्याव्या वर्षांपर्यंत.पुढे थोडे समजायला लागल्यापासून आणि विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्यावर देव धर्म यातला फोलपणा व खासकरुन भारतीयांमधला भोळसटपणा लक्षात यायला लागला व हळूहळू मी /ठार नास्तिक झालो.देव नावचे अस्तित्वात नसलेले रसायन लोकांच्या अंगात कसे मिसळले आहे हे जाणवायला लागले.पुढे रिचर्ड डॉकीन्स या अवलिया वैज्ञानिकाची पुस्तक स्वरुपात ओळख झाल्यानंतर माझ्या आधीच्या विसंगत नास्तिक विचारांमध्ये एकसंधपणा आला .नास्तिकता ही मिरवता येते हे त्याने जगाला दाखवून दिले . असो,एका संशोधनानुसार नास्तिक लोक आस्तिकांपेक्षा जास्त हुशार असतात असे आढळून आले आहे. तर या धाग्यावर तुम्ही नास्तिक का आहात? नास्तिक का झालात ? हे थोडक्यात मांडावे. इथे लॉजिकल कारण सांगावे.अमुक बलात्कार झाला,देवदर्शनाला गेलेल्या भाविकांचा अपघात होऊन मृत्यु झाला म्हणून मी नास्तिक झालो वगैरे भावनिक आर्ग्युमेंट नकोत. धन्यवाद.

प्रतिक्रिया द्या
26683 वाचन

💬 प्रतिसाद (79)
आ
आदूबाळ Tue, 01/03/2017 - 17:15 नवीन
स्वामींचा एक दिवस दृष्टांत झाला. म्हणाले हो नास्तिक. मग काय...
  • Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद Tue, 01/03/2017 - 17:49 नवीन
हहपुवा!! :):)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
प
पुंबा Wed, 01/04/2017 - 06:21 नवीन
हाहाहा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
प
पैसा Wed, 01/04/2017 - 08:04 नवीन
मी कोण ते मलाच माहीत नाही. म्हसोबाला कौल लावून विचारते थांबा वाईच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
स
संजय क्षीरसागर Tue, 01/03/2017 - 17:55 नवीन
देव ही केवळ मानवी कल्पना आहे हा उलगडा झाला आणि निरीश्वरवादी झालो ! इतकी साधी गोष्ट, पहिल्यांदा लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करायचो . पण लोक्स त्यांच्या धारणांना सोडायला तयार नाहीत. पुन्हा त्यातनं इमोशनल इश्यूज व्हायचे आणि बरोबर असून एकटा पडायचो . मग म्हटलं जाऊं द्या झन्नममधे सगळं. आपला वेळ, पैसा आणि श्रम सगळेच वाचतायंत ना ? पब्लिकला काय करायचंय ते करू दे .
  • Log in or register to post comments
त
तिमा Tue, 01/03/2017 - 18:16 नवीन
आई-वडीलच पूर्ण नास्तिक होते. त्यामुळे त्यांनी पहिल्यापासूनच बुद्धिवादी विचारसरणी शिकवली. पुढे विज्ञान शाखेत गेल्यावर, आपले आई-वडील विज्ञान शाखेत न जाताही, किती हुशार आणि स्वतंत्र विचारांचे आहेत, हे कळले. त्यानंतर आयुष्यात कितीही संकटे आली तरी कधीही देवाचा धावा केला नाही आणि यापुढेही करणार नाही. माझ्यासारखे विचार करणारे खूपच कमी आहेत, त्यामुळे आपण अत्यंत अल्पसंख्य गटात मोडतो, याची जाणीव आहे. पण अलिप्तपणे या बाकीच्या प्रवाहपतित लोकांचे निरीक्षण करायलाही फार मजा येते, हे नमूद करावेसे वाटते.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 01/03/2017 - 18:21 नवीन
'ना' धाग्याच्या शीर्षकाचे पहिले अक्षर आहे. त्यामुळे 'ना' अक्षरापासून अंताक्षरीचा शुभारंभ करीत आहे. ना तुम हमे जाSSSने, ना हम तुम्हे जाSSSने मगर लगता है कुछ ऐसा, मेरा हमदम मिल गया 'या' अक्षर आलंय.
  • Log in or register to post comments
प
प्रान्जल केलकर Wed, 01/04/2017 - 04:33 नवीन
लाहोल मिळाकुवत आपके इस गाणे पार पहिला गाणा हमाराच गोर फर्माइये गाणे के अलफाज है या जणमावर या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे चंचल वारा, या जलधारा, भिजली काळी माती हिरवेहिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती फुले लाजरी बघुन कुणाचे हळवे ओठ स्मरावे रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणी ही केली ? काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे बाळाच्या चिमण्या ओठांतुन हाक बोबडी येते वेलीवरती प्रेम प्रियेचे जन्म फुलांनी घेते नदिच्या काठी सजणासाठी गाणे गात झुरावे या ओठांनी चुंबुन घेइन हजारदा ही माती अनंत मरणे झेलुन घ्यावी इथल्या जगण्यासाठी इथल्या पिंपळपानावरती अवघे विश्व तरावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 01/04/2017 - 05:19 नवीन
वेगवेगळी फुले उमलली, रचुनी त्यांचे झेले एकमेकांवरी उधळले, गेलेSS तेSS दिन गेSलेS 'ले' अक्षर आलंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रान्जल केलकर
प
प्रान्जल केलकर Wed, 01/04/2017 - 05:30 नवीन
वल्लाह क्या केहेणे अगला गाणा हमारी तर्फ से लेक लाडकी या घरची होणार सून मी त्या घरची सौख्यात वाढलेली प्रेमात नाहलेली कळिकळि फुलून ही चढते मंडपी वेल मायेची संपताच भातुकली चिमुकली ती बाहुली आली वयात खुदुखुदू हसते होऊनी नवरी लग्‍नाची हे माहेर, सासर ते ही काशी, रामेश्वर ते उजळिते कळस दो घरचे चंद्रिका पूर्ण चंद्राची
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
प
पिलीयन रायडर Tue, 01/03/2017 - 18:24 नवीन
कधी आस्तिक नव्हतेच. देव आहे असं एक क्षणभरही वाटलं नाही आजवर. माझे आजोबा नास्तिक होते तो प्रभाव असेल. पण आजी आणि बाबांचे आईवडिल अत्यंत धार्मिक. मी नेमकी ह्याच आजोबांवर कशी गेले ते माहिती नाही. पण त्यांच्यामुळेच मी नास्तिक आहे हे नक्की.
  • Log in or register to post comments
ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर Tue, 01/03/2017 - 19:15 नवीन
रायडर बाइ ,तुम्ही आस्तिक असाल असे वाटले होते ,पण तुम्ही चक्क नास्तिक आहात. वेलकम टु द क्लब बाय्दवे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
ग
गॅरी ट्रुमन Wed, 01/04/2017 - 04:54 नवीन
माझे आजोबा नास्तिक होते तो प्रभाव असेल. पण आजी आणि बाबांचे आईवडिल अत्यंत धार्मिक.
आस्तिक आणि धार्मिक (पक्षी पूजाअर्चा इत्यादी करणारे) या दोन गोष्टी इंटरचेन्जेबली वापरल्या जाणे या गोंधळामुळे बरेच 'कन्फ्युजन' तयार होते. (आस्तिक असलेला पण धार्मिक नसलेला) ट्रुमन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Wed, 01/04/2017 - 05:16 नवीन
खरंय.. पण जे धार्मिक असतात ते १००% अस्तिक असतातच ना.. त्यामुळे इथे ते नुसतेच अस्तिक नसुन, देवभोळे आणि काही बाबतीत कट्टरही होते हे सांगायला हा शब्द वापरलाय. बाकी आस्तिक, नास्तिक, अज्ञेय, धार्मिक वगैरे संज्ञा मी बर्‍याच मोघम वापरते हे खरंय. म्हणायचा मुद्दा इतकाच की मी आस्तिकही नाही आणि धार्मिकही. नास्तिक आहे की अज्ञेयवादी हे अजुन माहित नाही. पण कुणी एक शक्ती हे सगळं ठरवुन कंट्रोल करतेय असं काही अजुन मला वाटत नाही. सगळ्यामागे कारण आहे, आपल्याला माहिती नाही इतकंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Wed, 01/04/2017 - 05:42 नवीन
पण जे धार्मिक असतात ते १००% अस्तिक असतातच ना.
प्रत्येक वेळी नाही. अनेकदा पक्के चोर लोक आपल्याच मनाला लागलेली टोचणी दूर करायला पूजाअर्चा वगैरे गोष्टींचा वापर करतात. त्यांना वाटते की आपण इतर ठिकाणी जे पाप करतो त्याची किंमत या पूजाअर्चांच्या माध्यमातून चुकवली की आपले काम झाले. असे लोक खरोखरच अस्तिक असतात का?अशा लोकांना अस्तिक समजले जाते आणि त्यामुळे अस्तिक लोक चोर असतात पण नास्तिक लोक सज्जन असतात असे चित्र उभे राहते. दुसरे म्हणजे अनेक लोक पूजाअर्चा वगैरे घराण्याची परंपरा म्हणून चालू ठेवतात. एकतर ती परंपरा मोडायचे धैर्य त्यांच्यात नसते किंवा आपल्याच नातेवाईकांना काय वाटेल या विचाराने इच्छा नसूनही ते त्या परंपरा सुरू ठेवतात. असे लोक खरोखरच अस्तिक असतात का? आपल्याला आजूबाजूला जे धार्मिक लोक दिसतात त्यात या दोन प्रकारच्या लोकांचा भरणा मोठ्या प्रमाणावर असतो. याची आकडेवारी माझ्याकडे नाही आणि ती गोळा करण्याचे स्वारस्यही नाही पण एक जनरल गोष्ट लिहित आहे. तेव्हा खरोखरच अस्तिक असलेले आणि धार्मिक असलेले लोक नक्की किती हा गणितातील वेन डायग्रॅमचाच प्रश्न झाला :) लिहायचा उद्देश हा की जे धार्मिक असतात ते १००% अस्तिक असतातच असे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
म
मराठी कथालेखक Wed, 01/04/2017 - 09:31 नवीन
तुमचं बरोबर आहे, पण तरीही इतका काथ्याकूट अनावश्यक वाटतो. प्रॅक्टिकली जो जाहीर करतो की "मी नास्तिक आहे", तो नास्तिक. जो अस्तिक असल्याचं जाहीर करतो किंवा मंदिरात जातो वा पूजा वगैरे करतो तो अस्तिक...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Wed, 01/04/2017 - 09:39 नवीन
जो जाहीर करतो की "मी नास्तिक आहे", तो नास्तिक. जो अस्तिक असल्याचं जाहीर करतो किंवा मंदिरात जातो वा पूजा वगैरे करतो तो अस्तिक...
अहो पाकिस्तानचे पंतप्रधानही आपला देश दहशतवादविरोधात आहे असेच म्हणतात. खरोखर तशी परिस्थिती आहे का? माणूस म्हणेल लाख काही पण प्रत्यक्ष तशी परिस्थिती आहे की नाही हे पडताळून बघायला नको का?पडताळणी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक Wed, 01/04/2017 - 11:16 नवीन
आता नास्तिक असल्याचा किंवा अस्तिक असल्याचा काय पुरावा शोधणार.. एखादा माणूस मंदिरात जातो आहे, तो अस्तिक आहे हे त्याने डिक्लेअर केलंय.. आता त्याच्या मनात तो खरंच देवाचं अस्तित्व मानतो की नाही हे सिद्ध कसं करणार ? झालंच तर तो (किंवा विरुद्ध पक्षाचा म्हणजे नास्तिक माणूस तरी) खोटं का बोलेल ? शिवाय त्याच्यामुळे मंदिरापुढची रांग वाढली , सकृतदर्शनी तरी अस्तिकांची संख्या जास्त दिसली आता त्याच्या मनात काय वेगळं आहे त्याने काय फरक पडणार ? मी जर कमळाच्या पुढचं बटन दाबलंय आता माझ्या मी मनातून मी भक्त असलो काय किंवा विरोधक असलो काय , ते कळणार कुणाला आहे आणि त्याने फरक तरी काय पडणार आहे ? 'ऑफिशियली' मी भाजपचा समर्थकच ठरतो ना !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
व
विशुमित Wed, 01/04/2017 - 07:45 नवीन
<<<सगळ्यामागे कारण आहे, आपल्याला माहिती नाही इतकंच.>>> -- नास्तिकांना आपली बाजू मांडण्यासाठी हे एकच जबरदस्त वाक्य पुरेसे आहे..!! क्या बात क्या बात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
स
सुबोध खरे Tue, 01/03/2017 - 18:47 नवीन
नास्तिक लोक आस्तिकांपेक्षा जास्त हुशार असतात असे आढळून आले आहे. कुणाला कधी आणि कुठे ?
  • Log in or register to post comments
ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर Tue, 01/03/2017 - 19:12 नवीन
http://www.dailymail.co.uk/news/article-2395972/Atheists-higher-IQs-Their-intelligence-makes-likely-dismiss-religion-irrational-unscientific.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
र
रामपुरी Tue, 01/03/2017 - 18:51 नवीन
"खासकरुन भारतीयांमधला भोळसटपणा लक्षात यायला लागला" हे असं भारतियांवर घसरण्याचं कारण समजलं नाही. म्हणजे इतर धर्मात/देशात काय चालतं हे माहितचं नाही की ही फक्त काडी आहे? माहीत नसेल तर अभ्यास वाढवा. आणि नेहेमी सारखी काडी असेल तर चालू द्या.
  • Log in or register to post comments
ल
लाडू Wed, 01/04/2017 - 11:17 नवीन
डब्लिन ला टेम्पल बार जवळ एका दुकानात छत्री विकत घेत होते. त्या विक्रेतीला ला विचारलं कि उघडून बघितली तर चालेल ना? त्यावर तिचे उत्तर होते कि नाही चालणार कारण काहीतरी वाईट घडेल... सांगायचं उद्देश एवढाच कि अंधश्रद्धा भारताबाहेर पण तितक्याच आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामपुरी
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 01/03/2017 - 18:56 नवीन
नास्तिक आणि आस्तिक दोघेही बहुदा आक्रस्ताळेपणे "मीच्च खरा" म्हणताना दिसतात. त्यापेक्षा अज्ञेयवादी (अग्नॉस्टिक) जास्त समंजसपणे आणि शास्त्रीय पद्धतीने विचार मांडणारे असतात असे निरिक्षण आहे. :)
  • Log in or register to post comments
प
पुंबा Wed, 01/04/2017 - 06:28 नवीन
अगदी मान्य. आस्तिकांचा भोळसटपणा आणि नास्तिकाचा अहंकार या दोन्हीपेक्षा अज्ञेयवाद्याचा चिकीत्सक खुलेपणा अधिक योग्य वाटतो. जाणीवपुर्वक अज्ञेयवाद स्विकारला आहे. आस्तिक म्हणून जी थेरं केली जातात त्यातल्या एकावरही विश्वास नाही, विज्ञानवादी विवेकनिष्ठा जीवनाचे खरे रूप समजण्यास पुरेशी आहे असे वाटते मात्र अध्यात्म पुर्णपणे निरुपयोगी संस्था आहे हे पटत नाही आणि देवाचे अस्तित्व संपूर्ण पुसून टाका हा नास्तिकांचा दुराग्रहही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
प
प्रसाद गोडबोले Tue, 01/03/2017 - 21:08 नवीन
हिंदु तत्वज्ञानानुसार नास्तिक आणि निरीश्वरवादी ह्या दोन स्वतंत्र संकल्पना आहेत. नास्तिक म्हणजे वेदप्रामाण्य नाकारणरा आणि निरीश्वरवादी म्हणजे पारलौकिक शक्तीचे अस्तित्व नाकारणारा ! तुम्ही येथे नास्तिक हा शव्द निरीश्वरवादी ह्या अर्थाने वापरलेला दिसत आहे म्हणुन खास तुमच्या माहीती साठी सांगतो कि हिंदु धर्माच्या तत्वज्ञाच्या मुळाशी असलेले सांख्य दर्शन हे आस्तिक दर्शन चक्क निरीश्वरवादी आहे !! आणि ह्याच उलट नास्तिक दर्शनांपैकी जैन आणि बुध्द दर्शन स्विकारणार्‍या लोकांच्या कित्येक संप्रदायात पारलौकिक शक्तीचे अस्तित्व मान्य केले आहे ,. हीनयान संप्रदायात तर बुध्दाचीच पुजा अर्चा होते ! नास्तिक आणि निरीश्वरवादी असे दोन्हीही असलेले एकमेव दर्शन म्हणजे चार्वाक ! पण त्याला तत्वज्ञान म्हणायचे का हाच पहिला प्रश्न आहे ! लोल !! ( आजीवकांबद्दल तुर्तास तरी काही वाचनात आलेले नाही.) सध्या अस्तित्वात असलेला भक्तिप्रधान हिंदु धर्म मुळात श्रीमदाद्यशंकराचार्य प्रणीत अद्वैत वेदांत सिध्दांतावर आधारलेला आहे . अद्वैत संप्रदाय " तत्वमसि" अर्थात ते (ब्रह्म) तुच आहेस असे मत प्रतिपादन करतो आणि ह्या एनलाईटनमेन्टच्या परमोच्च अवस्थे प्रत पोहचण्यासाठी ज्ञान कर्म आणि राज ह्या तिन्ही योगांचा समुच्चय असलेला नवविधाभक्तिराजपंथ असा भक्तीयोग हा साधा सोप्पा मार्ग सुचवतो !! ईश्वराचे अस्तित्व मान्य केले तरी भक्तियोगाच्या आधारे शेवटी ' तो तुच आहेस' हे समजुन घेणे हीच हिंदु धर्माची डोक्टराईन आहे. पहा : " अरे अरे ज्ञाना झालासे पावन | तुझे तुज ध्यान कळो आले | तुझा तुचि देव तुझा तुचि भाव | फिटला संदेह अन्य तत्त्वी ||" ) आता बोला तुम्ही टफि कंच्या साईडला ??
  • Log in or register to post comments
ल
लीना कनाटा Wed, 01/04/2017 - 02:08 नवीन
अरे अरे टफि झालासे पावन | तुझे तुज ट्रोल कळो आले || तुझा तुचि आयडी,तुचि डुआयडी | टाकली पिंक अन्य धागी ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
अ
अनन्त्_यात्री Wed, 01/04/2017 - 05:01 नवीन
सांख्य दर्शन जितके आस्तिक व निरीश्वरवादी आहे तेवढीच न्याय व वैशेषिक दर्शने आस्तिक व निरीश्वरवादी आहेत असे वाचले होते. मार्कस, या विषयी अधिक विस्ताराने लिहाल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Wed, 01/04/2017 - 06:21 नवीन
मार्कस, या विषयी अधिक विस्ताराने लिहाल?
माफ करा , पण माझा ह्या विषयाचा सखोल अभ्यास नाही . प्रसाद प्रकाशनाने ह्या सर्व दर्शनांवर सविस्तर पुस्तके लिहिली आहेत . ती आपण पाहू शकता . ( अवांतर: एका अवलिया मिपा मित्राच्या घरी हि सर्वच्या सर्व पुस्तके पाहिल्याचे आठवते . योग्य वेळी ती वाचनास मागून घेतली जातील :D)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त्_यात्री
स
सुबोध खरे Wed, 01/04/2017 - 05:15 नवीन
हे म्हणजे तुम्ही टफि ना गोल रिंगणात घेऊन कोपऱ्यात उभे रहा सांगितल्यासारखे आहे. आता कोपरा कुठे आहे आणि कसा शोधायचा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
स
सस्नेह Wed, 01/04/2017 - 08:54 नवीन
याशिवाय पातंजल योग-दर्शनात प्रत्येक जीवाचे शुद्ध केवल रूप म्हणजे ईश्वर असे मत मांडले आहे, त्यावर टफिसाहेबांचे आस्तिक-नास्तिकपण काय म्हणते हे वाचावयास आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रान्जल केलकर Wed, 01/04/2017 - 04:42 नवीन
असले झाटू आरोप करण्या आधी दुसऱ्या धर्मात पण बघा. देव मानत नाही म्हणजे धर्म पण मनात नाही. त्यामुळे आधी आपला धर्म साफ करू माग दुसऱ्याचा असले बालगंधर्व पुलावरल्या भुताचे विचार आम्हाला ऐकवू नका. हिंदू धर्माची घाण साफ करण्यापेक्षा पार्श्वभागात दम असेल तर फक्त मुस्लिम धर्मातल्या बुरख्या वर बंदी आणून दाखवा. आस्तिक नास्तिक हे फादर सिस्टर्स ला पण सांगा. पास्टर लोक काय उच्छाद मांडतात ते बघा आधी फेसबुक वर नो कॉन्व्हर्जन (NO CONVERSION) नावाचा ग्रुप आहे तिथे जाऊन आधी ख्रिश्चन धर्मातल्या होलयु यु च्या करामती बघा माग हिंदू धर्मावर टीका करा
  • Log in or register to post comments
च
चिनार Wed, 01/04/2017 - 05:24 नवीन
बुद्धीवाद म्हणजे नेमकं काय ?
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Wed, 01/04/2017 - 05:43 नवीन
बुद्धीवाद म्हणजे नेमकं काय ?
एखाद्याची बुध्दी कायम वादात असल्याचे लक्षण म्हणजे बुध्दीवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
अ
अनन्त्_यात्री Wed, 01/04/2017 - 05:52 नवीन
ज्ञानप्राप्ती फक्त बुद्धी व तर्काचा वापर करूनच होऊ शकते ही धारणा म्हणजे बुद्धीवाद.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Wed, 01/04/2017 - 06:02 नवीन
ज्ञानप्राप्ती फक्त बुद्धी व तर्काचा वापर करूनच होऊ शकते ही धारणा म्हणजे बुद्धीवाद.
सहमत आहे. खरोखरचा बुद्धीवाद असा असेल असे म्हणायला हरकत नसावी. स्वतःला बुद्दीवादी म्हणवून घेणारे मात्र त्यांची बुध्दी कायम वादात असल्याप्रमाणे वर्तन करतात. यातून होते असे की सर्व धार्मिकांना अस्तिक म्हटल्याप्रमाणे घोळ होतो तसाच घोळ इथेही होतो :) (खरोखरचा बुद्धीवाद आणि फेसबुक-मिपा आणि इतर ठिकाणी स्वतःला बुद्धीवादी म्हणवून घेणार्‍यांचा बुद्धीवाद यांच्यात जमिन अस्मानाचा फरक आहे असे मानणारा) ट्रुमन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त्_यात्री
च
चिनार Wed, 01/04/2017 - 06:13 नवीन
पण अशी धारणा म्हणजे स्वतःच्या बुद्धीप्रती असलेली अंधश्रद्धा नव्हे काय ? मानव हा सगळ्यात बुद्धिमान प्राणी आहे असं म्हणतात. पण ही गोष्ट एखाद्या बुद्धीवादी हत्तीला माहिती नसेल तर तो त्याच्या बुद्धीला सर्वश्रेष्ठ समजेल. थोडक्यात आपल्या बुद्धीच्या पलीकडेही काहीतरी असेल हा विचार बुद्धीवादामध्ये येत नाही का ? अर्थात आपल्या बुद्धीच्या पलीकडे असेल ते सगळे दैवी असे मला म्हणायचे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त्_यात्री
ग
गॅरी ट्रुमन Wed, 01/04/2017 - 06:39 नवीन
आपल्या बुद्धीच्या पलीकडेही काहीतरी असेल हा विचार बुद्धीवादामध्ये येत नाही का ?
हाच फेसबुक-मिपा इत्यादीवर स्वतःला बुद्धीवादी म्हणविणार्‍या लोकांच्या बुध्दीवादाचा घोळ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 01/04/2017 - 07:51 नवीन
थोडासा पण कळीचा फरक... "ज्ञानप्राप्ती फक्त बुद्धी व तर्काचा प्रामाणिक वापर करूनच होऊ शकते ही धारणा म्हणजे बुद्धीवाद." प्रामाणिकपणाच्या अभावामध्ये बुद्धी व तर्काचा वापर करून बुद्धीभेद केला जातो, या अनुभवावर आधारलेली आपली एक छोटीशी भर. :) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त्_यात्री
इ
इल्यूमिनाटस Wed, 01/04/2017 - 06:08 नवीन
जिथे विज्ञान संपतं तिथे देव सुरु होतो हे विश्व कसं निर्माण झालं याचं उत्तर विज्ञान देतं (ते ही वादातच आहे(बिग ब्यांग)) पण का निर्माण झालं याचं उत्तर विज्ञाना कडे नाही मग पारलौकिक शक्तीला मानण्या खेरिज पर्याय उरत नाही जेव्हा आयुष्य नॉर्मल चालू असतं तेव्हा मी नास्तिक असतो, पण कोणता मोठा प्रॉब्लेम आला की आपसूकच देवाचा धावा सुरु होतो नास्तिक व्हायचे आहे पण जमत नाही
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Wed, 01/04/2017 - 06:34 नवीन
पण कोणता मोठा प्रॉब्लेम आला की आपसूकच देवाचा धावा सुरु होतो
तुमच्या प्रतिसादातल्या पहिल्या परिच्छेदाच्या हिशोबाने विज्ञानाकडची उत्तरं संपली की मगच देवाचा धावा सुरू केला पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इल्यूमिनाटस
अ
अनन्त्_यात्री Wed, 01/04/2017 - 06:41 नवीन
जसजसे उन्चावर जावे तसतसे क्षितिज विस्तारत जाते, त्याप्रमाणे बुद्धी-वर्धनाच्या समप्रमाणात विविध घटनान्ची / विषयान्ची सन्ख्या / व्याप्ती व त्यामधील समब्न्ध व कार्य-कारण भाव आकलन-गम्य होत जातो. बुद्धिवाद म्हणजे बुद्धीप्रती असलेली अंधश्रद्धा नक्कीच नव्हे ...तर बुद्धी वर्धनक्षम असल्यामुळे अधिकाधिक ज्ञान आकलन-गम्य आहे ही धारणा.
  • Log in or register to post comments
च
चिनार Wed, 01/04/2017 - 06:48 नवीन
ज्ञान हे बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आहे की नाही ह्यावर प्रकाश टाकावा मुळात ज्ञान मिळवायचे हा प्रामाणिक हेतू असल्यास, ते फक्त बुद्धीनेच मिळवायचे हा अट्टाहास कश्यासाठी ? उपलब्ध असलेल्या सर्व स्रोतातून ते मिळवल्यास त्यात काय वाईट आहे ? बुद्धीने मिळते तेच ज्ञान असा काही नियम आहे का ? हे सर्व प्रश्न प्रामाणिक आहेत. बुद्धीवादाची खिल्ली उडवण्याचा उद्देश नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त्_यात्री
आ
आनन्दा Wed, 01/04/2017 - 06:43 नवीन
माझा पास.. मिपावरच मी पूर्वी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अजून कोणी दिलेली नाहीत, त्यामुळे लेखनसीमा.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 01/04/2017 - 07:01 नवीन
ऐला, यावरून अनिता पाटील विचार मंचाची आठवण झाली. :)
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Wed, 01/04/2017 - 09:49 नवीन
त्यांचा 'विचार' मंच पण आहे? अविचार मंचाबद्दल ऐकले होते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
स
संदीप डांगे Wed, 01/04/2017 - 07:22 नवीन
सौ बात की एक बातः मी स्वार्थी आहे.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Wed, 01/04/2017 - 08:34 नवीन
मी नास्तिक /निरीश्वरवादी आहे. कारण साधं आहे - वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगू लागलो तेव्हापासून 'इश्वर ही एक मानवनिर्मित संकल्पना आहे' हे समजले. त्यानंतर ती संकल्पना कवटाळायची की दूर सारायची हा निर्णय घेणे जास्त कठीण नव्हते.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Wed, 01/04/2017 - 09:03 नवीन
पैले तुम अपना प्रॉब्लेम फिक्स करो ...नास्तिक किसको कहत है, आस्तिक माने क्या, धार्मिक क्या है ..?
  • Log in or register to post comments
P
palambar Wed, 01/04/2017 - 15:22 नवीन
खरतर आस्तिक किंवा नास्तिक होण्यात काही तोटा नाही , पण कर्मकांड टाळति आला पाहिजे(टाळता)
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा