Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पुणे ते लेह (कारने)

अ
अभिजीत अवलिया
Fri, 02/24/2017 - 16:50
💬 54
नमस्कार मंडळी, गेली ४ वर्षे प्लॅन केलेली आणी दरवेळी काहीतरी टिनपाट कारणाने बारगळलेली पुणे ते लेह लडाख ट्रिप ह्या वर्षी जून मध्ये करण्याचे ठरवले आहे. अंदाजे १ जूनला पुण्यातून निघायचे असा बेत आहे. (९९.९९% ह्या वेळी ट्रिप होईलच). (मनाली वरून लेह गाठायचे आणी श्रीनगर वरून परत यायचे का उलट करायचे ह्याचा अजून निर्णय झालेला नाही) ट्रिपच्या अनुषंगाने मोदक रावांना भेटून तसेच कारने ट्रिप केलेल्या एका व्यक्तीचा अनुभव वाचून प्राथमिक माहिती घेतली आहे. मोदक रावांच्या अनुभवानुसार जून हाच योग्य महिना आहे जायचा. फक्त त्यांच्या आणी माझ्या ट्रिप मधील एक मोठा फरक म्हणजे मोदकरावानी बुलेट वरून ट्रिप केली होती तर मी ही ट्रिप फोर्ड फिगो डिझेल कारने करणार आहे. एक लहान मूल (वय वर्षे ५) धरून ३ मेंबर असल्याने बाईक शक्यच नाही. तरी ह्या अनुषंगाने काही माहिती अपेक्षित आहे. १) ह्या गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स थोडा कमी असल्याने तिथल्या दगडगोट्यांनी भरलेल्या रस्त्यांवर गाडी नक्की खालून खूप घासली जाणार आहे. एका व्यक्तीने 'किमान २०० मिमी. ग्राउंड क्लिअरन्स असलेली गाडी हवी. फोर्ड फिगोने ही ट्रिप करू नका' असा सल्ला दिलेला आहे पण माझ्याकडे दुसरा पर्याय आज तरी नाही. तर काहीतरी मोठा दणका बसून आम्ही तिथे अडकून पडू नये यासाठी गाडीची कोणती कामे करून घेणे आवश्यक आहे ? ? २) स्वतः कोणत्या मूलभूत गोष्टी शिकणे गरजेचे आहे. जसे की पंक्चर बदलणे शिकले जाईल. पण अन्य कोणत्या गोष्टी 'स्वतःला' येणे गरजेचे आहे ? ३) कारचे कोणते स्पेअर पार्टस घेऊन जाणे गरजेचे आहे ? ४) सर्व काळजी घेऊन देखील काही कारणाने गाडी तिथे बंद पडली तर कोण मदत करू शकेल तिला किमान मनाली किंवा चंदीगड पर्यंत आणायला ? ५) अन्य कोणतीही माहिती जी उपयुक्त ठरेल. उदा. - तिथल्या रस्त्यांवर गाडी चालवतानाची घ्यायची काळजी, जवळ बाळगायची कागदपत्रे, वस्तू वगैरे.

प्रतिक्रिया द्या
14921 वाचन

💬 प्रतिसाद (54)
अ
अभिजीत अवलिया Sun, 03/05/2017 - 13:58 नवीन
मिपा परंपरेला जागून ही ट्रिप व्यवस्थित पार पडावी ह्यासाठी बरेचजण उपयुक्त माहिती देत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद. चिमणराव, मला जी माहिती द्याल ती इथे पण टाका. म्हणजे भविष्यात ट्रिप करू इच्छिणाऱ्या सगळ्यांना उपयुक्त होईल.
  • Log in or register to post comments
भ
भटकंती अनलिमिटेड Mon, 03/06/2017 - 08:15 नवीन
इतरांच्या माहितीकरिता मीही आपले व्यनिवर झालेले संभाषण इथ पोस्ट करतो. झालाच कुणाला फायदा तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
क
किल्लेदार Mon, 03/13/2017 - 04:12 नवीन
प्रवासासाठी शुभेच्छा !!!
  • Log in or register to post comments
ब
बाबा पाटील Tue, 03/21/2017 - 10:34 नवीन
माझ्याकडे XUV 500 automatic आहे, आणखी २-३ गाड्यांचा ग्रुप बनवुन जायचा विचार करतोय. पण यातील एकपण गाडी ४*४ नाही, तर उंची आणी विरळ वातावरनात काही त्रास होणार नाही ना ?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा