Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लेगिंग्स ,शॉर्ट्स ......महिलांचे हे काय चालू आहे?????????

ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर
गुरुवार, 03/30/2017 - 18:28
🗣 121 प्रतिसाद
नुकतीच एक बातमी वाचनात आली.अमेरीकेतील युनायटेड एअरलाईन्स या विमान सेवेच्या विमानात लेगिंग्स घातलेल्या दोन महीलांना ,inappropriate attire म्हणून विमानात बसू दिले नाही.कंपणीच्या म्हणण्यानुसार लेगिंग्स हे डिसेंट दिसत नाही.पुढे नेहमीप्रमाणे निओफेमिनीस्टांनी इंटरनेटवर धुमाकुळ घातल्यावर कंपणीने सारवासारव केली. यावरुन बरेच दिवस लीहायचा विचार असलेला विषय डोक्यात आला.थोडं स्पष्ट लीहीणार आहे.कदाचीत संस्थळाच्या धोरणात बसेल की नाही सांगता येत नाही.तसा मी जेंडर इक्व्यालीटीवाला असलो तरी काही बाबतीत मला स्त्री पुरुष यांनी ठराविक संकेत पाळावेत असे वाटते. तर,गेल्या काही वर्षापासून लेगिंग्स हा प्रकार भलताच लोकप्रिय झाला आहे.चाळीशीच्या काही काकवांपासून ते लहान मुलींपर्यंत हा प्रकार भलताच लोकप्रिय झाला आहे.यात शरीराला पक्षी कमरेपासून खालच्या भागाला अगदी घट्ट बसेल (स्कीन टाईट) असा हा कपड्याचा प्रकार आहे.बरेच जण यावर आक्षेप घेतात याचे कारण यात स्त्रीयांचे अंग प्रत्यांग, अगदीच स्पष्ट बोलायचे तर नितंब, मांड्या ,पोटर्या त्यांच्या मुळ आकारात स्पष्ट दिसतात.बॉडी टाईट अटायर असल्याने हे होते.मुली महीला लेगिंग्सवर शॉर्ट टॉप घालत असल्याने कमरेपासुन घालचा भाग दृगोच्चर होतो.हा प्रकार त्यामुळेच डिसेंन्सीच्या जवळपासही जाणारा नाही.यातून स्त्रीयांचे सौंदर्य न दिसता वासनेला खतपाणी घालणारे शरीरसौष्ठव दिसते. लेगिंग्स घातलेल्या मुली बहुविध वयाच्या पुरुषांचे लक्ष खेचून घेतात.यातून कोणता संदेश जातो पुरुषांकडे? .असे कपडे घालते म्हणजे चालू आहे असा अर्थ झोपडपट्टीछाप पुरुषच न्हवे तर सुशिक्षीत पुरुषही काढतात.त्यामुळे leggings is inappropriate attire हे अमेरीकन विमानकंपणीचे म्हणने मला पटते. आणखी एक प्रकार म्हणजे सलवार कमीज.यावर आक्षेप नाही ,पण यातही आजकान आले आहे.सलवार कमीजपैकी सलवार स्कीन टाईट शिवायचा व कमीजचा वा टॉपचा साइड कट कमरेच्याही वरपर्यंत ठेवायचा ,जेणेकरुण संपुर्ण भाग उघडा पडावा.अश्या महीला मुली दुचाकी चालवताना त्यांचा पुर्ण लेग पीस (हो!,खाजगीत पुरुष हाच शब्द वापरतात्) दिसत राहतो व आंबटशौकीनांची मात्र चंगळ होते. यात आणखी भर म्हणजे आजकालच्या नुकत्याच वयात आलेल्या मुली घरात शॉर्ट्स घालतात,त्या अर्ध्या चड्डीत सोसायटी खालच्या दुकानात सामन अणायला वा रात्री फिरायला जातात.आमच्याच इथे (सातार्यात्) ही परिस्थीती आहे तर पुण्या मुंबईत काय असेल हे मी सांगायला नकोच. हवे ते कपडे घालण्याचे स्वातंत्र्य म्हणजे सामाजिक संकेतांना पायदळी तुडवने नव्हे. कपड्यांमुळे बलात्कार होतात यावर माझा विश्वास न्हवता.पण आजकालच्या महीलांचे व मुलींचे कपडे बघितल्यावर मी ही थोडा कंझर्वेटीव विचाराचा झालो आहे,भडक कपडे घालण्याचा बलात्कार होण्याशी थेट संबंध नसला तरी तो एक प्रमुख डिसाईडींग फॅक्टर् आहे या विचाराप्रत मी आलो आहे. हे प्रकटन वाचून डिसेंन्सी आणि वल्गर यातला फरक कुणा महीलेला कळला तर लेख सफल झाला असे म्हणेन.

