Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सुशिक्षितांमधे आजही असे विचार जीवंत आहेत?

स
संदीप डांगे
Wed, 02/01/2017 - 10:58
🗣 179 प्रतिसाद
arunjoshi123 हे अभ्यासू सदस्य म्हणतातः आर्यन इन्वेजन थेरी हा धाग्याचा विषय नाही. पण तरीही... ती मांडली तेव्हा मांडणार्‍या लोकांची मानसिकता पाहून , राजकारण पाहून अनेक इतिहासकारांनी त्यातला फोलपणा तत्क्षणी दाखवला होता. पण असे इतिहासकार नॅशनालिस्ट असल्याने अर्थातच देशद्रोही मंडळीनी सोयीस्कररित्या खास देश तोडण्यासाठी ती थेरी स्वीकारली. त्या थेरीला तेव्हाही काही अर्थ नव्हता, आजही नाही. पण इंग्रजाच्या तोडो आणि राज करो नितिला या लोकांची थेट साथ होती. म्हणून सत्य काय आहे याचेशी त्यांना कधीच काही देणेघेणे नव्हते. ब्राह्मण ही देशातली सर्वात प्रखर राष्ट्रवादी जात आहे नि होती. हे लोक फक्त आणि फक्त ब्राह्मणद्वेष्टे होते. आणि म्हणून हे लोक थेट भारतद्वेष्टे होते. . http://www.misalpav.com/comment/916211#comment-916211 ----------------------------------------------- वरील प्रकारची मते सुशिक्षित लोकांमधे अजून जीवंत आहेत ह्याचे आश्चर्य वाटते. मला अरुणजोशींना विचारायचे आहे की त्यांनी वर जी मते मांडली आहेत त्यावर त्यांचेकडे काय स्पष्टीकरण आहे की नाही? असली जातीयवादी विचारसरणी बाळगायचे कारण काय? ब्राह्मणद्वेष्टे म्हणजे भारतद्वेष्टे हा काय प्रकार आहे? फेदरवेट यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आहेत काय? संबंधित धाग्यावर अवांतर नको म्हणून हा धागा वेगळा काढत आहे.

प्रतिक्रिया द्या
30566 वाचन

💬 प्रतिसाद (179)
A
arunjoshi123 गुरुवार, 02/02/2017 - 06:30 नवीन
अश्या विनोदांची तुलना करण्याऐवजी खालील विषयांवर गंभीर अशी चर्चा करावी. १. संदर्भ माहित नसल्याने माणूस कुठेही काहीही कसा बरळतो. २. आपल्या स्वतःच्याच विनोदबुद्धीची किव कशी करावी. ३. स्वतःलाच अक्कल आहे आणि अन्य लोक महामूर्ख असतात अशा भ्रमातून कसे बाहेर यावे. ४. एखाद्याला जातीयवादी ठरवण्याची घाई कशी टाळावी. ५. सामाजिक विषयांवर चर्चा करताना एखाद्या बिनमहत्त्वाच्या व्यक्तिच्या मताची चिरफाड करणे कसे अनावश्यक असते. ६. मिसळपावचा उपयोग विधायक कामांसाठी कसा जास्त करता येईल. ७. संक्षेप कसे वापरावेत. ८. मधेच येऊन कुठेही काहीही बरळलो तर आपल्याला शहाणे समजले जाण्याची श्यक्यता सर्वत्र असते काय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
प
पुंबा गुरुवार, 02/02/2017 - 07:01 नवीन
स्वतःलाच अक्कल आहे आणि अन्य लोक महामूर्ख असतात अशा भ्रमातून कसे बाहेर यावे.
ह्या प्रश्नाचे उत्तर लवकर शोधा बरं.. गरज आहे तुम्हाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 गुरुवार, 02/02/2017 - 07:26 नवीन
चेन ऑफ रिस्पॉन्सेस वूड गो इनटू डायवर्जेंट सर्क्यूलर रेफरेन्सेस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
व
विशुमित गुरुवार, 02/02/2017 - 07:02 नवीन
चला मूळ स्वभावावर आले म्हणायचे. पूर्ण प्रश्नांमागचा अप्रोच एकच "सर्वात प्रखर"...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 गुरुवार, 02/02/2017 - 17:00 नवीन
सर्वात प्रखर लोक आपल्या मतावर कायम आहेत. ते परतून येत नाहियेत. आणि अप्रोच काय आहे हे सर्वांना सांगायचं काम नका करू. ते सर्वांना दिसत आहे आणि जी काय मंत्रपुष्पांजली माझ्या अंगावर टाकायची ती टाकताहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
च
चिनार गुरुवार, 02/02/2017 - 08:19 नवीन
जोशी साहेब , आपल्यासहीत सर्व मिपाकरांच्या अभ्यासू वृत्ती विषयी मला अतिशय आदर आहे हे नमूद करू इच्छितो. १. संदर्भ माहित नसल्याने माणूस कुठेही काहीही कसा बरळतो. >> माझ्या मते,मी अमुक एका जातीचा आहे म्हणून मी राष्ट्रवादी हा विचार राष्ट्रविघातक आहे. तसेही राष्ट्रवादी असण्यापेक्षा राष्ट्रोपयोगी असणं उत्तम. मी अमुक एका जातीचा आहे ह्याचा मला अभिमान नाही आणि खेदही नाही. पण माझ्या मात्यापित्यांच्या पोटी भारतभूमीत जन्मलो याचा अभिमान आहे आणि राहील. २. आपल्या स्वतःच्याच विनोदबुद्धीची किव कशी करावी. >> ज्या परमेश्वराने विनोदबुद्धी दिली त्यानेच तिची कीव न करता जास्तीत जास्त उपयोग करून आपले आणि इतरांचे आयुष्य सुखकर कसे करता येईल हा विचार करण्याची सद्बुद्धी दिली आहे. ३. स्वतःलाच अक्कल आहे आणि अन्य लोक महामूर्ख असतात अशा भ्रमातून कसे बाहेर यावे. >> माझे थोडेबहुत लिखाण वाचल्यास, मला स्वतःच्या असलेल्या आणि नसलेल्या अकलेची जाणीव आहे हे दिसून येत असावे. अर्थात तसे दिसत नसल्यास लेखनाचा दर्जा वाढवण्याचा प्रयत्न करेल. माझे लिखाण वाचावे असा आग्रह नाही. ४. एखाद्याला जातीयवादी ठरवण्याची घाई कशी टाळावी. >> जाता जाता जात काढतो (आपली आणि समोरच्याची) तो जातीयवादी असे माझे मत. आपल्याशी जास्त संपर्क नसल्यामुळे आपण तसे आहेत का हे सांगू शकत नाही आणि सांगितलेही नाही. ५. सामाजिक विषयांवर चर्चा करताना एखाद्या बिनमहत्त्वाच्या व्यक्तिच्या मताची चिरफाड करणे कसे अनावश्यक असते. >>व्यक्ती महत्त्वाची की बिनमहत्त्वाची हे त्याच्या मतांवरून आणि आचरणावरून कळते. मत महत्त्वाचं की बिन महत्त्वाचं हे व्यक्ती बघून ठरवू नये. अर्थात हे माझं मत. ६. मिसळपावचा उपयोग विधायक कामांसाठी कसा जास्त करता येईल. >> विधायक कामासाठी पूर्ण शक्तीनिशी कायम उपलब्ध असेल, विघातक कार्यांसाठी नाही.विधायक की विघातक हे ठरवण्यासाठी अंतर्मनाचा कौल घेण्यात येईल. ७. संक्षेप कसे वापरावेत. >> संक्षेप या शब्दाचा अर्थ माहिती नसल्यामुळे या मुद्द्यावर पास. ८. मधेच येऊन कुठेही काहीही बरळलो तर आपल्याला शहाणे समजले जाण्याची श्यक्यता सर्वत्र असते काय. >> शहाणं समजणं आणि शहाणं असणं ह्यात फरक आहे ह्याची पूर्ण जाणीव आहे. शहाणपणचे सर्टिफिकेट मिपावर वाटले जाते का ह्याविषयी कल्पना नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
ज
जानु गुरुवार, 02/02/2017 - 06:57 नवीन
एक मात्र नक्की या धाग्यावर काही नेमक्या प्रश्नांची होऊ शकते आणि भविष्यातील काही मोठ्या चर्चांचे बीजारोपण पाहूया काय होते ते ....तसे अजो ची मते आणि काही प्रश्न विचार करावयास लावतात. आण्णा तुम्ही त्यांच्या वाक्यात काय चुक आहे त्याचे विवेचन केले तर अधिक योग्य होईल असे वाटते.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 गुरुवार, 02/02/2017 - 08:16 नवीन
इथे या फार लोकांचा फार गोंधळ होत आहे. "ब्राह्मण ही सर्वात प्रखर राष्ट्रवादी जात होती आणि आहे" हे सोडून त्या धाग्यावरचे अन्य लेखन त्या संदर्भात योग्य होते हे जितक्या लोकांना कळू शकते तितक्या लोकांना कळले आहे. फक्त इतकचे विधान उरले आहे. यात खालील उपचर्चा आहेतः १. मला जात हीच संकल्पना अमान्य आहे म्हणून हे विधान चूक आहे. (इति धागाकर्ते डांगे)* २. आम्हाला राष्ट्रवाद हीच संकल्पना मान्य नाही म्हणून हे विधान चूक आहे. (हे लोक अजून तरी विहिरीच्या कठड्याला थांबलेत. पन मारतील उडी. ) ३. आम्हाला श्रेष्ठत्व हीच संकल्पना अमान्य आहे. (असे म्हणणारे बरेच आहेत वर. एखाद्या परिमाणाचा गणितीय क्रम लावताच येत नाही म्हणून मी लावलेला क्रम नक्कीच चुकिचा आहे.) ४. धागापात्र (मंजे मी) एक नीच, संकुचित, जातीयवादी, असंस्क्रूत, बेशिक्षित , आणि विशेषतः निर्बुद्ध इ इ मनुष्य आहे असं म्हणायची घाई झाली आहे म्हणून हे विधान चूक आहे. ५. या धाग्यात इतर जातींची तुलना आहे, तुलना ही फक्त श्रेष्ठ आणि नीच अशी बायनरीच असते, म्हणून हे विधान करणेच चूक आहे, विधान चूक आहे का नाही ते असोच. ६. एखाद्या सामाजिक मंचावर (मंजे मिसळपावर) आपल्या सब्जेक्टिव मतांची अभिव्यक्ति करणेच चूक असते म्हणून हे विधान चूक आहे. (मंजे मी राष्ट्रवादाची व्याख्या, एकक, निकष, त्यांची गनिते, इ इ साभ्यास मत मांडलेले नाही. एक गट फिल टाकलेला आहे. मला जबर्‍या किंवा साधेही दाखले दिले तर मी अन्य मते स्वीकारायला तयार आहे हे त्यांना कळत नाही.) ७. बर्‍याच लोकांना ब्राह्मणांच्या बाजूने बोलणे कालसुसंगत वाटत नसावे. (१९८० मधे मी काही दलित साहित्य वाचले होते. त्यात ब्राह्मणांसाठी बरीच स्तुतिपर वाक्ये देखिल असायची जी अशीच मोघम स्वरुपाची होती. आता तो ट्रेंड बंद झाला आहे.) =================== या उपचर्चा धाग्याचा विषय नाही. ================= काही लोकांनी मात्र विधानाचा उत्तम प्रतिवाद केला आहे. राष्ट्रवाद, जात आणि श्रेष्ठत्व आणि तिन्ही व्हॅलिड संकल्पना मानून हे विधान कसं चूक वा बरोबर आहे यावर दुसरी मुख्य चर्चा होऊ शकते. ==================== संदीप डांगे आणि मी काही जालशत्रू इ नाहीत. मी त्यांचे काही धागे नि प्रतिसाद वाचलेत. मला त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल संशय नाही. त्यांच्या मनात आलेला "असे विधान लिहिणारे लोक कशा मानसिकतेचे असू शकतात" याला काहीतरी आधार असू शकतो. मला ते विधान का लिहावं वाटलं आणि डांगेंना हा धागा का काढावा वाटला यावर विचार केला तर हे भारतीय समाजाबाबत बरंच काही बोलून जातं. ही पहिली मुख्य चर्चा असू शकते. ================== बाकी ज्यांना बेसिक मॅनर नाहीत त्यांनी तरी किमान डिस्टर्ब करू नये.
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 02/02/2017 - 10:13 नवीन
<<<<बाकी ज्यांना बेसिक मॅनर नाहीत त्यांनी तरी किमान डिस्टर्ब करू नये.>>> -- पुन्हा तेच "सर्वात प्रखर". बाकीच्यांचा नंबर त्या खालोखाल लागतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 गुरुवार, 02/02/2017 - 16:57 नवीन
अहो, पुन्हा तेच मंजे काय? मी गप्प कधी बसलोय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ग
गामा पैलवान गुरुवार, 02/02/2017 - 09:15 नवीन
सुखीमाणसा,
ब्राह्मण सर्वात राष्ट्रवादी ही चुकीची समजूत आहे. तसे असते तर स्वतन्त्र भारतात मोठ्या सन्ख्येने ब्राह्मण सैन्यात गेले असते.
जुलमी इंग्रजी राजवटीस प्रखर राष्ट्रवादी ब्राह्मणांचा धोका वाटायचा. म्हणून ब्राह्मणांना मुद्दाम सैन्यापासून दूर ठेवण्यात आलं होतं. मात्र स्वतंत्र भारतात राष्ट्रवाद दाखवण्यासाठी सैन्यात जायची गरज नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस गुरुवार, 02/02/2017 - 15:46 नवीन
जो सैन्यात जातो तो राष्ट्रवादी नम्बर १.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
म
मोदक गुरुवार, 02/02/2017 - 16:07 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखीमाणूस
स
साहेब.. Fri, 02/03/2017 - 04:38 नवीन
हा फोटो एकदम कहर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 02/02/2017 - 09:19 नवीन
काश मी हा प्रतिसाद लिहिला नसता आणि काश अनुप ढेरेंनी नायकर म्हणजे केवळ रामद्वेष्टे होते असे नाही असे म्हटले नसते!!
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 02/02/2017 - 10:12 नवीन
अब पछताए का होत! पण एका मनोरंजक चर्चेबद्दल सर्व चर्चाकर्‍यांचे आभार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
स
सुखीमाणूस गुरुवार, 02/02/2017 - 15:48 नवीन
मस्त चालली आहे कि चर्चा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
A
arunjoshi123 गुरुवार, 02/02/2017 - 16:54 नवीन
ट्रुमन साहेब, इतिहासातल्या कोण्याही माणसाला कोणाच्याही सोबत बसवायचं (आंबेडकराशेजारी पेरीयार) आणि केवळ ऐतिहासिक आहे म्हणून कोणीही देशद्रोही नव्हता म्हणत सुटायचं ही एक घातक सोय होत चालली आहे. =========== भारतात देशद्रोही भारंभार होते आणि भले भले लोक काही बाबतीत देशद्रोही भूमिका घेऊन राहिलेत. त्यांच्यावर खणखणित टिका नाही केली तर देशद्रोह करणे आणि वर स्तुति मिळवणे फॅशनेबल बनून जाईल. ============ इथे प्रतिक्रिया देणे टाळू शकता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
अ
अनुप ढेरे गुरुवार, 02/02/2017 - 17:24 नवीन
खरं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
फ
फेदरवेट साहेब गुरुवार, 02/02/2017 - 10:25 नवीन
वरती जुन्या दिल्लीत म्हणजेच दिल्ली-६ मध्ये इलेक्ट्रिसिटीच्या तारांचे असते तसे प्रतिसादांचे जडजांबल झालेले आहे. तरी मी इथून सुरुवात करतोय. ++++++++++++++++++++++ तुमच्या एकंदरीत लिखाणाचे स्वरूप पाहून माझे काही आडाखे तयार झाले (आडाखेच, स्टीरिओटाईप नाही, गैरसमज नसावा) . हे आडाखे बरोबर वाटल्यास तशी पावती द्या किंवा मला तुमची नरेटिव्ह परत एकदा समजवून सांगा अशी आगाऊ विनंती करतो तुम्हाला. तर... तुमच्या हिशोबे १. क्रमवारी लावणे वाईट नाही (चढती भाजणी असो वा उतरती) २. ब्राह्मण 'सर्वात' देशभक्त म्हणले तरी त्यात इतर देशभक्त नाहीतच हे अध्याहृत नसते, तर लोक तसा समज करून घेतात (का ह्यावर आपण बोलायला नको, जाणतेअजाणतेपणी आपल्या हातून नवे stereotype तयार व्हायला नको) हे आडाखे जर बरोबर असलेच तर ते आधारभूत म्हणून वापरून मी नवे वाक्य रचतो '*क्ष' ही जात भारतात सर्वात अप्पलपोटी अन हलकट आहे ह्यात क्ष जातीला मनापासून राग येण्यासारखे काही नाही असे आपण मानाल का? कारण १. क्रमवारी लावलेली आहे २. क्ष जात हलकट आहे म्हणजे अ,ब,क,ड,ई जाती हलकट नाहीत हे अध्याहृत असेलच तुमचे मत जाणून घ्यायला उत्सुक आहे, कारण माझा पुढला मुद्दा तुमच्या उत्तरावर आधारित असेल असे म्हणतो. -फेदूदा * क्ष च्या जागी ज्याने त्याने आपापले बायस, वातावरण, सोय, वगैरेंच्या अनुषंगाने काय वाटेल ती जात लावून घ्यावी, ऑप्टिमिस्ट असाल तर आपल्या नावडत्या जातीचे नाव त्यात घालून क्षणभर आनंद घ्या, पेसिमिस्ट असाल तर त्यात स्वजातीचे नाव घालून विकटीम कार्ड खेळा रडा, छातीपिटून काय वाटेल ते करा, प्रॅग्मॅटीक असाल तर चर्चेत भाग घ्या.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 गुरुवार, 02/02/2017 - 16:47 नवीन
क्ष जातीला मनापासून राग येण्यासारखे काही नाही असे आपण मानाल का?
ब्राह्मण सर्वात प्रखर राष्ट्रभक्त म्हटल्यावर ब्राह्मणांना बरे, दुसर्‍या जातींना इर्ष्या वाटेल. तसेच वरच्या आपल्या विधानाने क्ष जातीला राग येईल. इतर जातींना हायसे वाटेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब
ग
गामा पैलवान गुरुवार, 02/02/2017 - 16:37 नवीन
ए फेदरवेट शायेब, स्साला तू बी आसा उफराटा लोजीक लावते नी. तू म्हन्ते :
बिन लढाऊ मध्ये ब्राह्मणच नाही तर तथाकथित गुन्हेगार जाती सुद्धा होत्या. उद्या त्यांनाही 'लढाऊ मध्ये नाव नव्हते म्हणजे ब्रिटिश त्यांना घाबरायचे म्हणुन ते सर्वात देशभक्त' म्हणाल!
स्साला मी काय बोलते की क्रिमिनल लोगांनला आर्मीमंदी परवेस दिला नाय. बिकॉज ते लोगां गुनहगार होते. एकदम चोक्कस? पछी, गुनहगार नवते तरीबी बामनलोगला एण्ट्री का नाय? आनी बाय द वे, तो फडके याद हाय तुला? आपनो वासुदेव बळवंत फडके? एमने रामोशी लोगां साथ मळवे मोटो धमाको उडाव्यो नी. अंग्रेजी बुकमां आं रामोशी बद्धू क्रिमिनल जाती छे. तरीपन हाय का नाय देशभक्त? तूच सांग. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
N
nanaba गुरुवार, 02/02/2017 - 19:50 नवीन
Not read and not commenting on any other factors.. but have read a book by American archeologist "debunking Aryan invasion theory". Tevhaa tari patalele pustak. http://world.time.com/2011/12/15/the-aryan-race-time-to-forget-about-it/ http://www.dnaindia.com/india/report-new-research-debunks-aryan-invasion-theory-1623744 Can't remember exact name of book
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Fri, 02/03/2017 - 07:12 नवीन
मिपावर अशा "चर्चा" होऊ लागल्या आहेत हे एक छान झाले. आता करमणुकीसाठी विशिष्ट ब्लॉग्ज वाचायची गरज उरली नाही.
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 02/03/2017 - 07:19 नवीन
यू सेड इट! पण चर्चा मुद्द्यावरून गुद्द्यावर येत नाहीत हे फार छान झालं बघ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
A
arunjoshi123 Fri, 02/03/2017 - 08:03 नवीन
त्याचं श्रेय मला द्यायला हवं. मला ज्या उपाध्या इथे बर्‍याच लोकांनी दिल्यात त्या मी शांतपणे ऐकून घेतल्यात. ========== (विशुमितच्या वतीनं मीच लिहितो) सर्वात प्रखर पुन्हा एकदा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Fri, 02/03/2017 - 08:08 नवीन
तुमच्या लिखाणाच्या स्टाईलची मी फॅन झाले आहे. शप्पत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
स
संदीप डांगे Fri, 02/03/2017 - 08:47 नवीन
+११०००००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ह
हतोळकरांचा प्रसाद Fri, 02/03/2017 - 08:53 नवीन
त्याचं श्रेय मला द्यायला हवं.
१००% सहमत! याचं श्रेय तुमच्या संयत प्रतिसादांना द्यावेच लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
अ
अनरँडम Fri, 02/03/2017 - 14:58 नवीन
तुम्ही या प्रतिसादावर काही मत नोंदवलेले नाही. असो. जात या गोष्टीबद्दल मोकळेपणाने चर्चा करता येत नाही याची खंत वाटते. जातीची अस्मिता विसरून चर्चा करणे काही कदाचित कठीणच असावे. सामान्यपणे अशा संवेदनशील विषयांवर चर्चा करतांना शब्दांचा वापर जपून केला जावा असे वाटते. अरूण जोशींना काही सल्ला देण्याची माझी पात्रता नाही पण त्यांनी आपली भुमिका थोडी विस्ताराने आणि काळजीपूर्वक मांडली तर त्यांना हवी असलेली फलदायी चर्चा होऊ शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
न
निष्पक्ष सदस्य Sun, 02/05/2017 - 10:23 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Sun, 02/05/2017 - 19:36 नवीन
ब्राह्मणांना श्या घातलेल्या बघून यदा यदा हि धर्मस्य वगैरे उबळ येऊन त्यातून हे असले प्रतिसादमुक्ताफळ प्रसवले गेले असावे. अजोला अशी अस्ताव्यस्त बेशिस्त विधाने करायची खोडच आहे. पण असे विधान केल्याची लाज वाटली पाहिजे. अशा विधानांमुळे ब्रिगेड्यांचे फावते हे एखाद्या ब्राह्मण सुप्रीमसिस्ट माणसालाही सहज लक्षात येईल, पण मुक्ताफळप्रेमाच्या भरात हे अजोला कळणार नाही, कळालं तरी प्रतिष्ठेचा मुद्दा करून किल्ला लढवत बसवायचा हा मूर्ख प्रकार आता थांबवला पाहिजे.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Mon, 02/06/2017 - 07:04 नवीन
ब्राह्मणांना श्या घातलेल्या बघून यदा यदा हि धर्मस्य वगैरे उबळ येऊन त्यातून हे असले प्रतिसादमुक्ताफळ प्रसवले गेले असावे.
असं नाही.
पण असे विधान केल्याची लाज वाटली पाहिजे.
मला अजिबात नाही.
अशा विधानांमुळे ब्रिगेड्यांचे फावते
मूळात ब्रिगेडी लोकांचे का फाववू नये असा माझा प्रश्न आहे. http://sambhajibrigade.blogspot.in/ http://www.sambhajibrigade.in यांच्याबद्दलच बोलत आहात ना? मी त्यांच्या तत्वज्ञानाचा सक्रिय पुरस्कर्ता, अनुयायी, इ इ नसलो तरी मला त्यांच्या चळवळीत काही चूक वाटत नाही. मूळात "ब्रिगेड्यांचे" हा शब्द फार द्वशात्मक आहे आणि डांगे अण्णा तुम्ही याच्यावर पण धागा काढायला हवा. काय मंता? (अवांतर - लिबरलापणाच्या नावाखाली भारताच्या मानबिंदू असलेल्या महतींना काहीही संबोधनाणारांना हिसका दाखवायची इच्छा असलेल्या लोकांचे मला कौतुकच आहे. सबब माझ्यामुळे ब्रिगेडचे फावले तर मला आनंद आहे. )
प्रतिष्ठेचा मुद्दा
असं काही नाही. उलट ग्रामीण, गरीब, बाहेरचा, इ इ म्हणून अप्रतिष्ठित राहण्याची, टोमणे खाण्याची मला आयुष्यभराची सवय आहे. ========================= माझं चरित्र वर्णन थांबवून विषय पाहाल तर काही बोलता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Mon, 02/06/2017 - 10:33 नवीन
यांच्याबद्दलच बोलत आहात ना? मी त्यांच्या तत्वज्ञानाचा सक्रिय पुरस्कर्ता, अनुयायी, इ इ नसलो तरी मला त्यांच्या चळवळीत काही चूक वाटत नाही. मूळात "ब्रिगेड्यांचे" हा शब्द फार द्वशात्मक आहे आणि डांगे अण्णा तुम्ही याच्यावर पण धागा काढायला हवा. काय मंता? (अवांतर - लिबरलापणाच्या नावाखाली भारताच्या मानबिंदू असलेल्या महतींना काहीही संबोधनाणारांना हिसका दाखवायची इच्छा असलेल्या लोकांचे मला कौतुकच आहे. सबब माझ्यामुळे ब्रिगेडचे फावले तर मला आनंद आहे. )
ऑ अच्चं जालं तल. ब्रिगेड्यांशी पाला पडला नाही म्हणून कौतुक सुचतंय. चालायचंच, उदगीरमध्ये ब्रिगेड नव्हती तेव्हाच्या काळात. तुम्हांला ते कधीच समजणार नाही. घरातली पाल मरते म्हणून सर्वांच्या जेवणाखाणात विष टाकण्याला समर्थन करण्याच्या गोष्टी तुम्ही करताहात ते पाहणं बाकी तुफान मनोरंजक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Mon, 02/06/2017 - 11:04 नवीन
ब्रिगेड्यांशी पाला पडला नाही म्हणून कौतुक सुचतंय. चालायचंच, उदगीरमध्ये ब्रिगेड नव्हती तेव्हाच्या काळात. तुम्हांला ते कधीच समजणार नाही.
तुमचा पाला पडला असेल आणि कोणी तुमच्याशी दुर्व्यवहार केला असेल तर मी त्याचा निषेध करतो. मात्र संभाजी बिग्रेडच्या अधिकृत भूमिकेत काहीच चूक नाही असे माझे मत आहे. विशुद्ध गांधीवाद सार्‍याच्या सार्‍या जगाने एकत्र स्वीकारला तर अतिशय मनोहर बाब असेल मात्र फक्त भारतातच आणि ते ही व्यक्तिगत स्वार्थासाठी गांधीवादाचे ढोंग करणारे लोक असतात म्हणजे गांधावाद कौतुक करायच्या लायकिचा नाही असं होत नाही. ============= माझ्या लहानपणी उदगीरला अपवादात्मक प्रसंग सोडले तर सर्व जाती आणि धर्मांत खूप सख्य होते. त्याचा माझ्या विचारसरणीवर परिणाम झाला असण्याची शक्यता मान्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Mon, 02/06/2017 - 11:21 नवीन
अधिकृत भूमिकेच्या प्रेमात पडणे म्हणजे भोळसटपणाची हद्द झाली. तुमचे शत्रू म्हणजे पुरोगामी. ब्रिगेडवाल्यांचे शत्रू म्हणजे ब्राह्मण. त्याकरिता ते पुरोगाम्यांची मदत घेतात. तेव्हा एकदा नक्की काय भूमिका आहे ते ठरवा.
माझ्या लहानपणी उदगीरला अपवादात्मक प्रसंग सोडले तर सर्व जाती आणि धर्मांत खूप सख्य होते. त्याचा माझ्या विचारसरणीवर परिणाम झाला असण्याची शक्यता मान्य आहे.
हो ना, आम्ही स्ट्रिक्टली ब्राह्मण घेट्टोमध्येच वाढलो. आम्हांला काही माहितीच नसेल कारण उदगीर पृथ्वीवर नव्हतेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Mon, 02/06/2017 - 11:47 नवीन
अधिकृत भूमिकेच्या प्रेमात पडणे म्हणजे भोळसटपणाची हद्द झाली.
भूमिका म्हणून भूमिका छानच आहे. पण दाखवायचे दात वेगळे अशी ती संघटना असेल असं मी का मानू? इतकी आयवोरी टोवर भूमिका सामान्य कार्यकर्त्याला सांगता , पाळता येत नाही हे सर्वत्र असतेच. --------- दुसरं जगाला उदाहरण मिळेल इतके व्यवस्थित ब्रिगेडी मोर्चे झालेत. म्हणून त्यांनी काही मूर्खपणा केला तर त्यांनाच्यावरही टिका करेन असं म्हणायच्या मूडमधे सध्याला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Mon, 02/06/2017 - 11:55 नवीन
तुम्ही काहीच मानू नका कारण तुम्ही पृथ्वीवर राहत नाही. टिपिकल फुरोगामी. शहराला शिव्या द्यायच्या आणि खेड्यांचे गोडवे गायचे पण रहायचे मात्र शहरातच. तद्वतच ब्रिगेड्यांबद्दल शष्प माहिती नसताना त्यांचे गोडवे गायचे. तुम्ही उच्च दर्जाची पुरोगामी कौशल्ये बाळगून आहात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Mon, 02/06/2017 - 12:12 नवीन
तुम्ही उच्च दर्जाची पुरोगामी कौशल्ये बाळगून आहात.
यू गॉट मी राइट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Mon, 02/06/2017 - 12:19 नवीन
येस, ज्या पुरोगाम्यांना तुम्ही शिव्या घालता त्यांचीच कौशल्ये इन केस आय वॉजंट क्लिअर इनफ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
ब
बॅटमॅन Mon, 02/06/2017 - 12:23 नवीन
ज्या पुरोगाम्यांना तुम्ही शिव्या घालता त्यांच्यासारखेच आहात तुम्ही. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Sun, 02/05/2017 - 19:38 नवीन
आणि हो, रच्याकने मला माझ्या ब्राह्मण असण्याची लाज आजिबात वाटत नसली तरी निव्वळ त्या जातीत जन्माला आलो म्हणून बिनकामी अभिमान बाळगावा असे वाटत नाही. हिंदू धर्माच्या ब्राह्मण जातीच्या कलेक्टिव्ह हेरिटेजशी संबंध आहे म्हणून या दोहोंबद्दल आत्मीयता आणि तज्जन्य थोडा फार अभिमान आहे. बिनकामाचा बिनडोक अभिमान नाही. बहुतेकदा कशात काही संबंध नसलेल्यांनाच अभिमान जास्त असतो.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Mon, 02/06/2017 - 06:48 नवीन
+1111111
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
संदीप डांगे Mon, 02/06/2017 - 06:55 नवीन
खरे तर, स्वतः चे काहीही कर्तृत्व नसलेल्याना जातीच्या आधारावर फुकटच्या अभिमानाचे झेंडे मिरवायचे असतात, ह्यात कोणीही चुकलेले नाही... शिवाजी महाराज, आंबेडकर, फुले, अशी लिस्ट मोठी आहे, महापुरुष जातिवार विभागले जाण्यामागचे कारण येनकेनप्रकारेन भासमान पेडिग्री सिद्ध करण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
A
arunjoshi123 Mon, 02/06/2017 - 08:07 नवीन
तुमच्या सगळ्या विधानांशी प्रचंड असहमत आहे.
शिवाजी महाराज, आंबेडकर, फुले, अशी लिस्ट मोठी आहे,
शिवाजी महाराज हे (महान) शिवाजी महाराज असण्यात त्यांच्या जातीच्या गुणांचा अजिबात काही संबंध नव्हता आणि ते गुण आपल्यात आहेत असं मानणं चूक, मिथाभिमानी आहे ही फार केविलवाणी विधाने आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ब
बॅटमॅन Mon, 02/06/2017 - 10:37 नवीन
ब्रिगेडचा अभिमान बाळगणे आणि नाझींचा अभिमान बाळगणे सारखेच. यू आर साउंडिंग लाईक टिपिकल फुरोगामी. कीटकभृंगन्याय झालाय. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Mon, 02/06/2017 - 07:16 नवीन
मला माझ्या ब्राह्मण असण्याची लाज आजिबात वाटत नसली तरी निव्वळ त्या जातीत जन्माला आलो म्हणून बिनकामी अभिमान बाळगावा असे वाटत नाही.
मी मराठा म्हणून जन्मलो नाही पण मला ब्रिगेडचा अभिमान आहे. "सर्वात प्रखर ..." विधानाचा आणि "मी" कोण्या जातीत जन्म घेतला आहे त्याचा संबंध न जोडण्याची विनंती. -------------------
हिंदू धर्माच्या ब्राह्मण जातीच्या कलेक्टिव्ह हेरिटेजशी संबंध आहे म्हणून या दोहोंबद्दल आत्मीयता आणि तज्जन्य थोडा फार अभिमान आहे.
मला आदर आहे आपल्या भावनांचा.
बहुतेकदा कशात काही संबंध नसलेल्यांनाच अभिमान जास्त असतो.
असं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Mon, 02/06/2017 - 10:35 नवीन
मी मराठा म्हणून जन्मलो नाही पण मला ब्रिगेडचा अभिमान आहे. "सर्वात प्रखर ..." विधानाचा आणि "मी" कोण्या जातीत जन्म घेतला आहे त्याचा संबंध न जोडण्याची विनंती.
ब्रिगेडचा इतकाच अभिमान आहे तर ब्राह्मणांबद्दल त्यांनी काय मुक्ताफळे उधळलीत तेवढे बघा. म्हणे अभिमान. =)) तुमच्या तर्कशून्य मनःपूत मुक्ताफळांचा बाकी मी फ्यान आहे हे मात्र नमूद केलेच पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Mon, 02/06/2017 - 11:30 नवीन
ब्रिगेडचा इतकाच अभिमान आहे तर ब्राह्मणांबद्दल त्यांनी काय मुक्ताफळे उधळलीत तेवढे बघा.
आपण जातीनिरपेक्ष आहोत, जात मानत नाहीत असे म्हणत लिबरल मंडळींनी (जी लोकांच्या मते प्रामुख्याने ब्राह्मण वा तत्सदृश असतात.) काय म्हणावे व काय म्हणू नये याला मर्यादा असाव्यात. इतिहासाचा अभ्यास हा निर्दय आणि संवेदनाशून्य नसावा. लिबरल लोक कसे विचार करतात? १. विवाहसंस्था अनावश्यक आहे. २. लैंगिक निष्ठा मूर्खपणा आहे. ३. वयात आलेल्या सुज्ञ लोकांत असलेले विवाहबाह्य संबंध उगाचच मूर्खपणे इ अनैतिक इ मानले जातात. आता असे विचार असलेले लोक काय करतात? मग उचला इतिहासतली पात्रे आणि लावा काहीही जोडया. या पात्रांचे लिबरल नसलेल्या लोकांच्या हृदयात काय स्थान आहे त्याचे काय? ते मूर्ख, गेले उडत. लोकवड्म्ता इतिहास म्हणून लिहिल्या असे नसले तरी, लोकवदंतांचा इतिहास लिहिण्यासाठी पाश्चिमात्य इतिहासकाराला भेटेलेले भारतीय लोक कोण? असो. त्या मुक्ताफळांना संदर्भ आहे. त्या संदर्भात ती मला योग्य वाटतात.
तुमच्या तर्कशून्य मनःपूत मुक्ताफळांचा बाकी मी फ्यान आहे हे मात्र नमूद केलेच पाहिजे.
आपला मी फॅन आहेच, त्याचा पुनरुच्चार देखिल आवश्यक नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Mon, 02/06/2017 - 11:38 नवीन
ब्राह्मण पुरुषांना ठार मारून त्यांच्या स्त्रियांना बहुजनांमध्ये वाटून घ्या वगैरे मुक्ताफळांना कसला शाट्टाचा संदर्भ आहे ते सांगा की. तुमचे ब्रिगेडप्रेम निव्वळ अज्ञानमूलक आहे इतकेच मला फक्त सांगायचे आहे. एवढे करूनही ब्रिगेड्यांना गोंजारायचे असेल तर खुशाल गोंजारा. उंटाच्या बुडख्याचा मुका घ्यायला आपल्या संविधानाने आवरलेले नाही. तुमचे ब्रिगेडप्रेम अज्ञानमूलक, हास्यास्पद आणि तितकेच अर्थहीन आहे. लिबरलांना काय द्यायच्या त्या शिव्या द्या. ब्रिगेडला जवळ करतो आहोत म्हणजे नक्की काय करतो आहोत याची तुम्हांला थोडीही कल्पना नाही हे मला अधोरेखित करून सांगायचे आहे. बाकी मला कशाची काहीही पडलेली नाही. चालूद्या उदगिरीलाल के हसीन सपने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा