लेगिंग्स ,शॉर्ट्स ......महिलांचे हे काय चालू आहे?????????
नुकतीच एक बातमी वाचनात आली.अमेरीकेतील युनायटेड एअरलाईन्स या विमान सेवेच्या विमानात लेगिंग्स घातलेल्या दोन महीलांना ,inappropriate attire म्हणून विमानात बसू दिले नाही.कंपणीच्या म्हणण्यानुसार लेगिंग्स हे डिसेंट दिसत नाही.पुढे नेहमीप्रमाणे निओफेमिनीस्टांनी इंटरनेटवर धुमाकुळ घातल्यावर कंपणीने सारवासारव केली.
यावरुन बरेच दिवस लीहायचा विचार असलेला विषय डोक्यात आला.थोडं स्पष्ट लीहीणार आहे.कदाचीत संस्थळाच्या धोरणात बसेल की नाही सांगता येत नाही.तसा मी जेंडर इक्व्यालीटीवाला असलो तरी काही बाबतीत मला स्त्री पुरुष यांनी ठराविक संकेत पाळावेत असे वाटते.
तर,गेल्या काही वर्षापासून लेगिंग्स हा प्रकार भलताच लोकप्रिय झाला आहे.चाळीशीच्या काही काकवांपासून ते लहान मुलींपर्यंत हा प्रकार भलताच लोकप्रिय झाला आहे.यात शरीराला पक्षी कमरेपासून खालच्या भागाला अगदी घट्ट बसेल (स्कीन टाईट) असा हा कपड्याचा प्रकार आहे.बरेच जण यावर आक्षेप घेतात याचे कारण यात स्त्रीयांचे अंग प्रत्यांग, अगदीच स्पष्ट बोलायचे तर नितंब, मांड्या ,पोटर्या त्यांच्या मुळ आकारात स्पष्ट दिसतात.बॉडी टाईट अटायर असल्याने हे होते.मुली महीला लेगिंग्सवर शॉर्ट टॉप घालत असल्याने कमरेपासुन घालचा भाग दृगोच्चर होतो.हा प्रकार त्यामुळेच डिसेंन्सीच्या जवळपासही जाणारा नाही.यातून स्त्रीयांचे सौंदर्य न दिसता वासनेला खतपाणी घालणारे शरीरसौष्ठव दिसते. लेगिंग्स घातलेल्या मुली बहुविध वयाच्या पुरुषांचे लक्ष खेचून घेतात.यातून कोणता संदेश जातो पुरुषांकडे? .असे कपडे घालते म्हणजे चालू आहे असा अर्थ झोपडपट्टीछाप पुरुषच न्हवे तर सुशिक्षीत पुरुषही काढतात.त्यामुळे leggings is inappropriate attire हे अमेरीकन विमानकंपणीचे म्हणने मला पटते.
आणखी एक प्रकार म्हणजे सलवार कमीज.यावर आक्षेप नाही ,पण यातही आजकान आले आहे.सलवार कमीजपैकी सलवार स्कीन टाईट शिवायचा व कमीजचा वा टॉपचा साइड कट कमरेच्याही वरपर्यंत ठेवायचा ,जेणेकरुण संपुर्ण भाग उघडा पडावा.अश्या महीला मुली दुचाकी चालवताना त्यांचा पुर्ण लेग पीस (हो!,खाजगीत पुरुष हाच शब्द वापरतात्) दिसत राहतो व आंबटशौकीनांची मात्र चंगळ होते.
यात आणखी भर म्हणजे आजकालच्या नुकत्याच वयात आलेल्या मुली घरात शॉर्ट्स घालतात,त्या अर्ध्या चड्डीत सोसायटी खालच्या दुकानात सामन अणायला वा रात्री फिरायला जातात.आमच्याच इथे (सातार्यात्) ही परिस्थीती आहे तर पुण्या मुंबईत काय असेल हे मी सांगायला नकोच.
हवे ते कपडे घालण्याचे स्वातंत्र्य म्हणजे सामाजिक संकेतांना पायदळी तुडवने नव्हे.
कपड्यांमुळे बलात्कार होतात यावर माझा विश्वास न्हवता.पण आजकालच्या महीलांचे व मुलींचे कपडे बघितल्यावर मी ही थोडा कंझर्वेटीव विचाराचा झालो आहे,भडक कपडे घालण्याचा बलात्कार होण्याशी थेट संबंध नसला तरी तो एक प्रमुख डिसाईडींग फॅक्टर् आहे या विचाराप्रत मी आलो आहे.
हे प्रकटन वाचून डिसेंन्सी आणि वल्गर यातला फरक कुणा महीलेला कळला तर लेख सफल झाला असे म्हणेन.
💬 प्रतिसाद
(121)
आ
आनन्दा
Sat, 04/01/2017 - 14:09
नवीन
बरेच दिवस ट्फिंचे दर्शन झाले नव्हते.. त्यामुळे धागालेखकाचे नाव न वाचता धागा वाचला.
पण जसाजसा धागा वाचत पुढे गेलो तशी तशी शंका यायला लागली, म्हणून लेखकाचे नाव वाचले. आणि खात्रीच पटली..
शुभेच्छा..
- Log in or register to post comments
झ
झपाटलेला फिलॉसॉफर
Mon, 04/03/2017 - 02:58
नवीन
लेखातील मतांशी बर्याच अंशी सहमत आहे
आम्ही रस्त्यावर ना*ड्या नाचू , पण पुरुषानी शान्त राहावे ,अशी जर कोणा निओफॅमिनिस्ट / महिलान्ची मते असतील , तर जमणार नाही
या जगात नैतिकता कशासाठी आहे त्याचा आधी विचार करा . समाजव्यवस्था सुरळीत चालावी यासाठी नीति धर्म शास्त्रे यांची निर्मिती झाली
असे असताना "मॉरल पोलिसिंग" ला नाके मुरडणार्या बालिकानी आपण स्वतःसाठीच खड्डा खणत आहोत याचे भान राखावे , उद्या खड्ड्यात पडल्यावर जगाच्या नावाने बोंब मारून काहीच उपयोग होणार नाही
सुज्ञास अधिक सांगणे नलगे
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 04/03/2017 - 04:41
नवीन
नैतिक कशास म्हणावे ? या देशात गुरुंनी सन्मान्य मान्यता देऊन नग्न स्त्री संत होऊन गेल्या आहेत, गावातील पुरुषांनी कोणत्याही त्रास न देता ग्राम देवता हनुमानास नग्नपणे दोक्यावरुन पाणी नेऊन अभिषेक झाले आहेत, पाऊस नाही पडला तर शेतात काही प्रदेशातील आदीवासी स्त्रीयांनी त्यांच्या समाजातील पुरुषांची अडकाठी न येता नग्न नृत्येही केली आणि समाजाने तरीही त्यांना बाधा न येऊ देणारे पुरुष सुसंस्कृत आणि नैतिक ? कि स्त्रीयांना त्यांच्या व्यक्तिगत निवडींना नाकारुन धाकात ठेऊ इच्छिणारे तालीबानी पुरुष अधिक नैतीक?
बालिकांपेक्षा पुरुषॉफरच अधिक असुरक्षीत का बरे ? बालिका सुज्ञ आहेत यावर विश्वास असेल तर रस्ता कोणता आणि खड्डा कोणता आणि खड्डे दाखवणारा सुयोग्य मार्गदर्शक त्यांच्या त्या निवडतील आणि निवडतही असतात. हा धागा वाचण्यासाठी आणि उत्तरे देण्यासाठी कोणी बालीका आली आहे असे कुणाच्या पहाण्यात आहे का ? कशाला स्विकारावे आणि कशाला फाट्यावर मारावे हे त्यांनाही समजत असावे.
नग्न स्त्रीस सुद्धा सुरक्षेची आश्वासन देऊ शकेल अशी संस्कृती आणि संस्कार जोपासावेत किंवा कसे ? समाजाने काळजी कुणाच्या नैतिकतेची करावी , स्त्रीला सर्व परिस्थितीत सुरक्षेची आश्वस्तता न देऊ इच्छणार्या बाळगणार्या मेंदूंत शिरलेल्या असंस्कृत विचारांची आणि चुकींच्या कृतीची की अशा विचार आणि गैरकृतीस कारण शोधणार्या अपप्रवृत्तींची पाठराखण करावी ? याचा सुज्ञ वाचक नक्कीच विचार करतील.
- Log in or register to post comments
झ
झपाटलेला फिलॉसॉफर
Mon, 04/03/2017 - 05:49
नवीन
अजिबात जमणार नाही
तुम्ही भले अशा कल्पनाविलासात दन्ग राहा ... पण फेमिनिस्टास माझे असे स्वच्छ सांगणे आहे की उद्या नग्न अवस्थेत प्रक्षोभक वर्तन करीत रस्त्याने गेला तर तुम्ही सहन कराल का? जेन्डर इक्व्यालिटी हवी तर आपल्यापुरती सोयिस्कर असून चालणार नाही
इफ यू विल वियर प्रवोकेटिव्ह ड्रेसेस , डोन्ट ब्लेम अदर्स इफ यू आर मोलेस्टेड!
- Log in or register to post comments
झ
झपाटलेला फिलॉसॉफर
Mon, 04/03/2017 - 05:50
नवीन
की उद्या नग्न अवस्थेत *एखादा पुरुष* प्रक्षोभक वर्तन करीत रस्त्याने गेला तर तुम्ही सहन कराल का? जेन्डर इक्व्यालिटी हवी तर आपल्यापुरती सोयिस्कर असून चालणार नाही
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 04/03/2017 - 07:11
नवीन
इथे सुद्धा प्रक्षोभक शब्दाची व्याख्या सापेक्षच ठरते, भारतात विवीध पंथांमध्ये विवीध साधू संत नग्न रहात आले आले आहेत, लकुलीशासारखेसुद्धा अवतारी पुरुष होऊन गेले आणि त्यांच्या पावित्र्याचा सहसा आदरच केला गेला आहे. यात सोईस्करपणाचा संबंध कुठे आहे उलटपक्षी सोईस्करपणाच्या आरोपास संस्कृतीच्या कवचा आडून असंस्कृततेचे समरथन करणारे भक्षकच अधिक पात्र असतात किंवा कसे हे अभ्यासण्याची गरज असावी.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 04/03/2017 - 06:55
नवीन
मान ना मान मै तेरा मेह्ममान ?
प्रोव्होकेटीव्हची व्याख्या सापेक्ष आहे हे वर इतर सदस्यांच्या उपरोधपुर्ण प्रतिसादातून लक्षात आले नाही का ? स्त्रीयांना बुरखा घालण्यास लावणारे बुरखेतरांसाठी हिच भाषा वापरतात बुरखा न घातलेली मग कितीही पोषाख केलेली स्त्री (किंवा पुरुष सुद्धा) तथाकथीत प्रोव्होकेटीव्ह असू शकतो. सगळ शरीर झाकल फक्त डोळे उघडे ठेवले तरी प्रोव्होकेटीव्ह असू शकतात. डोळे बांधले तरी आवाज पण प्रोव्होकेटीव्ह असू शकतो. आवाज बंद केला बुरख्यात पुरुष फिरवला आणि आत माहित नसेल कोण आहे तरीही बुरखाधारीचे अस्तीत्वही प्रोव्होकेटीव्ह वाटू शकते.
दुसरे सभ्य ड्रेसेससुद्धा तुमच्या व्याख्येत नग्नतेत मोडत असतील तर त्याला कोण काय करू शकेल. आणि सरते शेवटी कायदा हातात घेतल्या मुळे स्त्रीचा, स्त्रीच्या कुटूंबीयांचा जशास आणि कायद्याचा बडगा आल्यामुळे जे परिणाम होतात त्याबद्दलही ब्लेम करण्यास अर्थ नसतो. (सगळेच कुटूंबीय हातावर हात धरुन बसत नाहीत आणि त्यांनीही कायदा हातात घेणार्यास जशास तशाने उत्तर द्यायचे ठरवले तर हे शूरवीर कुठे पहातील ? )
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 04/03/2017 - 07:55
नवीन
चोरी हा गुन्हाच आहे त्याबद्दल शंका नाहीच.
आणि आपले घर उघडे ठेआणि, त्यातील संपत्तीचे ओंगळ प्रदर्शन करणे हे कायद्याने किंवा नैतिकतेने चूक नसेलही
परंतु ते चोरांना निमंत्रण देणारे ठरते हा विवेक असावा एवढेच म्हणणे आहे.
"कड्या कुलुपे लावूनही" चोर्या होतातच
पण म्हणून घराला कुलूप न लावता गावाला जाणे कितपत शहाणपणचे आहे हे प्रत्येकाने स्वतः ठरवावे.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Mon, 04/03/2017 - 08:34
नवीन
खरे डॉक्टर,
हाच तर्क संगणक व त्यावरील विषाणूंनाही लागू पडतो. झाकून ठेवायचा डेटा उघड्यावर (सा)पडला तर ताबडतोब चोरला व विकला जातो.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
स
साहेब..
Mon, 04/03/2017 - 08:37
नवीन
पटतंय, आपण आपली काळजी घ्यावी :)
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 04/03/2017 - 10:41
नवीन
मानवी संस्कृती असुरक्षीततेकडून सुरक्षीततेकडे प्रवास करत आली आहे, हा प्रवास माणसाच्या सुसंस्कृत होत जाण्याने वाल्याचा वाल्मिकी बनवत, प्रसंगी रावण दुर्योधन अशा दुष्प्रवृत्तींवर चाप बसवून होत आला आहे पण चोरी आणि दरोडेखोरीच्या समर्थनाने अथवा त्याची दहशत स्विकारुन नव्हे.
इथे चर्चा केवळ संपत्तीची नव्हे हाडा मांसाच्या व्यक्तिची होत आहे ज्यात त्याच्या त्वचेला ऊन पाऊस वारा प्राणवायू मिळवण्याचे तसेच पोषाखातून स्वतःचा आत्मविश्वास जोपासता येणार्या स्वातंत्र्याचा समावेश असावा, जेथे निवड स्वातंत्र्यच नसेल सभ्यतेचे बुरखे घातलेल्या चोरांचे समर्थन अथवा दहशत असेल अशा संस्कृतीत व्यक्तिंची आत्मविश्वास आत्मप्रतिष्ठा आणि मन मारले जात असल्यास व्यक्ति व्यक्तिंनी मिळून बनलेला सबंध समाजच सांस्कृतीक उन्नयना वाचून वंचीत राहण्याची शक्यता असते. व्यक्ति स्वातंत्र्य नाकारणे सांस्कृतिक प्रगतीचे नव्हे सांस्कृतीक विकासाच्या पायातील बेड्या आहेत त्या बेड्या शक्य तेवढ्या कापून साचलेल्या तळ्यातील पाण्याला प्रवाहीपणे वाहण्याची संधी देण्यासाठी लागणारा विवेक ही नाण्याची दुसरी बाजू असावी किंवा कसे.
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Mon, 04/03/2017 - 13:41
नवीन
खतरनाक उपमा डॉक्टर साहेब ....पण
हे असे स्पष्ट लिहिले की " तुम्ही चोरी करण्याच्या मनोवृत्तीचे समर्थन करत आहात" असे आरोप होतात .
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 04/03/2017 - 14:25
नवीन
तुम्ही चोरी करण्याच्या मनोवृत्तीस फेससेव्हर नक्कीच मिळतो नेमक्या डॉक्टरांच्या प्रतिसादानंतर धागालेखक महाशय 'वावा' करत वापस आले आणि घागरीवरून पाणि वाहून गेल्याचे निष्पन्न झाले त्यात काय ते समजावे.
- Log in or register to post comments
ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर
Mon, 04/03/2017 - 09:50
नवीन
चला,काहीजण तरी योग्य चर्चा करत आहेत व माझ्या मताशी सहमत आहेत हे पाहून आनंद वाटला.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Mon, 04/03/2017 - 14:21
नवीन
माहितगार,
लो कट ब्लाऊज परिधान करून आत्मविश्वासाची जोपासना होते हे कळल्याने स्वर्ग म्हणतात तो केवळ दोन बोटेच उरला आहे आम्हांस! उगीच नाही शास्त्रेपुराणे पुण्य कमवायला सांगीत हो!!
आपला नम्र,
-गामाशास्त्री पंडित
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Mon, 04/03/2017 - 14:23
नवीन
डोळा मारायचा राहून गेला.
-गा.पं.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 04/03/2017 - 14:29
नवीन
पोषाख परिधानाची जी काही अनेक कारणे असू शकतात त्यात अगदी स्वतःचा आत्मविश्वास दिसून येतो. पहाणार्यांच्या काहींचा आत्मविश्वास समोरच्या व्यक्तीच्या आत्मविश्वासाने डळमळीत होत असेल तर ज्यांचा आत्मविश्वास डळमळीत होतो त्यांनी जिथून आत्मविश्वास डळमळीत होतो तिकडे न बघण्याचे काळजी घेणे कदाचित श्रेयस्कर असावे.
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
Mon, 04/03/2017 - 14:49
नवीन
नुस्ते उघडे पाऊल देखील उत्तेजक असू शकते.... बघा:
https://youtu.be/QfAJw5pTGTg
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Mon, 04/03/2017 - 15:43
नवीन
हा प्रतिसाद पाहुन ह्या धाग्याची आठवण झाली !
तुम्हाला काय सेक्सी वाटते http://www.misalpav.com/node/22023
- Log in or register to post comments
स
सूड
Mon, 04/03/2017 - 16:38
नवीन
हा हा!!
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 04/12/2017 - 12:12
नवीन
हा धागा वाचून श्री संत अक्की कुमारांच्या गरम मसालेदार जन्मावतारात असतानाच्या "तुम लडकी को इज्जत दो..." अशी सुरवात असणार्या सुवचनाची आठवण झाली =))
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3