ताज्या राजकीय घडामोडी भाग ६- दिल्ली महानगरपालिका निवडणूक २०१७ विशेष
रविवारी एकूण ५४% मतदान दिल्ली महानगरपालिका साठी झाले आहे आणि एक्झिट पोल अंदाज भाजपाला बहुमत मिळेल असे म्हणत आहे.
दिल्ली दक्षिण (१०४ जागा) , दिल्ली उत्तर (१०४ जागा ) आणि दिल्ली पूर्व (६४ जागा ) अश्या तीन महानगरपालिका आहेत.
ऍक्सिस - इंडिया टुडे चा एक्झिट पोल
एबीपी - सी वोटर चा एक्झिट पोल
निवडणुकीचा निकाल दिल्लीकर ,अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्ष, काँग्रेस आणि EVM साठी कसा असेल या चर्चे साठी हा धागा उघडत आहे.
मतमोजणी २६ एप्रिल रोजी आहे.
| महानगरपालिका | भाजप | आआप | काँग्रेस |
|---|---|---|---|
| उत्तर | 78-84 | 8-12 | 8-12 |
| दक्षिण | 79-85 | 9-13 | 7-11 |
| पूर्व | 45-51 | 6-10 | 4-8 |
| महानगरपालिका | भाजप | आआप | काँग्रेस |
|---|---|---|---|
| उत्तर | 88 | 6 | 7 |
| दक्षिण | 83 | 9 | 9 |
| पूर्व | 47 | 9 | 6 |
जर केजरीसाहेब जिंकले असते तर कमालीची सुसंगत विचारसरणी दुप्पट उफाळुन आलि असती.हे मात्र १००% खरे आहे ! "मीच्च खरा/सज्जन/बरोबर/ इत्यादी आहे. बाकी सगळे जग खोटे/भ्रष्ट/चूक/इत्यादी आहे." ही चलाख व स्वमग्न विचारसरणी नक्कीच दुप्पट वेगाने उफाळून वर आली असती, यात वाद नाही ! =)) =)) =)) बादवे : निवडणुकीत सतत सडकून मार खाल्ल्यावर आणि पक्षनेत्यांना सार्वजनिक शपथ घालूनही पक्षात फूट पडण्याची लक्षणे दिसत आहेत हे पाहून पहिल्यांदा केजरीवाल यांना आपण चूका केल्या आहेत हे म्हणण्याची उपरती झाली आहे... "तो अजून एक स्वार्थी कावा आहे का ?" आणि "ती उपरती किती दिवस शिल्लक राहील ?" या प्रश्नांची उत्तरे भविष्यच देईल ;) :) मात्र, केजरीवाल भक्त अजूनही सत्य कबूल करण्याचे प्रामाणिक धाडस करण्यात अयशस्वी ठरले आहेत व चुप्पी साधून आहेत :)