Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

PAKISTAN DIDN’T KILL MY DAD “WAR” DID !!

ड
डँबिस००७
Wed, 03/01/2017 - 13:27
🗣 144 प्रतिसाद
एका राम सुब्रमण्यम नावाच्या बेकार माणसाने एका बिंडोक मॉडेलला घेऊन " वॉईस ऑफ राम " या बॅनरसाठी एक फिल्म बनवली. त्यानंतर हा उठलेला गदारोळ !! PAKISTAN DIDN’T KILL MY DAD “WAR” DID !! ह्या वाक्याचा अर्थ कोणी मला समजुन सांगेल का ? ह्या राम सुब्रमण्यंम चे काम : While the Profile for Peace campaign found many takers from both the neighbouring countries, celebrities like filmmaker Mahesh Bhatt and music composer Vishal Dadlani also extended their support. It was relaunched last year after Indian army’s surgical strike across the Line of Control (LoC) into Pakistani territory. Subramanian who has volunteered for Arvind Kejriwal’s anti-corruption political movement claims that he is not a member of the Aam Aadmi Party. गुरमेहर कौरचे वडिल पाकिस्तान बरोबर झालेल्या कारगील युद्धात शहीद झाले, तेंव्हा ही गुरमेहेर फक्त २ वर्षांंची होती.

प्रतिक्रिया द्या
28850 वाचन

💬 प्रतिसाद (144)
व
वरुण मोहिते गुरुवार, 03/02/2017 - 12:25 नवीन
परंपरा फार जुनी आहे . एका फटक्यात कोण बोललं असतं दोन्ही बाजू चुकीच्या आहेत . काय करता येईल यावर चर्चा चांगली झाली असती
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 03/02/2017 - 12:47 नवीन
काय करता येईल यावर चर्चा चांगली झाली असती -- अनुमोदन...!! ह्या बारक्या पोरांच्या भांडणां पायी देशातील मोठ्या माणसांमध्ये जुंपली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 03/02/2017 - 15:38 नवीन
अजेंडा घेऊन यायची मिपा परंपरा फार जुनी आहे
फक्त प्रॉब्लेम असा असतो की आपण स्वतः सोडून (आणि कदाचित आपल्या कंपूमध्ये असलेले सोडून) इतर सगळे अजेंडा घेऊन मिपावर येतात पण "तो मी नव्हेत" (किंवा ते आम्ही नव्हेच) असे वाटायला लागले तर ते अधिक घातक आहे. अशा छुप्या लोकांपेक्षा उघडउघडपणे कुठला तरी अजेंड्याचा झेंडा घेऊन मिपावर येणारे लोक कधीही परवडले. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
ड
डँबिस००७ गुरुवार, 03/02/2017 - 14:32 नवीन
२०१० साली काँग्रेस सरकारच्या आदेशानुसार, तिस्ता सेटलवाडच्या (सबरंग ट्रस्ट ) ने एन सी ई आर टीच्या शिक्षकांसाठी प्रशिक्षणार्थ पुस्तक लिहुन दिली. त्या पुस्तकात ईयत्ता ५ व ६ च्या मुला मुलींना काय शिकवायच हे दिलेल होत. त्या पुस्तकातले काही ठळक उदा, १. महम्मद गझनीने सोमनाथ मंदिर हे कधीच तोडल नव्हत. २. औरंगजेब , टिपु सुलतान, महम्मद गझनवी सारखे बादशहा दयाळु होते. ३. हिंदु राजांनी जनतेचा फार छळ केला. ४. मुसलमांन लोकांना आताच्या भारता बद्दल प्रेम असायलाच पाहीजे अस नाही, त्याची भावना ईतरत्र गुंतलेली असु शकते. हा व्हीडीयो बघीतला तर कळेल. https://www.youtube.com/watch?v=R8s2xRN66zY&t=969s
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ गुरुवार, 03/02/2017 - 14:34 नवीन
  • Log in or register to post comments
म
मारवा गुरुवार, 03/02/2017 - 14:58 नवीन
भारत व पाकीस्तान या दोन मानव समुहात जे काही चाललेल आहे. शत्रुत्व हिंसाचार एकमेकांना ठार मारणे इ. हे दोन्ही कडच्या मानवी टोळ्यांच्या उन्नत प्रगल्भ अवस्थेचे लक्षण आहे का ? यात दोन्ही टोळींकडुन प्रत्येकाने रक्त न सांडता आपापल्या टोळीसाठी रक्त सांडण्यासाठी काही ठराविक माणसांची निवड केलेली आहे. इतर टोळी सभासदांनी रक्त सांडलेल्या व्यक्तीचा सन्मान त्यांच्या कुटुंबाचा सांभाळ त्यांना वंदन आर्थिक आधार इ. देणे अपेक्षीत आहे. आता यात रक्त सांडलेल्या टोळी सभासदाच्या कुटुंबियाने ही टोळी संदर्भात मान मर्यादा पाळणे अपेक्षीत आहेच तसे न झाल्यास ते एक पापच आहे. तर एक टोळी सभासद म्हणुन काहींचा सात्विक संताप होऊन त्यांनी सामुहीक बलात्काराचे शासन तुला या पापासाठी देऊ अथवा व्हीडियो व्हायरल करु असे टोळीप्रतीच्या प्रेमभावनेच्या आवेगात जर एखादा टोळी सभासद बोलला तर त्याचे काय नेमके चुकले ? टोळीप्रती निष्ठा असण्यात नेमके गैर काय ? युद्ध हिंसाचार इत्यादीवर प्रमाणापेक्षा जास्त विचार करणे किंवा त्याचे खापर टोळी धुरीणांवर फोडणे हे गैरच नाही का ? मुळात इतका विचार करणे हेच किती सरळ सरळ टोळी प्रती गद्दारी असण्याचाच पुरावा नाही का ? जेव्हा ती मुलगी असे म्हणते की पाकीस्तानने मारले नाही युद्धाने मारले तेव्हा ती ज्या युद्ध संदर्भातील मुलभुत कारणाकडे त्यातील राजकारणाकडे त्यामागील गुंतागुंतीच्या हितसंबंधाकडे निर्देश करते तो मी म्हणतो मुळातच टोळीवादा ला टोळीच्या सभासदांना विनाकारण सेल्फ कॉन्शस करण्याचा एक घातक प्रयत्नच नाही का ? शिवाय टोळी लोकशाहीवादी असण्याचे किती तोटे सहन करावे ? म्हणजे शासन करावेसे वाटुनही आवंढा गिळुन किंवा मुग गिळुन स्वतःलाच शासन करुन घ्यावे लागते शिवाय मुलगी स्वत रक्त सांडण्याची जबाबदारी " वाहीलेल्या " घरातील सभासद आहे. कर्तव्याचे ओझे वाटुन दिलेले आहे तिच्याकडे चर्चेचे ओझे वाहण्याचे कारणमीमांसा करण्याचे ओझे वाहण्याची जबाबदारी दिलेली नसतांना ती अशी नेमलेल्या टोळी विचारवंताची जागा का घेऊ पाहतेय ? याला उद्धटपणा नाहीतर काय म्हणावे ?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 03/02/2017 - 15:21 नवीन
मारवा साहेब आपले विचार आदर्शवादी वाटतात. म्हणूनच ते व्यवहारात अने कठीणच नव्हे तर अशक्य आहेत. बाकी आदर्शवादी विचारसरणी असू नये असे मी म्हणत नाही पण तो वास्तवाच्या जवळ असावी असे वाटते. दुर्दैवाने पाकिस्तानशी सलोखा करण्याचे जेवढे प्रयत्न आपल्या राजकारण्यांनी( सर्व पक्षाच्या) केले ते सर्व आतापर्यंत फोलच गेलेले आहेत. आपल्या प्रत्येक राजकीय पक्षाने आपल्या विचारसरणी नुसार केंव्हा ना केंव्हा प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत असेच मी म्हणेन.( साम्यवादी लोकांबद्दल शंकाच आहे. पण ते सोडून द्या) विचारसरणीबद्दल त्यांचे आपसात विरोध असतील आणि त्याचे ते राजकारण करणारच( तो त्यांचा पूर्णवेळ धंदा आहे) अशा परिस्थितीत केवळ आपल्याच बाजूने शांततेचे प्रयत्न चालू ठेवणे हे कितपत योग्य आहे. उगाच शांतता हवी म्हणून बॉलिवूडचे लोक म्हणतात आणि सर्वच्या सर्व सिनेमे राजकारणी लोक कसे हरामखोर आहेत हे सांगत सिनेमे काढतात ते सुद्धा स्वतःचे सिनेमे पाकिस्तानात चालावेत म्हणून. त्यातून निष्पन्न काहीच होत नाही. जोवर पाकिस्तान दहशतवादाची "निर्यात" थांबवत नाही तोवर स्थायी स्वरूपात काहीच होणार नाही हेही सर्वाना माहित आहे. बाकी गुरमेहर, कन्हेय्या कुमार सारखी प्यादी येतील आणि जातील. शब्दांचे बुडबुडे खूप झाले. प्रत्यक्ष काय करावे म्हणजे हा प्रश्न सुटेल हे मात्र कोणीच लिहीत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
म
माहितगार गुरुवार, 03/02/2017 - 17:23 नवीन
डॉक्टर साहेब आदर्शवादाची प्रमाणपत्र स्वस्त झाली आहेत का ? हल्ली फार सहजपणे आणि नाही त्यांना वाटली जाताना दिसताहेत !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
माहितगार गुरुवार, 03/02/2017 - 17:25 नवीन
आदर्श टोळ्यांनी नाही म्हणावायास आदर्श शब्दाची व्याख्या बदललेली आहे हे ही तेवढेच 'खरे' आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ग
गामा पैलवान गुरुवार, 03/02/2017 - 15:41 नवीन
मारवा, तुमचं पाहिलंच गृहीतक चुकीचं आहे. भारत ही टोळी नाही. पाकिस्तान ही मात्र टोळी आहे. चुकीच्या गृहितकावर आधारलेला प्रश्न चुकीचा ठरतो. चुकीच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर घेऊन काय फायदा! आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
आ
आदिजोशी Fri, 03/03/2017 - 10:54 नवीन
भारत खाज म्हणून युद्ध करत नाही. भारताने केलेले प्रत्येक युद्ध त्यावर लादले गेलेले आहे. देशाची फाळणी होऊन दोन देशांच्या सीमा ठरवलेल्या असताना जर पाकडे गोळीबार करत घुसत असतील तर त्यांची खणा नारळाने ओटी भरायची का? टोळी पोळी करून उगाच बुद्धीभेद कशाला करताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
ड
डँबिस००७ गुरुवार, 03/02/2017 - 16:37 नवीन
मारवा साहेब व ईतर, तुमच्या एक लक्षात येत नाहीय !! हा व्हिडीयो २०१६ मध्ये एका जाहीरात क्षेत्रात काम करणार्या व स्वतःचा जम बसवु पहाणार्या राम सुब्रमण्यम नावाच्या डायरेक्टरने बनवलेला आहे. त्यात त्या मुलीने (गुरमेहेरने) फक्त काम केलेल आहे, त्या मुलीचा बॅग्राऊंड ही ह्या डायरेक्टरने कथा म्हणुन वापरलेली आहे. त्या मुळे त्या प्लॅकार्डवर काय लिहीलेल आहे हे त्या मुलीने वाचल देखील नसेल कारण मूळात ती फिल्म म्युट आहे. गुरमेहेर सारख्या मॉडेल म्हणुन काम हव असलेल्या मुलीला ईतका विचार नसावा ! त्या नंतर रामजस कॉलेज मधल्या विद्यार्थी परिषद व अभाविपच्या भांडणात परत ह्या गुरमेहेरचा वापर करुन घेतलेला आहे. तीने त्या फिल्म सारखाच हातत प्लॅकार्ड धरुन बनवलेला आहे. आताच्या गदारोळात धुर्तपणे तोच व्हिडीयो बाहेर येणे, लगेच गुर मेहरला सपोर्ट म्हणुन राम सुब्रम ण्य म चे अव तरणे हे संशयास्पद वाटते. हा व्हीडीयो वायरल सुद्धा कोणीतरी खास उद्देशाने केलेला आहे. हा राम सुब्रमण्यम हा केजरीवाल बरोबरचाच कार्यकर्ता आहे . त्याचे धेय्य उघड आहे. थोडक्यात ह्या मुलीचा वापर राम सुब्रमण्यम नावाच्या माणसाने केलेला आहे.
  • Log in or register to post comments
स
सचिन७३८ गुरुवार, 03/02/2017 - 17:04 नवीन
कायद्यासमोर सगळे समानही आहे म्हणायचे वर विशिष्ट समूहाबद्दलच टिका करायची. त्यातून इतर समूहाची चिकीत्सा करायची नाही. देशाबद्दल काहीबाही बोलणाऱ्यांचे लंगडे समर्थन करायचे. इतरांनी बोलले की असहिष्णूता आणि ह्यांची आरोळी म्हणजे अभिव्यक्तीस्वातंत्र्य. शिवाय आम्ही म्हणू तेच पुरोगामित्व अशी माळही वारंवार हेच जपणार. कोण पुरोगामी ह्याचे प्रमाणपत्रही हेच देणार. व्वा! तुम्हाला विरोध करता-करता आम्हीच तुम्ही झालो, वेष्टन फक्त वेगळे, आतून आरोपांचे खेळ खेळत राहिलो.
  • Log in or register to post comments
अ
अनरँडम गुरुवार, 03/02/2017 - 19:09 नवीन
त्या मुलीला तिचे मत मांडण्याचा अधिकार आहे. सेहवाग लोकांना तिच्या मतास विरोध करण्याचा हक्क आहे. इतरांनाही या दोघांविषयी मत मांडण्याचा अधिकार आहे. थोडक्यात वटवटणार्‍या लोकांना वटवट करण्याचा अधिकार आहे. हे सर्व मान्य करून काही मत मांडण्याचा माझा अधिकार वापरून पुढील मत मांडतो: गुरमेहर कौर या मुलीने किंवा त्या चित्रफितीच्या कर्त्याधर्त्यांना त्यांचे मत अधिक परिणामकारकपणे मांडता आले असते. त्यांनी ती संधी वाया घालवली. इंग्रजीत लिहीलेला मजकुर, मुलीच्या शर्टावरचे आयफेल टॉवरचे चित्र वगैरेंमुळे चित्रफीत पाहणार्‍या व्यक्तिचा नकारात्मक पूर्वग्रह होणे सोपे झाले. डाव्या लोकांना लोकांपर्यंत पोहचण्यासाठी उच्चभ्रुपणा टाळायला हवा. म्हणून माझे मत काहीसे डाव्या बाजूला झुकलेले असले तरी या मंडळींनी उजव्यांच्या हातात कोलित दिल्यामुळे माझे मत त्या चित्रफितीविषयी नकारात्मक झाले आहे. तिच्या वडिलांनी देशासाठी केलेला त्याग इतक्या उथळपणे वापरल्याने मला वाईट वाटले. जाता जाता: 'बुबुडाविपुमाधवि' म्हणजे काय हे कोणी स्पष्ट केल्यास बरे होईल. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Fri, 03/03/2017 - 06:15 नवीन
ऑटो चालकों का ऐलान, 'देशद्रोहियों' को नहीं बैठाएंगे ही बातमी आज नवभारत टाईम्समध्ये आली आहे. अशी गोष्ट प्रत्यक्षात करणे फारच कठिण आहे कारण कोणी कपाळावर 'देशभक्त' आणि 'देशद्रोही' असे शिक्के मारून वावरत नसतो. त्यामु़ळे रिक्षावाले दिल्ली विद्यापीठातच कोणाला घेऊन जाणार नाहीत असेही म्हटले आहे. त्याचे कारण तिथे मारामारी झाली तर विनाकारण गोत्यात यायला नको हे दिले आहेच पण त्याचबरोबर "'पुलिस को इन देशद्रोहियों को तुरंत गिरफ्तार करना चाहिए ताकि इस तरह की गतिविधियों पर रोक लगायी जा सके।" हे महत्वाचे वाक्यही आहे. एकूणच या प्रकारावरून अभिव्यक्तीस्वातंत्र्य मोजणे वगैरे प्रकार जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्राध्यापक आणि कन्हैय्यासारखे विद्यार्थी (?), मोठे मोठे विचारवंत, परदेशातील पैशावर माजलेले एन.जी.ओ वाले, आपवाले इत्यादी इत्यादी सोडून इतर कोणी करत असेल ही शक्यता कमीच वाटते. सामान्य माणसाला "भारत तेरे तुकडे तुकडे होगे" असे म्हणणे मोठे अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे नाही तर खाल्ल्या ताटात *गायचे लक्षण वाटत असावे हे म्हणायला नक्कीच जागा आहे. दिल्लीतले रिक्षावाले असे काही म्हणत असतील तर त्यामागचे कारणही तेच असावे असे म्हणायला नक्कीच जागा आहे.
  • Log in or register to post comments
र
रॉजरमूर Fri, 03/03/2017 - 06:46 नवीन
अहो गेली ती .......... जिच्या मुळे ह्या धाग्यावर बाजार भरवला गेला तीच गुरुमेहर गेलीय सोडून डाव अर्ध्यावर टाकून जालंधरला तिच्या घरी . बहुधा घरच्यांकडून कानपिचक्या मिळालेल्या असतील . आता इथे भोंगे वाजवून , आदळ आपट करून काय उपयोग ? आवरा आता धागा.
  • Log in or register to post comments
म
माझीही शॅम्पेन Fri, 03/03/2017 - 08:06 नवीन
अस कस , मिपा हे समाजमनाचा आरसा आहे . . . इथे प्रत्येक महत्वाच्या गोष्टीचा उहापोह झालाच पाहिजे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रॉजरमूर
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 03/03/2017 - 08:59 नवीन
हे नवीन वाचले... Expose: It was Barkha Dutt who planted, trained, & wrote script for Gurmehar Kaur
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ Fri, 03/03/2017 - 09:25 नवीन
एखाद्याचे समर्थन करायचे ठरवले कि त्याच्या बाजूच्या कसल्याही/कुठल्याही (म्हणजे या तद्दन भिकार पातळीच्या या लेखासारख्या) गोष्टी डोळ्यावर पट्टी बांधून सत्यच मानायचे का? त्याला लेख पण म्हणता यायचे नाही, पप्पू वगैरे शब्दप्रयोगावरूनच वैचारिक पातळी दिसून येतेय. खेद याचा वाटतोय कि सिनियर लोक देखील असल्या "काहीही" लिंक शेअर करतात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 03/03/2017 - 12:01 नवीन
दोन्ही बाजू नीट पडताळून मगच निर्णय घ्यावा, असे तुम्हाला वाटत नाही, याचे खरेच दु:ख झाले ! हवे (किंवा नावडते) असलेले शब्दप्रयोग तुम्हाला स्पष्ट दिसले पण एनडिटिव्हीने घेतलेली गुरमेहरची मुलाखत, बरखा दत्त बाईंचे ट्वीट्स, त्यातली व्हिडिओ क्लिपमधल्या शब्दांची बरहुकुम कॉपी आणि दर ट्वीटखाली गुरमेहर, कारगिल हिरोज डॉटर, इत्यादी गोष्टी "गौण" वाटतात याचे आश्चर्य नाही पण दु:ख जरूर वाटले ! :( असा काहीसा प्रतिसाद अपेक्षित असल्यामुळेच मी त्या दुव्याचे विश्लेषण हेतूपूर्वक केले नव्हते :) असो. खुल्या मनाने, डोळे उघडून, पूर्ण दुवा, परत नीट वाचलात तर अजून बरेच धागेदोरे हाती लागतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 03/03/2017 - 12:15 नवीन
बरखा दत्त सारख्या जान्यामान्या आणि मोठी साधनसंपत्ती असलेल्या एनडीटीव्हीसारख्या राष्ट्रीय वाहिनीच्या इन्व्हेस्टीगेटीव्ह रिपोर्टरने गुरमेहरचे वडिल कारगिल युद्धात शहीद झाले नव्हते हा मुद्दा नीट न तपासता मुलाखत घ्यावी आणि काररगिलचा उल्लेख असलेल्या ट्वीटसची (एक नव्हे) मालिका, अचूकतेची खात्री करून न घेता प्रसिद्ध करावी (की कारगिलला वलय आहे म्हणून ते मुद्दाम केले गेले ?) आणि तीच "अचूक, भेदक व अर्थपूर्ण" शब्दयोजना व्हिडिओमध्ये केवळ "किड्" असलेल्या (म्हणजे एका अर्थी गंभीर विचार न करू शकणार्‍या, निरागस) गुरमेहरच्या हातातील पाट्यांवर यावी... किती ते आश्चर्यकारक योगायोग... या सगळ्यात तुम्हाला काहीच आश्चर्य न वाटल्यास, मलाही तुमच्या वरच्या प्रतिसादाचे काहीच आश्चर्य वाटले नाही, असे समजायला अजिबात हरकत नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डँबिस००७ Fri, 03/03/2017 - 11:21 नवीन
म्हात्रे सा, खरच डोळे उघडणारा लेख !! अगोदर म्हटंल्या प्रमाणेच ह्या गुरमेहेरचा वापर प्यादी म्हणुन करण्यात आलेला आहे . बरखा दत्त सारखी सुद्धा त्यात शामिल असेल हे वाटले नव्हते. परिस्थीती खुप क्लीअर होत चाललेली आहे. डावे व डावी कडे झुकलेले , कललेले लोक आता टोटलच कलंडायला लागलेले आहेत. युनिवर्सिटीजमध्ये ब्रेन वॉशींगमध्ये डावी कडे झुकलेल्या शिक्षकांचा वापर होत आहे. १. आभा देब हबिब : ही म्हणते बुरहान वानी हा अतिरेकी नव्हता, स्वातंत्र सैनिक होता. २. निवेदिता मेनॉन : ही म्हणते, भारताने काश्मिरवर बेकायदेशीर अतिक्रमण केलेल आहे , काश्मिर पाकिस्तानला दिला पाहीजे, तसेच भारताचा उत्तर पुर्व भाग हा चीनला परत केला पाहीजे,
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 03/03/2017 - 13:50 नवीन
चिनार,
ज्याने कोणी हे असले पोश्टर लावले असतील त्याच्या पार्श्वभागावर फटके द्यायला हवे. पण ते कोणी ?? तर पोलिसांनी आणि न्यायव्यवस्थेने...अभाविप आणि इतर कोणत्याही संघटनेला तसे करण्याचा अधिकार आहे का?
माझ्या मते प्राचार्यांनी बोलावल्याशिवाय विद्यापीठात प्रवेश करायचा अधिकार पोलिसांना नाही. साहजिकंच न्यायालयही हस्तक्षेप करू शकंत नाही. म्हणून अभाविपसारख्या विद्यार्थी संस्थांनाच प्रत्युत्तर द्यावं लागतं. त्यातून पोलीस पडले भ्रष्ट आणि न्यायव्यवस्था आहे चेंगट. मग कोण करणार न्याय? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
सचु कुळकर्णी Fri, 03/03/2017 - 20:57 नवीन
माझ्या मते प्राचार्यांनी बोलावल्याशिवाय विद्यापीठात प्रवेश करायचा अधिकार पोलिसांना नाही. साहजिकंच न्यायालयही हस्तक्षेप करू शकंत नाही.
आ.न.गा.पै. आपले बरोबर आहे पण प्राचार्य नाहि तर कुलगुरुंची (V.C.) परमिशन लागते, पण एक गोष्ट आपण विसरत आहात कि ह्या देशात पोलिसांना जेव्हा जेव्हा खुलि छुट दिलि जाते त्यांच्या ईतका मोठा गुंड मग कोणिच नसतो चांगल्या चांगल्या ऑरगनाईझ क्राईम च मग ते कंबरड मोडतात इथे तर कोवळे विद्द्यार्थि आहेत हो. उदाहरणच द्यायच झाल तर आमच्या अकोल्याला पंजाबराव देशमुख कृषि विद्द्यापिठ आहे ह्याचे कँपस नॅशनल हायवे ६ (आता बायपास झालाय) च्या बरोबर दोन्हि बाजुस विखुरलेले आहे महिन्याला एक तरि तिथे अपघात व्हायचा आणि विद्द्यापिठातले विद्यार्थि टोटल हायवे बंद पाडायचे, जाळपोळ करायचे आणि कँपस मध्ये निघुन जायचे, पोलिस मुकदर्शक म्हणुन रहायचि. देवेन भारती S.P. म्हणुन आले आणि एकदा सेम ईसिंडंट झाला जाळपोळिचा त्यावेळेस पोलिसांनि जे झोडपले होते ना विद्दार्थ्याना हॉस्टेल, कँपस मध्ये घुसुन लाठिचार्ज केला होता. मुलांनि भितिने २ र्या ३र्या माळ्यावरुन उड्या मारल्या होत्या. कित्येकांचे हात पाय तुटेस्तोवर मारल होत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
प
पुंबा Mon, 03/06/2017 - 07:01 नवीन
गापै, तुम्ही समांतर न्यायव्यवस्थेला पाठींबा देताहात. अश्या स्वयंघोषीत देशभक्तांच्या संघटनेच्या हातात न्याय करण्याचा अधिकार दिला की काय किंमत राहील संविधानाची अन त्याने निर्माण केलेल्या institutions ची? ह्याच लॉजीकने खाप पंचायत आणि जात पंचायत समर्थनीय ठरतील. लोकशाहीत न्याय, स्वातंत्र्य, समता ही सारी मुल्ये संविधानाने निर्माण केलेल्या institutions च्या मार्फतच प्रस्थापित व्हावी अन्यथा अराजक माजते. अभाविप असो किंवा डाव्यांची विद्यार्थी संघटना. त्यांना कायदा हातात घेण्याचा अधिकार नसला पाहीजे. जी काही आंदोलने करायचीत ती अहिंसक मार्गाने करा नाही तर कारवाईला तयार रहा असा स्पष्ट संदेश सरकारने द्यायला हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
व
विशुमित Mon, 03/06/2017 - 09:18 नवीन
जी काही आंदोलने करायचीत ती अहिंसक मार्गाने करा नाही तर कारवाईला तयार रहा असा स्पष्ट संदेश सरकारने द्यायला हवा. --++111111111
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
ड
डँबिस००७ Fri, 03/03/2017 - 14:30 नवीन
https://www.youtube.com/watch?v=WHNlmxBdKQM बरेच देश द्रोही जे एन यु च्या विद्यार्थ्यांच्या मागे राहुन आपल काम करत आहेत, १. कविता कृष्णन : ही कम्युनिस्ट पार्टीच्या मासिकाची एडीटर आहे. २. जॉन दयाल : हा युएस मध्ये जाऊन भारता विरुद्ध गरळ ओकत असतो. ३. निवेदीता मेनॉन : ही म्हणते, सैनिक भारताच्या सिमेवर आपल्या ब्रेड बटर साठी उभे रहातात देशासाठी नाही. ह्या लोकांना फक्त कायद्याच्या चौकटीत आणुन उअपयोग नाही. त्यांना जनतेने शिक्षा दिली पाहीजे.
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Fri, 03/03/2017 - 16:36 नवीन
मोदींना फॅसिस्ट, एकाधिकारशहा, हिटलर ईई संबोधणाऱ्यांनी खरी एकाधिकारशाही किंवा त्यांची लाडकी कम्युनिस्ट राजवट अनुभवायला पाहिजे. सरकारी, म्हणजेच हुकूमशहाच्या, धोरणांविरुद्ध एक शब्द काढणारी व्यक्ती एका रात्रीत गायब केली जाते, पुन्हा कधीही न दिसण्यासाठी. अभिव्यक्ती स्वातंत्र्य तर जाऊच द्या, कसलेच स्वातंत्र्य नसते. मला एका गोष्टीचा उलगडा अजून होत नाहीये की या असल्या देशद्रोह्यांवर सरकार सरळ सरळ कारवाई का करत नाही? या घटनांवर मोदी एक सुध्दा कमेंट करत नाहीत, याचे काय कारण असावे? एवढी मोठी यंत्रणा हाती असताना तसंही एखाद्याला "कामाला" लावायला फारसे प्रयास पडू नयेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
व
वरुण मोहिते Fri, 03/03/2017 - 17:18 नवीन
कम्म्युनिस्ट पूर्वी न्हवते का ?? २०१४ नंतर आले का ???मनमोहन सिंगांना ह्यांना फासावर लटकवायला हवं असं कोणी बोलले का ?? असा मारण्याचा आतातायी निर्णय घेऊन नाही जमत कोणाला म्हणून मोदी गप्प आहेत .५ वर्ष टिकवायची आहेत ना प्रत्येकाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
प
पिजा Fri, 03/03/2017 - 19:20 नवीन
वरच दिलेला एक युक्तिवादयुक्तिवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
स
सचु कुळकर्णी Fri, 03/03/2017 - 20:22 नवीन
या घटनांवर मोदी एक सुध्दा कमेंट करत नाहीत, याचे काय कारण असावे? एवढी मोठी यंत्रणा हाती असताना तसंही एखाद्याला "कामाला" लावायला फारसे प्रयास पडू नयेत.
बिरादर यहि तो वो चाहते है. १) देशाच्या पंतप्रधानाने असल्या गोष्टि नोटिस करुन त्यावर कॉमेंट करणे म्हणजे एकप्रकारे त्यांना महत्व देणे होईल आणि सध्याच्या काळात तरी असलेले पंतप्रधान असल्या खेळांमध्ये ह्यांचे बाप आहेत. २००२ पासुन आरोप होताहेत खरे खोटे देवजाणे पण या देशाच्या सुप्रिम कोर्टाने त्यांना निर्दोष सोडले आहे, असंख्य वेळा डिवचायचे प्रयत्न झाले पण ह्यांनी पब्लिक प्लेस किंवा मिडियासमोर तरी आपला धीर सोडल्याचे माझ्या बघण्यात नाहि. तेव्हा असल्या पोरखेळांना ते महत्व देतिल असे वाटत नाहि. २) आंदोलन मग ते कसलेहि असो आणि कितिहि उग्र किंवा मोठे असो कुठल्याहि राज्य किंवा केंद्र सरकार साठि ते चिरडणे काहि फार मोठे काम नाहि, आठवा रामदेव बाबांना मुलिचा वेष करुन पलायन करावे लागले होते. असेच एक आंदोलन (गोवारी हत्याकांड) चिरडण्याचा नागपुर मध्ये सुद्धा प्रयत्न तेव्हाच्या राज्यसरकार ने केला होता बहुधा मि अकरावि ला असेन त्यावेळेस पण नक्कि आठवत त्या चेंगराचेंगरित खुप लाहन मुले बायका मरण पावल्या होत्या. पण ह्या दिल्लि युनिवर्सिटि किंवा जे.एन.यु. साठि बळाचा वापर चुकुनहि केंद्र सरकार करणार नाहि कारण एकदम साफ आहे कि सरकार हे ओळखुन आहे कि ह्या सो कॉल्ड कोम्रेड लोकांना हेच हवे आहे कि असे काहि घडावे म्हणजे देशभर राळ उठवता येईल आणि अराजक माजवता येईल. नॉन स्टेट अ‍ॅक्टर किंवा प्रॉक्झि वॉर हे शब्द आपण नेहमि ऐकतो पण ते पाकिस्तान च्या संदर्भात, तुम्हाला नाहि वाटत कि ते सेम सेम टु सेम इथे लागु पडतय. हम तेरे दर पे सनम रोज आयेंगे...... हम तेरे दर पे सनम रोज आयेंगे...... घंटि बजायंगे और भाग जायेंगे. मागच्या फेब्रुवारीत थोर क्रांतिकारक कॉम्रेड कन्हैय्या कुमार ह्यांच्यावर एक धागा आला होता मिपावर बहुधा २ धागे आले होते एक रींगमास्टरांचा* होता दुसरा आठवत नाहि कोणि काढला होता ते पण मि तेव्हाच म्हणालो होतो कि ये बहोत बडा गेम है और खेलने वाले भि इसे बडि फुरसत से खेल रहे है. पटावरच्या सोंगट्या बदलत जाणार त्यामागे खेळणारे हात मात्र तेच आहेत आणि राहतिल, होळि पेटलि कि नारळ वहायला युगपुरुष केजरीवाल, रा.रा. राहुलजी गांधि, झालेच तर लेनिन चे भारतिय व्हर्जन :) शिताराम येचुरि हे दरवर्षी येतच राहणार. तिकडे भाजप चे काहि महाराज किंवा साध्वि लोक काहि बाहि बरळत राहतात ह्यामधे होतय काय कि ह्या सगळ्या घटना पोलरायझेशन नामक रीअ‍ॅक्शन मधे कॅटॅलिस्ट चा काम करताहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ट
ट्रेड मार्क Fri, 03/03/2017 - 22:05 नवीन
मोदींनी कन्हैया किंवा बाकी गँगपैकी कोणाचं नाव घेऊन कमेंट करावी असं म्हणणं नाहीये. पण इन जनरल या देशद्रोही मंडळींचं जे चाललंय त्यावर नेहमीच्या इस्टाईलने कोणाचं नाव न घेता कानफटात मारायला पाहिजे असं वाटतं. कदाचित योग्य वेळ आली नसावी. बळाचा वापर करून चिरडलं तर ती राजकीय चूक ठरेल. पण प्यादी वापरून उपाय करता येईल. कदाचित अभाविपचा वापर म्हणूनच केला असावा. पण कुठे तरी गडबड झाली आणि प्रकरणाला वेगळा रंग चढला असावा. त्यात मेनस्ट्रीम मीडिया पण विरोधात आहे. बहोत बडा गेम है और खेलने वाले भि इसे बडि फुरसत से खेल रहे है माझं पण हेच मत आहे. बुद्धिबळाचे पट मांडले आहेत आणि खेळ्या चालू आहेत. आत्तापर्यंतच्या घटनांवरून वाटतं की मोदी आपल्या विरोधकांना मुद्दाम एखादी गोष्ट करायला प्रवृत्त करतात आणि मग अडकवतात. काय होतंय ते बघू पण हा प्रतिसाद वाचा. देशद्रोही विचारांचं लोण जास्त पसरू नये असं वाटतं एवढंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचु कुळकर्णी
स
सचु कुळकर्णी Fri, 03/03/2017 - 22:25 नवीन
त्यात मेनस्ट्रीम मीडिया पण विरोधात आहे.
मिडिया ने मिडिया च काम करावच साहेब अगदि कठोर बनुन कराव पण विद्यार्थ्यांना प्याद बनवुन, त्याला एक रेडीमेड स्क्रिप्ट देउन आपल्या लॉबिंग* च्या घाणेरड्या खेळात सामिल करु नये.
आत्तापर्यंतच्या घटनांवरून वाटतं की मोदी आपल्या विरोधकांना मुद्दाम एखादी गोष्ट करायला प्रवृत्त करतात आणि मग अडकवतात.
ह्याबाबतित नशिब पण मस्त साथ देत ह्या माणसाला, विरोधक सुद्धा असे फसतात कि २०१४ ला "एक चायवाला" संबोधल होत आणि आता तर कच्छ च्या गाढवाचिच उपमा दिलिय. लॉबिंग* :- बरखा दत्त चा मेन ऑक्युपेशन हाच आहे शि इज अ पॉलिटिकल लॉब्यिस्ट. NDTV न्युज अँकरिंग हा तर जोडधंदा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 03/04/2017 - 09:19 नवीन
मिडिया ने मिडिया च काम करावच साहेब अगदि कठोर बनुन कराव पण विद्यार्थ्यांना प्याद बनवुन, त्याला एक रेडीमेड स्क्रिप्ट देउन आपल्या लॉबिंग* च्या घाणेरड्या खेळात सामिल करु नये. दुर्दैवाने, हे शक्य नाही. कारण, आजकालची मिडिया उच्च तत्वांवर चालणारी नाही किंवा केवळ पैशासाठी चालणारीही नाही तर राजकारणी आणि इतर पैसेवाले हितसंबंधी यांनी खरेदी केलेला (त्यांचे मेजर शेअरहोल्डिंग असलेला) आणि त्यांच्या हितसंबंधांचा पाठपुरावा करणारे उद्योगधंदे आहेत. खालील दुवा चाळून पहा म्हणजे ही पाळेमुळे किती खोलवर रुजलेली आहेत आणि एकमेकात किती गुंतलेली आहेत हे पाहून चक्कर येईल...

Who owns your media?

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचु कुळकर्णी
ट
ट्रेड मार्क Fri, 03/03/2017 - 21:23 नवीन
कम्म्युनिस्ट पूर्वी न्हवते का ? होतेच. चीन, रशिया यासाठी प्रसिद्ध होते. भारतातही प. बंगाल कम्युनिस्ट विचारसरणीसाठी प्रसिद्ध आहे. नक्षलवाद ही पण कम्युनिझमचीच देणगी आहे. प. बंगालमधील कम्युनिस्ट लोकांनी केलेल्या हत्याकांडांविषयी जालावर भरपूर माहिती उपलब्ध आहे. सध्या केरळमध्ये पण हेच चालू आहे. २०१४ नंतर आले का ?? २०१४ नंतर यांना उघड विरोध होऊ लागला असावा का? मनमोहन सिंगांना ह्यांना फासावर लटकवायला हवं असं कोणी बोलले का ?? याचा काही संदर्भ लागला नाही. असा मारण्याचा आतातायी निर्णय घेऊन नाही जमत कोणाला म्हणून मोदी गप्प आहेत. मारायला कोण सांगतंय? इतर बऱ्याच गोष्टी करता येतात. एखाद्या भानगडीत अडकवता येतं, प्रत्येकाचा कुठला न कुठला वीकपॉइंट असतोच, त्याचा वापर करता येतो. अगदी मारायचंच ठरवलं तरी जाहीरपणे मारायला पाहिजे असं कोणी सांगितलंय? बरेच मार्ग आहेत. ५ वर्ष टिकवायची आहेत ना प्रत्येकाला मोदींना या टर्ममध्ये तरी कार्यकाळ पूर्ण होईल का नाही ही चिंता नाहीये. असल्या देशद्रोह्यांना वेळीच धडा शिकवला पाहिजे.
  • Log in or register to post comments
व
वरुण मोहिते Sat, 03/04/2017 - 09:18 नवीन
लेडी श्रीराम च्या मुली किंवा उच्च विचारसरणी टाईप मुले माहित आहेत दिल्ली सर्कल ची . मी आधी पण एका धाग्यात उल्लेख केलाय ह्याचा. पण त्याच बरोबरीने स्वघोषित राष्ट्रभक्त नको हेच म्हणायचंय . ह्या लोकांना विचारांनी ठेचा . हा मुद्दा का उठला कारण सगळ्यांचे वेस्टेड इंटरेस्ट . कारण राष्ट्रभक्ती काय कम्युनिस्ट काय नुकसान देशाचाच होत . फार उदाहरण आहेत अशी जगात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ट
ट्रेड मार्क Mon, 03/06/2017 - 16:45 नवीन
सध्या परिस्थिती अशी दिसतेय की देशाच्या विरोधात कोणी बोलत असेल तर ते त्याचं/ तिचं FoE असतं पण जर कोणी त्या व्यक्तव्याच्या विरोधात बोलायला लागलं की मात्र त्याला स्वघोषित राष्ट्रभक्त म्हणून हिणवलं जातं. इतर कुठल्या देशात अशी देशविरोधी विधानं सार्वजनिक ठिकाणी केली तर ती व्यक्ती अशी उजळ माथ्याने वावरू शकते का? माझ्या मते इतक्या वर्षांनी केवळ इतरधर्मीय अल्पसंख्यांकांचे लांगुलचालन न करता हिंदूंना सपोर्ट करेल असे सरकार आहे असं लोकांना वाटतंय त्यामुळे राष्ट्रभावना जरा जास्त उचंबळून आलीये. कुठलीही टोकाची भावना (Extremism) ही धोकादायकच असते, पण जो पर्यंत हे केवळ देशविरोधी बोलण्याला व कृतीला विरोध म्हणून आहे तोपर्यंत ठीक आहे. हे स्वघोषित राष्ट्रभक्त किंवा सरकारसुद्धा अशी देशविरोधी वक्तव्य करणाऱ्यांना गोळ्या घालत नाही किंवा फासावर लटकावत नाही. प्रत्येक कुटुंबात एक कांगावखोर मूल असतं, जे जे स्वतः खोड्या काढतं पण इतरांनी नुसतं बघितलं तरी कांगावा करायला लागतं आणि मग तिथे त्यावेळी उपस्थित नसलेल्या पालकांना वाटतं की या मुलाला बाकीचे किती त्रास देतात. तशी ही टोळी कांगावखोर आहे. बाकी विद्यार्थी संघटनांमधली मारामारी खूप पूर्वीपासून चालू आहे. विद्यार्थी संघटनांचे व राजकीय पक्षांचे लागेबांधे असणे हे पण बरीच वर्षे आहे. पण सध्या मात्र अभाविप भाजपशी संलग्न आहे म्हणून जरा काही झालं की त्यांच्याविरुद्ध रान उठवलं जातं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
प
प्रसाद_१९८२ Sat, 03/04/2017 - 10:02 नवीन
कारण राष्ट्रभक्ती काय कम्युनिस्ट काय नुकसान देशाचाच होत . << खर आहे या अति राष्ट्रभक्ती मुळेच, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनेक भारतीयांना स्वत:च्या जीवाची हकनाक आहूती द्यावी लागली, याच अतिराष्ट्रभक्ती मुळे स्वातंत्र्यानंतर झालेल्या भारत-पाकिस्तान फाळणीत अनेक निरपराध लोक मारली गेली आणि याच अतिराष्ट्रभक्ती मुळे पाकिस्तान सारखा कुरापती देशाची निर्मिती झाली आणि त्याचा परिणाम आजही भारतीय जनता भोगत आहे.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 03/04/2017 - 13:35 नवीन
लोकहो, गुरुमेहेरबाईंच्या वक्तव्याप्रमाणे तिच्या पित्यास पाकिस्तानने मारलं नसून युद्धाने मारलं आहे. यावरून एक प्रश्न पडलाय. पाकिस्तानात २००३ पासून दररोज सरासरी १२ लोक हल्ल्यांत मरतात (आकडेवारी : http://www.satp.org/satporgtp/countries/Pakistan/database/casualties.htm). ह्यांना कोण मारतो? पाकिस्तान की युद्ध? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 03/06/2017 - 09:03 नवीन
सौरा,
अभाविप असो किंवा डाव्यांची विद्यार्थी संघटना. त्यांना कायदा हातात घेण्याचा अधिकार नसला पाहीजे. जी काही आंदोलने करायचीत ती अहिंसक मार्गाने करा नाही तर कारवाईला तयार रहा असा स्पष्ट संदेश सरकारने द्यायला हवा.
ज्यांनी संविधानाचं रक्षण करायचं तेच भ्रष्ट असले तर कोणाकडे दाद मागायची? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
प
पुंबा Mon, 03/06/2017 - 09:52 नवीन
त्यासाठी लोकशाहीत संस्था निर्माण करणे, त्यांना पुरेसे स्वातंत्र्य देऊन सक्षम करणे, कायद्याची अंमलबजावणी निर्भयपणे करण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण करणे हे काम लोकनियुक्त सरकारल नेहमीच करणे भाग असते. लोक लोभी, संधी मिळाल्यास भ्रष्ट असणारच. नागरी समाज आणि सरकार यांचे कर्तव्य हे असते की ह्या संस्थांना उत्तम चेक्स आणि बॅलन्सेस देणं, व्यवस्थेला बळकटी देणं. भ्रष्टांना भ्रष्टाचार करण्याची संधी मिळू नये अशी व्यवस्था निर्माण करणे हे सतत चालणारे काम आहे आणि ते लोक आणि सरकार यांच्या सतत चालणार्‍या वाद संवादातूनच व्हावे. संविधानाने दिलेल्या व्यवस्थेला न मानण्याचे, संस्थांचा, कायद्याचा अनादर करण्याचे कॉस्टस हे व्यवस्थेतील कमतरतांमुळे येणार्‍या कॉस्टसच्या तुलनेत भयानक असतात. तेव्हा, इथे कायद्याचेच राज्य चालणार, झुंडीचे नाही हे पुनःपुन्हा प्रतिष्ठापीत करणे सरकारचे कर्तव्य आहे.
नी संविधानाचं रक्षण करायचं तेच भ्रष्ट असले तर कोणाकडे दाद मागायची?
आपली न्यायव्यवस्था(विशेषत: उच्च व सर्वोच्च न्यायमंडळे) स्वतंत्र, कमी भ्रष्ट आणि जास्त पारदर्शक आहे. त्यांच्याकडे दाद मागितल्यास न्याय मिळण्याची शक्यता अधिक आहे. आतापर्यंत संविधानाचे रक्षण ह्यांच्याच highest level of professional excellence मुळे झाले. विशेषतः आणीबाणी व नंतरच्या काळात संविधानावर लोकनियुक्त सरकारने जो घाला घातला त्याचा न्यायमंडळाने प्रतिकार केला त्यामुळेच आपले संविधान अक्षय्य राहिले. अर्थात न्यायव्यवस्था सुद्धा सतत अधिकाधिक पारदर्शक होत राहीलीच पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Mon, 03/06/2017 - 18:17 नवीन
सौरा,
त्यासाठी लोकशाहीत संस्था निर्माण करणे, त्यांना पुरेसे स्वातंत्र्य देऊन सक्षम करणे, कायद्याची अंमलबजावणी निर्भयपणे करण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण करणे हे काम लोकनियुक्त सरकारल नेहमीच करणे भाग असते.
ही कामं होईस्तोवर नक्षलवादी देश ताब्यात घेऊन त्याची विल्हेवाट लावतील. भ्रष्ट व्यवस्थेचा गैरफायदा देशद्रोह्यांना घेऊ द्यावा का, असा प्रश्न आहे. देश टिकवण्यासाठी देशतोड्यांना बडवलं तर त्यात चुकीचं ते काय? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 05/08/2017 - 11:04 नवीन
काही जणांना त्या विशीष्ट उद्गारांची खिल्ली उडवणे रुचले नाही तरीपण बर्‍याचशा खिल्ली अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या कक्षेत व्यवस्थीत बसतात. त्यांच्या वाक्यासहीत त्या वाक्याची खिल्ली उडवणारी वाक्ये विकिक्वोट या विकिपीडिया बंधू प्रकल्पाच्या कक्षेत येतात इंग्रजी विकिपीडियाने गुरमेहेर कौर यांच्यावरचा लेख वगळला नाही. तेव्हा विकिक्वोट प्रकल्पानेही खिल्ली उडवणार्‍या वाक्यांची यादी करुन दखल घेण्यास हरकत नसावी. खिल्ली उडवणार्‍या वाक्यांची कोण म्हणाले आणि संदर्भ यासहीत यादी मिळाल्यास तसा विकिक्वोटवर लेख बनवताअ येऊ शकेल. "This comment is not written by me, its written by my key board" हे उद्गार बहुधा कुणातरी मिपाकराचेच होते, कुणाचे होते ? हि कॉमेंटे बहुधा याच धाग्यावर अथवा मिपावर वाचली पण त्या प्रतिसादाला पंख लागले का काय माहित पण गुगलवरुन शोधता दिसत नाही.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 05/08/2017 - 14:57 नवीन
PAKISTAN DIDN’T KILL MY DAD “WAR” DID !!
हे वाक्य 'गन्स डोन्ट किल द पिपल, पिपल किल द पिपल' या वाक्याच्या समकक्ष आहे. किंवा ' अपराध वाईट असतात, म्हणून अमुक तमुक ला वाईट अपराधास जबाबदार धरु नका" हे वाक्य अशीच एक फॉलसी दर्शवते. या फॉलसीचे वर्गीकरण नेमके कोणकोणत्या प्रकारात करावे ह्याची स्वतंत्र चर्चा व्हावी म्हणून बद्दल एका चर्चा धाग्यासाठी टंकन केले पण ते मिपा सॉफ्टवेअर ऐनवेळी रागावल्याने जतन झाले नाही. पुन्हा तेवढे सगळे लिहिणे होणार नाही पण जिज्ञासूंनी या विषयावर आपली मते द्यावीत असे वाटते
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा