Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

स्विकारावं का हे?

उ
उपयोजक
गुरुवार, 06/08/2017 - 12:31
🗣 107 प्रतिसाद
Vadpujan सदर फोटो फेबुच्या कृपेने मिळाला आहे.फोटो पाहिल्यावर आधी लक्ष जातं ते टी शर्ट आणि शॉर्टस् घालून वडाची पुजा करणार्‍या या स्त्री कडे! कदाचित ती कोणासोबत मदतीसाठीही आलेली असू शकते;पण समजा ती याच पोषाखात पुजेसाठी आली असेल तर? आपण असे बदल स्विकारावेत का? स्विकारावेत असं वाटत असेल तर का स्विकारावेत? स्विकारु नयेत असं वाटत असेल तर का स्विकारु नयेत? की वेळ लागेल असे बदल स्विकारायला? अनेक कंपन्यांमधे फॉर्मल पोषाखात न घालता कर्मचारी आल्यास तो कामाबाबत गंभीर नाही असं समजलं जातं पंचताराकीत हॉटेल्समधे स्त्रीयांनी नऊवारी नेसून गेल्यास ड्रेसकोडचं कारण सांगून प्रवेश नाकारला जातो. काय वाटतं तुम्हाला?झडू द्या चर्चा!!
वर्गीकरण
इतिहास आणि संस्कृती

प्रतिक्रिया द्या
25935 वाचन

💬 प्रतिसाद (107)
म
मुक्त विहारि गुरुवार, 06/08/2017 - 12:43 नवीन
ह्यालाच उन्नती म्हणतात... वल्कला पासून वल्लकाकडे...असे आमचे मत (गरजूंनी कालचक्र हा आमचा आगामी धागा बघावा.कदाचित धागा काढणारही नाही.) कोणे एके काळी कोपर्‍यापर्यंत चोळी आणि नऊवारी असायची मग पाचवारी आली आणि मग पंजाबी. असो, पुरुष मंडळी जर धोतरे सोडून अर्ध्या चड्डीवर आली (मी तरी अर्ध्या चड्डीत कुठेही भस्त्रि) मग स्त्रियांनीच काय घोडे मारले आहे? निदान त्या वडाची पूजा तरी करत आहेत..... डहाळी तरी घरी आणून पूजत नाहीत. असो,
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर गुरुवार, 06/08/2017 - 12:44 नवीन
या माहितीचे तुम्ही काय करणार आहात.
  • Log in or register to post comments
ए
एस गुरुवार, 06/08/2017 - 12:56 नवीन
मुळात वडाची पूजा करून नवऱ्याचं काँट्रॅक्ट का बरं जबरदस्तीनं वाढवून घेतात प्रत्येक जन्मात? ते ही चक्क सात जन्मांनी? ही शुद्ध गुलामगिरी आहे. प्रत्येक जन्मात स्वातंत्र्य मिळालेच पाहिजे (दोन्ही पार्ट्यांना). बिचाऱ्या वडाला धागा गुंडाळून त्याचा जीव गुदमरवून टाकता? काही वाटतं का नाही? वडालापण स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 06/08/2017 - 13:01 नवीन
अशा कपड्यात जर कुणी येत असेल तर वड कशाला नाही म्हणेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
उ
उपयोजक गुरुवार, 06/08/2017 - 12:56 नवीन
दरवेळी मिळणार्‍या माहितीचं काही केलंच पाहिजे का?
  • Log in or register to post comments
अ
अमु१२३ Fri, 06/09/2017 - 07:00 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
उ
उपयोजक गुरुवार, 06/08/2017 - 13:01 नवीन
किंवा असं समजा जे याबाबत संदिग्ध आहेत त्यांना निश्चित मत ठरवायला मदत होईल ही चर्चा वाचून!
  • Log in or register to post comments
द
दशानन गुरुवार, 06/08/2017 - 13:02 नवीन
झडू द्या चर्चा!! पगार किती बोला आधी!
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा गुरुवार, 06/08/2017 - 13:07 नवीन
तुमचा खफ बंद झाल्यापासून खूपच फिरायला लागला तुम्ही इकडे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
द
दशानन गुरुवार, 06/08/2017 - 13:08 नवीन
आम्हाला परवानगी नाय लागत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
म
मितान गुरुवार, 06/08/2017 - 13:24 नवीन
काय सुरेख झाड आहे हो ! थोडा लांबून फोटो घेतला असता तर पारंब्या पण फोटोत आल्या असत्या !
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 06/08/2017 - 14:12 नवीन
फोटो मधोमध डिवाइड करुन पाहा........ वरचा भाग एकदम निर्विवाद आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान
ए
एकुलता एक डॉन गुरुवार, 06/08/2017 - 16:14 नवीन
अशील अश्लील अश्लील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
आ
आदूबाळ गुरुवार, 06/08/2017 - 14:19 नवीन
पंचताराकीत हॉटेल्समधे स्त्रीयांनी नऊवारी नेसून गेल्यास ड्रेसकोडचं कारण सांगून प्रवेश नाकारला जातो.
हे खोटं आहे हे स्वानुभवावरून** सांगू शकतो. कोणतं हॉटेल हे करतं सांगा. आपण मन्शेला सांगू. **स्वानुभव पंचतारांकित हॉटेलात काम करायचा आहे. नऊवारी नेसायचा नव्हे.
  • Log in or register to post comments
ख
खेडूत गुरुवार, 06/08/2017 - 14:30 नवीन
नऊवारी नेसायचा नव्हे.
यात असाही बदल करता येईल...नऊवारी नेसून पंचतारांकित हॉटेलात जाण्याचा नव्हे! =)) . बाकी अश्या पंचतारांकित हॉटेलात लग्नाला हजेरी लावली आहे, जिथे अनेक महिला अनेक प्रकारच्या साड्या नेसून आल्या होत्या. ती एमेफ हुसेनची गोष्ट किती सालची अन किती खरी कोण जाणे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
M
mayu4u Sat, 06/10/2017 - 18:59 नवीन
जिमी वालं हॉटेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आदूबाळ Sat, 06/10/2017 - 19:01 नवीन
हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mayu4u
अ
अभिजीत अवलिया गुरुवार, 06/08/2017 - 14:58 नवीन
कोण कुठे कसले कपडे घालतो, काय खातो ह्या बाबींवर लक्ष देणे जेव्हा बंद होईल तेव्हा सामाजिक प्रगतीचे आणि व्यक्तीस्वातंत्र्याचे एक मोठे पाऊल आपण पुढे टाकलेले असेल.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 06/08/2017 - 15:31 नवीन
तसेच प्रत्येक ठिकाणाचा एक ड्रेस कोड असतो आणि तो असलाच पाहिजे. स्वतःच्या लग्नाला कुणी असा ड्रेस घालून बोहल्यावर चढत नाही.अगदी प्रगतीशील देशातही लग्नाच्या वेळी वधू तो प्रघात सांभाळतेच.वरांना पण हाच नियम आपण पाळतो. उद्या सन्नी ताई लियोनीने जरी लग्न केले तरी ती पण ही प्रथा सांभाळेलच. शिवाय ड्रेसचे स्वातंत्र्य हा एक वेगळा विषय आहे.तो बर्‍यापैकी स्थळ-काळ आणि संपत्ती ह्यावर अवलंबून असतो. उद्या जर भरपूर पगार देणार्‍या कंपनींनी स्त्रीयांनी नऊवारीत आणि पुरुषांनी धोतर पगडी घालून येण्याचा नियम केला तर, किती जण त्याला विरोध करतील? असो, व्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबतीत आपण सगळेच स्वार्थी आहोत.मी तर आहेच.उद्या जर साहेब म्हणाला की धोतर घालून या तर मी धोतर घालीन आणि उद्या जर तो म्हणाला अर्ध्या चड्डीवर या, तर मी नक्कीच जाईन. "पापी पेट का सवाल है भाई."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
द
दशानन गुरुवार, 06/08/2017 - 15:37 नवीन
पर्यंतचा प्रतिसाद पटला नाही आणि नंतरचा देखील भावला नाही. काय वाईट आहे हो त्या स्त्रीच्या ड्रेसमध्ये?
स्वतःच्या लग्नाला कुणी असा ड्रेस घालून बोहल्यावर चढत नाही
हा लग्नाचा फोटो आहे का? मला वाटलं होते वाट'पौर्णिमेचा आहे ;) "सन्नी ताई लियोनी" हाच तो पुरुषी अहंकार! बसा कुरवाळत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
उ
उगा काहितरीच गुरुवार, 06/08/2017 - 15:48 नवीन
आमच्या हापीसात जातो आम्ही अर्ध्या चड्डीत. पुण्यात , MNC मध्ये ! (अधिक माहीती इथे मिळणार नाही. हवी असल्यास व्यनि करा )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
आ
आदूबाळ गुरुवार, 06/08/2017 - 15:54 नवीन
च्यायला आम्हीपण पुण्यात, MNC मध्ये अर्ध्या चड्डीत जायचो. बाहेरून फक्त पूर्ण चड्डी घालायचो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
ए
एमी Fri, 06/09/2017 - 06:06 नवीन
अर्धी चड्डी नक्की कशी दिसत असेल विचार करतेय ^_^ जी की सी स्ट्रिंग सारखे काही प्रकरण असणार बहुतेक :-P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आदूबाळ Fri, 06/09/2017 - 06:29 नवीन
आमचा "साध्या माणसांचा एल्गार" हो... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
अ
अभ्या.. Fri, 06/09/2017 - 06:36 नवीन
अरेवा, एलगार माहिते व्है. आम्हाला उगिच आम्ही निर्माण केलेला शब्द वाटायचा ;) बादवे पूर्ण चड्डी म्हणजे अर्ध विजार ना? मांड्या, गुडघे, नडगी, घोटा अशी क्वार्टरची मापे ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
ए
एमी Fri, 06/09/2017 - 17:10 नवीन
मला नाई माहिती एलगार मंजे काय ते. मला सांगा. मी simple man elgar गुगलून पाहिलं =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
आ
आदूबाळ Fri, 06/09/2017 - 17:34 नवीन
साध्याच माणसांचा एल्गार येत आहे हा थोर गांडुळांचा भोंदू जमाव नाही! - सुरेश भट एल्गार = जिवावर उदार होऊन केलेला हल्ला (किंवा बंड)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
अ
अभ्या.. Fri, 06/09/2017 - 17:58 नवीन
=)) . =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
ए
एमी Sat, 06/10/2017 - 02:22 नवीन
ह्म्म्म. आभारी आहे. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आनन्दा Fri, 06/09/2017 - 12:03 नवीन
सुप्परम्यान सुप्परम्यान सुप्परम्यान वरतुन चड्डी, आतून प्यॅण्ण्ण्ट..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
व
विकास... Wed, 07/19/2017 - 00:28 नवीन
अर्धी चड्डी काय घालून गेला म्हणू सांगताय, बिना चड्डी जाव लागत होत राव, फक्त MNC ला पोहोचल्यावर चड्डी आणि पॅन्ट घालायचो . . . तोपर्यंत फक्त रेनकोट (पुण्याचा पाऊस आणि night शिफ्ट)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
उ
उपयोजक गुरुवार, 06/08/2017 - 15:55 नवीन
लकी आहात. हवा तो पोषाख घालून MNC त!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
म
मुक्त विहारि गुरुवार, 06/08/2017 - 16:41 नवीन
"उद्या जर भरपूर पगार देणार्‍या कंपनींनी स्त्रीयांनी नऊवारीत आणि पुरुषांनी धोतर पगडी घालून येण्याचा नियम केला तर, किती जण त्याला विरोध करतील?" हे वाक्य नीट वाचले आहे का? आज तुम्ही कुठल्याही ड्रेसमध्ये जा....पण....... उद्या जर तुमच्या कंपनीने धोतराचा ड्रेसकोड केला तर तुम्ही "आज पर्यंत तर अर्ध्या चड्डीत येत होतो.मग उद्या पासून कशाला हे झंझट? ही आमच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आहे.असे म्हणून नौकरी सोडणार का?" ज्याला नौकरीची गरज नाही आणि ज्याला प्रचंड माज आहे, अशा व्यक्ती सोडून.....असे सामान्यतः कुणीही करणार नाही आणि करत पण नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
उ
उगा काहितरीच Sat, 06/10/2017 - 09:36 नवीन
नाही बा अज्जीब्बात सोडणार नाही नोकरी. धोतर तर धोतर . ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
उ
उपयोजक गुरुवार, 06/08/2017 - 16:11 नवीन
हा पोषाख पारंपारिक नाही.तो पंजाबी ड्रेस किंवा सलवार कुर्ता असा साडीपेक्षा वेगळा पण अंगभर असाही नाही.सणाच्या दिवशी शक्यतो सांस्कृतिक पोषाख करण्याचा प्रघात आहे.तो धुडकावून लावण्याचं कारण काय? साडी,पंजाबी ड्रेस,सलवार कुर्ता यात मागासलेपणा आहे का?अशा अर्धवट पोशाखातून नेमकं काय सांगायचं आहे? दक्षिणेतल्या बर्‍याचशा देवळांमधे स्त्रियांनी भारतीय वेषातच आलं पाहिजे असा नियम आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
प
पुंबा Fri, 06/09/2017 - 06:51 नवीन
++++१११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 06/08/2017 - 16:00 नवीन
"स्त्री हीच स्त्रीचा खरा शत्रु असतो" ही म्हण तुम्हा सगळ्यांनीच अगदी खोटी ठरविली भावड्यांनो ! व्रत स्त्रीयांचे, कपडे एका स्त्रीचे आणि मग चर्चेत सहभाग कुणाचा तर पुरुषांचा ? असं नका करु गड्यांनो !
  • Log in or register to post comments
द
दशानन गुरुवार, 06/08/2017 - 16:04 नवीन
असं नका करु गड्यांनो ! व्याकरण/ शब्दरचना चुकीची आहे. योग्य असे आहे... "असं नका 'न' करु गड्यांनो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
स
संजय पाटिल गुरुवार, 06/08/2017 - 17:12 नवीन
त्यापेक्षा हे कसं वाटतंय बघा.... असं नका करू ना गड्यांनो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
प
पिलीयन रायडर गुरुवार, 06/08/2017 - 18:06 नवीन
तुम्ही न स्वीकारणारे कोण? चर्चा करणारे तरी कोण? समजा चुकुन लावलाच निकाल तुम्ही ह्या चर्चेतुन, तरी त्याचं करणार काय? ती बाई ना तुम्हाला बांधील आहे, ना कोणता ड्रेसकोड असणार्‍या कंपनीला, ना भारतीय संस्कृतीला (ज्यात अमुकच कपडे घाला किंवा घालु नका असं कुठेही लिहीलेलं नाही)... मग ज्यात आपल्या म्हणण्याला कवडीचीही किंमत नाही, तिथे बोलायचं कशाला? तुम्ही उगाच लोड घेताय.
  • Log in or register to post comments
ए
एकुलता एक डॉन गुरुवार, 06/08/2017 - 19:55 नवीन
ती वडाला बांधील आहे ( उगाच पांचट)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
न
नावातकायआहे Fri, 06/09/2017 - 01:29 नवीन
:-)) आवडल्या गेला आहे!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकुलता एक डॉन
स
संजय क्षीरसागर Fri, 06/09/2017 - 07:25 नवीन
तुम्ही न स्वीकारणारे कोण? चर्चा करणारे तरी कोण? हे लेखकाला माहिती नाही असं वाटतंय का ? त्यांना फक्त फोटो टाकण्यात इंटरेस्ट होता पण तो नुसता टाकता आला नसता म्हणून त्याला चर्चेचं रुप दिलंय :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
इ
इष्टुर फाकडा Tue, 06/13/2017 - 22:04 नवीन
माफ करा पिरा, तसं असेल तर मिपावर केलेल्या कुठल्याच चर्चेचे अधिकारी कोण? आणि कोणत्या चर्चेने Existential फरक झालेला आहे? माझे दोन पैसे इतकेच आहेत कि, त्या काकूंच्या अर्ध्या चड्डीनेच त्यांचं व्यक्तिस्वातंत्र्य अभिव्यक्त झालं आणि त्याजागी जर त्या सावित्री ड्रेस मध्ये गेल्या असत्या तर ते झालं नसतं असे दोन्ही विचार बऱ्याच गोष्टी गृहीत धरून झाले आहेत. त्या काकूंची श्रद्धा पूर्ण असेलही पण मला त्यांची कृती बाहेरून अर्धवट वाटते. पण ते तांदळातल्या खड्याएवढच खटकतं. उद्या अस्सल मराठी लग्नात कुठल्या वधूने कॅथलिक वधूसारखा फटफटीत पोशाख केला तर जसं वाटेल तसंच (पुरुषांचा पोशाख पूर्वीच आंग्लाळलेला आहेच) या फोटोकडे बघून वाटतं. तरीही, एका घासत खडा आला तर आपण पूर्ण ताट उलथून लावणार नाही तद्वतच या एका काकूंचा पोशाख त्यांच्या 'पोषाखाच्या निवडीतील तऱ्हेवाईकपणा' इतपतच ठेवू. याला व्यक्तिस्वातंत्र्य किंवा बंडखोरपणा हि दोन्ही लेबले लावायला नकोतच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
क
कुलदादा गुरुवार, 06/08/2017 - 18:14 नवीन
तुका म्हने उगि रहावे जे जे मिलेल ते घालावे इतरान्नि नीट बघावे भरूनि डोळे!
  • Log in or register to post comments
अ
अत्रे Fri, 06/09/2017 - 02:53 नवीन
आपण असे बदल स्विकारावेत का?
स्वीकारायचं म्हणजे नेमकं काय करायचं? आणि आपण स्वीकारलं / नाही स्वीकारलं तर कोणाला काय फरक पडतो?
  • Log in or register to post comments
म
मितान Fri, 06/09/2017 - 04:27 नवीन
झालं का इथलं ? चला पुढचा धागा - कलकत्ता विमानतळा वर अर्धनग्न होऊन संध्या करणारे गृहस्थ !
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Fri, 06/09/2017 - 05:07 नवीन
इथलं झालं की नाही हे माहिती नाही. मात्र तिकडे चालू झालं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान
ए
एकुलता एक डॉन Fri, 06/09/2017 - 08:40 नवीन
इकडे पण http://indiatoday.intoday.in/story/priyanka-chopra-narendra-modi-berlin-dress-facebook-twitter/1/967161.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
अ
अत्रे Fri, 06/09/2017 - 04:49 नवीन
आत्ताच एक विकी लेख वाचला. तो इथे लागू होतो असे वाटते. मॉरल पॅनिक https://en.wikipedia.org/wiki/Moral_panic
A moral panic is a feeling of fear spread among a large number of people that some evil threatens the well-being of society
Moral panics have several distinct features. According to Goode and Ben-Yehuda, moral panic consists of the following characteristics: Concern – There must be the belief that the behaviour of the group or activity deemed deviant is likely to have a negative effect on society
मिपावर "मॉरल पॅनिक" या कॅटेगरी मध्ये येणारा अजून एक लेख आठवला दिल दोस्ती डिकन्स्ट्रक्शन http://www.misalpav.com/node/39053 अजून कोणते लेख मॉरल पॅनिक कॅटेगरी मध्ये येतील असे तुम्हाला वाटते?
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा