Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रामदेव व पतंजलीच्या प्रोडक्ट्स आपले मत काय आहे?

ब
बार्नी यांनी
Tue, 08/08/2017 - 08:29  ·  लेख
लेख
नुकतेच प्रियांका पाठक – नारायण ह्यांचे “Godman to tycoon –The untold story of Baba Ramdev” नावाचे पुस्तक प्रकाशित झाले.तसेच आंतरजालावर हा पुस्तक परिचय वाचनात आला म्हणून उत्सुकता वाढलेली आहे. मी पतंजली चे प्रोडक्ट्स कधी वापरले नाहीत. परंतु आंतरजालावर थोडा अभ्यास केल्यानंतर , पतंजलीच्या उत्पादनांच्या मागील काही चिंताजनक गोष्टी आढळून आल्या. उदाहरणार्थ , पतंजली चे गायीचे तूप हे गायीचे नसल्याचा दावा एस. के . पात्रा ह्या त्यांच्या EX-CEO ने केला आहे. “कारवान “ मासिकाने त्याबाबत एक लेख प्रकाशित केला आहे. तसेच त्यांची काही उत्पादने FSSAI च्या टेस्ट्स मध्ये नापास झाल्याचे समजले. तसेच त्यांच्या जाहीराती ह्या फसव्या असल्याचा दावा इतर कंपन्यांनी केल्याचे वाचनात आले. रामदेव हे कमालीचे हुशार व्यापारी आहेत हे माझे वैयक्तिक मत आहे. त्यांच्या उत्पादनांबाबत मी आधीपासूनच साशंक होतो. जर आपण त्यांची उत्पादने वापरली असल्यास आपला काय अनुभव होता हे जाणण्यास उत्सुक.

प्रतिक्रिया द्या
20611 वाचन

💬 प्रतिसाद (70)

प्रतिक्रिया

ग
गामा पैलवान Mon, 08/14/2017 - 08:58 नवीन
बार्नी, कंप्यारेटिव्ह आडव्हांटेज थियरी च्या दुव्याविषयी धन्यवाद. वरवर चाळला तेव्हा हे सापडलं :
David Ricardo developed the classical theory of comparative advantage in 1817 to explain why countries engage in international trade even when one country's workers are more efficient at producing every single good than workers in other countries. He demonstrated that if two countries capable of producing two commodities engage in the free market, then each country will increase its overall consumption by exporting the good for which it has a comparative advantage while importing the other good, provided that there exist differences in labor productivity between both countries.
हाच न्याय पतंजलीच्या उत्पादनांना लावूया. जेव्हा ही उत्पादने बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या देशांत निर्यात होऊ लागतील, तेव्हा आणि फक्त तेव्हाच बहुराष्ट्रीय कंपन्यांना भारतात उत्पादने विकायची परवानगी देण्यात यावी. आधीपासून नको. आगोदर भारतातल्या भारतात पतंजलीची उत्पादने जोर धरू द्यावीत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बार्नी
प
पुंबा Wed, 08/16/2017 - 09:09 नवीन
पतंजलीचे मध १०० टक्के शुद्ध आहे, आता लोकांना भेसळ खायची सवय आहे तर त्याला कुणी काही करू शकत नाही.
काका काय वाट्टेल ते बोलताय आता मात्र तुम्ही.. पतंजलीचा मध भिकार आहे हे आमचे इतर कंपन्यांचे तसेच प्रत्यक्ष रानातून काढून आणलेला मध वापरून मग पतंजलीचा मध वापरल्यानंतर झालेले मत आहे. भेसळ खायची सवय वगैरे फालतू मुद्दे सोडा. इथेच बघा किती लोकांना मध आवडलाय ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
व
विनिता००२ Sat, 08/12/2017 - 10:22 नवीन
पतंजलीची बरीच उत्पादने वापरतेय. मस्त आहेत. मला तरी आवडतात.
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Sat, 08/12/2017 - 15:48 नवीन
चमचाभर मध पाण्यात घालुन बघावा. विरघ़ळला तर फ्रॉड मध आहे समजावे. पतंजलीचा अगदी व्यवस्थित विरघळतो. डाबरचा थोडा विरघळतो बराचसा तसाच रहातो. एका मित्राबरोबर न्युझीलंडवरून मागवला होता. अगदी जसाच्या तसा राहतो तो मध पाण्यात टाकल्यास. सो जर कोणी सगा सोयरा येणार असेल फारीनहून तर त्याच्याबरोबर मागवावा मध. चांगला मिळण्याचा चांस वाढतो.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Sun, 08/13/2017 - 15:05 नवीन
मीच एकटा बाहेर पडलेला, ढेरे साहेब, भारतीय काही असलं ऑप्शन तर सुचवा की हो. आम्ही लहान असताना आजोबा उत्तर प्रदेश ग्रामोद्योग महामंडळ का खादी मंडळाचे मध आणत असत, 'कैलाश ग्लोरी' का काय नाव मधाचं, आजकाल मिळतो का नाही कोणास ठाऊक, अन तेव्हा तरी शुद्ध होता की नाही देव जाणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
अ
अनुप ढेरे Mon, 08/14/2017 - 07:50 नवीन
मिपाकरांच्या वार्‍या होत असतात की! मागवा की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
ज
जेम्स वांड Mon, 08/14/2017 - 10:58 नवीन
मिपाकरांपैकी कोणी मित्र नाहीत, भविष्यात होतील असे वाटतही नाही. त्यामुळं शुद्ध मधाला ह्या पर्यायाने तरी आम्ही मोतादच राहू, असो, दुसरे काही मार्ग असल्यास तपासूच, तुमचे आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
अ
अनुप ढेरे Mon, 08/14/2017 - 11:26 नवीन
खाली मुनिवर्य म्हणतात तो पर्याय ट्राय करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
ह
हतोळकरांचा प्रसाद Mon, 08/14/2017 - 10:46 नवीन
सातमहाचा वापरून बघा, बहुतेक सगळ्या मेडिकल्स मध्ये मिळतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
र
रेवती Wed, 08/16/2017 - 17:59 नवीन
महाराष्ट्र शासनाचाही मिळतो ना? ग्रामोद्योगाच्या दुकानात मिळतो तो आम्ही आणायचो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
क
कपिलमुनी Sun, 08/13/2017 - 15:07 नवीन
महाबळेश्वर च्या केंद्रामधून किंवा शिवाजीनगर सरकारी केंद्रामधून घ्यावा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
अ
अनुप ढेरे Mon, 08/14/2017 - 07:07 नवीन
हे केंद्र पाहिलं आहे. ट्राय करायचय अजून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
A
arunjoshi123 Mon, 08/14/2017 - 10:20 नवीन
मधाबद्दल अंधश्रद्द्धा पसरवणे बंद करा अनुपजी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
म
मनिमौ Mon, 08/14/2017 - 06:37 नवीन
आले होते
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Mon, 08/14/2017 - 08:36 नवीन
पतंजली हा FMCG क्षेत्रातील इतर उद्योगाप्रमाणे एक उद्योग आहे. त्यात स्वदेशी आणि देशप्रेम वगैरे पाहणे हा भाबडेपणा आहे. ज्यांना पतंजलीची उत्पादने आवडतात ते ती घेतील. ज्यांना नाही आवडत किंवा उत्पादनांमध्ये भेसळ असते असे वाटते त्यानी ती घेऊ नयेत. हाकानाका.
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 08/15/2017 - 07:32 नवीन
सहमत आहे. शिवाय ते मार्केटमधे स्पर्धा करत आहेत. मोनोपॉली होईल असे संरक्षण वगैरे सरकारकडे थेट मागितल्याचे कुठे वाचले नाही. लोकांच्या भावनांना हात घालून जाहिरात करणे हे नियमबाह्य समजले जात नसावे. निव्वळ भावनांवर आधारित ग्राहक एकदा मिळतील पण ते दीर्घ मुदतीत टिकवायचे असतील तर भारतात तरी सतत विनाव्यत्यय पुरवठा, चांगला दर्जा आणि स्पर्धकांपेक्षा कमी किंमती हे सातत्याने देत रहावे लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सही रे सई Wed, 08/16/2017 - 15:49 नवीन
निव्वळ भावनांवर आधारित ग्राहक एकदा मिळतील पण ते दीर्घ मुदतीत टिकवायचे असतील तर भारतात तरी सतत विनाव्यत्यय पुरवठा, चांगला दर्जा आणि स्पर्धकांपेक्षा कमी किंमती हे सातत्याने देत रहावे लागेल. किती योग्य शब्दात मांडलसं पैसा ताई..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ड
डँबिस००७ Mon, 08/14/2017 - 09:11 नवीन
रामदेव बाबाची दंतकांती टुथपेस्ट वापरण्या ऐवजी कोलगेट वेदशक्ती टुथपेस्ट वापरा ! ५००० वर्षांच्या संशोधनाने बनवलेली आहे १
  • Log in or register to post comments
ए
एस Mon, 08/14/2017 - 09:55 नवीन
पुण्यातला 'सातमहा' ब्रँडचा मध अतिशय उत्तम आहे. मिक्स फुलांचा मिळतोच, शिवाय फक्त शेवग्याच्या फुलांचा, कारवीचा, जांभूळ फुलांचा, हिरड्याचा इत्यादी प्रकारचा मधही मिळतो. खूप छान चव असते वेगवेगळ्या प्रकारांची.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Wed, 08/16/2017 - 09:39 नवीन
रामदेव बाबांचे मीठ म्हणे 'प्राचीन हिमालयन रॉक बेड्स मधून काढलेले आहे' अन त्या पाकिटावर एक्सपायरी डेट आहे, म्हणजे एकंदरीत बाबांनी बरोबर अब्जावधी वर्षांनंतर एकदम एक्सपायर व्हायच्या आधीच, ते मीठ खोदून काढले आहे बहुतेक असा काहीसा आशय होता त्या मॅसेजचा :D
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा