Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आयटी कंपन्यांची मग्रुरी

ए
एकुलता एक डॉन
गुरुवार, 06/15/2017 - 18:11
🗣 111 प्रतिसाद
तसे आयटी वर भरपूर धागे आहेत पण हा धागा प्रासंगिक आहे एक महिन्या आधी विप्रो वगैरे कंपन्या ५६००० हुन जास्त लोकांना काढणार http://www.livemint.com/Industry/4CXsLIIZXf8uVQLs6uFQvK/Top-7-IT-firms-including-Infosys-Wipro-to-lay-off-at-least.हटमळ आज मात्र नवीन कंपन्या विकत घेत आहेत http://www.wipro.com/newsroom/press-releases/Wipro-to-acquire-Appirio-A-global-cloud-services-company/ कायदेशीर दृष्ट्या ,अर्थ शाश्त्र दृष्ट्या चालत असले तरी हा प्रकार दुभती गाय दूध काढून कत्तल खाण्याकडे टाकायची व पोपट पाळायचा असे नाही वाटत ?

प्रतिक्रिया द्या
42495 वाचन

💬 प्रतिसाद (111)
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 06/17/2017 - 21:27 नवीन
लेबर कमिशन आता काय म्हणते आहे त्यापेक्षा शेवटचा निकाल नक्की काय येतो, हे पाहणे मनोरंजक असेल ! (इंडिया जैसे बडे देश मे ऐसी बहुत छोटी छोटी बाते होती रहती है ;) ) मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणावर कामगार कपात करण्याचा निर्णय घेताना, इतक्या मोठ्या कंपन्यांच्या, मोठमोठ्या कायदेशीर सल्लागारांनी (लीगल डिपार्टमेट + जानेमाने एक्स्टर्नल लीगल अ‍ॅडव्हायझर्स) काहीच विचार केला नसेल असे समजणे धाडसाचे वाटते आहे. अर्थात, वर लिहिल्याप्रमाणे कंपनीचा खमकेपणा आणि कंपनीचे सरकारवरचे अवलंबित्व हे वास्तवातले मुद्दे लागू आहेतच :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकुलता एक डॉन
अ
अप्पा जोगळेकर Mon, 06/19/2017 - 14:29 नवीन
आस्थापना कोणतेही कारण न देता नोकरीतून कमी करु शकते असा आशयाचे कागदपत्र सही करुन घेतात. काही होत नाही. उगाच कामगार कायद्याच्या मागे लागण्यापेक्षा नविन नोकरी किंवा पर्यायी उत्पन्न शोधणे अशिक श्रेयस्कर असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
सुबोध खरे Wed, 06/21/2017 - 06:40 नवीन
labour commision नुसार layoff बेकायदा आहे पहिली गोष्ट लेबर म्हणजे कामगार अशिक्षित किंवा अर्धशिक्षित. इंजिनियर (डिग्री किंवा डिप्लोमा) हा कामगार या व्याख्येत बसत नाही तर अधिकारी या व्याख्येत बसतो तेंव्हा लेबर कमिशनरच्या अखत्यारीत हि गोष्ट येत नाही.तुमच्या इंजिनियर लोकांना कामगार विमा योजना लागू होते काय? (ती तशी नसेल तर ते कामगार नाहीत सरकारी व्याख्येप्रमाणे) त्यांनी केवळ सरकार काहीतरी करत आहे हे दाखवण्यासाठी केलेला हा एक दिखाऊ उपाय आहे. त्यावर खुश होण्यात काहीच फायदा नाही. शिवाय असिस्टंट लेबर कमिशनरला कुत्रं हि विचारत नाही. त्याने नोटीस दिली तर एक कंपनीचा अधिकारी त्याला उत्तर देतो ते सुद्धा कामगारांबाबत असेल तर अन्यथा त्याने पाठवलेल्या नोटिशीला केराची टोपली दाखविली जाते.आजकाल कायदे हे कामगाराभिमुख राहिलेले नाहीत विशेषतः खाजगी क्षेत्रात. सरकारी नोकरी असेल तर गोष्ट वेगळी. ( माझे वडील लेबर लॉ ची प्रॅक्टिस करत होते आणि कामगार विषयात अनेक वर्षे काम केले आहे त्यांच्याशी केलेल्या वार्तालापाचा हा सारांश आहे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकुलता एक डॉन
अ
अनुप ढेरे Wed, 06/21/2017 - 07:25 नवीन
आयटी कमगार व्हाईट कॉलर असतात. त्यांना कायद्याने युनियन फॉर्म करता येत नाही. तमिळनाडुने गेल्या वर्षी आयटीवाल्यांना युनिअन बनवता येईल असा कायद्यात बदल करू असं आश्वासन दिलेलं. त्याचं पुढं काय झालं नाही माहिती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ए
एकुलता एक डॉन Sat, 06/17/2017 - 22:56 नवीन
सध्या social मीडिया मध्ये खूप चर्चा होत आहे ,माझे दुर्दव्य MNC मध्ये असायला पाहिजे होते
  • Log in or register to post comments
च
चिकित्सक Sun, 06/18/2017 - 10:49 नवीन
विप्रो आणि तत्सम अन्य सॉफ्टवेर सर्विस बेस्ड कंपनीज़ ला अनेक वर्ष कामात असल्या मुळे मला जे वाटत ते शेयर करतोय , १. रोबोटीक प्रोसेस औटोमेशन मुळे रिपिटिटिव वर्क दिवसेंदिवस कमी होत जाणार , त्या मुळे सर्विस ऑपरेशन्स किवा प्रोडक्षन सपोर्ट च्या ओपनिंग्स कमी होत होत नाहीसे होणार २. कंपनीज़ चे मार्जिन कमीत होत आहे , आजकाल प्रत्येक कंपनीज़ चे स्वतंत्र आईटी डिपार्टमेण्ट असत , क्रीम वर्क ते स्वत: जवळ ठेवतात आणि रिपिटिटिव आणि त्यातल्या त्यात नको असलेल काम टीसीएस विप्रो सारख्या वेंडरना देण्यात येत ३. कॅप्टिव कंपनी चे आईटी मॅनेजर हे आपल्याच रिपोर्टीस ना फटकून वागवतात पण वेंडर्स वर ह्यांच्या फार विश्वास असतो , पुढे हेच वेंडर कधी डेलिवरी खराब करतात किवा ह्यांच्या मुळे एस्कलेशन होत , बहुधा वेंडेर्स ह्या क्लाइंट मॅनेजर्स ना त्यांना बिज़्नेस देण्या साठी अप्रोच करतात | ४. सॉफ्टवेर सर्वीसज़ आणि वेंडर्स नि बेंच बराच कमी केला , आजकाल त्यांना ह्व्या असलेल्या स्किल्स चा माणूस बिनधास्त थर्ड पार्टी कांट्रॅक्ट वर घेतात ह्याचे क्लाइंट , वेंडर आणि कॉंट्रॅक्टर ला फायदा होतो , पण ह्या मुळे पार्मानॅंट ओपनिंग्स कमीच निघतात | ५. स्वत: ला रिस्कील करणे म्हणण्या इतक सोप नसत , समजा तुमची टेक्नॉलॉजी डॉट नेट किवा जावा आहे आणि तुम्ही सॅॅप चा कोर्स करण्याच ठरवल तर त्याचे ट्रेनिंग सुद्धा फार महाग आहे आणि कंपन्या त्यांना हवे असलेल्या स्किल सेट वरच तुम्हाला ट्रेनिंग देणार , मग कुठल्या ईटीएल वाल्या डिव्लपर ला कोबॉल किंवा मेन-फ्रेम सारख्या जुनाट टेक्नालजी वर ट्रेन करायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही , तुम्हाला पायथॉन , हदूप शिकायचे असेल किवा तसल्या प्रॉजेक्ट वर काम हवे असेल त्या साठी सुद्धा तुम्हाला शब्द टाकावा लागतो , नव्या टेक्नॉलॉजी चे ट्रेनिंग असेल तर पहिल्यांदा मॅनेजर च्या फेवरेट लोकांचा नंबर लागतो| ६. आईटी मध्ये रीसॉरसिंग आणि वर्कफोर्स मॅनेज्मेंट नावाचा काही हरामखोर लोकांचा ग्रूप असतो ज्यात विशेषत: असे लोक असतात ज्यांच्या टेक्निकल अनुभव काही नसतो , कुठल्या प्रॉजेक्ट मधून डिमांड आली आणि त्यास पूर्ण करायला कुठला ही रीसोर्स त्याचे स्पेशलिज़ेशन किंवा स्किल सेट न बघता अलोकेत करतात , फ्रेशर्स ना त्रास देतात आणि अनुभवी माणसा ला चक्क कोलकाता , चेन्नई ला जाण्यास भाग पाडतात ७. अन्य सेक्टर्स च्या कंपनीज़ सारखेच इथे सुद्धा पॉलिटिक्स आहे शिवाय रीजनलिज़म तर खूपच दिल्ली , कनपुरिये , लखनावीए , जयपूरिये ह्या लोकांचा एक ग्रूप असतो तर बांगला-बिहारी लोकांचा दुसरा , ओरिया लोकांचा एक तर गल्ट-हैदराबादी आणि तामिलियन्स चा वेगळा , ही लोक स्वत: च्या लोकांना खूप फेवर करतात , कुठल्याश्या फालतू कामा बाबत त्याना अवॉर्ड साठी तर कधी प्रमोशन साठी नॉमिनेट करतात ह्या उलट आपले मराठी लोक हे एकदुसर्या वर कुरघोडी करतात आणि कोवापरेट क्वचित करतात | ८. विप्रो इंफॉस्यस किवा टीसीएस चा काळ सॉफ्टवेर सर्वीसज़ कडे जास्त आहे स्वत: चे प्रॉडक्ट डेवेलपमेंट वर त्यानी हव तेवढ लक्ष दिले नाही , नाही म्हणायला इन्फोसिस चे फिनॅकल नावाचे प्रॉडक्ट आहे पण ते तेवढ्या पुरताच , कंपन्या आपले उत्पन्न बॉडी शॉपिंग किवा सपोर्ट वले प्रॉजेक्ट करून कमावतात आणि वर सांगितल्याप्रमाणे तश्या ऑपर्चुनिटीस कंपन्या ना कमी मिळणार नारायण मूर्ती , शिव नादर किवा अझिम प्रेमजी असोत ह्यांचे पोटे भरल्या मुळे मग लोकांना फिलोसॉफि झाडतात कि मिडील लेवेल मॅनेज्मेंट कशी वाया गेलेली आहे आणि लोक कसे स्वत: ला अपडेट करत नाहीत , आणि ह्यांनी स्व खुषीने . पगारात कपात करावी म्हणून , पॅयन ही लोक आपल्या शेयर चा कमी भाव स्वीकारणार नाहीत , जेव्हा जेव्हा भाव चढले तेव्हा आपला हिस्सा विकून ह्या लोकांनी . . . जबर पैसा कमावले सुद्धा , बोर्ड मेंबर्ज़ नि सुद्धा त्या फाउंडर मेंबेर्सना आपले शेयर्स विकून बाहेर पडायला सुचवले आहे त्या कडे हे लोक जाणीव पणे दुर्लक्ष करतात |
  • Log in or register to post comments
ए
एकुलता एक डॉन Sun, 06/18/2017 - 21:58 नवीन
तुम्ही कॅपजेमिनी ला आहात ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिकित्सक
च
चिकित्सक Wed, 06/21/2017 - 05:54 नवीन
फार पुर्वी म्हणजे २००६ साली कॅनबे ला होतो पुढे तिला कॅपजी ने टेक ओवर केल त्या नंतर बर्‍याच स्विच केल्या , सध्या एका योरोपियन इनवेस्टमेंट बॅंक च्या आईटी सर्विस डिविषन ला कामाला आहे |
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकुलता एक डॉन
द
दीपक११७७ Mon, 06/19/2017 - 11:05 नवीन
टेक महिन्द्रा... बद्दल काही सांगुशकाल! धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिकित्सक
अ
अप्पा जोगळेकर Mon, 06/19/2017 - 14:36 नवीन
सगळे काही ऑटोमेट होणार आणि एकदम नोकर्‍या कमी होणार हा एक बागुलबुवा आहे. सगळे ऑटोमेट व्हायला २०५० साल उजाडेल आणि तोवर आत्ता जे नविन आले आहे ते पुन्हा जुने झाले असेल. दरवर्षी तंत्रज्ञान बदलते वगैरे म्हणणे सोपे आहे. प्रत्यक्षात २००५ सालचे तंत्रज्ञान आजही वापरले जात आहे. आत्ता जे नविन येत आहे किंवा आले आहे ते सर्विस बेस्ड कंपन्यांमधे कदाचित २०२५ पर्यांत सुद्धा वापरले जाईल. दरवर्षी नविन तंत्रज्ञान आले तरी ते दरवर्षी विकत घेणे परवडत नाही. टप्प्याटप्प्याने बदलावे लागतेच हे खरे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिकित्सक
फ
फारएन्ड Mon, 06/19/2017 - 17:02 नवीन
एकदम नोकर्‍या कमी होणार हे जरी खरे नसले, तरी २०५० इतके ते लांब नाही. अनेक क्षेत्रात पुढच्या ४-५ वर्षांत सुद्धा व्यक्तीऐवजी सॉफ्टवेअर ते काम करेल, किंवा डिझाइन्/आर्किटेक्चर असे बनवले जाईल की इतक्या लोकांची गरज नसेल. त्यातून नोकर्‍या कमी होतीला? हे इतके क्लिअर नाही. होपफुली सध्याच्या कौशल्या ऐवजी दुसर्‍या नवीन कौशल्याचे लोक लागतील. वरती रोबॉटिक्स/ऑटोमेशन चा उल्लेख आहे - ते सगळे वेगात येत असले, तरी सध्या सर्विस कंपन्यांच्या नोकर्‍यांची गरज कमी होण्याचे कारण ते नाही. ऑटोमेशन येउ घातलेली कामे व या कंपन्या करतात ती कामे यात अजूनतरी फारसा ओव्हरलॅप नाही. पुढचे माहीत नाही. प्रॉडक्शन सपोर्ट वगैरे गोष्टी कस्टमर्स आपल्या सिस्टीम्स क्लाउड बेस्ड - अ‍ॅमेझॉन किंवा मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्यांकडे देत असल्याने मूळ स्वतःच्या कंपनीत विकत घेतलेले हार्डवेअर, त्यावर बनवलेल्या सिस्टीम्स, त्यांचे बॅक अप्स व इतर तत्सम कामे करायला आधी जितके लोक लागत तितके आता लागत नाहीत. पण हा "क्लाउड" चा परिणाम आहे. अजून रोबॉटिक्स्/ऑटोमेशन चा तितका नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
च
चिकित्सक Wed, 06/21/2017 - 06:42 नवीन
तस नाहीए , रोबोटीक प्रोसेस अटोमेशन ची अवदसा खरी आहे आणि ह्या बाबतीत काळजी करण्या सारखे आहे कारण डेली ऑपरेशन्स /सपोर्ट मेंटेनेन्स साठी जी काही आईटी रिसोर्सस ची टीम बीलिंग घ्यायची , ते काम खरच ऑटोमेट होणार उदाहरणार्थ जे हेल्थ चेक इवेंट आणि आलएर्ट मॉनिटरिंग आणि मिटिगेशन आक्षन , रिपोर्ट प्रेपरेशन , स्टेटस अपडेट , टिकेटिंग ची काम करायला स्वतंत्र लोक नेमले जायचे ते एका झटक्यात होणार , अर्थात सुरुवाती ला बर्‍याच ट्यूनिंग करव्यला लागतील पण एकदा सेटअप झाल कि ते मॉडेल ऑपरेट करायला फार सोप जाणार १० लोकांचे काम औटोमेशन नि सहज शक्य होईल , ह्या औटोमेशन टूल करिता दोन तीन रिसोर्सस कंपन्या नेमतील | डेव ऑप्स , एजाईल मुळे डेप्लाय्मेंट टीम च्या पोटा वर जणू लातच पडली आहे , प्रॉडक्षण , डेव एसआयटी क्यु / युएटी एन्वाइरन्मेंट बिल्ड ऑपरेट आणि मेनटेन करण प्रचंड खर्चिक असत , मिडियम किवा स्माल बिज़्नेस ना ते शक्य नसत , सॉफ्टवेर लाइसेन्स आणि इतर किचकट गोष्टी असतात त्या मुळे ह्यांच्या साठी क्लाउड किंवा शेर्ड इनफ्रास्ट्रक्चर सर्विस असतात , ते सुद्धा औटोमेट होतय | पुर्वी इनहाउस डेवेलपमेंट व्हयायच किंवा वेंडर ला प्रॉजेक्ट डेवलप , टेस्ट आणि डिप्लाय , सपोर्ट करायला दिला जायचा साधारण ४० ते १२० लोक ह्या कामा साठी ठेवले जायचे आता टूल बेस्ड डेवेलपमेंट आल , टूल बेस्ड टेस्टिंग आल जॉब शेड्युलर टूल आणि अप्लिकेशन मॉनिटरिंग सिस्टम सुद्धा आलेत आणखी काय हव ? राहता राहील कॉनफिगरेशन जे कि मॅन्यूयल आहे , पण ती वन टाइम प्रोसेस असते त्या साठी फूल पगारी कामगार ठेवण ह्या कंपनीज़ ना परवडत नाहीत त्या साठीच त्यांनी बेंच संपवला , आजकाल कांट्रॅक्ट टू हायर प्रकार सर्रास चालतात कारण कंपनीज़ चा भर क्वालिटी ला कमी प्राइयारिटी देऊन कमी वेळेत काम संपवण्या कडे भर असतो |
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
च
चिनार Wed, 06/21/2017 - 08:56 नवीन
६. आईटी मध्ये रीसॉरसिंग आणि वर्कफोर्स मॅनेज्मेंट नावाचा काही हरामखोर लोकांचा ग्रूप असतो ज्यात विशेषत: असे लोक असतात ज्यांच्या टेक्निकल अनुभव काही नसतो , कुठल्या प्रॉजेक्ट मधून डिमांड आली आणि त्यास पूर्ण करायला कुठला ही रीसोर्स त्याचे स्पेशलिज़ेशन किंवा स्किल सेट न बघता अलोकेत करतात , फ्रेशर्स ना त्रास देतात आणि अनुभवी माणसा ला चक्क कोलकाता , चेन्नई ला जाण्यास भाग पाडतात
या वाक्याला सहमत. मोठा भाऊ एका बड्या आय टी कंपनीत होता. त्याच्या कंपनीतला एक अलोकेशन मॅनेजर ह्या गोष्टीला वैतागून सोडून गेला. त्याच्या गुड बाय मेल मध्ये पुढील वाक्य होतं, Freshers and 2-3 years experienced resources are used like toilet papers in this company !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिकित्सक
र
राघवेंद्र Mon, 06/19/2017 - 16:00 नवीन
माझे २ पैसे, मलाही जास्त अनुभव नाही आहे पण थोडी आकडेमोड. भारतात जे मुख्यत्वे काम येते ते $२० ते $२५ प्रति तास या दराने म्हणजे वर्षाचे २००० तासाचे $४०,०००. याचे भारतीय रुपयात २६ लाख ४० हजार. यातील ५०% जरी काम करण्याला द्यायचे म्हणले तरी १३ लाख रुपये होतात. म्हणजे वर्षाचा पगार १३ लाखाच्या पुढे गेला म्हणजे ती व्यक्ती कंपनीला नुकसानीची आहे. मार्केट मध्ये स्पर्धा खूप आहे त्यामुळे नफा खूप कमी होत आहे. यात आपले काम niche (स्पेशल ) स्किल असेल तरच मार्केट मध्ये राहू शकतो.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 06/19/2017 - 17:25 नवीन
एवढी माहिती दिली आहेत, बाकी ओव्हरहेड्स बद्दल सुद्धा माहिती द्यावी म्हणजे व्यवसायाचे स्वरुप अधिक नेमकेपणाने स्पष्ट होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघवेंद्र
र
राघवेंद्र Mon, 06/19/2017 - 18:33 नवीन
आय टी सर्विसेस मध्ये दोन प्रकारचे लोक असतात. १. Billable - ज्यांचे कामाचे तास client ने मान्य करून त्या कामाच्या तासाच्या बदल्यात रक्क्म मिळते. Fixed Price कामामध्ये पण 'क्ष ' लोकांच्या कामाचा मोबदला असे billing मान्य झाले असते. थोडक्यात आय टी मध्ये जेवढे Billable तेवढे उत्पन्न. २. Non - Billable - यात उरलेले सर्व जण म्हणजे CEO पासून ते सेक्युरिटी गार्ड पर्यंत तसेच कंपनीच्या शेअर होल्डर सुद्धा. आजकाल काही प्रमाणात IT मॅनेजर हा सुद्धा Non - Billable असतो. यामुळे HR लवकरात लवकर प्रत्येकाला Billable करण्याच्या बदल्यात स्किल-सेट कडे फार न बघता प्रोजेक्ट देतात. आधी नवीन कोड लिहावे लागत होते पण आता automated tools मुले खूप नवीन काम फक्त configuration होते त्यामुळे development टीम लहान आणि त्यामुळे टेस्टिंग टीम पण लहान होत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
मुक्त विहारि Tue, 06/20/2017 - 07:28 नवीन
ही "अमेरिकन पद्धत" आहे का? कारण वकीलांच्या फर्म मध्ये पण असेच असते ना?........ माहितीचा स्त्रोत जॉन ग्रिशॅम ह्यांच्या कादंबर्‍या. मुलाला योग्य ते इंजिनियरिंगचे शिक्षण देण्यापुर्वी, श्री.अच्युत गोडबोले, ह्यांच्याशी चर्चा केली होती. त्यांनी जे सांगीतले त्यात पण "आय.टी. क्षेत्र हे सेवा-भावी किंवा सेवा देणारे क्षेत्र आहे. जो अद्ययावत सेवा, तत्परतेने आणि कमी पैशात देईल, तोच टिकेल." ह्या वाक्याचाही समावेश होता. आज ६=७ वर्षांनी, त्यांच्या वाक्याची सत्यता पटत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघवेंद्र
ए
एकुलता एक डॉन Tue, 06/20/2017 - 16:42 नवीन
श्री.अच्युत गोडबोले, ह्यांच्या मते चांगले क्षेत्र कोणते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Tue, 06/20/2017 - 17:02 नवीन
ते मी त्यांना विचारले नाही. कारण चांगले क्षेत्र नक्की कुठले? ह्यावर पंचतंत्रात फार उत्तम कथा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकुलता एक डॉन
च
चिकित्सक Wed, 06/21/2017 - 06:59 नवीन
हिला पूर्णपणे अमेरिकन पद्धत नाही म्हणता येणार प्रॉजेक्ट बीलिंग आणि इन्वाइस च्या खूपश्या पद्धती असतात त्यायत फिक्स्ड बीड , टाइम एण्ड मटेरियल आहेत , टी एण्ड एम हे अन्य सॉफ्टवेर सर्विस कंपनीज़ नी इन्फोसिस कडून उचलल आहे |
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
श
श्रीगुरुजी Wed, 06/21/2017 - 11:47 नवीन
Fixed Price आणि Time and Material प्रमाणे Capped Time and Material नावाचा एक भयंकर बिलिंग प्रकार आहे. या प्रकारात प्रोजेक्टच्या टोटल बिलिंग ची रक्कम फिक्स्ड असते, परंतु एकूण कामाचे तास ठरलेले नसते. इन्फोसिस मध्ये असताना यूबीएस या बँकेचे काम मिळविण्यासाठी आमच्या स्वित्झर्लॅड मधील मार्केटिंगच्या माणसाने सुरवातीच्या पायलट प्रोजेक्ट साठी Capped Time and Material बिलिंग असलेले काँट्रॅक्ट केले होते. जेमतेम १२ पर्सन मंथ्सचे बिलिंग मिळणार होते. परंतु ६ माणसांनी २ महिने काम केल्यानंतर सुद्धा क्लाएंट काम देणे थांबवेना. शेवटी तब्बल ५ महिने उलटून गेले. तोपर्यंत आम्ही ३० महिन्यांचे काम केले होते, परंतु करारानुसार १२ महिन्यांचेच बिलिंग करता आले. वरीष्ठ व्यवस्थापक संतापून सर्वांना शिव्या हासडत होते. शेवटी मी स्वतः स्वित्झरलँडला जाऊन मार्केटिंगच्या माणसाबरोबर यूबीएसच्या मॅनेजरला भेटून, अक्षरशः त्याचे पाय धरून प्रोजेक्टचे काम संपवायची विनंती केली. This project is bleeding us from all directions. We're chasing a moving target. Seems there is no end to this project. या शब्दात त्याला आमची व्यथा सांगितली. शेवटी त्याने प्रोजेक्टमध्ये नवीन काम न देता पुढील काही दिवसात प्रोजेक्ट संपविण्याचे आश्वासन देऊन आमची सुटका केली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिकित्सक
च
चिकित्सक Wed, 06/21/2017 - 06:53 नवीन
हे बरचस एक्सचेंज रेट वर सुद्धा डिपेंड असत , रुपया मजबूत होतोय ह्या कारणा मुळे , सर्विस बेस्ड कंपन्याचे मार्जिन वर विपरीत प्रभाव पडलाय , ओवरसीस क्लाइंट ना भारतातल्या कंपनी ला काम देण्याहून विएतनम , फिलिपिन्स , स्पेन , बांगलादेश , श्रीलंका रश्या सारख्या देशांत काम देण परवडत् | दुसर म्हणजे १३-१४ लाख आजच्या महागाई च्या काळात काहीच नाहीत वर्षाला ५-६ लाख लोक घर गाडीचा हफ्ता भरतात वर २-३ लाख सरकार ला टॅक्स द्यावा लागतो उरल्या ३-४ लाखात इन्षुरेन्स , इनवेस्टमेंट, बायको-मुलांचे आजारपण , मुलांचे शिक्षण त्यांचेकपडे , व्ह्या पुस्तके ह्यात जातात | साधारण ३०-३२ वयाच्या आईटी प्रोफेशनल्स चा पगार त्यांचा स्किल सेट आणि एक्सपीरियन्स अनुसार १३-१४ लाख सहज असतो आणि एकदा तुम्हाला १० वर्षांच्या पुढे एक्सपीरियेन्स झाला कि नव्या ऑपर्चुनिटीस कमी होतात , तुमची प्रॉफीतीबीलेटी कमी होते |
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघवेंद्र
क
कलंत्री Wed, 06/21/2017 - 05:45 नवीन
स्वेच्छानिवृतीचा मार्ग उपलब्ध असताना कंपन्या इतका घोळ का घालतात हेच समजत नाही. गोल्डन शेकहॅड करुन कामगार आणि कंपन्या एकमेकांना रामराम करु शकतात ना?
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Wed, 06/21/2017 - 06:44 नवीन
गोल्डन शेकहॅड करुन कामगार आणि कंपन्या एकमेकांना रामराम करु शकतात ना?
हे वयाची पन्नाशी ओलांडलेल्यांना शक्य आहे. पण तिशीतल्या कर्मचार्‍यांना हे कसे शक्य आहे? कुटुंबाची जबाबदारी असते, होमलोन घेतलेले असले तर त्याचे हप्ते असतात. मग अशावेळी असा रामराम करता येणार नाही ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री
म
मुक्त विहारि Wed, 06/21/2017 - 08:23 नवीन
जितका-जितका मी पुढचा विचार किंवा पुढील आयुष्याचा विचार करतो, तितका-तितका मी स्वयंरोजगाराकडे वळत आहे. माझ्या मुलांना तरी मी एकच सल्ला दिला आहे, "एक वेळ विडी-सिगारेटची टपरी टाका किंवा वडा-पाव विका, पण गुलामगिरी कधीच करू नका.गुलामगिरी कधीचपूर्ण वेळ फायदेशीर नसते.(अर्थात ह्याला पण अपवाद आहेतच.) व्यसने आधारीत धंद्यांना कधीच मरण नसते आणि ते धंदे जमत नसतील तर, खाण्या-पिण्या आधारीत धंदे उत्तम." जाताजाता, बाजारात कितीही मंदी असू दे, राजश्री लॉटरी. बियरबार, पान-तंबाखूच्या टपर्‍या ह्यांची गिर्‍हाईके काही कमी होत नाहीत.लोकसंख्या वाढीच्या प्रमाणा पेक्षाही, ह्या व्यसनी लोकांचे प्रमाण जास्त वाढत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
व
विशुमित Wed, 06/21/2017 - 09:26 नवीन
मी स्वयंरोजगार आणि कोणत्याही कामाला/धंदा/ व्यवसायाला बिलकुल कमी लेखात नाही पण ... धंदा टिकून ठेवण्यासाठी करावी लागणारी गुलामगिरी नोकरी करण्याच्या गुलामगिरी पेक्षा खूप भयावय आहे. मोक्याच्या ठिकाणी टपरी आणि वडापावची गाडी टाकण्यासाठी आणि त्या टिकवण्यासाठी कितीजणांचे तळवे चाटावे लागतात हे फर्स्ट हॅन्ड अनुभव असणाऱ्या धन्देवायिकांना विचारून बघा. दारूचे दुकान चालवणाऱ्यांचा पैसा दिसतो पण समाजात किंमत शून्य..!! (विनंती: काका भावनेच्या भरात स्वतःच्या मुलांना असल्या धंद्याचे सल्ले कृपया नका देऊ. फुल्ल टाईम शेती करायचा तर नकोच नको.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
द
दीपक११७७ Wed, 06/21/2017 - 09:50 नवीन
एकंदर काय? तर इतरांना गुलाम बनवणे हे मानवी स्वभावातच आहे, मग तुम्ही धंद्यात असा, नोकरीत असा किंवा शेतीत असा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
म
मोदक Wed, 06/21/2017 - 11:22 नवीन
विनंती: काका भावनेच्या भरात स्वतःच्या मुलांना असल्या धंद्याचे सल्ले कृपया नका देऊ. सहमत. मुवि काका, तुमचे धागे आणि एकंदर विचार वाचत आहे. तुम्ही जे चाकोरीबाहेरचे प्रयोग करत आहात त्यातून चांगले झाले तर कुणालाच काही अडचण असणार नाही पण असे वेगळे प्रयोग अंगाशी आले तर सगळा दोष तुम्हालाच दिला जाईल. तुम्हाला त्याची टोचणी लागणार नसेल तर प्रश्नच मिटला पण तसे नसेल तर एक "प्लॅन B" हाताशी असूद्यात. अगदीच रहावले नाही म्हणून सांगितले. राग मानू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
म
मुक्त विहारि Fri, 06/23/2017 - 07:02 नवीन
प्लॅन "ब" प्लॅन "सी" आणि प्लॅन "डी" हाताशी आहेत. कारण, आता एकाच आर्थिक स्तोतावर अवलंबून राहणे, कुणालाच परवडत नाही. किंबहूना आमची सगळी गणितेच उलटी असल्याने, आधी इतर प्लॅन्स झाले, त्यामुळेच प्लॅन "ए" कडे वळत आहे. देअर इज नथिंग टू लूझ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
अ
अभ्या.. Wed, 06/21/2017 - 12:12 नवीन
मूविकाका सॉरी टू से पण असले भंकस सल्ले मुलाला देण्यापेक्षा त्याला त्याचे स्वतःला काय येते अन काय करायचे ह्याचा विचार करायला पात्र करायला हवे. आपण यशस्वी पालक असाल, तुमच्यापुढे मि फार छोटा आहे पण असले सल्ले तुमच्याकडून अपेक्षित नाहीत. खान्यापिण्याच धंदे काय कुणीही उठून करावेत इतके सोपे नाहीत. माझ्या डोळ्यासमोर गेल्या वर्षात 10 नवीन हॉटेल बंद पडलेत. ते फार विचारपूर्वक, आवडिने आणि डोक्यानेच करायचा धंदा आहे. धंदा करणाऱ्याच्या घरात तसे वातावरण ही फार महतत्वाचे असते. निम्मी मराठी व्यावसायिक पीढ़ी याबाबतित कमनाशिबि असते. दारात देनेकरी आला की थरथर कापरे भरणार पालक पोराला काय धंद्यात पडू देणारेत. कुठल्याही परिस्थितिवर डोस्के शांत ठेऊन येता काळ पाहायला वेगळेच संस्कार लागेतात. गुजराती मारवाड्यात ते कैसे येतात ते मि तुम्हाला सांगायला नको. धंदा सोपा नाही आणि नोकरी म्हणजे गुलामगिरी नाही. मुद्दा हा की त्याला काय करायचेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
र
राघवेंद्र Wed, 06/21/2017 - 15:29 नवीन
एक नंबर अभ्या !!! सल्ला/विचार पटले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अप्पा जोगळेकर गुरुवार, 06/22/2017 - 10:07 नवीन
दारात देनेकरी आला की थरथर कापरे भरणार पालक पोराला काय धंद्यात पडू देणारेत. कुठल्याही परिस्थितिवर डोस्के शांत ठेऊन येता काळ पाहायला वेगळेच संस्कार लागेतात. ही एक विशिष्ट पिढी होती. सरकारी नोकरी सर्वोत्तम, कर्ज कधी काढू नये, कोणाचे उपकार घेऊ नयेत वगैरे विचित्र संस्कार हळू हळू काळाच्या पडद्याआड गेले. आता खाजगी किंवा बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करुन घरासाठी अवाच्या सवा कर्ज काढणे किंवा धंद्यासाठी कर्ज काढणे यात फारसा फरक नाही. म्हणजे रिस्क फॅक्टर सारख्याच मापाचा आहे. आयुष्य चढउतारांचे असते हे बहुतांश जणांनी आता स्वीकारले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
उ
उपेक्षित गुरुवार, 06/22/2017 - 16:57 नवीन
अतिशय उत्तम प्रतिसाद अभ्या भाऊ आणि मोदक यांना पण अनुमोदन. स्वतः सध्या धंदा करत आहे, नशिबाने बरा चालू आहे धंदा पण या आधी ४/५ वेळा तोंडावर सपाटून आपटलो आहे आणि प्रत्येक वेळी परत शून्यातून सुरवात केली आहे, पण सगळ्यांनाच हे जमेल असे नाही अपयश पचवायची ताकत असेल तरच खरे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
म
मुक्त विहारि Fri, 06/23/2017 - 07:22 नवीन
ते तर आहेच किंबहूना तेच महत्वाचे पण आहे. पण, बर्‍याचदा होते असे की, मुलांना कधीतरी असे वाटते की, बस्स झाली ही नौकरी. पण त्यावेळी वाढलेले वय, वाढलेला आर्थिक खर्च, जोडीदारांची स्थिरते कडून अस्थिरतेकडे न जाणारी मानसिकता. (बर्‍याचदा ही आर्थिक अस्थितरता १००० दिवसांपेक्षा जास्त नसते. किंबहूना योग्य आर्थिक नियोजन केले तर १००० दिवसात कुठल्याही कामात यश मिळतेच आणि त्याला फक्त २च गोष्टी लागतात. चिकाटी आणि समर्पित भावना...... ह्या २ही गोष्टींवर तर आत्ता पर्यंत जगलोय.), नातेवाईकांचे टोमणे (भला उसकी कमीज मेरे कमीज से सफेद कैसी.) शिवाय आजकाल सर्वच्ग क्षेत्रात, विशेषतः नौकरीत, स्पर्धा इतकी वाढली आहे की, अगदी एका ग्लासातले मित्र पण नौकरी टिकवण्यासाठी मित्राचे/मैत्रिणीचे गळे कापायला तयार होतात. स्वयं-रोजगार जर युनिक असेल आणि गिर्‍हाइकांना देव मानलेत तर, कुठल्याही स्वयं रोजगाराला यश मिळतेच मिळते.(इथे एम.एल.एम. हा स्वयंरोजगार नाही, मित्रांचे गळे कापणे, हा कसला आलाय स्वयं-रोजगार) "दारात देणेकरी आले की थरथर कापरे भरणारे पालक पोराला काय धंद्यात पडू देणारेत?" एक नंबर वाक्य. आपल्याच मुलाला परत विकत घेणारे बाप बघीतले आहेत.त्यामुळे ह्या वाक्याला प्रचंड सहमत.तुला ह्या वाक्याबद्दल आमच्या सौ.च्या हातची चिकन-बिर्याणी किंवा आमच्या हातची पाव-भाजी लागू.कधीही ये.तुमचे गांव ते डोंबोली फार जास्त अंतर नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Fri, 06/23/2017 - 07:46 नवीन
डोम्बोली पेक्षा तुमच्या वावरावर बोलवा. पळत एईन. वावर हाय तर पावर हाय ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Fri, 06/23/2017 - 14:20 नवीन
ओके नोटेड... आता ऐनवेळी टांग मारू नकोस म्हणजे मिळवले. बरेच मिपाकर ऐनवेळी टंग मारतात. (मी पण मारलेली आहे. उगाच आम्ही नाही त्यातले असे म्हणण्यात काही अर्थ नाही. शिवाय सोलापूरातून येत असल्यास "शेंगदाण्याची चटणी" न आणल्यासही हरकत नाही.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
द
दीपक११७७ Fri, 06/23/2017 - 13:53 नवीन
विशुमित जी, अभेंद्र जी आणि मुवी जी यांचे विचार समांतर आहेत पण १००% सत्य ही आहेत. शिवाय परिपक्व सुध्दा आहेत. यातील एक स्विकारुन दुसरा नाकारणे संयुक्तिक होणार नाही. यास पर्याय म्हणजे संबंधीत व्यक्ती कुठली(नोकरी की व्यवसाय) गुलामगिरी करण्यासाठी तयार आहे हे त्या व्यक्तीलाच ठरवू द्यावे. जेणे करुन त्याला फार वाईट वाटणार नाही व तो ते काम (नोकरी कींवा व्यवसाय) निमुट पणे करेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
द
दीपक११७७ Fri, 06/23/2017 - 13:54 नवीन
अभेंद्र जी एवजी अभ्या जी असे वाचावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दीपक११७७
क
कपिलमुनी Fri, 06/23/2017 - 14:51 नवीन
अभेंद्रजी
हे आवडल्या गेल्या आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दीपक११७७
अ
अभ्या.. Fri, 06/23/2017 - 16:14 नवीन
मला तर उगीचच युपीच्या मंत्रीमंडळात शपथविधी झाल्यागत वाटले क्षणभर. लगेच कम्मुचा प्रतिसाद दिसला, म्हणलं "हाय, आपल्या लोकातंच हाय"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
व
विशुमित Sat, 06/24/2017 - 06:48 नवीन
अभेंद्रजी ...!! भारदस्त वाटतंय नाव हे... आवडलं गेलाय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
द
दीपक११७७ Sat, 06/24/2017 - 15:19 नवीन
अनुमती असेल तर अभ्या या आयडीला अभेंद्रजी म्हणत जाईल. _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 07/15/2017 - 13:37 नवीन
अभेंद्र मिपाचे धर्मेंद्र आहेत पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दीपक११७७
अ
अभ्या.. Sat, 07/15/2017 - 13:40 नवीन
पैजारबुवा, अन्याव करु नका हो, धर्मेंद्राची लेकरं पण आता म्हातारी झाली. नातवासाठी पिक्चर काढायले पाजी आता. ;) मला बसंती सापडेना अजून. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 07/15/2017 - 17:38 नवीन
सोलापूरात एखादी उंच पाण्याची टाकी पण नाही की काय ?! :) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभिजीत अवलिया Wed, 06/21/2017 - 15:51 नवीन
नोकरी म्हणजे निव्वळ गुलामगिरी ही चुकीची कल्पना वाटते. जवळपास प्रत्येकाला आपण नोकरी न करता धंदा करावा असे वाटते. पण चित्रपटात दाखवतात तसे 'केला धंदा सुरु आणि ६ महिन्यात धंदा यशस्वी होऊन गाडी बंगला घेतला' इतके ते सोपे नाही. असंख्य समस्या असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
ए
एकुलता एक डॉन Wed, 06/21/2017 - 18:46 नवीन
नोकरी म्हणजे गुलामगिरी फक्त मालक बदला येतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
म
मुक्त विहारि Fri, 06/23/2017 - 07:24 नवीन
त्या तर स्गळ्याच ठिकाणी असतात. पण ह्या मुद्द्यावर आपण सविस्तर चर्चा नंतर करू.आता टंकाळा आला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
आ
आदूबाळ गुरुवार, 06/22/2017 - 10:24 नवीन
नोकरी म्हणजे गुलामगिरी हे सरसकट विधान मलाही नाही पटलं. हे म्हणजे लग्न फक्त शरीरसंबंधांची सोय म्हणून करतात, सगळ्या क्रिकेट मॅचेस फिक्स असतात, सगळे राजकारणी चोर असतात, सगळ्या नट्या छिनाल असतात वगैरे सोप्या, सरसकट (आणि त्यामुळेच) लोकप्रिय axioms आहेत त्यातला प्रकार आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 06/23/2017 - 07:34 नवीन
हे वाक्य जरी सरकटी करण असले तरी पण ते माझ्या अनुभवानुसार योग्य आहे. एखादा मनुष्य जर अतिशय स्थिर नौकरीत असेल तर त्याला हे वाक्य लागू होणार नाही.पण आजकाल अशा स्थिर नौकर्‍या किती आहेत? अगदी आय.ए.अस. अधिकार्‍यांना पण मारहाणीच्या आणि वेळप्रसंगी जीव गमावण्याच्या घटना ह्याच पवित्र देशांत घडलेल्या आहेत.(त्या अधिकार्‍याच्या नंतर आलेला अधिकारी मात्र अशा हल्ल्यांचा बळी ठरत नाही, ह्यामागचे कारण मात्र गुलदस्ताच आहे.) लोकसंख्यावाढीच्या प्रमाणात स्थिर नौकर्‍यांचे प्रमाण नगण्याच आहे, असे माझे अनुभव आहेत. तुमचे अनुभव माझ्या पेक्षा वेगळे असल्याने, तुमची मते वेगळी असणे पण स्वाभाविकच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा