एवढ्यात काय खरेदी केलंत?- ३
नमस्कार मंडळी,
माझ्या आधीच्या धाग्याला भरपूर प्रतिसाद देऊन, मुख्य म्हणजे फक्त प्रतिसाद देण्यासाठी खरेदी करून तुम्ही मोठे काम केले आहे. "आता पुरे" म्हटल्यानंतरही तुम्ही न थांबण्याचे ठरवले आहे. मग विचार केला की आता तिसरा भाग काढूयात व तोही असाच यशस्वी करुयात. मागीलवेळी ज्यांना काही खरेदी करायची नव्हती त्यांनी मीठ मिरच्या का होईना घेतल्यात व त्याची नोंद इथे केलीत म्हणून आभार. हे धागे जतन केले गेले पाहिजेत म्हणजे अजून धा वीस वर्षांनी अमूक दिवशी तुम्ही भाजी खरेदी केलीत असे सिद्ध करता येईल. पूर्वी भाजीच्या किमती किती होत्या हे आपल्या पुढील पिढ्यांना कळणे सोपे जाईल. या धाग्यावर तुम्ही नवी खरेदी नमूद कराल या आशेसह प्रसिद्ध करीत आहे. माझी आजची अॅमेझॉन ऑर्डर साधारणपणे अशी असेल- मुलाच्या सेलफोनचा स्क्रीन व केस, माझा लेनोव्हो, ड्रायरच्या व्हेंटमध्ये पक्षी जातात म्हणून बर्ड स्टॉपर, ईअर रिंग्जचे सेफ्टी बॅक्स किंवा फिरक्या, डिशवॉशरचे डोअर सील.
धन्यवाद.
💬 प्रतिसाद
(177)
प
पैसा
Sun, 07/30/2017 - 05:58
नवीन
आंबेमोहोर ला एकदम सुपर्ब वास असतो पण 95 रुपये किलोचे तांदूळ घेऊन रोजचा भात घशाखाली कसा उतरेल!
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Sat, 07/29/2017 - 15:32
नवीन
रेवती/पद्मावती आभार!
- Log in or register to post comments
ए
एमी
Wed, 08/02/2017 - 05:05
नवीन
काळेवाडी डीमार्ट मधून 43.5 ₹ किलो दराने इंद्रायणी तांदूळ आणला. कच्चा आणि शिजवलेला दोनही चा मस्त वास येतो. कुकर लावला कि घरभर वास दरवळतो.
आंबेमोहोर आणि बासमती दोन्ही पचायला फार जड असतात. रोज वापरला इंद्रायणी किंवा कोलम चांगला. कोलम बीनवासाचा.
एन्जॉय मुरमुरा आणला. एकवर एक फ्री 45 ₹ किलो.
- Log in or register to post comments
ए
एमी
गुरुवार, 08/10/2017 - 06:43
नवीन
वरती इतकेजण इंद्रायणी तांदळाचा वास येत नाही म्हणतायत.. मग आम्ही डीमार्टमधून आणतो काय असतं?? इंद्रायणी नावानेच विकताय्त ते....
- Log in or register to post comments
म
मोदक
Wed, 08/02/2017 - 07:31
नवीन
"Yonex Sunr 1004-PRM Badminton Kit Bag (Black)" ही किट बॅग खरेदी केली.
एक रॅकेट, शूज, पाण्याची बाटली, एक ड्रेस आणि नॅपकिन इतके सामान आरामात बसते. मोबाईल आणि पाकिटासाठी वेगळा कप्पा आहे.
.
.
दोन किंवा तीन रॅकेट ठेवायच्या असतील तर मोठी बॅग घ्यावी लागेल.
- Log in or register to post comments
इ
इरसाल
Wed, 08/02/2017 - 12:08
नवीन
फिट्बीट चार्ज -२, फिलाचे खेळजोडे घेतले.
https://encrypted-tbn0.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcSMRPoz68oINnJYH4u4oARNFHluPZ38sn6YjFmtLCXmciZX_AjF
https://www.google.co.in/imgres?imgurl=http%3A%2F%2Fecx.images-amazon.com%2Fimages%2FI%2F81AlYW6B7%252BL._UX395_.jpg&imgrefurl=http%3A%2F%2Fwww.amazon.in%2FFila-Mens-Ignatz-Sneakers%2Fdp%2FB01N9FO33D&docid=K-3VzYWf6guQtM&tbnid=WqiekCShR0im0M%3A&vet=10ahUKEwjnjd_NprjVAhUBpI8KHZz5BEEQMwgkKAAwAA..i&w=395&h=222&bih=662&biw=1366&q=Fila%20Men%27s%20Ignatz%20Sneakers&ved=0ahUKEwjnjd_NprjVAhUBpI8KHZz5BEEQMwgkKAAwAA&iact=mrc&uact=8
दादरहुन मराठी बुके ८/१० आणी बीसीटी वरुन २/३ बुके.
- Log in or register to post comments
म
मोदक
Wed, 08/02/2017 - 12:24
नवीन
फिटबिट चार्ज २ घेताना नक्की काय काय बघितले..? आणि MI बँड 2 पेक्षा काय वेगळे आहे..?
(तुमच्यासाठी "चेहरे" घेतले आहे.. या आठवड्यात हातात येईल.)
- Log in or register to post comments
इ
इरसाल
Wed, 08/02/2017 - 12:54
नवीन
https://s3-us-west-1.amazonaws.com/wearablezone/uploads/posts/September2016/eupAhY1XoHbiokMBOe7P.jpg
तुमच्या दोघांकडे पाहुन पोट जरा आत घ्यावं असा हुरुप आलेला होत तो टिकलाय ;)
- Log in or register to post comments
म
मोदक
Wed, 08/02/2017 - 12:59
नवीन
इरसाल बुवा.. हेच सगळे MI-2 पण मोजतो. आता तर नवीन अपडेट प्रमाणे सायकलिंगचेही डिटेल्स मोजले जातात.. मग त्याच सोयींसाठी १४ हजार कशाला घालवायचे..? २००० मध्ये MI-2 मिळतो आहे की..
- Log in or register to post comments
इ
इरसाल
Wed, 08/02/2017 - 13:05
नवीन
अॅमेझॉनच्या स्कीम मधे. थोडा महाग पडलेच पण ते दिल परी गधी झालं.
- Log in or register to post comments
म
मोदक
Wed, 08/02/2017 - 13:37
नवीन
ओके ओके.. मग प्रश्नच संपला.
- Log in or register to post comments
ज
जेम्स वांड
Wed, 08/02/2017 - 13:44
नवीन
(वयस्कर म्हणजे ३३-३४ च्या पुरुषाचं वजन सांभाळेल असलं)

- Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया
Wed, 08/02/2017 - 17:10
नवीन
काय आहे हे?
- Log in or register to post comments
म
मोदक
Wed, 08/02/2017 - 21:04
नवीन
पोगो स्टिक असे सर्च करा, अॅमेझॉन / फ्लिपकार्ट कुठेही मिळेल.
- Log in or register to post comments
ज
जेम्स वांड
गुरुवार, 08/03/2017 - 06:53
नवीन
तिकडे सगळ्या पोगो स्टीक बारक्या पोरांच्या आहेत हो......
- Log in or register to post comments
म
मोदक
गुरुवार, 08/03/2017 - 10:26
नवीन
याला आणखी एक काहीतरी नांव आहे ना..?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 08/02/2017 - 17:16
नवीन
मिंत्रावरून आदिदासचे टेनिस शूज मागविले. मूळ किंमत २२९९ + ४१४ (१८% वसेक) = २७१३ ला मिळाले.

- Log in or register to post comments
म
मोदक
Wed, 08/02/2017 - 20:56
नवीन
स्वदेशी नव्हते का..? ;)
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Wed, 08/02/2017 - 21:01
नवीन
पातंजलीचे बूट अजून आले नाहीत वाटतं :D
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 08/03/2017 - 06:05
नवीन
तुम्हाला कशाला बूट हवेत? तुमच्यासारख्यांसाठी पतंजलीचं जळजळशामक चूर्ण उपलब्ध आहे. ते गट्टम् करावे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 08/03/2017 - 06:01
नवीन
Made in India च आहेत.
- Log in or register to post comments
म
मोदक
गुरुवार, 08/03/2017 - 06:38
नवीन
हलके घेतल्याबद्दल धन्यवाद हो..! :)
टेनीस कधीपासून खेळता..?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 08/06/2017 - 17:17
नवीन
हो. माझ्या पूर्वीच्या नाईके बुटांच्या तुलनेत खूपच हलके आहेत.
टेनिस बर्याच वर्षात खेळलेलो नाही. परंतु टेनिस शूज टेनिससाठीच वापरले पाहिजेत असे नाही. मी हे शूज जलद चालण्यासाठी व नेहमीच्या वापरासाठी घेतले आहेत.
- Log in or register to post comments
ख
खेडूत
गुरुवार, 08/03/2017 - 07:24
नवीन
शप्पत! मी मित्राकडून आणि आदिवासींचे बूट वाचलं! :)
सारखं पेपर अन बातम्या वाचण्याचा परिणाम..दुसरं काय!
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 08/06/2017 - 17:17
नवीन
ळॉळ
- Log in or register to post comments
अ
अमित मुंबईचा
गुरुवार, 08/03/2017 - 07:33
नवीन
दोन दिवसांपूर्वी आई फोन ७+ (३२ GB) घेतला रु. ५५०००, पण फार जड फोन यजास्त दिवस वापरेन असा वाटत नाही, अशाही मंडळी आशेवर आहेत बहुदा त्यांच्यावरच कृपा होईल
- Log in or register to post comments
इ
इरसाल
गुरुवार, 08/03/2017 - 13:47
नवीन
http://www.amazon.in/Truphe-Cloth-Dryer-Stand-warranty/dp/B01LXBUBVV/ref=sr_1_sc_1?s=kitchen&ie=UTF8&qid=1501760837&sr=1-1-spell&keywords=turphe+cloth+stand
हे बी घेतलं
- Log in or register to post comments
र
रेवती
गुरुवार, 08/10/2017 - 04:35
नवीन
वेफेअर वेबसायटीवरून दोन खुर्च्या मागवल्या होत्या त्यातील एक आली. जोडण्यास सोपी होती.
- Log in or register to post comments
म
मिनेश
गुरुवार, 08/10/2017 - 06:08
नवीन
एक peltier घेतलाय . आता प्रयोग करून बघतो
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
गुरुवार, 08/10/2017 - 07:27
नवीन
लोकांना भाताची एक व्हरायटी खात्रीलायक रित्या ओळखता येत नाही ही आधुनिक शिक्षणाची देणगी म्हणायची का? तांदूळ इतका नियमीत खाल्ला जातो त्याची ही गत आहे तर बाकी तर आनंदच असेल.
- Log in or register to post comments
क
कंजूस
गुरुवार, 08/10/2017 - 13:33
नवीन
मोबाइल फोन ते थेट टिव्ही(एलइडी) वर फोटो व्हिडिओ दाखवणारी केबल कुणी वापरली आहे का?
माइक्रो युएसबी - एचडिएमआइ केबल.
सध्या किंमत ५००रु सांगत आहेत.
( क्रोमकास्ट वगैरे मध्ये न वापरता थेट कनेक्ट होते असे कळले म्हणून )
- Log in or register to post comments
स
संग्राम
गुरुवार, 08/10/2017 - 15:00
नवीन
काही मॉडेल असेल तर लिंक द्या
- Log in or register to post comments
ग
गंम्बा
Mon, 08/21/2017 - 11:21
नवीन
केबल लाउन मोबाइल टीव्हीवर बघण्या साठी मोबाईल मधे काहीतरी एमएचएल ( किंवा असे काहीतरी ) असायला लागते. तसे नसेल तर केबल वाया जाइल. हे एमएचएल बर्याच फोन मधे नसते.
दुसरा उपाय म्हणजे टिव्ही सार्ट असेल आणि फोन मधे स्मार्ट व्हियु सारखी सोय असेल तर केबल पण लागणार नाही.
- Log in or register to post comments
र
रेवती
Fri, 08/18/2017 - 19:01
नवीन
अॅमेझॉनची डिलिव्हरी आली. वस्तू पुढीलप्रमाणे- रिमोटच्या ब्याटर्या, पाणी पिण्याचे ग्लासेस सहा. ग्लास प्लेन आहे पण तळात वेगवेगळे रंग आहेत.
लगेज स्केल, लेझी सुझन, मुलाचा धनुष्यबाण, डोअरम्याट, व्यायाम शॉर्ट्स, खेळाचे साहित्य नेण्याचे ब्याकप्याक.
- Log in or register to post comments
प
पैसा
Sat, 08/19/2017 - 12:18
नवीन
क्रोसिन आणि बेनाड्रिल :(
- Log in or register to post comments
ग
गवि
Sun, 08/20/2017 - 09:33
नवीन
बापरे. काळजी घे ताई.. विश्रांती घेणे.
बेनाड्रिलने भारी झोप येईलच.
- Log in or register to post comments
प
पैसा
Sun, 08/20/2017 - 09:37
नवीन
परवा रात्री 10 तास झोपलेय. कालची झोप अजून पुरी झाली नाहीये. :(
- Log in or register to post comments
म
मंदार कात्रे
Sun, 08/20/2017 - 10:52
नवीन
नुकताच एच पी १ टीबी / ४ जीबी / आय ३ लॅप्पी घेतला . अमेझॉन सेल ला
२५ सहस्र रुप्यकाणि
अतिसूक्ष्म-मुलायम खिडक्या १० बाहेरून बसवाव्या लागल्या . डॉस येते कम्पनीकडून
- Log in or register to post comments
र
रेवती
Sun, 08/20/2017 - 23:52
नवीन
हीहीही.
- Log in or register to post comments
स
साबु
Fri, 08/25/2017 - 07:36
नवीन
अतिसूक्ष्म-मुलायम खिडक्या १० साठी किती रुप्यकाणि आणि कुठुन?
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Sun, 10/01/2017 - 17:15
नवीन
I3/4GB/1TB/डॉस
22990 -१०%डिस्काउंट hdfc कार्डाचा =20691
+नो कॉस्ट इ एम आय (तेसुद्धा जानेवारी पासून सुरू होणार)
अमेझॉन वर घेतला मागच्या आठवड्यात.
एका दुकानात 500 मध्ये w10 व बेसिक सॉफ्टवेअर टाकून मिळाले.
- Log in or register to post comments
अ
अजया
Mon, 08/21/2017 - 13:45
नवीन
अॅमेझाॅनवरुन वाॅल स्टिकर्स घेतले . बिपी मशिन घेतले omron चे. बिग बास्केटवर Aroma magic चे night cream,levon Moroccan hair serum घेतले.
- Log in or register to post comments
ग
गंम्बा
Mon, 08/21/2017 - 13:54
नवीन
अलिएक्स्प्रेस वर बघा वॉल स्टिकर्स चे भरपुर प्रकार आहेत.
https://www.aliexpress.com/wholesale?catId=200002937&initiative_id=AS_20170821035310&SearchText=wall+sticker
- Log in or register to post comments
र
रेवती
Sat, 09/30/2017 - 20:59
नवीन
सावत्याजी, नवा धागा काढा की! हा स्लोलावलाय. ;)
खूप महिन्यांनंतर आमची एक अॅक्सेंट चेअर आज आली तसेच फूट मसाजर आज आला.
दसर्यादिवशी आल्याने चांगले वाटले. चेअर चांगली आहे. तशीच एक आधी घेतल्याने अंदाज होता. फूट मसाजर हा शिआत्सु कंपनीचा मिको म्हणून आहे. चांगला वाटला.
- Log in or register to post comments
म
मनिमौ
Sun, 10/01/2017 - 03:37
नवीन
तीन शर्ट आणी एक प्यांट. घेतली लोक सोलापुरातून खरेदीला पुण्याला जातात आम्ही मात्र न चुकता इथे आल्यावर खरेदी करतो. उद्याच्या खरेदी मधे पवनकुमार स्वीट्स चे लाडू व भाग्यश्री कुंदा ही दोन नावे आहेत
- Log in or register to post comments
र
रेवती
Sun, 10/01/2017 - 13:36
नवीन
सहमत, पुण्यात खरेदीला मलातरी फारशी मजा येत नाही. माझी वहिनी मात्र तिच्या माहेराहून, औरंगाबादहून खरेदी करते ती आवडते. हे पाहून तिच्या माहेरच्यांनी कितीतरीवेळा तिकडे खरेदीला बोलावलेय. पुणे, मुंबै सोडता बाकीच्या गावांमध्ये, शहरांमध्येही चांगले कपडे मिळतात यावर विश्वास आहे. एक मिपाकरीण कोल्हापूरला म्हणजे माहेरी गेली की भरपूर सुंदर कपडे आणायची. पूर्वी आम्ही दोनदा सोलापूरला जाऊन पुलगमच्या चादरी आणल्या होत्या ते आठवले.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Sun, 10/01/2017 - 20:02
नवीन
अरेवा, रेवाक्का सोलापूरास येऊन गेलेली आहे वाटते?
बहुधा मी मिपाकर नसेन तेंव्हा, किंवा रेवाक्का.
.
.
.
नायतर फ्लेक्स लावला असता स्वागताचा.
- Log in or register to post comments
र
रेवती
Sun, 10/01/2017 - 21:56
नवीन
अरे हो, सोलापूरला पाचेकवेळा तरी येणे झाले होते तेंव्हा मी शाळकरी पोरगी होते. तुझा जन्म व्हायचा होता. घरातून निघायचे, मोडनिंबला एका नातेवाईकांकडे चहापाणी, मग सोलापूर, तिथले काम उरकायचे किंवा परिक्षा द्यायची असली तर बहुतेक सिद्धेश्वर हायस्कुलात जावे लागे, नंतर बार्शीला वडिलांच्या आजोळी मुक्काम असे काहीवेळा केले होते. सोलापूर अत्यंत आवडायचे तेव्हा.
सोलापुरात त्यावेळी तरी एक मोठी बाग होती. पुण्यात सारसबाग आहे तशी. एकदा भावाची परिक्षा देऊन झाल्यावर आम्ही त्या बागेत बसलो असताना संध्याकाळी तेथील खाण्याचे स्टॉल्स सुरु झाले व अचानक एक गृहस्थ भेटले. ते वडिलांना ओळखत होते व आग्रहाने त्यांच्या उपहारगृहात घेऊन गेले. तेंव्हा पहिल्यांदा मी पावभाजी खाल्ली होती.
काही कारणाने डॉक्टरांकडे जाण्याची वेळ आली की तेंव्हा वालचंदनगर गाठावे लागे. आता अर्थातच परिस्थिती बदलली असेल. मला तेंव्हाचे आठवते.
- Log in or register to post comments
र
रेवती
Sun, 10/01/2017 - 21:58
नवीन
माझ्या काही मैत्रिणी हरिभाई देवकरण शाळेतल्या होत्या. इंदापूरला काही जमेना म्हणून आम्ही पुण्याला व त्या मैत्रिणी सोलापुरास परत गेल्या.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Sun, 10/01/2017 - 20:05
नवीन
पवनकुमार एकच लंबर. चाटी/फलटण गल्लीतला ना?
कुंद्याला ऑप्शन्स आहेत म्हणा. आप्पा हलवाई, आनंद वगैरे.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- ›
- »