ताज्या राजकीय घडामोडी भाग ६- दिल्ली महानगरपालिका निवडणूक २०१७ विशेष
रविवारी एकूण ५४% मतदान दिल्ली महानगरपालिका साठी झाले आहे आणि एक्झिट पोल अंदाज भाजपाला बहुमत मिळेल असे म्हणत आहे.
दिल्ली दक्षिण (१०४ जागा) , दिल्ली उत्तर (१०४ जागा ) आणि दिल्ली पूर्व (६४ जागा ) अश्या तीन महानगरपालिका आहेत.
ऍक्सिस - इंडिया टुडे चा एक्झिट पोल
एबीपी - सी वोटर चा एक्झिट पोल
निवडणुकीचा निकाल दिल्लीकर ,अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्ष, काँग्रेस आणि EVM साठी कसा असेल या चर्चे साठी हा धागा उघडत आहे.
मतमोजणी २६ एप्रिल रोजी आहे.
| महानगरपालिका | भाजप | आआप | काँग्रेस |
|---|---|---|---|
| उत्तर | 78-84 | 8-12 | 8-12 |
| दक्षिण | 79-85 | 9-13 | 7-11 |
| पूर्व | 45-51 | 6-10 | 4-8 |
| महानगरपालिका | भाजप | आआप | काँग्रेस |
|---|---|---|---|
| उत्तर | 88 | 6 | 7 |
| दक्षिण | 83 | 9 | 9 |
| पूर्व | 47 | 9 | 6 |
💬 प्रतिसाद
(91)
ग
गॅरी ट्रुमन
Wed, 04/26/2017 - 06:59
नवीन
योगेन्द्र यादव यांनी आताच दिल्ली महापालिका निवडणुकांवर मार्मिक भाष्य केले--
लोक आपले नगरसेवक निवडायला बाहेर पडले पण दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांविरूध्द आणि देशाच्या पंतप्रधानांच्या बाजूने ते मत देऊन परत आले.
या प्रकारात दिल्लीच्या स्थानिक राजकारणाचे मात्र नुकसान झाले.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Wed, 04/26/2017 - 07:05
नवीन
१. चूक EVM च्या software मध्ये नाही, तर केजरीवाल सरकारच्या software मध्ये आहे.
२. लोक आआपच्या दिल्ली विधानसभेतल्या कारभारावर भाजपच्या दिल्ली महानगरपालिकांमधल्या कारभारापेक्षा जास्त चिडले आहेत.
आत्ता आआपच्या एका भाऊने मस्त सबब सांगितली. उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्यामुळे भाजपला दिल्लीत मतं मिळाली. काय बोलावं आता या गणंगांना?
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Wed, 04/26/2017 - 07:09
नवीन
१० फेब्रुवारी २०१५ रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाचा जोरदार विजय झाल्यावर सागरीका घोषने पुढील टिवटिवाट केला होता. आता ती काय म्हणेल बरे?
- Log in or register to post comments
द
दशानन
Wed, 04/26/2017 - 07:13
नवीन
उद्धव ठाकरे काय बोलतात हे पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे ;)
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Wed, 04/26/2017 - 07:20
नवीन
२०१५ मध्ये आम आदमी पक्षाचा जबरदस्त विजय झाल्यानंतरची उधोजीरावांची प्रतिक्रिया होती-- कोणत्याही लाटेपेक्षा त्सुनामी मोठी असते.
http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/delhi-poll-results-trigger-a-clash-between-shiv-sena-bjp-in-maharashtra/articleshow/46187319.cms?intenttarget=no
त्यावेळी उधोजीरावांनी केजरीवालना अभिनंदनाचा फोनही केला होता. यावेळी काय करणार ते बघायचे :)
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 04/26/2017 - 10:35
नवीन
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य सस्थांच्या निवडणुकीत भाजपच्या लाटेमुळे उधोजींच्याच नाकातोंडात पाणी गेले असून ते व त्यांना पक्ष गटांगळ्या खात आहेत. त्यामुळे दिल्लीतील भाजपच्या विजयावर, खरं तर आआपच्या पराभवावर, ते काय डोंबलाची प्रतिक्रिया देणार.
- Log in or register to post comments
ख
खेडूत
गुरुवार, 04/27/2017 - 05:48
नवीन
एबीपी माझाच्या बातमीनुसार त्यांनी ५६ उमेदवार उभे केले होते, त्यातल्या ५५ जणांचे डिपॉझिट जप्त झालेय!
काय बोलतील आता.. :)
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
गुरुवार, 04/27/2017 - 06:49
नवीन
मराठी चॅनेल आणि वर्तमानपत्रे मोड ऑन
एकाचे डिपॉझिट वाचले ही पण काही कमी महत्वाची गोष्ट नाही. एकूण मतदानाच्या १/६ पेक्षा कमी (१६.६६%) मते मिळाल्यास डिपॉझिट जप्त होते. जर उत्तर भारतीयांविरोधी भूमिका घ्यायचा इतिहास असलेल्या मुंबईतल्या एका 'मराठी माणसाच्या' पक्षाने दिल्लीत एका वॉर्डमध्ये का होईना १६.६६% पेक्षा जास्त मते मिळवली हे पण काही कमी महत्वाचे नाही.
मराठी चॅनेल आणि वर्तमानपत्रे मोड ऑफ
बहुतांश वेळा परिस्थिती अशी असते की शिवसेना उत्तर भारतात निवडणुक लढविते त्यावेळी त्या स्थानिक भागातील थोडाफार जनाधार असलेल्या कुणाला तरी आपला उमेदवार म्हणून उभा करते. त्या उमेदवारांनाही अगदी अपक्ष म्हणून निवडणुक लढविण्यापेक्षा मुंबईतून थोडीफार मदत (पोस्टर चिकटवायला, घरोघर प्रचार करायला, मतदानाच्या स्लीपा द्यायला वगैरे कामे करायला माणसे पाठवली जाणे) तर तेवढे बरे असते म्हणून ते ही शिवसेनेसारख्या पक्षाची उमेदवारी स्विकारतात. त्यांचे मुळातल्या शिवसेनेशी काही घेणेदेणे असतेच असे नाही. १९९१ मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये अकबरपूर मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर पवनकुमार पांडे हा असाच उमेदवार निवडून गेला होता. १९९२ मध्ये बाबरी उध्वस्त झाल्यावर उत्तर प्रदेश विधानसभा बरखास्त झाली आणि नोव्हेंबर १९९३ मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. त्यापूर्वी महिनाभर ऑक्टोबरमध्ये शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला स्टेजवर बोलावलेही होते. त्याचा १९९३ मध्ये पराभव झाला. खरे तर थोडक्यातच डिपॉझिट वाचले त्याचे. त्यानंतर तो समाजवादी पक्षाशी संलग्न होता. १९९९ मध्ये सुलतानपूर लोकसभा मतदारसंघातून भाजप समर्थित अपक्ष उमेदवार म्हणून त्याने लोकसभा निवडणुक लढवली होती. निवडणुक २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये याच्या भावाने (राकेश मोहन पांडे) आंबेडकर नगर (फैजाबाद) मधून बसपाचे उमेदवार म्हणून निवडणुक लढवली होती आणि भाजपच्या विनय कटियारला हरवले होते. पण २००९ मध्ये पवन कुमार पांडेने स्वतःच्या भावाचा प्रचार न करता सुलतानपूरमधून काँग्रेस उमेदवार म्हणून निवडणुक लढविणार्या संजय सिंगचा प्रचार केला होता. २००९ च्या लोकसभा निवडणुकांनंतर पवन कुमार पांडेने बसपामध्ये प्रवेश केला. तेव्हा या मनुष्याचे शिवसेनेशी (किंवा फॉर दॅट मॅटर कोणत्याही पक्षाशी) किती घेणेदेणे आहे हे समजून येईलच. तेव्हा १९९१ मध्ये अकबरपूरची विधानसभा जागा शिवसेनेने जिंकली त्याच अर्थाने बहुतेक कालच्या दिल्ली महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना उमेदवाराचे एका वॉर्डात डिपॉझिट वाचले असे म्हटले तरी फार चुकीचे ठरू नये.
- Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२
Wed, 04/26/2017 - 07:47
नवीन
- Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२
Wed, 04/26/2017 - 07:53
नवीन
ज्या ४४ जागांवर आपचे उमेदवार पुढे आहेत तिथली ई.व्ही.एम. खराब आहे की बरोबर? आणि केजरिवालने ई.व्ही.एम.च्या विषयावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे आता आपचे निवडणुन येणारे उमेदवार, नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन आंदोलनात सहभागी होणार की राजीनामा न देता. ह्या प्रश्नांची उत्तरे केजरीवालने द्यायला हवीत.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Wed, 04/26/2017 - 13:15
नवीन
या प्रश्नाचे उत्तर आम आदमी पक्षनेते आणि ग्रेटर कैलाशचे आमदार सौरभ भारद्वाजने आधीच दिले आहे. बहुदा केजरीवालांचेही तेच उत्तर असावे :)
सगळ्या वॉर्डांमध्ये ई.व्ही.एम मध्ये फेरफार करण्यात आले होते. भाजपचे नेते त्यांच्या इन-हाऊस सेफॉलॉजिस्टसह (जी.व्ही.एल नरसिंह राव-- दुसर्या प्रतिसादात चुकून महेश रंगराजन लिहिले होते) कोणत्या मतदारसंघात किती टक्के मते इकडे तिकडे करायची हे ठरवतात आणि त्याप्रमाणे मते इकडची तिकडे केली जातात. ही मते फिरवताना संशयास्पद दिसणार नाही याची काळजी भाजप नेते आणि इन-हाऊस सेफॉलॉजिस्ट घेत असतात.
ज्या वॉर्डांमधून आम आदमी पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत ते इतके लोकप्रिय आहेत आणि त्यांनी इतके काम केले आहे की काही टक्के मते इकडची तिकडे करूनही शेवटी तेच निवडून आले. त्यामुळे आम आदमी पक्षाच्या या नगरसेवकांना राजीनामा द्यायचे काही कारण नाही :)
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Wed, 04/26/2017 - 08:07
नवीन
याक्षणी भाजप १८४, आम आदमी पक्ष ४७ तर काँग्रेस २६ जागांवर पुढे आहे. यापुढे या आकड्यांमध्ये फार फरक पडू नयेत. दोन वर्षांपूर्वी भरभरून मते दिलेल्या आम आदमी पक्षाला लोकांनी चांगलेच नाकारले असा या निकालांचा अर्थ आहे. तीनही महापालिकांमध्ये आम आदमी पक्षाची कामगिरी २०१४ च्या लोकसभा निवडणुकांपेक्षाही वाईट झाली आहे असे एन.डी.टी.व्ही वर मदाखवत आहेत. हा पक्षाला बसलेला खरा झटका आहे. हा पक्ष स्थानिक पक्ष असल्यामुळे महापालिका निवडणुकांमध्ये नक्कीच अधिक चांगली कामगिरी करणे अपेक्षित होते. पण जर लोकसभा निवडणुकांपेक्षाही आआप खाली येत असेल तर मात्र पक्षासाठी ही चिंता करायची परिथिती आहे.
यापुढे आम आदमी पक्षाची वाटचाल अजिबात सोपी नाही. लोकांचा विश्वास नक्कीच उडाला आहे हे स्पष्ट दिसतच आहे. इतके महिने सत्तेचे लोणी होते आणि केजरीवाल दिल्लीपलीकडे यश मिळवतील असे चित्र जाणीवपूर्वक उभे केले जात होते त्यामुळे केजरीवालांची काम करायची पध्दत आणि हुकुमशाही प्रवृत्ती मान्य नसली तरी आमदार त्यांच्यामागे होते. पण जर केजरीवालांचा प्रभाव कितीतरी कमी झाला आहे असे चित्र उभे राहिले तर मात्र हे सगळे आमदार, नेते पक्षाबरोबर राहतीलच याची खात्री देता येणार नाही. मुळातच देवेन्द्र सेहरावत पक्षापासून नाराज आहेतच. वेदप्रकाश या आमदाराने तर सरळ पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळीच पक्षाचे ३०-३५ आमदार केजरीवालांवर नाराज आहेत असे संकेत त्यांनी दिले होते. पंजाबमधील डॉ. धरमवीर गांधी आणि हरभजन खालसा या चारपैकी दोन खासदारांना आधीच पक्षाबाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.
अशावेळी केजरीवालांविरूध्द आवाज उठायला सुरू होणे स्वाभाविक आहे. मनीष सिसोदियांनी निवडणुकांपूर्वीच परस्पर 'या निवडणुका आमच्या सरकारवरचे सार्वमत असेल' असे म्हणून केजरीवालांनाच अडचणीत आणायचा प्रयत्न केला असे म्हणायला जागा आहे. एक तर केजरीवाल पंजाबमध्ये मुख्यमंत्री म्हणून जातील आणि आपल्याला दिल्लीचे मुख्यमंत्रीपद मिळेल ही त्यांची अपेक्षा असेलच. पण तसे काही व्हायचा प्रश्नच आला नाही. अशावेळी हे वक्तव्य आधीच परस्पर देऊन ठेऊन मग पराभव झाल्यावर 'लोकांनी आपल्या सरकारला नाकारले' म्हणून सरकारचे प्रमुख म्हणून जबाबदारी केजरीवालांनी घ्यायला हवी असे म्हणून केजरीवालांना बाजूला करायचा प्रयत्न झाल्यास त्याला सिसोदियांचीही फूस असेल ही पण शक्यता आहेच.
तसेच आम आदमी पक्षापुढे इतर आव्हाने तर असणारच आहेत. नायब राज्यपालांनी दिल्लीच्या करदात्यांच्या पैशावर पक्षाचा प्रचार दिल्लीबाहेर केला म्हणून सरकारला ९७ कोटी भरावेत हा आदेश दिलाच आहे. निवडणुक आयोगाने २१ आमदारांच्या लाभाचे पद मुद्द्यावर सुनावणी पूर्ण केली आहे आणि त्याचा निकाल कधीही लागेल. समजा निवडणुक आयोगाने या २१ आमदारांचे पद रद्द केले तर त्याविरूध्द कोर्टात जाऊन वेळकाढूपणा करायचा प्रयत्न हे करतीलच. पण ते शक्य नसेल तर या २१ जागांवर पोटनिवडणुक आली तर ते नवीन आव्हान उभे राहिल. तसेच अरूण जेटली, सुभाष चंद्रा इत्यादींनी केजरीवालांविरूध्द अब्रूनुकसानीचे खटले भरले आहेत. त्यातील अरूण जेटलींनी भरलेला खटला बराच पुढे गेला आहे. केजरीवालांच्या मते अरूण जेटलींनी भ्रष्टाचार केला असेल तर त्या भ्रष्टाचाराचे पुरावे द्यावेत इतका साधा मामला असूनही केजरीवाल त्या खटल्यात टाईमपास करत होते त्यावरूनच त्यांच्याकडे कसलाही पुरावा नाही हे स्पष्ट झालेच आहे. समजा कोर्टाने त्यांना दोषी ठरविले तर किती दिवस तुरूंगवासाची तरतूद आहे हे तपासून बघायला हवे. समजा २ वर्षांपेक्षा जास्त तुरूंगवासाची तरतूद असेल तर मात्र केजरीवाल स्वत: तुरूंगात गेले नाहीत तरी त्यांना आणखी ६ वर्षे निवडणुक लढवता येणार नाही आणि भारतीय राजकारणातील अरविंद केजरीवाल या नावाचा तो अस्त असेल.
एकूणच यापुढील काळात काय होते हे बघणे इंटरेस्टींग ठरेल.
- Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२
Wed, 04/26/2017 - 08:15
नवीन
मनिष सिसोदिया ह्या नौटंकीबाज माणसाची अगदिच हास्यास्पद प्रेस वार्ता सध्या सुरु आहे, त्याच्या मते २००९ च्या निवडणुकीतील पराभवानंतर भाजपाच्या लोकांनी ई.व्ही.एम. कशी हॅक/टेंपरींग करता येईल यावर रिसर्च केला, जीबीएल नरसिंहाराव व अडवाणी यांनी या रिसर्च वर पुस्तक देखिल लिहिले व आज होणारे सर्व विजय त्या रिसर्चचाच एक भाग आहे असे हा मनिष सिसोदिया नावाचा महाभाग म्हणत आहे.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Wed, 04/26/2017 - 08:48
नवीन
मी राजकारणात रस घ्यायला सुरवात केली अगदी प्राथमिक शाळेत असल्यापासून. १९८९ च्या लोकसभा निवडणुका त्यानंतर पहिल्या निवडणुका होत्या. तेव्हापासून दिल्ली म्हणजे भाजपचा बालेकिल्ला असे मानतच मी लहानाचा मोठा झालो. १९९१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार म्हणून निवडणुक लढविणार्या बॉलीवूड नायक राजेश खन्नाने लालकृष्ण अडवाणींवर दोन-अडीच हजार मतांची आघाडी घेतली होती पण नंतर शेवटी अडवाणींनी ती निवडणुक थोडक्यात जिंकली.तो एकच अपवाद आहे असे वाटत होते. १९९३ ची विधानसभा तसेच १९९६ आणि १९९८ च्या लोकसभा निवडणुका भाजपने अगदी आरामात जिंकल्या. पुढे १९९८ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा मोठा पराभव झाला तो खरा तर माझ्यासाठी मोठाच धक्का होता. पण १९९९ मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने ७ पैकी ७ जागा जिंकल्या तेव्हा वाटायला लागले की १९९८ ची विधानसभा निवडणुक हा एक अपवाद होता. पण २००० च्या दशकातील जवळपास सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेसने आरामात जिंकल्या. २००३ आणि २००८ च्या विधानसभा निवडणुका तसेच २००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुका काँग्रेसने आरामात जिंकल्या होत्या. त्यानंतर २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने दिल्लीतील ७ पैकी ७ जागा जिंकल्यावर १९९० चे दशक परत आले असे वाटायला लागले. या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी २०१५ च्या विधानसभा निवडणुका मात्र अगदीच धक्कादायक होत्या.
आम आदमी पार्टीचा नाटकीपणा आणि ढोंगीपणा अगदी पहिल्या दिवसापासून नव्हे पहिल्या सेकंदापासून प्रचंड डोक्यात जायचा आणि अजूनही जातो. या असल्या पक्षाविषयी कुठल्याही क्षणी कुठलाही आपलेपणा मला कधीही वाटला नव्हता. फेब्रुवारी २०१५ च्या निवडणुकांमध्ये आआपचा विजय होणार अशी चिन्हे दिसायला लागल्यावरच (अर्थातच आआपचा इतका मोठा विजय होईल असे मात्र वाटले नव्हते पण विजय होणार असे मात्र वाटत होते) फेसबुक आणि मिपावरील दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून वावरायचे असेच ठरवले आणि त्याप्रमाणेच मिपा आणि फेसबुक या दोन्ही ठिकाणी केजरीवाल आणि आआपच्या ढोंगीपणावर प्रचंड कोरडे मी ओढलेच. मिपावरील आम आदमी पक्षाच्या सर्वात कट्टर विरोधकांमध्ये माझा समावेश नक्कीच आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाच्या आज झालेल्या पराभवामुळे मला खूपच आनंद झाला आहे. १० फेब्रुवारी २०१५ रोजी आआप आणि केजरीवाल समर्थकांना किती असुरी आनंद होत होता हे त्यावेळी मी दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या निकालावर मिपावर काढलेल्या धाग्यात समजून आलेच. आपण ज्या पक्षाचा विरोध करतो त्याचा पराभव झाल्यास असुरी आनंद होणे हा लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे.
१० फेब्रुवारी २०१५ रोजी केजरीवाल आणि आआप समर्थकांना जितका असुरी आनंद झाला होता त्याच्या चौपट असुरी आनंद मला होत आहे. आणि आजचा दिवस मी साजरा करणार आहे.
यापुढे आम आदमी पक्षात अजून भांडणे व्हावीत आणि केजरीवालांचे मुख्यमंत्रीपद जावे, आम आदमी पक्ष हा लवकरात लवकर इतिहास (किंबहुना एक दु:खद आठवण) बनावा हीच इच्छा. यापुढे केजरीवाल हे भारतीय राजकारणातील एक ट्रॅजिक फिगर म्हणून ओळखले जावेत आणि नुसती इतरांना नावे ठेऊन आणि आपल्या पदाच्या मर्यादा किंवा अधिकार काय आहेत हे लक्षात न घेता शहाणपणा करत अपेक्षित असलेली कामे न करता इतर सगळ्या गोष्टी करायच्या, इतर सगळ्यांना लेक्चरबाजी करायची हे प्रकार केले तर त्याचे परिणाम काय होतात याचे एक उदाहरण म्हणून केजरीवाल आणि आम आदमी पक्ष ओळखले जावेत ही इच्छा. आणि यातूनच दिल्लीतील जनेयु वगैरे हलकटातल्या हलकट डाव्या शहरी नक्षलवाद्यांना लवकरात लवकर त्यांची जागा दाखवून दिली जावी ही पण इच्छा.
या सगळ्यात वाईट याचेच वाटते की केजरीवालांच्या मर्कटलीलांमुळे यापुढील काळात भ्रष्टाचाराला विरोध, लोकाभिमुख प्रशासन वगैरे मुद्दे घेऊन राजकारणात आलेल्या प्रामाणिक लोकांकडेही मतदार संशयानेच बघतील. केजरीवालांनी या चळवळीचे हे भरून न येणारे नुकसान केले आहे.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Wed, 04/26/2017 - 09:41
नवीन
तसेच होवो ही इच्छा! त्याचबरोबर काँग्रेसलाही धुगधुगी मिळावी आणि त्यांनी एका राष्ट्रीय पक्षासारखे वावरावे असंही वाटतं.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Wed, 04/26/2017 - 08:52
नवीन
चांदनी चौक विधानसभा मतदारसंघातून दिल्ली विधानसभेवर निवडून गेलेल्या आआप आमदार अलका लांबा यांनी त्यांच्या मतदारसंघातील तीनही जागांवरून आम आदमी पक्षाचा पराभव झाला याची 'नैतिक जबाबदारी' घेऊन राजीनामा द्यायची तयारी दाखवली आहे.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Wed, 04/26/2017 - 08:57
नवीन
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Wed, 04/26/2017 - 08:59
नवीन
चांदनी चौकचा परिसर म्हणजे लाल किल्ला आणि जामा मस्जिदचा परिसर. या भागात मोठ्या प्रमाणावर मुस्लिम लोकवस्ती आहे.या भागातून आआपचा पराभव होत असेल तर विजय कोणाचा झाला हे बघायला हवे-- काँग्रेसचा की भाजपचा. की उत्तर प्रदेशात झाले त्याप्रमाणे ट्रिपल तलाकविरूध्दचा राग मुस्लिम महिलांनी भाजपला मत देऊन व्यक्त केला आहे?
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Wed, 04/26/2017 - 08:53
नवीन
कविवर्य कुमार विश्वास यांचे नाव कुठेच दिसत नाही बातम्यांमध्ये.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Wed, 04/26/2017 - 09:04
नवीन
एबीपी न्यूजवर आताच दाखविले की भाजपला जवळपास ४०%, आम आदमी पक्षाला २५% तर काँग्रेसला २३% मते मिळाली आहेत. म्हणजे एक्झिट पोल भाजपला ५०% मते मिळतील हा अंदाज व्यक्त करत होते तसे झालेले नाही.
या क्षणी दिल्ली विधानसभा निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकांमध्येही असेच मतदान झाले तर भाजपला ७० पैकी ४३, आआपला १२ आणि काँग्रेसला १० जागा मिळतील असेही एबीपी न्यूजवर दाखवले जात आहे.
- Log in or register to post comments
प
प्रसन्न३००१
Wed, 04/26/2017 - 09:18
नवीन
डिट्टो फिलिंग
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Wed, 04/26/2017 - 10:35
नवीन
डिसेँबर 2013, फेब्रुआरी 2015, आणि आत्ता यात भाजपाचा व्होट शेअर साधारण सेम राहिला आहे. 34-35% आसपास. कॉम्ग्रेसला जी मतँ 2013 मध्ये गेलेली ती 2015मध्ये आपकडे गेली आणि 2015मध्ये आपला 54% मतं होती. सो २०१३ ही तीन लोकांमधली लढत होती. २०१५मध्ये काँग्रेस अगदीच निग्लिजिबल होती त्यामुळे २०१५ दोन लोकांची लढत होती. आता कॉंग्रेसची जुनी मतं त्यांच्याकडे परत येत आहेत आणि ही परत थ्री कॉर्नर्ड निवड्णूक झाली. सो भाजपाचा भरघोस फायदा झाला.
- Log in or register to post comments
प
पुंबा
गुरुवार, 04/27/2017 - 09:35
नवीन
हे विश्लेषण पटले.
भाजपा आणि काँग्रेस, दोघांचेही माध्यममार्गी मतदार फुटलेले. केजरीवालांच्या नालायकपणामुळे ते परत भाजप, काँग्रेसकडे परतले. आता हेच कायम राहील असे वाटते. केजरीवाल आणि आप हा फिनॉमेना संपलेला आहे. :(
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Wed, 04/26/2017 - 10:46
नवीन
एन.डी.टी.व्ही हिंदीवर आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज धक्कादायक माहिती देत आहेत.
१. आआपचा पराभव ई.व्ही.एम मुळेच झाला.
२. भाजपामधील सेफॉलॉजिस्ट (महेश रंगराजन यांच्याकडे रोख दिसत आहे) आणि सगळे लोक आधी ठरवतात की कोणत्या ठिकाणी किती प्रमाणात मते दाखवायची म्हणजे आपले कामही होईल आणि आकडे संशयास्पदही वाटणार नाहीत.
३. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला हरवायचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे काँग्रेसला जिंकवा. पंजाबमध्ये चौकाचौकात उभे राहून लोक अकाली दलाला शिव्या घालत होते. त्यामुळे अकाली-भाजप युतीला जिंकलेले दाखवले असते तर 'विद्रोह' झाला असता. त्यामुळे तसे करणे शक्य नव्हते म्हणून काँग्रेसला जिंकायचा सोपा मार्ग अवलंबला गेला.
याचाच अर्थ आपण मतदान करायला जातो आणि मशीनवरील कोणते बटन दाबतो त्यावर काहीही अवलंबून नसते. सगळे काही आधीच फिक्स्ड झालेले असते. मॉलमध्ये लहान मुलांच्या गाड्या असतात. ती लहान मुले आपणच गाडी चालवत आहोत असे समजत स्टिअरींग काय फिरवतात, ब्रेक काय दाबतात काही विचारू नका. पण प्रत्यक्ष ती मुले त्या गाड्या चालवतच नसतात. त्या गाड्या चालवत असतात मागे रिमोट कंट्रोल घेऊन फिरणारे लोक. सौरभ भारद्वाजांच्या मते मतदानाचे स्वरूप असेच दिसते.
हे अत्यंत धक्कादायक आहे.
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Wed, 04/26/2017 - 13:14
नवीन
- Log in or register to post comments
व
विकास
Wed, 04/26/2017 - 13:34
नवीन
दिल्ली MCD निवडणुका मतदान :
"लेहर" च्या बाजूने आणि "लहरी"च्या विरोधात ;)
- Log in or register to post comments
व
विकास
Wed, 04/26/2017 - 13:44
नवीन
- Log in or register to post comments
व
विशुमित
Wed, 04/26/2017 - 15:45
नवीन
एवढ्या माणसाचे पटते आपल्याला..!!
http://www.loksatta.com/pune-news/nitin-gadkari-bjp-state-executive-meeting-pimpri-chinchwad-1460966/
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 04/26/2017 - 16:43
नवीन
अपेक्षेप्रमाणे दिल्लीमध्ये तीनही महापालिकांमध्ये भाजपचा विजय झाला. तीनही महापालिकात भाजपला दोन तृतीयांश बहुमत मिळाले आहे. आआप व काँग्रेसचा दारूण पराभव झाला. तरीसुद्धा तांत्रिकदृष्ट्या आआप दुसर्या क्रमांकावर आहे.
२६ महिन्यांपूर्वी दिल्ली विधानसभेत आआपने ७० पैकी ६७ जागा जिंकल्या होत्या. भाजपला फक्त ३ जागा होत्या तर काँग्रेसला भोपळा मिळाला होता. मागील २ विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी अशी होती.
२०१३ विधानसभा निवडणुक - भाजप ३४%, आआप २९%, काँग्रेस २५%
२०१५ विधानसभा निवडणुक - भाजप ३२%, आआप ५४%, काँग्रेस ९%
याचा अर्थ असा की दोन्ही निवडणुकीत भाजपची मते जवळपास कायम राहिली होती. परंतु २०१५ मध्ये आआपने काँग्रेसची तब्बल १६% मते मिळविली. त्याच बरोबरीने बसपची ४% मते देखील आआपकडे गेली होती. त्यामुळे आआपने तब्बल ५४% वर उडी घेतली. त्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपच्या पराभवासाठी आपली मते मोठ्या प्रमाणात आआपकडे वळविली होती.
आजच्या निवडणुकीत अशी टक्केवारी आहे.
भाजप ३९%, आआप २६%, काँग्रेस २१%
म्हणजे आआपला आपली २०१३ मध्ये मिळालेली मते सुद्धा टिकविता आली नाहीत. २०१५ च्या तुलनेत काँग्रेसने आपली बरीचशी मते आआपकडून परत मिळविली आहेत. भाजपने आपल्या मतात घसघशीत ७% मतांची वाढ केली.
आजच्या निकालात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. फेब्रुवारी २०१५ मधील आआपची प्रचंड लाट ओसरू लागल्याचे ७ महिन्यांतच स्पष्ट झाले होते. सप्टेंबर २०१५ मधील दिल्ली विद्यापीठाच्या वार्षिक निवडणुकीत आआपच्या विद्यार्थी संघटनेने पहिल्यांदाच सहभाग घेतला. ती निवडणुक चौरंगी होती. अभाविप (भाजप), एनएसयूआय (काँग्रेस), एसएफआय (डावे पक्ष) आणि एआयएसए (आआप) या ४ विद्यार्थी संघटनांमध्ये लढत होती. त्या निवडणुकीत प्रचारासाठी आआपने दिल्ली विद्यापीठात एक रॉक शो आयोजित केला होता ज्याचे उद्घाटन केजरीवाल व सिसोदियांनी केले होते. उद्घाटन समारंभात केजरीवाल व सिसोदियांनी आआपच्या विद्यार्थी संघटनेला मते द्यायचे आवाहन केले होते. त्यावेळी आआपने जाहीर केले होते की त्यांच्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार आआपला ४४% विद्यार्थी मत देणार आहेत.
प्रत्यक्षात मतदान होऊन निकाल लागल्यावर असे दिसले की चारही जागा अभाविपने जिंकल्या व आआपचे उमेदवार तिसर्या किंवा चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. अवघ्या ७ महिन्यांच्या अवधीत आआपची लाट ओसरायला लागल्याचे स्पष्ट झाले होते.
नंतर एप्रिल २०१७ मध्ये दिल्लीतील एका विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आआपचा दारूण पराभव झाला. ती जागा २०१५ मध्ये आआपने जिंकली होती. परंतु पोटनिवडणुकीत आआपच्या उमेदवाराला तिसर्या क्रमांकाची मते मिळून उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली. म्हणजे २६ महिन्यांनंतर आआपची प्रचंड लाट पूर्ण ओसरली आहे हे दिसून आले.
या महापालिका निवडणुकीमुळे आआपची लाट पूर्ण ओसरलेली असून ओहोटी सुरू झाली आहे हे स्पष्ट झाले आहे.
हे होणारच होते. केजरीवाल व आआपच्या नेत्यांचे मागील २६ महिन्यांपासून सुरू असलेले माकडचाळे, भ्रष्टाचार, ढोंगीपणा, अकार्यक्षमता, वशिलेबाजी इ. मुळे मतदार आआपला धडा शिकविणार हे स्पष्ट होते. केजरीवालांनी निवडणुक प्रचारात अजून खालची पातळी गाठली. भाजपला मते दिल्यास दिल्लीत डेंगू, मलेरियाची साथ येईल, भाजपचे कार्यकर्ते ट्रान्सफॉर्मरमधील तेल चोरत आहेत कारण त्यामुळे वीजटंचाई निर्माण व्हावी हा त्यांचा उद्देश आहे, भाजप महापालिकेत विजयी झाल्यास ते वीज व पाण्याचे दर वाढवतील (वीज व पाण्याचे दर वाढविण्याचा/कमी करण्याचा अधिकार राज्य सरकारला असतो. तो अधिकार महापालिकेला नाही.) असा अत्यंत खालच्या स्तराचा व खोटारडा प्रचार ते करत राहिले. आपण काय करणार यापेक्षा भाजप किती नालायक हाच नकारात्मक प्रचार त्यांच्या मुळावर आला.
केजरीवाल आणि त्यांची टोळी यातून धडा शिकेल अशी अजिबात शक्यता नाही. किंबहुना त्यांनी या पराभवातून धडा शिकून वर्तन सुधारावे असे मला अजिबात वाटत नाही. कारण जोपर्यंत केजरीवाल, राहुल, उद्धव इ. मंडळी मोदींविरूद्ध नकारात्मक प्रचार करीत आहेत तोपर्यंत मोदींना अजिबात मते मिळविण्याची चिंता नाही.
- Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२
Wed, 04/26/2017 - 17:18
नवीन
---
सहमत !
- Log in or register to post comments
द
दशानन
Wed, 04/26/2017 - 19:32
नवीन
स्वराज पार्टी, विजेंद्र यांची त्यात ल्यात्यात सेन्सबल बोलत आहे सकाळ पासून, अजून होप ठेवावी का?
बाकी आप चा दन्गा पाहून काय बोलावे हेच कळत नाही आहे, मूर्खांच्या यादीत मी नव्हतो हे सुख की कधी अपेक्षा होत्या त्याच्या कडून याचे दुःख करू :(
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
गुरुवार, 04/27/2017 - 06:59
नवीन
कालच्या दिल्ली महापालिका निवडणुकांसंबंधी रोचक माहिती
१. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ३२ उमेदवारांना मिळून अवघी ५२ मते मिळाली आहेत. याचा अर्थ जवाहरलाल नेहरू विद्यापीठातल्या प्राध्यापकांनीही सगळ्यांनी माकपच्या उमेदवारांना मते दिलेली दिसत नाहीत. त्यातल्याही अनेकांची मते आआपला गेली असावीत :)
२. ९० मतदारसंघात काँग्रेसचे, ४० मतदारसंघात आम आदमी पक्षाचे तर ५ मतदारसंघांमध्ये भाजपचे डिपॉझिट जप्त झाले आहे.
३. नितीशकुमारांच्या जनता दल युनायटेडने दिल्ली महापालिका निवडणुक लढवली. दिल्लीत मोठ्या प्रमाणावर मुळचे बिहारचे मतदार आहेत. त्यांची मते मिळतील अशी अपेक्षा असावी. पण जदयुला नोटापेक्षाही कमी मते मिळाली आहेत :)
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Sat, 04/29/2017 - 09:37
नवीन
नाही. साधारण ९००० मतं आहेत कम्युनिस्ट पार्ट्यांना. पण तेव्हाच, 'नोटा'ला ६०००० आहेत बहुधा.
- Log in or register to post comments
स
सचु कुळकर्णी
Sat, 04/29/2017 - 15:39
नवीन
मनोज तिवारी ला दिल्ली ची जबाबदारी देण्यामागे हे सुध्दा एक कारण होत. पुर्वांचली आणि बिहारी मते भाजपा कडे वळवणे.
भोजपुरी सुपर स्टार रहिन बा.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sat, 04/29/2017 - 09:03
नवीन
१. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ३२ उमेदवारांना मिळून अवघी ५२ मते मिळाली आहेत.
म्हणजेच सहा उमेदवारांना त्यांच्या बायकांनी पण मते दिलेली नाहीत. ))))----
- Log in or register to post comments
प
पैसा
Sat, 04/29/2017 - 09:25
नवीन
=))
- Log in or register to post comments
इ
इरसाल
Sat, 04/29/2017 - 13:39
नवीन
याचा अर्थ असापण होतो कि काही उमेदवारांनी स्वतःलाही मतं दिली नाहीत.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Sat, 04/29/2017 - 09:40
नवीन
हा धागा प्रामुख्याने निवडणुकसंदर्भात तरिही एक ताजी नॉन राजकीय घटना सांगतो... बाहुबली २ नावाचा भयाण चित्रपट प्रदर्शीत झाला आहे. एका शब्दात चित्रपटाचं वर्णन करायचं तर "डोकेदुखी" हे एकच विशेषण वापरता येईल. अत्यंत सुमार कथानक, सुमार संगीत, बाहुबली १ पेक्षा एक इंच देखील अभिनयाची उंची न वाढवलेले कलाकार, तंत्रज्ञानाच्या वापरातुन युद्धदृष्यांना थ्रीलर बनवण्याऐवजी थिल्लर बनवणारे स्पेशल इफेक्ट्स, पांढर्या रंगात अधिकचा चुना मिसळुन घडवलेली नायकाची प्रतिमा... बरच काहि आहे. अजीबात बघु नका.
सर्वात जास्त राग आला त्या सो कॉल्ड सस्पेन्सचा... कटप्पाने बाहुबली को क्यु मारा. च्यायला त्याच्या...
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Sat, 04/29/2017 - 10:07
नवीन
=))
तरीच केजरीवालने त्याचे ट्वीटरवर समिक्षण केले नाही ! ;)
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Sat, 04/29/2017 - 10:48
नवीन
इथे केजरींचच समीक्षण व्हायची वेळ आलि आहे.
तसं बघितलं तर केजरीसाहेब अगदी चपखल उदाहरण आहे बाहुबलीचे. बाहुबली१ आणि २ मधे नेमका केजरीवाल २०१५ आणि २०१७ असाच फरक आहे. आता तुम्हाला नेमकी कल्पना येईल किती भयंकर चित्रपट आहे हा.
- Log in or register to post comments
र
राघवेंद्र
Mon, 08/28/2017 - 06:28
नवीन
#BawanaByPoll
बवाना निवडणुकीचे निकाल येत आहेत आणि सहाव्या फेरीनंतर
काँग्रेस - सुरेंद्र कुमार - १३१८२
भाजप - वेद प्रकाश -९७४५
आआप - राम चंद्रा - ९४९९
भाजप आणि आआप या दोंघाना ही धोक्याची सुचना आहे.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2