"मराठी ही दक्षिण भारतीय भाषा का मानत नाहीत?"
१૪ एप्रिलपासून तमिळ भाषिकांचे नवीन वर्ष सुरु झालं.यासंबंधी माहिती वाचताना एक मुद्दा विचार करण्यासारखा वाटला की 'मराठी ही दक्षिण भारतीय भाषा का मानत नाहीत?'
भौगोलिक दृष्ट्या भारताचे पूर्वीपासून दोन भाग मानले जातात.
१ आर्यावर्त Āryāvarta (आर्यावर्त) is the historic name for the present-day northern Indian subcontinent, including the territories north of the Vindhya Range in India as per the classical Sanskrit literature. - Wikipedia
२ दक्षिणापथ(आर्यावर्ताच्या खाली असणारा भारतीय भूभाग)
साधारणपणे नर्मदेच्या खालचा सगळा प्रदेश म्हणजे दक्षिण भारत.म्हणजे भौगोलिक दृष्ट्या महाराष्ट्र दक्षिण भारतात येतो.पण भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर मात्र महाराष्ट्र पश्चिम भारतात गेला.
१९५६ ची भाषावार प्रांतरचना भारताने स्विकारली.आता भाषेच्या दृष्टीने पहायचं तर भाषासंशोधक विश्वनाथ खैरे यांचं संशोधन पहा.
विश्वनाथ खैरेंसारख्या संशोधकानं मराठीत अर्ध्याहून अधिक शब्द तमिळमधले आहेत असं म्हटलंय.महाराष्ट्राच्या खेडेगावांमधे वापरल्या जाणार्या बहुतांश शब्दांचं मूळ तमिळ भाषेत आहे.खैरेंनी या विषयावर भरपूर संशोधनही केलंय.पुस्तकंही लिहिलियेत!
आपले मराठी संस्कार दक्षिण भारताशी जास्त जुळतात,अर्धे अधिक शब्द तमिळ,तेलुगू,कन्नड
मग आपण पश्चिम भारतात कुठून आलो?
मराठी ही इंडो-आर्यन कुळातील भाषा आहे.तर दक्षिणेतल्या भाषा या द्रविड कुळातल्या आहेत.
अमुक एका भारतीय भाषेचा समावेश कोणत्या कुळात करायचा याचे निकष कोणते?त्याची माहिती कुठे वाचायला मिळेल?
आपण मराठी भाषेच्या लेखनासाठी देवनागरी लिपी वापरतो. देवनागरी हीच हिंदीच्या लेखनासाठी वापरली जाते.उत्तरेतील बरीचशी राज्य ही हिंदी भाषिक आहेत.
म्हणून महाराष्ट्राला आणि पर्यायानं मराठीला त्यांच्यातलं समजलं जात असेल?
मराठीचा आणि तमिळ भाषेचा घनिष्ठ संबंध खैरेंनी दाखवून दिला आहे.तमिळमधली काही अक्षरं सोडली तर दक्षिणेतल्या कोणत्याच भाषेची लिपी ही देवनागरीशी फारशी मिळतजुळत नाही.मग मराठी ही द्रविड कुळातील शब्दांनी समृध्द भाषा असताना 'फक्त लेखनासाठी आपण देवनागरी वापरतो' म्हणून दक्षिण भारतीय भाषांमधे मराठीचा समावेश केला जात नाही,असं म्हणावं का?
विश्वनाथ खैरेंसारख्या संशोधकानं मराठीत अर्ध्याहून अधिक शब्द तमिळमधले आहेत असं म्हटलंय.महाराष्ट्राच्या खेडेगावांमधे वापरल्या जाणार्या बहुतांश शब्दांचं मूळ तमिळ भाषेत आहे.खैरेंनी या विषयावर भरपूर संशोधनही केलंय.पुस्तकंही लिहिलियेत!उलटं असेल का? म्हणजे तामिळमधील अर्ध्याहून अधिक शब्द मराठीतून गेले आहेत असं असेल का?आपले मराठी संस्कार दक्षिण भारताशी जास्त जुळतात,अर्धे अधिक शब्द तमिळ,तेलुगू,कन्नड मग आपण पश्चिम भारतात कुठून आलो?मराठी, गुजराती व हिंदी या एकमेकांशी जास्त जवळ आहेत व या तीनही भाषांची संस्कृतशी जवळीक आहे. त्यामानाने दाक्षिणात्य भाषा मराठीपासून बर्याच वेगळ्या आहेत.