स्विकारावं का हे?
सदर फोटो फेबुच्या कृपेने मिळाला आहे.फोटो पाहिल्यावर आधी लक्ष जातं ते टी शर्ट आणि शॉर्टस् घालून वडाची पुजा करणार्या या स्त्री कडे! कदाचित ती कोणासोबत मदतीसाठीही आलेली असू शकते;पण समजा ती याच पोषाखात पुजेसाठी आली असेल तर?
आपण असे बदल स्विकारावेत का?
स्विकारावेत असं वाटत असेल तर का स्विकारावेत?
स्विकारु नयेत असं वाटत असेल तर का स्विकारु नयेत?
की वेळ लागेल असे बदल स्विकारायला?
अनेक कंपन्यांमधे फॉर्मल पोषाखात न घालता कर्मचारी आल्यास तो कामाबाबत गंभीर नाही असं समजलं जातं
पंचताराकीत हॉटेल्समधे स्त्रीयांनी नऊवारी नेसून गेल्यास ड्रेसकोडचं कारण सांगून प्रवेश नाकारला जातो.
काय वाटतं तुम्हाला?झडू द्या चर्चा!!
झडू द्या चर्चा!!पगार किती बोला आधी!असं नका करु गड्यांनो !व्याकरण/ शब्दरचना चुकीची आहे. योग्य असे आहे... "असं नका 'न' करु गड्यांनो !तुम्ही न स्वीकारणारे कोण? चर्चा करणारे तरी कोण?हे लेखकाला माहिती नाही असं वाटतंय का ? त्यांना फक्त फोटो टाकण्यात इंटरेस्ट होता पण तो नुसता टाकता आला नसता म्हणून त्याला चर्चेचं रुप दिलंय :)