प्रतिक्रिया द्या
28836 वाचन

💬 प्रतिसाद (121)
क
किसन शिंदे Fri, 03/31/2017 - 10:13 नवीन
आपल्या युनिटात टीशर्ट आणि इतर गारमेंटस बनत. मग आमच्या एका पार्टनरच्या डोस्क्यात लेगीन्स प्रोडक्शनचे खूळ शिरले. काय शिंपल तर असते म्हणला. लायक्रा बेस होजिअरी मटेरिअल वापरुन बेस साईज प्रोड्युस करायला सुरुवात केली. काय सांगू राव, चिल्लर चिल्लर गावातले दुकानदार पण प्रत्येक प्रकारात, प्रत्येक साईजात कमीत कमी ७५ रंगाची रेंज मागतात हो. परत अमुल, एस्सा अशा बनेनवाल्या मोठ्या होजिअरी कंपन्या ह्यात उतरल्यात. बर मोठी रेंज दिली तरी त्यात काप्री बिप्री का काय असल्या स्टाइल्स असतात म्हणे, त्या बनवल्या तर आता फ्लुरोसंट मटेरिअल, ग्लॉसी मटेरिअल मागतात, ते ही दिले की प्रिंटेड फ्लोरल डिझाईनचा फंडा आलाय. सगळं करुन जेगीन्स बिगिन्स पण आहेत का विचारतात. वैतागलाय राव तो. जेन्टस टीशर्ट बरे म्हनून परत तेच करायलाय. ;)
=)) =)) पडशील म्हणावं पुन्हा यात.?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
क
कुंदन Sun, 04/02/2017 - 21:01 नवीन
उरलेल्या तुकड्यांमधुन चट्टेरी पट्टेरी पायजामे पण बनवा , काही शहरांमधुन जोरदार मागणी मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
म
मराठी कथालेखक Fri, 03/31/2017 - 10:29 नवीन
१०० होतील का हो ? :)
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Fri, 03/31/2017 - 11:56 नवीन
अशा धाग्यांवर दुर्लक्ष न करता अंताक्षरी खेळलात तर सहज होतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
अ
अद्द्या Fri, 03/31/2017 - 12:03 नवीन
नक्की प्रॉब्लेम काय आहे तेच समजलं नाही मला .. तुम्हाला नेत्रसुख घेता येत नाही नाहीए हा .. कि कसली तरी तपस्या करत होता आणि कोणी कन्या हे असलं inappropriate attire घालून समोर आणि तपास भंग होते हा..
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 03/31/2017 - 12:25 नवीन
अद्द्या तुझं बेळगावी मराठी कसलं बे? तपास भंग इलरी हुच्च्या....तपस्या भंगद तपास भंग करायला काय ते शिवाजी साटम है का स्यायडीतलं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या
अ
अद्द्या Sat, 04/01/2017 - 07:45 नवीन
बेळगावी मराठी नाही हि.. दुपारच्या अर्धवट झोपेत केलेली टंकन चूक आहे .. ते असो.. धागाकर्ता नक्की का म्हणून असले धागे टाकतो याचा तपास कोण करणारे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अद्द्या Sat, 04/01/2017 - 07:57 नवीन
मटण आणि ५-६ भाकऱ्या हाणल्या होत्या काल .. आणि मग ढीग भर भात .. झोप येणारच :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
स
सस्नेह Fri, 03/31/2017 - 18:42 नवीन
तपास भंग =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या
प
प्रसाद गोडबोले Fri, 03/31/2017 - 13:09 नवीन
टर्बोचार्ज्डराव , तुमचे इंजिन बी.एस ३ आहे की बी. एस. ४ ? ३ असेल तर उद्यापासुन बंद होईल अशी अपेक्षा आहे , ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ! नारीस्तनभर नाभीदेशं दृष्ट्वा मागामोहावेशम् । एतन्मांसवसादि विकारं मनसि विचिन्तय वारं वारम् ॥ ३॥
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Sun, 04/02/2017 - 09:42 नवीन
मार्कस भौ, श्लोक सार्थ आणि सटीप द्यायला हवा...! नारीस्तनभर नाभीदेशं दृष्ट्वा याचा अर्थ जरासा लक्षात येतोय. स्तनभर ऐवजी स्तनभार असावं असं उगीच वाटलं. (एसेस्सीला सौन्स्कृत घेतलं होतं... १९७२ साली.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
न
नीलमोहर Fri, 03/31/2017 - 13:13 नवीन
फुल्ल टाइमपास झाला, थँक्स टू ऑल हां :) बाकी ज्याला जे सूट होईल त्याने ते घालावं, स्कीन टाईट जीन्स घातलेले किडमिडे पुरुष, आणि टाईट लेगिंग्ज घातलेल्या जाडजूड बायका, दोन्ही तेवढेच वाईट दिसतात.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 03/31/2017 - 13:49 नवीन
टफि, बायकांनी काहीही उत्तन घातलं तरी त्यांच्याकडे पुरुषांनी दुर्लक्ष करावं या मताचा मी आहे. मात्र सिंधुताई सपकाळांचं मत थोडं वेगळं आहे : https://www.facebook.com/permalink.php?id=190151511024745&story_fbid=510801625626397 विमानातल्या घटनेबद्दल थोडी अधिक माहिती अशी की प्रवास करणाऱ्या दोन मुली कंपनीच्या तिकिटावर प्रवास करंत होत्या. अशा वेळेस कपडे ठरवायचा अधिकार कंपनीला असतो. इतर प्रवाशांना हा नियम लागू पडंत नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
भ
भीमराव Fri, 03/31/2017 - 13:51 नवीन
नाव घालवा लगा पुरोगामी सातारचं आसल्या जिलाब्या पाडुन, त्या बाया पोरी त्यांच्या पैशाने वाट्टेल ते घालुद्या, तुम्हाला काय करायचय का? पटलं तर बघा ते पन सौंदर्य दृष्टीनं. पाहुन सहन होत नसेल तर पाच पाच लिंबांचा रस पित चला, नाहीतर घरातच बसत चला, कशाला बायकांच्या कपड्यावर नजर हवी? आणि पाहुन तर पहायचं लाळ गळेपरीयंत नंतर मात्र हळुच चोरुन ईकडे तिकडे बघत म्हणायचं शी शी शी काय कपडे घातलेयत, वा रे संस्कृती रक्षक.
  • Log in or register to post comments
भ
भीमराव Fri, 03/31/2017 - 13:52 नवीन
नाव घालवा लगा पुरोगामी सातारचं आसल्या जिलाब्या पाडुन, त्या बाया पोरी त्यांच्या पैशाने वाट्टेल ते घालुद्या, तुम्हाला काय करायचय का? पटलं तर बघा ते पन सौंदर्य दृष्टीनं. पाहुन सहन होत नसेल तर पाच पाच लिंबांचा रस पित चला, नाहीतर घरातच बसत चला, कशाला बायकांच्या कपड्यावर नजर हवी? आणि पाहुन तर पहायचं लाळ गळेपरीयंत नंतर मात्र हळुच चोरुन ईकडे तिकडे बघत म्हणायचं शी शी शी काय कपडे घातलेयत, वा रे संस्कृती रक्षक.
  • Log in or register to post comments
श
शलभ Fri, 03/31/2017 - 17:08 नवीन
आणि पाहुन तर पहायचं लाळ गळेपरीयंत नंतर मात्र हळुच चोरुन ईकडे तिकडे बघत म्हणायचं शी शी शी काय कपडे घातलेयत, वा रे संस्कृती रक्षक.
:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीमराव
च
चित्रगुप्त Fri, 03/31/2017 - 14:36 नवीन
विमान, मग ते कोणत्याही कंपणीचे असो, आणि प्रवास अर्ध्या तासाचा असो वा वीस तासांचा, विमानात पुरुष मंडळींनी फकस्त चड्डी आणि बाया माणसांनी बिकिनीच घालणे सक्तीचे करावे, तसेच कुणाला हेही फार वाटत असेल, त्यांसी खुशाल निर्वस्त्र बसण्याचीही मुभा असावी. यामुळे बेढब शरीराचे स्त्री-पुरुषांचे ठायी लज्जेचा प्रादुर्भाव होऊन ते आपले शरीर सौष्ठव उत्तम व्हावे याकडे लक्ष देण्यास प्रवृत्त होतील, परिणामी हळू हळू ठायी ठायी सुडौल, आरोग्य संपन्न स्त्री-पुरूष नजरेस पडू लागतील. Image removed.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Fri, 03/31/2017 - 14:55 नवीन
हे सतप्रवृत्त करणारं संतकाव्य ....रोज सकाळ संध्याकाळ आणि विशेषतः झोपतांना म्हणा : तुझ्या लेगींगला भारी, माझी सोज्वळ पापणी, तुझी उत्तानता झाके, माझा संयम गं राणी | तुझ्या शॉर्टसना दाद, तुझ्या अंकाशी सलगी, काय करु धजे डोळे, त्यांना शपथ आईची | तुझा लेग-पीस माझी, काय उचलेल तलवार, माझ्या मनाची गं म्यान, तुझ्या आव्हानाला भारी | वस्त्रातून दिसे कुणा, निर-वस्त्र सौदामिनी, माझ्यासाठी इथे-तिथे , कुणी माय, कुणी भगीनी | ॐ शांती :शांती : शांती :
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 03/31/2017 - 14:58 नवीन
=)) =)) विडंबन करनेको...........जी चाहता है
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Fri, 03/31/2017 - 15:01 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
स
सूड Fri, 03/31/2017 - 15:27 नवीन
शीघ्र होतेत त्याला कविता!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
आ
आदूबाळ Fri, 03/31/2017 - 15:19 नवीन
ब्याकार हसतोय! जबरदस्त!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Fri, 03/31/2017 - 16:12 नवीन
तुझे हापूस रसाळ, नाभी तळी कसतुरी, माझ्या कपाळी चंदन, सारा अनंग शांतवी I
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
श
शलभ Fri, 03/31/2017 - 17:10 नवीन
खतरनाक..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
प
पुंबा Mon, 04/03/2017 - 11:22 नवीन
आरारा... खत्रा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
N
Nitin Palkar Sun, 04/02/2017 - 09:46 नवीन
सुंदर! भांगेत तुळस!! लै आवडलं!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
अ
अप्पा जोगळेकर Mon, 04/03/2017 - 15:01 नवीन
लै भारी हो संक्षी सर. तुम्ही कविताच लिहित जावा. तुमच्या वस्त्राला आमचे ठिगळ. कच्च्या कैरीपेक्षा हापूस आंबा भारी आणि वासनेला पडतो टफि भारी, बायांनो मारा हवी तेवढी सेंटे न्यारी, शुक्रजन्य उत्थानाला फाट्यावर मारी आला मिलनाचा काळ, पेटलेल्या ललना जाळ, मी तो वैराग्यरुपी काळ, टफी म्हणे येई तरुणी लाडात, म्हणे तू त्या 'मोजक्यां'त, सजवू लॉजची खोली लाभ होईल अमॄताचा पुरे झाली लाडीगोडी, नेस तू वस्त्रे आधी, जडली वैराग्याची व्याधी आधुनिक ऋषी जणू, टफी सांगावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
च
चित्रगुप्त Fri, 03/31/2017 - 15:00 नवीन
संक्षीसर, सतप्रवृत्त करणारं संतकाव्य एकदम भारी.
  • Log in or register to post comments
R
Ranapratap Fri, 03/31/2017 - 15:51 नवीन
दे रे सगळ्यांना सातारी झटका
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 03/31/2017 - 16:33 नवीन
लेगीन्स घालणा-यांना अडचण नसेल तर कोणी ऑब्जेक्शन घेऊ नये असं माझं मत आहे. मला लेगीन्स आणि वर मस्त टॉप घातलेल्या स्रिया नेहमीच आवडल्या आणि आकर्षक वाटल्या आहेत, हे नम्र नमूद करतो. बाकी चालू द्या ! -दिलीप बिरुटे (जगात जे जे सुंदर असेल त्याचा फ्यान असलेला)
  • Log in or register to post comments
ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर Fri, 03/31/2017 - 17:41 नवीन
एका चांगल्या विषयाचं पोटेन्शीयल असलेल्या धाग्याचा कचरा करायला मिपाकरांनकडून शिकावं. आणि सातार्याचं नाव् बदनाम कसं होईल? सातारमधल्या स्त्रीयांनी जरी डीसेंट कपडे घातले तर सातारचं नावच होईल.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Fri, 03/31/2017 - 19:04 नवीन
चांगल्या विषयाचं पोटेन्शीयल
हाहाहाहाहाहाहाहा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्बोचार्जड फिलॉसॉफर
म
माहितगार Sat, 04/01/2017 - 07:27 नवीन
धाग्याचा कचरा करायला...
टफि, हे खरयंकी लोक चांगल्या जागी सुद्धा कचरा टाकू शकतात, पण प्रथमतः उपरोक्त धागा लेखाला 'चांगला' या शब्दाची व्याख्या लागू होते का या बद्दल सांशकताच आहेत. डिसेंन्सी आणि वल्गर यातला फरक इतरांना समजावण्या आधी घागा लेखाकास स्वतःस समजलेला आहे का ? हा प्रश्न धागालेखा बद्दल उपस्थित होत असताना धागा लेखक काय स्तुती सुमनांची अपेक्षा करत आहेत किंवा कसे. आपल्या ह्या प्रतिसादावरून तुम्हाला उपरोधिक भाषेतून दाखवून दिलेल्या तार्कीक उणीवा लक्षात येण्यास अडचण जाणवते आहे असे वाटते आहे. फुलांच्या दुकानातून सुगंध येतो म्हणून फुलांची दुकाने लुटण्याचे समर्थन होते का ? भूक लागलेल्या माणसाला फळे आणि खाद्य पदार्थाचे आकर्षण वाटते म्हणून इतरांची फळे किंवा कुणाच्या स्वैपाकघरातून खाद्य पदार्थाचा सुवास आला म्हणून दुसर्‍याचे स्वैपाकघर लुटण्याचे समर्थन होते का ? मानवाला सुंदर वाटणार्‍या सर्व वस्तुंवर बुरखा घालावा असा तुमचा विचार आहे का ? स्त्री आणि पुरषांना खोक्यांचे पोषाख करुन दिले, किंवा चित्रपटात फक्त जोडलेल्या डब्ब्यांप्रमाणे रोबोटला स्त्रीचा आवाज दिला (किंवा पुरुषाचा दिलातरी) परस्पर आकर्षण थांबते का ? पुरुषजरी बुरखा घालून फिरलातरी लक्ष जात नाही का ? कि बुरखा घालून सुद्धा सार्वजनिक ठिकाणी फिरु नये आणि जायचे असेल तर मुलगा/पती/बाप/भाऊ सोबत असावा असा सौदी दृष्टीकोण आपल्या विचारात आहे ? परदेश असो वा भारत बलात्कारा बद्दलच्या गुन्ह्यांबद्दलची सांख्यिकी आणि अभ्यास अधिकतम बलात्कारांच्या केसेस स्त्रीस परिचीत व्यक्तींकडून होतात -बर्‍याचदा घरातल्या व्यक्तीकडूनही- सौदीआशिर्वादीत समाजात स्त्रीच्या जबानीस अर्धेच मुल्य असते असे काहिसे आहे त्या शिवाय त्यांच्यावरच उलटा आरोप होऊन जमिनीत पुरुन दगडांनी ठेचले जाण्यासारख्या शक्यता भयंकर गोष्टीमुळे शिवाय बहुतेक विवाह नातेवाईकांशी त्यामुळे त्यांच्याकडची खरी आकडेवारी बाहेर येत नाही-, त्या शिवाय आकर्षणा पेक्षा वर्चस्व दाखवण्याची इच्छा अथवा अपमानांदीचा बदला घेण्या प्रकारातून होणार्‍या गुन्ह्यांचे प्रमाण अधिक असते या बद्दल धागा लेखकाचा काय अभ्यास आहे? सांख्यिकींचा अभ्यास नसेल, आणि धागा लेखक काही चित्रपट पहात असतील तर पारंपारीक भारतीय पोषाख करुनही अथवा बुरखे घालून घरात बसूनही स्त्रीयांना ज्या संकटांना जावे लागते ते लागतेच हे वास्तव धागा लेखक आणि त्यांच्या प्रमाणे विचार करणारी मंडळी का लक्षात घेत नाहीत. तिसरा महत्वाचा भाग सासंकृतिक आहे आवडलेल्या गोष्टीचे कौतुक करु शकता, हवी असल्यास विनंती करु शकता घेण्यासाठी जबरदस्ती करु शकत नाही हा स्वमनावर करावयाच्या संस्काराचा भाग आहे. कायद्याचा धाक असतोच आणि असावयास हवा पण केवळ कायदा आहे म्हणून नव्हे बलात्कार न करणारे पुरुष(आणि स्त्रीया) बहुसंख्य असतात आणि संस्कारी असतात म्हणून तसे करत नाहीत. आपण हा धागा काढलाच आहे आपल्या किंवा आपल्यासारखा विचार करणार्‍या कुणा वाचकाचा सुयोग्य संस्कार कुठे ढळू पहात असेल तर त्याला चांगल्या संस्कारावर नेण्याची हिच वेळ आहे असे समजून स्वतःस सुसंस्कृत करुन घेणे चांगले. आजकालच्या स्त्रींयाची अपेक्षा त्यांच्या अभिव्यक्ती स्वतंत्र्याचा आदर करुन स्त्रीला स्त्री म्हणून स्विकारावे अशी असते. त्यातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर स्त्रीला स्त्री म्हणून समजून घेणे हे जमत नसेल त्यांनी परस्त्री कडे हवे तर बहीणीच्या अथवा मातेच्या जागी पहावे. संक्षींनी त्यांच्या प्रतिसाद ओळीतम्हटले आहे, 'माझ्यासाठी इथे-तिथे ,कुणी माय, कुणी भगीनी |' मग मातेनी काय पोषाख केला याने तुम्हास फरक पडण्याचे कारण नाही बहीणीच्या अथवा मातेच्या जागी पाहूनही कुणाला आकर्षण वाटत असेल तर कदाचित मनोवैद्यकीय सल्ल्याची समुपदेशनाची गरज आहे पाहून मानसशास्त्रीय तज्ञांकडे संपर्क करणे सयुक्तीक आहे किंवा कसे ते पहावे. सार्वजनिकरित्या दृष्टीस पडलेली अथवा दृष्टीस पडणारी प्रत्येक गोष्ट सार्वजनिक नसते, सार्वजनिकरीत्या उपलब्ध नसते, हा साधा कॉमनसेन्स आहे. (अगदी बुरखाधारी संस्कृतीत सुद्धा) एखादी गोष्ट कितीजरी आवडली असेल तर विनंती करुन मागावी लागते आणि देणार्‍याची मर्जी नसेल तर नकार गोड मानून घ्यावा लागतो. बहुसंख्य स्त्री पुरूष नकार गोड मानून घेऊ शकतात, जे नकार पचवू शकत नाहीत त्यांना कायद्याचा सामना करावा लागतो. वर एका यांच्या प्रतिसादात त्यांनी 'Don’t tell girls what to wear; teach the boys not to stare.' हे सांगितले आहेच. सातारच्या ईश्वरदास यांची संस्कृतीरक्षक धागे काढून पुरोगामी सातारच नाव घालवत असल्याची तक्रार आहे. लास्ट बट नॉट लीस्ट , युनायटेड एअरलाईन्सच्या बातमी बद्दल काढलेला आपला निष्कर्ष अपुर्‍या माहितीचा आणि तार्कीक उणीवेचा परीपाक असावा, वस्तुतः युनायटेड एअरलाईन्सचा नियम त्यांच्या एम्प्लॉयीज (आणि फ्री तिकीट दिलेल्या नातेवाईकांना) फॉर्मल ड्रेस पुरताच मर्यादीत असावा त्यांच्या एम्प्लॉईजनी प्रवासात कॅज्यूअल ड्रेस घालू नये हे समजण्यासारखे आहे. अर्थात दहावर्षाच्या मुलीवर ड्रेसकोडचे बंधन घालणे हा बिनडोकपणाच. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्बोचार्जड फिलॉसॉफर
अ
अद्द्या Sat, 04/01/2017 - 08:01 नवीन
देवा , का आपली मेहनत वाया घालवताय .. ते हि या धाग्यावर. बाकी राजकीय आणि इतर धुरळ्यातून मजा मस्ती करायला असे धागे असतात.. यापेक्षा जास्त काही नाही :) वर खेळतेत तशी अंताक्षरी खेळा , सुचल्याच तर वाट्टेल तशी यमक जुळवून कविता करा. आणि आपली चांगली लिहिण्याची / प्रतिसाद देण्याची शक्ती दुसऱ्या सिरीयस धाग्यावर उपयोग करा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
भ
भीमराव Fri, 03/31/2017 - 19:07 नवीन
तुमच्या ह्या लेखनाची १ डिजीटल फ्लेक्स प्रींट घेऊन बसा ऊद्या पोवईनाक्यावर
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 04/01/2017 - 09:19 नवीन
माहितगार, Don’t tell girls what to wear; teach the boys not to stare असं वर म्हंटलेलं आहे. पण यासंबंधी उलटा युक्तिवादही होऊ शकतो. बायकांकडे टक लावून पाहिल्याने त्यांच्या अंगास भोकं पडतात का? नाही ना? मग तसं बघितलं तर काय बिघडलं? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
अ
अत्रे Sat, 04/01/2017 - 13:34 नवीन
इंटरेस्टिंग प्रश्न आहे! http://www.thehindu.com/news/national/kerala/Staring-at-a-woman-can-land-you-in-big-trouble/article14574403.ece नुसार
The provisions were introduced in the penal code after the Nirbhaya incident at New Delhi to deal with sexual harassment and punishment for sexual harassment. If one stares at a woman continually for some time, he could be booked for stalking or even voyeurism,” Mr. Singh told The Hindu.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
म
माहितगार Sat, 04/01/2017 - 15:20 नवीन
ऑफीशीअल लिगल पोझीशन कदाचित तशी नसावी. * हि क्वोरा वरील चर्चा पहावी * पण ३५४ डी आणि 509 ही स्टॉकींग विरोधी प्रोव्हीजन्स वाकड्या नजरेने बघण्या आधी दोनदा विचार करावा इतपत म्हणजे बर्‍या पैकी स्ट्राँग आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे
प
प्रसाद गोडबोले Sat, 04/01/2017 - 15:45 नवीन
वाकड्या नजर वाकड्या नजर ही खुप व्हेग टर्म आहे ! असो ह्या विषयात चर्चा करण्यात रस राहिलेला नाही पण तरीही एक किस्सा आठवला म्हणुन सांगतो : एकदा आमच्या ग्रुप मधल्या एकदम फ्रँकली बोलणार्‍याला मुलीला मी स्पष्ट विचारले होते की जेव्हा मुली प्लंगिंग नेकलाईन , ट्रान्स्परंट , बॅकलेस, स्किनटाईट वगैरे अस्से काहीसे "रीव्हीलींग" कपडे घालत असतात , तेव्हा पोरांनी पहाणे , इंप्रेस होणे , अ‍ॅप्रोच करणे अपेक्षित असते की पाहु नये , डोळे मिटुन घ्यावेत नजर फिरवुन घ्यावी असे अपेक्षित असते ? तेव्हा तिने उत्तर दिले होते की " काही मोजक्या मुलांनी" पहाणे अपेक्षित असते आणि "इतरांनी" पाहु नये असे अपेक्षित असते ! ज्यांनी पहावे असे वाटत असते पण त्यांनी पाहिले नाही तर तो टाईप २ एरर ( ट्रु निगेटिव्ह ) होतो पण ज्यांनी पाहु नये असे अपेक्षित असते त्यांनी पाहिले की तो टाईप १ एरर ( फॉल्स पॉसिटीटीव्ह) होतो !! ह्या अचाट तर्काला कोपरापासुन दंडवत __________________________/\_____________________________
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
अ
अभ्या.. Sat, 04/01/2017 - 16:07 नवीन
अरे मार्क्या, तुझ्या त्या फ्रँकलीला विचार ना प्लीज, ते 'मोजकेच' म्हणजे कोण? कसे असते ते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Sat, 04/01/2017 - 16:13 नवीन
मोजकेच म्हणजे जे आवडत असतात ते , ज्यांना ईंप्रेस करायचे आहे तेवढेच रे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
प
प्रमोद देर्देकर Mon, 04/03/2017 - 05:35 नवीन
अरे मग आमच्या टक्याल्या अशी कोणी इ इ इ ईंप्रेस करणारी कशी रे अजुन भेटत नाहीये. तो आशा लावुन बसलाय ना बिचारा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
अ
अप्पा जोगळेकर Mon, 04/03/2017 - 10:31 नवीन
तुम्हाला त्या 'मोजकेच' कॅटेगरीत जायचे आहे वाटते ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अप्पा जोगळेकर Mon, 04/03/2017 - 10:31 नवीन
तुम्हाला त्या 'मोजकेच' कॅटेगरीत जायचे आहे वाटते ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
म
माहितगार Sat, 04/01/2017 - 19:49 नवीन
" काही मोजक्या मुलांनी" पहाणे अपेक्षित असते आणि "इतरांनी" पाहु नये असे अपेक्षित असते ! ज्यांनी पहावे असे वाटत असते पण त्यांनी पाहिले नाही तर तो टाईप २ एरर ( ट्रु निगेटिव्ह ) होतो पण ज्यांनी पाहु नये असे अपेक्षित असते त्यांनी पाहिले की तो टाईप १ एरर ( फॉल्स पॉसिटीटीव्ह) होतो !!
बहुधा असेच काहीसे ते आहे , अर्थात बर्‍याचदा स्वत:स छान वाटावे म्हणूनही पोषाख केले जातात प्रत्येक वेळेस भलता अर्थ काढलाच पाहीजे असे ही नसावे, अर्थात त्यांचे गणित पुरुषांना कसे कळावे हा तुमचा प्रश्न आहे पण २०१३ ची कायद्यातील अमेंडमेंट्स पाहता स्त्री प्रथम स्वत: होऊन तुमच्या जवळ पुरावा असेल असे मागत नाही तो पर्यंत टाईप १ची एरर कायदेशी दृस्ग्ट्या त्यातल्या त्यात सेफ असावी पण तुम्ही टाईप १ची एरर करताय म्हणून टाईप २ची एरर केल्याचा आरोप झाला तर देदाचा धावा करावा हे उत्तम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
म
माहितगार Sat, 04/01/2017 - 19:52 नवीन
सॉरी वरचे वाक्य नेमके उलटे लिहिले, टाईप २ची एरर कायदेशी दृस्ग्ट्या त्यातल्या त्यात सेफ असावी पण तुम्ही टाईप २ची एरर करताय म्हणून टाईप १ची एरर केल्याचा आरोप झाला तर देदाचा धावा करावा हे उत्तम असे वाचावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
स
सूड Mon, 04/03/2017 - 09:16 नवीन
हा प्रतिसाद / विचार चेपुवर चोप्यपस्ते करायला परवानगी द्या पोपशास्त्री.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Mon, 04/03/2017 - 13:35 नवीन
स्वतःच्या रिक्स वर शेयर करा ... परवानगी आहे :) पण पुनरेकवार हे पहा : सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात् न ब्रूयात् सत्यमप्रियम् । नासत्यं च प्रियं ब्रूयात् एष धर्मः सनातनः ॥
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
अ
अत्रे Sat, 04/01/2017 - 16:02 नवीन
धन्यवाद. http://devgan.in/ipc/section/354/ यात अजून माहिती मिळाली. त्यात तुम्ही कोना स्त्रीला फॉलो / कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असाल (तिला इंटरेस्ट नसताना) तर तो गुन्हा आहे असे म्हटले आहे. पण यात फक्त "वाकड्या नजरेने बघणे" याचा समावेश होतो असे वाटत नाही. https://indiankanoon.org/doc/68146/ प्रमाणे "वाकड्या नजरेने बघणे" चा अंतर्भाव खालील प्रकारात टाकता येईल असे वाटते
gesture or act intended to insult the modesty of a woman
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Sat, 04/01/2017 - 19:40 नवीन
तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. माझ्या प्रतिसादात मी ते स्टॉकींबद्दल आहे असे म्हटले आहे. बेसिकली सांगण्याचा मुद्दा कायदा खूप स्ट्रिक्ट आहेच त्या शिवाय स्त्रीशी केलेल्या कोणत्याही संपर्कास अधिक सहजतेने अनवाँटेडचा शिक्का मारण्याचा आधिकार स्त्रीयांना पोहोचतो आहे; की ज्यामुळे वाकड्या नजरेने पहाणेचा समावेश कायद्यात नसला तरी तुम्ही म्हणता तसे अन वाँटेड जेश्चर म्हटले की संपले, 'वाकड्या नजरेने' हा शब्द प्रयोग मी 'पापी नजरेने' (संदर्भ दातेकर्वे शब्दकोश) अशा अर्थाने आणि सोबतची 'वाकडी पावले/कृती' इंप्लिसीट धरुन केला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा