आजच्या लोकसत्ते मध्ये एक विनोदी बातमी आली आहे
जवानांच्या मृतदेहांच्या विटंबनेची किंमत मोजावी लागेल.. भारताचा पाकिस्तानला सज्जड इशारा
वाचुन खूप हसायला आले ,
पकिस्तान ला ह भारताचा कितवा सज्जड कडक इशारा असेल ?
लेख मोठ्ठे टाकत चला , स्वतःचे मत , मुद्दे स्पष्ट पणे मांडल्यास चर्चा करायल्;आ मजा येईल , चारोळी धागे उडवण्यात येतील.
एक आपुलकीचा म्हणुन सल्ला दिला . राग नसावा लोभ असावा .
असो.
माझा मुद्दा असा आहे की एकवेळ पाकिस्तानचे हल्ले परवडले पण भारतातील पाकिस्तान विषयी सहानुभुती आत्मीयता असलेल्यांचे काय करायचे हा मोठ्ठा गहन प्रश्न आहे :
हे पहा : सर्जिकल स्ट्राईकचे साईड इफेक्ट
http://blogs.maharashtratimes.indiatimes.com/sabab/pakistan-mutilates-bodies-of-two-indian-jawans-army-vows-retaliation/
साईड इफ्फेक्ट्स ? आर यु किड्डिंग मी ? म्हणे सर्जिकल स्ट्राईक दहशतवाद्यांविरोधात होता आणि आता पाक लष्कर असणार आहे , कोणतीही कारवाई ही थेट आक्रमण ठरणार आहे !!
ह्या लोकांच्या हे लक्षातच येत नाही पाकिस्तान लष्कर आणि दहशतवादी ह्यात द्वैत नाही , ते एकच आहेत , अगदी १९४७ पासुन आजपर्यंत पाकिस्तानने कधी दहशतवाद्यांविरोधात कारवाई केली आहे ? स्वतःच्या देशातली लहान लहान पोरं शाळेत घुसुन मारली तरीही कुठे पाकिस्तानने मुलतववाद्यांविरोधात आघाडी उघडली ?
कारण हे शक्यच नाहीये ,
पाकिस्तान दार अल इस्लाम आहे आणि भारत दार अल अह्द / दार अल सुल्ह आणि व्याप्त काश्मीर दार अल हर्ब हे ह्यांच्या लक्षातच येत नाहीये !
सदर लेखक पुढे म्हणतात " आक्रमण करायला काहीच हरकत नाही." अन आक्रमण केले की हेच लोकं म्हणतात की युध्दखोर सरकार , राष्ट्रभक्तीचे हीडीस प्रदर्शन वगैरे वगैरे !!
आणि हे आपले पाकिस्तानविषयी सुप्त आत्मीयता बाळगुन , " युध्द वाईट असते" " युध्द होऊच नये " " माझ्या वडीलांना युध्दाने मारले , पाकिस्तानने नव्हे" असले काही बरळत असतात ! एकवेळ पाकिस्तानव्रर आक्रमण करुन ७२ सारखा विजय मिळवताही येईल अन काश्मीर प्रश्न वन्स अॅन्ड फॉरएव्हर सोडवता ही येईल पण ह्या असल्या लोकांचे करायचे काय ? हा प्रश्न कसा सोडवायचा हाच मोठ्ठा प्र्श्न आहे !
केजरू आणि अंधभक्त .. दोन्ही एकाच .. सगळी कडे फक्त मोदी मोदी .. काय चाललंय आणि काय नाही हे डोळे उघडून त्यावर शांतपणे मत व्यक्त करणे नाही जमणार.. असो.. तो धाग्याचा मुद्दा नाही ..
त्यानंतर हि बातमी हि अली कि आपल्या सैन्याने त्यांच्या २ चौक्या उडवल्या.. पण काही दिवसांनी परत तेच तेच होत राहणार..
असो .. कळफलक बडवण्यापलीकडे काय करू शकतो
खरं आहे, आपण काय करू शकतो.
तरी एका पाकिस्तानी टीव्हीवर हुसेन निसार म्हणून एक व्यक्ती जरा सेन्सबल बोलतो त्याचे वाक्य आठवलं, आपण काही केले तरी शेजारी बदलू शकत नाही, किमान आपण त्यांना व त्यांनी आपल्याला त्रास देऊ नये एवढे संबंध तर नीट असावेत.
पण, पाकि काही सुधारणार नाहीत, त्यांना एक मोठा झटका द्यावा लागेलच. ते अजून 71 चा बदला या मूड मध्ये आहेत, जर मोदी सरकारने सिंध, बलुचिस्तान वेगळे केले तर किमान आपल्या 3-4 पिढ्या शांत वातावरणात जगतील.
ते सायेब सद्या त्यांच्याच पार्टीत चाललेल्या रणधुमाळीत आपची (की... आपली ?, नाही नाही, दोन्हींची !) उरलीसुरली अब्रू वाचविण्याच्या प्रयत्नात असल्याने त्यांना बाहुबली२ सकट कोणत्याही गोष्टीवर मत देण्यास वेळ मिळत नाही असे सूत्रांकडून कळते.
मार्कस ओरेलियस , तुम्ही अड्मिन आहात का मिसळ्पाव चे ? मला महित नाही म्हणुन विचारले , राग मानु नये
पाकिस्तान ने भारतावर हल्ले करायचे, जवानान्चे गळे कापायचे , विटम्बना करयची, अतिरेकि हल्ले करुन स्वतःचे अल्प आणि भारताचे प्रचन्ड नुकसान करायचे आणि नन्तर आपण फक्त रडायचे, विव्हळयचे, आक्रोश करायचा , पाकिस्तान्ला आणि अतिरेक्यान्ना सज्जड , कडक अति कडक इशारे ,निशेध खलिते पाठवायचे , वल्गना करायच्या , पुष्पचक्र वहायची, मेण्बत्त्या लावुन शत शत नमन आणि श्रद्धन्जली अर्पायची हे कोन्ग्रेस शासन असताना अनेक वर्षे पहात होतो , यात बदल व्हाव या आशेने भाजप ला जनतेने निवडले .काहिही फरक झालेला नाही. अतिरेकि आपले सैनिक मारतयत, नक्षल्वादी निमलश्करी दले आणि पोलिस यान्च्या घाउक कत्तली करतायत . आपले स्थितप्रज्ञ मन्त्री सन्त जेटली आणि सन्त राजनाथ, साक्षी भावनेने या सर्व घटनान्चे अवलोकन करित आहेत
आपले लष्कर आणी निमलष्करी दले ,पोलिस यन्च्यावर अतिरेकि, पाक सैन्य, नक्षल्वादी हे नेहमिच मात करतात .
काय करावे अशी तुमची अपेक्षा आहे?
पूर्ण युद्ध?
मी वर लिहले आज त्या बद्दल. पण अडचण अशी आहे की ते मूर्ख अणुयुद्ध करण्यास मागे पुढे पाहणार नाहीत, त्यांच्याकडे असलेल्या अस्त्रांची रेंज ही 350-400km आहे, म्हणजे मोठे नुकसान पंजाब, राजस्थान आणि हरियाणा प्रदेश ला होऊ शकतो, ह्या सर्व बाबी पाहता सरकार मला वाटते की योग्य असा मध्यम मार्ग काढेल किंवा काढावा.
मार्कस ओरेलियस , तुम्ही अड्मिन आहात का मिसळ्पाव चे ?
नाही नाही अॅडमिन नाही , जनलोकपाल आहे ;) . इथे होणार्या नियमभंगांकडे मी जातीने लक्ष ठेवुन असतो. ( कधी कधी क्वोट करायला बरे पडते ;) )
हे वाचा : मिसळपावचे आधिकारीक धोरण http://www.misalpav.com/node/13199
६.नवे लेखन करताना एक-दोन ओळींचे लेखन करू नये. असे लेखन अप्रकाशित करण्याचा निर्णय संपादक मंडळ घेऊ शकते याची नोंद घ्यावी.
बाकी पोर्किस्तान विषयी बहुतांश चिडलेलेच आहेत पण काही मोजकेच लोक अजुनही पोर्किस्तान विषयी सहानुभुती ठेवुन आहेत हे ही तितकेच सत्य आहे ! ह्या अशा लोकांचे काय करायचे हा जास्त गंभीर प्रश्न आहे असे मला वाटते !
मा. मोदी सरकार पाकिस्तानचं नाव जगाच्या नकाशावरून मिटवून टाकतील असे स्वप्न भारतीय मतदारांनी पाहिले आहे, त्यामुळे अजूनही सरकारने केवळ सज्जड दम द्यावा, त्यामुळे काही भारतीय नागरिक नाराज होऊ शकतात, हे मी समजू शकतो.
-दिलीप बिरुटे
पंतप्रधानपदावर्,संरक्षण मंत्रीपदावर कोणीही असो, पाकिस्तान व दहशतवादी त्यांना पाहिजे तेच करतात असाच ह्याचा अर्थ होतो. भारत-पाक संबंध न समजणारे आहेत. एकीकडे त्यांनी ह्यांना(भारताला) बासमती तांदूळ ,सिमेंट,खजूर द्यायचे..ह्यांनी त्यांना साखर्,टोमॅटो,कापूस द्यायचे. वाघा सीमेवर अगदी कडक शिस्तीत एकमेकांसमोर संचलन करायचे. हल्ला झाला की ह्यांनी ईशारा द्यायचा..त्यांनी तो फेटाळून लावायचा.. मग ह्यांनी 'प्रत्युत्तर' द्यायचे..त्यांनी त्यावर काहीच जाणवले नाही असे म्हणायचे..
मग दोघांनी एकत्र येऊन पोज देत 'कश्मीर प्रश्न चर्चेनेच सुटेल' असे एका सुरात म्हणायचे..
गेले ४० वर्षे असेच घडत आलेय..
चर्चा करू का माईसाहेब ह्या प्रश्नावर ? आयात निर्यात धोरण वैग्रे . मोस्ट फेव्हरटेड कंट्री मध्ये आहे पाकिस्तान व्यापारात .
बाकी ४० वर्षाचा मुद्दा नाही पटला .
मुंबईवरील हल्ल्यानंतर देखील असेच वाटले होते.
त्यावेळेस ते मांडायचा प्रयत्न पण केलेला. दुवा
पण आता लक्षात येतं की पाकला, दहशतवाद्यांना शिव्या घालण्याशिवाय आणि आपल्या सरकारवर नाराजी व्यक्त करण्यापलिकडे आपण स्वतः काहीच करू शकत नाही. अर्थात त्यामुळे आपल्या जाणिवा बोथट व्हायची गरज नाही, पण मनाला समाधान मिळत नाही हे खरं.
मला नेहमी एक प्रश्न पडतो तो असा की अतिरेक्यान्चा हल्ला असो अथवा नक्षलवादी हल्ला असो,जास्त सन्ख्येने मरणारे आपले सैनिक ,जवान्,पोलिस कसे काय असतात ? वास्तविक आपले सैन्य किन्वा इतर सुरक्शा दलातील सैनिक हे अतिरेकी किन्वा नक्षलवादी यान्च्या पेक्षा चान्गले प्रशिक्षण झालेले असले पाहिजेत. पण चित्र नेहमि विपरीत दिसते.अतिरेकी/पाकिस्तानी/ नक्षलवादी हे लढाइत वरचढ असतात आणि सैन्यचे नुक्सान अधिक त्यन्च्याहून जास्त होते. २ अतिरेकि ठार आणि ५ सैनिक शहीद , ४ नक्षलवादी ठार आणि १८ जवान शहीद असल्याच बातम्या ऐकायची सवय झाली आहे , कधी उलट ऐकायला मिळाले आहे का ? मला तर आपल्या सैन्याच्या युद्ध युद्ध कौशल्याविशयीच शन्का येउ लागली आहे.
परवानगीच्या आत नाही बसलं तर प्रतिसाद उडवा .
तर अनंतनाग नावाचा जिल्हा आपणास माहित असेल . त्यापुढे मेन खोऱ्यात मी भरपूर काम करत होतो .त्यावेळी जेव्हा पर्यटन जोरात होतं तेव्हाही अनंतनाग ला गाडीचा डेक बंद करा ह्या सूचना होत्या . टुरिस्ट बस ना लाईट बंद करा अश्याही .
३-५ वेळा पर्यटन आणि ४ महिने काम केलंय तिकडे सांगू शकतो पण धोरणात बसेल कि नाही माहित नाही .
भयंकर राग होता ,आहे आणि राहील खोऱ्यात . पर्यटन ह्या कारणास्तव पैसे मिळत होते म्हणून काही वर्ष गप्प होते . ह्या घडीला आपण काहीच करू शकणार नाहीये . संरक्षण निधीवर ताण पडणार . त्यात बलुचिस्तान मध्ये आम्ही लक्ष घालतो हे माननीय पंतप्रधानांनी जाहीर सांगितलं . असं नाही चालत आंतरराष्ट्रीय राजकारणात .आकडेवारी पाहिली तर जे प्रश्न सोडवू बोले त्यांच्या कालखंडात हत्या जास्त झाल्या .गावागावात राहिलोय आप इंडिया से हो ना हा प्रश्न मग मैत्री .
वाचुन खूप हसायला आले ,
पकिस्तान ला ह भारताचा कितवा सज्जड कडक इशारा असेल ?
बरोबर आहे. मुंबई पुण्यात बसून कळ फलक बडवायला काय जाते? मानवाधिकार हा विषय विश्वविद्यालयात( JNU असलं तर उत्तमच) शिकायला आणि चर्चा करायला फार छान आणि गरमागरम असतो.
पाकिस्तानी सैन्य आणि त्यांनी पाळलेले दहशतवादी यात काही फरक आहे. त्यांचा सैनिक मारला गेला तर तो जमेत धरला जातो(accountable) पण दहशतवादी मारला गेला तर तो मुळातच हिशेबात नसतो. त्यामुळे आपण सरहद्दीच्या पलीकडे एखादा दहशतवादी मारला तर पाकिस्तान लष्कर ताबडतोब त्याचा इन्कार करते. आपल्याकडील प्रत्येक सैनिक किंवा माणूस हा जमेत धरला जातो म्हणूनतो मारला गेला कि त्याची मोठी बातमी वर्तमानपत्रात येते त्यातून आपल्याकडे डावे मानवतावादी आणि मोदी द्वेष्टे लोकी असे आहेत कि काळ्या गाईला पांढरे वासरू झाले तरी मोदीच जबाबदार आहेत असे टाहो फोडतात. त्यामुळे काही केले तर युद्धखोर आणि काही केले नाही तर काहीच करत नाही म्हणून टाहो फोडला जातो.
प्रत्यक्ष युद्ध रेषेवर काय चालू आहे ते इतरांना सांगायची लष्कराला आवश्यकता वाटत नाही कारण दहा अतिरेक्यांना मारले तर हेच लोक त्यांच्या मानवाधिकाराचे उल्लंघन होते म्हणून बोम्ब मारायला सुरुवात करतात.
त्यातून आपली न्यायालये सुद्धा मानवाधिकाराच्या बाबतीत अतिशय उदार आहेत. अशांत भागात जेथे लष्कर तैनात झाले आहे तेथे केलेल्या प्रत्येक एन्काउंटर चा एफ आय आर दाखल केला पाहिजे असा अलीकडील निकाल पाहता हसावे कि रडावे हेच कळत नाही.
http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/file-encounter-death-firs-even-in-afspa-areas-supreme-court/articleshow/58410927.cms
मुळात एखाद्या भागात लष्कर का बोलवावे लागते तर तेथील मुलकी प्रशासन/ पोलीस परिस्थिती हाताळण्यास असमर्थ आहे. अशा असमर्थ लोकांनी लष्कराला बोलवायचे आणि त्यात झालेल्या एन्काउंटरचा एफ आय आर दाखल करून वर्षानुवर्षे गुऱ्हाळ चालवत राहायचे. या गुन्ह्याचा(?) तपास कुणी करायचा जे असमर्थ आहे त्यांच्या मदतीला लष्कर बोलावले किंवा अतिरेक्यांना सामील असलेले पोलीस दल त्याने ? वा रे न्याय
काश्मीरच्या पोलिसांची निष्ठा वादातीत नाही. त्यात दहशतवाद्यांचे सहानुभूतीदार अनेक आहेत. त्यामुळे लष्कर सहसा पोलिसांना न सांगता एन्काउंटर करते. आता झालेल्या प्रत्येक एन्काउंटरचा जर काश्मीर पोलिसांनी एफ आय आर नोंद केला आणि लष्कराने त्याचा हिशेब देत राहायचे तर काश्मीरमध्ये लष्कराला बंदुकांच्या ऐवजी फक्त लाठ्याच वापरायला लागतील.
पण न्यायालयात केवळ निकाल मिळतो न्याय मिळत नाही.
सरकार उघडपणे काही करू शकत नाही. हि डाव्या पुरोगामी मानवत्वाद्यानी केलेली कोंडी आहे. पण सरकारने लष्कराला बऱ्यापैकी मोकळीक दिलेली आहे. दमदार प्रतिहल्ला हेच एक तत्व बाळगून लष्कर तेथे काम करीत आहे.
यामुळे जेथे शक्य आहे तेथे काश्मीर मध्ये आता दहशतवाद्यांना नियंत्रणरेषेपर्यंत नेले जाईल आणि गोळ्या घातल्या जातील म्हणजे पळून ते पाकिस्तानात गेले आणि तेथे मेले तर "एफ आय आर चा प्रश्न" सुटेल.
हि माहिती माझ्या काही वर्ग मित्रानी दिलेली आहे जे लष्करात आता ब्रिगेडियर पदावर कार्यरत आहेत. यापेक्षा जास्त मी उघड करू शकत नाही.
जेथे शक्य आहे तेथे काश्मीर मध्ये आता दहशतवाद्यांना नियंत्रणरेषेपर्यंत नेले जाईल आणि गोळ्या घातल्या जातील म्हणजे पळून ते पाकिस्तानात गेले आणि तेथे मेले तर "एफ आय आर चा प्रश्न" सुटेल.
देशाच्या एकात्मते पेक्षा मानवाधिकारांचा बाऊ अधिक करू इच्छित नाही तरीही डॉक्टरांच्या मांडणी बद्दल काशी साशंकता शिल्लक राहतात.
मला वाटते प्रयत्न करून पकडून जेल मध्ये टाकलेले दहशतवादी; अपहरणे इत्यादींच्या माध्यमातून मांडवली करून सुटून जातात त्यामुळे एनकाऊंटर्स बरे असा भाव निर्माण व्हावयास लागतो.
यातील चिंतेचा मुद्दा असा आहे की सूत्रधार (म्हणजे अतिरेक्यांचे नेतृत्व वैचारीक आणि कमांड दोन्ही) सोडून प्याद्यांची किती एनकाऊंटर्स केली तरी नवीन प्यादी निर्माण होत रहातात हे एक दुसरे दुसरे इन्व्हेस्तीगेट न करता एनकाऊंटर केल्यास सूत्रधारा पर्यंत पोहोचण्यास म्हणजे त्यांचे मार्ग पैशांचा सप्लाय त्यांना दिले जाणारे आश्रय याची माहिती त्या प्याद्या सोबतच संपते, प्याद्यांना मदत करणारी साखळी तशीच रहाते.
स्थानिक पोलीस घेऊनच ब्रिटीशांनी सबंध भारतखंडावर राज्य केले त्यांच्यावरचे अधिकारी बाहेरून बसवावेत सैन्य दलांसोबत बाहेर राज्याच्या पोलीस दलांना आणि महिला पोलीस इत्यादींना मोठ्याप्रमाणावर वापरावयास हवे कारण इन्व्हेस्तीगेशन मधून सुत्रांचा तपास लागतो तेवढा विदाऊट इनव्हेस्टीगेशन लागत नाही. माझा प्रश्न मुलतः फोकस बद्दल आहे राग प्याद्यांवर काढायचा की (शेवटचा बायबाय करण्याची संधी दिल्याबद्दल) सुत्रधारांना थँक यू म्हणायचे ?
दहशतवाद्यांना तुरुंगात टाकण्यासाठी त्यांच्या विरुद्ध सज्जड पुरावा गोळा करणे आवश्यक आहे. हा पुरावा कसा आणि कुणी मिळवायचा? लष्कराने? मग पोलिसांचे काम काय? मुळात काश्मीर मध्ये पोलिसांची निष्ठा संशयास्पद आहे अशा परिस्थितीत ढिसाळ पुरावा पुढे आल्यावर अतिरेकी जामिनावर सुटतो. आणि मग तो सैनिकांना " बघून घेईन म्हणून धमकी देतो? सैनिकाच्या जीवाला धोका निर्माण झाला तर त्याने कुणाकडे दाद मागायची. पोलिसांकडे?
हे म्हणजे उद्याने नागड्याकडे वस्त्र मागितल्यासारखे झाले.
प्यादी गोंधळ घालत फिरत असतात त्यांना काबूत आणणे आवश्यक आहेच. मुळात प्याद्यांना सज्जड शिक्षा केली तर तेथे भरती होणारे अतिरेकी कमी होतील. बुऱ्हान वणी ला मारल्यावर आपल्या डाव्या आणि मानवतावाद्यांनी जी कोल्हेकुई चालू केलेली आहे त्यामुळे तेथे अजून अतिरेक्यांची भरती जोरात चालू झाली आहे. पंजाब मध्ये केवळ दहशतवादी नव्हे तर त्यांच्या नातेवाईकांना पण ठार मारल्यावर दहशतवाद्यांची भरती एकदम थंडावली हि वस्तुस्थिती आहे. के पी एस गिल ना या बद्दल विचारले असता ते म्हणाले कि असे मानवाधिकार उल्लंघन झाले हि वस्तुस्थिती आहे परंतु येणाऱ्या काळात अतिरेक्यांच्या हातून बळी जाणारया असंख्य निर्दोष नातेवाईकांचे प्राण वाचले त्याची किंमत कशी करणार?
जर दहशतवाद्यांनाच दहशत बसवायची असेल तर त्यांच्या बरोबर त्यांच्या नातेवाईकांना जेरबंद करणे आवश्यक आहे. जर अतिरेक्याला असे समजले कि तो जर दहशतवाद्यांना सामील झाला तर त्यांच्या कुटुंबाचा काटा काढला जाईल तर तो पुढे येण्याची हिम्मत दाखवणार नाही. हि मानवाधिकाराची पायमल्ली आहे हे मान्य आहे. परंतु असे करणे आणि ३७० कलम रद्द करणे हाच एक काश्मिरात शांतता आणण्याचा आता शिल्लक राहिलेला उपाय आहे.
काश्मीर मध्ये दहशतवाद्यांना जरासे काहीही केले तरी सर्व डावे इतकी कोल्हेकुई चालू करतात कि शेवटी बरेच लष्करी अधिकारी हताश बुद्धीने म्हणतात झक मारली. आपली दोन वर्षे काढा आणि पुढच्या पोस्टिंगला जा.
राहिली गोष्ट त्यांच्या बोलविता धनी जो सीमापार आहे त्याला वेसण घालऱ्यांच्या अनेक संधी आपल्या विद्वान राजकारण्यांनी १९४७, १९७१, १९८० इ अनेक वेळेस वाया घालवल्या आहेत. सर्वंकष युद्ध हे तुम्हाला दहा ते पंधरा वर्षे विकासात मागे घेऊन जाईल. पाकिस्तान हे झुरळ किंवा उंदरां सारखे आहे. कितीही मारा, परत परत येत राहणार.
कुंपण मजबूत करून सीमेपारच्या कारवायांना पायबंद घालता येईल पण जोवर काश्मिरातील युवकांची अतिरेक्यांमध्ये भरती आणि त्यांना सहानुभूती थांबवत नाही तोवर हा काट्याचा झालेला नायटा बरा होणार नाही.
डॉक्टर साहेब आपण माझा प्रतिसाद नीट अभ्यासलात का या बद्दल साशंक आहे. प्याद्यांचे नातेवाईक संपवल्याने प्याद्यांना मदत करणार्या साखळीची माहिती कशी मिळणार हे समजले नाही. प्यादा मारायचाच आहे तर माहिती मिळवून मारता येतो. स्थानिक पोलीसांवर विश्वास आहे का नाही हा प्रश्नच येथे उद्भवत नाही. स्थानीक पोलीस उपलब्ध नसतील तर नसूद्यात इनव्हेटीगेशनसाठी रॉ आयबी एनाअयए इत्यादी संस्था असताना त्यांच्या कडूनही इनव्हेस्टीगेट करून घेतले जावयास हवे. आपल्या प्रतिसादातून सैन्य आणि राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणात ताळमेळ कितपत आहे या बद्दल साशंकता वाटते.
सैन्य आणि सैन्यासाठी विशेषाधीकार वापरा पण विशेषाधिकारासाठी हट्ट करता येतो भारतभरातील सर्व राज्यातून पोलीसदलांमधील क्रीम आणून त्यांची बटालीअन सैनिकी ट्रेनिंगसह बनवून वापरण्याचा आग्रह का लावून धरता येत नाही ? कारण सिव्हीलीअ पॉपूलेशनला हँडल करण्याचे कौशल्य पोलीसदलांकडे नक्कीच अधिक असते. सैनिकांना मुख्यत्वे सीमेपारच्या शत्रूशी लढण्याचे ट्रेनिंग दिलेले असते. सिव्हीलीअन पॉपूलेश हँडल करण्यासाठी लागणारे पेशन्स सैनिकांकडे नसते हे आपल्या प्रतिसादात आपसूकपणे समोर येत आहे.
...आणि मग तो सैनिकांना " बघून घेईन म्हणून धमकी देतो? सैनिकाच्या जीवाला धोका निर्माण झाला तर त्याने कुणाकडे दाद मागायची.
आपला हा मुद्दा समजून घेण्यास मी कमी पडतो आहे का ? ड्यूटीवर असलेल्या सशस्त्र सैनिकाने जीवाच्या धोक्याची पर्वा का करावी हे मला निटसे समजले नाही.
...कि शेवटी बरेच लष्करी अधिकारी हताश बुद्धीने म्हणतात झक मारली. आपली दोन वर्षे काढा आणि पुढच्या पोस्टिंगला जा.
मी डाव्यांचा पक्षधर नाही तरीपण राजकारण असतेच डाव्यांनी कोल्हेकुई नाही केली तरी पाकीस्तानची कोल्हेकुई चालू राहणारच आणि काही प्रमाणात प्यादे पुढे येतील, मग काय आपले लष्करी आधीकारी आपण उल्लेख केल्या प्रमाने हताश रहातील.
लष्करातून बाहेर पडल्यानंतर स्वतः राजकारणात येण्याचे मार्ग उपलब्ध आहेतच ना केवळ बोटे मोडण्या पेक्षा रिटायरमेंट नंतर चांगले राजकारणही का करू नये ?
ओल्या सोबत सुके जळणार हे समजून घेतले तरी कियी सुके म्हणजे पुरेसे सुके आहे याचे काही गणित उपलब्ध आहे का ? न्यायालयांनी हस्त़षेप नाही केला तरी गरजेपेक्षा जास्त सुके जळू नये म्हणून काही सैन्यांतर्गतच का होईन प्रभावी पडताळणी व्यवस्था आहे का ?
चालवून घ्याल अशी अपेक्षा . तर व्यवस्था आहे पडताळणीसाठी लष्करात पण आता हात बांधलेत . बाता मारून प्रश्न हाताबाहेर सुटलाय . अनेक लोकांच्या मोदींवर अपेक्षा आहेत . परवाच चीन ने लोहमार्ग न्हेलाय कश्मीर च्या डोक्यावरून . ती मालगाडी पोचली परवा. त्यामुळे जरा वेळ द्यावा मोदी सरकार कारवाई जरूर करणार .पण मतांसाठी कि देशासाठी हे त्यांना ठरवायचं आहे . मतांसाठी केलं तर युद्ध, देशासाठी केलं तर सामोपचारी भूमिका . लेट सी
तुमच्या आणि डॉक्टरसाहेबांच्या तर्क (भूमिका) आणि तार्कीक उणीवा दोन्ही विरुद्ध दिशेच्या आहेत तेव्हा विरुद्ध भूमिक्चेया व्यक्तिचे उत्तर प्रातिनिधीक कसे असू शकेल ? बरे त्यासाठी तुम्ही त्यांच्या भूमिकेतून विचार वगैरे करून पहाताय असेही काही नाही. त्यामुळे त्यांचे उत्तर त्यांना देऊ द्या. तुमच्या भूमिकेची (ती आहे का आणि नेमकी काय आहे हे स्वतंत्र धागा काढलातर अधिक बरे) स्वतंत्र चर्चा केलेली बरी.
प्याद्यांचे नातेवाईक संपवल्याने प्याद्यांना मदत करणार्या साखळीची माहिती कशी मिळणार हे समजले नाही. प्यादा मारायचाच आहे तर माहिती मिळवून मारता येतो. स्थानिक पोलीसांवर विश्वास आहे का नाही हा प्रश्नच येथे उद्भवत नाही. स्थानीक पोलीस उपलब्ध नसतील तर नसूद्यात इनव्हेटीगेशनसाठी रॉ आयबी एनाअयए इत्यादी संस्था असताना त्यांच्या कडूनही इनव्हेस्टीगेट करून घेतले जावयास हवे. आपल्या प्रतिसादातून सैन्य आणि राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणात ताळमेळ कितपत आहे या बद्दल साशंकता वाटते.
आपली मते हि माहितीच्या कमतरतेवर आधारित आहेत असे वाटते.
प्यादी म्हणजे काश्मिरी लोक आज ते भारतीय घटनेवर आणि भारतीय संरक्षण दलांच्या माणूसकी वर विसंबून आहेत. एका दगडफेक्याला जीपवर बसवून फिरवले तेंव्हा काश्मिरातील दगडफेक बंद झाली पण भारतभर लष्करावर प्रचंड चिखलफेक झाली. त्याना माहीत आहे कि आपण काहीही केलं तरी भारतीय संरक्षण दले आपल्या नातेवाईकांना काहीही करणार नाहीत. उद्या एखाद्या अतिरेकि दलात सामील होणाऱ्या युवकाला कळले कि आपण अतिरेकी दलात सामील झालो तर आपल्या भावाला ठार मारले जाईल किंवा आपले घर जाळून टाकले जाईल तर तो त्या दलात सामील होणार नाही. याउलट काश्मीर पोलिसात असलेल्या पोलिसाला माहित असते कि आज एखाद्या अतिरेक्याला आपण अटक केली तर उद्या तो आपल्या घरावर हल्ला करेल म्हणून ते पोलीस आपल्या कृतीत कुचराई करतात. काश्मीर बाहेरून आणलेले लष्कर काय किंवा केंद्रीय राखीव पोलीस दल याना स्थानीय गोष्टीची बित्तमबातमी असत नाही त्यातून काश्मिरी भाषेचा प्रश्न असतोच. काही पोलिसांचे नातेवाईकच अतिरेकी आहेत. मग त्यांची याना उघड किंवा छुप्या रीतीने फूस असतेच. बऱ्याच वेळेस त्यामुळे संरक्षण दले स्थानिक पोलिसांना न सांगताच कार्यवाही करतात.
रॉ आयबी एनाअयए याच्याकडे काश्मिरात "अडकवून ठेवण्याइतके" मनुष्यबळ नाही.
आपल्याला लष्करी किंवा मुलकी गुप्त माहिती खाते माहिती कशी काढते याची साद्यन्त माहिती नसावी हे यावरून समजते. असो.
भारतभरातील सर्व राज्यातून पोलीसदलांमधील क्रीम आणून त्यांची बटालीअन सैनिकी ट्रेनिंगसह बनवून वापरण्याचा आग्रह का लावून धरता येत नाही ?
आपल्याला असे वाटते का निमलष्करी दले किंवा केंद्रीय पोलीस दले हि कुचकामी आहेत? मूळ तेथे स्थानीक प्रश्न समजण्यासाठी वर्षानुवर्षे तेथे स्थायिक असावे लागते. मिपावरच विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र यात जुगलबंदी चालू असते कि जमिनीवरील परिस्थिती तुम्हाला माहित नाही. मग तामिळ किंवा बंगाली पोलीस कितीही हुशार असेल तरीही वर्ष दोन वर्षात काश्मीर मधील परिस्थिती कशी समजून येणार. नुसताच भाषेचा नव्हे तर धर्माचा आणि राष्ट्रभक्तीचा फरक आहे.
सैनिकांना मुख्यत्वे सीमेपारच्या शत्रूशी लढण्याचे ट्रेनिंग दिलेले असते.
सिव्हीलीअन पॉपूलेश हँडल करण्यासाठी लागणारे पेशन्स सैनिकांकडे नसते हे आपल्या प्रतिसादात आपसूकपणे समोर येत आहे.
सैनिकांना समोरच्या माणसाला शत्रू आहे त्याला ठार मारले पाहिजे असे शिक्षण दिले जाते आणि मग त्याला आपल्याच जनतेत पाठविले जाते आणि सांगितले जाते कि गोळी मारायची नाही अन्यथा तुझ्यावर कारवाई होईल. मुळात लष्कर हे फक्त मुलकी प्रशासनाच्या मदतीसाठी असते. प्रशासन चालवण्यासाठी नाही. काश्मीर प्रश्न सोडवणे हे लष्कराचे मुळात कामच नाही. ते राजकारणी स्थानिक आणि राष्ट्रीय प्रशासनाचे आणि जनतेचेच काम आहे.
ओल्या सोबत सुके जळणार हे समजून घेतले तरी कियी सुके म्हणजे पुरेसे सुके आहे याचे काही गणित उपलब्ध आहे का ?
किती सैनिक मेल्यावर/ जायबंदी झाल्यावर आणि किती काश्मिरी पंडित बेघर झाल्यावर सुके जास्त झाले असे आपण म्हणणार?
हे गणित जमवणे हे सैन्याचे काम नाही ते सरकारचे काम आहे. पण सैन्य काढून घेतले तर काश्मीर( सुरुवातीला दिखाऊ स्वतंत्र करून) पाकिस्तान गिळंकृत करेल याबद्दल अजिबात शंका नाही
ड्यूटीवर असलेल्या सशस्त्र सैनिकाने जीवाच्या धोक्याची पर्वा का करावी हे मला नीटसे समजले नाही.
बंदुकीच्या या बाजूला उभे राहून असे विधान करणे सोपे आहे/ असते. एकदा श्रीनगर छावणी ( कॅन्टोन्मेंट) मध्ये आत जाऊन पहा. माझ्या मित्राच्या म्हणण्यानुसार तो "मोठ्या" तुरुंगात आहे. आपली स्वतःची मोटार गाडी आपण श्रीनगर बाजारात नेली तर परत आल्यावर सुरुवातीला ती एका स्फोटक विरोधी बंकरमध्ये नेऊन संपूर्णपणे तपासली जाते(sanitise) कारण दोन मिनिटात कोणीही आपल्या गाडीला खाली स्फोटके (IED) लावू शकतात. दुचाकी वाहनास छावणीच्या बाहेर नेण्यास परवानगी नाही. सैनिक स्वतःच्या कुटुंबासोबत श्रीनगर बाजारात जातात ते लष्करी गाड्यामध्ये बसूनच आणि ठराविक वेळेतच जातात आणि परत येतात. शाळा कॉलेजे हि छावणीच्या आतच आहेत. स्वातंत्र्य काय आहे याची कल्पनासुद्धा नसलेल्या लोकांनी लष्कराच्या जीपवर बसवलेल्या दगडफेक्याच्या स्वातंत्र्यावर उधळलेली मुक्ताफळे पाहून लाज वाटली. अशा लोकांसाठी माझ्या सैनिकांनी प्राणार्पण करावे याबद्दल शरम वाटली.
पाकीस्तानची कोल्हेकुई चालू राहणारच त्यांना कोण कुत्रं विचारत नाही.
आपलेच घरभेदी जेंव्हा जनेयुमध्ये भारताचे तुकडे करण्याच्या घोषणा देणाऱ्यांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याबद्दल टाहो फोडतात तेंव्हा लाज वाटते.
लष्करातून बाहेर पडल्यानंतर स्वतः राजकारणात येण्याचे मार्ग उपलब्ध आहेतच ना केवळ बोटे मोडण्या पेक्षा रिटायरमेंट नंतर चांगले राजकारणही का करू नये ?
हे लष्करातून बाहेर पडण्या बद्दल नव्हे तर काश्मीरमधून बाहेर पोस्टिंगवर जाण्यावर आहे.
एकंदर आपला अहं दुखावला गेला आहे असे स्पष्टपणे जाणवते.
पण ड्यूटीवर असलेल्या सशस्त्र सैनिकाने जीवाच्या धोक्याची पर्वा का करावी हे मला नीटसे समजले नाही.
आपले हे विधान पूर्वग्रहदूषित आणि संवेदनाहीन आहे. आहे हे स्पष्टपणे दाखवते. केवळ तो पोटासाठी लष्कराची नोकरी करतो म्हणजे त्याच्या जीवाची काहीच किंमत नाही? कि अंगावर गणवेश चढवला म्हणजे तो सामान्य माणसांचा गुलाम झाला? त्याच्या मानवी हक्काची किंमत काहीच नाही का?
न्यायालयां बद्दल सध्या तरी काही बोलण्याच्या मनस्थितीत मी नाही. न्यायालयात निकाल मिळतो. न्याय मिळेलच असे नाही.किंवा न्यायालयात जे मिळते त्याला न्याय म्हणायचे असते.
एक उच्च न्यायालयाचा न्यायाधीश (जस्टीस करणन) सर्वोच्च न्यायालयावर भ्रष्टाचाराचे आणि मानसिक असंतुलनाचे आरोप करतो आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचे सात वरिष्ठ न्यायाधीश त्याच्या निवृत्तीची वाट पाहत आहेत यापेक्षा वाईट परिस्थिती न्यायसंचिताजतागायत आलेली नसावी.
आपल्याला असे वाटते का निमलष्करी दले किंवा केंद्रीय पोलीस दले हि कुचकामी आहेत?
'तेथिल स्थानिक भाषा स्थानिक परिस्थितीची माहिती होणे' याची गरज असते पण आपल्या म्हणण्या बद्दल जी शंका आली ती हि की आज बहुतांश काश्मिरींना उर्दू येते जी हिंदीच्या जवळ आहे, इतर काश्मिरी भाषांचा टोनचा फरक पडेल -संस्कृतचा प्रभाव असणार कारण इतर भारता पेक्षाही काश्मिरात संस्कृतहीच पुर्वीची लिंग्वा फ्रँका होती मराठी माणसाला गुजराथी आणि गुजराथी माणसाला मराठी अवघड जाईल तेवढेच. जेव्हा पंजाबी डोग्रा तिथे जाऊन राज्य करू शकले ब्रिटीश करू शकले. ब्रिटीशोत्तर काळात सुरक्षादलांनी तेथे असूनही जवळपास सत्तर वर्षे होत येतील एवढ्या कालावधीत स्थानिक परीस्थितीची माहिती भाषा यांचे ट्रेनिंग सुरक्षादलांना देण्याची काहीच व्यवस्था नाही हे कसे शक्य आहे.
निमलष्करी दले किंवा केंद्रीय पोलीस दले सक्षम आहेत तर मेन सैन्यदलांवर भार का पडतो आहे ?
...अशा लोकांसाठी माझ्या सैनिकांनी प्राणार्पण करावे याबद्दल शरम वाटली.
डाव्यांना दिल्ली कॉर्पोरेशन च्या निवडणूकीत म्हणे ७० सुद्धा मते मिळाली नाहीत. जेनयुतील मोजके मूठभर डाव्यांचे वर्तन त्यांना स्वतःस लाज वाटावे असे आहे केवळ मिडीयाच्या उपलब्धतेमुळे ते बहुसंक्य जनतेचे मत होत नाही. जे एन यूतील मूर्ख डाव्यांची काय कशी वाटलावायची हा वेगळा राजकीय आणि प्रशासनीक प्रश्न आहे.
१) माझे इम्प्रेशन सैनिक माझ्यासारख्या बहुसंख्य राष्ट्रप्रेमी जनतेतून आलेले असतात आणि आपल्या राष्ट्रासाठी प्राणपणाला लावत असतता. २) तुमच्या आश्रयात काही टिकाकार असले तरी गुन्हेगारी होत नाही तो पर्यंत संरक्षण देण्याचे कर्तव्य तुमच्या प्रोफेशनल त्यांच्या ड्युटीचा भाग आहे. स्वतःची ड्यूटी प्रोफेशनली करण्याची लाज कुणासही का वाटावी ? आपण डॉक्टर आहात आपण आपल्याला न आवडणार्या व्यक्तिचे प्राणही वाचवत असताच तसाच प्रोफशनलीझम एका प्रोफशनल सैनिकाकडून अपेक्षिण्यात काय चुकते ?
एक राष्ट्रप्रेमी म्हणून सैनिकांच्या बंदुकांच्या मागे नव्हे त्यांच्या बंदुकीची एक गोळी वाचवण्यासाठी प्रसंगी बंदुकीच्या समोर उभेटाकू तो प्रश्न नाही, सैनिकांना मानवी हक्क नाहीत असे कुठेही म्हटलेले नाही, प्रत्येक सैनिकाचाही जिवही तेवढाच किमती आहे पण जीवावर उदार होऊन लढणे हा त्यांच्या प्रोफेशनचा जबाबदारीचा भाग आहे. ड्यूटीवर असलेल्या सशस्त्र सैनिकाने जबाबदारी न निभावता स्वतःच्याच जीवाच्या धोक्याची काळजी करत असतील तर ते इतरांचे संरक्षण कसे करतील ? हा प्रश्न मुदलात शिल्लक राहतोच.
सुरक्षादलांनी तेथे असूनही जवळपास सत्तर वर्षे होत येतील एवढ्या कालावधीत स्थानिक परीस्थितीची माहिती भाषा यांचे ट्रेनिंग सुरक्षादलांना देण्याची काहीच व्यवस्था नाही हे कसे शक्य आहे.
साहेब मी लष्करात( नौदलात) होतो, कोचीनला गेलो तेथे मल्याळी शिकायचं मग विशाखा पटनाम ला गेलो तेथे तेलगू शिकायची, मग जोधपूरला गेलो तेथे मारवाडी भाषा शिकायची. मग गोव्यात आलो तर कोकणी शिकायची. असे करणे शक्य आहे का? केंद्रीय दले किंवा सेवा या कोणत्याही राजकीय किंवा स्थानिक लागे बांधे यापासून दूर राहावीत म्हणून त्यांची दर दोन किंवा तीन वर्षांनी बदली होत राहते तेंव्हा तुमचा हा मुद्दा मुळातूनच गैरलागू आहे.(मूलभूत माहितीचा अभाव आहे)
निमलष्करी दले किंवा केंद्रीय पोलीस दले सक्षम आहेत तर मेन सैन्यदलांवर भार का पडतो आहे ?
काश्मीरची स्थिती हि इतर राज्यांपेक्षा वेगळी आहे तेथे आपला शेजारीच आपला शत्रू आहे आणि आंतरराष्ट्रीय शत्रूच्या आधुनिक शस्त्रे आणि अस्त्रे यांच्याबरोबर टक्कर घेण्यासाठी लष्कराची गरज पडते.काश्मीरचे राज्य पाकिस्तानच्या सीमेशी लागून आहे आणि त्या राज्याला ३७० कलमाखाली अलग दर्जा दिलेला आहे. अशी स्थिती इतर ठिकाणी नाही म्हणूनच आपल्या लष्कर प्रमुखांनी छत्तीस गड/ तेलंगण मध्ये नक्षलवाद्यांशी लढण्यासाठी आर्मी पाठवण्याच्या प्रस्तावाला स्पष्ट नकार दिला होता . ( परत मूलभूत माहितीचा अभाव)
तुमच्या आश्रयात काही टिकाकार असले तरी गुन्हेगारी होत नाही तो पर्यंत संरक्षण देण्याचे कर्तव्य तुमच्या प्रोफेशनल त्यांच्या ड्युटीचा भाग आहे.
त्यांना संरक्षण देणे आणि त्यांच्यासाठी सर्वोच्च त्याग / प्राणार्पण करणे यात फार मोठा फरक आहे साहेब
पण ड्यूटीवर असलेल्या सशस्त्र सैनिकाने जीवाच्या धोक्याची पर्वा का करावी हे मला नीटसे समजले नाही. हे तुमचे विधान काय दर्शवते? प्रत्यक्ष युद्धात कोणता भारतीय सैनिक पाठ दाखवून पळालेला आहे. गरज असते तेंव्हा जीवावर उदार होण्यात कोणताही सैनिक मागे पुढे पाहत नाही. पण एखाद्या ११ वर्षाच्या मुलीने बुरख्यातून AK ४७ काढून तुमच्या १५ वर्षांपासून बरोबर असलेल्या साथीदाराची गोळी घालून हत्या केली. यावर त्या सैनिकाने त्या मुलीला सहा गोळ्या घातल्या याची चौकशी झाली आणि पुढे तीन वर्षे त्याला मानसिक कटकट झाली याची किंमत काय आहे? म्हणजे जीवावर उदारही व्हायचे आणि आपले काम केल्यावर वर्षानुवर्षे चौकशीला सामोरे जायचे आणि आपले निर्दोषित्व सिद्ध करत राहायचे. त्याच्या मानवी हक्काची किंमत काहीच नाही का?
एकदा काश्मीरमध्ये पंधरा दिवस सैनिकांच्या बराकीत राहून पहा. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग हे ३१ मार्च च्या अगोदर वर्ष अखेरीस मुंबई पुण्याच्या वातानुकूलित कार्यालयातील ऐकू येणारे उद्गार किती फोल आणि उथळ आहेत हे आपल्या लक्षात येतील.
इशरत जहाँ सारख्या मुलीच्या नावाने रुग्णवाहिका काढणारे आपले लोकनियुक्त प्रतिनिधी. यांच्यासारख्या लोकांसाठी बलिदान? कशासाठी ?
फार जळजळ होते साहेब. क्षमा करा.
कदाचित भावूकतेमुळे बर्याचजागी आपला उत्तरांचा फ्लो मूळ प्रश्नांपासून भरक्टतोय अथवा काही ठिकाणी समतोलते बद्दल / तर्कसुसंगतते बद्दल साशंकता वाटली तर काही माहिती नळकोंडाळ्यावरच्या ऐकीव गप्पां/अफवांवर आधारीत वाटली. एनी वे आपण मनमोकळेपणाने प्रतिसाद दिलेत त्यासाठी आभार.
काही ठिकाणी समतोलते बद्दल / तर्कसुसंगतते बद्दल साशंकता वाटली तर काही माहिती नळकोंडाळ्यावरच्या ऐकीव गप्पां/अफवांवर आधारीत वाटली.
बरोबर आहे
आपण प्रत्यक्ष काश्मीरमध्ये काय चाललं आहे ते तिथेच जमिनीवर पाहात आहात.
आणि आमचं काय आम्ही आहोतच मुंबईत बसलेले वातानुकूलित कार्यालयात नळकोंडाळ्यावरच्या ऐकीव गप्पां/अफवांवर किंवा व्हॉट्सऍप वरील ज्ञानावर जगाला शिकवण्यासाठी.
एकदा फक्त सुरुंग फुटून किंवा गोळीने छिन्न विच्छिन्न झालेला रक्तबंबाळ झालेला पायाला हात लावून पहा. साधं ड्रेसिंग करायचं तर सुरुवात कुठून करायची हे समजेनासं होतं.
असो. बऱ्याच गोष्टी अजून शिकायच्या आहेत. आम्ही माहितगार थोडीच आहोत.
बढिया है!
माहितगारजी काही प्रश्णांची माहितगार उत्तरे द्या बरं.
१. तुमचा लष्करी अनुभव किती?
२. किती वर्षं तुम्ही युद्धजन्य भागात काढली आहात?
३. लष्कराचे नियम आणि कायदे ह्यांची तुम्हाला "फश्टहँड" माहिती आहे का?
४. जर का वरच्या प्रश्णांची उत्तरं नकारात्मक असतील तर मग डॉकच्या विधानाला व्हॉट्सअॅप/ नळकोंडाळ्यावरच्या गप्पा म्हणायचं कारण काय?
५. तुम्हाला उद्या बंदुक देउन तिकडे पाठवलं तर तुम्ही नेमकं काय कराल?
धन्यवाद.
मागे एखादा मिपावर कोणीतरी म्हंटले होते, गायनॅकॉलॉजिस्टने प्रेग्नंट व्हायलाच पाहिजे का ?
खाली लिंक दिली आहे त्या खालचे २-३ प्रतिसाद पण कृपया वाचा.
http://www.misalpav.com/comment/641308#comment-641308
http://www.misalpav.com/comment/641210#comment-641210
एक निरीक्षण आहे- जो ज्या क्षेत्रात काम करत असतो त्याला जर त्या क्षेत्रात काम करत नसलेला कोणी अक्कल शिकवत असेल तर चवताळतोच...!!
दुसरे निरीक्षण - दुसरा त्यालाही त्या क्षेत्राचा अनुभव नाही पण तो त्या अक्कल शिकवणाऱ्या अक्कल शिकवत असतो.
(अवांतर : या देशात शेतकरी, सैन्य, धर्म आणि जातीं बद्दल कोणीहि शंका उपस्थित करायच्या नाहीत. देशाच्या भावना दुखावतात)
विशुमित साहेब,
मी स्पष्टपणे लिहिले आहे कि ज्याचा एखाद्या विषयाबद्दल सखोल अभ्यास आहे अशा कोणाचाही विचारीवृंदात समावेश होउ शकतो.
"जर मी शेती करत नसेन किंवा केली नसेल तर मला त्या प्रश्नातील काहीच समजत नाही/समजणार नाही हे म्हणणे बरोबर नाही.
या न्यायाने आज भारतीय लष्कराच्या विचारवृंदात ( THINK TANK) मध्ये फक्त लष्करी अधिकार्यांचाच भरणा असायला पाहिजे. तसे बरोबर नाही ज्याने या विषयाचा सखोल अभ्यास केला आहे तो माणूस या विचारवृन्दात समाविष्ट केला जाऊ शकतो.असे अनेक अत्यंत हुशार आणी चतुरस्त्र सिव्हिलीयन्स( ज्यांनी युद्ध भूमी पाहिलेलीसुद्धा नाही). यात आहेत आणी त्यांची मोलाची भर/मदत लष्कराच्या डावपेच आणी नीती साठी होते आहे"
पुरुष स्त्रीरोग तज्ज्ञ हे येथे बसणारे चपखल उदाहरण आहे.
पण माहितगार साहेबानी "काही ठिकाणी समतोलते बद्दल / तर्कसुसंगतते बद्दल साशंकता वाटली तर काही माहिती नळकोंडाळ्यावरच्या ऐकीव गप्पां/अफवांवर आधारीत वाटली."
हि भाषा कोणत्या आधाराने वापरली हे मात्र सांगणे चातुर्याने टाळले.
मी आयुष्याची २३ वर्षे लष्करात काढली आणि त्यानंतरही आज माझे स्वतःचे वर्ग मित्र हे गुरेझ, उडी,श्रीनगर, उधमपूर ठिकाणी प्रत्यक्ष कार्यरत आहेत. सामाजिक न्यासातून आणि प्रत्यक्ष भेटीतून होणाऱ्या बोलण्यातून बऱ्याच गोष्टी समजतात त्यातील संवेदनशील भाग वगळून इतर गोष्टी मी इथे लिहितो. त्यावर माहितगार साहेब "नळकोंडाळ्याच्या गप्पा" अशी प्रतिक्रिया देणार असतील तर काय म्हणायचे?
बढिया है एवढेच म्हणतो.
अति अवांतर -- आपण पण साहेबांबद्दल किंवा शेतीबद्दल कुणी विधाने केल्यावर चवताळून अंगावर येता असे एक निरीक्षण आहे.
अचकूली हा प्रतिसाद कॅप्टन याना होता.
तो सुद्धा उपरोधक बिलकुल नव्हता. जे तथ्य आहे तेच मांडले होते मी.
त्यांनी माहितीगारांना त्यांचा सैन्यातील अनुभव किती अशा प्रश्नांची सरबत्ती केली होती म्हणून त्यांना तुमचे या बद्दलचे विचार काय आहेत हे दाखवून दिले.
तुमच्या कर्तव्य निष्ठे बाबत बिलकुल दुमत नाही.
ज्या क्षेत्रात ज्याचं आयुष्यभराचं योगदान आहे आणि त्या क्षेत्राबद्दल जर कोणी, पूर्वग्रहदूषित म्हणा किंवा आणखी काय, अप्रचार करत असेल किंवा अज्ञान पसरवत असेल तर तो माणूस चवताळून उठणारच. प्रतिवाद करणारच. जे तुम्ही केले, योग्यच होते ते.
बाकी साहेब आणि शेती बद्दल विधाने पूर्वी केली असतील ती अंगावर धावून जाण्या इतपत होती असे मला तरी नाही वाटत. असो...
१००% सहमत.दि. ३ मे २०१७ चा लोकसत्ता पहानगरिकांचे बळी १५ आहे वर्ष २०१६शहिद जवान ८२ आहेत वर्ष २०१६आणिदहशदवाद्यांचा खात्मा १५० आहे वर्ष २०१६बाकी लोकसत्तेचा खोडसाळ पणा वाटतो २०१२ आणि २०१६ कम्पॅरिझनद्याचे होते तर २०१० ते २०१६ सगळ्या वर्षाचे द्यायचे होते.
"सरळ डोक्यात गोळ्या घाला. सगळे काश्मीर लष्कराच्या ताब्यात द्या' हे म्हणायला सोपे असले तरी किती अवघड आहे हे सत्ताधार्यांच्या लक्षात आले असेल.
"Dulat said that talks are the only way forward to bring the situation back to normal."
"“Whenever and whatever actions are needed should be taken, but my point is there is no military solution for Kashmir. Anybody who had brains in our recent history understood it…
'रॉ' ह्या संस्थेच्या माजी गुप्तचर प्रमुखांचे हे उद्गार आहेत.
परम पूज्य श्रीमान राजयोगी पत्नीपरित्यागी लॉर्ड ऑफ मेन ह्यांनी आधीपासूनच योजना आखून ठेवली आहे जी आम्हा पामरांच्या लक्षांत यायची नाही. एक दिवस "मित्रो! आम्ही इस्लामाबाद ताब्यात घेतले आहे" अशी टीव्ही वर येऊन घोषणा होईल.
तथाकथित विचारवंत, मानवाधिकारवाले, अतिरेक्यांविषयी/ नक्षलवाद्यांबद्दल सहानुभूती बाळगणारे, भारतात राहून भारताविषयी अढी असणारे, धर्माच्या नावावर देशहिताला धोका पोहोचवणारे, पैश्यांसाठी देशविरोधी कारवाया करणारे किंवा सहाय्य करणारे या सगळ्यांना चाप लावायला पाहिजे. नंतर लष्करी कारवाई करावी.
श्रीलंकेने तामिळ वाघांचा कसा नायनाट केला ते अभ्यासण्यासारखे आहे.
स्टील काउंटिंग द डेड हे पुस्तक वाचावे असे सुचवतो .प्राध्यापक हॅरिसन ह्यांचं . श्रीलंकेला सीमा रेषा नाहीये . व्यापार मर्यादित आहे . हि फॉर असणारी बाजू असताना देखील अनेक वर्ष प्रश्न सोडवण्यात त्यांची गेली . समांतर वेळी रॉ तिकडे कार्यरत होतं. राजपक्षे नकोत ह्यासाठी पण ..हे ताज् उदाहरण पण आहे . त्यामुळे प्रत्येक प्रश्न सोडवायला एक वेळ असते . आज मोठी अर्थव्यवस्था भारतात आहे .जगभरात ल्या कंपन्या काम करत आहेत इकडे . तरी आपल्याला थांबावं लागतंय कारण जोडलेल्या सीमारेषा .चीन असो किंवा पाकिस्तान .
स्वत:च्या जिवावर उदार होऊन लढणे हा सैनिकाचा व्यावसायिक हेतू कधीच नसतो. शत्रूच्या जिवावर उदार होऊन लढणे हा आणि केवळ हाच सैनिकाचा व्यावसायिक हेतू असू शकतो. अन्यथा सैनिक आणि सामान्य नागरिक यांच्यात फरक तो काय उरला? सैनिक जनतेचं रक्षण करतील. पण सैनिकांचं रक्षण करायची जबाबदारी ज्यांची आहे ते नक्की काय करताहेत?
आ.न.,
-गा.पै.
मग दोघांनी एकत्र येऊन पोज देत 'कश्मीर प्रश्न चर्चेनेच सुटेल' असे एका सुरात म्हणायचे..*WALL*