Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वधूपरिक्षेच्या पारंपारिक पद्धतीत सुधारणा शक्य आहे का?

अ
अॅस्ट्रोनाट विनय
Fri, 01/13/2017 - 12:31
🗣 88 प्रतिसाद
वधूपरिक्षेच्या पारंपारिक पद्धतीत सुधारणा शक्य आहे का? मुली बघण्याच्या पारंपारिक पद्धतीमध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत तसेच काही दोषसुद्धा आहेत आपल्याला जर एखादी वस्तू विकायची असली तर आपण काय करतो? त्या वस्तूला सजवून मांडतो, त्यातले दोष झाकून असलेले अन नसलेले गुण वर्णन करून सांगतो. वधू वर परीक्षणाचही असंच आहे. ही निवडप्रक्रिया बऱ्याचअंशी दिखाव्यावर आधारीत असते. शिवाय पहायला गेल्यावर मुलगा अन मुलगी फक्त पाच ते दहा मिनीटं समोरासमोर असतात. अन तेवढ्या भेटीवरच लग्नाचे निर्णय घेतले जातात. एकमेकांचे स्वभाव कळण्याचा प्रश्नच नाही. यावर एक उपाय असा सुचवला जातो की मुलीला एकदोन वेळा वैयक्तिकरित्या भेटावं आणि आपल्या अपेक्षा वगैरेंबाबत बोलावं. पण अशा भेटीतून खरा तो किंवा ती एकमेकांना कळतात का ही शंकाच आहे. कारण अर्थातच मुलीला(आई, वडील, बहीण, मैत्रीण इ.)घरून पढवून पाठवलेलं असतं की त्यांच्याशी असं असं बोल.चांगल स्थळ आहे जमलंच पाहिजे वगैरे वगैरे. मला पडलेला गहन प्रश्न असा आहे की वरील परिस्थितीवर काही उपाय शक्य आहे का जेणेकरून ती त्याच्यासाठी योग्य आहे की नाही याची थोडी तरी चाचपणी करता येईल? मत,कल्पना, सल्ला, अनुभव ?

प्रतिक्रिया द्या
15919 वाचन

💬 प्रतिसाद (88)
अ
अत्रन्गि पाउस Fri, 01/13/2017 - 17:41 नवीन
कदाचित २००
  • Log in or register to post comments
अ
अॅस्ट्रोनाट विनय Fri, 01/13/2017 - 19:06 नवीन
??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस
ण
णरुअ Fri, 01/13/2017 - 18:51 नवीन
लिव्ह इन रेलशनशिप
  • Log in or register to post comments
अ
अॅस्ट्रोनाट विनय Fri, 01/13/2017 - 19:05 नवीन
लीव इन साठी आधी तुम्ही gf आणि bf असावे लागता. मी arrange marriage बद्दल बोलतोय. मुली बघण्याच्या पारंपारिक पद्धतीत सुधारणा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: णरुअ
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 01/13/2017 - 18:54 नवीन
मुंडावळ..., आपलं...ते हे..जागा धरून बसतो. .
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Fri, 01/13/2017 - 20:32 नवीन
कारण अर्थातच मुलीला(आई, वडील, बहीण, मैत्रीण इ.)घरून पढवून पाठवलेलं असतं की त्यांच्याशी असं असं बोल.चांगल स्थळ आहे जमलंच पाहिजे वगैरे वगैरे.
फक्त मुलीला? मुलाला नसते का घरून पढवून पाठवलेलं असतं की त्यांच्याशी असं असं बोल.चांगल स्थळ आहे जमलंच पाहिजे वगैरे वगैरे.. चला आता जागा धरून बसा..
  • Log in or register to post comments
अ
अॅस्ट्रोनाट विनय Sat, 01/14/2017 - 05:31 नवीन
हो पण असा दबाव मुलांवर कमी असतो. तुला आवडली मुलगी तरच कर, आमचा दबाव नाही असं बरचसे आईवडील म्हणतात. मुलींएवढा होकाराचा दबाव त्यांच्यावर नसतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त अवधुत
र
रेवती Fri, 01/13/2017 - 20:55 नवीन
तुम्ही लग्नाळू आहात का? असल्यास मुलगी बघण्याचे असे अनुभव आलेत का? बदल हा नेहमी स्वत:पासून सुरु होतो. इथं मिपावर काहीजणांनी अशा धाग्यांमध्ये आपले मत व्यक्त करताना मुलीला भेटणे, बोलणे, आपल्या हातात ठेवल्याचे सांगितले आहे. तुम्ही तुमच्याघरातील ज्येष्ठांना सांगून पहावे की जात, धर्म, पंथ, पारंपारीक भेटीगाठी, अतोनात खर्च वगैरे (जी तुमची मते आहेत ती) करणार नाही व माझे लग्न माझ्या मर्जीने होईल. अशावेळी आपल्या व आपल्याला आवडलेल्या मुलीच्या खिषात दम पाहिजे. एकदम "हो घराबाहेर!" अशी धमकी आली तर निस्तरता आलं पाहिजे ना! तुम्हाला सध्याचा आट्याचा व डाळीचा भाव माहित असल्यास कळवा प्लीज.............. ;)
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sat, 01/14/2017 - 04:25 नवीन
=)) बहुतेक असे धागे लग्नाळू लोक्स काढतात असा अंदाज आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
अ
अॅस्ट्रोनाट विनय Sat, 01/14/2017 - 05:52 नवीन
:)) बरोबर कारण लग्नाळू लोकच जास्त आशावादी असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
अ
अॅस्ट्रोनाट विनय Sat, 01/14/2017 - 05:46 नवीन
सध्याच मी लग्नाळू नाही पण लवकरच योग येतील. मुली बघायला सुरुवात नाही केलीये पण बाकिच्यांचे अनुभव आहेत. रेवती मॅडम, इतर मुद्द्यांच्या बाबतीत तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतो. माझे लग्न माझ्याच मर्जीने करायला घरच्यांचि हरकत नाही. दूसरी गोष्ट जात,धर्म वगैरे अडसर तेव्हाच उत्पन्न होतील जेव्हा मला प्रेमविवाह करण्याची इच्छा असेल. पण तसं नाहीये. मला घरच्यांनी आणि नातेवईकानी सुचवलेल्या मुलींना भेटून त्यातली जी आवडेल तिच्याशी लग्न करायच आहे. त्यामुळे हो घराबाहेर या धमकीची भीती नाही (तसंही नोकरीनिमित्त बाहेरगावी असल्याने वेगळच घर थाटाव लागणार आहे) आणि डाळीचा भाव सध्याच माहीत करून घेण्याची गरज नाही. (आणि तो भाव कितीही असला तरी माझा एकट्याचा खिसा ते सहज पेलू शकतो :) माझा प्रश्न फक्त पारंपारिक मुली बघण्याचा कार्यक्रम आणि त्यात काही सुधारणा शक्य आहे का या बाबतीत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
स
संजय क्षीरसागर Sat, 01/14/2017 - 06:54 नवीन
यावर एक उपाय असा सुचवला जातो की मुलीला एकदोन वेळा वैयक्तिकरित्या भेटावं आणि आपल्या अपेक्षा वगैरेंबाबत बोलावं. पण अशा भेटीतून खरा तो किंवा ती एकमेकांना कळतात का ही शंकाच आहे. कारण अर्थातच मुलीला(आई, वडील, बहीण, मैत्रीण इ.) घरून पढवून पाठवलेलं असतं की त्यांच्याशी असं असं बोल.चांगल स्थळ आहे जमलंच पाहिजे वगैरे वगैरे. मुलं सुद्धा मुली पटवायला स्वतःची इमेज आदर्श पतीसारखीच दाखवतात. ते वाइसवर्सा आणि नॉर्मल आहे. कारण एकमेकांना इंप्रेस करु शकले नाहीत तर विषय तिथेच संपतो. मला घरच्यांनी आणि नातेवईकानी सुचवलेल्या मुलींना भेटून त्यातली जी आवडेल तिच्याशी लग्न करायच आहे. माझा प्रश्न फक्त पारंपारिक मुली बघण्याचा कार्यक्रम आणि त्यात काही सुधारणा शक्य आहे का या बाबतीत आहे. लग्न ठरवून करा की प्रेम करुन शेवटी तुम्हाला माणसाची पारख काय आहे यावर वैवाहिक यश अवलंबून आहे. आणि ते बव्हंशी केवळ तुमच्यावरच डिपेंडंट आहे. ती तशी आहे म्हणून आमचं जमत नाही ही पश्चात बुद्धी कायम निरुपयोगी आहे, मग तो विवाह पहिला असो की पाचवा. आणि ती कशीही असली तरी माझी आहे ही भावना जोपर्यंत मनात रुजत नाही तोपर्यंत विवाहाची मजा नाही मग तो एका आठवड्यापूर्वी झाला असो की काही दशकांपूर्वी. एकच करा, भेटीमधे प्रश्नोत्तरांचा तास घेण्यापेक्षा तिच्या सहवासात आपण रमतो की नाही हे पाहा. जीचा सहवास हवाहवासा वाटेल तिला एकदाच आपली म्हणा आणि मग मागे वळून पाहू नका, कोणताही अ‍ॅनॅलिसिस करायच्या भानगडीत पडू नका. तुमचं वैवाहिक जीवन मजेचं होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अॅस्ट्रोनाट विनय
अ
अॅस्ट्रोनाट विनय Sat, 01/14/2017 - 07:15 नवीन
धन्यवाद संजयजी, योग्य मार्गदर्शन केलंत. तुमचं म्हणणं पटण्यासारख आहे. कोणीही perfect नसतो आणि कोणतंही नातं टिकावणं हे आपल्यावरच अवलंबून असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
ब
बरखा Sat, 01/14/2017 - 08:16 नवीन
+१ , " ती कशीही असली तरी माझी आहे ही भावना जोपर्यंत मनात रुजत नाही तोपर्यंत विवाहाची मजा नाही मग तो एका आठवड्यापूर्वी झाला असो की काही दशकांपूर्वी. "संजय क्षीरसागर यांच्याशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
ध
धर्मराजमुटके Sat, 01/14/2017 - 09:13 नवीन
ती कशीही असली तरी माझी आहे ही भावना जोपर्यंत मनात रुजत नाही तोपर्यंत विवाहाची मजा नाही
हं. जुनी खोंडं हेच वाक्य "पदरी पडलं, पवित्र झालं" अशा भाषेत बोलायते तेव्हा त्यांच्यावर फार टीका व्हायची असे आठवते. एकंदरीत काय तर मनीचा हेतू काहीही असो, शब्दांचं रॅपर देखील सुंदर असावे लागते असा आजच्या जगाचा नियम आहे. बाकी तुमच्या मुळ मुद्द्याशी सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Sat, 01/14/2017 - 09:29 नवीन
"पदरी पडलं, पवित्र झालं" यात मागच्या पिढ्यांचा नाईलाज दिसतो. जे आहे ते ओढण्याची भावना (दोन्ही कडून) दिसते. त्यात मजा नाही. ती कशीही असली तरी माझी आहे यात आपल्या सिलेक्शनचा गौरव आहे. तिच्यात काही तरी भावलं आहे जे शब्दांच्या पलिकडे आहे आणि ते शेवटापर्यंत वर्णन करता येणार नाही. मतभेद आहेत पण ते पदरी पडलं म्हणून अ‍ॅडजेस्ट केलेले नाहीत. त्यावरनं नेहमी वादंग होतील पण एकमेकांच्या सहवासाची खुमारी त्यांना पार करुन जाईल हा विश्वास आहे. आणि तो दोघांनाही एकमेकांबद्दल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
प
पुंबा Mon, 01/16/2017 - 11:46 नवीन
++++१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
ह
हतोळकरांचा प्रसाद Sat, 01/14/2017 - 10:47 नवीन
हे
ती कशीही असली तरी माझी आहे ही भावना जोपर्यंत मनात रुजत नाही तोपर्यंत विवाहाची मजा नाही
आणि
भेटीमधे प्रश्नोत्तरांचा तास घेण्यापेक्षा तिच्या सहवासात आपण रमतो की नाही हे पाहा
ह्या दोन वाक्यांशी प्रचंड सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 01/14/2017 - 15:32 नवीन
ते जौंद्या ओ. तुम्ही ते टिफनीचं काय झालं ते सांगा बरं =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती Sun, 01/15/2017 - 19:39 नवीन
टिफनी असंय की सध्या ती भारतीय चालीरिती शिकतिये. कर्ण जोहरचे शिनेमे पाहून त्यांच्याकडे सर्व महिलांना ती कडवाचौथीचं व्रत समजावून सांगतिये व त्यामुळे डाएट कंट्रोलचे धडे गिरवतिये. प्रश्न असा आहे की तिच्या सर्व आया (आईचे अनेकवचन) आठ आठ तास उपास करून इंटरनेटवरील चंद्र व टीव्हीवरील नवरा बघून बफेलो विंग्ज व पिझ्झा हादडतात व टिफनीला तू एकलाच असल्यामुळे अख्खा दिवस तहान भुकेने तळमळत रहावे लागते. तुझी सध्या कोणी गफ्रे असेल तर कळव म्हणून माझ्याकडे निरोप दिलाय. तसे असल्यास (एकापेक्षा जास्त गफ्रे असल्यास आनंदच आहे) सगळ्याजणी मिळून दिवसाचे तास वाटून घेतील व कडवाचौथ पार पाडतील हा त्यामागील हेतू आहे. तसंही पाणी न पिता राहणं तिच्या स्किनटोनसाठी बरं नाही म्हणाली. आता काय ते बोल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 01/16/2017 - 02:24 नवीन
ह्या ह्या ह्या.....!!! बेक्कार हसलोय अनेकवचन वगैरे ऐकुन. =))!! नेमके तास वाटुन घेतील का मला वाटतील हे अंमळ स्पष्टं नं झाल्याने त्या प्रश्णाला टँजंट हाणतो आहे. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
अ
अॅस्ट्रोनाट विनय Mon, 01/16/2017 - 08:15 नवीन
या टिफनी पुरानावर एक कथाच होऊ शकते की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
ल
लाडू Mon, 01/16/2017 - 11:44 नवीन
लग्नाळू नाही ओ लग्नाऊ असतात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
प
प्रकाश घाटपांडे Sat, 01/14/2017 - 05:19 नवीन
व्यक्तिगत मूल्ये व कौटुंबिक मूल्ये यांची चर्चा अपेक्षा व अनुरुपता, तडजोडीच्या मर्यादा याबद्दल मुलामुलींनी तसेच त्यांच्या कुटुंबांनी चर्चा करावी त्यातून अंदाज येतो. त्याआधारे 'रिस्क' घ्यावी असा फंडा सध्या आहे.
  • Log in or register to post comments
अ
अॅस्ट्रोनाट विनय Sat, 01/14/2017 - 05:50 नवीन
विषयांतर न करता तुम्ही योग्य उत्तर दिलंत याबद्दल आभारी आहे __/\__ दोन्ही कुटुंबांमध्ये मोकळेपणा हवाच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
अ
अॅस्ट्रोनाट विनय Sat, 01/14/2017 - 05:50 नवीन
विषयांतर न करता तुम्ही योग्य उत्तर दिलंत याबद्दल आभारी आहे __/\__ दोन्ही कुटुंबांमध्ये मोकळेपणा हवाच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
स
सामान्यनागरिक Sat, 01/14/2017 - 07:04 नवीन
१. मुला मुलीने वेगळं भेटणं हा एक उत्तम पर्याय आहे. कितीही पढवल तरी शेवटी त्या दोघानी एकमेकांना परखण्याची संधी मिळेल. २.अजूनही काही वेगळे पर्याय काढता येतील. उदा. फक्त मुला-मुलींचे वेगळे मिलन समारंभ. यात पालक दूर बसतील. दिवसभर मुले मुली पालकांच्या नजरे समोर एकमेकांशी बोलतील. यात काही खेळ, गाणी वगैरे असू शकतात. ३. जर पसंती असेल तर पुढे भेटी होऊ शकतात. नाहीतर ....
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Sat, 01/14/2017 - 07:10 नवीन
यात पालक दूर बसतील. दिवसभर मुले मुली पालकांच्या नजरे समोर एकमेकांशी बोलतील. यात काही खेळ, गाणी वगैरे असू शकतात.
म्हंजे ज्युनियर केजीत होतं तसं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्यनागरिक
अ
अॅस्ट्रोनाट विनय Sat, 01/14/2017 - 08:33 नवीन
माझ्पायाबी डोळ्लयांसमोर हेच चित्थोतूर आलं पालक थोडावेळ निघून गेले तर बरं नाही का? त्यांना नेमकी कशाची भीती वाटते :D D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
स
संदीप डांगे Sat, 01/14/2017 - 09:02 नवीन
असं वाटणार्‍या पालकांना मुलांवर आपले नियंत्रण हवं असतं, नोकरी-शिक्षण स्वत:च्या मनानी करणार्‍या तीशीतल्या मुलाने मुलगी मात्र आपल्याला विचारुन आपल्या संमतीने केली पाहिजे हा हट्ट. मुलीही आजकाल २४च्या पुढे लग्न करतात, त्यांनाही आपला जोडीदार निवडतांना आईवडिलांच्या कुबड्या लागाव्या हे गजब आहे. संक्षिंनी एक चांगला मुद्दा सांगितलाय, माणसं ओळखता येणे, साधारण १६ व्या वर्षापासून पुढे आपली माणसं जोखायची बुद्धी जागृत होते... कारण आईवडिलांच्या छायेतून निघून वेगवेगळ्या लोकांशी आपण आपल्या मर्जीने भेट-व्यवहार करत असतो, कॉलेज-नोकरीत तर कित्येक अनोळखी माणसे भेटतात, त्यातून आपण माणसे शिकत जातो. तरी एक लग्न म्हटलं की हे सगळं विसरुन जणू काही आता बालवाडीत आहे अशा पद्धतीने पालक मुलांबाबत करतात तेव्हा हसायला येत नाही, कीव येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अॅस्ट्रोनाट विनय
स
संदीप डांगे Sat, 01/14/2017 - 09:04 नवीन
जर माणसे ओळखण्याची समज पन्नाशीनंतरच येते असे आईवडिलांना वाटत असेल तर लग्न पन्नाशी झाल्यावरच करावी असा मी विचार मांडतो. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
अ
अॅस्ट्रोनाट विनय Sat, 01/14/2017 - 11:31 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
अ
अॅस्ट्रोनाट विनय Sat, 01/14/2017 - 11:32 नवीन
बरूबर. गांधर्व विवाहाचा ट्रेंड येईल मग परत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
य
यशोधरा Sat, 01/14/2017 - 09:45 नवीन
त्यांना नेमकी कशाची भीती वाटते :D D
असले प्रश्न विचारुन खिदळणार्‍या मुलांची वाटत असावी.. भीती हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अॅस्ट्रोनाट विनय
अ
अॅस्ट्रोनाट विनय Sat, 01/14/2017 - 11:28 नवीन
असले प्रश्न विचारुन खिदळणार्‍या मुलांची वाटत असावी.. भीती हो. धन्यवाद हा तर आमचा गौरवच झाला की :))
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Mon, 01/16/2017 - 05:38 नवीन
अच्छा! म्हणजे तो गौरव तुमचा मुलगा आहे तर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अॅस्ट्रोनाट विनय
अ
अॅस्ट्रोनाट विनय Mon, 01/16/2017 - 08:01 नवीन
हो, पण नाजायज
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
ए
एस Sat, 01/14/2017 - 11:57 नवीन
लग्नाच्या भानगडीत शहाण्यांनी पडू नये. ;-)
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sat, 01/14/2017 - 12:07 नवीन
मला वाटतं, लग्नाळू लोकांनी शाहाण्यांना सल्ला विचारण्याच्या भानगडीत पडू नय! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
अ
अॅस्ट्रोनाट विनय Sat, 01/14/2017 - 12:39 नवीन
थँक गॉड मी शहाणा नाही ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
स
संजय क्षीरसागर Sat, 01/14/2017 - 13:22 नवीन
लग्न हा फंद नाही छंद आहे, शहाण्यांचा तो खेळ नव्हे, हा जुगार वेड्यांचा आहे |
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अॅस्ट्रोनाट विनय
अ
अॅस्ट्रोनाट विनय Sat, 01/14/2017 - 15:26 नवीन
वेड्यांची जगात कमी नाही.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 01/15/2017 - 11:03 नवीन
अॅस्ट्रोनाट विनय, सगळ्यांनी एव्हढे सल्ले दिलेत तर मीही हात धुवून घेतो. जेव्हा मुलगी पसंत करायला जाल, तेव्हा तुम्हां दोघांचं किती जुळतंय यापेक्षा जुळवून घ्यायची इच्छा प्रबळ आहे का हा प्रश्न विचारून पहा. उत्तर होकारार्थी आल्याच द्या उडवून बार. जुळवून घ्यायची इच्छा प्रबळ असणे म्हणजे संक्षींच्या भाषेत तिला आपले म्हणणे होय. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sun, 01/15/2017 - 11:30 नवीन
जुळवून घ्यायची इच्छा प्रबळ असणे म्हणजे संक्षींच्या भाषेत तिला आपले म्हणणे होय. एकमेकांच्या सहवासात मस्त वाटणं हा फॅक्टर आहे. त्याची कारणमिमांसा होऊ शकत नाही. तो एक फील आहे. एकदा तो फील आला की मग सगळं आपोआप जुळून येतं. एकमेकांशी `जुळवून घेतलं' असा भाव दोन्हीकडे राहात नाही. ते अगदी असं आहे : पार्टीतल्या मुली सुल्तानला म्हणतात, इतकी वर्ष झाली तुझ्या पत्नीनं तुला सोडून, हर एक चिज़का एक एक्सपायरी डेट होता है. त्यावर सुल्तान म्हणतो, मॅडम, हमरे यहां लडाई झगडे होते है. लेकीन इष्कका कोई एक्सपायरी डेट नही होता ! त्यावर मुली विचारतात की तिच्यात अशी काय खास बात आहे जी आमच्यात नाही ? आणि सुल्तान म्हणतो, तसं नाही. तुम्ही सगळ्या सुरेख आहात पण तिच्यात एक फिल आहे...आणि तो फक्त अनुभवता येतो! जग घूमेया थारे जैसा ना कोई |
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
अ
अॅस्ट्रोनाट विनय Sun, 01/15/2017 - 12:50 नवीन
संजयजी खूप आभारी आहे. आपला सल्ला मोलाचा. पैलवान साहेब धन्यवाद. आयला पण पहिल्या भेटीत प्रत्येकच मुलगी छान वाटते (की हा फक्त माझाच problem आहे ?) दूसरी गोष्ट,विवाहोत्सुक प्रत्येक मुलगी मी जुळवून घ्यायला तयार आहे असं म्हणेल न. मुळात तिचा स्वभाव आधीपासूनच समजुतदार आणि जुळवून घेणारा असलेला बरा. हे शोधणे कठीण
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ Sun, 01/15/2017 - 14:23 नवीन
हो!
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sun, 01/15/2017 - 18:17 नवीन
आयुष्यात कधीही कुठलेही इंटरॅक्शन नसलेल्या कुठल्यातरी मुलीबरोबर दहा मिनिटे "आतल्या खोलीत" एकांतात काही बोलायचे या कल्पनेनेच मला खरे तर पूर्वी शहारा यायचा. आता येत नाही कारण या जन्मी तरी तो प्रकार करायची गरज लागणार नाही :) बरं झालं आमची बेस (आणि रोझ) म्हणजेच पूर्वाश्रमीची हिलरीला ऑनलाईन भेटलो आणि लग्न करायचे ठरवेपर्यंत चांगले तीन-साडेतीन वर्षे एकमेकांना ओळखत होतो. अन्यथा मलाही आज "मुली पाहण्यामधले फ्रस्ट्रेशन" अशा स्वरूपाचा एखादा लेख लिहावा लागला असता मिपावर :)
  • Log in or register to post comments
अ
अॅस्ट्रोनाट विनय Sun, 01/15/2017 - 18:45 नवीन
गॅरीजी भाग्यवान आहात. पण पारंपारिक पद्धतीतसुद्धा आजकाल आतल्या खोलीतच बोललं पाहिजे असं काही नसतं :)), तुम्ही निर्णय घेण्याआधी मुलीला एकदोन वेळा बाहेरही भेटू शकता आणि हवा तेवढा वेळ गप्पा मारू शकता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
अ
अत्रन्गि पाउस Mon, 01/16/2017 - 08:07 नवीन
गॅरी ऐकून एकदम 'माझ्या नवऱ्याची बायको' मधली शनाया आठवली ... अवांतर फाटा फोडण्याबद्दल क्षमस्व
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अॅस्ट्रोनाट विनय
च
चिनार Mon, 01/16/2017 - 07:08 नवीन
काय सांगता ग्यारी भौ... म्या तर बिलकुल घाबरत नव्हतो पोरींशी बोलाले. लय फकाल्या मारायचो मी. ची मायबीन कॉलेजमदी कोणतीच पोरगी बोलेना आमच्याशी मंग असा चान्स कोन सोडणार राव ? अन ऑनलाईन वगैरे आपल्याला कधी जमलंच नाही ना !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा