Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एवढ्यात काय खरेदी केलंत?- ३

र
रेवती
Sun, 04/02/2017 - 19:33
🗣 177 प्रतिसाद
नमस्कार मंडळी, माझ्या आधीच्या धाग्याला भरपूर प्रतिसाद देऊन, मुख्य म्हणजे फक्त प्रतिसाद देण्यासाठी खरेदी करून तुम्ही मोठे काम केले आहे. "आता पुरे" म्हटल्यानंतरही तुम्ही न थांबण्याचे ठरवले आहे. मग विचार केला की आता तिसरा भाग काढूयात व तोही असाच यशस्वी करुयात. मागीलवेळी ज्यांना काही खरेदी करायची नव्हती त्यांनी मीठ मिरच्या का होईना घेतल्यात व त्याची नोंद इथे केलीत म्हणून आभार. हे धागे जतन केले गेले पाहिजेत म्हणजे अजून धा वीस वर्षांनी अमूक दिवशी तुम्ही भाजी खरेदी केलीत असे सिद्ध करता येईल. पूर्वी भाजीच्या किमती किती होत्या हे आपल्या पुढील पिढ्यांना कळणे सोपे जाईल. या धाग्यावर तुम्ही नवी खरेदी नमूद कराल या आशेसह प्रसिद्ध करीत आहे. माझी आजची अ‍ॅमेझॉन ऑर्डर साधारणपणे अशी असेल- मुलाच्या सेलफोनचा स्क्रीन व केस, माझा लेनोव्हो, ड्रायरच्या व्हेंटमध्ये पक्षी जातात म्हणून बर्ड स्टॉपर, ईअर रिंग्जचे सेफ्टी बॅक्स किंवा फिरक्या, डिशवॉशरचे डोअर सील. धन्यवाद.

प्रतिक्रिया द्या
49093 वाचन

💬 प्रतिसाद (177)
आ
आनंदी गोपाळ Tue, 04/04/2017 - 18:44 नवीन
अम्रूत ओव्हर हाईप्ड आहे असे वैम. गवि, प्रोजेक्टर मिळाला का? कोणता?
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 04/05/2017 - 04:01 नवीन
गवि, प्रोजेक्टर मिळाला का? कोणता?
नाही ना. अजूनही सल्ल्याची वाट बघतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
व
वाचक Sun, 04/09/2017 - 16:30 नवीन
http://www.visualapex.com/ इथे बरीच माहिती मिळून जाइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
व
वेदांत Sun, 04/09/2017 - 16:22 नवीन
शिओमीचा नीलदन्त स्पिकर घेतला. एकदम मस्त.
  • Log in or register to post comments
व
वेदांत Wed, 07/26/2017 - 13:29 नवीन
आयफोन एस ई घेतला .. ३२जिबि @१६३००
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Wed, 07/26/2017 - 13:43 नवीन
ओ, ओ वेदांतसाहेब. प्लीजच ना एक सांगाल काय? आयफोनच का घ्यायचा? म्हण्जे तुम्ही तो का घेतला? लै जण इचारतेत, मी बी लै जणांना इचारलो पण प्रॉपर उत्तर काय गावलेले नाही. सांगा ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेदांत
प
पाटीलभाऊ Wed, 07/26/2017 - 14:13 नवीन
बाईकचे चांगल्या प्रतीचे पंक्चर रिपेयर किट आणि हवा भरायचा पंप पुण्यात कुठे मिळेल? फ्लिपकार्ट आणि अमेझॉन वर बघितलं...पण रिव्ह्यूज...लय बेक्कार आहेत.
  • Log in or register to post comments
म
मोदक Wed, 07/26/2017 - 19:29 नवीन
लाल महालाकडून फडके हौदाकडे जाताना डावीकडे (सरदार सायकल्स समोर) चावला सायकल नावाचे एक लहानसे दुकान आहे, त्याच्याकडे फुट दीड फुटाचा एक पंप मिळतो. तो पंप सायकल, फुटबॉल, गाड्या सर्वांना चालतो. किंमत २०० रू. हा पंप कामचलाऊ प्रकारचा आहे व टायरमध्ये अगदीच हवा नसताना हवा भरण्यासाठी योग्य आहे, किंवा जवळच्या पंक्चरवाल्याकडे जाईपर्यंत वापरावा. जर घरच्या घरी टायरमध्ये टामटुम हवा भरायची असेल तर डेकॅथलॉन मध्ये फूटपंप मिळेल. किंमत २००० रू. Image removed. पंक्चरकीटपेक्षा सोबत एक वेगळी ट्युब ठेवा. पंक्चर झाले की सरळ ट्युब बदला आणि नवीन ट्युबवर गाडी चालवा. जुनी ट्युब सावकाशीने टायरवाल्याकडे नेऊन पंक्चर काढा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटीलभाऊ
प
पाटीलभाऊ गुरुवार, 07/27/2017 - 09:41 नवीन
धन्यवाद...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
क
कंजूस Wed, 07/26/2017 - 14:29 नवीन
पावर बँक (४०००एमेच लिहिलय पण २०००एमेच एकदा चार्ज करते)३०० रु.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Wed, 07/26/2017 - 18:26 नवीन
खादी भांडारातून लंगोटाचं कापड घेतलं, फडात ती गुळमुळीत सपोर्टरं कुचकामी असत्याती. उत्तम कसलेला लंगोट हाच निश्चिन्त मनाने अन पूर्ण एकाग्रतेने कुस्ती खेळायचा हमखास उपाय होय, हे सांगून मी माझी ज्ञानदानाची हौस पुरवून घेतो..
  • Log in or register to post comments
द
दशानन Wed, 07/26/2017 - 19:16 नवीन
इको नॉन एसी! टुरिस्ट परमिट, आज घेतली. उत्तम गाडी आहे, पुण्यातून कोणास रेंटवर हवी असेल तर मला सांगा ;)
  • Log in or register to post comments
श
शेखर गुरुवार, 07/27/2017 - 13:32 नवीन
काँग्रॅट्स राजे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
म
मोदक Wed, 07/26/2017 - 19:44 नवीन
अनेक ब्रँडेड टेल लँप हरवून / पाडून आणि अनेक स्वस्तातले टेललँप वापरून शेवटी हा एक दिवा घेतलाच. Image removed. हाताच्या बोटांच्या दोन पेरांइतकी लांबी आहे. मोबाईल चार्जरने चार्ज होतो आणि सायकल, सॅक, शर्टाची कॉलर, बॅक पॉकेट कुठेही बसवता येतो. पांढरा आणि लाल - टॉर्च आणि ब्लिंकर असे मोड आहेत. एकदम छोटूकला असल्याने खिशात वगैरे आरामात बसतो. किंमत - ७००/- रू.
  • Log in or register to post comments
स
सानझरी Fri, 07/28/2017 - 13:42 नवीन
हे भारीए!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
ग
गवि गुरुवार, 07/27/2017 - 10:18 नवीन
मला घरच्यांना अन शेजार्यांना पिडायला एक कॅरावके सिस्टीम घ्यायची आहे. उत्तम ऑप्शन कोणता? इनबिल्ट हिंदी आणि इंग्लिश गाणी जास्तीतजास्त (हजारो) असली पाहिजेत आणि नंतर नेमकी हवी ती गाणी (सशुल्क अथवा निःशुल्क) मिळवण्याची सुलभ (यक्क!!) सोय हवी.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 गुरुवार, 07/27/2017 - 13:58 नवीन
हे विकत घेणं नाही, पण तरी ... पुण्यात ९ ते ९ इतकी ड्यूटी असणारा ड्रायवर केवढ्यात मिळेल? १. त्याचं सहसा काम फक्त ऑफिसमधे सोडणे आणि आणणे इतकंच असेल. मधे सगळा विराम. २. मार्केटच्या हिशेबाने जे ओवरहेड आहेत ते सगळे मिळून महिन्याला पगारावर २००० ते ३००० होतात. (जास्तिचे तास, सुट्टीच्या दिवशी येणे, आउटस्टेशन ड्यूटी). ३. एजन्सीच्या ड्रायवर ८ तासांच्या ड्यूटिची बेसीक कॉस्ट १६००० पासून सुरु होते. वर हे २-३०००. त्यामुळे कंपन्यांना लावलेले रेट पर्सनली परवडत नाहीत. ४. ड्रायवरकडून गाडीचं नुकसान झालं तर विम्याव्यतिरिक्तच्या पैशाचं काय करायचं असतं? ======================================================================= मी गेले एक वर्ष सरासरी १७००० रु. प्रतिमाह ड्रायवरवर खर्च करत आहे (एजंसीकडून घेतला तर किमान २०,००० होइल) आणि त्याच्या सर्विसेस अजिबात प्रोफेशनल नाहीत (मंजे शहर माहित असणं, पत्ता शोधता येणं, गाडी वेळेवर साफ असणं, इ इ). तो भरोसेमंद आणि सज्जन आहे इतकं मात्र आहे.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ गुरुवार, 07/27/2017 - 14:37 नवीन
महिन्याकाठी गाडीचा ईएमाय १५,००० + पेट्रोल ४००० + ड्रायव्हर १७,००० = महिन्याचे रु. ३६,००० झाले. (देखभालखर्च, टोलं/दंड, विमा, वगैरे धरलं नाही.) तुम्ही हापिसात २२ दिवस जाता असं समजू. म्हणजे दिवसाचे रु. १६३६ झाले. इज इट रियली वर्थ इट? याच अंतरासाठी उबेरचा सगळ्यात मोठ्ठा प्राईस क्वोट रु. ४५८ (वन वे) आहे. अगदी दोन्ही धरून रु. १००० पकडा. #हात_दाखवा_उबेर_थांबवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 गुरुवार, 07/27/2017 - 14:52 नवीन
पर्सनल सेवेची आणि उबेरची तुलना करता येते काय? रोज कोण बोलवणार उबेर? रोज अ‍ॅड्रेस सांगा... ते असो. ===================== माझं म्हणणं असं आहे कि एवी तेवी प्रोफेशनल सर्विस नसेलच तर ड्रायवर अनऑर्ग्यनाइज्ड मर्केट मधे जो रेट आहे तोच द्यावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 07/27/2017 - 14:21 नवीन
हे विकत घेणे नाही पण कुणाला विकत घ्यायचे असेल तर छोट्या ऑफिसांत, घरी प्रिंटर गरजेचा झाला आहे. डेस्कजेट घेतला तर स्वस्त पडतो पण रिफिलमधे फार कमी प्रिंट निघतात. न वापरता पडून राहिला तर खराब होतो.पण कलर प्रिंटर , स्कॅनर ई. चा पर्याय स्वस्तात मिळून जातो. लेजर ची क्वालिटि उत्तम पण किंमत महाग. कलर असेल तर अजुनच जास्त. दोघांचा मध्य काढायचा तर ईप्सन चे इंक टँक प्रिंटर घेणे. जास्त प्रिंटस, प्रति पान किंमत कमी, लवकर खराब होत नाही. प्रिंट, कॉपी, स्कॅन सगळं मिळतं. साधारण १०,००० पासुन किंमत आहे.
  • Log in or register to post comments
स
सूड Fri, 07/28/2017 - 16:45 नवीन
दोन वांगी, एक राजम्याचं पाकिट, म्यागीचा पास्ता. त्यात राजमे भिजत घालायला विसरलो आहे. सुदैवाने म्यागी आहे. उद्या वांग्याची थालीपीटं होतील. रैवारी दिव्यांच्या अवसेला आणलेला आम्रखंडाचा डबा फ्रीझर मध्ये आहे. आता तो संपवायचा म्हणजे उगाच मूठभर मास चढल्यासारखं वाटतं. बरं या आठवड्यात कोणी मित्रमंडळ पण येणार नाहीये. संपवता आला असता. सध्या व्हॅक्क्यूम क्लीनरच्या शोधात आहे. बघू कस्काय जमतोय तो.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 07/28/2017 - 17:04 नवीन
आम्रखंडाचा डबा फ्रीझर मध्ये आहे. आता तो संपवायचा म्हणजे उगाच मूठभर मास चढल्यासारखं वाटतं. बरं या आठवड्यात कोणी मित्रमंडळ पण येणार नाहीये. संपवता आला असता. सध्या व्हॅक्क्यूम क्लीनरच्या शोधात आहे.
येऊ काय क्लीनर घेऊन एक दिवसापुरता. तू क्लीनींग आटप, मी डबा संपवतो, भेटणेही होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Fri, 07/28/2017 - 17:24 नवीन
चालतंय की!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
प
पैसा Fri, 07/28/2017 - 19:19 नवीन
कॅप्टन कूक मीठ एक किलो आणले. टोमॅटोचा भाव विचारला मग पाव किलो हिरवी वांगी आणि भारंगीची फुले घेतली. इंद्रायणी तांदूळ तुकडा 32 रुपये किलो हा भाव बरोबर आहे का? माहिती नसल्याने घेतले नाहीत.
  • Log in or register to post comments
द
दशानन Fri, 07/28/2017 - 19:22 नवीन
इंद्रायणी तांदूळ चा भाव तर ठीक आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Fri, 07/28/2017 - 19:48 नवीन
उद्या आणते. रत्नाग्री भयंकर महागडे शहर आहे, आणि इंद्रायणी तांदूळ इकडे होत नाही त्यामुळे दर माहीत नव्हते. अर्थात तांदूळ अस्सल इंद्रायणी असावेत असे समजून घेईन. साध्या तांदुळावर बासमतीचा वास येणारे गवत टाकून फसवतात असे ऐकिवात आहे. तसेच बेळगावातून येणाऱ्या एका दुकानदाराने पूर्वी काहीवेळा आपल्याकडे होणारा बासमतीसारखा वास येणारा दुसऱ्या कोणत्यातरी जातीचा तांदूळ (खरे सांगूनच) बराच स्वस्त दिला होता. इंद्रायणी तांदुळाच्या बाबत असे प्रकार कधी ऐकले नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
र
रेवती Fri, 07/28/2017 - 19:38 नवीन
होय, हा भाव बरोबर आहे. म्हणजे चुकिचा असल्यास मलाही फसवले आहे म्हणता येईल. ;) पण मिपाकरांनी इंद्रायणी भात शिजल्यानंतर दरवळणार्‍या वासाचं जे वर्णन केलय ते काही लागू पडलं नाही. मग दुसरीकडे जाऊन तपासले तर तांदूळ दिसायला तसाच होता. पुन्हा भात करून पाहिला. पार नाक भातात खुपसून पाहिले पण कसलाही वास आला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
द
दशानन Fri, 07/28/2017 - 19:41 नवीन
तुला फसीवले तायडे ग.. चचच :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती Fri, 07/28/2017 - 19:45 नवीन
हे असलं अर्धवट बोलू नकोस. नक्की कुठे फशिवलय ते सांग. दोन्ही दुकानात तांदूळ दिसायला सारखाच होता. दोन्ही भातांचा शिजल्यावर वास येत नव्हता. लहान दुकानात फसवले की काय असे वाटले म्हणून मोअरमध्ये गेले. म्हणजे सग्ळीकडे फसवतात का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
प
पैसा Fri, 07/28/2017 - 19:53 नवीन
आधी एकच किलो आणून बघेन तर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
अ
अभिदेश Fri, 07/28/2017 - 19:56 नवीन
चांगला येतो तो आंबेमोहोरचाच ...ईंद्रायणी नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ध
धनावडे Sat, 07/29/2017 - 00:38 नवीन
५० रुपये भाव आहे सध्या आणि वासाचं म्हणाल तर मला हि कधी आला नाही त्या भाताचा वास
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
स
सूड Mon, 08/07/2017 - 08:16 नवीन
इंद्रायणीच्या बाबतीत मीदेखील सहमत आहे. आम्ही पार राजगडाच्या पायथ्याशी ज्यांच्याकडे पिकतो त्यांच्या घरातून विकत घेतला होता, अजिबात काही दरवळ वैगरे आला नाही. भाताच्या खाचरात मात्र घमघमाट होता. आंबेमोहराच्या तोडीचा भात मिळणे आहे अजून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
आ
आदूबाळ Fri, 07/28/2017 - 19:46 नवीन
सर्दी झाली नव्हती ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती Fri, 07/28/2017 - 21:33 नवीन
नाही हो, सर्दी कुठली, पण किलोभर आणलेला प्रकार इडली करून वगैरे खपवला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
र
रुस्तम Sat, 07/29/2017 - 06:42 नवीन
इंद्रायणी भाताचा वास चांगला येतो. आंबेमोहोर सारखा. इथे मागे चर्चा वाचूनच तांदुळ घेतले. आधी 32 वाले 30 किलो घेतले. आता 35 वाले 30 किलो घेतले. आता परत हाच तांदुळ घ्यायचा विचार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
अ
अभिजीत अवलिया Fri, 07/28/2017 - 19:55 नवीन
इंद्रायणी तांदूळ तुकडा 32 रुपये किलो हा भाव बरोबर आहे का?
प्रचंड स्वस्त आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
र
रुपी Fri, 07/28/2017 - 20:00 नवीन
मागे कुणी मिपाकराने लिहिले होते ना त्यांच्याकडे इंद्रायणी तांदूळ होतो म्हणून?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पिलीयन रायडर Fri, 07/28/2017 - 22:33 नवीन
मी!! माझ्याकडे मित्राच्या शेतातुन येतो. भाव ३२ च्या आसपासच असेल. आणि त्याचा शिजल्यावर सुंदर वास दरवळतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी
प
पिलीयन रायडर Sat, 07/29/2017 - 17:15 नवीन
चौकशी केली. ४०-४२ ने घेतो आम्ही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
र
रुपी Sat, 07/29/2017 - 21:01 नवीन
मला आठवत होता तो हा अजून एक प्रतिसाद सापडला.. सध्या ते मिपावर येतात की नाही माहीत नाही. पण तो धागाही मस्त आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Sat, 07/29/2017 - 23:47 नवीन
अगदी सत्यवचन आहे ते! मऊ गुरगुट्या भात होतो तो. जगात तसला सुंदर भात नाही. शेतातुन मिळत असेल तर लगेच घ्यावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी
अ
अनुप ढेरे Fri, 07/28/2017 - 19:50 नवीन
रुंबा नामक अ‍ॅटोमॅटिक फिरणारा वॅक्युम क्लिनर कोणी वापरला आहे काय? उपयोगी आहे का हा प्रकार?
  • Log in or register to post comments
र
रॉजरमूर Wed, 08/02/2017 - 11:50 नवीन
Roomba Vs Dog
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
र
रॉजरमूर Wed, 08/02/2017 - 11:55 नवीन
Roomba Vs Dog
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रॉजरमूर
प
पद्मावति Fri, 07/28/2017 - 19:59 नवीन
मी वापरलाय. तसा सोयीचा आहे पण कानाकोपर्‍यांमधली धूळ साफ करायला त्याचा फारसा उपयोग नाही. पण मोठी मोकळी जागा असेल तर रूंबा आपले काम व्यवस्थीत करतं. अडीअडचणीला उपयोगी आहे पण रोजचे क्लीनिंग मला तरी नीट नाही जमलं. अर्थात रूंबा मी शेवटचे ट्राय केले त्यालाही आठ दहा वर्षे झाली आहेत. आता त्याचं तंत्रज्ञान अजुन यूज़र फ्रेण्डली झाले असावे अशी आशा आहे.
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 07/28/2017 - 21:59 नवीन
रुम्बा वापरतिये त्याला तीन वर्षे होत आली. फार्फार मदत करतोय. उदा. पद्मावथी म्हणतेय तसा अगदी कोपर्‍यातला केर काढला जात नाही म्हणून तेवढे झाडून घ्यायचे, म्हणजे मध्ये आणून ठेवायचे. जी खोली साफ करून हविये त्यातील वायरी, अध्येमध्ये पडलेल्या वस्तू उचलायच्या. जसे, मुलांची खेळणी, बॉल्स वगैरे. व्हर्चुअल वॉल स्विच ऑन करून ठेवायची म्हणजे त्यापुढे तो जात नाही. त्याचे डॉकिंग स्टेशन त्या खोलीतच नेऊन ठेवायचे म्हणजे डिस्चार्ज होण्याची वेळ येतात आपला आपण चार्ज होईल व आपण बाहेर जायचे असल्यात चालेल. स्वच्छतेसाठी त्यात पर्याय उपलब्ध आहेत. उदा. स्पॉट क्लिनिंग, अठवड्याचे वार, वेळेनुसार सफाई करणे. जे मी करत नाही. एकदा तो बेडखाली जाऊन अडकला व सूचना देऊन गप्प बसला. मी घरात नव्हते. काही नुकसान झाले नाही. काल एक कॉर्ड उचलायला विसरले तर त्यात गुंतून पडला. आणखी एक प्रकार म्हणजे गालीच्यावर जर खूप गडद रंग असेल तर त्याला तो टाळून जायला बघतो. त्याला ते होल आहे असे वाटते. माझ्याकडील गालिच्यावर जिथे काळे त्रिकोण आहेत ते काही दिवसांनी मळाकट दिसू लागले. तेवढेच हँडी क्लिनरने साफ करावे लागतात. एका मैत्रिणीला तिचा गडद गालिचा बदलावा लागला. माझ्याकडील मॉडेल नव्यातले नाही. यंत्राखाली ब्रिसल्स आहेत व एक रबरी रोटर आहे. यंत्राच्या सर्कम्फरन्सला एक ब्रश आहे. नव्या सिरीजचा मैत्रिणीने घेतल्यावर पाहिला त्याला ब्रिसल्स नाहीतच. दोन रबरी रोटर्स आहेत. त्यात केस अडकत नाहीत. माझ्याकडील रुम्बाचे ब्रिसल्स दर वापरानंतर साफ करावे लागतात. पण मला या यंत्राचा खूप उपयोग होतो. पूर्वी मी त्याच्या मागेमागे जाऊन सफाई करतोय का हे पहात असे. कालांतराने लक्षात आलेय की तो आपल्याला वाटतो त्यापेक्षा जास्तवेळ फिरवावा लागतो. मग व्हर्च्युअल वॉल लावून दुर्लक्ष करते. रुम्बाचे केर काढण्याचे काम होताच आपण मॉप करून घेतल्यास झटकन काम होते. पण रुम्बाचा जमीन पुसणारा प्रकार आहे तोही मैत्रिण वापरते. तिला आवडलाय. घरात कमी सामान असल्यास खूप सोयिचे पडते.
  • Log in or register to post comments
ग
गवि Sat, 07/29/2017 - 14:03 नवीन
इंद्रायणी भात मऊ चिकटपणा आणि चवीसाठी लोकप्रिय आहे. घमघमाटासाठी नव्हे. त्याचा वास तसा मंदच असतो. वर चर्चेत बहुधा एकाच पट्ट्यात होणार्या जिरगा, घनसाळ आणि इंद्रायणी यांविषयक मिसळण झालेली दिसते.
  • Log in or register to post comments
ध
धनावडे Sat, 07/29/2017 - 16:44 नवीन
हे बरोबर आहे. आणि मिसळ नाही आमच्या शेतातच पिकतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
प
पिलीयन रायडर Sat, 07/29/2017 - 23:48 नवीन
मी कधी अस्सल आंबेमोहराचा वास घेतलेला नाही. तेव्हा कदाचित त्या तुलनेत हा मंद वाटत असावा. पण त्याचा अगदी कुकर झाल्या झाल्या कळेल असा वास दरवळतो खरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा