Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

स्विकारावं का हे?

उ
उपयोजक
गुरुवार, 06/08/2017 - 12:31
🗣 107 प्रतिसाद
Vadpujan सदर फोटो फेबुच्या कृपेने मिळाला आहे.फोटो पाहिल्यावर आधी लक्ष जातं ते टी शर्ट आणि शॉर्टस् घालून वडाची पुजा करणार्‍या या स्त्री कडे! कदाचित ती कोणासोबत मदतीसाठीही आलेली असू शकते;पण समजा ती याच पोषाखात पुजेसाठी आली असेल तर? आपण असे बदल स्विकारावेत का? स्विकारावेत असं वाटत असेल तर का स्विकारावेत? स्विकारु नयेत असं वाटत असेल तर का स्विकारु नयेत? की वेळ लागेल असे बदल स्विकारायला? अनेक कंपन्यांमधे फॉर्मल पोषाखात न घालता कर्मचारी आल्यास तो कामाबाबत गंभीर नाही असं समजलं जातं पंचताराकीत हॉटेल्समधे स्त्रीयांनी नऊवारी नेसून गेल्यास ड्रेसकोडचं कारण सांगून प्रवेश नाकारला जातो. काय वाटतं तुम्हाला?झडू द्या चर्चा!!
वर्गीकरण
इतिहास आणि संस्कृती

प्रतिक्रिया द्या
25935 वाचन

💬 प्रतिसाद (107)
र
रातराणी Mon, 06/12/2017 - 08:51 नवीन
इथे अज्जून चर्चा चालू आहे? =)) काय स्टॅमिनाये! (संदर्भ : गेला माधव कुणीकडेमधला प्रशांत दामले )
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 06/12/2017 - 14:06 नवीन
हो मग.... रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी अन फावल्या वेळात मुवि प्रतिसाद्/लेख टाकी.... (आम्ही फक्त आमच्याबद्दल लिहू शकतो.) उद्या कुणी जर टिंबक्टूच्या एखाद्या जमीनदाराच्या १४व्या कुत्र्याच्या शेपटीवरील केसात आणि ३-१३ ग्रहावरील पंचपेशीय प्राण्याच्या शेपटीवरील केसात साम्य कसे? असा जरी प्रबंध टंकला तरी आम्ही एक तरी प्रतिसाद देवूच. ५-६ महिने, कळफलका शिवाय काढून दाखवा, म्हणजे कळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी
द
दा विन्ची Mon, 06/12/2017 - 18:30 नवीन
मुक्तविहारीजी आपण आपल्या लेखनामुळे मला आदरणीय आहात . परंतु आपण एखाद्या जातीची अशी हेटाळणी करणे पटले नाही. आपल्याकडे वेळ असेल तर कितीही लेख टाका, प्रतिसाद टाका, वट्ट प्रॉब्लेम इल्ले. पण जातीवाचक उल्लेख नको.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 06/12/2017 - 18:40 नवीन
तशीच बाजारात नाही तुरी अन भट भटणीला मारी... ही पण असो,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दा विन्ची
म
मुक्त विहारि Mon, 06/12/2017 - 18:36 नवीन
१००
  • Log in or register to post comments
स
साहना Mon, 06/12/2017 - 21:57 नवीन
स्वीकार-अस्वीकार करणारे आपण कोण ? आणि चड्डी मध्ये इतके वाईट असे काय आहे ? Image removed.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 06/13/2017 - 14:48 नवीन
mayu4u
... दोन्ही प्रचंड comfortable असतं असं स्वानुभवावरून सांगतो.
अहो, मग हाताने फिरवा की पंखा. विजेवर चालवायची गरज काय? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा