Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या राजकीय घडामोडी भाग ६- दिल्ली महानगरपालिका निवडणूक २०१७ विशेष

र
राघवेंद्र
Mon, 04/24/2017 - 16:45
🗣 91 प्रतिसाद
रविवारी एकूण ५४% मतदान दिल्ली महानगरपालिका साठी झाले आहे आणि एक्झिट पोल अंदाज भाजपाला बहुमत मिळेल असे म्हणत आहे. दिल्ली दक्षिण (१०४ जागा) , दिल्ली उत्तर (१०४ जागा ) आणि दिल्ली पूर्व (६४ जागा ) अश्या तीन महानगरपालिका आहेत. ऍक्सिस - इंडिया टुडे चा एक्झिट पोल
महानगरपालिका भाजप आआप काँग्रेस
उत्तर 78-848-128-12
दक्षिण 79-859-137-11
पूर्व 45-516-104-8
एबीपी - सी वोटर चा एक्झिट पोल
महानगरपालिका भाजप आआप काँग्रेस
उत्तर 8867
दक्षिण 8399
पूर्व 4796
निवडणुकीचा निकाल दिल्लीकर ,अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्ष, काँग्रेस आणि EVM साठी कसा असेल या चर्चे साठी हा धागा उघडत आहे. मतमोजणी २६ एप्रिल रोजी आहे.
वर्गीकरण
दिल्ली महानगरपालिका एक्झिट पोल निवडणूक अरविंद केजरीवाल

प्रतिक्रिया द्या
19623 वाचन

💬 प्रतिसाद (91)
द
दशानन Mon, 04/24/2017 - 17:46 नवीन
आपचा जो खोडसाळपणा सुरू आहे त्यावरून तरी दंगा तरी फिक्स आहे. बाकी 52% च्या आसपास मतदान ही खरी गेम आहे.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Mon, 04/24/2017 - 18:38 नवीन
सेफॉलॉजिस्ट यशवंत देशमुख यांनी ट्विटरवर दिल्ली महापालिका निवडणुकांमध्ये मतांच्या टक्केवारीचा खालील तक्ता प्रसिध्द केला होता. काही कारणांनी त्यांनी तो तक्ता ट्विटरवरून काढलेला दिसतो. त्यांनी तो तक्ता काढण्यापूर्वीच मी तो सेव्ह करून ठेवला होता हे चांगले झाले. Image removed. या तक्त्यावरून असे दिसते की दिल्ली महापालिकांमध्ये भाजपला ५०.७%, आम आदमी पक्षाला १८.६%, काँग्रेसला १९.१% आणि इतरांना ११.७% मते मिळतील असा त्यांचा अंदाज आहे. पण त्यामानाने भाजपला २७२ पैकी २०२ ते २२० हा जागांचा खूपच सावध अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. जर मतांची ही टक्केवारी खरोखरच अशी आली तर भाजपचा दिल्लीमध्ये अगदी पूर्ण स्वीप असेल. फक्त यासाठी खूपच महत्वाचे 'कॅव्हिएट' आहे आणि ते म्हणजे यशवंत देशमुखांनी मतांचा अंदाज अचूक व्यक्त केला आहे. तसेच आम आदमी पक्षाची आणि काँग्रेसची मते एखाद्याच भागात खूप मोठ्या प्रमाणावर एकवटली असली तर त्या भागामधील जवळपास सगळ्या जागा ते पक्ष जिंकू शकतील. पण तसे घडण्यासाठी तो भाग वगळता दिल्लीच्या इतर भागांमध्ये त्या पक्षांना जवळपास शून्य मते मिळायला हवीत. तसे होणे कठिणच आहे. काँग्रेस आणि आआपची मते बर्‍यापैकी विखुरलेली असतील (हीच शक्यता जास्त) आणि मतांची टक्केवारी यशवंत देशमुखांनी व्यक्त केलेल्या अंदाजाप्रमाणेच आली तर भाजपने २७२ पैकी २५५ ते २६५ जागा जिंकल्या तरी आश्चर्य वाटू नये. याचे कारण म्हणजे दिल्लीमध्ये मुख्यत्वे तिरंगी लढत असणार आहे. तिरंगी लढतीत नक्की कसा परिणाम होतो हे आपण २०१५ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये बघितलेच आहे. त्यावेळी आआपला ५४.५%, भाजपला ३२.३% आणि कॉंग्रेसला ९.७% मते मिळाली होती. याचा परिणाम म्हणून आआपला ७० पैकी ६७ आणि भाजपला अवघ्या ३ जागा मिळाल्या होत्या. आता भाजपची मते आणखी १२-१३% कमी होऊन ती काँग्रेसला गेली असती तर आम आदमी पक्षाने ७० पैकी ६९ जागा जिंकल्या असत्या. या महापालिका निवडणुकांमध्ये तशीच परिस्थिती असल्यामुळे जर मतांची टक्केवारी अशीच राहिली तर भाजपचा अगदी जबरदस्त स्वीप असेल हे नक्की. तसे खरोखरच होणार का? या प्रश्नाचे उत्तर मिळेल परवा.
  • Log in or register to post comments
द
दशानन Mon, 04/24/2017 - 18:40 नवीन
केजरीवाल आताच मशीनच्या नावाने शंख करत आहेत! "ईवीएम पर सवाल उठाते हुए केजरीवाल ने कहा, 'जीत या हार लगी रहेगी. अगर परसो (26 अप्रैल) इस तरह के नतीजे आए, जो पंजाब, धौलपुर, भिंड जैसी बेईमानी साबित करते हैं तो हम आंदोलन से आये थे, सत्ता का सुख भोगने नहीं, वापस आंदोलन करना पड़ेगा.'"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Tue, 04/25/2017 - 07:10 नवीन
आतापर्यंत सत्तेची हवा डोक्यात गेलेले अनेक नेते होऊन गेले. वेळोवेळी अशा नेत्यांचा भारतीय मतदारांनी पराभवही केला आहे. यात इंदिरा गांधींचा १९७७ च्या लोकसभा निवडणुकांमधील पराभव, १९८७ मध्ये बन्सीलालांचा हरियाणा विधानसभेत आणि १९९१ मध्ये देवीलालाचा हरियाणा विधानसभेतच पराभव, जयललितांचा १९९६ मध्ये तामिळनाडू विधानसभेत, शरद पवारांचा १९९५ मध्ये महाराष्ट्र विधानसभेत, लालू यादवांचा २००५ मध्ये बिहार विधानसभेत तर २०१३ मध्ये भाजपचा कर्नाटक विधानसभेत झालेले पराभव हे लगेच आठवले. तसेच चळवळीतून राजकारणात आलेल्या आसाम गणपरिषदेच्या प्रफुल कुमार महंतांचा १९९१ आणि २००१ मध्येही पराभव झाला. तरीही या सर्व नेत्यांनी जनादेश मुकाट्याने मान्य केला. जर केजरीवालांनी झालेल्या पराभवाविरूध्द आंदोलन केले तर लोकशाही मार्गातून जनतेने व्यक्त केलेला कौल मला मान्य नाही, मी म्हणेन तीच पूर्वदिशा असे म्हणत पराभूत पक्षाने आंदोलन करायचा हा पहिलाच प्रकार असेल. अण्णांच्या दिल्लीतील एप्रिल २०११ मधील जंतरमंतरवरील पहिल्या उपोषणाच्या काळापासूनच हा मनुष्य का कोणास ठाऊक प्रचंड डोक्यात जायचा. हा माणूस म्हणजे गायीचे कातडे पांघरलेला लांडगा असून भारतीय राजकारणाला लागलेला कलंक आहे हेच माझे अगदी पहिल्यापासूनचे मत होते आणि जशाजशा या मनुष्याच्या मर्कटलीला वाढत गेल्या तसे हे मत आणखी पक्के होत गेले. आपण भ्रष्टाचाराविरोधी आहोत, आपण लोकाभिमुख प्रशासन देणार, चांगल्या लोकांनी राजकारणात यायला पाहिजे वगैरे बकवास काही काळ चालेल पण यांचे प्रत्यक्ष वागणे त्याच्या पूर्णपणे उलटे असेल तर लोकांची चीड मतदानातून व्यक्त झाली तर त्यात काहीही नवल नाही. मोदींच्या राज्यात लोकशाहीला धोका आहे आता कायद्याचे नाही तर एका माणसाचे राज्य येत आहे वगैरे विचारवंती बडबड करणार्‍या सुशिक्षित लोकांची यावर प्रतिक्रिया काय असेल याचीच आता उत्सुकता लागली आहे. लोकांनी लोकशाही पध्दतीतून दिलेला जनादेश नाकारणे आणि त्याविरूध्द आंदोलन करायची बेजबाबदार भाषा मुख्यमंत्री या जबाबदार आणि घटनात्मक पदावरील व्यक्तीने केल्यामुळे लोकशाही खूपच बळकट होत आहे ना भारतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 04/29/2017 - 09:42 नवीन
"अत्यंत तर्कशुद्ध दृष्टीकोन, कमालीची सुसंगत विचारसरणी, कोणत्याही प्रश्नाला सामोरं जाण्याचं साहस आणि अत्यंत समतोल व्यक्तिमत्त्व..." इत्यादी, इत्यादी, इत्यादी, असंख्य विशेषणांनी केजरीवालचे पोवाडे गाणारी मंडळींना अगोदरच "कुठे लपवू हे (पोवाडे गाणारे) तोंड" असे झाले आहे. हल्ली कोणी नुसते 'क' असे म्हटले तरी त्यांना धडकी भरते ! त्यातच तुम्ही असे काही खरे खरे लिहून त्या निष्पाप लोकांच्या जीवाला किती यातना देत आहात याची काही कल्पना आहे काय, साहेब ? ;) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
अ
अर्धवटराव Sat, 04/29/2017 - 09:53 नवीन
सक्सेस हेज मेनी फादर्स, पण पराभव पोरका असतो. जर केजरीसाहेब जिंकले असते तर कमालीची सुसंगत विचारसरणी दुप्पट उफाळुन आलि असती. आपल्या मर्कटलीलांनी पराभव खेचुन आणलाय तर मूग गिळायलाच लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ग
गॅरी ट्रुमन Sat, 04/29/2017 - 10:33 नवीन
जर केजरीसाहेब जिंकले असते तर कमालीची सुसंगत विचारसरणी दुप्पट उफाळुन आलि असती.
लोल. केजरीवाल जिंकले तरी आणि हरले तरी त्या माणसाला आणि आम आदमी पक्षाला माझा तरी विरोध कायमच राहिल आणि सध्याइतकाच (किंबहुना त्यापेक्षाही जास्त) तिखट होईल :) :) (दिल्ली विधानसभेतील मिपावरील विरोधी पक्षनेता) ट्रुमन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 04/29/2017 - 18:39 नवीन
जर केजरीसाहेब जिंकले असते तर कमालीची सुसंगत विचारसरणी दुप्पट उफाळुन आलि असती. हे मात्र १००% खरे आहे ! "मीच्च खरा/सज्जन/बरोबर/ इत्यादी आहे. बाकी सगळे जग खोटे/भ्रष्ट/चूक/इत्यादी आहे." ही चलाख व स्वमग्न विचारसरणी नक्कीच दुप्पट वेगाने उफाळून वर आली असती, यात वाद नाही ! =)) =)) =)) बादवे : निवडणुकीत सतत सडकून मार खाल्ल्यावर आणि पक्षनेत्यांना सार्वजनिक शपथ घालूनही पक्षात फूट पडण्याची लक्षणे दिसत आहेत हे पाहून पहिल्यांदा केजरीवाल यांना आपण चूका केल्या आहेत हे म्हणण्याची उपरती झाली आहे... "तो अजून एक स्वार्थी कावा आहे का ?" आणि "ती उपरती किती दिवस शिल्लक राहील ?" या प्रश्नांची उत्तरे भविष्यच देईल ;) :) मात्र, केजरीवाल भक्त अजूनही सत्य कबूल करण्याचे प्रामाणिक धाडस करण्यात अयशस्वी ठरले आहेत व चुप्पी साधून आहेत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
स
सचु कुळकर्णी Sat, 04/29/2017 - 11:15 नवीन
अत्यंत तर्कशुद्ध दृष्टीकोन, कमालीची सुसंगत विचारसरणी, कोणत्याही प्रश्नाला सामोरं जाण्याचं साहस हा पवाडा आम्हि कालच वर आनला व्हुता पन ना तर शाहिर आले... ना... जी जी र जी... करनारे... मिपावरच्या दिल्ली विधानसभेच्या विरोधि पक्ष नेत्याच्या पालखिचा भोई होबासराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
श
श्रीगुरुजी Sat, 04/29/2017 - 18:18 नवीन
२०१४ मध्ये ते केजरीवालांच्या प्रेमात होते. २०१६ मध्ये ते कन्हैयाकुमारच्या प्रेमात होते. २०१७ मध्ये ते स्वतःच्याच प्रेमात आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचु कुळकर्णी
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 04/29/2017 - 18:45 नवीन
म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे ???!!! कारण आतापर्यंत केजरीवाल आणि कन्हैयाकुमारच्या अधःपतनावर शिक्कामोर्तब झाले आहे ;) :) :O)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
सचु कुळकर्णी Sat, 04/29/2017 - 19:53 नवीन
मिपावरच्या दिल्ली विधानसभेच्या विरोधि पक्ष नेत्याच्या पालखिचा भोई होबासराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
द
दशानन Sat, 04/29/2017 - 10:38 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Tue, 04/25/2017 - 18:56 नवीन
यशवंत देशमुखांनी मतांच्या टक्केवारीचा अंदाज व्यक्त केला आहे त्याप्रमाणे मतांची टक्केवारी आली तर फेब्रुवारी २०१५ पासून आम आदमी पक्षाविरूध्द तब्बल ३५.७% चा कल असेल. याचाच अर्थ फेब्रुवारी २०१५ मध्ये आम आदमी पक्षाला मत दिलेल्या प्रत्येक तीन मतदारांपैकी दोन मतदार आता पक्षाविरूध्द जातील असा त्यांचा अंदाज आहे. अर्थातच हा एक्झिट पोलचा अंदाज आहे. प्रत्यक्ष निकाल अजून आलेले नाहीत. पण अवघ्या दोन वर्षाच्या काळात इतका जबरदस्त कल एखाद्या पक्षाविरूध्द आल्याचे कुणा एक्झिट पोलवाल्यानेही पटकन आठवतही नाही. काँग्रेस सरकारच्या अनेक वर्षांच्या काळात आणि विशेषतः युपीएच्या दुसर्‍या इनिंगमध्ये सगळे राजकारणी म्हणजे चोर असतात, त्यांच्याकडून काहीही चांगले घडू शकणार नाही अशी अनेक मतदारांची नकारात्मक मानसिकता झाली होती. या पार्श्वभूमीवर अण्णा-केजरीवालांचे आंदोलन अनेकांना आकर्षित करू शकले. भ्रष्टाचारमुक्त कारभार, लोकाभिमुख शासन हे मुद्दे दिसायला भारदस्त होतेच. दिल्लीतल्या मतदारांना आणखी आकर्षित करणारे एक आश्वासन म्हणजे व्ही.आय.पी कल्चर संपविणे. दिल्ली राजधानी आणि सरकारचे ठिकाण असल्यामुळे दिल्लीतल्या लोकांना या व्ही.आय.पी कल्चरचा त्रास होतोच. तसेच दिल्लीमध्ये कुणा खरोखरच्या व्ही.आय.पी च्या काकाच्या मामाच्या पुतण्याच्या भाचीच्या नवर्‍याच्या मित्राच्या मावसभावाच्या शेजार्‍याचा बायकोच्या बहिणीचा नवराही आपण स्वतः व्ही.आय.पी असल्याप्रमाणे अनेकदा माज दाखवतो आणि असल्या उपटसुंभांपुढे काही बोलायचीही सोय नसते. त्यामुळे दिल्लीत व्ही.आय.पी कल्चरविरूध्दचा मुद्दा अधिक लोकप्रिय झाला. आपल्याला कदाचित ते मुंबई-पुण्यात बसून इतके समजायचे नाही. अण्णांच्या दिल्लीतील उपोषणाला जोरदार समर्थन मिळाले पण त्यानंतर चारच महिन्यात मुंबईत केलेल्या उपोषणाचा मात्र फज्जा उडाला. एकूणच दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून काम करणे अपेक्षित आहे ते सोडून इतर सगळे करणे--- करदात्यांच्या पैशावर पक्षाचा पंजाब आणि गोव्यात प्रचार करणे, दिल्लीबाहेर कुठेही काहीही घडले तरी तिथे धावून जाणे (पण दिल्लीमध्येच डॉ. पंकज नारंग यांची झोपडपट्टीवाल्यांनी हत्या केली तेव्हा दखलही न घेणे, सियाचीनमध्ये बर्फात गाडले गेलेले हनुमंतप्पा दिल्लीत हॉस्पिटलमध्ये असताना पंतप्रधान मोदीही त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन आले पण एकही खात्याचा कारभार न पाहाणार्‍या केजरीवालांना मात्र त्यासाठी वेळ मिळाला नाही), देशद्रोह्यांचे समर्थन करणे, सर्जिकल स्ट्राईकप्रकरणी लष्कराला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणे हे प्रकार कधीनाकधी केजरीवालांना भोवणारच आहेत. तसेच इतर कोणत्याही पूर्ण राज्याच्या मुख्यमंत्र्याचे नाव दररोज बातम्यांमध्ये येत नसायचे (आठवून बघा कितीवेळा सरबानंद सोनोवाल, सिद्दरामय्या, रघुबर दास, विजय रूपानी, चंद्रशेखर राव, देवेंद्र फडणवीस यांची नावे राष्ट्रीय बातम्यांमध्ये आली आहेत) पण या अर्ध्या राज्याच्या मुख्यमंत्र्याचे नाव मात्र जवळपास एक दिवसाआड बातम्यांमध्ये असायचे. या सगळ्या यादीमध्ये इतर अनेक गोष्टींचा समावेश केलेला नाही. बहुदा शिशुपालाच्या शंभर अपराधांप्रमाणे केजरीवालांचे शंभर अपराध या यादीमध्ये येतील. या सगळ्या घोटाळ्यात ज्या दिल्लीच्या मतदारांनी त्यांना विश्वासाने मते दिली होती त्यांना मात्र वार्‍यावरच सोडले गेले. ते मतदार कधीना कधी आपला हिसका दाखवून देतीलच. समजा या महापालिका निवडणुकांमध्ये नाही तर लवकरच कधीतरी!! एकूणच केजरीवालांच्या मर्कटलिलांमुळे भविष्यकाळात भ्रष्टाचाराला विरोध, लोकाभिमुख प्रशासन इत्यादी मुद्दे प्रामाणिकपणे घेऊन राजकारणात उतरलेल्या खरोखरच्या चांगल्या लोकांकडेही मतदार संशयानेच बघतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
व
विकास Tue, 04/25/2017 - 05:20 नवीन
कंटाळा आला कि ओ! ;) Image removed.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 04/25/2017 - 10:33 नवीन
'आप'ची ही चिडचिड नक्की कशामुळे झाली आहे हे कळायला मार्ग नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 04/25/2017 - 11:32 नवीन
आआपच्या गोपाल राय यांच्या म्हणण्यानुसार जर दिल्ली महापालिकेत आआपचा विजय झाला तर आआपच्या दिल्लीतील कारभारावर लोकांन पसंतीची मोहोर उठविली असेल. पण जर आआपचा पराभव झाला तर तो भाजपने मतदान यंत्रात केलेल्या गडबडीमुळेच असेल. म्हणजे केजरीवालांच्या मर्कटलीला, त्यांचा ढोंगीपणा, त्यांच्या नौटंक्या, अत्यंत बेजबाबदार वक्तव्ये व अत्यंत बेजबाबदार कारभार, त्यांच्या मंत्रीमंडळातील व आमदारांनी केलेला भ्रष्टाचार, त्यांनी वशिल्याने सर्वत्र नेमलेली आपली माणसे, आसेतुहिमाचल व कॅनडात लोकांच्या कराच्या पैशातून दिलेल्या पूर्ण पाने जाहिराती, केजरीवालांनी बेछूट आरोप केल्यामुळे कराव्या लागणार्‍या न्यायालयांच्या वार्‍या व त्यातून सुटण्यासाठी गलेलठ्ठ पैसे देऊन नेमलेल्या वकीलाचे मानधन लोकांच्या कराच्या पैशातून देणे, मोदींनी न मागता दिलेले अत्यंत आचरट व अनाहूत सल्ले, नवीन चित्रपट बघून लगेच त्याचे रसग्रहण करणे, दिल्ली सोडून इतर राज्यातच भटकण्यात वेळ घालविणे, दिल्लीत साथीचे रोग फैलावले असताना संपूर्ण मंत्रीमंडळ दिल्लीबाहेर असणे, मोदींविरूद्ध वापरलेली अत्यंत असभ्य भाषा, आपल्या प्रत्येक अपयशाचे खापर केंद्राच्या डोक्यावर फोडणे . . . यापैकी कोणत्याही गोष्टींमुळे दिल्लीकर आआपच्या विरूद्ध मतदान करणार नसून आआपच्या पराभवाला फक्त मतदान यंत्रातील गडबडच जबाबदार असेल. केजरीवालांइतका नीच व नालायक नेता भारतीय राजकारणात आजवर झालेला नाही.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Tue, 04/25/2017 - 18:01 नवीन
>> नवीन चित्रपट बघून लगेच त्याचे रसग्रहण करणे हे कुठे वाचायला मिळेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ग
गॅरी ट्रुमन Tue, 04/25/2017 - 18:23 नवीन

V interesting movie @ShirishKunder https://t.co/80ygEBJv2u

— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) June 22, 2016

Just watched UDTA Punjab. V powerful. Badals must watch it to see what they have done to Punjab.

— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) June 17, 2016

Watched "Drishyam". A must watch.

— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) August 3, 2015

Watched "Gabbar is back". An amazing movie. U must watch

— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) May 9, 2015

Just watched PK. Excellent movie. Congrats @aamir_khan for handling such a delicate subject so beautifully.

— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) December 22, 2014

Went to see Bang Bang with my family. Nice movie. Kids enjoyed it. Congrats @VishalDadlani

— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) October 4, 2014

Just saw Masaan. Excellent movie. A must watch

— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) July 25, 2015
Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Tue, 04/25/2017 - 18:31 नवीन
धन्यवाद :) ही ट्विट्स त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून न टाकता आम आदमी म्हणून टाकली असावीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
द
दशानन Tue, 04/25/2017 - 18:33 नवीन
हे कसे वेगळे करायचं बरं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
व
विशुमित Tue, 04/25/2017 - 19:17 नवीन
ठीक आहे ना चित्रपट पाहिले म्हणून काय झाले ? इतर नेते जनतेसाठी २४*७ अकूपाय असतात का ? माहित नाही म्हणून विचारले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
श
श्रीगुरुजी Tue, 04/25/2017 - 18:54 नवीन
त्यांनी जेटलींची बदनामी मुख्यमंत्री या नात्याने केली होती. त्यामुळेच वकीलाची फी सरकारने देणे योग्य होते. परंतु ते चित्रपट आम आदमी या नात्याने बघतात. ते जरी इतरांची तुफान करमणूक करत असले तरी स्वतःची करमणूक करून घ्यायचा त्यांना हक्क आहेच. त्यासाठी ते येणारा प्रत्येक नवीन चित्रपट बघतात. तसेही मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर कोणतीच जबाबदारी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ब
बोका-ए-आझम Tue, 04/25/2017 - 17:07 नवीन
केजरीवालांइतका नीच व नालायक नेता भारतीय राजकारणात आजवर झालेला नाही.
काहीही हं गुरुजी. इतकी निखळ करमणूक करणाऱ्या केजरीवालांबद्दल तुम्ही असे शब्द वापरणं शोभत नाही ;) राजनारायण, देवीलाल वगैरेंच्या निधनानंतर भारतीय राजकारणात आचरटपणाच्या नावाने जी पोकळी निर्माण झाली होती ती भरून काढण्याचं एवढं महान कार्य करणाऱ्या या नरपुंगवाला तुम्ही अशी शेलकी विशेषणं वापरणं म्हणजे कैच्या कैच बुवा!
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Wed, 04/26/2017 - 04:30 नवीन
बरोबर ८ वाजता ई.व्ही.एम उघडण्यात आली आहेत आणि मतमोजणी सुरू झाली आहे. नेहमीप्रमाणे सुरवातीला पोस्टल मतांची मोजणी सुरू झाली आहे. महापालिका निवडणुकांमध्ये मतदारसंघ लहान असतात त्यामुळे मतदारांची संख्याही कमी असते. सकाळी ११ वाजेपर्यंत सर्व मतदारसंघांमधील निकाल हातात यायला हवेत.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Wed, 04/26/2017 - 04:42 नवीन
तीनही महापालिकांमधून पहिले कल आले आहेत. उत्तरः २ कल उपलब्ध. भाजप-२ दक्षिणः ४ कल उपलब्ध. काँग्रेस-२, भाजप-१, आआप-१ पूर्वः ३ कल उपलब्ध. भाजप-३
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Wed, 04/26/2017 - 04:49 नवीन
उत्तरः ७ कल उपलब्ध. भाजप-६ ,आआप -१ दक्षिणः ९ कल उपलब्ध. भाजप-४ , काँग्रेस-४ , आआप-१ पूर्वः ४ कल उपलब्ध. भाजप-२, आआप-१, काँग्रेस-१ सुरवातीचे कल बघता भाजपने तीनही महापालिकांमध्ये आघाडी घेतली आहे असे दिसते. काँग्रेसची कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली दिसत आहे. पूर्व दिल्लीतील पतपडगंजमधील एका वॉर्डमधून आआप उमेदवार पिछाडीवर आहे. हा उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांचा मतदारसंघ आहे.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Wed, 04/26/2017 - 04:53 नवीन
आतापर्यंत एन.डी.टी.व्ही बघत होतो. टाईम्स नाऊवर पुढचे आकडे आहेत. तीन महापालिका क्षेत्रांमध्ये १०६ पैकी भाजप-७२, काँग्रेस-१७, आआप-१२ तर इतर-५ आतापर्यंतचे चित्र--- भाजपला चांगलेच यश मिळताना दिसत आहे. पण एक्झिट पोलमध्ये अंदाज व्यक्त केला होता त्यापेक्षा कमी. काँग्रेसची कामगिरी बरीच चांगली. आआपचा धुव्वा उडताना दिसत आहे.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Wed, 04/26/2017 - 04:55 नवीन
आकडे भरभर पुढे जात आहेत. एकूण--- १ ४१ पैकी भाजप-८८, काँग्रेस-३० , आआप-१७, इतर-६
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Wed, 04/26/2017 - 04:59 नवीन
एकूण-- १८३ पैकी भाजप-१२१, काँग्रेस-४०, आआप-१६, इतर-६ पूर्व- ५२ पैकी भाजप-३९, काँग्रेस-८, आआप-३, इतर-२ उत्तर-- ८३ पैकी भाजप ५३, काँग्रेस-१९, आआप-९, इतर-२ दक्षिण-- ४९ पैकी भाजप-२९, काँग्रेस-१३, आआप-४, इतर-३
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Wed, 04/26/2017 - 05:05 नवीन
आतापर्यंतचे चित्र--- भाजपला एक्झिट पोलमध्ये अपेक्षित होते तितकेही यश मिळताना दिसत नाही. या क्षणी २२९ पैकी १५१ ठिकाणी भाजप उमेदवार आघाडीवर आहेत. या रेटने भाजप १७० ते १८० दरम्यान स्थिरावेल. काँग्रेसने बरीच चांगली कामगिरी केली आहे. दुसर्‍या क्रमांकावर काँग्रेस आहे. अजय माकन दिल्लीमध्ये काँग्रेसला पुनरज्जिवीत करत आहेत असे चित्र आहे असे दिसते. आम आदमी पक्षाचा मात्र जोरदार धुव्वा उडताना दिसत आहे. आतापर्यंत केवळ २२ जागांवर आआपला आघाडी मिळताना दिसत आहे.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Wed, 04/26/2017 - 05:11 नवीन
एकूणच ई.व्ही.एम मध्ये गडबड करण्यात आली होती पण एक्झिट पोलमध्ये गडबड किती केली होती याचा अंदाज बराच वाढवून सांगितला असे दिसते :) आता २५५ पैकी भाजप १६८ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस ५४ जागांवर तर आआप २७ जागांवर आघाडीवर आहे. या प्रमाणात जागा मिळवायला भाजपला साधारणपणे ४०-४२% मते, काँग्रेसला २२-२४% मते तर आआपला १२-१४% मते मिळत असली पाहिजेत. आआपला 'कॅपिटल पनिशमेन्ट' मिळताना दिसत आहे असे चॅनेलवर म्हणत आहेत. कॅपिटल पनिशमेन्ट ही 'कॅपिटलमध्ये मिळालेली पनिशमेन्ट' म्हणून आणि या झालेल्या मोठ्या पराभवानंतर कदाचित आआपचे अस्तित्वच धोक्यात येईल या अर्थीही :)
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Wed, 04/26/2017 - 05:16 नवीन
भारतीय राजकारणातल्या एका अभूतपूर्व घटनेची एका माणसाच्या लहरीपणामुळे आणि आचरटपणामुळे माती झाली. असो. आता तरी केजरीवाल सुधरावेत आणि उरलेली ३ वर्षे त्यांनी कामावर लक्ष द्यावे अशी इच्छा आहे. पण ' चोर चोरी से जाय, लेकिन हेराफेरी से ना जाय ' या न्यायानुसार ते कठीणच दिसतंय.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Wed, 04/26/2017 - 05:20 नवीन
आता २७० जागांवरील कल उपलब्ध आहेत. भाजप १८५, काँग्रेस ४१ तर आआप ४० जागांवर आघाडीवर आहे. आआपने काँग्रेसमधील अंतर बरेचसे भरून काढले आहे. हे लिहिता लिहिता आआप ४० तर काँग्रेस ४० जागांवर आधाडीवर गेला आहे. तरीही भाजपपेक्षा कितीतरी मागे आहे. एकूणच मतदारांनी आआपला नाकारले आहे हे चित्र आहे.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Wed, 04/26/2017 - 05:30 नवीन
दुसर्‍या क्रमांकासाठी काँग्रेस आणि आआपमध्ये चुरस आहे. याक्षणी आआप ४३ तर काँग्रेस ४१ जागांवर पुढे आहे. भाजप १८२ जागांवर पुढे आहे. एकूणच राजौरी गार्डनइतका जोरदार धक्का आआपला बसलेला दिसत नाही. तरीही २०१५ मधील कामगिरी लक्षात घेता आआपची ही जोरदार घसरगुंडी आहे. तसेच आआप हा दिल्लीतील स्थानिक पक्ष असल्यामुळे महापालिका निवडणुकांमध्ये अजून चांगली कामगिरी व्हायला हवी होती. पण तसे होताना दिसत नाही.
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Wed, 04/26/2017 - 05:37 नवीन
केजरीवालांनी UPA च्या पराभवानंतर राहुल गांधींनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा असं कुणीही न विचारता सांगितलं होतं. आता तेही या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणार का? अर्थात भाजपला हा विजय EVM मध्ये घोटाळा करुन मिळालेला असल्यामुळे केजरीवाल राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सब मिले हुवे है जी!
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Wed, 04/26/2017 - 05:54 नवीन
टाईम्स नाऊवर बोलताना भाजपच्या संबित पात्रांनी केजरीवालांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, खरे तर महापालिका निवडणुकांमध्ये पराभव झाला असला तरी विधानसभेत बहुमत असल्यामुळे महापालिका निवडणुकांमध्ये पराभव झाला तरी तसा राजीनामा द्यायची गरज नाही. पण होते कसे की केजरीवाल २०१५ मध्ये जिंकल्यानंतर आपण जगाच्या टोकावर आहोत (ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड) असे समजून इतर सगळ्यांना (विशेषतः पंतप्रधान मोदींना) काय करावे आणि काय करू नये याची लेक्चरबाजी करत होते.

Modi is a coward and a psycopath

— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) December 15, 2015

मैं अपनी माँ के साथ रहता हूँ, रोज़ उनका आशीर्वाद लेता हूँ लेकिन ढिंढोरा नहीं पीटता। मैं माँ को राजनीति के लिए बैंक की लाइन में भी नहीं लगाता https://t.co/CT243GCiaC

— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) January 10, 2017

हिंदू धर्म और भारतीय संस्कृति कहती है कि आपको अपनी बूढ़ी माँ और धर्मपत्नी को अपने साथ रखना चाहिए। PM आवास बहुत बड़ा है, थोड़ा दिल बड़ा कीजिए https://t.co/CT243GTTzc

— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) January 10, 2017
मोदींच्या डिग्रीवर नसलेला वाद निर्माण करून---

हिंदू धर्म और भारतीय संस्कृति कहती है कि आपको अपनी बूढ़ी माँ और धर्मपत्नी को अपने साथ रखना चाहिए। PM आवास बहुत बड़ा है, थोड़ा दिल बड़ा कीजिए https://t.co/CT243GTTzc

— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) January 10, 2017

मोदीजी ने राजनीति के लिए माँ को लाइन में लगा ठीक नहीं किया। कभी लाइन में लगना हो तो मैं ख़ुद लाइन में लगूँगा, माँ को लाइन में नहीं लगाउँगा pic.twitter.com/wEO1TYATO7

— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) 15 नवंबर 2016
आणि सर्वात विनोदी व्हिडिओ म्हणजे मोदी यांना ठार मारतील--- म्हणजे हे इतरांना काय करावे आणि काय करू नये अशी लेक्चरबाजी कोणीही विचारलेले नसताना करणार असतील तर यांनाही कोणीतरी येऊन लेक्चर देणारच. इलाज नाही.
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Wed, 04/26/2017 - 06:10 नवीन
संबित पात्रा हाणतोय. Kejriwal thinks he is PM by the day and CM by the night. Delhi voters will never accept such fly by night operators. हे वक्तव्य त्याने केल्यावर आपटार्डस् चे चेहरे कसे झाले असतील ते सांगायला हवं का? ;)
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Wed, 04/26/2017 - 06:16 नवीन
इतका मोठा पराभव होऊनही आम आदमी पक्षाने आपला पराभव मान्य न करता ई.व्ही.एम वर खापर फोडायला सुरवात केली आहे. आआपचे नागेन्द्रर शर्मा (केजरीवालांचे सहकारी आणि मिडिया अ‍ॅडव्हायझर) यांनी पुढील टिवटिवाट केला आहे--

Sweeping Delhi MCD polls without sweeping Delhi's streets for a decade. When machines are with you human will is of no relevance.

— Nagendar Sharma (@sharmanagendar) April 26, 2017
मागे म्हटल्याप्रमाणे आआपने ई,व्ही.एम चुकीची आहेत असे म्हणत 'पराभवपूर्व सबब' (अटकपूर्व जामिनला समकक्ष) आपल्याकडे ठेवली होतीच. त्याचा ते वापर करत आहेत.
  • Log in or register to post comments
व
वरुण मोहिते Wed, 04/26/2017 - 06:20 नवीन
अपेक्षेप्रमाणे त्यांचा थयथयाट चालू झाला आहे . कारण तर त्यांनी आधीच शोधून ठेवलेलं आहे . ह्या टर्म मध्ये भाजप चा कारभार सुधारावा हि अपेक्षा .
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Wed, 04/26/2017 - 06:28 नवीन
आपण काय इथे बसून पॉपकॉर्न खात या बातम्या वाचतो. भोगायचं दिल्लीवाल्यांना आहे कोणाचही सरकर आलं तरी. शीला दिक्षितांनी दिल्ली बरीच चांगली चालवलेली असं आता वाचायला मिळतय. केंद्रातल्या सरकारचे घोटाळे त्यांना भोगायला लागले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
ख
खेडूत Wed, 04/26/2017 - 07:03 नवीन
केंद्रातल्या सरकारचे घोटाळे त्यांना भोगायला लागले.
नुस्ते तेवढेच नै, कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेतले घोटाळे थेट त्यांच्या संमतीने झाले म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
ब
बोका-ए-आझम Wed, 04/26/2017 - 06:23 नवीन
Times now ने मुद्दामहून AAP मधून BJP मध्ये गेलेल्या शाझिया इल्मीला बोलावलंय. जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे. #सब मिले हुवे है जी!
  • Log in or register to post comments
व
वरुण मोहिते Wed, 04/26/2017 - 06:34 नवीन
ईव्हीएम मशीन वर बोट दाखवणे चूक आहे पहिले आप ने आत्मचिंतन करावं . तरीही केजरीवाल काही ऐकणार नाहीत . आप मध्येच फूट पडणारे अजून आता .
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Wed, 04/26/2017 - 06:35 नवीन
आप देखील मनसेच्या वाटेवर जाताना बघुन दु:ख होत आहे. मनसेचं एक वेळ समजु शकतो. तिथे विचारधारा वगैरे प्रकार नव्हता, असला तरी लिमेटेड होता. आपचं मूळ तरी सशक्त होतं. केजरीवाल साहेबांनी आपल्या वैयक्तीक महत्वाकांक्षेसाठी म्हणा, किंवा एकुणच वकुबानुसरुन म्हणा, आपची फार धुळघाण उडवली.
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Wed, 04/26/2017 - 06:36 नवीन
सुरुवातीला अपेक्षा होत्या आपकडून. केजरीवालांनी एकच काम चांगलं केलं ते म्हणजे प्रशांत भुषण आणि योगेंद्र यादव यांना हाकलुन लावलं ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
ब
बोका-ए-आझम Wed, 04/26/2017 - 07:08 नवीन
केजरीवालांनी एकच काम चांगलं केलं ते म्हणजे प्रशांत भुषण आणि योगेंद्र यादव यांना हाकलुन लावलं ते.
प्रशांत भूषण ठीक आहे. योगेंद्र यादव हा सेन्सिबल माणूस आहे. ते असल्यामुळे आआपचा एक किमान बुद्धयांक तरी होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
ग
गॅरी ट्रुमन Wed, 04/26/2017 - 06:54 नवीन
आपचं मूळ तरी सशक्त होतं.
आपचं मूळ सशक्त होतं असे चित्र उभे करण्यात मात्र केजरीवाल कमालीचे यशस्वी ठरले. खरी परिस्थिती तशी नक्कीच नव्हती. म्हणजे भ्रष्टाचार विरोध, लोकाभिमुख प्रशासन वगैरे मुद्दे महत्वाचे नाहित असे नक्कीच नाही पण ते मुद्दे मांडणारे लोक त्यावर काही चांगली अ‍ॅक्शन घेण्याच्या परिस्थितीत आहेत की नाही हे पण बघायला हवे. उद्या विजय मल्ल्याला बरोबर घेऊन कोणी दारूबंदी चळवळ चालवत असेल तर त्यावर डोळे झाकून थोडीच विश्वास ठेवायचा? डाव्या चळवळीत अग्रेसर असलेले जनेयुमधले लोक (खरे तर शहरी नक्षलवादी) बरोबर घेऊन कोणीही कुठलीही गोष्ट चांगली करू शकेल यावर माझा तरी विश्वासच नाही. हलकटातले हलकट लोक आहेत हे. आणि असल्या नकारात्मक मनोवृत्तीच्या अराजकतावादी लोकांना बरोबर घेणार्‍या कोणावरही विश्वास ठेवणे मला तरी कठिणच आहे. अनेक लोक सुरवातीच्या काळात केजरीवाल-केजरीवाल असे करत त्या मनुष्याच्या भजनी लागले होते. नशीबाने मी त्यातला कधीच नव्हतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव Wed, 04/26/2017 - 07:13 नवीन
विचारधारा हवेत तगु शकत नाहि. तिला जीवंत ठेवणारे, सशक्त करणारे मेंदु नसतील तर त्या केवळ पुस्तकी गप्पा ठरतात. पण भारतात लोकशाहीची पानं पुढे सरकत होती. नेहरूंना नवीन राजा समजणारी शिशु अवस्थेतली लोकशाही पुढे घराणेशाही, केंद्रीय पार्टी, केंद्र+राज्य स्तरीय पार्ट्या, आधि नाममात्र असलेला विरोधी पक्ष पुढे कडक बहुमतात येणं वगैरे पाऊलं टाकत प्रौढ होत होती. उजव्या समजल्या जाणार्‍या पक्षाने सबका साथ सबका विकास वगैरे भाषा करुनच सत्तेत यावं इतकी ति मॅचुअर झाली होती. आता स्वच्छ चारित्र्य आणि केवळ विकासाभिमुख राजकारण हा पुढील अध्याय होता. आपकडे आमच्यासारखे लोक याच अध्यायाचे रचनाकार म्हणुन बघत होते. पण या केजरी नामक कोल्ह्याने सगळी माती केली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ब
बोका-ए-आझम Wed, 04/26/2017 - 06:45 नवीन
अशी मुक्ताफळं गोपाल राय यांनी उधळलेली आहेत. एकूण काय तर नकारात्मक राजकारण करायच्या सवयीतून हे बाहेर येण्याची चिन्हं दिसत नाहीत. काँग्रेस दुर्दैवाने तिसऱ्या क्रमांकावर गेलेली आहे. आशुतोषही आप का हरली हे सांगण्याऐवजी भाजप EVM मध्ये गोलमाल करुन जिंकली हे सांगायचा आणि प्रतिप्रश्न करायचा प्रयत्न करतोय.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा