"मराठी ही दक्षिण भारतीय भाषा का मानत नाहीत?"
१૪ एप्रिलपासून तमिळ भाषिकांचे नवीन वर्ष सुरु झालं.यासंबंधी माहिती वाचताना एक मुद्दा विचार करण्यासारखा वाटला की 'मराठी ही दक्षिण भारतीय भाषा का मानत नाहीत?'
भौगोलिक दृष्ट्या भारताचे पूर्वीपासून दोन भाग मानले जातात.
१ आर्यावर्त Āryāvarta (आर्यावर्त) is the historic name for the present-day northern Indian subcontinent, including the territories north of the Vindhya Range in India as per the classical Sanskrit literature. - Wikipedia
२ दक्षिणापथ(आर्यावर्ताच्या खाली असणारा भारतीय भूभाग)
साधारणपणे नर्मदेच्या खालचा सगळा प्रदेश म्हणजे दक्षिण भारत.म्हणजे भौगोलिक दृष्ट्या महाराष्ट्र दक्षिण भारतात येतो.पण भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर मात्र महाराष्ट्र पश्चिम भारतात गेला.
१९५६ ची भाषावार प्रांतरचना भारताने स्विकारली.आता भाषेच्या दृष्टीने पहायचं तर भाषासंशोधक विश्वनाथ खैरे यांचं संशोधन पहा.
विश्वनाथ खैरेंसारख्या संशोधकानं मराठीत अर्ध्याहून अधिक शब्द तमिळमधले आहेत असं म्हटलंय.महाराष्ट्राच्या खेडेगावांमधे वापरल्या जाणार्या बहुतांश शब्दांचं मूळ तमिळ भाषेत आहे.खैरेंनी या विषयावर भरपूर संशोधनही केलंय.पुस्तकंही लिहिलियेत!
आपले मराठी संस्कार दक्षिण भारताशी जास्त जुळतात,अर्धे अधिक शब्द तमिळ,तेलुगू,कन्नड
मग आपण पश्चिम भारतात कुठून आलो?
मराठी ही इंडो-आर्यन कुळातील भाषा आहे.तर दक्षिणेतल्या भाषा या द्रविड कुळातल्या आहेत.
अमुक एका भारतीय भाषेचा समावेश कोणत्या कुळात करायचा याचे निकष कोणते?त्याची माहिती कुठे वाचायला मिळेल?
आपण मराठी भाषेच्या लेखनासाठी देवनागरी लिपी वापरतो. देवनागरी हीच हिंदीच्या लेखनासाठी वापरली जाते.उत्तरेतील बरीचशी राज्य ही हिंदी भाषिक आहेत.
म्हणून महाराष्ट्राला आणि पर्यायानं मराठीला त्यांच्यातलं समजलं जात असेल?
मराठीचा आणि तमिळ भाषेचा घनिष्ठ संबंध खैरेंनी दाखवून दिला आहे.तमिळमधली काही अक्षरं सोडली तर दक्षिणेतल्या कोणत्याच भाषेची लिपी ही देवनागरीशी फारशी मिळतजुळत नाही.मग मराठी ही द्रविड कुळातील शब्दांनी समृध्द भाषा असताना 'फक्त लेखनासाठी आपण देवनागरी वापरतो' म्हणून दक्षिण भारतीय भाषांमधे मराठीचा समावेश केला जात नाही,असं म्हणावं का?
💬 प्रतिसाद
(59)
ख
खटपट्या
Wed, 04/19/2017 - 14:46
नवीन
लेखनासाठी आपण देवनागरी वापरायला लागल्यास १५० वर्षेही झाली नसतील ( जाणकार सांगतीलच) मराठी आधी मोडी लीपीत लीहीली जायची. अजूनही जुने जमीनीचे कागद मोडीत आहेत. मुद्रणास सुलभ म्हणून आपण देवनागरी अंगीकारली. त्यामुळे फक्त आपण देवनागरी वापरतो म्हणून काही ग्रुहीतके मांडणे बरोबर नाही.
बाकी चालूद्या
- Log in or register to post comments
म
माहितगार
Wed, 04/19/2017 - 15:21
नवीन
प्रमाणित देवनागरीचा वापर लोकमान्य टिळकांच्या काळापासूनचा आहे (देवनागरी प्रचारिणी सभा नावाची उत्तरप्रदेशातून एक संस्था कार्यरत असे त्यांनी प्रमाणीकरणासाठी आणि देशभर एकच लिपी वापरली जावी म्हणून देशभरातल्या तत्कालीन भाषाविद्वान आणि राजकीय नेत्यांना आमंत्रणे देऊन देशभर सहमतीसाठी प्रयत्न केले. हिंदी शिवाय नेपाळी आणि मराठीने ते प्रमाणीकरण स्विकारले, बाकी आसामी बंगाली गुजराथी यांनी थोड्या बदलांनी प्रमाण नसलेली देवनागरी स्वतःचे बदल लावून स्विकारली. जसे गुजराथींना केवळ लेखन कालावधी वाचवण्यासाठी म्हणून शिरोरेष नाकारली. व्यापारी लोकांच्या लेखन वेगात फरक पडत असेलही पण संगणकीय जमान्यात अशा कारणांना वस्तुतः काही अर्थ राहीलेला नाही.
दक्षिणात्य भाषाही देवनागरीपुर्व ब्राह्मी लिपीवरूनच तयार झाल्या आहेत जोडाक्षरांची मूळ कल्पना सर्व भारतीय लिप्यांना एकसारखीच आहे. केवळ दिखाऊ भाषिक अस्मितेच्या कारणांनी वेगवेगळ्या लिप्यांचा अनावश्यक हट्ट धरला गेला आहे. नेपाळी किंवा मराठीने देवनागरी वापरल्याने नेपाळी किंवा मराठीच्या भाषिक स्वातंत्र्यावर काही नकारात्मक परिणाम झालेला नाही. लोकांची स्थलांतरे लिपीभिन्नतेने थांबत नाहीतच उलट तुमची लिपी वाचणे अवघड असेल तर स्थलांतरीतांना भाषा शिकण्यास विलंब होण्याची शक्यताच अधिक असते. पण चुकीच्या अस्मितेतून तार्कीक उणीवेच्या बादरायण संबंध नसलेल्या थेअरी पसरवल्या जात रहातात. सेवन करणारे मुकाट्याए सेवन करत रहातात. असो.
- Log in or register to post comments
उ
उपयोजक
Wed, 04/19/2017 - 16:30
नवीन
जसा तमिळचा उगम ब्राह्मीतून तसा मोडीचा उगम कशातून?
- Log in or register to post comments
म
माहितगार
Wed, 04/19/2017 - 18:29
नवीन
मी यातला तज्ञ नाही पण मोडी म्हणजे तत्कालीन नित्य वापरातल्या लिपीलाच धावत्या लिपीत बदलणे होते, ब्राह्मी → देवनागरीची २० व्या शतकात प्रमाण म्हणून स्विकारल्या जाण्याच्या ज्याकाही व्हर्शन असतील त्या पासून बनवलेल्या लिपी→ मोडी लिपी
अर्थात मोडी जाणकारांनी यावर लिहिणे अधिक चांगले मी लिहिलेले चुकीचे असू शकते.
- Log in or register to post comments
स
सुनील
गुरुवार, 04/20/2017 - 03:28
नवीन
"चामुंडराजे करवियले..." हा शिलालेख जुन्या देवनागरीतच आहे!
- Log in or register to post comments
प
पुंबा
Fri, 04/21/2017 - 14:13
नवीन
+११
हेच डोक्यात आले होते..
- Log in or register to post comments
म
माहितगार
Wed, 04/19/2017 - 15:41
नवीन
तमिळ भाषा जगातली ओरीजनल पहिली भाषा आपलीच असल्याची तामिळ थाप त्याबद्दल आणि ऑस्ट्रेलिअन आदीवासी भाषांशी साम्य असल्याबद्दलचा हा एक लेख (पुर्ण पटला नाहीतरी अंशिक दखल घेण्यास हरकत नसावी) मुख्य म्हणजे आदीवासी बोलींचा व्यवस्थीत शोध वेळीच घेतला असता तर अशी थाप एवढी दशके त्यांना चालवता आली नसती. प्रश्न त्यांनी आपली भाषा जगातली पहिली म्हणण्याचा नाही सोकावण्याच्या वृत्तीचा आहे
- Log in or register to post comments
द
दीपक११७७
Sat, 05/20/2017 - 18:17
नवीन
बलुचीस्थान ची ब्राहुई ही भाषा तमिळ भाषेशी मिळती जुळती आहे
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sun, 05/28/2017 - 13:12
नवीन
१९९९ मध्ये लक्ष्मण बिडवई यांनी डॉबाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठात सादर केलेला विश्वनाथ खैरेंची मते संस्कृत दृष्टीकोणातून खोडणारा पिएचडी शोधप्रबंध शोधगंगा डॉटकॉमवर उपलब्ध दिसतो आहे. अर्थात प्रंबंध वाचताना संस्कृतवादाचा दुसर्या टोकाचा चष्माही जाणवतो असे वाटते. असो हा शोधगंगा डॉटकॉमवरील दुवा
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2