Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गणेशोत्सव हायजॅक ?

प
पगला गजोधर यांनी
Sat, 08/12/2017 - 08:14  ·  लेख
लेख
"शिवजयंती सार्वजनिक उत्सव", याचे जनक महात्मा फुले असून, तो उत्सव हायजॅक होऊन, दुसऱ्या कोणाच्या नावे प्रोपागेंडा केला जात असू शकतो काय ?, याबाबत मागे मिपावर मी एक धागा काढला होता. (रेफ: शिवजयंती हायजॅक ) असो आता "सार्वजनिक गणेशोत्सवाचे" जनक कोण ? यासाठी भाऊ रंगारी गणेश मंडळांच्या विश्वस्तांनी थेट न्यायालयात याचिका दाखल करुन न्याय मागणार असल्याचे म्हटले आहे. इतिहासाचे चुकीचे लेखन करुन, बाळ गंगाधर टिळक यांच्या नावे गणेशोत्सव सुरु केल्याचे दाखविण्यात आले असले, तरी वास्तविकता मात्र वेगळीच आहे. गणेशोत्सव कुणी सुरू केला असा प्रश्न आला तर उत्तर तोंडपाठ…लोकमान्य बाळ गंगाधर टिळक…हे आपल्याला अगदी शाळेपासून शिकवले गेले. पण गणेशोत्सव टिळकांनी नाही तर भाऊ रंगारी यांनी सुरू केला असा दावा या गणेश मंडळांच्या विश्वस्तांनी केला आहे. गेल्यावर्षी सुध्दा या मंडळाने महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सरकारने त्याकडे कानाडोळा केल्यानेच अखेर भाऊ रंगारी गणपती ट्रस्टने न्यायालयात याचिका दाखल केली. 1892 साली भाऊ रंगारी यांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली. 1892 साली आणखी 3 मंडळांकडून गणेशाची स्थापना झाली. 1893 साली गणेश मंडळांची संख्या वाढून 20-25 वर गेली. 1894 साली विंचूरकर वाड्यात लोकमान्य टिळकांकडून गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली तर लोकमान्य टिळक सार्वजनिक गणेश उत्सवाचे जनक कसे? फार फार तर त्यांना प्रचारक म्हटले गेले पाहिजे नाही का ? तुम्हाला काय वाटते ? (जाता जाता अवांतर : नामांकित न्यूज ब्युरो च्या संदर्भाने ... "राज्य शिक्षण मंडळाच्या सातवी व नववीच्या अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहासच वगळण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत झालेल्या बैठकीनंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे." या बातमी मागच्या बातमीचा वर वरील उल्लेखलेल्या हायजॅकिंगच्या घटनांमागील एम. ओ. मधे काही साम्यस्थळे आढळतात काय ?)

प्रतिक्रिया द्या
28919 वाचन

💬 प्रतिसाद (128)

प्रतिक्रिया

म
मैत्र Mon, 08/14/2017 - 14:50 नवीन
डॉक्टर http://www.misalpav.com/comment/953889#comment-953889 हा धागा कर्त्याचा स्पष्ट हेतू आहे. गणेशोत्सव इतिहास हा नाही.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
M
mayu4u Mon, 08/14/2017 - 14:13 नवीन
... केवळ गणपतीची आरती रचली; कारण त्यात स्पष्ट लिहिलंय, रघुकुलटिळक रामदासा अंतरी... असं नवसंशोधन लौकरच प्रसिद्ध होऊ शकेल, अशी शंका आहे.
अ
अभ्या.. Mon, 08/14/2017 - 14:20 नवीन
अतिच हे, फार मनस्ताप होतोय का पाहिजे तसा इतिहास खरोखर तसा नाहीये म्हणून?
↩ प्रतिसाद: mayu4u
M
mayu4u Mon, 08/14/2017 - 14:45 नवीन
तूच एक समजू शकला माही दर्दभरी कहाणी!
↩ प्रतिसाद: अभ्या..
प
पैसा Mon, 08/14/2017 - 14:28 नवीन
कारण त्यात टिळक आणि रामदास अशी दोन त्याज्य नावे आहेत. इतिहासाबरोबरच इतर सर्व साहित्याचे शुद्धीकरन ही काळाची गरज आहे.
↩ प्रतिसाद: mayu4u
प
पगला गजोधर Mon, 08/14/2017 - 14:38 नवीन
ताई,
इतिहासाबरोबरच इतर सर्व साहित्याचे शुद्धीकरन ही काळाची गरज आहे
अवांतर :- "शुद्धीकरण करणे " अशी मानसिकता ठेवणाऱ्या लोकांना, उदा. मौजीबंधनावरून छोट्या लेकरांची, शुद्धीपत्रके मागणारी मनोवृत्ती, टिळकांनी दुसऱ्या धर्मीय व्यक्तीच्या घरी चहा प्यायला, म्हणून प्रायश्चित शुद्धी मागणारी जमात, यांना शुद्धीकरणाचे अप्रूप, तसल्या लोकांना सान्गा कृपया.
↩ प्रतिसाद: पैसा
स
सुबोध खरे Mon, 08/14/2017 - 14:41 नवीन
पगला गजोधर तुमचा मूळ चेहरा आता समोर येत आहे असेच मी म्हणेन
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Mon, 08/14/2017 - 14:46 नवीन
असोच
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
M
mayu4u Mon, 08/14/2017 - 14:48 नवीन
सर, हा धागा आला तेव्हाच कळायला हवं होतं...
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
प
पैसा Mon, 08/14/2017 - 14:54 नवीन
मी सिरीयस आहे. माझा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे. कारण तुम्ही इतिहास वाचला आहे हे या प्रतिसादावरून दिसतंय. मग जी माहिती सहज उपलब्ध आहे तिचा शोध न घेता "टिळकांनी उत्सव हायजॅक केला" वगैरे भडकाऊ भाषा का वापरावीत? प्रामाणिकपणे उत्तर द्या. जर तुम्हाला खरोखर मिपाकरांकडून निकोप चर्चा हवी होती तर हा चर्चा प्रस्ताव नीट भाषेत लिहिता आला असता ना? असली भाषा वापरणाऱ्या लोकांच्या दाहशतीपुढे आम्ही सपशेल लोटांगण घालतो कारण आम्हाला हुतात्मा व्हायचे नसते. थोडक्यात म्हणजे "तू मोठा, तू बरोबर" म्हणून बाजूला होणे मला तरी शहाणपणाचे वाटते. मी जरा कडक भाषेत लिहीत आहे तरी अजून ताई म्हणता आहात, म्हणून जाहीर रीत्या हे सांगितले. नाहीतर दुर्लक्ष करून गेले असते. जयंत कुलकर्णी यांच्यासारखे अभ्यासू सदस्य जेव्हा काहीतरी सांगतात तेव्हा ते सकारात्मक घ्या. मिपाची काळजी खरोखर असेल तर असली भाषा यापुढे टाळा. दुसरा काही अजेंडा असेल तर मात्र हे सगळे सांगणे फुकट आहे. अधिक उणे बोलल्याबद्दल क्षमा असावी.
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Mon, 08/14/2017 - 15:10 नवीन
अहो ताई, "टिळकांनी उत्सव हायजॅक केला" असे मी लिहिलंय हा पूर्वग्रह जरा बाजूला ठेवून, "टिळकांच्या नावाखाली कोणी, त्यांच्या पश्चात, उत्सव हायजॅक केला असू शकतो का ?" (कारण त्यांना तसं करायचं असतं तर मैत्र म्हणतायेत त्या प्रमाणे स्मरणिकेत फेरफार आढळला असता, नाही का ?) असं लिहिलंय समजून परत व्यक्त व्हा बरे. कुठलेही कारण नसताना मी कोणाशीही अभद्र शब्दात प्रत्युत्तर दिलेलं नाही, परंतु माझ्यावर विनापुरावा ब्रिगेडी किंवा आणखी बरंच फैरी झडतात, त्याबद्दल मात्र शांतता दिसतेय इथे. असो, तुम्ही क्षमा मागण्याचा संबंध नाही, कारण तुम्ही कठोर शब्दात तुमचं मत व्यक्त केलंय. उलट अजाणता हिट ऑफ मोमेन्टमधे माझी चॉईस ऑफ वर्ड चुकली असेल, तर मला क्षमा करा
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Mon, 08/14/2017 - 15:26 नवीन
या शब्दाच्या अर्थापासून सुरुवात करा बघू. आपण शाळेत जे शिकलो, या धाग्यावर अनेकजण जे सांगत आहेत, तत्कालीन लिखाणात जे अनेकांनी निसंदिग्ध लिहून ठेवले आहे की लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने मुंबई आणि पुण्यात 1893 साली सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाले. रंगारी गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत लोकमान्य हजर होते आणि ते लोकांना कळताच तिथे मोठ्या संख्येने लोक जमा झाले इत्यादी उल्लेखही आहेत; या सगळ्याचा अर्थ काय? स्वतः लोकमान्यांनी लोकांना सांगितले का माझ्या नावावर खपवा? का ब्रिटिशांचाही हायजॅक च्या कटात भाग होता? जर सुरुवातीपासून हे लिखित उल्लेख आहेत, आणि सोलापूरच्या उल्लेखवरून दिसते की ती लोकमान्यांची प्रेरणा आहे, तर हा वाद आता उकरायचे कारण काय? तुम्ही इथे बाबरी वगैरे संबंध नसलेले लिहिले त्याबद्दल तर मी बोलताच नाहीये. हायजॅक चे उदाहरण पाहिजे असेल तर संभाजी राजांची प्रतिमा त्यांच्या मृत्यूनंतर लोकात बिघडवणे हे त्यांच्या विरोधक लोकांकडून इतिहासाचे हायजॅक होते. जी घटना घडली त्या दिवसापासून जे वर्णन समकालीन लिखाणात दहा लोकांकडून आले आहे ते स्वीकारले पाहिजे. त्याला तुम्ही हायजॅक म्हणून नाकारत असाल तर त्यामागे इतर काही कारण असणार हा साधा हिशेब आहे.
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Mon, 08/14/2017 - 15:59 नवीन
हायजॅक म्हणजे जे आपलं नाही त्याचे हरण करणे. आता तुम्ही कसे बघताय धाग्याकडे त्यावर अवलंबून आहे, अभ्या यांनी सांगितले सोलापूरचा गणपती पहिला, व त्या संधर्भात त्यांनी काही मटेरियल ही पुरवले, या धाग्यावर अश्या प्रकारच्या प्रतिक्रिया मला अपेक्षित होत्या. आता राहिलं बाबरी वैगरे चा उल्लेख, तो मी काही शून्यातून केलेल नाही, त्या आधीच्या प्रतिक्रिया कश्या होत्या त्यानुसार मी दिलेलं उत्तर होत. जिथे मला प्रतिक्रिया (माझ्या मता विपरीत असली तरीही ) योग्य वाटली, तिथे मी धन्यवाद सुद्धा दिलेले आहे, याकडे सोईस्कर रित्या दुर्लक्ष होऊ नये. जर हागणदारी वैगरे शब्दयुक्त प्रतिक्रिया आल्या तर, मी बौद्धिक चिंतन वैगरेला फाटा देऊन उत्तर दिलेल आहे, देत राहीन, आरेला कारे मी करणारच, पण त्याच बरोबर आपल्या सारख्या वडीलधाऱ्या मेम्बरांनी कडक शब्दात प्रतिक्रिया दिल्या, तरीही मला तुमच्या बद्दल कुठलेही मनात कलुषितपणा नाही, याची मी आपल्याला ग्वाही देतो. वाद मी उकरून काढला नसून, न्यायप्रविष्ट वादाबद्दल माझ्या कुतूहलापोटी हा धागा काढलाय. हा धागा मी काढला नसता तर मला अभ्या यांनी दिलेली माहिती, कि जी मला पूर्वी अज्ञात होती, माहिती झाली नसती. माझा साधा थीओरम होता, वर्ग संघर्षामध्ये ज्या वर्गाच्या हाती सत्ता असते, तो आपल्यास अनुकूल इतिहास ठेवतो, प्रतिकूल इतिहास बदलण्याचा प्रयत्न करतो किंवा इतिहास दाखले नष्ट करण्याचा प्रयत्न करतो, उदा. आयसिस सीरियामधील सर्व ग्रंथगृहें म्युसिअम नष्ट केली प्लास्टिक एक्सप्लोसिव्ह वापरून. आणि हो संभाजी राजांच्या चरित्र कलुषित करणाऱ्या मास्टर माईंड शक्तींचा चेहेरा खरंच जगापुढे येवो अशी माझीही विश्व चरणी प्रार्थना आहेच.
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Mon, 08/14/2017 - 16:11 नवीन
सार्वजनिक गणेशोत्सव हायजॅक झाला नाही. अशी चर्चासुद्धा पहिल्या ११० -२०वर्षात झाली नाही आणि टिळकांच्या पश्चात नव्हे तर त्यांच्या हयातीत पुणे आणि मुंबईच्या अगदी पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रेरणा म्हणून श्रेय त्यांच्या विरोधकांनी सुद्धा त्यांना दिले होते. इथे वर्गाकलह वगैरे कुठे आला?
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Mon, 08/14/2017 - 16:34 नवीन
तेच तर म्हणणे आहे, सत्ता व परिघातील वर्ग , हा त्यापरिघाबाहेरील वर्गावर नियंत्रण राहावे म्हणून, (नेहमीच नाही पण बहुतेक वेळा )प्रतिकूल इतिहास बदलतो किंवा नष्ट करतो किंवा तसा प्रयत्न करतो, असं मला वाटतं (मी चूकही असू शकेन). आता नका याच वेळी हा विवाद का उपस्थित व्हावा , आधी का नाही झाला ? मला दोन शक्यता वाटतात (इथेही मी चूकही असू शकेन) शक्यता १. आत्ता जनमानसात जे चित्र आहे ते ऐतिहासिक दृष्ट्या बरोबर आहे, पण आता काही नतद्रष्ट लोक इतिहास अपडेट करण्याचा प्रयत्न करा आहे . किंवा शक्यता २. खरंच इतिहासात फेरफार झालेला आहे, व पूर्वी काही कारणामुळे तो उघडकीस नाही आला, किंवा पूर्वी त्याला दाबून ठेवण्यात, दाबून ठेवणाऱ्याला यश आले, पण सध्या सत्ता समीकरण बदलल्यामुळे, आता ह्या गोष्टींना त्यांना नियंत्रणात ठेवता आल्या नसल्यामुळे, सध्या हा प्रश्न उपस्थित झाला / करता येऊ शकला असेल.
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Mon, 08/14/2017 - 16:51 नवीन
अजून फुकट घालवायला माझ्याकडे वेळ नाही. तुमचे चालू द्या. इतिहासात फेरफार या केसमध्ये झालेला नाही. आरडाओरडा करून तुम्ही लोकांना तसे कबूल करायला भाग पाडू शकाल कदाचित पण जगात सगळीकडे विखुरलेले पुरावे कोणालाही नाहीसे करता येणार नाहीत.
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Mon, 08/14/2017 - 17:13 नवीन
"आरड़ा ओरडा" या तुमच्या शब्दला माझा आक्षेप असला तरी, एक गोष्ट सखेद नमूद करतो, की जर पुन्हा पुन्हा तेच मान्य करायला सांगणे, हे एका बाजून होताना दिसत नाहीये. असोच
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Mon, 08/14/2017 - 16:36 नवीन
हायजॅक शब्दाला माझा अजूनही आक्षेप आहे. जी गोष्ट आहे की नाही हे तुम्हाला माहिती नाही त्याबद्दल पूर्वग्रह ठेवून लिहिणे थांबवा.
↩ प्रतिसाद: पैसा
प
पगला गजोधर Mon, 08/14/2017 - 16:40 नवीन
तुम्ही समर्पक शब्द सुचवा, मी तो मान्य करेन.
↩ प्रतिसाद: पैसा
M
mayu4u Mon, 08/14/2017 - 15:27 नवीन
मग http://www.misalpav.com/comment/953909#comment-९५३९०९ यावर तुमचं मत सांगा पाहू.
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
म
मैत्र Mon, 08/14/2017 - 15:47 नवीन
अहो तुम्हाला माहिती सह नीट सांगितलं की केसरी वाड्यासह कोणी ही फेरफार, तुमच्या भाषेत हायजॅक केले नाहीये. पुण्यात लोकांना भाऊ रंगारी माहिती आहेत. तुम्ही हे मान्य करायचे सोडून त्या माहितीचा मुद्दाम विपर्यास करताय. परत लिहिले की रंगारी गणपती आधी होता तरी * सार्वजनिक * उत्सव प्रणेते टिळक होते आणि हेही शतक महोत्सवात मांडले होते. तेव्हा वाद झाला नाही. आता उकरून वाद निर्माण केला जातो आहे. मग तुम्हाला म्हणायचे का की ब्रिगेड तेव्हा नव्हती म्हणून वाद नाही झाला. बहुधा बोलविता धनी राष्ट्रवादी पण नव्हती. राजकारण म्हटले तर टिळक कुटुंब कॉंग्रेस चे, तेव्हा पंचवीस वर्षे पूर्वी सत्ता कॉंग्रेस ची. ना त्यांना अडचण आली, ना विरोधी भाजपला, ना राज्य सत्ता असलेल्या पवारांना. मग आत्ता हा मुद्दा करून काय साध्य केले जात आहे? तुमचा चॉईस ऑफ वर्ड समजून उमजून वाटतो आहे. 125 वर्षे जुने संदर्भ आत्ता कोणी पाच दहा वर्षांत हायजॅक केले असे म्हणणे हास्यास्पद आहे. वातावरण मुद्दाम कलूषित करणे टाळा
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
ज
जयंत कुलकर्णी Mon, 08/14/2017 - 15:17 नवीन
जाऊ देत ! त्यांना आनंद मिळतोय ना ...चालू देत... :-)
↩ प्रतिसाद: पैसा
ज
जयंत कुलकर्णी Mon, 08/14/2017 - 15:27 नवीन
पग, "तसल्या लोकांना सांगा कृपया...'' तसले लोक म्हणजे कोणते आणि कसले? आणि तसले लोक आता तसे वागतात का ? मग तिनशे वर्षापूर्वीचा उदा. आत्ता देऊन तुम्ही काय साधत आहात हे कळेल का? ही जमात कुठली?
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Mon, 08/14/2017 - 15:31 नवीन
तसले म्हणजे, समोरच्याला विनापुरावा "ब्रिगेडी" म्हणणारे.
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
ज
जयंत कुलकर्णी Mon, 08/14/2017 - 15:58 नवीन
पगसाहेब, तुमचा पूर्ण प्रतिसाद वाचा आणि मग उत्तर द्या. वेळ घेतला तरी चालेल. कारण ते कळल्याशिवाय तुम्ही कोण आहात हे कळणार नाही. तुम्हाला येथील बहुसंख्य लोक ब्रिगेडी समजत नाहीत पण तुमचे धागे वाचून आता सगळ्यांना तसा संशय येत चालला आहे हे मात्र खरं... :-) बरं असो. हा शेवटचा प्रतिसाद कारण जमात इ. हे शब्द वाचणे माझ्या कुवतीपलीकडे आहे.... तुमच्याच भाषेत सांगायचे झाल्यास, " असोच". :-)
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
स
सुबोध खरे Mon, 08/14/2017 - 17:16 नवीन
पैसा ताई आणि जयंतराव पहिल्यांदा हा धागा यांनीखोडसाळपणे काढला आणि त्यानंतर खरा चेहरा समोर आल्यावर ते सोलापूर आणि अभ्याच्या मागे लपण्याच्या प्रयत्न चालू आहे.आणि आव मात्र गंभीर इतिहास संशोधकाचा आहे. यांचे वितंडवाद श्री केजरीवालांची आठवण करून देणारे आहेत. उगाच यांच्या नादाला लागणे हा कालापव्यय आहे.
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
प
पैसा Mon, 08/14/2017 - 17:21 नवीन
:)
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
M
mayu4u Mon, 08/14/2017 - 17:48 नवीन
... पाल खायचा हट्ट करणारा मुलगा आठवला. असो.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा