पुणे ते लेह (कारने)
नमस्कार मंडळी,
गेली ४ वर्षे प्लॅन केलेली आणी दरवेळी काहीतरी टिनपाट कारणाने बारगळलेली पुणे ते लेह लडाख ट्रिप ह्या वर्षी जून मध्ये करण्याचे ठरवले आहे. अंदाजे १ जूनला पुण्यातून निघायचे असा बेत आहे. (९९.९९% ह्या वेळी ट्रिप होईलच).
(मनाली वरून लेह गाठायचे आणी श्रीनगर वरून परत यायचे का उलट करायचे ह्याचा अजून निर्णय झालेला नाही)
ट्रिपच्या अनुषंगाने मोदक रावांना भेटून तसेच कारने ट्रिप केलेल्या एका व्यक्तीचा अनुभव वाचून प्राथमिक माहिती घेतली आहे. मोदक रावांच्या अनुभवानुसार जून हाच योग्य महिना आहे जायचा. फक्त त्यांच्या आणी माझ्या ट्रिप मधील एक मोठा फरक म्हणजे मोदकरावानी बुलेट वरून ट्रिप केली होती तर मी ही ट्रिप फोर्ड फिगो डिझेल कारने करणार आहे. एक लहान मूल (वय वर्षे ५) धरून ३ मेंबर असल्याने बाईक शक्यच नाही. तरी ह्या अनुषंगाने काही माहिती अपेक्षित आहे.
१) ह्या गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स थोडा कमी असल्याने तिथल्या दगडगोट्यांनी भरलेल्या रस्त्यांवर गाडी नक्की खालून खूप घासली जाणार आहे. एका व्यक्तीने 'किमान २०० मिमी. ग्राउंड क्लिअरन्स असलेली गाडी हवी. फोर्ड फिगोने ही ट्रिप करू नका' असा सल्ला दिलेला आहे पण माझ्याकडे दुसरा पर्याय आज तरी नाही. तर काहीतरी मोठा दणका बसून आम्ही तिथे अडकून पडू नये यासाठी गाडीची कोणती कामे करून घेणे आवश्यक आहे ? ?
२) स्वतः कोणत्या मूलभूत गोष्टी शिकणे गरजेचे आहे. जसे की पंक्चर बदलणे शिकले जाईल. पण अन्य कोणत्या गोष्टी 'स्वतःला' येणे गरजेचे आहे ?
३) कारचे कोणते स्पेअर पार्टस घेऊन जाणे गरजेचे आहे ?
४) सर्व काळजी घेऊन देखील काही कारणाने गाडी तिथे बंद पडली तर कोण मदत करू शकेल तिला किमान मनाली किंवा चंदीगड पर्यंत आणायला ?
५) अन्य कोणतीही माहिती जी उपयुक्त ठरेल.
उदा. - तिथल्या रस्त्यांवर गाडी चालवतानाची घ्यायची काळजी, जवळ बाळगायची कागदपत्रे, वस्तू वगैरे.
वडोदरा ते अम्रुतसर__/\__ दंडवत घ्या राजे.. १३००+ किमी एका दिवसात. कोणती गाडी होती..?? तसेच "लेह - नुब्रा व्हली - लेह - पँगोंंग लेक - लेह" असा प्रवास करण्याचे कांही विशेष कारण..? लेह - नुब्रा- पँगाँग - लेह असे करता आले असते की.