Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

PAKISTAN DIDN’T KILL MY DAD “WAR” DID !!

ड
डँबिस००७
Wed, 03/01/2017 - 13:27
🗣 144 प्रतिसाद
एका राम सुब्रमण्यम नावाच्या बेकार माणसाने एका बिंडोक मॉडेलला घेऊन " वॉईस ऑफ राम " या बॅनरसाठी एक फिल्म बनवली. त्यानंतर हा उठलेला गदारोळ !! PAKISTAN DIDN’T KILL MY DAD “WAR” DID !! ह्या वाक्याचा अर्थ कोणी मला समजुन सांगेल का ? ह्या राम सुब्रमण्यंम चे काम : While the Profile for Peace campaign found many takers from both the neighbouring countries, celebrities like filmmaker Mahesh Bhatt and music composer Vishal Dadlani also extended their support. It was relaunched last year after Indian army’s surgical strike across the Line of Control (LoC) into Pakistani territory. Subramanian who has volunteered for Arvind Kejriwal’s anti-corruption political movement claims that he is not a member of the Aam Aadmi Party. गुरमेहर कौरचे वडिल पाकिस्तान बरोबर झालेल्या कारगील युद्धात शहीद झाले, तेंव्हा ही गुरमेहेर फक्त २ वर्षांंची होती.

प्रतिक्रिया द्या
28850 वाचन

💬 प्रतिसाद (144)
व
वरुण मोहिते Fri, 03/03/2017 - 08:55 नवीन
ते नेपाळविषयक धोरणाचे काय झाले . माहिती हवी आहे जरा . ते नेपाळी वाचता येतं म्हणून विचारलं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Fri, 03/03/2017 - 09:00 नवीन
हो नेपाळी वाचता येते ना. देवनागरीच असते त्यांची लिपी. वाचता न यायला काय प्रॉब्लेम आहे? फक्त प्रॉब्लेम असतो की काय लिहिले आहे त्याचा अजिबात पत्ता लागत नाही.नेमका तसाच फिल तुमचा तो प्रतिसाद वाचून आला. म्हणजे देवनागरी लिपीतला प्रतिसाद पण त्यातून नक्की काय म्हणायचे आहे याचा अजिबात पत्ता लागत नव्हता. इतर कोणाला जर त्या प्रतिसादातून नक्की काय म्हणायचे आहे (की विचारायचे आहे) हा अर्थबोध झाला तर त्या मिपाकराला माझ्याकडून एक मसाला सॅन्डविचची ट्रीट. ऑफर आजच लागू आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
व
वरुण मोहिते Fri, 03/03/2017 - 09:18 नवीन
आता परत एकदा सविस्तर -स्वप्नाळू पण आणि भाबडेपण ह्या विषयी जे हिंदुत्ववादाचा सतत प्रचार करून आधीच घडलेल्या पाश्वभुमी सोबत पंतप्रधान होतात ते भाबडे असतील का??? पाकिस्तान को एक दिन मैं देख लुंगा ते भाबडे असतील का ?? गोमाता को कैसे मार शकते हे बोलणारे आज भारत आज बीफ निर्याती वर प्रथम क्रमांकावर आहे म्हणून विचारलं असं भाबडेपण कसं जमत ?? शेवटचा मुद्दा कोणी काही केलं कि भाबडेपणा स्वप्नाळू बोलून क्लीनचीट द्यायची का??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Fri, 03/03/2017 - 09:38 नवीन
जे हिंदुत्ववादाचा सतत प्रचार करून आधीच घडलेल्या पाश्वभुमी सोबत पंतप्रधान होतात ते भाबडे असतील का
असू शकतील किंवा नसूही शकतील. मी स्वतः मोदी नाही की मोदींचे काहीही झाले तरी समर्थन करायचेच असे ठरविलेलाही कोणी नाही. एक सामान्य मतदार म्हणून माझ्या परिने मी मोदींच्या कामाचे इव्हॅल्युएशन करणार. आणि परराष्ट्रसंबंध या गुंतागुंतीच्या विषयात सगळी माहिती चव्हाट्यावर येत नसते आणि पडद्याआडून अनेक गोष्टी होत असतात. तेव्हा रिझल्ट उघडउघड दिसले नाहीत तरी मधूनमधून ये मनमोहनका नही मोदीका हिंदुस्तान आहे वगैरे गोष्टींवरून काहीतरी चालू असावे हे म्हणायला वाव आहे इतकेच. तेव्हा मोदी भाबडे आहेत हा हायपोथिसिस अजून तरी रिजेक्ट होत आहे. भविष्यात काय होईल हे माहित नाही. भविष्यात तो हायपोथिसिस रिजेक्ट करता आला नाही तर मग एक सामान्य मतदार म्हणून काय करायचे ते तेव्हा ठरवेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 03/03/2017 - 08:19 नवीन
म्हणजे मोदिजींनी जे केलं (शपथविधीला आमंत्रण, 'पाकड्यांच्या' प्रधानमंत्र्याला सरप्राइज व्हिजिट देणं इ.) ते सगळं शेखमहंमदी मूर्खपणा होता? "मित्रत्वाची पुरेशी संधी देऊन नंतर दुसरा कोणताच उपाय बाकी राहीला नाही म्हणून कडक उपाय सुरू केले आहेत" असे जगापुढे सिद्ध करावे लागते. युद्ध/सामरिक कारवाई करताना आणि त्यानंतर, आपल्या बाजूने महत्वाचे देश असावेत किंवा कमीत कमी ते तटस्थ तरी असावेत यासाठी आवश्यक मुत्सद्देगिरी असते. असे काही सर्वमान्य मानदंड महासत्ता असलेल्या अमेरिकेलाही पाळावे लागतात. म्हणूनच कोणतेही युद्ध किंवा सामरिक कारवाई करण्याअगोदर अमेरिका युएनचा आधार घेते. जर मोदींनी तसे करून, "खूप प्रयत्न करूनही पाकिस्तान सुधारत नाही" हे जगासमोर सिद्ध न करता ताबडतोप कडक कारवाया केल्या असत्या तर आता आंतारराष्ट्रीय राजकारणात पाकीस्तान जितका एकाकी पडला आहे ते झाले नसते. आज पाकीस्तानचे आंतरराष्ट्रीय मंचावर पाठींबा देईल असा (भारतविरोधी हितसंबंधांस असलेला) चीन सोडून इतर कोणही देश नाही. सर्जिकल स्ट्राईक्सनंतर एकाही देशाने भारताला आक्रमक म्हटले नाही. हे झाले देशाबाहेरील पाठींब्याचे. देशांतर्गत पाहिले तर, पाकिस्तानला पुरेशी संधी न देता, मोदींनी कडक धोरण सुरू केले असते तर भारतातले विरोधी पक्ष गप्प बसले असते का ? आधिपासूनच ते मोदींना हिटलर, आक्रमक एकाधिकारशहा, इ म्हणतच होते, त्यांच्या हाती आयतेच कोलीत मिळाले असते आणि... मोदींना विरोध करताना पाकिस्तानला मदत होत आहे का, याचा विचार केला जात नाही हे तर आपण दिवसगणिक नवीन उदाहरणात पाहत आहोतच. राजकारण साध्या सोप्या सरळ लॉजिकने चालत नाही, ते करताना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय वस्तूस्थितीचा विचार करावाच लागतो. ते दोन्ही बाजूंना समान असलेल्या खेळाच्या लॉजिकल नियमांनी बांधील नसते. ते प्रत्येक देशाचे हितसंबंध आणि काही सर्वमान्य दंडक यांच्या क्रमांतरण आणि संयोजन (permutation and combination) यावर चालते. देशातील आणि देशाबाहेरील विरोधक, संधी मिळेल तेव्हा आणि संधी मिळेल त्याप्रमाणे, पाय ओढायला टपलेले असतातच. त्यांना जरूर ते, जरूर तसे उघड व छुपे शह द्यावेच लागतात. मोदींचे वर्तन हा त्याचा भाग होता, हे आता त्याचे जागतिक परिणाम समोर आले असताना, मानायला हरकत नसावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुलाम
व
वरुण मोहिते Fri, 03/03/2017 - 08:41 नवीन
युनो मध्ये अनेकदा पाकिस्तान ला उघड पडलंय. ह्या पेक्षा हास्यास्पद स्थिती १९६५ १९७१ ला झालीये पुढे ९९ ला पण ९९ ला आपण भाव दिला म्हणून डोक्यावर चढले असा मुद्दा उपस्थित झाल्याने अजूनपर्यंत तोडगा काढता आला नाही . बाकी आंतरराष्ट्रीय राजकारण कसे चालते आपल्याला माहित असेलच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 03/03/2017 - 08:53 नवीन
आंतरराष्ट्रीय राजकारण एकाद्या कृतीने होत नाही, भारताने "पाणी नाकाच्या वर गेले की कडक खेळी करून नंतर माती खात राहणे" हा "नी जर्क रिअ‍ॅक्शन" चा खेळ खूपदा खेळलेला आहे. यशस्वी आंतरराष्ट्रीय राजकारण ही विचारपूर्वक आणि चिकाटीने अनेक मुत्सद्दी खेळ्यांच्या साखळीचा परिपाक असतो. सद्या तेच चालले आहे असा माझा सकारण अंदाज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
व
वरुण मोहिते Fri, 03/03/2017 - 09:07 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
च
चिर्कुट Fri, 03/03/2017 - 07:31 नवीन
काहीही झालं की डाव्या विचारवंतांविषयीची उर्फ बुबुडाविपुमाधविंविषयीची चीड व्यक्त करायची संधी आपण सोडत नाही असे दिसते..असो. जर "भारत-पाकिस्तानमध्ये शांतता व्हावी अशी शेखमहंमदी स्वप्ने ठेवणे हा मूर्खपणा असेल", तर तिकडे जाउन केक कापणे, शरीफच्या वाढदिवसाला ट्विट करणे, आयएसआयला तपासासाठी बोलावणे ई. काय आहे हो? प्रत्येकवेळी आपण करू तेच देशासाठी आणि इतर सगळे करतील ते देशद्रोही, ही मांडणी नथुरामपासून आजतागायत बदलण्याची काहीच चिन्हे नाहीत. त्यामुळे हिंदू असूनही अस्ल्या डबल स्टँडर्डवाल्यांना कधी सपोर्ट करु वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Fri, 03/03/2017 - 08:16 नवीन
काहीही झालं की डाव्या विचारवंतांविषयीची उर्फ बुबुडाविपुमाधविंविषयीची चीड व्यक्त करायची संधी आपण सोडत नाही असे दिसते..असो.
आणि सोडणारही नाही.
जर "भारत-पाकिस्तानमध्ये शांतता व्हावी अशी शेखमहंमदी स्वप्ने ठेवणे हा मूर्खपणा असेल", तर तिकडे जाउन केक कापणे, शरीफच्या वाढदिवसाला ट्विट करणे, आयएसआयला तपासासाठी बोलावणे ई. काय आहे हो?
याचे उत्तर याच चर्चेत दोनदा दिले आहे. तेव्हा परत लिहित नाही.
प्रत्येकवेळी आपण करू तेच देशासाठी आणि इतर सगळे करतील ते देशद्रोही, ही मांडणी नथुरामपासून आजतागायत बदलण्याची काहीच चिन्हे नाहीत. त्यामुळे हिंदू असूनही अस्ल्या डबल स्टँडर्डवाल्यांना कधी सपोर्ट करु वाटत नाही.
ओक्के.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिर्कुट
ग
गामा पैलवान Fri, 03/03/2017 - 08:31 नवीन
चिर्कुट,
हिंदू असूनही अस्ल्या डबल स्टँडर्डवाल्यांना कधी सपोर्ट करु वाटत नाही.
कम्युनिस्ट कसे स्वत:ला जगातल्या शोषितांचे एकमेव तारणहार मानतात. अगदी तस्संच माझ्यासारखे हिंदुत्ववादी स्वत:स अखिल हिंदूंचा तारणहार समजतात. डबल स्टँडर्डचा उगम कुठे आहे ते तुम्हाला कळलं असेलंच. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिर्कुट
च
चिर्कुट Fri, 03/03/2017 - 10:04 नवीन
म्हणजे, त्यांनी शेण खाल्लं म्हणून आपण पण खायचं असं आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Fri, 03/03/2017 - 13:50 नवीन
चिर्कुट, त्याचं काय आहे की रामदासस्वामी म्हणून गेलेत की : धटासी असावे धट । उद्धटाशी उद्धट ॥ खटनटाचे नटखट । अगत्य करी ॥ आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिर्कुट
च
चिर्कुट Fri, 03/03/2017 - 14:26 नवीन
माझ्या अल्पबुद्धीला या श्लोकाचा आणि वर चाललेल्या संवादाचा काय संबंध आहे ते कळत नाही. जाऊदे. त्यावरून आठवलं, लहानपणी मी कुणाशी असं "उद्धटाशी उद्धट" वागायचा प्रयत्न केला की एक वाक्य माझी आजी नेहमी बोलायची - "तू पण त्याच्यासाखाच वागलास तर तुझ्यात आणि त्याच्यात फरक काय?" थोडक्यात आपली पातळी किती सोडायची ते आपण ठरवावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
द
दीपक११७७ Fri, 03/10/2017 - 18:46 नवीन
अप्रतिम _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
स
सचु कुळकर्णी Wed, 03/01/2017 - 20:48 नवीन
छान अन मुद्देसुद प्रतिसाद, एक प्रश्न सतत पडतो म्हणजे हि मंडळि फेब्रुवारी च्या आसपासच का जागे होतात ?
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 03/02/2017 - 05:34 नवीन
एक प्रश्न सतत पडतो म्हणजे हि मंडळि फेब्रुवारी च्या आसपासच का जागे होतात ?
याचे कारण एका अत्यंत कनवाळू महामानवाला जुलमी भारत सरकारने फेब्रुवारी महिन्यात अन्यायाने फासावर लटकवले आणि त्याची पुण्यतिथी फेब्रुवारी महिन्यात आहे ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचु कुळकर्णी
च
चौकटराजा गुरुवार, 03/02/2017 - 01:35 नवीन
या मुलीचे लॉजिक लावायचे झाल्यास तिच्या वडिलाना ना पाकने मारले ना युद्धाने. अनेक युगे गेली तरी मानव हा एक प्राणी आहे हे सत्य आहे. सर्व धर्मांची अशी श्रदद्धा आहे की " ईश्वरेच्छा बलियसी " सबब याला परमेश च जबाबदार आहे. आणि हो त्याला उत्पत्ति, स्थिती व लय याचा समवय साधायचा असल्याने त्याने मानवामधे हेतूपूर्वक षटरिपुंची स्थापना केली आहे. त्यात मोह हा एक आहे. मग तो मोह पाण्याचा असो वा जमीनीचा वा साधनसंपत्त्तीचा त्यानेच युद्धे होत असतात. सब सार्‍याला तो कर्ता करविताच जबाब्दार आहे. .... जर तिच्या तर्काने खोलात जायचे झाले तर......
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी गुरुवार, 03/02/2017 - 03:02 नवीन
गॅरी साहेब योग्य आणि विचारपूर्वक केलेला प्रतिसाद आवडला
  • Log in or register to post comments
फ
फेदरवेट साहेब गुरुवार, 03/02/2017 - 04:18 नवीन
तुमचे विचार बहुतांशी पटलेले आहेत, डावे विचारवंत काही तर्क सोवळे नाहीत हे बरोबरच आहे. प्रश्न तो नाही, प्रश्न डांगेंनी इतर धाग्यावर विचारला तसाच आहे 'युद्धात बाप गमावलेल्या पोरीने युद्धविहीन जगाची कल्पना केली, तर त्यात चूक काय?' मी ह्या प्रश्नाला थोडे मोफिडाय करतो. 'युद्धात बाप गेलेल्या पोरीने युद्धविहीन जगाची कल्पना करणे हे प्रॅक्टिकल नसले तरी तिच्या वैयक्तिक आयुष्या संदर्भातील फॅक्ट पाहून तिने युटोपियन संकल्पना मांडली तरी तिच्यावर शरसंधान करणे कितपत माणुसकी अन औचित्याला धरून असेल?' दुसरे म्हणजे, तुमचे एकंदरीत मत हे आत्यंतिक उजवे किंवा डावे नाही हे तर स्पष्ट आहे, तरी तुम्ही जेव्हा 'पाकडे' म्हणता त्यात नेमके कोण कोण समाविष्ट असते १ पाकी जनता २ पाकी सरकार ३ पाकी मुलकी अधिकारी ४ पाकी लष्करी अधिकारी हे विचारायचे कारण म्हणजे वरील चार ह्या पाकिस्तानात वेगवेगळ्या संकल्पना आहेत, अन नंबर १ वगळता उर्वरित ३ आपापसात एकमेकांवरच कुरघोड्या करायच्या प्रयत्नात आहेत/असतात त्यामुळे एकाने काढलेले आदेश बाकी दोन पाळत नाहीत किंवा एकंदरीत पाक आर्मी बद्दल बोलताना तर एका वाक्यात बोलता येते "इन इंडिया, स्टेट पोझसेस ऍन आर्मी इन पाकिस्तान, आर्मी होल्ड्स अँड कंट्रोल्स अ स्टेट" त्यामुळे तुमच्यासारखा जबाबदार माणूस जेव्हा 'पाकडे' वृत्ती वर बोलतो तेव्हा तो नेमका कोणावर बोलतोय असा एक कुतूहलवजा प्रश्न येतो मनात
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 03/02/2017 - 05:26 नवीन
'युद्धात बाप गेलेल्या पोरीने युद्धविहीन जगाची कल्पना करणे हे प्रॅक्टिकल नसले तरी तिच्या वैयक्तिक आयुष्या संदर्भातील फॅक्ट पाहून तिने युटोपियन संकल्पना मांडली तरी तिच्यावर शरसंधान करणे कितपत माणुसकी अन औचित्याला धरून असेल?'
नाहीच ना. मी पण माझ्या प्रतिसादात म्हटलेच आहे की अशी शेखमहंमदी स्वप्ने बघणे हा मूर्खपणा असला तरी त्यात आक्षेप घेण्यासारखे नाही. तरीही एक गोष्ट पुढे येत आहे. गुरमेहर ही काही हलकटांच्या हातातील एक प्यादे म्हणून पुढे येत आहे. काल सिमरनजितसिंग मान यांनीही तिच्या समर्थनार्थ टिवटिवाट केला आहे अशा बातम्या आहेत. नेहमीचे यशस्वी कलाकार--केजरीवाल, काँग्रेसचे नेते इत्यादी आहेतच. असे लोक प्यादे म्हणून एखाद्याला वापरत असतील तर ती व्यक्ती मुळात काही प्रमाणात तरी तशी असलीच पाहिजे. केजरीवाल माझ्यासारख्या कोणाला प्यादे म्हणून वापरूच शकणार नाहीत कारण माझ्यासारखे पहिल्यांदाच तो प्लॅन हाणून पाडतील. आणि अशा लोकांचे प्यादे म्हणून ती मुलगी स्वतःला वापरू देत असेल तर त्याबद्दल काही प्रमाणात तरी तिच्यावर टिका होणारच.
तुम्ही जेव्हा 'पाकडे' म्हणता त्यात नेमके कोण कोण समाविष्ट असते
भारताविषयी वाईट भावना असलेले सगळे. मग ते सामान्य लोक असोत की सरकारमध्ये बसलेले असोत की आय.एस.आय मधले असोत की लष्करातले असोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब
स
सुबोध खरे गुरुवार, 03/02/2017 - 06:05 नवीन
फेदरवेट साहेब कामटे, तुकाराम ओंबळे इ लोकांना मुंबईत घुसून कसाब आणि त्यांच्या इतर दहशतवाद्यांनी मारले.हे तर युद्ध नव्हते ना? कि रुमालात हात बांधून पाकिस्तानला शरणागत जायचे? तुम्ही म्हणाल त्या मागण्या मान्य करू पण युद्ध नको. तत्व म्हणून युद्ध नको हे ठीक पण शेळीची अहिंसा हि भंपक असते हे लक्षात ठेवले पहिजे. जैन आणि बुद्ध धर्म भारतात टिकले कारण हिंदूंनी शास्त्र हातात घेतले होते हे विसरून चालणार नाही. गुरमेहर कौर च्या वडिलांचे हौतात्म्याला वंदन करून मी एवढेच म्हणेन कि आपला वापर कुणाला आणि कशासाठी करू द्यायचा हे त्या मुलीला समजत नसेल तर ते तिचं दुर्दैव आहे. तिच्या सारख्या अशा काही अधिकाऱ्यांच्या मुलांच्या संपर्कात आजही मी आहे. ( ज्यांचे वडील लष्करी कारवाईत हुतात्मा झाले.) जर ती आपल्या वडिलांच्या हौतात्म्याचे राजकारण करत असेल तर तिचा पूर्ण निषेध. आता राहिला प्रश्न पाकडे म्हणजे कोण यात तुम्ही वर्णन केलेले चारही लोक येतात होय पाकिस्तानी जनता सुद्धा. कारण गेल्या ७० वर्षात त्यांना भारत काश्मीर मध्ये मुसलमानांवर अनन्वित अत्याचार करीत आहे आणि काश्मीरमधील मुसलमानांच्या अत्याचाराचा बदला घेतला पाहिजे हा इतिहास सातवी आठवी पासून शिकवला जातो. मुद्दाम पाकिस्तानी शाळात शिकवला जाणारा इतिहास काय आहे याचे खोदकाम करून पहा. अख्ख्या दोन पिढ्यांचे मानसिक दूषीकरण झाले असल्याने आता शांततेची कबुतरे उडवून काहीही साध्य होणार नाही. काँग्रेस पक्ष केवळ मतांसाठी हे "अमन कि आशा" गीत आळवत असते. बॉलिवूड चे 'सगळेच" लोक हरामखोर आहेत. आपले सिनेमे पाकिस्तानात चालावेत म्हणून तेथील सर्व लोक शांती, अमन इ नाटकीपणा चालवत असतात. त्यांच्यासाठी पैसे हेच सर्वस्व आहे देश खड्ड्यात गेला तरी चालेल. प्रत्येक दहशतवादी हल्ल्याला सज्जड प्रत्युत्तर ( सर्जिकल स्ट्राईक) मिळेल. जेंव्हा "ब्लीडींग विथ थाऊजंड कट्स" या त्यांच्या डावपेचाला "ब्लीडींग विथ मिलियन कट्स" असेच उत्तर मिळेल तेंव्हाच पाकिस्तानची नाटके थांबतील.massive retaliation भयंकर प्रतिहल्ला याची भीती पाकिस्तानी हृदयात धडकी बसवेल तेंव्हा हि त्यांची नाटके कमी होतील. कबुतरे उडवली तर ती तुमच्याच डोक्यावर बसून डोक्यावरच शीटतात हे अजून आपल्या सुडो सेक्युलर ओकून कळत नाही हेच आपले दुर्दैव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब
ओ
ओम शतानन्द गुरुवार, 03/02/2017 - 04:42 नवीन
कान्गावखोर आणि आक्रस्ताळ्या डाव्या आणि समाजवाद्द्यान्ना खणखणीत उत्तर, धन्यवाद ट्रुमन
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 03/02/2017 - 06:21 नवीन
गॅरी ट्रुमन आणि डॉ खरे यांचे प्रतिसाद नेहमीप्रमाणेच आवडले. फेद्॑रवेट साहेबांचे मुद्दे व्यक्तीचा विचार करता योग्य आहेत. पण समूहाचे मानसशास्त्र आणि वागणे याचा विचार करताना त्यांचे महत्त्व कमी होते.
  • Log in or register to post comments
ज
जानु गुरुवार, 03/02/2017 - 06:41 नवीन
यापुर्वी या डाव्यांची भारताच्या धोरण निर्मितीत मजबुत पकड होती आणि दिल्लीच्या वरीष्ठ वर्तुळात यांच्या मनाप्रमाणे ध्येय्य धोरणे सहज तयार होत होती. त्यातुन यांना भरपुर पैसा आणि सवलती मिळत होत्या. त्या आता बंद झाल्यात. एबीव्हीपी ने डाव्या संघटनांच्या हडेलहप्पी प्रकाराच्या विरोधात सरळ संघर्ष सुरु केल्याने यांची कोंडी होत आहे. सरकारचा विरोध, हातात पैसा नाही, संघटना चालविणे अवघड, जनतेचा पाठिंबा तर राहिला नाहीच त्यात विरोध सुरु झाला या कोंडीत डावे सापडलेत. मागील एक महिन्यात केजरीवाल टीव्हीवर दिसत नव्हता. त्याचा आपला भयानक त्रास होत असेल. या सर्व असंतुष्टांच्या सहभागाने रामजसची पटकथा लिहली असेल असे म्हणायला हरकत नाही. रामजसच्या प्राचार्याला उमर खालीद आणि ईतर वक्ते आल्यावर काय होईल याची कल्पना नसेल असे कसे समजायचे? हे ठरवलेले आणि घडवलेले आहे. एबीव्हीपी आणि भाजपाची प्रतिक्रिया काय होणार याविषयी खात्री असावी.
  • Log in or register to post comments
आ
आकाश कंदील गुरुवार, 03/02/2017 - 06:58 नवीन
माझ्या माहिती प्रमाणे आणि "आज तक" या वाहिनीवर दिनांक २८/०२/२०१७ रोजी रात्री दाखवलेल्या माहिती प्रमाणे (जी त्यांनी सैनादलाकडून मिळवलेली आहे) गुरमेहेर कौर चे वडील कारगिल युद्धात शहिद झालेले नसून ते कुपवाडा मध्ये आतंकी लोकाबरोबरील चकमकीत शहिद झालेले आहेत आणि इतकी basic माहिती सुद्धा तिला असू नये याचे आश्चर्य वाटते. जी मुलगी आपल्या वडीलांच्या मृत्यू बद्दल इतकी बेफिकीर असू शकते त्या मुलीच्या या प्रकारे केलेल्या twit ला काय अर्थ असू शकतो . यु ट्यूब वर वरील विडिओ ची लिंक मिळाली कि लवकरात लवकर देण्याचा प्रयन्त करतो
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 03/02/2017 - 07:23 नवीन
साहेब, वडील प्रत्यक्ष युद्धात मारले गेले कि घुसखोरीविरुद्ध कार्यवाहीत(CI ops) मारले गेले हे माझ्या दृष्टीने गौण आहे. कारण असे कर्तव्य करीत असताना मृत्यूच्या छायेतच वावरावे लागते. ते प्रत्यक्ष शत्रूच्या विरुद्ध लढत असताना मारले गेले आहेत ( killed in action) आणि त्यामुळे त्यांच्या हौतात्म्यात कोणतीही कसर येत नाही. मुलीला हे माहित "असणारच" पण ती सुडोसेक्युलर लोकांच्या हातातील प्यादे बनून राहिली आहे. आणि अशा वक्तव्याला फाटे फुटले कि हेच सुडोसेक्युलर लोक म्हणणार कि, "पहा हिचे वडील हुतात्मा झाले आणि या "तथाकथित देशभक्तांना" त्यांची कदरच नाही". हे सर्व हलकटपणाचे डावपेच असतात. http://indiatoday.intoday.in/story/gurmehar-kaur-captain-mandeep-singh-ramjas-college-delhi-university-abvp-operation-rakshak/1/894406.html
  • Log in or register to post comments
व
वरुण मोहिते गुरुवार, 03/02/2017 - 07:46 नवीन
पण दोन्ही बाजूच्या आततायी विचारांनी हे राजकारण बाहेर आलं . मुळात त्या मुलीकडे लक्षच द्यायला नव्हतं पाहिजे . असे शांतीचे कबुतर सोडणारे लै झाले भारतात . त्यावर मीच देशभक्त म्हणून लोकांनी धडाधड सोशल मीडिया वर प्रतिक्रिया देऊन त्यांचीही इमेज गेली . तिच्या बोलण्यात एक वाक्य होतं पाकिस्तान नाही युद्धाने मारलं . म्हणजे काय भारत एकाचवेळी १०० लोकांशी युद्ध खेळत असतो का ???ते पाहून तेवढं सांगता आलं असतं बाई हे चूक आहे .पण सगळीकडून आततायी पणा नडला.
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 03/02/2017 - 08:14 नवीन
एक्साक्टली... समजावून सांगणे आणि समजून घेणे हा प्रकारचं उरला नाही. लगेच हमरातुम्बरी. बाकी वरील बरेच गोलगोल प्रतिसाद आणि त्याला दिलेले अनुमोदन एकच अजेंडा पुढे रेटण्याची धडपड दिसत आहे, हे लपून राहिले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
च
चिनार गुरुवार, 03/02/2017 - 08:16 नवीन
पहिले तर तो ट्विटर नावाचा टिवटिवाट बंद केला पाहिजे. देशातल्या कोणत्यातरी कॉलेजमध्ये दोन-चार पोट्टे भांडले तर अक्ख्या देशात युद्ध चालू झाल्याचं चित्र ट्विटरवर दिसतं. हे अश्या प्रकारचे भांडणं प्रत्येक गल्लीबोळातल्या कॉलेजमध्ये रोजच होत असतील. त्यांना इतकं महत्व देण्याचं कारण नाही. राहिला प्रश्न त्या मुलीचा तर तिचे विचार अति आदर्शवादी आहेत. पण तसे विचार ठेवण्यात काही गैर वाटत नाही. फक्त देशातला प्रत्येक हरामखोर राजकारणी आपला उपयोग करून घेत आहे (ह्यात उजवे -डावे-आडवे -उभे सगळेच आलेत) हे तिला कदाचित कळत नसावं.
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 03/02/2017 - 08:34 नवीन
<<<राहिला प्रश्न त्या मुलीचा तर तिचे विचार अति आदर्शवादी आहेत. पण तसे विचार ठेवण्यात काही गैर वाटत नाही.>>> -- तीव्र सहमत. त्याचबरोबर त्या मुलीला विरोध करणारे सुद्धा अति राष्ट्रवादी (?) आहेत. पण तसे विचार ठेवण्यात ही काही गैर वाटत नाही. हे राजकारणी त्यांचा उपयोग करून घेत आहेत हे त्या बिचाऱ्या मुलीला आणि एबीव्हीप च्या मुलांना पण कळत नसावं, याची खंत वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
च
चिनार गुरुवार, 03/02/2017 - 10:40 नवीन
राष्ट्रवादाची अलीकडली व्याख्या : राष्ट्रवाद: ज्यात राष्ट्रहित सोडून इतर सर्व गोष्टींवर वाद घातला जातो तो राष्ट्रवाद.. ज्यादिवशी राष्ट्रवादाचा अर्थ समजून घेण्याची कुवत परमेश्वर माझ्यासहित सर्वांना देईल तो सुदिन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित गुरुवार, 03/02/2017 - 10:45 नवीन
राष्ट्रवादाची अलीकडली व्याख्या : राष्ट्रवाद: ज्यात राष्ट्रहित सोडून इतर सर्व गोष्टींवर वाद घातला जातो तो राष्ट्रवाद.. +1111111
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
व
वरुण मोहिते गुरुवार, 03/02/2017 - 10:59 नवीन
स्वयंघोषित राष्ट्रवादी तयार होत आहेत . अशी संधी मिळाली नव्हती म्हणून . बराच काळ काँग्रेस च वर्चस्व होत . त्यावेळी देशासाठी काँगेस ने चांगले निर्णय घेतलेही असतील . पण राष्ट्रभक्त ह्या विचारसरणी ला तेव्हा चालना मिळाली नाही . जी आताच्या काळात मिळाली . प्रश्न वृत्तीचा असतो . जगात सगळीकडे राष्ट्रभक्त हा मुद्दा झालाय केव्हा ना केव्हातरी . हि मानसिकता आहे .आणि ह्या मानसिकतेतून काहीच साध्य होत नाही .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 03/02/2017 - 17:07 नवीन
राष्ट्रवादाची अलीकडली व्याख्या : राष्ट्रवाद: ज्यात राष्ट्रहित सोडून इतर सर्व गोष्टींवर वाद घातला जातो तो राष्ट्रवाद..
बाकीचा फापटपसारा राहू द्या हो. फक्त खाली दिलेल्या गोष्टीसारख्या गोष्टींवर आक्षेप घेतला तर तसा आक्षेप घेणे म्हणजे राष्ट्रहित सोडून इतर सगळ्या गोष्टींवर घातलेला वाद का?की ते पण अभिव्यक्तीस्वातंत्र्य? एकदाचा उलगडा होऊन जाऊ द्या. Image removed. अशा पध्दतीने दिशाभूल करून मुख्य विषयावरून लक्ष भरकटवायचे काम विचारवंत नेहमीच करत असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
च
चिनार Fri, 03/03/2017 - 05:22 नवीन
अशा पध्दतीने दिशाभूल करून मुख्य विषयावरून लक्ष भरकटवायचे काम विचारवंत नेहमीच करत असतात. बाबो!! हे वाक्य मला उद्देशून आहे की काय ??? मी नाही हो ट्रुमन भाऊ विचारवंत... शिवाय थोडीशी सुधारणा.. अशा पध्दतीने दिशाभूल करून मुख्य विषयावरून लक्ष भरकटवायचे काम विचारवंत/राजकारणी/सरकार/विरोधक/समाजकंटक नेहमीच करत असतात. राहिला प्रश्न ह्या पोश्टरचा.. ज्याने कोणी हे असले पोश्टर लावले असतील त्याच्या पार्श्वभागावर फटके द्यायला हवे. पण ते कोणी ?? तर पोलिसांनी आणि न्यायव्यवस्थेने...अभाविप आणि इतर कोणत्याही संघटनेला तसे करण्याचा अधिकार आहे का? झालंय काय की आजकाल मूळ विषय बाजूला राहतो आणि सुरु होतो तो बोभाटा..मग बोभाटयावर बोभाटा...बोभाटयावरच्या बोभाटयावर बोभाटा..आणि तुमच्या आमच्यासमोर येतो एक वेगळाच बोभाटा.. माना अथवा नका मानू पण ह्या सगळ्याला सोशल नेटवर्किंग थोड्याफार प्रमाणात जबाबदार आहेच. त्यावर नियंत्रण हवे. पण तसे केल्यास परत अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे बोंबा चालू होतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Fri, 03/03/2017 - 05:40 नवीन
मी नाही हो ट्रुमन भाऊ विचारवंत...
नक्कीच :)
अभाविप आणि इतर कोणत्याही संघटनेला तसे करण्याचा अधिकार आहे का?
नक्कीच नाही ना. ते काम पोलिसांचे आणि न्यायव्यवस्थेचेच. पण प्रश्न कुठे निर्माण होतो? असे काही तिरपागडे विचार ठेवणे यात काही चुकीचे आहे हेच विचारवंतांना वाटत नसते. अशा विचारवंतांना शारीरीक नाही तरी शाब्दिक लाठ्या मिपासारख्या ठिकाणी लगावल्या जाणारच. कुठेही शारीरीक लाठ्या लगावल्या जात असतील तर ते नक्कीच चुकीचे आहे.
माना अथवा नका मानू पण ह्या सगळ्याला सोशल नेटवर्किंग थोड्याफार प्रमाणात जबाबदार आहेच.
मी म्हणेन याला मानवी स्वभाव जास्त जबाबदार आहे. सोशल मिडिया हे एक व्यासपीठ मिळाले आणि गॉसिप जास्त प्रमाणावर पसरले. एक उदाहरण द्यायचे झाले तर लॅन्डलाईन फोन आल्यानंतर पूर्वी 'कानगोष्टी' स्वरूपातील गॉसिप जास्त प्रमाणावर पसरले त्याला लॅन्डलाईन फोनपेक्षा मुळातील गॉसिपिंग प्रवृत्ती जास्त जबाबदार आहे. तसेच काहीसे सोशल मिडियाच्या बाबतीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
प
पुंबा गुरुवार, 03/02/2017 - 08:54 नवीन
१. गुरमेहर कौर या 'व्यक्ति'ला(शहीदाची मुलगी वगैरे नव्हे) आपले मत व्यक्त करण्याचा मुलभूत अधिकार घटनेने दिला आहे. तो समाजाने मान्य केला आहे. कायदेमंडळाने त्याच्या रक्षणासाठी कायदे केलेले आहेत आणि न्यायपालीका तिच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी कटीबद्ध आहे. तिचे मतस्वातंत्र्य अबाधीत आहे आणि त्याचा मी आदर करतो. २. तरीदेखील तिचे विधान तद्दन गल्लाभरू, दांभिक आहे असा दावा करण्याचा आणि तिच्या वाक्यांची तार्किक चिरफाड करण्याचा अधिकार सेहवाग, मी, रणदीप हूडा आणि समस्त भारतियांना आहे. गुरमेहर करते ती अभिव्यक्ति आणि सेहवागचे ते ट्रोलींग आणि बुलीइंग हा वेगळा न्याय का? ३. सध्या तीने केलेले 'मी अभाविप ला घाबरत नाही' हे विधान योग्य आहे. माझ्या मते, कुठल्याही विद्यार्थी संघटनेला (डाव्यांची असो वा हिंदूत्ववाद्यांची) इतर विद्यार्थ्यांनी घाबरणे हे चांगले नाही. ४. कन्हैय्या असो वा सध्याचे हे रामजास कॉलेज प्रकरण, या दोहोंचाही हेतू आपापल्या शक्तींचे प्रदर्शन करणे हाच आहे. भाजपच्या मागे सामान्यांत असलेला प्रचंड पाठींबा आहे तर डाव्यांच्या बाजूला त्यांनी इतकी वर्षे निगुतीने सांभाळलेली डाव्या विचारांची बुद्धीवादी मंडळी आहेत. तुम्ही राष्ट्रद्रोही आहात हे ठरवायला उजव्या बाजूच्या मंडळींना एक सेकंदही लागत नाही, तुम्ही भाजपाच्या विरोधात काहीही बोललाअत की झाले. दुसर्‍या बाजूला नुसते सेहवागला अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही काय? असे विचारलंत की तुम्ही फॅसिस्ट, ट्रोल होता, हिंदूराज्य निर्माण करण्याच्या संघाच्या कटात तुम्ही सहभागी आहात, असे डावे म्हणतात. मध्यममार्गी, असल्या कुठल्याही विचारधारेच्या आहारी न गेलेल्या विचारी जनांची असल्या टोणग्यांमुळे आणी त्यांच्या रोज चालणार्‍या कळवंडीमुळे निष्कारण कुचंबणा होते. तेव्हा शहाण्यांनी असल्या कोणत्याही आयडियॉलॉजीला शरण न जाता प्रत्येक घटनेचा स्वतंत्रपणे संविधान, मानवी मुल्ये, नैतिकता आणि राष्ट्रीय सुरक्षा या सर्व गोष्टींचा अभ्यास करून मत बनवावे असे वाटते.
  • Log in or register to post comments
प
पुंबा गुरुवार, 03/02/2017 - 08:58 नवीन
लोकमतची चिंधीगिरी
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 03/02/2017 - 08:59 नवीन
गुरमेहर करते ती अभिव्यक्ति आणि सेहवागचे ते ट्रोलींग आणि बुलीइंग हा वेगळा न्याय का? हे असं विचारलं तर तुमचं बुर्ज्वा, बुरसटलेल्या विचारांचे, प्रतिगामी, मनुवादी, स्वातंत्र्यवैरी अशा विशेषणांनी मिपावरील बुद्धिवंतांकडून स्वागत होईल.
  • Log in or register to post comments
फ
फेदरवेट साहेब गुरुवार, 03/02/2017 - 11:22 नवीन
अन गुरमेहरला तिचे मत मांडायचे स्वातंत्र्य आहे, असे म्हणले की (ते ही तिचा वापर होतोय हा मुद्दा मान्य केल्यावर) सुद्धा 'खणखणीत प्रतिसाद डाव्या अन समाजवाद्यांना' असे नथीतून तीर मारल्या जातात, माझ्यामते डॉक्टर सौरा एकंदरीत पूर्ण व्यवस्थेबद्दल बोलतायत फक्त मिपाबद्दल नाही , मिपाचे काय घेऊन बसलात, परवाच एक पात्र 'अरे वा तुम्ही पण कुंपणावरचे का?' म्हणून एका (त्यातल्यात्यात) निष्पक्ष माणसाची लाज काढून गेलं, मुद्दा काय मूर्खपणा कुठेच चुकलेला नाही, डावे नाही का उजवे नाही. आपला कल जिकडे असतो त्याच्या विरुद्ध दिशेने किटाळ दिसते फक्त :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/02/2017 - 10:47 नवीन
थोडक्यात सारांश - १) गुरमेहर कौर या व्यक्तीला आपले मत असण्याचे, ते जाहीरपणे बोलून दाखविण्याचे, एखाद्या संघटनेविरूद्ध असण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्या स्वातंत्र्याला विरोध करणे अयोग्य आहे. २) तिने १०-१२ फलक तयार करून ते एकापाठोपाठ दाखविण्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रदर्शित केली. असे करण्याचा तिला पूर्ण हक्क आहे. ३) आपले वडील आपण २ वर्षाच्या असताना कारगिल युद्धात मारले गेले. सुरवातीची काही वर्षे आपण मुस्लिमविरोधी होतो. परंतु मला आईने समजावून सांगितले व त्यामुळे आपले वडील पाकिस्तानने मारले नसून त्यांना युद्धाने मारले आहे असे आपले मत जाहीर सांगण्याचा तिला पूर्ण हक्क आहे. ४) तिने समाजमाध्यमांवर आपली चित्रफीत प्रदर्शित केल्यानंतर त्यावर तिच्या बाजूने किंवा विरूद्ध प्रतिक्रिया देण्याचा सर्वांना पूर्ण हक्क आहे. ५) सेहवागने किंवा भाजपच्या एका मंत्र्याने प्रसिद्ध केलेले चित्र हे तिच्या "आपले वडील पाकिस्तानने मारले नसून त्यांना युद्धाने मारले आहे" या तिच्या एका फलकावरील वाक्याविरूद्ध दिलेली उपरोधिक प्रतिक्रिया होती. अशी प्रतिक्रिया देण्याचा त्यांना पूर्ण हक्क आहे. अशी प्रतिक्रिया देताना सेहवागने युद्धाची तुलना क्रिकेटशी किंवा भाजपच्या मंत्र्याने तिची तुलना दाऊदशी केलेली नसून आणि तिचा किंवा तिच्या वडीलांच्या हौतात्म्याचा अपमान केलेला नसून, तिच्या फलकावरील वाक्यावर दिलेली ही उपरोधिक प्रतिक्रिया आहे. हिरोशिमा व नागासकी येथील लाखो नागरिकांना अमेरिकेने मारले नसून युद्धाने त्यांना मारले आहे किंवा ६० लाख ज्यूंना हिटलरने मारले नसून युद्धाने त्यांना मारले आहे हा युक्तिवाद जितका हास्यास्पद भासेल तितकाच माझे वडील पाकिस्तानने मारले नसून त्यांना युद्धाने मारले आहे हा युक्तीवाद देखील हास्यास्पद आहे. यापुढे जाऊन असेही म्हणता येईल की तिच्या वडीलांना युद्धाने मारले नसून भारताने मारले आहे कारण भारताने १९९९ मध्ये युद्ध न करता शांततेची बोलणी केली असती तर युद्धच झाले नसते व तिचे वडील शहीद झालेच नसते. अर्थात तिच्या नकळत ती पुढे आणत असलेली विचारसरणी देशासाठी घातक आहे हे तिच्या अजून लक्षात आलेले नाही. या देशात एक विशिष्ट वर्ग भारत-पाकिस्तानमधील तणावाला, युद्धांना, दहशतवादी हल्ल्यांना, काश्मिरमधील फुटिरतावादाला व परिस्थितीला पाकिस्तान जबाबदार नसून भारतच जबाबदार आहे असे मानतो. भारत काश्मिरींवर अत्याचार करीत आहे, भारत तिथे दडपशाही करीत आहे असा ते सातत्याने प्रचार करीत असतात. भारताने काश्मिरमध्ये सार्वमत घ्यावे, काश्मिरला स्वातंत्र्य द्यावे, सीमेच्या दोन्ही बाजूकडील नागरिकांना व्हिसाची अट न घातला मुक्तद्वार ठेवावे अशा तर्‍हेच्या मागण्या ते वारंवार करीत असतात. असे करण्याने उर्वरीत भारतावर किती वाईट परीणाम होईल याचा विचारदेखील त्यांच्या मनात येत नाही. मालेगाव, समझोता एक्सप्रेस, अजमेर इ. ठिकाणी झालेले बॉम्बस्फोट "हिंदू" अतिरेक्यांनी केले, गोध्रामध्ये हिंदूंनी मुस्लिमांचे वांशिक हत्याकांड केले, संसदेवरील हल्ला हे वाजपेयी व अडवानींचेच कारस्थान होते, इशरत जहां निर्दोष होती, अफजल गुरू निर्दोष होता, याकूब मेमनची फाशी म्हणजे न्यायालयीन हत्या असा प्रचार ते आंतरराष्ट्रीय पातळीवर करून भारताची बाजू लंगडी करण्याचा ते सातत्याने प्रयत्न करीत असतात. ही मुलगी दाखवित असलेल्या फलकातून देशासाठी अत्यंत घातक असलेली हीच ती "बुद्धीवादी निधर्मी व पुरोगामी" विचारसरणी पुढे येते आहे हे या मुलीच्या लक्षात आलेले दिसत नाही. ६) तिला ज्यांनी मारहाणीच्या किंवा बलात्काराच्या धमक्या दिल्या असतील, त्यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे. अशा धमक्या देणे अत्यंच चूक आहे. ७) तिने #studentagainstABVP असा हॅशटॅग प्रसिद्ध केला असून आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने असून हिंसाचाराच्या विरूद्ध आहोत असे तिने सांगितले आहे. यातून जरा गोंधळ निर्माण होतो. ती इतर कोणत्याची विद्यार्थी संघटनांविरूद्ध नसुन फक्त अभाविपविरूद्ध आहे, ती फक्त अभाविपने केलेल्या कथित हिंसाचाराविरूद्ध असून इतर विद्यार्थी संघटनांच्या हिंसाचाराविरूद्ध नाही, अभाविप वगळता इतर विद्यार्थी संघटना अजिबात हिंसाचार करीत नाहीत असे अनेक गैरसमज यातून निर्माण होऊ शकतात. ८) या सर्व प्रकरणात केजरीवाल, राहुल, डावे नेते इ. यशस्वी कलाकारांनी भरपूर तेल ओतले असून आपल्या पोळ्या भाजून घेण्याचे कार्य सुरू आहे. तिचा प्यादे म्हणून वापर करून या निमित्ताने मोदी सरकार, अभाविप, भाजप इ. विरूद्ध वातावरण पेटवायचे प्रयत्न सुरू आहेत. २०१५ मध्ये एफटीआयआय, २०१६ मध्ये आधी हैद्राबाद विद्यापीठ व नंतर जनेवि येथे अगदी याच पद्धतीने वातावरण पेटविले गेले होते. आताही अगदी तसेच सुरू आहे. ९) १५-२० दिवसांपूर्वी मराठवाडा विद्यापीठात आयोजित केलेला दीनदयाळ उपाद्याय जयंतीचा कार्यक्रम बहुजन विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उधळला होता. शाजिया इल्मी यांना अलिगड विद्यापीठात तलाक विषयावर बोलण्यासाठी मज्जाव करण्यात आला. काही वर्षांपूर्वी तस्लीमा नसरीन यांच्यावर दोन वेळा शारिरीक हल्ला झाला होता. २-३ आठवड्यांपूर्वी जनेविमधील निष्पक्ष वृत्तीचे प्रा. मकरंद परांजपे यांना तेथील काही विद्यार्थ्यांनी त्त्यांना यांच्या कार्यालयात जाण्यास मज्जाव करून त्यांना अडवून धरले. त्यांनी वारंवार विनंती करूनसुद्धा त्यांना अडवून धरण्यात आले. माझ्या कार्यालयात जाणे हा माझा हक्क आहे हे वारंवार सांगूनसुद्धा विद्यार्थ्यांनी ऐकले नाही. शेवटी त्यांनी गांधीवादी पद्धतीने सर्व विद्यांर्थ्याचे पाय धरले. याची चित्रफीत उपलब्ध आहे. जनेवि किंवा रामजसमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी जीवाच्या आकांताने टाहो फोडणारे या प्रकारांबद्दल अजूनही मूग गिळुन गप्प आहे. निवडक विरोध व निवडक मौन हे यांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. १०) लहानपणी मुस्लिमविरोधी असलेली मुलगी आज वडीलांच्या मृत्युसाठी पाकिस्तानला जबाबदार धरीत नाही. कदाचित अजून १०-१५ वर्षांनी तिच्या जाणीवेच्या कक्षा विस्तृत झाल्यानंतर खरोखर पाकिस्तानमुळेच आपले वडील गेले असे तिच्या लक्षात येऊ शकेल किंवा कदाचित आताच्याच मार्गावर पुढे जाऊन, "माझ्या वडीलांना युद्धाने मारले नसून, त्यासाठी आक्रमक भारतच जबाबदार आहे" अशीही तिची समजूत होऊ शकेल. ११) ऐन निवडणुकीच्या तोंडावर असे प्रकार होणे यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 03/02/2017 - 12:11 नवीन
आंतरजालावरून साभारः Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
प
पुंबा गुरुवार, 03/02/2017 - 13:13 नवीन
२-३ आठवड्यांपूर्वी जनेविमधील निष्पक्ष वृत्तीचे प्रा. मकरंद परांजपे यांना तेथील काही विद्यार्थ्यांनी त्त्यांना यांच्या कार्यालयात जाण्यास मज्जाव करून त्यांना अडवून धरले. त्यांनी वारंवार विनंती करूनसुद्धा त्यांना अडवून धरण्यात आले. माझ्या कार्यालयात जाणे हा माझा हक्क आहे हे वारंवार सांगूनसुद्धा विद्यार्थ्यांनी ऐकले नाही. शेवटी त्यांनी गांधीवादी पद्धतीने सर्व विद्यांर्थ्याचे पाय धरले. याची चित्रफीत उपलब्ध आहे.
हे खरे असेल तर भयानक आहे. ह्या विद्यार्थी संघटना नक्की कसल्या मोटिव्ह ने काम करतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/02/2017 - 18:39 नवीन
हे खरं आहे ही बातमी अनेक माध्यमातून आलेली आहे. http://m.dailyhunt.in/news/india/english/the+quint-epaper-quint/democratic+are+quite+anti+democratic+jnu+professor+on+protesters-newsid-63537060 JNU students stop faculty from entering office; professor threatens satyagraha, touches students' feet. वरील बातमीत चित्रफीत आहे. नजीबचा पुळका आलेल्या, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गफ्फा हाणणाऱ्या असहिष्णु टोळीने ही गुंडगिरी केली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
प
पुष्करिणी गुरुवार, 03/02/2017 - 11:55 नवीन
तद्द्न मूर्खपणा आहे. आधी येडछाप चाळे करायचे आणि झेपेनासे झाले की लहान मुलगी / मुलगा आहे अशी रड चालू करायची. गुरमेहेरबद्दल मला राग नाही कारण तिनं जे काही केलय ते अटेंशन ग्रॅबिंग ;'मला बघा - फुलं वहा' प्रकारच वाटतं. पण त्यानंतर 'सिलेक्टिव्ह फ्रिडम ऑफ एक्स्प्रेशन' चे कैवारी जसे वागत आहेत त्याचा जास्त राग आहे. दिल्ली युनिव्हर्सिटीच्याबद्दल मत खराब होत चाललय माझं; तिथं काही रेग्युलर लेक्चर्स / सबमिशन्स / प्रोजेक्ट्स / परिक्षा असं काही नसतं का? इतक्या विद्यार्थ्यांना इतका मोकळा वेळ कसा मिळतो? खुद्द दिल्लीमधे राहणारे कमी असावेत यांत बरेचसे हॉस्टेल मधे राहणारे आहेत का? घरून काही विचारणा होत नाही का या बाळांची? गुरमेहेरची कॉलेजमधिल अ‍ॅडमिशन डिफेन्स कोट्यातून आहे का? असली तर ती सुद्धा 'युद्धखोरीत' अप्रक्षरित्या सहभागी आहे. कारण भारतानं सैन्य बाळगणं हाच जर 'युद्धखोरी' चा क्रयटेरिया असेल तर सरकारनं सैनिकांना / त्यांच्या परिवारांना दिल्या जाणार्‍या कोणत्याही सोयी-सुविधा तिनं घेउ नयेत आणि पर्यायानं या युद्धखोरीतला स्वतःचा सहभाग बंद करावा. भारतात सक्तीची मिलिटरी सर्व्हिस नसल्यानं तिला हे सहज शक्य आहे.
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 03/02/2017 - 12:13 नवीन
रेग्युलर लेक्चर्स / सबमिशन्स / प्रोजेक्ट्स / परिक्षा देऊन कोणाचे भले झाले म्हणा ? गुरमीत तिचे मित्रमंडळी आणि एबीव्हीप मधील मुलांच्या पालकांनी नक्कीच आपल्या पाल्यांवर वचक ठेवला पाहिजे. काय म्हणता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी
व
विशुमित गुरुवार, 03/02/2017 - 12:15 नवीन
??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
प
पुष्करिणी गुरुवार, 03/02/2017 - 12:29 नवीन
त्यांचं भलं होउ दे अथवा नाही इतरांना तरी त्रास नाही, एकीकडे स्वतःला 'यंग इंडिया' वगैरे म्हणत चमकोगिरी करायची आणि विरूद्ध बाजूनं कोणी बोलायला लागलं की मी लहानच आहे म्हणून रडायला सुरूवात करायची. मी फक्त गुरमेहेर किंवा तिच्या कंपूबद्दल नाही तर अभाविप सहित सगळ्याच विद्यार्थीसंघटनांबद्दल बोलतीये, यांना इतका वेळ कसा मिळतो, वेळ तर वेळ वर फुकटची प्रसिद्धी पण ...थोडी जेलसी म्हणा हवं तर; आम्हांला असं आरामाचं विद्यार्थीजीवन का कधी नाही मिळालं? आत्ता अभ्यास नाही केला / नीट रिझ्ल्ट नाही लागला तर काय होइल / नोकरी मिळेल का अशी भविष्याची चिंता पण असायची वयाच्या २० व्या वर्षी, असं 'सर पे कफन' वगैरे बांधून काही करता येइल इतका वेळ आणि पैसाच नव्हता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 03/02/2017 - 17:01 नवीन
रेग्युलर लेक्चर्स / सबमिशन्स / प्रोजेक्ट्स / परिक्षा देऊन कोणाचे भले झाले म्हणा ? हे मात्र वट्ट खरे आहे ! एफटीआयआयमधले विद्यार्थीही दोन वर्षांचा अभ्यासक्रम ९-१० वर्षे करण्यासाठी प्रसिद्ध असल्याचे आणि त्या वाढीव काळासाठी त्यांना शिष्यवृत्ती वाढवून मिळत होती असे मागे उघड झाले आहेच ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा