Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रामदेव व पतंजलीच्या प्रोडक्ट्स आपले मत काय आहे?

ब
बार्नी यांनी
Tue, 08/08/2017 - 08:29  ·  लेख
लेख
नुकतेच प्रियांका पाठक – नारायण ह्यांचे “Godman to tycoon –The untold story of Baba Ramdev” नावाचे पुस्तक प्रकाशित झाले.तसेच आंतरजालावर हा पुस्तक परिचय वाचनात आला म्हणून उत्सुकता वाढलेली आहे. मी पतंजली चे प्रोडक्ट्स कधी वापरले नाहीत. परंतु आंतरजालावर थोडा अभ्यास केल्यानंतर , पतंजलीच्या उत्पादनांच्या मागील काही चिंताजनक गोष्टी आढळून आल्या. उदाहरणार्थ , पतंजली चे गायीचे तूप हे गायीचे नसल्याचा दावा एस. के . पात्रा ह्या त्यांच्या EX-CEO ने केला आहे. “कारवान “ मासिकाने त्याबाबत एक लेख प्रकाशित केला आहे. तसेच त्यांची काही उत्पादने FSSAI च्या टेस्ट्स मध्ये नापास झाल्याचे समजले. तसेच त्यांच्या जाहीराती ह्या फसव्या असल्याचा दावा इतर कंपन्यांनी केल्याचे वाचनात आले. रामदेव हे कमालीचे हुशार व्यापारी आहेत हे माझे वैयक्तिक मत आहे. त्यांच्या उत्पादनांबाबत मी आधीपासूनच साशंक होतो. जर आपण त्यांची उत्पादने वापरली असल्यास आपला काय अनुभव होता हे जाणण्यास उत्सुक.

प्रतिक्रिया द्या
20611 वाचन

💬 प्रतिसाद (70)

प्रतिक्रिया

ब
बार्नी Tue, 08/08/2017 - 08:37 नवीन
वर दिलेल्या लिंक्स अचानक गायब झाल्याने खाली देत आहे. Godman to tycoon –The untold story of Baba Ramdev Is Patanjali’s Desi Cow Ghee Even Cow Ghee?
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 08/08/2017 - 09:02 नवीन
इतकी फसवेगिरी करणार नाही बाबा. इतरांचा खप अचानक कमी झाल्याने त्यांचा धंधा बुडायला लागला असेल हे निश्चित. ( गंमत अशी आहे की तूप अन गायीची चरबि यांची केमिकल टेस्ट एकच येते म्हणतात!!)
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Tue, 08/08/2017 - 09:23 नवीन
मी पतंजली चे प्रोडक्ट्स कधी वापरले नाहीत रामदेव हे कमालीचे हुशार व्यापारी आहेत हे माझे वैयक्तिक मत आहे. त्यांच्या उत्पादनांबाबत मी आधीपासूनच साशंक होतो. तुमची ही मते तुम्ही अगोदरच ठरवली असल्यामुळे तुम्हाला तुमच्या दाव्याला पुष्टीकारक मते आली तरच जास्त आनंद होईल. विरुद्ध मते आली तर तुम्ही काय पतंजलीची उत्पादने टेस्ट करायला जाणार नाही. बरोबर ना ?
  • Log in or register to post comments
ब
बार्नी Tue, 08/08/2017 - 09:30 नवीन
विरूद्ध मते आली तरी आनंदच होईल .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
ए
एस Tue, 08/08/2017 - 09:27 नवीन
पतंजलिला तथाकथित शुद्ध देशी गायीच्या तुपाचा पुरवठा हा वेगवेगळ्या ठिकाणांवरून होतो असे ऐकले आहे. त्याच ठिकाणांहून इतर डेअऱ्यांनाही पुरवठा होत असल्याने त्यात किती आणि कशी भेसळ होत असावी ह्याची कल्पना आहे. तस्मात् पतंजलिच्या उत्पादनांवर डोळे झाकून विश्वास ठेवावा अशी परिस्थिती मुळीच नाही.
  • Log in or register to post comments
च
चिगो Tue, 08/08/2017 - 10:24 नवीन
रामदेव बाबा हा माणुस अत्यंत धुर्त व्यापारी आहे. त्यांनी 'योग'ला काहीतरी असाध्य, कठीण अशी सिद्धी न ठेवता 'कधीही, कुठेही करता येईल असा सहज सोपा व्यायाम' म्हणून भारतातील घराघरात पोहचवलं, हे त्यांचं निश्चित आणि प्रशंसनीय यश.. मी लोकांना रेल्वेच्या बर्थ्सवर 'अनुलोम-विलोम', 'कपालभाती', 'भ्रामरी प्राणायाम' करतांना बघितलं आहे. 'नखांवर नखं घासून केस परत येतात' सारख्या उपायांनी त्यांना लोकांना आपल्याकडे ओढलं, . 'बाबा सांगतील आणि करतील, ते आपल्या भल्याचंच आहे' हा विश्वास जनतेकडून संपादन केल्यावर त्यांनी 'पतंजली', 'दिव्य फार्मसी'वगैरे कंपन्या सुरु केल्या, आणि त्या भरमसाठ चालत देखील आहेत. गंमत म्हणजे, पतंजलीमधे कागदोपत्री त्यांचा फारसा स्टेक नाहीये. 'पतंजली'च्या उत्पादनांबद्दल बरेचदा जनतेचा अ‍ॅटीट्युड 'बाबाजी का प्रसाद हैं. अच्छाही होगा..' टायपातला असतो. त्यांच्याबद्दल फारशी चिकीत्सा करायला, गुणवत्ता तपासायला वगैरे जनतेला आवडत नाही. त्या बाजूने कुणी काही बोललं किंवा काही सिद्ध जरी केलं तरी 'विदेशी कंपनीयों की साजिश' आहेच. त्यामुळेच, सद्यस्थितीत तरी पतंजली भारतात काहीही खपवू शकते, हे सत्य आहे. रामदेव एक व्यापारी आहेत, ते स्वतःच ब्रॅन्ड आणि ब्रॅन्ड एम्बॅसिडरही आहेत. व्यक्तीगतरित्या बोलायचं झाल्यास, मी पतंजलीची उत्पादनं 'विथ अ पिंच ऑफ सॉल्ट'टायपात वापरतो. खाण्यापिण्याच्या वस्तू सहसा घेत नाही, आणि बाकीच्या वस्तुंबद्दलही 'अटॅच्ड' अजिबात नाही.
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Tue, 08/08/2017 - 10:41 नवीन
कणिक, मध शुद्ध फसवणुक आहे. बिस्किटं/कॉर्न्फ्लेक्स साठी पतंजलीवर विश्वास नाही. इतर कंपन्यांवर आहे. पेस्ट वापरली नाही. हँड वॉश साबण बरा आहे
  • Log in or register to post comments
प
पुंबा Tue, 08/08/2017 - 11:17 नवीन
कणिक, मध शुद्ध फसवणुक आहे.
++११ फसवणूकः बिस्किटे कपडे धुण्याची पावडर हॅन्डवॉश चांगली उत्पादने: टूथपेस्ट शाम्पू डोक्याचे तेल आवळा सिरप
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
A
arunjoshi123 Tue, 08/08/2017 - 14:21 नवीन
काय फसवणूक आह??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
अ
अनुप ढेरे Tue, 08/08/2017 - 14:30 नवीन
वापरुन बघा. समजेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
ह
हतोळकरांचा प्रसाद Tue, 08/08/2017 - 20:11 नवीन
पीठ वापरून बघितले, आवडले नाही. पण यात फसवणूक काय ते कळले नाही. मी पैसे देऊन घेतलेली बरीच उत्पादने मला आवडत नाहीत, पैसा वसूल नाहीत असे म्हणणे जास्त योग्य ठरणार नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
ज
जयंत कुलकर्णी Tue, 08/08/2017 - 10:42 नवीन
मी खालील मेल त्यांना पाठवला होता पण अर्थातच त्याचा उपयोग झाला नाही. शिवाय त्यांचा मध चांगला नाही हे मी अनुभवाने सांगू शकतो. Honey Batch No. CN 231 11/19/15 to feedback Dear Sir, I bought Honey which mentions the cited Batch No. Unfortunately when i weighed it was less by 50 gms. Add the weight of the bottle and I am sure we are receiving in 200 gms less Honey in each bottle. Regards, Jayant Kulkarni
  • Log in or register to post comments
व
विशुमित Tue, 08/08/2017 - 10:49 नवीन
पतंजलीचे फेस वॉश वापरत आहे, हिमालया पेक्षा सरस वाटलं. पण आयुर्वेदिक वगैरे असेल या बद्दल साशंक आहे.
  • Log in or register to post comments
प
पुंबा Tue, 08/08/2017 - 11:18 नवीन
हो फेसवॉश चांगले आहेत.. विशेषतः तेलकट त्वचेसाठीचा चांगला आहे. एकदम इफेक्टिव्ह.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ए
एमी Tue, 08/08/2017 - 11:03 नवीन
पतंजलीचा शाम्पू, टूथपेस्ट, भांडी घासायचा साबण वापरला आहे. पेस्ट ठीक आहे. वीको वज्रदंतीसारखी लागते चवीला :D शाम्पू आत्ताच वापरायला घेतला. पहिल्यांदा चांगला वाटला पण पुढचे दोन वेळा केस फार कोरडे/राठ झाले. मी परत कोणतेच पतंजली उत्पादन आणेल असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Sun, 08/13/2017 - 18:47 नवीन
आणून पाहिली वेगवेगळी उत्पादने. एकही नाही आवडलं. शाम्पू, फेस वॉश सूट नाही झाले. शाम्पू तर बहुतेक फक्त तेलकट केसांसाठी असावा. माझे अती कोरडे झाले आणि प्रचंड गुंतले. कणीक, दलिया, मध , तूप काहीही आवडलं नाही. टूथपेस्ट ही ठीकच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
ए
एमी Mon, 08/14/2017 - 08:02 नवीन
शाम्पू तर बहुतेक फक्त तेलकट केसांसाठी असावा. माझे अती कोरडे झाले आणि प्रचंड गुंतले. >> +1. माझेपण केस फार कोरडे झाले :-( मी Natural Hair Cleanser आणलेला. संत्र्याच्या सालीसारखा वास येतो त्याचा. आणि त्यावर 'बालों का टूटना, झडना व रुखेपन को दूर करे ' असे लिहीले आहे =)) सॅशे मिळत असते तर इतर प्रकार ट्राय करून पहिले असते. बाटली आणणे परवडत नाही प्रयोगासाठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सविता००१
ख
खेडूत Tue, 08/08/2017 - 11:50 नवीन
मार्चला येणार्‍या जीन्स कश्या आहेत बघूयात. बाबांनी पराक्रम सेक्युरिटीज नावाची कंपनी काढलीय. त्यातून आता वॉचमन पुरवणार आहेत. :) त्यांचा गणवेष बाबांसारखाच असेल की काय अशी शंका आहे...!
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Tue, 08/08/2017 - 14:31 नवीन
कोरावर बाबा रामदेवच्या (म्हणजे फक्त बाबा रामदेवच्याच) उत्पादनांवर भारतीयांना शंका का येते याचं मी उत्तर दिलेलं आहे. ते बर्‍याच लोकांना आवडलेलं आहे. असं प्रश्न करायची मानसिकता काय आहे हे कळलं तर प्रश्नात काय किती तथ्य आहे हे कळेल. https://www.quora.com/Is-Baba-Ramdev-a-fraud/answer/Arun-Joshi-33?srid=CtTy ================ १. रामदेवाची पेस्ट दिसायला फार कुरुप आहे. पण माझा मागे, दुसरि पेस्ट वापरताना, एक किडलेला दात काढावा लागला. दंतकांती वापरल्यापासून दुसरा किडलेला दात चक्क भरून आला. हे चक्क बियाँड बिलिफ आहे. शिवाय खरोखर्च श्वास २४ तास शुद्ध राहतो. २. त्याचं तेल वापरल्यावर केस गळणं बंद होतं. पण टॉवेल फार घाण होतो इतकी द्रव्य तो त्यात टाकतो. ३. त्याचा मोगरा फ्लेवरचा साबण माझा फेवरेट आहे. (तो दिसतो सुंदर. त्याचा वास सुरेख . म्हणून.)
  • Log in or register to post comments
च
चिगो Tue, 08/08/2017 - 14:54 नवीन
एक अ‍ॅनालिसीस म्हणून आपलं उत्तर आवडलं. हिंदू किंवा भारतीय विज्ञानाचे स्टँडर्डायजेशन करुन त्याच्या कसोटीवर पतंजलीची उत्पादने काय रिझल्ट देतात, हे बघणे रोचक ठरेल. तोपर्यंत तरी 'बाबाजी का प्रसाद' ह्या निकषावर पतंजलीची उत्पादने विकणे किंवा विकत घेणे, ह्यावर आक्षेप आहेच. पाश्चिमात्य किंवा पौर्वार्त्य कुठल्याही विज्ञानाचे स्टँडर्डायजेशन (मराठी प्रतिशब्द?) करणे फार गरजेचे आहे, असे मला वाटते. आमच्या जिल्ह्यात आम्ही आयुष मंत्रालयातर्फे एक वर्कशॉप ठेवलं होतं. त्यात आलेल्या आयुर्वेदीक डॉक्टरांनी केवळ दोन मिनीटं माझी नाडी तपासून मला खाण्यात काही बदल सुचवले, जे मला फायदेशीर ठरलेत. इथेही काही पारंपारीक औषधी वापरतात. मी आलेल्या चमुला हेच सांगितले कि 'श्रेष्ठत्वावर' वाद करत बसण्यापेक्षा भारतीय विज्ञानाच्या विकासावर भर दिला पाहीजे. बाकी तुमच्या 'इन्फेरीऑरीटी कॉम्प्लेक्स'वाल्या विवेचनाशी सहमत आहे. तो सिस्टेमॅटीकली आपल्यात मुरवण्यात आला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
प
पुंबा Tue, 08/08/2017 - 14:57 नवीन
'श्रेष्ठत्वावर' वाद करत बसण्यापेक्षा भारतीय विज्ञानाच्या विकासावर भर दिला पाहीजे.
+११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो
म
मोदक Tue, 08/08/2017 - 15:21 नवीन
स्टँडर्डायजेशन (मराठी प्रतिशब्द?) प्रमाणीकरण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो
प
पुंबा Tue, 08/08/2017 - 14:56 नवीन
अजो, तिनही वस्तूंबाबत तुमच्या परिक्षणाशी सहमत. पण खाण्याच्या वस्तूंबाबत वैयक्तिक वापरातून दर्जाबाबत अक्षम्य दिरंगाई केल्याचे आढळून आले आहे. मध तर भिकार आहे. पतंजलीच्या वस्तूबाबत माझे मतः खायच्या वस्तू शक्यतो घेऊ नयेत. टॉयलेटरीज वापरून बघायला हरकत नाही. किफायतशीर दरात चांगला दर्जा देतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
म
मोदक Tue, 08/08/2017 - 15:22 नवीन
>>>टॉयलेटरीज वापरून बघायला हरकत नाही. किफायतशीर दरात चांगला दर्जा देतात. +१ बाकी त्यांचे एनर्जी बार चांगले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
R
Ranapratap Tue, 08/08/2017 - 16:02 नवीन
मी बरेच पतंजलीचे प्रॉडक्ट वापरतो, काही चांगले, तर काही बरे वाटले. पण संशय घेण्या सारखे काही नाही. आयुर्वेदिक औषधे तर चांगलीच आहेत, खाजगी कंपनी पेक्षा स्वस्त आहेत.
  • Log in or register to post comments
य
योगेश लक्ष्मण बोरोले Tue, 08/08/2017 - 16:13 नवीन
रामदेवबाबांबाबत माझी मते खालीलप्रमाणे आहेत; १) साधारणत: १५ बर्षांपासुन दररोज सकाळी प्राणायाम व योगासनांचा प्रचार करतांना त्यांना बघितले आहे. त्यांच्या कार्यक्रमित नेहेमी देशभक्तिपर गीते असतात व ईतर अनेक बाबांप्रमाणे त्यांनी कधीहि आपली स्वतःची किंवा स्वतःच्या प्रतिमांची पुजा करण्यास कोणालाही उद्युक्त केले नाही.. २) त्यांची लोकप्रियता वाढली तसे तसे त्यांनी विदेशात प्राणायाम व योगासनांचे कार्यक्रम केलेत, भारतातील कार्यक्रमांना तिकिटे लावलीत, हरिद्वारला आश्रम काढलेत. एकंदरीत पतांजली ब्रँड तयार होत होता व पैसा खुप जमत होता पण तरीही व्यक्तिपुजा कोठेही सुरु केली गेली नाही,, तसेच पैशांचा संशयास्पद विनियोग / अपाहार /फसवेगिरी सुध्धा कोठेही वाटली नाही. ३) खुप नाव झाल्यावर रामदेवबाबांनी राजकारण / समाजकारण करण्याचा प्रयत्न केला पण जमले नाही. त्यानंतर त्यांनी कोठलाही आक्रास्तळेपणा केला नाही. गांधी कूटुंबीय व काँग्रेसच्या विरोधात ते जाहीर सभांमध्ये बोलतात, पण मर्यादेतच. आता पतंजली उत्पादनांबाबत, १) बहुतांष FMCG उत्पादने मार्केटिंगवरच चालतात. ही प्राॅडक्टस बनवणे म्हणजे राॅकेट सायन्स नाहीच व म्हणुन विदेशी तंत्रज्ञानाची वगैरे काहीच गरज नाही. मग बाकी कंपन्या हिरो - हिरविणींच्या मदतीने ब्रँडींग करुन विकतात किंवा फाॅरीनचे (म्हणुन चांगले??) म्हणुन खच्चुन नफा कमवुन विकतात तर पतंजलीने रामदेवबाबांचा ब्रँड व स्वदेशीची साद घालुन विकले तर काय बिघडले? २) खाण्याच्या वस्तुंचे FSSI certification म्हणजे आनंदी आनंदच आहे. जर भिंग घेउनच बघायचे ठरवले तर कित्यैक विदेशी कंपन्यांचेही धाबे दणाणेल. ३) माझा स्वतःचा अनुभव बहुतांष पतंजली उत्पादनांबद्दल चांगलाच आहे. मी आटा नाही वापरला पण मध, पाॅवरव्हिटा, बिस्किटे, तेलं, रसं ई उत्पादने कोठेही कमी नाही वाटली. वैयक्तिक चवींमध्ये फरक असु शकतो पण फ्राॅड नक्किच नाही.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Tue, 08/08/2017 - 16:50 नवीन
<<<फ्राॅड वगैरे काही नाहीय, लोकांना आपल्याच माणसाचे यश बघवत नाही. >>> ==>> मला तर रामदेव बाबांचे बिसिनेस मॉडेलच खूप कौतुक वाटते. व्यक्ती पूजे बाबत अगदी सहमत. गावोगावी लोक सकाळी उठून चालू लागली आणि मोडका तोडका का होईना योग करायला लागली, ही खूप मोठी उपलब्धी आहे बाबांची. बाकी प्रतिसादाशी बऱ्यापैकी सहमत..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगेश लक्ष्मण बोरोले
म
मोहन Tue, 08/08/2017 - 18:02 नवीन
+१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगेश लक्ष्मण बोरोले
ए
एकविरा गुरुवार, 08/10/2017 - 11:17 नवीन
मी तर नेहमीच पतंजली उत्पादने वापरते . मध बिस्किटे आवला ज्यूस इत्यादि ख़रच खूप छान आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगेश लक्ष्मण बोरोले
क
कंजूस Tue, 08/08/2017 - 17:08 नवीन
जाहिरातीतला तो बाबाच्या मागचा विरळ दातवाला साधक आयुर्वेदाची माहिती असणारा आहे. कोणी नवीन शोध लावत नाही फक्त जुन्या संहितातल्या मिश्रणातले प्रमाण कमी अधिक करतात आणि वेगळ्या नावाने विकतात.
  • Log in or register to post comments
ब
बार्नी Tue, 08/08/2017 - 17:21 नवीन
आचार्य बाळकृष्ण ह्यांच्यावर खोटी शैक्षणिक कागदपत्रे व पासपोर्ट मिळवल्याबद्दल कोर्टात सी.बी.आय ने केसेस दाखल केल्या आहेत , त्यामुळे त्यांचे आयुर्वेदाचे ज्ञान हा वादाचा मुद्दा आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
क
कंजूस Wed, 08/09/2017 - 00:36 नवीन
आयुर्वेदाचे ज्ञान पुस्तके ,ग्रंथ वाचून मिळत नाही का? एखाद्या रसशाळेतला कामाचा अनुभवही उपयोगी पडत असेल. रीतसर महाविद्यालयातल्या शिक्षणाचे प्रमाणपत्र नसेल आणि नोंदणी केलेली नसेल तर तो वैद्य व्यवसाय करू शकत नाही. बाकी माहिती असायला काय हरकत आहे? शिवाय ही उत्पादने सौंदर्यप्रसाधने असल्यास त्या खात्याचे जे काही नोंदणी/तपासणी/प्रमाण वापरले नसेल तर जनता /सरकार खटला दाखल करू शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बार्नी
ख
खेडूत Wed, 08/09/2017 - 12:51 नवीन
दहा हजार कोटींचं मार्केट जातंय म्हटल्यावर बहुराष्ट्रीय कंपन्या शक्य त्या मार्गाने त्यांच्या मागे लागल्या. दुसरीकडे त्यांनीच मिळून हर्बल बिझनेसवर लक्ष्य केंद्रित केले. आता सगळ्यांच्या पेस्टमधे नमक, लवंगा, कोळसा आला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
प
प्रसाद_१९८२ Wed, 08/09/2017 - 13:11 नवीन
दातांना किती हानीकारक आहे हे दाखवणारी कोलगेटची एक जाहिरात, फार पुर्वी दुरदर्शनवर येत असे. त्यात समुद्री शिंपल्यावर कोळसा किंव्हा मिठ घासून, त्या खडबडीत कोळसा व मिठाने दातांवर कसा विपरित परिणाम होतो हे त्यात असत. व आता त्याच कोलगेटच्या "क्या आपके टुथपेस्ट में नमक है" व "कोलगेट चारकोल" सारख्या जाहिराती येत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
स
सुबोध खरे Tue, 08/08/2017 - 17:15 नवीन
पतंजली चे गायीचे तूप हे गायीचे नसल्याचा दावा एस. के . पात्रा ह्या त्यांच्या EX-CEO ने केला आहे. हे तूप तयार करण्यासाठी नंदिनी या सरकारी कंपनीचे लोणी वापरले जाते. हे गायीचे आहे कि म्हशीचे आहे याबद्दल सरकारी कंपनीच्या लेबल वर काहीच लिहिलेले नाही. यामुळे ते गायीचे आणि म्हशीचे असे दोन्ही असण्याची शक्यता आहे. परंतु म्हशीचे लोणी जास्त महाग आहे त्यामुळे त्यात म्हशीच्या लोण्याची मात्रा (असली तर कमी असेल). बाकी पात्रा साहेबांचा इतर आरोप हा पूर्वग्रह दूषित असल्याचे आढळते The distinction of the source of milk is important and has far-reaching ramifications on health.According to Keith Woodford, professor of farm management and agribusiness at Lincoln University in New Zealand and author of Devil in the Milk: Illness, Health and Politics of A1 and A2 Milk, there is a clear link between the milk we drink and a range of serious illnesses such as diabetes, heart disease, autism and schizophrenia. Woodford asserts that mixed breed cows, such as jersey cows, contain the A1 beta-casein, which triggers an adverse reaction in the human body when digested. On the other hand, the milk of many herds of Asia (including local Indian pure breed cows such as the Bos indicus) contain A2 protein—which is safer for human consumption. यात प्रथिन कोणते आहे याचा उहापोह आहे परंतु मुळात तुपामध्ये प्रथिन हे नसतेच त्यामुळे या मुद्द्याला तसा काहीच अर्थ नाही बाकी पतंजलीची काही उत्पादने चांगली आहेत काही ठीक ठाक. मूळ सुरुवातीला त्यांनी विपणन( जाहिरातींवर) होणार अव्वाच्या सव्वा खर्च (उलाढालीच्या ३० %) टाळून बाजारात आपले बस्तान बसवले आणि आता लोकांना उत्पादने चांगली आहेत म्हणून साघेत आहेत तर खप वाढवायला त्यांनी जाहिराती करणे चालू केले आहे
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 08/08/2017 - 21:07 नवीन
राबांची टूथपेस्ट आवडली. खरंतर फारच आवडली. त्यांचा शांपू एकदाच वापरलाय पण खास काही वाटला नाही. ग्राहकपेठेत राबांच्या उत्पादनांसाठी वेगळा विभाग आहे. त्यातील कणिक नेहमी संपलेली असते. ज्यूसेसपैकी दोन प्रकार अवडले पण कोणते ते आता आठवत नाही. दोनच ट्राय केल्याने बाकीच्यांबद्दल मत नाही.
  • Log in or register to post comments
I
II श्रीमंत पेशवे II Wed, 08/09/2017 - 08:50 नवीन
सर्वात अगोदर पतंजली ची उत्पादने आणि त्यांची लोकप्रियता लक्षात घेता त्यांनी राबवलेली वितरण प्रणाली आणि मोक्याची बाजारपेठ याचं कौतुक कराव तेवढ कमी आहे. आयुर्वेदिक औषधांमध्ये बरेच वेळेस कालबाह्य तारीख हि जास्त असते पण , वितरणाच्या वेळी होणारी हेळसांड ( हंड्लिंग) मुळे काहीवेळेस हवाबंद असणारे डबे हे खराब होतात , त्यातूनच उत्पादन खराब व्हायला सुरुवात होते. शांत पणे विचार केला तर वितरण या एकच विषयाची व्याप्ती इतकी मोठी आहे कि त्याचच आश्चर्य वाटत , खूप कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांना उत्पादन कस पोचेल असा विचार करता , एकट्या उत्तराखंड मध्ये असणाऱ्या कारखान्यातून देशभर सर्व उत्पादने वितरीत करणे केवळ अशक्य आहे म्हणून कहि नाशिवंत ( लवकर खराब होणारी ) उत्पादनासाठी , सहकार्य पद्धत - करार कार्य केले जाते आणि पतंजली ला जे उद्योजक सहमत आहेत ते उद्योजक हे करार कार्य करतात ( अर्थात ५० टक्के हेतू साध्य होतो आणि शेवटी मेरा क्या ? ) मुळे आपली पोळी त्यातच भाजता यावी या हेतूने उत्पादनाचे गुणवत्ता धोरण धाब्यावर बसवून , ग्राहकाना कमी गुणवत्तेचा माल विकला जातो , देशाच्या एका कोपर्यात बसून गुणवत्ते वर मेहर नजर ठेवणे अतिशय कठीण काम आहे. तरीही फक्त आणि फक्त बाबा रामदेव , त्यांची उद्दिष्टे , हेतू ,त्याचं आतापर्यंत कार्य आणि देशभक्ती काही टक्के का होईना देशातील लोकांनी देशातील उत्पादनास प्रधान्य देऊन देशाला मोठ कराव हि भावना या मुळेच त्यांनी सुरु केलेल्या छोट्या प्रयत्नांना यश मिळत गेलं आणि तेही कल्पने पलीकडे . वरती नमूद केलेल्या उत्पादनात काही उत्पादने कि खरोकर खूप चांगली आहेत , परंतु आपली एक पिढी कोलगेट , लक्स ,पोमोलीव, डव्ह , फेअर & लवली , अशा अनेक उत्पादनांची जाहिरात जन्माला आल्या पासून पाहत आलोय म्हणून ति उत्पादने चांगली नसून चांगली भासवली गेली आणि ति मुकाट्याने वापरून आपण ते आपल्या आनग्व्ल्नी पाडून घेतली. आता अचानक गुळाचा चहा प्या अस सांगितल तर आपले हावभाव कसे होतील ? पण पूर्वी जेव्हा कधी आपल्या घरात पहिल्यांदा चहा पूड आणून चहा करायला सुरुवात झाली तेव्हा त्यात गुळच वापरत होते , नंतर वापरण्यास सोपी ( महा घातक ) साखर आली आणि चित्र बदललं तसच आहे आतापर्यंत वापरत असलेली एखाद्या ब्रान्ड ची वस्तू अचानक बदलली तर ति आपलीशी व्हायला वेळ तर लागणारच वरती गायीच्या तुपाचा मुद्दा आला ? किती गायी आहेत भारतात ? किती लिटर दुध देतात ? त्यापासून किती ( पारंपारिक पद्धतीने - दही , ताक , लोणी मिळते ? ) फुल क्रीम काढून किती तूप बनेल ते वेगळ ! यांची आकडेवारी पाहिली तर आज भारतात दर १०० माणसा मागे एक गाय आहे त्यापासून तयार होणारे तूप , विकत घेणारे ग्राहक याची आकडेवारी काढली x याच्या विरुद्ध किती ब्रांड पहिला मिळतात , महाराष्ट्रात / गुजरात मध्ये अमूल ,सागर, चितळे , वारणा, कृष्णा , कान्हा , गोवर्धन , वगैरे २०० च्या वर डेअऱ्या तूप विक्री साठी चढाओढ करीत आहेत देश भरात तर असंख्य लोकं तूप विकत आहेत. देशी गाय - तीच दुध - ( सरासरी ४-६ लिटर दिवसाला ) त्यापासून तूप बनवायचं म्हटल तर जेमतेम १ किलो ते दीड किलो तूप बनू शकते मग एवढ तूप आलं कुठून ???/ कि गायी अचानक दुधा ऐवजी तूप द्यायला लागल्यायत ?? भेसळ ,,,,,,,,,,,,,, भेसळ .........भेसळ या शिवाय इतक तूप बाजारात दिसूच शकत नाही. त्यामुळे बाबा रामदेव नि तूप बाजारात आणलं तरी पतंजली साठी काम करणारी सहकारी डेअरी ते किती शुद्ध बनवेल ?? हा प्रश्न आहेच हीच गोष्ट मधाची ......... खर मध कोणत ? डाबर देतो ते कि पतंजली देतो ते .......? दुधा तुपाच ठीक आहे ते लिटर मध्ये मिळत ? पण मधाच काय ?? माश्या पोळी तयार करतात त्यातून काय एका वेळेस ५ लिटर मध मिळत नाही , आणि माश्या जिथे जंगल आहे , फुलझाडे आहेत अशाच ठिकाणी मध साठवतात मग शहरातल्या प्रत्येक केमिस्ट वाल्या पासून ते गल्लीतल्या छोट्यात छोट्या किराणा माल वाल्याकडे मधाची बाटली सापडते ........ एवढ मध तयार करायला काय जादू आहे का यांच्या कडे ? अशा अनेक गोष्टी आहेत कि लोकसंख्या आणि त्यांना पुरेल इतके विशिष्ट अन्न पदार्थ हे हे संख्येचा तफावतीचा विचार न करता , केवळ उपलब्ध आहेत म्हणून आपण घेतो वापरतो आणि त्यालाच प्रमाण मानून चालत असतो. त्यामागचा उत्पादनाचे खटाटोप , वेळ ,अवधी याचा आपण विचा करत नाही. मी ओघात बरेच लिहून टाकले आणि मूळ मुद्दा बाजूला राहिला रामदेव व पतंजलीच्या प्रोडक्ट्स आपले मत काय आहे? पतंजली ने कर लो दुनिया मुठ्ठी मे ची प्रतिज्ञा केली आहे , जमतील ते सगळे उद्योग करायचा विडा उचलला आहे. पण सहकार पद्धतीने ब्रांड चा वापर करून एखादी गोष्ट दुसर्याला बनवायला सांगून ति त्या भागात उपलब्ध करून देणे या मुळे काही उत्पादने हि गुणवत्ते पासून लांब राहत आहेत काही उत्पादने खरच छान आहेत , पण ओरीजनल कोणते आणि मिळावट वाले कोणते हे सर्व सामान्यांना ओळखता येत नाहीत त्यामुळे सुक्याबरोबर ओले पण जळते आहे. त्यातून अनेक कुशंका / प्रश्न उत्पन्न होत आहेत. वर्षोनुवर्षे भेसळ युक्त प्रसाधने वापरल्या मुळे चांगली कोणती यात गफलत होते आणि चांगली घाण वाटतात , योगेश बोरोले ने छान लिहिले आहे सौरा - यांनी लिहिल्या प्रमाणे खायच्या वस्तू टाळल्या तर बाकी प्रसाधने छान आहेत अंगाचे साबण , औषधे जे मदर प्लांट मध्ये तयार होते , ति उत्पादने उत्कृष्ट आहेत.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते गुरुवार, 08/10/2017 - 09:58 नवीन
>>देशी गाय - तीच दुध - ( सरासरी ४-६ लिटर दिवसाला ) त्यापासून तूप बनवायचं म्हटल तर जेमतेम १ किलो ते दीड किलो तूप बनू शकते गायीच्या दुधात ३.५ टक्के फॅट असते. त्या हिशोबाने ४ ते ६ लीटर दुधातून १४० ते २१० ग्रॅम तूप मिळू शकते. (म्हशीच्या १० लिटर दुधातून ६०० ग्रॅम तूप मिळू शकते. बाकी धागा रोचक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: II श्रीमंत पेशवे II
व
वरुण मोहिते Wed, 08/09/2017 - 08:57 नवीन
आणि स्टॅंडर्ड राखणाऱ्या बाहेरच्या कंपन्या ह्याचे पहा . मग पुढे बोलू .सगळ्या गोष्टी आउटसोर्स आहेत . त्यात पतंजली चा संबंध नाही आहे . ब्रँड नेम महत्वाचे .
  • Log in or register to post comments
ल
लिओ Wed, 08/09/2017 - 10:59 नवीन
@ कंजूस
( गंमत अशी आहे की तूप अन गायीची चरबि यांची केमिकल टेस्ट एकच येते म्हणतात!!)
हे आपण कोठे वाचले ? याबद्द्ल थोडे सविस्तर लिहा. वाचायला आवडेल. तूप अन गायीची चरबि यांची केमिकल टेस्ट एकच येते या विधानावरून असे वाटते कि तथाकथित शाकाहारीचे कट्टर पुरस्कर्ते शाकाहार व मांसाहारातील तफावत पुर्णपणे नाहीशी करण्यासाठी झटत आहे कि काय ??? सामिष शाकाहारी माणुस यावर काय म्हणेल ???? जेव्हा गायमांस भक्षणाच्या संशयावरुन एका भारतीय वायुसेनेतील जवानाच्या कुटुंबातील सदस्यांच्या हत्या झाली आहे, तेव्हां गायीची चरबि व गायीचे तुप यावर सरकाने स्पष्टीकरण द्यावे असे मला वाटते. तूप अन गायीची चरबि एकाच पातळीवर आणुन ठेवणे फार किळसवाणे वाटते. ********************************************************************************* मग एवढ तूप आलं कुठून ???/ कि गायी अचानक दुधा ऐवजी तूप द्यायला लागल्यायत ?? पुर्णपणे सहमत आयुर्वेद तुप व साजुक तुप याला एकाच प्रकारचे मानते काय ? आयुर्वेद गायीचे तुप व इतर तुप याला एकाच प्रकारचे मानते काय ? पतंजली दोन प्रकारचे तुप विकते. १. COW'S GHEE व २. COW'S DESI GHEE COW'S DESI GHEE व DESI COW'S GHEE यात फरक काय ? कोणत्या प्रकारे तुप निर्माण केले गेले फुल क्रीम कि परंपरागत पध्दत यावर उत्पादक काहिच बोलत नाहि, उत्पादक फक्त गायीचे तुप / म्हशीचे तुप या प्रकारचे तुप महाराष्ट्रात विकले जाते. दुधाची उपलब्धता जर विपुल प्रमाणात असती तर भेसळिचे दुध बेमालुमपणे विकले गेले नसते, तुपाबद्द्ल काय बोलायचे ???
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Wed, 08/09/2017 - 12:56 नवीन
बाजारातले तूप गोलमाल वाटते- म्हणून मी गायीच्या दुधाचे लोणी आणून घरी तूप बनवणे पसंत करतो!
  • Log in or register to post comments
I
II श्रीमंत पेशवे II Wed, 08/09/2017 - 13:00 नवीन
हे सर्वात बेश्ट ............ जे काय होईल ते आपल्या समोर .......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
क
कंजूस Wed, 08/09/2017 - 17:22 नवीन
@ II श्रीमंत पेशवे II सविस्तर प्रतिसाद आवडला. "तूप /चरबीची तपासणी अथवा अन्या खाद्यपदार्थाची तपासणी" एक उदा० समुद्राच्या पाण्याचे मीठ, काही खाणींमधले मीठ,काळे मीठ,लवण वगैरे यामध्ये सोडिअम क्लोराइडचे प्रमाण वेगळे आढळते. खाणीतल्या मिठात मंग्नेसिअम कमी असते. एकूण मीठ हे सोडिअम क्लोराइडसह इतर क्षारांचे मिश्रण असते. २)तूप तेले ही अशीच मिश्रणे आहेत. म्हशीच्या दुधात सहा ते आठ कार्बन साखळीची संयुगे अधिक असतात तर चारवाली कमी असतात. गायीच्या दुधात उलट असते. लहान साखळीची संयुगे लगेच पचतात. हेच गुणोत्तर तुपात परावर्तीत होते. नक्की काय मिश्रण म्हणजे अमुकच वस्तू असे नाही. ३) केमिकल टेस्ट दोन्हित एकच उत्तर देत असेल तर कसा निर्णय देणार हा प्रश्न राहतो. ४)अजून एक उदाहरण - नैसर्गिक लॅटेक्स रबरातले ९८% संयुग कृत्रिम रबरात असतात तरीही ते उरलेले दोन टक्के फार मोठा फरक करतात गुणधर्मात. आता ९८ -१०० मध्ये फारसा फरक नाही पण विमानाचे टायरला फरक पडतो. लॅटेक्सचा तापला जलद तरी फाटत नाही. किंमत मोजावी लागते
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड गुरुवार, 08/10/2017 - 12:35 नवीन
पतंजलीच्या प्रॉडक्ट्स संबंधी निर्णय अन सगळे मिठाच्या चिमटी सोबत घ्यावे, ह्याला सहमत आहे, पण 'कारवान मासिक' परातभर मिठासोबतच घ्यावं, कारवान सुद्धा डाव्या विचारांचेच मासिक आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments
स
सुजल Fri, 08/11/2017 - 19:45 नवीन
योगेश लक्ष्मण बोरोले यांची प्रतिक्रिया एकदम पटली . मलापण त्यांची प्रोडक्ट्स फ्राॅड वगैरे वाटत नाहीत जी काही उत्पादन वापरली आहेत ती चांगली आहेत
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Sat, 08/12/2017 - 10:02 नवीन
स्पष्ट आहे लेखकाला पतंजली बाबत काही हि माहिती नाही. बहुतेक पतंजली म्हणजे बाबाजी या पलीकडची उडी नाही. पतंजली फूड पार्क इथली प्रयोगशाळा उत्तर भारतातील सर्वात मोठी प्रयोगशाळा आहे. वस्तू नव्हे तर पेकिंग साठी वापरणाऱ्या वस्तू हि इथे टेस्ट. होतात. कुठल्याही खाद्य क्षेत्रात कार्यरत कुठल्याही संस्थे जवळ एवढी मोठी प्रयोगशाळा नाही. सरकारी संस्थान्जवल ही नहीं. १. पतंजलीचा कुठलाही प्रोडक्ट गुणवत्तेच्या आधारावर बाद झालेला नाही आणि बाजारातून कधीच परत केला गेला नाही. तकनिकी आधारावर काही आक्षेप राजकीय दबावमुळे आले पण पदार्थावर कधीच टिप्पणी झाली नाही आहे. अधिकांश आक्षेप misleading प्रचारावर आहे. (आयुर्वेदिक पदार्थांना अजून औषधी दर्जा नाही). ( विको वर हि असेच आरोप झाले होते. सर्वोच्च न्यायालयात त्यांनी शेवटी केस जिंकली. त्यांच्या प्रगती वर ब्रेक मारण्यात त्यावेळी mncच्या इशार्यावर आणि भ्रष्ट नौकरशाही यशस्वी झाली होती. बहुतेक 'अभिजित' दिवाळी अंकात विकोच्या मालकाचा या विषयावर लेख वाचला होता ) ५०० कोटी खर्च करून आयुर्वेदिक रिसर्च केंद्र बांधण्यात आले आहे. आज ३०० scientist तिथे कार्य करत आहे. १५० कोटीहून जास्त प्रतिवर्ष खर्च आहे. २. पतंजलीचे गायीचे तूप १०० टक्के शुद्ध आहे. कुठलेही कार्य सुरु करण्याआधी पूर्ण सर्वे केल्या जातो. गाईच्या दुधाची गुणवत्ता तपासण्यासाठी पूर्ण देशातून ५००० हून जास्त नमुने घेतले. त्यात महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळ नाडू आणि केरला इथले ८५ ते ९५ टक्के नमुने शुद्ध होते. पतंजली साठी मख्खन कर्णाटक मिल्क को. आणि महाराष्ट्र तामिळनाडू आणि केरला येथील संस्था पाठवितात. ३. पतंजलीचे मध १०० टक्के शुद्ध आहे, आता लोकांना भेसळ खायची सवय आहे तर त्याला कुणी काही करू शकत नाही. ४. बाकी कुठल्याही खाद्य प्रसंस्करण मध्ये कार्यरत अधिकार्याला विचारा, तोच तुम्हाला सांगेल समान गुणवत्तेची वस्तू पतंजली १००रुपयात देत असेल तर दुसरी १३०च्या खाली देऊ शकत नाही. कारण मालकाला किमान २० टक्के नफा पाहिजे, प्रचारावर २० टक्के आणखीन. पतन्जलीचा प्रचारावर खर्च अडीच टक्के गेल्यावर्षी होता आणि लाभांश फक्त ५ टक्के आणि १०० एक उत्पादने बिना लाभ हानीचे. ५. आजच घरी डोक्याला लावणारे तेल तपासून बघा. बहुतेक आपण पामोलीन आणि पेट्रोलियम पदार्थ महागात विकत घेऊन डोक्यावर लावत असल. ६. बाकी हरिद्वार फूड प्रोसिसिंग प्लांटची क्षमता २५००० टन आहे जी देशात सर्वात जास्त आहे. आसामची १५००० हजार टन ( फ़क्त ३ महिन्यात जंगला पासून एक प्लांट तिथे सुरु झाला, त्याचा आकार पाहिल्यावर अमेरिकेत ही हे संभव झाले नसते, ते भारतीय आणि असामी ठेकेदार आणि मजूरानी करून दाखविले). नागपुर, नॉएडा , विशाखापत्तनम, इंदौर, इत्यादी पुढील २ वर्षांत १ लाख टन फ़ूड प्रोसेस पतंजलि करेल. (टीवी वर उदघाटनचे चित्र बघितले होते. नोव. मध्ये शिल्यान्यास आणि मार्च शेवटी उत्पादन सुरु). ७. पतंजलीचा कुठलाही पदार्थ बाहेर बनत नाही. फक्त पतंजली ग्रामोद्योगचे (पापड इत्यादी सोडून). ८. बाकी mncच्या कुठल्याही कंपनी जवळ एवठे मोठे प्लांट आहेच नाही. शेवटी पतंजलिचे रसायन विहिरीत डबल फ़िल्टर तेल रिफाईन्द तेल पेक्षा निश्चित चांगले. गेल्या ३ महिन्यांपासून वापरतो आहे. मी स्वत: उपभोक्ता मंत्रालयात १६ वर्षे कार्य केले आहे. कुठला ही पदार्थ आत काय आहे हे वाचल्याशिवाय घेत नहीं. शेवटी भारताचा पैसा भारतात राहणार आणि समाजाच्या विकासाच्या साठी खर्च होणार. प्रत्यक्ष होतो आहे स्वत: खात्री करू शकतात.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sat, 08/12/2017 - 12:18 नवीन
आसाममध्ये जंगल तोडून बनवलेला अवाढव्य प्लांट (तसा असेल तर) हा चिंताजनक भाग सोडून उरलेला प्रचंड हास्यास्पद आणि भाभडा प्रतिसाद. अशा प्रतिसादातून दिसणार्‍या भक्तीतच बाबांचे व्यावसायीक यश दडलेले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
A
arunjoshi123 Sat, 08/12/2017 - 14:26 नवीन
का म्हणे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
व
विवेकपटाईत Tue, 08/15/2017 - 06:30 नवीन
प्रिय अभ्या तुमच्या ज्ञानाची कीव येते. मुद्देसूद प्रतिसादाला उत्तर देण्यास असमर्थ ठरल्यास प्रतिसादाला बगल देणे आणि दुसर्याची खिल्ली उडविण्याचा प्रकार करणार्याला काय म्हणावे. बाकी प्रतिसाद देण्याआधी माहिती मिळवली पाहिजे तसे न करता बिना माहितीचा प्रतिसाद देतात. "आसाममध्ये जंगल तोडून बनवलेला अवाढव्य प्लांट (तसा असेल तर)" तुमचे अज्ञान प्रगट करते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ब
बार्नी Sun, 08/13/2017 - 07:23 नवीन
व्हाटसाप्प वर शोभेल असा प्रतिसाद . असो. “भारतातील पैसा भारतात राहील” ह्या बिन डोक जाहिरातीवर विश्वास ठेवणे सोडा. अर्थशास्त्राची माहिती नसणार्या जनतेला फसवण्यासाठी अशा युक्त्या वापरल्या जातात. “प्रोटेक्शनिस्म” चा अर्थव्यवस्थेला फायदा होत नसून उलट तोटाच होत असतो . सर्वात जास्त तोटा हा “डोमेस्टिक” उपभोक्त्यांना होत असतो. वाचा "Comparative advantage". ह्यामुळे संशोधनास खीळ बसते आणि “Consumer Surplus” घटतो. Overall, economics tells us that the benefits of trade are greater than the costs for economies as a whole, so that the winners could conceivably compensate the losers and still be better off. अधिक वाचनासाठी. What’s so bad about protectionism? If Free Trade Is Bad, Protectionism Is Far Worse! अजून , बाबा रामदेव ज्या उत्पादनावर टीका करतात त्यातील बरीच उत्पादने भारतात तयार होतात, ज्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला फायदाच होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा